मारुतीराय मंदिर

मारूतीगड, मळा, पणजी, जि. उत्तर गोवा

पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराने गांजलेल्या हिंदू समाजाच्या संघर्षाचे, पाय रोऊन उभे राहण्याच्या वृत्तीचे प्रतिक म्हणजे गोव्याची राजधानी असलेल्या पणजीतील मळा भागातील मारूतीराय मंदिर. गोव्यातील पाच प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिराची स्थापना विसाव्या शतकात झाली. गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीहून अत्यंत भिन्न अशा शैलीत बांधलेले हे देखणे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. जत्रा भरणारे हे पणजीतील एकमेव मंदिर आहे. मारूतीरायाचे स्थान, मंदिराची वेगळी शैली आणि येथून दिसणारे पणजीच्या पूर्वेकडील भागाचे विहंगम दृश्य, यामुळे येथे भाविकांबरोबरच पर्यटकांचीही नित्य वर्दळ असते.

मारुती म्हणजे मरूताचा पुत्र. हनुमंत, हनुमान, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, महाबली, महावीर, अशा विविध नावांनी पूजली जाणारी ही मूळची लोकदेवता शक्ती, भक्ती आणि युक्तीचा आदर्श मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, मारुती हा सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. संत तुलसीदास यांनी सोळाव्या शतकात रचलेल्या ‘हनुमान चालिसा’ स्तोत्रामध्ये हनुमानाचे वर्णन ‘ज्ञान गुणसागर’, ‘महावीर’, ‘तेज प्रताप’ अशा शब्दांत केले आहे. हनुमान ही सर्व संकटांपासून सुटका करणारी देवता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी प्रभू श्रीराम व हनुमानास उपास्य मानून समाजात धार्मिक क्रांती घडवून आणली. रामदास स्वामींनी ‘हनुमान स्तोत्रा’त ‘भीमरूपी’, ‘महाबळी’ या स्वरूपात त्याचे वर्णन केले आहे. बलोपासना हे त्यांच्या समर्थ संप्रदायातील उपासनेचे एक महत्त्वाचे अंग होते.

धर्मांध पोर्तुगीजांच्या राजवटीत आपला धर्म टिकवण्यासाठी अनेकांनी मोठा संघर्ष केला. त्यातून पुढे पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण मवाळ झाले. यानंतरच्या कालखंडात येथे नव्याने मंदिरांची स्थापना करण्यात येऊ लागली. पणजीतील मारुतीरायाचे मंदिर हे त्यांपैकीच एक होय. या मंदिराचा इतिहास असा की विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पणजीतील काही समाजधुरिणांना येथे मारूतीचे मंदिर असावे असे वाटू लागले. नानू तारकर (बाबलो) पेडणेकर, जनो रामा रेडकर हे पणजीतील मातब्बर गृहस्थ त्यांपैकीच. त्यांनी एके दिवशी माळा भागातील विठ्ठल-रखुमाईच्या छोट्या मंदिरात एक बैठक घेतली आणि त्यात येथे मारूतीचे मंदिर बांधावे असे ठरले. या मंदिरासाठी जानो रेडकर यांनी पोर्तुगीजांकडून माळा येथील टेकडीवरील जमीन भाडेपट्ट्याने प्राप्त केली. मंदिरासाठीचा मोठा खर्च उलण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. इ.स. १९३१ मध्ये या मंदिराच्या बांधकामास प्रारंभ झाला. २५ जानेवारी १९३४ रोजी माघ शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर या मंदिरात मारूतीरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिर परिसराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखात ही तारीख नोंदवलेली आहे. येथील मारूतीरायाची मूर्ती पणजीतील तत्कालिन बडे व्यापारी रामदास गोकुळदास शेटे गुजर यांनी राजस्थानातून आणली होती, असे सांगण्यात येते. ९०च्या दशकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

पणजीतील अल्टिन्हो हिलच्या पूर्वेकडील भागात मारूतीरायाचे हे मंदिर वसले आहे. पोर्तुगीज भाषेत अल्टो म्हणजे उंच. त्यावरून या टेकडीस अल्टिन्हो असे नाव पडले. पणजीतील हा एक अत्यंत निसर्गरम्य आणि उच्चभ्रू भाग गणला जातो. या टेकडी परिसरातच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. या शिवाय येथे पोर्तुगीज कौन्स्युलेट, आकाशवाणी केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यालय आदींच्या इमारती आहेत. येथील मारूतीरायाचे मंदिर वसलेल्या भागास मारूतीगड असे म्हटले जाते.

मारूतीगडाखाली रस्त्यालगत केशरी रंगात रंगविलेली नक्षीदार प्रवेशकमान आहे. येथून मंदिर परिसरास येण्यासाठी अनेक पायऱ्यांचा मार्ग आहे. वर येताच दिसते केशरी रंगातील मारूती मंदिराची भव्य आणि तितकीच वैशिष्ट्यपूर्ण वास्तू. हे मंदिर एकाच सपाट जागेवर नसून ते तीन स्तरांत बांधलेले आहे. टेकडीखालून पायऱ्या चढून आल्यानंतर येथे छोट्या रस्त्याएवढी, एका बाजूने कठडे बांधलेली मोकळी जागा आहे. तेथून मंदिरात प्रवेशासाठी आणखी काही पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथे मंदिर परिसराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. सिमेंटचे चौकोनाकार स्तंभ, मध्यभागी कमान, वर दोन्ही बाजूंनी उतरत्या छप्परासारखे छत अशी या प्रवेशद्वाराची रचना आहे. येथून काही पायऱ्या चढून आल्यानंतर दोन्ही बाजूंस मोकळी जागा आहे. येथे डावीकडे तुलसी वृंदावन आणि मंदिराचा भव्य असा सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. त्यावर मोठा कलश आहे. या स्तंभांवरील दीपहस्तांवर मोठे कलशाकार, तर स्तंभावरील छोट्या छोट्या देवळ्यांत छोटे विद्युत दिवे बसवलेले आहेत. येथून आणखी काही पायऱ्या चढून आल्यानंतर मंदिर प्रांगणाच्या दुसऱ्या स्तरावर प्रवेश होतो. येथे समोर एका दालनामध्ये उंच चौथऱ्यावर हनुमानाची गदाधारी व अभयमुद्रेतील पाषाण मूर्ती विराजमान आहे. हनुमानाला इच्छादेवता मानले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की हनुमानास तैलाभिषेक केल्यास शनीची पिडा टळते. या मंदिरात येथील हनुमानाच्या पाषाणमूर्तीस तैलाभिषेकस केला जातो. हनुमानाच्या या स्थानाच्या दोन्ही बाजूंनी वरच्या स्तरावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथील प्रशस्त जागेत सर्वत्र संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. येथे बाजूला दोन मेघडंबऱ्या उभारलेल्या आहेत. या स्तरावर मारुतीरायाचे मुख्य देवालय आहे. या देवालयासमोरच्या भागात सिमेंटची शेड उभारलेली आहे. येथून मंदिराच्या महामंडपात प्रवेश होतो.

महामंडपास महिरपी कमान असलेले संगमरवरी प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना काचा बसवलेल्या मोठ्या खिडक्या आहेत. महामंडप अत्यंत प्रशस्त व दुमजली आहे. येथे गोलाकार स्तंभांवर सज्जासारखी रचना उभारलेली आहे. त्यातील लाकडी देव्हाऱ्यांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. या मंडपात पुढच्या बाजूस, गर्भगृहाच्या समोर लाकडी स्तंभ असलेला अर्धखुल्या स्वरुपाचा मंडप उभारण्यात आला आहे. सुंदर नक्षीकाम केलेल्या या मंडपाच्या छतावरील लाकडी देव्हाऱ्यात मध्यभागी श्रीराम-लक्ष्मण-सीता व नमस्कार मुद्रेतील हनुमान यांच्या काष्ठमूर्ती आहेत. या मूर्तींच्या डावीकडे भजनात तल्लिन अशा हनुमानाची, तर उजवीकडे पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. या देव्हाऱ्याच्या डावीकडील देवकोष्ठकात हनुमानाची, तर उजवीकडे गणेशाची रंगीत मूर्ती आहे.

गर्भगृहाची दर्शनभिंत व बाजूचे खांब नक्षीदार सुवर्णपत्रा जडवून सुशोभित केलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवळीमध्ये वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. आत चांदीच्या उंच चौथऱ्यावर चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये चांदीच्या आसनावर मारूतीरायाची सुवर्णाची मूर्ती विराजमान आहे. एकूण एक कोटी २३ लाख ४३ हजार ५०९ रुपये खर्च करून ही मूर्ती घडवण्यात आली आहे. या मूर्तीस सोन्याचा मुखवटा, गदा आणि वरदहस्त आहे. त्याकरीता एकूण २७ लाख ५८ हजार ५२३ रुपये खर्च करण्यात आला. तर देव्हारा, आसन याकरीता एकूण ८८ हजार ३५० रुपयांची चांदी वापरण्यात आली. हा खर्च भक्तांनी दिलेल्या देणग्यांतून करण्यात आला. मंदिराच्या गर्भगृहावर आगळ्या वेगळ्या पद्धतीचे तीन स्तरीय शिखर आहे. त्याचे खालचे दोन भाग षटकोनाकार आणि वरच्या स्तरात चारही बाजूंनी वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. त्यावर आमलक आणि कळस आहे. या शिखराच्या चारही कोपऱ्यांवर लहान मेघडंबऱ्या बसवण्यात आल्या आहेत. अत्यंत दुर्मीळ अशा प्रकारचे हे शिखर आहे.

या मंदिरात रविवार ते शुक्रवार सकाळी ७ ते १२.३० व दुपारी ४ ते ८ आणि दर शनिवारी सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या कालखंडात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. येथे दर शनिवारी भाविकांची मोठी गर्दी असते. १९३५ पासून रामनवमी, हनुमान जयंती, विजयादशमी, गणेश चतुर्थी श्रावणी शनिवार आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे पणजीमधील जत्रोत्सव होणारे एकमेव मंदिर आहे. माघ शुद्ध दशमीस या चार दिवसीय जत्रोत्सवास प्रारंभ होतो. या दिवशी सायंकाळी मारूतीरायाची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. माळा येथील पांडुरंगाच्या ज्या मंदिरात पहिल्यांदा मारूतीरायाच्या मंदिरस्थापनेचा विचार झाला, त्या मंदिरातून ही पालखी निघते. पुढचे तीन दिवस रोज रात्री देवालय परिसरातून पालखी मिरवण्यात येते. या तिन्ही दिवशी येथे विविध धार्मिक विधींबरोबरच रात्री नाटकाचाही प्रयोग होतो.

उपयुक्त माहिती:

  • पणजी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पणजीसाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापासून काहीशा दूर असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २४२६०९०
  • सुधीर नाईक, अध्यक्ष, मो. ८६६८८५६८९०,
  • नरेश पेडणेकर, उपाध्यक्ष, मो. ९४२११५०५१०

मारुतिराय मंदिर

मारुतिगढ़, पणजी, जिला उत्तर गोवा

पुर्तगाली शासकों के धार्मिक उत्पीड़न से संत्रस्त हिंदू समाज के सुदीर्घ संघर्ष एवं उनकी अदम्य जिजीविषा का जीवंत प्रतिमान है गोवा की राजधानी पणजी के मला क्षेत्र में स्थित यह भव्य मारुतिराय मंदिर। गोवा के पांच प्रमुख देवालयों में परिगणित इस पावन स्थल की स्थापना बीसवीं शताब्दी में हुई थी। गोमंतकीय मंदिर स्थापत्य शैली से सर्वथा भिन्न और विलक्षण कलात्मकता से आपूरित यह नयनाभिराम मंदिर एक उत्तुंग गिरि-शिखर पर प्रतिष्ठित है। यह पणजी का एकमात्र ऐसा मंदिर है जहाँ वार्षिक मेले का आयोजन होता है। श्री मारुतिराय का पावन सान्निध्य, मंदिर की विशिष्ट वास्तुकला और यहाँ से दृष्टिगोचर होने वाला पणजी के पूर्वी भाग का विहंगम दृश्य – इनके आकर्षण के कारण यहाँ श्रद्धालुओं के साथ-साथ पर्यटकों का भी नित्य आवागमन बना रहता है।

मारुति अर्थात मरुत-नंदन। हनुमंत, हनुमान, बजरंगबली, आंजनेय, पवनपुत्र, महाबली, महावीर जैसे अगणित नामों से पूजित यह आदि लोक-देवता शक्ति, भक्ति और युक्ति के अनुपम आदर्श माने जाते हैं। धार्मिक मान्यताओं के अनुसार मारुति सप्तचिरंजीवियों में से एक हैं। षोडश शताब्दी में गोस्वामी तुलसीदास जी द्वारा विरचित ‘हनुमान चालीसा’ में उनका वर्णन ‘ज्ञान गुण सागर’, ‘महावीर’ और ‘तेज प्रताप’ जैसे विशेषणों से किया गया है। उन्होंने हनुमान जी को समस्त संकटों से मुक्ति प्रदाता देव के रूप में प्रतिष्ठित किया है। सत्रहवीं शताब्दी में समर्थ रामदास स्वामी ने प्रभु श्रीराम और श्री हनुमान को अपना आराध्य मानकर समाज में एक महती धार्मिक चेतना जागृत की। उन्होंने अपने ‘हनुमान स्तोत्र’ में उन्हें ‘भीमरूपी’ और ‘महाबली’ के रूप में वर्णित किया है। बलोपासना उनके समर्थ संप्रदाय की साधना का एक अपरिहार्य अंग रही है।

धर्मांध पुर्तगाली शासन के कालखंड में स्वधर्म की रक्षा हेतु अनेक वीरों ने भीषण संघर्ष किया, जिसके फलस्वरूप कालांतर में पुर्तगालियों की धार्मिक नीति कुछ शिथिल हुई। इसी कालखंड में यहाँ नूतन मंदिरों की स्थापना का मार्ग प्रशस्त हुआ, जिनमें पणजी का यह मारुतिराय मंदिर प्रमुख है। इस मंदिर का इतिहास यह है कि बीसवीं शताब्दी के पूर्वार्ध में पणजी के कुछ समाज-ध्वजवाहकों के अंतर्मन में यहाँ हनुमान जी के मंदिर की स्थापना की इच्छा जाग्रत हुई। पणजी के प्रतिष्ठित सज्जन नानु तारकर (बाबलो) पेडणेकर एवं जनो रामा रेडकर उनमें अग्रणी थे। उन्होंने एक दिन मला क्षेत्र के विठ्ठल-रखुमाई के लघु मंदिर में एक गोष्ठी आयोजित की, जहाँ मारुति मंदिर के निर्माण का संकल्प लिया गया। इस पावन कार्य हेतु जानो रेडकर ने पुर्तगाली प्रशासन से मला की इस पहाड़ी भूमि को पट्टे पर प्राप्त किया और निर्माण के वृहद व्यय को वहन करने का उत्तरदायित्व भी स्वीकार किया। ईसवी सन १९३१ में मंदिर का निर्माण कार्य प्रारंभ हुआ और २५ जनवरी १९३४ को माघ शुक्ल सप्तमी के शुभ मुहूर्त पर मारुतिराय की प्राण-प्रतिष्ठा संपन्न हुई। मंदिर परिसर के मुख्य द्वार पर स्थित शिलालेख में यह तिथि अंकित है। जनश्रुति है कि यहाँ प्रतिष्ठित मारुतिराय की प्रतिमा को पणजी के तत्कालीन लब्धप्रतिष्ठ व्यापारी रामदास गोकुलदास शेटे गुजर राजस्थान से लाए थे। ९० के दशक में इस देवालय का पुनरुद्धार किया गया।

पणजी के अल्टिन्हो हिल के पूर्वी अंचल में श्री मारुतिराय का यह मंदिर स्थित है। पुर्तगाली भाषा में ‘अल्टो’ का अर्थ उच्च होता है, जिससे इस पहाड़ी का नाम अल्टिन्हो पड़ा। यह पणजी का अत्यंत नैसर्गिक सौंदर्य से परिपूर्ण और अभिजात्य क्षेत्र माना जाता है। इसी पहाड़ी क्षेत्र में गोवा के मुख्यमंत्री का आधिकारिक निवास स्थित है। इसके अतिरिक्त यहाँ पुर्तगाली दूतावास, आकाशवाणी केंद्र और सार्वजनिक निर्माण विभाग के मुख्यालय जैसे राजकीय भवन भी विद्यमान हैं। जिस स्थान पर मारुतिराय का मंदिर प्रतिष्ठित है, उसे ‘मारुतिगढ़’ के नाम से अभिहित किया जाता है।

मारुतिगढ़ के नीचे पथ के समीप केसरिया वर्ण में रंजित एक अलंकृत प्रवेश द्वार है। यहाँ से मंदिर प्रांगण तक पहुँचने के लिए सोपान मार्ग निर्मित है। ऊपर पहुँचते ही केसरिया आभा से मंडित मारुति मंदिर की भव्य और विशिष्ट संरचना दृष्टिगोचर होती है। यह मंदिर किसी एक समतल भूमि पर न होकर तीन स्तरों में निर्मित है। पहाड़ी के नीचे से सोपानों द्वारा ऊपर आने पर एक विस्तृत मार्ग जैसी रिक्त भूमि है, जिसके एक ओर सुरक्षा प्राचीर बनी है। यहाँ से मंदिर में प्रवेश हेतु कुछ और सोपान निर्मित हैं, जहाँ देवालय का मुख्य द्वार स्थित है। सीमेंट के चौकोर स्तंभ, मध्य में मेहराब और ऊपर दोनों ओर ढलुआँ छत जैसी इस द्वार की विशिष्ट संरचना है। यहाँ से कुछ सोपान ऊपर चढ़ने पर दोनों ओर रिक्त स्थान है, जहाँ बाईं ओर तुलसी वृंदावन और मंदिर का भव्य षट-स्तरीय दीपस्तंभ है, जिसके शीर्ष पर एक विशाल कलश स्थापित है। इन स्तंभों के दीप-हस्तकों पर कलशाकार आकृतियाँ और लघु देवकोष्ठकों में विद्युत दीप प्रज्ज्वलित हैं। यहाँ से पुन: कुछ सोपान चढ़ने पर प्रांगण के द्वितीय स्तर पर प्रवेश होता है। यहाँ सम्मुख एक दीर्घा में उच्च वज्रपीठिका पर हनुमान जी की गदाधारी और अभयमुद्रा में उत्कीर्ण पाषाण प्रतिमा विराजमान है। हनुमान जी को इच्छा-पूर्ति के देवता के रूप में पूजा जाता है। श्रद्धालुओं की ऐसी अटूट श्रद्धा है कि हनुमान जी को तैलाभिषेक करने से शनि की पीड़ा का शमन होता है, अतः यहाँ पाषाण प्रतिमा का तैलाभिषेक किया जाता है। इस स्थान के बाईं और दाईं ओर के भाग से ऊपरी स्तर पर जाने हेतु सोपान बने हैं। यहाँ के प्रशस्त प्रांगण में सर्वत्र संगमरमर जड़ा हुआ है और पार्श्व में दो छतरियां निर्मित हैं। इसी स्तर पर मारुतिराय का मुख्य देवालय स्थित है, जिसके सम्मुख सीमेंट का एक मंडप है, जहाँ से मंदिर के महामंडप में प्रवेश प्राप्त होता है।

महामंडप का प्रवेश द्वार संगमरमर से निर्मित है जिसमें कलात्मक मेहराब बनी हैं। इसके दोनों पार्श्व में कांच की वृहद खिड़कियाँ हैं। यह महामंडप अत्यंत विशाल और द्विमंजिला है। यहाँ वृत्ताकार स्तंभों पर छज्जे जैसी संरचना निर्मित है, जिसके काष्ठ निर्मित देवगृहों में विभिन्न देवताओं की प्रतिमाएँ सुशोभित हैं। इस मंडप के अग्र भाग में, गर्भगृह के सम्मुख काष्ठ स्तंभों वाला एक अर्ध-विस्तृत मंडप निर्मित है। अत्यंत सूक्ष्म नक्काशी से अलंकृत इस मंडप की छत पर स्थित काष्ठ-मंदिर के मध्य में श्रीराम, लक्ष्मण, सीता और वंदन मुद्रा में हनुमान जी की काष्ठ प्रतिमाएँ विराजमान हैं। इन प्रतिमाओं के बाईं ओर भजन में तल्लीन हनुमान जी और दाईं ओर पंचमुखी हनुमान की प्रतिमा सुशोभित है। इस देवगृह के बाईं ओर के देवकोष्ठक में हनुमान जी और दाईं ओर के देवकोष्ठक में गणेश जी की सप्तवर्णीय प्रतिमा प्रतिष्ठित है।

गर्भगृह की दर्शन-भित्ति और पार्श्व स्तंभ स्वर्ण-पत्रों की नक्काशी से अलंकृत हैं। गर्भगृह के द्वार के दोनों ओर वैष्णव द्वारपालों की प्रतिमाएँ हैं। अंतर्भाग में रजत की उच्च वज्रपीठिका पर रजत निर्मित देवगृह में रजत आसन पर मारुतिराय की सुवर्ण प्रतिमा विराजमान है। कुल १,२३,४३,५०९ रुपये के व्यय से इस प्रतिमा का निर्माण हुआ है। इस विग्रह में स्वर्ण का मुखौटा, गदा और वरदहस्त है, जिसके निमित्त २७,५८,५२३ रुपये का व्यय हुआ, जबकि देवगृह और आसन हेतु ८८,३५० रुपये मूल्य की रजत सामग्री प्रयुक्त हुई। यह संपूर्ण व्यय श्रद्धालुओं द्वारा अर्पित दान राशि से पूर्ण किया गया। मंदिर के गर्भगृह के ऊपर एक विलक्षण त्रि-स्तरीय शिखर है। इसके निचले दो भाग षटकोणीय हैं और ऊपरी स्तर पर चारों दिशाओं से क्रमिक रूप से संकरा होता हुआ शिखर है, जिसके शीर्ष पर आमलक और कलश स्थापित हैं। शिखर के चारों कोनों पर लघु छतरियां स्थित हैं, जो इस स्थापत्य को अत्यंत दुर्लभ बनाती हैं।

इस पावन मंदिर में रविवार से शुक्रवार तक प्रातः ७:०० से १२:३० एवं अपराह्न ४:०० से ८:०० बजे तक तथा प्रत्येक शनिवार को प्रातः ६:३० से रात्रि ९:३० बजे तक श्रद्धालु दर्शन लाभ ले सकते हैं। प्रत्येक शनिवार को यहाँ श्रद्धालुओं का अपार जनसमूह उमड़ता है। वर्ष १९३५ से यहाँ रामनवमी, हनुमान जयंती, विजयादशमी, गणेश चतुर्थी और श्रावणी शनिवार जैसे उत्सव परम उत्साह के साथ मनाए जाते हैं। हनुमान जयंती के पावन अवसर पर श्रद्धालुओं को महाप्रसाद वितरित किया जाता है। इस मंदिर की एक अन्य विशेषता यह है कि हर साल यहाँ मेले का आयोजन होता है। माघ शुक्ल दशमी से इस चतुर्दिवसीय वार्षिक उत्सव का शुभारंभ होता है। इस दिन सायंकाल में मारुतिराय की पालकी शोभायात्रा निकाली जाती है। यह पालकी मला स्थित पांडुरंग के उसी मंदिर से प्रस्थान करती है जहाँ सर्वप्रथम मारुतिराय मंदिर की स्थापना का विचार अंकुरित हुआ था। आगामी तीन दिनों तक प्रति रात्रि मंदिर परिसर में पालकी यात्रा निकाली जाती है और विभिन्न धार्मिक अनुष्ठानों के साथ-साथ रात्रि में नाट्य मंचन भी संपन्न होते हैं।

उपयोगी जानकारी:

  • पणजी बस स्थानक से २ कि.मी. की दूरी पर
  • राज्य के विभिन्न नगरों से पणजी के लिए राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध है
  • निजी वाहन मंदिर से कुछ दूरी पर स्थित वाहन पार्किंग स्थल तक आ सकते हैं
  • निकटवर्ती क्षेत्र में आवास एवं अल्पाहार के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं
  • संपर्क: मंदिर कार्यालय, दूरभाष: ०८३२-२४२६०९०
  • सुधीर नाईक, अध्यक्ष, मो. ८६६८८५६८९०
  • नरेश पेडणेकर, उपाध्यक्ष, मो. ९४२११५०५१०
Back To Home