‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’ या ‘महानंदा’ चित्रपटाकरीता शांता शेळकेंनी लिहिलेल्या व उषा मंगेशकर, राणी वर्मा यांनी गायलेल्या अजरामर गीताने संपूर्ण महाराष्ट्रास परिचित झालेला मंगेश हे गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय दैवत होय. मंगिरीश वा मंगेश या नावाने विराजमान असलेल्या महादेवाचे येथील देवस्थान हे गोव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक संचित मानले जाते. या मंदिरात रोज शेकडो भाविक तसेच देश-विदेशातील पर्यटक दर्शनासाठी येतात. पंडित नेहरूंनी येथे येऊन मंगेशाचे दर्शन घेतले होते.
इसवी सनाच्या तेराव्या शतकानंतर रचण्यात आलेल्या व स्कंद पुराणांतर्गत असलेल्या सह्याद्री खंडात ‘मांगीशमाहात्म्य’ कथन केले आहे. त्यातील आख्यायिका अशी की एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती हे द्यूत खेळत होते. त्यात पार्वतीचा विजय झाला. तेव्हा तीने कठोर शब्दांनी शंकराची खिल्ली उडवली. ते शब्द ऐकून शंकरास फार कष्ट झाले व त्यांनी स्थानत्याग करण्याचा निर्णय घेतला. तेथून निघून ते कृष्णा-वेण्णाच्या संगमावर संगमेश्वर येथे आले. तेथे ते तप करू लागले. नंतर परशुरामाने स्थापन केलेल्या भूमीत राहावे, असे ठरवून ते तेथे राहू लागले. दरम्यान, गंगेसह शंकर स्थान सोडून गेल्याने पार्वती दुःखी झाली. तेव्हा सख्यांनी तिला शंकराचा शोध घे, असे सांगितले. या काळात शंकर रामेश्वर, हरिहरेश्वर येथे वास करून गोमंतक पर्वतावर आले.
इकडे पार्वतीमाता महादेवास सर्वत्र शोधत शोधत अघाशी नदीच्या पश्चिम तीरावर पोचली. तेथे तिने शंकराची आराधना केली. त्यावेळी पार्वती नदीत स्नानास गेली असता अचानक तिच्यासमोर एक वाघ आला. शंकरानेच त्या वाघाचे रूप धारण केले होते. त्याचे अक्राळविक्राळ रूप पाहून पार्वती घाबरली व तिने ‘त्राही माम् गिरीश’ म्हणजे ‘हे गिरीशा, मला वाचव’ असा धावा केला. परंतु भयव्याकुळतेमुळे तिच्या मुखातून केवळ माम् गिरीश वा मांगीश असे शब्द बाहेर पडले. ते ऐकून भगवान शंकरांनी व्याघ्ररूप टाकून शिवरूप धारण केले. यानंतर काही काळ येथे वास्तव्य करून शंकर-पार्वती कैलासास परतले.
जाण्यापूर्वी पार्वती मातेच्या इच्छेनुसार, शंकराने येथे मांगीश या नावाने शिवलिंग स्थापन केले. हे स्थान म्हणजे कुशस्थली होय व मांगीशचेच पुढे मंगेश झाले. अन्य एका नामस्पष्टीकरण कथेनुसार, पार्वतीने उच्चारलेल्या ‘माम् गिरीश’ या शब्दाचे अपभ्रंशरूप मांगरीश असे झाले व त्याचेच पुढे मंगेश असे रूप झाले. या स्थळाविषयीची आणखी एक कथा सह्याद्री खंडात आहे. ती अशी की कनौज देशी देवशर्मा नावाचा वत्सगोत्री ब्राह्मण राहात असे. तो पत्नीसह तीर्थयात्रा करीत चालला असता अघाशी नदीजवळ पोचला व तेथे वास्तव्य करू लागला. एकदा त्यास येथे अत्यंत अद्भत असे दृश्य दिसले. दुपारच्या वेळी या नदीत एका गाईने प्रवेश केला व पाण्यात बुडूनसुद्धी ती पुन्हा बाहेर आली. हे काय घटीत आहे याचा शोध त्याने सुरू केला व एकदा ती गाय पाण्यात जाऊ लागली तेव्हा तिची शेपटी धरून तो पाण्यात गेला. तेथे त्याला शंकराच्या तेजोरूप लिंगाचे दर्शन झाले. त्या लिंगावर त्या गोमातेने दुग्धाभिषेक केला. त्या ब्राह्मणानेही शंकराची प्रार्थना केली. ते मांगीशाचे लिंग होते. कालांतराने ते ईश्वरेच्छेने पाण्याबाहेर आले.
या देवशर्मा ब्राह्मणाची ग्रामपुरूष म्हणून पूजा केली जाते.
या विषयीच्या अन्य एका आख्यायिकेनुसार, कुशस्थलीतील मंगेशाच्या लिंगाभोवती कालांतराने जंगल माजले व ते लिंग मातीत गाडले गेले. यास अनेक वर्षे लोटली. येथे काही गोपालक आपली गाईगुरे चरण्यासाठी आणत असत. एकदा एका गोपालकास येथे अद्भूत दृश्य दिसले की एक गाय आपल्या कळपापासून दूर जाऊन विशिष्ट स्थानी पान्हा सोडत होती. ही बाब त्याने देवशर्मा या ब्राह्मणास सांगितली. त्याने येथे येऊन शोध घेतला. खोदकामात त्यांना एक शिवलिंग सापडले. लोकांनी तेथे छोटेसे मंदिर बांधले व या शिवलिंगाची ते पूजा करू लागले. ज्या गोपालास प्रथम ते दृश्य दिसले, त्यास आता प्रियोळ येथील मंगेशाच्या परिवार दैवतांत स्थान देण्यात आले आहे. येथे त्याची मूलकेश्वर या नावाने पूजा केली जाते.
मंगेश देवालयाचे आद्यस्थान हे अशा प्रकारे कुशस्थली (हल्लीचे कुठ्ठाळ) येथे होते. असे सांगण्यात येते की येथील देवालय अत्यंत वैभवशाली होते. मंदिरात सोन्याचांदीचे दागदागिने, भरजरी रेशमी वस्त्रे अशा नानाविध मौल्यवान वस्तू होत्या. देवालयातील मोठ्या घंटा चांदीच्या मोठ्या साखळदंडांना टांगलेल्या होत्या.
पोर्तुगीज आक्रमणानंतर या देवालयावर संकट आले. २८ फेब्रुवारी १५१० या काळ्या दिवशी गोवा बेटात पोर्तुगीज आरमार अवतरले आणि या भूमीच्या दुर्दशेस प्रारंभ झाला. धर्मांध पोर्तुगीजांनी गोव्यातील हिंदू-मुस्लिमांस बाटवण्यास सुरूवात केली. येथील देवस्थानांवर त्यांची वक्रदृष्टी वळली. पोर्तुगालच्या राणीने लिस्बन येथून २६ मार्च १५५९ रोजी एक फर्मान जारी केले. त्यानुसार यापुढे गोवा बेट व संलग्न बेटांत हिंदूंची देवालये असणार नाही. त्यातील मूर्ती कोणत्याच घरात वा बाहेर असता कामा नयेत. त्या संपूर्णपणे उद्ध्वस्त करून जाळून टाकण्यात याव्यात. या हुकूमाने येथील बिगर ख्रिश्चनांना त्यांची धार्मिक कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली. या परिस्थितीत पोर्तुगीज धर्मगुरू आणि सैनिकांची वाकडी नजर कुठ्ठाळवर लवकरच वळणार हे पाहून मंगेशाच्या कुळाव्यांनी एक गुप्त बैठक घेतली. शेजारील अंत्रुज प्रांतात मंदिरास सुरक्षितता लाभेल या खात्रीने गावातील लोकांनी तेथे मूर्तींचे स्थलांतर करण्याचे ठरविले. मंगेशाच्या शिवलिंगासह परिवार देवतांच्या मूर्ती वा प्रतिके बरोबर घेऊन गावकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात गुपचूप अंत्रुज प्रांताचा रस्ता धरला. होडीने नदी ओलांडून ते मडकईच्या तीरावर आले व तेथून ती मूर्ती प्रियोळमधील हाडिये या खेड्यातील मंगेशी वाड्यावर आणली. ही घटना इ.स. १५६० मध्ये घडली.
इतिहासाचार्य विनायक नारायण शेणवी धुमे यांचा असा कयास आहे की त्या वर्षीच्या कार्तिक शुक्ल द्वादशीची रात्र व त्रयोदशी या दिवशी हे स्थलांतर झाले असावे. त्याच प्रमाणे प्रियोळमध्ये १५६१ मध्ये माघ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी मंगेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी. याच तिथीला येथे मंगेश देवस्थानचा वार्षिक महोत्सव साजरा केला जातो.
येथील देवस्थान स्थापनेच्या ज्ञात इतिहासानुसार, इ.स. १७४४ आणि १८९० मध्ये या देवालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुढे पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्यानंतर हे देवालय पुरातन वास्तू म्हणून जाहीर केले. १९७०मध्ये देवालयाची वास्तू मंदिर समितीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पुन्हा देवालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला. १७ फेब्रुवारी १९७३ रोजी हे जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाले. त्यावेळी गौडपादाचार्य संस्थान, कैवल्यपूरचे मठाधीश सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले.
गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात या मंदिरास महत्त्वाचे स्थान आहे.
कवी सुबानंत, तसेच विठ्ठल कृष्ण कायकिणी यांनी याच मंदिरात बसून श्रीमांगीश माहात्म्य लिहिले. याच प्रमाणे महेश्वरशास्त्री सुखठणकर यांनी ‘मांगिरिशाष्टकम्’च्या लेखनास येथेच प्रारंभ केला. या मंदिरात शिवस्तुती केली जात असे. त्यातूनच येथे संगीताची मोठी परंपरा निर्माण झाली. येथील उत्सवांतील सांगितिक कार्यक्रमांसाठी मोठमोठ्या गायक-कलावंतांना येथे पाचारण केले जात असे. या मंदिराचा आणि मंगेशकर घराण्याचा निकटचा संबंध होता. भारतरत्न लता मंगेशकर यांचे वडिल मास्टर दिनानाथांचा जन्म मंगेशाची पूजा करणाऱ्या सेवेकऱ्यांपैकी अभिषेकी नामक ब्राह्मण घराण्यात २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. त्यांना संगीताचे बाळकडू येथूनच प्राप्त झाले. देवालयातील मंत्र, गायनातून त्यांच्यावर बालपणी संगीत संस्कार झाले. या देवालयात येऊन अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी, अगणित साधुसंतांनी मंगेशाचे दर्शन घेतले आहे. यात भारताचे तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच स्वामी विवेकानंद यांचा समावेश आहे.
निसर्गरम्य वातावरणात, उंच जागेवर हे मंदिर वसले आहे. मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर प्रसाद साहित्याबरोबरच मूर्ती,
कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांची मोठी रांग आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर डावीकडे मोठी पुष्करणी आहे. काही पायऱ्या चढून, मंदिराच्या महाद्वारातून प्राकारात प्रवेश होतो. येथे मंदिराच्या सन्मुख कालभैरवाचे मंदिर आहे. डावीकडे अतिभव्य असा आठ स्तरीय अष्टकोनी दीपस्तंभ आहे. हा गोव्यातील सर्वांत उंच दीपस्तंभ असल्याचे सांगितले जाते. यापुढे मंदिराची भव्य दुमजली वास्तू उभी आहे. गोमंतकीय स्थापत्यशैलीतील या देवालयाची संरचना मुखद्वार, मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. मुखमंडपावर खाली षटकोनी बांधकाम व त्यावर घुमट आणि कलश असलेले शिखर आहे. सभामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे, तर गर्भगृहावर खालचा भाग अष्टकोनी बांधकामाचा, त्यावर घुमट, त्याच्याही वर गोलाकार देवळीसारखी रचना आणि तिच्या घुमटावर कलश अशा प्रकारचे शिखर आहे. मुखमंडप आणि सभामंडपास अनेक कमानदार खिडक्या आहेत. भव्य गोलाकार स्तंभ, उंच वितान, त्यातील काचेच्या हंड्या आणि झुंबरे, जमिनीवरील संगमरवरी चकचकीत फरशा यांद्वारे येथील सभामंडप सुशोभित करण्यात आला आहे. सभामंडपातून पुढच्या बाजूला डाव्या आणि उजव्या दिशेला दोन प्रवेशमंडप आहेत. सभामंडपात नंदीची चांदीचा पत्रा मढवलेली मोठी मूर्ती आहे.
त्यापुढे संगमरवरी चौकावर देवशर्मा या ग्रामपुरूषाची मूर्ती आहे.
अर्धमंडपाच्या दर्शनीभिंतीस लागून चांदीच्या मखरात डावीकडे काळ्या पाषाणात घडवलेली गणेशाची, तर उजवीकडे देवी भगवतीची मूर्ती विराजमान आहे. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या उंच देवकोष्ठकांत वैष्णव द्वारपालांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. द्वारचौकटीच्या वरील बाजूस मंगेशाची मोठी प्रतिमा लावलेली आहे व तिच्या बाजूस चांदीत कोरलेल्या नंदिकेश्वराची शिल्पे आहेत. अर्धमंडपातून मंदिराच्या गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे. आत अष्टकोनाकार गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार बारीक नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. त्याच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती व दोन्ही बाजूंस दोन-दोन नागमूर्ती आहेत. गर्भागृहात मंगेशाचे पुष्पमालांनी सुशोभित शिवलिंग आहे. त्याभोवती नागप्रतिमा आहेत. त्याच्या मागच्या बाजूस एका उच्चासनावर मंगेशाचा मुखवटा प्रतिष्ठापित आहे. दाढी-मिशा, कपाळावर मोत्यांच्या माळा, मस्तकी नागफणा व गंगा अशा स्वरूपात येथे महादेव विराजमान आहेत. या मुखवट्याच्या मागे सोन्याची आणि चांदीची मोठी प्रभावळ आहेत. त्यावर मध्यभागी कीर्तिमुख व विविध शुभचिन्हे कोरलेली आहेत.
देवालयाच्या मागच्या, पश्चिमेकडील बाजूस काही अंतरावर एका मंदिरातील एका गर्भगृहात शीलास्वरूपातील मुलकेश्वर विराजमान आहे. त्या बाजूच्या गर्भागारात लक्ष्मीनारायणाची मूर्ती, शीलास्वरूपातील सूर्यनारायण, मूर्तीस्वरूपात गरुडदेव, तसेच लिंगरूपात वीरभद्र व देवी सातेरीचे स्थान आहे.
मंदिरात विविध सण आणि उत्सव विधिवत साजरे केले जातात. चैत्रात रामनवमी, वैशाखात अक्षय्यतृतीया, आषाढात शुद्ध पक्षात श्रीशयन द्वादशी, श्रावणात श्रीकृष्ण जन्माष्टमी, अश्विन नवरात्र, तसेच कोजागरी पौर्णिमा, दीपावली, कार्तिकात शुद्ध प्रतिपदेपासून चौदा दिवसांचा दीपोत्सव, मार्गशीर्षात शुद्ध एकादशीस गीता जयंती आदी उत्सव येथे हर्षोल्हासात साजरे केले जातात. माघ शुक्ल सप्तमी ते माघ पौर्णिमा या काळात भरणारी जत्रा हा येथील मोठा उत्सव. याची सुरूवात सप्तमीला विजयरथाने होते. अष्टमीला हत्ती अंबारी, नवमीला शिबिकोत्सव, दशमीला खांद्यावरील रथ, एकादशीला रौप्य शिबिकोत्सव, द्वादशीला मंदिराच्या तळ्यात नौका विहार, त्रयोदशीला सुखासन, चतुर्दशीला धाकटा रथ, पौर्णिमेला थोरला रथ असे कार्यक्रम होतात. भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये येथे माघ कृष्ण त्रयोदशीला पहाटे चारपासून श्रींच्या अभिषेकास प्रारंभ होतो. तो दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू असतो. या उत्सवांस होणाऱ्या भाविकांच्या गर्दीप्रमाणेच येथे देशविदेशातील पर्यटकांचीही नेहमी गर्दी असते.
‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे…’ मराठी फ़िल्म ‘महानंदा’ के लिए शांता शेलके द्वारा रचित एवं उषा मंगेशकर व रानी वर्मा द्वारा स्वरबद्ध इस अमर गीत से संपूर्ण महाराष्ट्र में सुविख्यात हुए श्री मंगेश, गोवा के सर्वाधिक लोकप्रिय आराध्य देव हैं। मंगिरीश अथवा मंगेश के नाम से विराजमान महादेव का यह देवालय गोवा की धार्मिक और सांस्कृतिक धरोहर माना जाता है। इस मंदिर में प्रतिदिन सैकड़ों श्रद्धालु तथा देश-विदेश के पर्यटक दर्शन हेतु पधारते हैं। पंडित नेहरू ने भी यहाँ आकर मंगेश के दर्शन किए थे।
ईसवी सन की तेरहवीं शताब्दी के पश्चात रचित एवं स्कंद पुराण के अंतर्गत समाहित सह्याद्रि खंड में ‘मांगीश माहात्म्य’ का वर्णन प्राप्त होता है। वहाँ वर्णित पौराणिक कथा के अनुसार, एक समय कैलाश पर्वत पर भगवान शंकर और माता पार्वती द्यूत क्रीड़ा कर रहे थे। उसमें पार्वती विजयी हुईं, तब उन्होंने कठोर शब्दों में शंकर का उपहास किया। उन शब्दों से शंकर अत्यंत व्यथित हुए और उन्होंने स्थान त्याग का निर्णय लिया। वहाँ से प्रस्थान कर वे कृष्णा-वेणा के संगम पर संगमेश्वर पधारे और तपस्या में लीन हो गए। तत्पश्चात परशुराम द्वारा स्थापित भूमि पर निवास करने का निश्चय कर वे वहीं रहने लगे। इसी अंतराल में, गंगा सहित शंकर के स्थान छोड़ देने से पार्वती अत्यंत दुखी हुईं। तब उनकी सखियों ने उन्हें शंकर की खोज करने का परामर्श दिया। उस कालखंड में शंकर रामेश्वर और हरिहरेश्वर में वास करते हुए गोमंतक पर्वत पर आए।
इधर माता पार्वती महादेव को सर्वत्र खोजते हुए अघाशी नदी के पश्चिमी तट पर पहुँचीं। वहाँ उन्होंने शंकर की आराधना की। उस समय जब पार्वती नदी में स्नान हेतु गईं, तब अकस्मात उनके सम्मुख एक व्याघ्र प्रकट हुआ। स्वयं शंकर ने ही वह व्याघ्र रूप धारण किया था। उस विकराल रूप को देखकर पार्वती भयभीत हो उठीं और उन्होंने ‘त्राही माम् गिरीश’ अर्थात ‘हे गिरीश, मेरी रक्षा करो’ कहकर पुकारा। किंतु भय की व्याकुलता के कारण उनके मुख से केवल ‘माम् गिरीश’ अथवा ‘मांगीश’ शब्द ही निकले। यह सुनकर भगवान शंकर ने व्याघ्र रूप त्यागकर शिव रूप धारण किया।
इसके पश्चात कुछ समय यहाँ निवास कर शंकर-पार्वती कैलाश लौट गए। प्रस्थान से पूर्व माता पार्वती की इच्छानुसार, शंकर ने यहाँ ‘मांगीश’ नाम से शिवलिंग स्थापित किया। यही स्थान ‘कुशस्थली’ है और वही मांगीश कालांतर में ‘मंगेश’ के रूप में प्रसिद्ध हुए। एक अन्य नाम-स्पष्टीकरण कथा के अनुसार, पार्वती द्वारा उच्चारित ‘माम् गिरीश’ शब्द का अपभ्रंश रूप ‘मांगरीश’ हुआ और वही आगे चलकर ‘मंगेश’ के रूप में परिवर्तित हो गया। इस स्थल के विषय में सह्याद्रि खंड में एक और कथा वर्णित है। कन्नौज देश में देवशर्मा नामक वत्स गोत्रीय ब्राह्मण रहते थे। वे अपनी पत्नी के साथ तीर्थयात्रा करते हुए अघाशी नदी के समीप पहुँचे और वहीं निवास करने लगे। एक बार उन्होंने वहाँ अत्यंत अद्भुत दृश्य देखा। मध्याह्न के समय इस नदी में एक गौ ने प्रवेश किया और जल में निमग्न होकर भी वह पुनः सुरक्षित बाहर आ गई। इस रहस्य की खोज में वे लग गए और एक बार जब वह गौ जल में जाने लगी, तब उसकी पूँछ पकड़कर वे भी जल के भीतर चले गए। वहाँ उन्हें शंकर के तेजोमय लिंग के दर्शन हुए। उस लिंग पर उस गौ माता ने दुग्धाभिषेक किया था। उस ब्राह्मण ने भी शंकर की स्तुति की। वह मांगीश का ही लिंग था, जो कालांतर में ईश्वरीय इच्छा से जल के बाहर प्रकट हुआ। इन देवशर्मा ब्राह्मण की पूजा आज भी ग्राम पुरुष के रूप में की जाती है।
इस विषय में एक अन्य लोककथा के अनुसार, कुशस्थली में मंगेश लिंग के चारों ओर काल के प्रभाव से सघन वन निर्मित हो गया और वह लिंग मिट्टी में विलीन हो गया। इस घटना को अनेक वर्ष व्यतीत हो गए। यहाँ कुछ गोपालक अपनी गौओं को चराने हेतु लाते थे। एक बार एक गोपालक को वहाँ अद्भुत दृश्य दिखाई दिया कि एक गौ अपने झुंड से पृथक होकर एक विशिष्ट स्थान पर दुग्ध की धारा प्रवाहित कर रही थी। यह वृत्तांत उसने देवशर्मा ब्राह्मण को सुनाया। उन्होंने वहाँ आकर अन्वेषण किया और उत्खनन में उन्हें एक शिवलिंग प्राप्त हुआ। भक्तों ने वहाँ एक लघु मंदिर का निर्माण किया और उस शिवलिंग की पूजा अर्चना करने लगे। जिस गोपालक को सर्वप्रथम वह दृश्य दृष्टिगोचर हुआ था, उसे अब प्रियोल के मंगेश कुलदेवताओं में स्थान दिया गया है। यहाँ उनकी ‘मूलकेश्वर’ के नाम से पूजा की जाती है।
मंगेश देवालय का आदि स्थान इस प्रकार कुशस्थली (वर्तमान कुठ्ठाल) में था। कहा जाता है कि वहाँ का देवालय अत्यंत वैभवशाली था। मंदिर में स्वर्ण-रजत के आभूषण, जरीदार रेशमी वस्त्र जैसी अनेक बहुमूल्य वस्तुएँ थीं। देवालय के विशाल घंटे रजत की बड़ी श्रृंखलाओं से लटके हुए थे।
पुर्तगाली आक्रमण के पश्चात इस देवालय पर संकट के बादल छा गए। २८ फरवरी १५१० के उस अंधकारमय दिन गोवा द्वीप पर पुर्तगाली नौसेना का आगमन हुआ और इस भूमि की दुर्दशा का सूत्रपात हुआ। धर्मांध पुर्तगालियों ने गोवा के हिंदू-मुसलमानों का मतांतरण करना प्रारंभ किया। यहाँ के देवस्थानों पर उनकी कुदृष्टि पड़ी। पुर्तगाल की रानी ने लिस्बन से २६ मार्च १५५९ को एक आदेश जारी किया। उसके अनुसार अब से गोवा द्वीप व संलग्न द्वीपों में हिंदुओं के देवालय नहीं होंगे। उनकी मूर्तियाँ किसी भी गृह अथवा बाहर नहीं होनी चाहिए। उन्हें पूर्णतः विनष्ट कर भस्म कर दिया जाए। इस आदेश से यहाँ के अ-ईसाइयों को उनके धार्मिक कृत्य करने से प्रतिबंधित कर दिया गया। इस परिस्थिति में पुर्तगाली पादरियों और सैनिकों की वक्र दृष्टि कुठ्ठाल पर शीघ्र ही पड़ने वाली है, यह भाँपकर मंगेश के कुल-श्रद्धालुओं ने एक गुप्त मंत्रणा की। समीपवर्ती अंत्रुज प्रांत में मंदिर को सुरक्षा प्राप्त होगी, इस विश्वास के साथ ग्रामीणों ने वहाँ मूर्तियों के स्थानांतरण का निश्चय किया। मंगेश के शिवलिंग सहित कुलदेवताओं की मूर्तियों एवं प्रतीकों को लेकर ग्रामवासी रात्रि के गहन अंधकार में चुपचाप अंत्रुज प्रांत की ओर निकल पड़े। नौका से नदी पार कर वे मडकई के तट पर पहुँचे और वहाँ से उन मूर्तियों को प्रियोल के हाडिये नामक ग्राम की मंगेशी वाड़ी में लाया गया। यह घटना ईसवी सन १५६० में घटित हुई।
इतिहासकार विनायक नारायण शेणवी धुमे का ऐसा अनुमान है कि उस वर्ष की कार्तिक शुक्ल द्वादशी की रात्रि व त्रयोदशी के दिन यह स्थानांतरण हुआ होगा। उसी प्रकार प्रियोल में १५६१ में माघ शुक्ल पूर्णिमा के दिन मंगेश की प्रतिष्ठापना की गई होगी। इसी तिथि को यहाँ मंगेश देवस्थान का वार्षिक महोत्सव अत्यंत उत्साह से मनाया जाता है।
इस देवस्थान की स्थापना के ज्ञात इतिहास के अनुसार, ईसवी सन १७४४ और १८९० में इस देवालय का जीर्णोद्धार किया गया। तत्पश्चात पंडित जवाहरलाल नेहरू ने १९६१ में पुर्तगालियों के आधिपत्य से गोवा को मुक्त करने के बाद इस देवालय को पुरातन भवन घोषित किया। १९७० में देवालय का भवन मंदिर समिति को हस्तांतरित किया गया। उसके उपरांत पुनः देवालय का जीर्णोद्धार हुआ। १७ फरवरी १९७३ को यह जीर्णोद्धार कार्य संपन्न हुआ। उस समय गौड़पादाचार्य संस्थान, कैवल्यपुर के मठाधीश सच्चिदानंद सरस्वती स्वामी के कर-कमलों द्वारा मंदिर पर स्वर्ण कलशारोहण किया गया।
गोवा के धार्मिक और सांस्कृतिक इतिहास में इस मंदिर का अत्यंत महत्वपूर्ण स्थान है। कवि सुबानंत तथा विठ्ठल कृष्ण कायकिणी ने इसी मंदिर में बैठकर श्रीमांगीश माहात्म्य की रचना की। इसी प्रकार महेश्वर शास्त्री सुखठणकर ने ‘मांगिरिशाष्टकम्’ के लेखन का प्रारंभ यहीं से किया। इस मंदिर में निरंतर शिव-स्तुति की जाती थी, जिससे यहाँ संगीत की एक महान परंपरा का उदय हुआ। यहाँ के उत्सवों में सांगीतिक कार्यक्रमों हेतु लब्धप्रतिष्ठ गायक-कलाकारों को आमंत्रित किया जाता था। इस मंदिर और मंगेशकर परिवार का घनिष्ठ संबंध रहा है। भारतरत्न लता मंगेशकर के पिता मास्टर दीनानाथ का जन्म मंगेश की पूजा करने वाले सेवादारों के ‘अभिषेकी’ नामक ब्राह्मण परिवार में २९ दिसंबर १९०० को हुआ था। उन्हें संगीत के संस्कार यहीं से प्राप्त हुए। देवालय के मंत्रोच्चार और गायन से उनके बाल्यकाल में संगीत की नींव पड़ी। इस देवालय में आकर अनेक महान विभूतियों और अनगिनत साधु-संतों ने मंगेश के दर्शन किए हैं। इसमें भारत के तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू के साथ ही स्वामी विवेकानंद भी सम्मिलित हैं।
निसर्ग के रमणीय वातावरण में, एक उच्च स्थल पर यह मंदिर स्थित है। मंदिर की ओर जाने वाले मार्ग पर प्रसाद सामग्री के साथ ही मूर्तियों,
वस्त्रों, क्रीड़ा-सामग्री और खाद्य पदार्थों की दुकानों की एक लंबी पंक्ति है। मंदिर के मार्ग पर बाईं ओर एक विशाल पुष्करिणी है। कुछ सीढ़ियाँ चढ़कर, मंदिर के महाद्वार से प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ मंदिर के सम्मुख कालभैरव का मंदिर है। बाईं ओर एक अति भव्य आठ स्तरीय अष्टकोणीय दीपस्तंभ है। कहा जाता है कि यह गोवा का सर्वाधिक ऊँचा दीपस्तंभ है। इसके आगे मंदिर का भव्य दो मंजिला भवन खड़ा है। गोमंतकीय स्थापत्य शैली के इस देवालय की संरचना मुखद्वार, मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप और गर्भगृह के रूप में है। मुखमंडप के अधोभाग में षटकोणीय निर्माण है और उस पर गुंबद तथा कलश युक्त शिखर है। सभामंडप पर ढलुआं खपरैल की छत है, जबकि गर्भगृह का निचला भाग अष्टकोणीय है, जिस पर गुंबद और उसके ऊपर गोलाकार लघु मंदिर जैसी संरचना और उसके गुंबद पर कलश युक्त शिखर सुशोभित है। मुखमंडप और सभामंडप में अनेक मेहराबदार खिड़कियाँ हैं। भव्य गोलाकार स्तंभ, ऊँचा वितान, उसमें लटकते काँच के हाँडी और झाड़-फानूस तथा धरातल पर संगमरमर की चमचमाती टाइलों से सभामंडप को अलंकृत किया गया है। सभामंडप से आगे बाईं और दाईं ओर के दो प्रवेश मंडप हैं। सभामंडप में नंदी की रजत-पत्र से मढ़ी हुई एक विशाल मूर्ति है।
उसके सम्मुख संगमरमर के चौक पर ग्राम पुरुष देवशर्मा की मूर्ति स्थापित है।
अर्धमंडप की सम्मुख दीवार से संलग्न रजत वज्रपीठिका में बाईं ओर कृष्ण पाषाण से निर्मित गणेश की, तथा दाईं ओर देवी भगवती की मूर्ति विराजमान है। अर्धमंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर स्थित ऊँचे देवकोष्ठकों में वैष्णव द्वारपालों की रजत मूर्तियाँ हैं। द्वार की चौखट के ऊपरी भाग में मंगेश की एक बड़ी प्रतिमा लगी है और उसके पार्श्व में रजत में उत्कीर्ण नंदिकेश्वर के शिल्प हैं। अर्धमंडप से मंदिर के गर्भगृह की परिक्रमा का मार्ग है। भीतर अष्टकोणीय गर्भगृह है। गर्भगृह का प्रवेश द्वार सूक्ष्म नक्काशी युक्त रजत पत्र से मढ़ा हुआ है। उसके ललाटबिंब पर गणेश की मूर्ति और दोनों ओर दो-दो नाग मूर्तियाँ हैं। गर्भगृह में मंगेश का पुष्पमालाओं से सुसज्जित शिवलिंग है। उसके चारों ओर नाग प्रतिमाएँ हैं। उसके पृष्ठ भाग में एक उच्च आसन पर मंगेश का मुखौटा प्रतिष्ठित है। दाढ़ी-मूंछें, भाल पर मोतियों की मालाएँ, मस्तक पर नागफण व गंगा के स्वरूप में यहाँ महादेव विराजमान हैं। इस मुखौटे के पीछे स्वर्ण और रजत का एक विशाल प्रभामंडल है, जिसके मध्य में कीर्तिमुख व विविध शुभ चिह्न उत्कीर्ण हैं। देवालय के पिछले, पश्चिमी भाग में कुछ दूरी पर एक अन्य गर्भगृह में शिला रूप में मूलकेश्वर विराजमान हैं।
उस ओर के गर्भगृह में लक्ष्मीनारायण की मूर्ति, शिला स्वरूप सूर्यनारायण, मूर्ति स्वरूप गरुड़देव, तथा लिंग रूप में वीरभद्र व देवी सातेरी का स्थान है।
मंदिर में विविध पर्व और उत्सव विधि-विधान से मनाए जाते हैं। चैत्र में रामनवमी, वैशाख में अक्षय तृतीया, आषाढ़ के शुक्ल पक्ष में श्रीशयन द्वादशी, श्रावण में श्रीकृष्ण जन्माष्टमी, आश्विन नवरात्रि, कोजागरी पूर्णिमा, दीपावली, कार्तिक शुक्ल प्रतिपदा से चौदह दिनों का दीपोत्सव तथा मार्गशीर्ष शुक्ल एकादशी को गीता जयंती आदि उत्सव हर्षोल्लास के साथ मनाए जाते हैं। माघ शुक्ल सप्तमी से माघ पूर्णिमा तक आयोजित होने वाला मेला यहाँ का सबसे बड़ा उत्सव है। इसका शुभारंभ सप्तमी को विजय रथ के साथ होता है। अष्टमी को हस्ति-अंबारी, नवमी को शिबिकोत्सव (पालकी), दशमी को कंधे पर वहन किया जाने वाला रथ, एकादशी को रौप्य शिबिकोत्सव, द्वादशी को मंदिर के सरोवर में नौका विहार, त्रयोदशी को सुखासन, चतुर्दशी को लघु रथ और पूर्णिमा को महा रथ जैसे कार्यक्रम संपन्न होते हैं। श्रद्धालुओं की अपार भीड़ के मध्य माघ कृष्ण त्रयोदशी को ब्रह्म मुहूर्त में चार बजे से श्री मंगेश के अभिषेक का प्रारंभ होता है, जो अगले दिन प्रातः काल तक निरंतर चलता रहता है। इन उत्सवों में उमड़ने वाली श्रद्धालुओं की भीड़ के समान ही यहाँ देश-विदेश के पर्यटकों का भी सदैव आगमन रहता है।