महालक्ष्मी मंदिर
शिरसव, ता. परांडा, जि. धाराशिव
मरीआई, यमाई, कडकलक्ष्मी, अंबाबाई, महालक्ष्मी इत्यादी साऱ्याच देवतांच्या ठायी एकच मातृतत्व आहे. अंबाबाई ही शिवपत्नी तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी. देवीचा शाक्तपंथ हा शैव आणि वैष्णव पंथापेक्षा वेगळा आणि स्वतंत्र असला तरी देवीचे महादेवाशी अथवा विष्णूशी संबंध जोडून शाक्त पंथामुळे शैव व वैष्णव वाद नाहीसा करण्याचा प्रयत्न केला गेला असावा. त्यामुळेच अंबाबाईला महालक्ष्मी नावाने संबोधले गेले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेच एक महालक्ष्मी देवीचे मंदिर परांडा तालुक्यातील शिरसव गावी आहे. येथील देवी अंबाबाई स्वरूपात आहे व तिला महालक्ष्मी नावाने संबोधले जाते. येथील देवीस फक्त शाकाहारी व गोडाचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे.
सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर त्यातील स्तंभांवर असलेल्या उलट्या नाग शिल्पांमुळे चालुक्य कालीन असल्याचे स्पष्ट होते. या मंदिराची अख्यायिका अशी की देव दानव युद्ध सुरू झाल्यानंतर महादेव दानवांशी लढण्यासाठी निघाले. त्यावेळी पार्वती माता शस्त्रसज्ज होऊन त्यांच्यासोबत निघाली. मात्र माझ्यापेक्षा सात कोस मागे थांब, असे महादेवाने पार्वतीला सांगितल्याने पार्वती माता येथेच थांबून राहिली व मूर्ती रूपात येथे स्थापित झाली.
परांडा तालुक्यातील शिरसव गावातील या मंदिरास पंधरा फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. तटबंदीच्या पाषाणावर विविध पशू व प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरास तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. आठ पायऱ्या चढून या दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रांगणात काही वृक्ष आहेत व त्यांच्या पारावर शिवपिंडी आणि इतर शिल्पे आहेत.
मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. खुल्या स्वरूपाचा येथील मंडप नव्याने बांधलेला आहे.
प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे मंडपाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात गोलाकार स्तंभ व स्तंभांवर छत आहे. छताला पितळी घंटा व जमिनीवर होमकुंड आहे. पुढे प्राचीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेला मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूस कठडा व त्यात प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ कठडा व भिंतीत आहेत. मधील चार स्तंभांच्या मध्यभागी रंगशिला आहे. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादांवर उभे आहेत व स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. या हस्तांवर उलटे नाग कोरलेले आहेत. ही चालुक्य काळातील बांधकामाची निशाणी असल्याचे सांगितले जाते. मुख्य सभामंडपात डाव्या बाजूला मखरात गणपती व उजव्या बाजूला चतुर्भुज भैरव शिल्प आहे. भैरवाच्या मागील दोन हातांत त्रिशूल व डमरू आणि पुढील दोन हातांत नाग आहेत. भैरवमूर्तीच्या बाजूने भिंतीवर उभ्या धारेच्या द्वारशाखांसारखी रचना आहेत. त्यातील ललाटबिंबस्थानी देवीशिल्प व ललाटपट्टीत गजथर आहे. सभामंडपात देवीची उत्सव काळात वापरली जाणारी पालखी आहे.
पुढे अंतराळ व गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एक पायरी आहे. द्वारशाखांवर स्तंभनक्षी, ललाटबिंबावर इष्ट शिल्प व तोरणात शिखरनक्षी आहेत. प्रवेशद्वार व नक्षीदार झडपांना पितळी अच्छादन आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची काळ्या शाळीग्राम पाषाणातील चतुर्भुज उभी मूर्ती आहे. देवीच्या हातात विविध आयुधे व अंगावर वस्त्रे आणि अलंकार आहेत. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांवर चार सिंहशिल्पे आहेत. मध्यभागी पाच थरांचे गोलाकार, उंच व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. हे शिखर नव्याने बांधण्यात आले असल्याचे सांगितले जाते. शिखराच्या खालील बाजूला कमळदल रिंगण आहे. शिखराच्या सर्व थरात प्रत्येकी बारा देवकोष्टके व त्यात देवमूर्ती आहेत. प्रत्येक दोन देवकोष्टकांमधे शक्तीमूर्ती आहेत. सर्व देवकोष्टकांवर व देवकोष्टकांच्या मधील शक्तीशिल्पाच्या वरील बाजूस लघूशिखरे, त्यांवर आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे तीन आमलक व कळस आहे. या शिखरावर एकूण १२१ कळस आहेत.
या उंच शिखराबाबत अख्यायिका अशी की पूर्वी मंदिरावर शिखर नव्हते. त्यावेळी गावात दुमजली घर बांधल्यास ते कोसळत असे. परंतू शिखर बांधल्यानंतर दुमजली घरे टिकून राहू लागली. मंदिरात चैत्र महिन्यात देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, पालखी मिरवणुकीने देवी ग्रामप्रदक्षिणा करते. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, शाकंभरी पौर्णिमा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सवांचे आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती
- परांडा येथून २० किमी, तर धाराशिव येथून ५० किमी अंतरावर
- परांडा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Mahalakshmi Temple
Shirsav, Taluka Paranda, District Dharashiv
There is a singular maternal essence underlying all deities such as Mariai, Yamai, Kadkalakshmi, Ambabai, and Mahalakshmi. Ambabai is the consort of Shiva, while Lakshmi is the consort of Vishnu. Although the Shakta sect of the Goddess is distinct and independent from the Shaiva and Vaishnava sects, it is believed that by connecting the Goddess to Mahadeva or Vishnu, an attempt was made to bridge the divide between Shaivism and Vaishnavism. Some scholars believe this is why Ambabai came to be addressed as Mahalakshmi. One such Mahalakshmi temple is located in the village of Shirsav in Paranda Taluka. The Goddess here is in the form of Ambabai and is addressed as Mahalakshmi. It is the custom here to offer only vegetarian food and sweets as Naivedya to the Goddess.
This temple, dating back approximately one thousand years, is identified as belonging to the Chalukya era due to the inverted serpent sculptures on its pillars. The legend of this temple states that after the war between the Devas and Danavas began, Mahadeva set out to fight the Danavas. At that time, Mother Parvati, fully armed, set out with him. However, Mahadeva told Parvati to stay seven leagues behind him; thus, Mother Parvati remained here and was established in the form of an idol.
This temple in Shirsav village of Paranda Taluka is surrounded by a sturdy stone fortification fifteen feet high. Sculptures of various animals and creatures are carved onto the stones of the fortification. The temple has a two-story entrance gate within the fortification. One enters the temple courtyard through this two-story entrance after climbing eight steps. Paintings of gatekeepers (Dwarapalas) are depicted on both sides of the entrance. There is a Nagarkhana (drum house) on the upper floor of the entrance. There are several trees in the courtyard, and under them, on the platforms, are Shiva Lingas and other sculptures.
The temple structure consists of a Mandapa, Sabha Mandapa, Antarala, and Garbhagriha. The open-style Mandapa here is newly constructed.
Being at a higher elevation than the courtyard, there are three steps in front of the entrance to the Mandapa. The Sabha Mandapa has circular pillars and a roof supported by them. There are brass bells hanging from the ceiling and a Homa-kunda on the floor. Further ahead is the main Sabha Mandapa, Antarala, and Garbhagriha, featuring ancient Hemadpanti architectural stonework. The enclosed Sabha Mandapa has a railing on the front side with an entrance. There is a tortoise (Kurma) sculpture in front of the entrance. The Sabha Mandapa has four rows of four ornate pillars each. The outer pillars are embedded in the railing and walls. In the center of the four middle pillars is the Rangashila. All pillars stand on square bases, and the shafts feature various geometric shapes such as squares, hexagons, octagons, and circles. At the top of the pillars are brackets (Kani) and above them are the corbels (Hasta). Inverted serpents are carved onto these corbels. It is said that this is a hallmark of Chalukya-era construction. In the main Sabha Mandapa, there is an idol of Ganapati in a niche on the left and a four-armed Bhairava sculpture on the right. In the two back hands of Bhairava are a Trishula and a Damaru, while the two front hands hold serpents. Along the sides of the Bhairava idol, there are structures resembling door jambs on the wall. At the center of the lintel (Lalatabimba) is a Goddess sculpture, and the lintel band features a row of elephants (Gajathar). The Sabha Mandapa houses the palanquin used during the Goddess’s festival.
Further ahead is the entrance to the Antarala and Garbhagriha. Being at a higher elevation than the Antarala, there is a step in front of the Garbhagriha entrance. The door jambs feature pillar carvings, the lintel features an auspicious sculpture, and the archway (Torana) features spire carvings. The entrance and the ornate doors are covered in brass. Inside the Garbhagriha, on a Vajrapitha, stands the four-armed idol of the Goddess made of black Shaligram stone. The Goddess holds various weapons and is adorned with garments and jewelry. A silver crown rests on the Goddess’s head. On the ceiling of the Garbhagriha, there are four lion sculptures at the four corners. In the center is a five-tiered, circular, tall spire that tapers towards the top. It is said that this spire was newly constructed. Below the spire is a lotus-petal ring. Each tier of the spire contains twelve niches, each housing a deity idol. Between every two niches are Shakti idols. Above all the niches and the Shakti sculptures are miniature spires, topped with Amalakas and Kalashas. At the very top of the main spire are three Amalakas and a Kalasha stacked one above the other. There are a total of 121 Kalashas on this spire.
Regarding this tall spire, the legend goes that previously there was no spire on the temple. At that time, if a two-story house was built in the village, it would collapse. However, after the spire was built, two-story houses began to remain standing. The annual Jatrotsav (fair) of the Goddess is celebrated with great enthusiasm in the month of Chaitra. During this time, amidst the sound of drums and the throwing of Gulal, the Goddess is taken on a village procession in a palanquin. Thousands of devotees come for the Goddess’s Darshan, to fulfill vows, and to participate in the palanquin procession. Additionally, festivals such as Chaitra Padwa, Shakambhari Purnima, Sharadiya Navaratri, Dussehra, and Diwali are organized at the temple.
Useful Information
- 20 km from Paranda, 50 km from Dharashiv
- ST bus service available from Paranda
- Private vehicles can reach the temple
- No lodging or boarding facilities available in the vicinity
महालक्ष्मी मंदिर
शिरसव, ता. परांडा, जि. धाराशिव
मरीआई, यमाई, कडकलक्ष्मी, अंबाबाई, महालक्ष्मी इत्यादि सभी देवताओं में एक ही मातृत्व तत्व है। अंबाबाई शिवपत्नी हैं तो लक्ष्मी विष्णु पत्नी। देवी का शाक्त पंथ शैव और वैष्णव पंथ से अलग और स्वतंत्र होने के बावजूद, देवी का महादेव या विष्णु से संबंध जोड़कर शाक्त पंथ के माध्यम से शैव और वैष्णव विवाद को समाप्त करने का प्रयास किया गया होगा। इसीलिए कुछ विद्वानों का मत है कि अंबाबाई को महालक्ष्मी के नाम से संबोधित किया गया होगा। ऐसा ही एक महालक्ष्मी देवी का मंदिर परांडा तहसील के शिरसव गांव में है। यहाँ की देवी अंबाबाई स्वरूप में हैं और उन्हें महालक्ष्मी के नाम से संबोधित किया जाता है। यहाँ देवी को केवल शाकाहारी और मीठे नैवेद्य का भोग लगाने की प्रथा है।
लगभग एक हजार वर्ष पुराना यह मंदिर अपने स्तंभों पर उत्कीर्ण उल्टे नाग शिल्पों के कारण चालुक्य कालीन होने का प्रमाण देता है। इस मंदिर की किंवदंती है कि देव-दानव युद्ध शुरू होने के बाद महादेव दानवों से लड़ने के लिए निकले। उस समय पार्वती माता शस्त्रों से सुसज्जित होकर उनके साथ निकलीं। परंतु महादेव द्वारा ‘मुझसे सात कोस पीछे रुको’ ऐसा कहे जाने पर पार्वती माता यहीं रुक गईं और मूर्ति रूप में यहाँ स्थापित हो गईं।
परांडा तहसील के शिरसव गांव स्थित इस मंदिर के चारों ओर १५ फुट ऊंची मजबूत पत्थर की चारदीवारी है। चारदीवारी के पत्थरों पर विभिन्न पशु-पक्षियों के शिल्प उकेरे गए हैं। मंदिर की चारदीवारी में दो मंजिला प्रवेशद्वार है। ८ सीढ़ियाँ चढ़कर इस दो मंजिला प्रवेशद्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। यहाँ प्रवेशद्वार पर दोनों ओर द्वारपालों के चित्र बने हैं। प्रवेशद्वार की ऊपरी मंजिल पर नगारखाना है। प्रांगण में कुछ वृक्ष हैं और उनके चबूतरे पर शिवपिंडी और अन्य शिल्प हैं।
मंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी मंदिर की संरचना है। खुले स्वरूप का यहाँ का मंडप नया निर्मित है।
प्रांगण से ऊँचा होने के कारण मंडप के प्रवेशद्वार के सामने ३ सीढ़ियाँ हैं। सभामंडप में गोलाकार स्तंभ और स्तंभों पर छत है। छत में पीतल की घंटियाँ और जमीन पर होमकुंड है। आगे प्राचीन हेमाडपंती स्थापत्य शैली का पत्थर निर्मित मुख्य सभामंडप, अंतराळ और गर्भगृह है। बंद स्वरूप के सभामंडप में सामने की ओर कठघरा और उसमें प्रवेशद्वार है। प्रवेशद्वार के सामने कछुआ शिल्प है। सभामंडप में प्रत्येक चार नक्काशीदार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। बाहरी ओर के स्तंभ कठघरे और दीवार में हैं। बीच के चार स्तंभों के मध्य में रंगशिला है। सभी स्तंभ चौकोर स्तंभपादों पर खड़े हैं और स्तंभदंड में चौकोर, षट्कोण, अष्टकोण, वृत्त जैसे विभिन्न ज्यामितीय आकार हैं। स्तंभों के शीर्ष पर कणी और उस पर हस्त हैं। इन हस्तों पर उल्टे नाग उकेरे गए हैं। इसे चालुक्य काल के निर्माण की निशानी बताया जाता है। मुख्य सभामंडप में बाईं ओर मखर में गणपति और दाईं ओर चतुर्भुज भैरव शिल्प है। भैरव के पिछले दो हाथों में त्रिशूल और डमरू तथा अगले दो हाथों में नाग हैं। भैरव मूर्ति के बाजू में दीवार पर खड़ी धार वाली द्वारशाखाओं जैसी रचना है। उनमें ललाटबिंब के स्थान पर देवी शिल्प और ललाटपट्टी में गजथर है। सभामंडप में देवी की उत्सव के दौरान उपयोग की जाने वाली पालकी है।
आगे अंतराळ और गर्भगृह का प्रवेशद्वार है। अंतराळ से ऊँचा होने के कारण गर्भगृह के प्रवेशद्वार के सामने १ सीढ़ी है। द्वारशाखाओं पर स्तंभ नक्काशी, ललाटबिंब पर इष्ट शिल्प और तोरण में शिखर नक्काशी है। प्रवेशद्वार और नक्काशीदार पल्लों पर पीतल का आवरण है। गर्भगृह में वज्रपीठ पर देवी की काले शालिग्राम पत्थर की चतुर्भुज खड़ी मूर्ति है। देवी के हाथों में विभिन्न आयुध और शरीर पर वस्त्र व आभूषण हैं। देवी के सिर पर चांदी का मुकुट है। गर्भगृह की छत के चारों कोनों पर चार सिंह शिल्प हैं। मध्य में पांच स्तरों वाला गोलाकार, ऊँचा और ऊपर की ओर संकरा होता गया शिखर है। यह शिखर नया निर्मित बताया जाता है। शिखर के निचले भाग में कमलदल रिंगण है। शिखर के सभी स्तरों में प्रत्येक में १२ देवकोष्ठक और उनमें देवमूर्तियाँ हैं। प्रत्येक दो देवकोष्ठकों के बीच शक्ति मूर्तियाँ हैं। सभी देवकोष्ठकों पर और देवकोष्ठकों के बीच शक्ति शिल्प के ऊपरी भाग में लघुशिखर, उन पर आमलक और कलश हैं। मुख्य शिखर के शीर्ष पर एक के ऊपर एक ऐसे ३ आमलक और कलश हैं। इस शिखर पर कुल १२१ कलश हैं।
इस ऊँचे शिखर के बारे में किंवदंती है कि पहले मंदिर पर शिखर नहीं था। उस समय गांव में दो मंजिला घर बनाने पर वह गिर जाता था। परंतु शिखर बनने के बाद दो मंजिला घर टिकने लगे। मंदिर में चैत्र माह में देवी का वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस समय ढोल-ताशों की गूंज में, गुलाल उड़ाते हुए, पालकी जुलूस के साथ देवी ग्राम प्रदक्षिणा करती हैं। इस समय हजारों श्रद्धालु देवी के दर्शन के लिए, मन्नत पूरी करने के लिए और पालकी समारोह में शामिल होने के लिए आते हैं। इसके अलावा मंदिर में चैत्र पाडवा, शाकंभरी पूर्णिमा, शारदीय नवरात्रोत्सव, दशहरा, दिवाली आदि त्योहार और उत्सव आयोजित किए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- परांडा से २० किमी, तो धाराशिव से ५० किमी की दूरी पर
- परांडा से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं है
મहालક્ષ્મી મંદિર
શિરસવ, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
મરીઆઈ, યમાઈ, કડકલક્ષ્મી, અંબાબાઈ, મહાલક્ષ્મી વગેરે તમામ દેવીઓમાં એક જ માતૃતત્વ રહેલું છે. અંબાબાઈ એ શિવપત્ની છે, તો લક્ષ્મી એ વિષ્ણુપત્ની છે. દેવીનો શાક્તપંથ એ શૈવ અને વૈષ્ણવ પંથ કરતા અલગ અને સ્વતંત્ર હોવા છતાં, દેવીના મહાદેવ કે વિષ્ણુ સાથે સંબંધ જોડીને શાક્ત પંથ દ્વારા શૈવ અને વૈષ્ણવ વિવાદને દૂર કરવાનો પ્રયાસ કરવામાં આવ્યો હોવો જોઈએ. તેથી જ અંબાબાઈને મહાલક્ષ્મીના નામે સંબોધવામાં આવી હશે, એવું કેટલાક અભ્યાસુઓનું માનવું છે. આવું જ એક મહાલક્ષ્મી દેવીનું મંદિર પરાંડા તાલુકાના શિરસવ ગામમાં આવેલું છે. અહીંની દેવી અંબાબાઈ સ્વરૂપમાં છે અને તેમને મહાલક્ષ્મીના નામે સંબોધવામાં આવે છે. અહીં દેવીને માત્ર શાકાહારી અને ગળ્યા નૈવેદ્ય ધરાવવાની પ્રથા છે.
આશરે એક હજાર વર્ષ જૂનું આ મંદિર તેના સ્તંભો પર રહેલા ઊંધા નાગના શિલ્પોને કારણે ચાલુક્ય કાળનું હોવાનું સ્પષ્ટ થાય છે. આ મંદિરની દંતકથા એવી છે કે દેવ-દાનવ યુદ્ધ શરૂ થયા પછી મહાદેવ દાનવો સાથે લડવા માટે નીકળ્યા. તે સમયે પાર્વતી માતા શસ્ત્રસજ્જ થઈને તેમની સાથે નીકળ્યા. પરંતુ મારા કરતા સાત કોસ પાછળ રોકાઈ જાઓ, તેમ મહાદેવે પાર્વતીને કહેતા પાર્વતી માતા અહીં જ રોકાઈ ગયા અને મૂર્તિ સ્વરૂપે અહીં સ્થાપિત થયા.
પરાંડા તાલુકાના શિરસવ ગામના આ મંદિરને ૧૫ ફૂટ ઊંચી મજબૂત પથ્થરની દીવાલ (તટબંધી) છે. દીવાલના પાષાણ પર વિવિધ પશુ અને પ્રાણીઓના શિલ્પો કોતરેલા છે. મંદિરને દીવાલમાં બે માળનું પ્રવેશદ્વાર છે. આઠ પગથિયાં ચઢીને આ બે માળના પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીં પ્રવેશદ્વાર પર બંને બાજુએ દ્વારપાળના ચિત્રો દોરેલા છે. પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે નગારખાનું છે. પ્રાંગણમાં કેટલાક વૃક્ષો છે અને તેના ઓટલા પર શિવપિંડી અને અન્ય શિલ્પો છે.
મંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. ખુલ્લા સ્વરૂપનો અહીંનો મંડપ નવેસરથી બાંધવામાં આવ્યો છે.
પ્રાંગણ કરતા ઊંચાઈ પર હોવાથી મંડપના પ્રવેશદ્વારની સામે ત્રણ પગથિયાં છે. સભામંડપમાં ગોળાકાર સ્તંભો અને સ્તંભો પર છત છે. છતને પિત્તળની ઘંટડી અને જમીન પર હોમકુંડ છે. આગળ પ્રાચીન હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીનું પથ્થરનું બાંધકામ ધરાવતો મુખ્ય સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ છે. બંધ સ્વરૂપના સભામંડપમાં સામેની બાજુએ કઠેડો અને તેમાં પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વારની સામે કાચબાનું શિલ્પ છે. સભામંડપમાં પ્રત્યેક ચાર નકશીદાર સ્તંભોની ચાર હરોળ છે. બહારની બાજુના સ્તંભો કઠેડા અને દીવાલમાં છે. વચ્ચેના ચાર સ્તંભોની મધ્યમાં રંગશિલા છે. તમામ સ્તંભો ચોરસ સ્તંભપાદો પર ઊભા છે અને સ્તંભદંડમાં ચોરસ, ષટ્કોણ, અષ્ટકોણ, વર્તુળ જેવા વિવિધ ભૌમિતિક આકારો છે. સ્તંભોની ટોચ પર કણી અને તેના પર હસ્ત છે. આ હસ્ત પર ઊંધા નાગ કોતરેલા છે. આ ચાલુક્ય કાળના બાંધકામની નિશાની હોવાનું કહેવાય છે. મુખ્ય સભામંડપમાં ડાબી બાજુએ મખરમાં ગણપતિ અને જમણી બાજુએ ચતુર્ભુજ ભૈરવ શિલ્પ છે. ભૈરવના પાછળના બે હાથમાં ત્રિશૂળ અને ડમરુ તથા આગળના બે હાથમાં નાગ છે. ભૈરવમૂર્તિની બાજુએ દીવાલ પર ઊભી ધારેલી દ્વારશાખાઓ જેવી રચના છે. તેમાં લલાટબિંબના સ્થાને દેવીશિલ્પ અને લલાટપટ્ટીમાં ગજથર છે. સભામંડપમાં દેવીની ઉત્સવ દરમિયાન વપરાતી પાલખી છે.
આગળ અંતરાળ અને ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. અંતરાળ કરતા ઊંચાઈ પર હોવાથી ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે એક પગથિયું છે. દ્વારશાખાઓ પર સ્તંભનકશી, લલાટબિંબ પર ઇષ્ટ શિલ્પ અને તોરણમાં શિખરનકશી છે. પ્રવેશદ્વાર અને નકશીદાર કમાડો પર પિત્તળનું આચ્છાદન છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર દેવીની કાળા શાલિગ્રામ પાષાણની ચતુર્ભુજ ઊભી મૂર્તિ છે. દેવીના હાથમાં વિવિધ આયુધો અને અંગ પર વસ્ત્રો તથા અલંકારો છે. દેવીના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે. ગર્ભગૃહની છત પર ચારેય ખૂણાઓ પર ચાર સિંહશિલ્પો છે. મધ્યમાં પાંચ સ્તરનું ગોળાકાર, ઊંચું અને ઉપર જતાં સાંકડું થતું જતું શિખર છે. આ શિખર નવેસરથી બાંધવામાં આવ્યું હોવાનું કહેવાય છે. શિખરની નીચેની બાજુએ કમળદળનું રીંગણ છે. શિખરના તમામ સ્તરોમાં પ્રત્યેક બાર દેવકોષ્ઠકો અને તેમાં દેવમૂર્તિઓ છે. પ્રત્યેક બે દેવકોષ્ઠકોની વચ્ચે શક્તિમૂર્તિઓ છે. તમામ દેવકોષ્ઠકો પર અને દેવકોષ્ઠકોની વચ્ચેના શક્તિશિલ્પની ઉપરની બાજુએ લઘુશિખરો, તેના પર આમલક અને કળશ છે. મુખ્ય શિખરની ટોચ પર એકની ઉપર એક એવા ત્રણ આમલક અને કળશ છે. આ શિખર પર કુલ ૧૨૧ કળશ છે.
આ ઊંચા શિખર વિશે દંતકથા એવી છે કે પહેલા મંદિર પર શિખર નહોતું. તે સમયે ગામમાં બે માળનું ઘર બાંધવામાં આવે તો તે ધરાશાયી થઈ જતું હતું. પરંતુ શિખર બાંધ્યા પછી બે માળના ઘરો ટકી રહેવા લાગ્યા. મંદિરમાં ચૈત્ર મહિનામાં દેવીનો વાર્ષિક જન્મોત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે ઢોલ-નગારાના ગુંજારવ સાથે, ગુલાલ ઉડાડતા, પાલખી સરઘસ સાથે દેવી ગ્રામપ્રદક્ષિણા કરે છે. આ સમયે હજારો ભાવિકો દેવીના દર્શન માટે, માનતા પૂરી કરવા અને પાલખી ઉત્સવમાં સામેલ થવા માટે આવે છે. આ ઉપરાંત મંદિરમાં ચૈત્ર પાડવો, શાકંભરી પૂર્ણિમા, શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ, દશેરા, દિવાળી વગેરે તહેવારો અને ઉત્સવોનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પરાંડાથી ૨૦ કિમી, તો ધારાશિવથી ૫૦ કિમી અંતરે
- પરાંડાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
மகாலட்சுமி கோயில்
சிரசவ், தாலுகா பராண்டா, மாவட்டம் தாராசிவ
மரியாஈ, யமாஈ, கடகல்ட்சுமி, அம்பாபாய், மகாலட்சுமி என அனைத்து தெய்வங்களிடமும் ஒரே மாதிரியான தாய்மை உணர்வே உள்ளது. அம்பாபாய் சிவபெருமானின் துணைவி, லட்சுமி விஷ்ணுவின் துணைவி. தேவியின் சாக்த வழிபாடானது சைவ மற்றும் வைணவ வழிபாடுகளிலிருந்து வேறுபட்டது மற்றும் தனித்துவமானது என்றாலும், தேவியை சிவபெருமானுடன் அல்லது விஷ்ணுவுடன் இணைப்பதன் மூலம் சாக்த வழிபாட்டின் வழியாக சைவ-வைணவ மோதல்களை நீக்க முயற்சி செய்யப்பட்டிருக்கலாம். இதனாலேயே அம்பாபாயை மகாலட்சுமி என்று அழைத்திருக்கலாம் என்பது சில அறிஞர்களின் கருத்து. அத்தகைய ஒரு மகாலட்சுமி கோயில் பராண்டா தாலுகாவில் உள்ள சிரசவ் கிராமத்தில் உள்ளது. இங்குள்ள தேவி அம்பாபாய் வடிவில் உள்ளார் மற்றும் அவர் மகாலட்சுமி என்று அழைக்கப்படுகிறார். இங்குள்ள தேவிக்கு சைவ உணவும், இனிப்பு வகைகளும் மட்டுமே நைவேத்தியமாகப் படைக்கும் வழக்கம் உள்ளது.
சுமார் ௧,௦௦௦ ஆண்டுகளுக்கு முற்பட்ட இக்கோயில், அதன் தூண்களில் உள்ள தலைகீழான நாகச் சிற்பங்களைக் கொண்டு சாளுக்கியர் காலத்தைச் சேர்ந்தது என்பது தெளிவாகிறது. இக்கோயிலின் தலபுராணம் என்னவென்றால், தேவாசுர யுத்தம் தொடங்கியபோது, சிவபெருமான் அசுரர்களுடன் போரிடச் சென்றார். அப்போது பார்வதி தேவி ஆயுதம் ஏந்தி அவருடன் புறப்பட்டார். ஆனால், தன்னை விட ஏழு காத தூரம் பின் தங்கி இருக்குமாறு சிவபெருமான் கூறியதால், பார்வதி தேவி இங்கேயே தங்கி, சிலை வடிவில் நிலைபெற்றார்.
பராண்டா தாலுகாவில் உள்ள சிரசவ் கிராமத்தில் உள்ள இக்கோயில் ௧௫ அடி உயரமான உறுதியான கல் மதிலைக் கொண்டுள்ளது. மதிலின் கற்களில் பல்வேறு விலங்குகள் மற்றும் பறவைகளின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கோயிலின் மதிலில் இரு அடுக்கு நுழைவாயில் உள்ளது. எட்டு படிகள் ஏறி இந்த இரு அடுக்கு நுழைவாயில் வழியாக கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் நகர்கானா (இசை முழங்கும் இடம்) உள்ளது. பிரகாரத்தில் சில மரங்கள் உள்ளன, அவற்றின் மேடைகளில் சிவலிங்கமும் பிற சிற்பங்களும் உள்ளன.
மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள திறந்தவெளி மண்டபம் புதிதாகக் கட்டப்பட்டது.
பிரகாரத்தை விட உயரத்தில் இருப்பதால் மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் மூன்று படிகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் வட்ட வடிவத் தூண்களும், தூண்களின் மீது கூரையும் உள்ளன. கூரையில் பித்தளை மணிகள் மற்றும் தரையில் ஹோம குண்டம் உள்ளது. அடுத்து, பழங்கால ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் கல் கட்டுமானத்தைக் கொண்ட முக்கிய சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை உள்ளன. மூடிய வடிவிலான சபா மண்டபத்தின் முன்பக்கத்தில் தடுப்புச் சுவரும், அதில் நுழைவாயிலும் உள்ளது. நுழைவாயிலுக்கு முன்னால் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. சபா மண்டபத்தில் தலா நான்கு செதுக்கப்பட்ட தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. வெளிப்புறத் தூண்கள் தடுப்புச் சுவரிலும் சுவர்களிலும் உள்ளன. நடுவில் உள்ள நான்கு தூண்களுக்கு இடையில் ரங்கசிலை உள்ளது. அனைத்துத் தூண்களும் சதுர வடிவ அடித்தளத்தில் எழுப்பப்பட்டுள்ளன, தூண் தண்டுகளில் சதுரம், அறுகோணம், எண்கோணம், வட்டம் போன்ற பல்வேறு வடிவியல் வடிவங்கள் உள்ளன. தூண்களின் உச்சியில் கனி மற்றும் அதன் மேல் ஹஸ்தங்கள் உள்ளன. இந்த ஹஸ்தங்களில் தலைகீழான நாகங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இது சாளுக்கியர் கால கட்டுமானத்தின் அடையாளம் என்று கூறப்படுகிறது. முக்கிய சபா மண்டபத்தில் இடதுபுறம் மகுடத்தில் கணபதியும், வலதுபுறம் நான்கு கைகளைக் கொண்ட பைரவர் சிற்பமும் உள்ளன. பைரவரின் பின் இரு கைகளில் சூலம் மற்றும் டமருகம், முன் இரு கைகளில் நாகங்கள் உள்ளன. பைரவர் சிலையின் பக்கவாட்டில் சுவரில் செங்குத்தான துவாரசாகா போன்ற அமைப்பு உள்ளது. அதன் லலாடபிம்பத்தில் தேவி சிலையும், லலாடப்பட்டியில் கஜதரமும் உள்ளன. சபா மண்டபத்தில் தேவியின் உற்சவ காலங்களில் பயன்படுத்தப்படும் பல்லக்கு உள்ளது.
அடுத்து அந்தராளம் மற்றும் கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. அந்தராளத்தை விட உயரத்தில் இருப்பதால் கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் ஒரு படி உள்ளது. துவாரசாகாக்களில் தூண் வேலைப்பாடுகள், லலாடபிம்பத்தில் இஷ்ட சிற்பம் மற்றும் தோரணத்தில் சிகர வேலைப்பாடுகள் உள்ளன. நுழைவாயில் மற்றும் செதுக்கப்பட்ட கதவுகளுக்கு பித்தளை கவசம் உள்ளது. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது தேவியின் கருப்பு சாளக்கிராமக் கல்லால் ஆன நான்கு கைகளைக் கொண்ட நின்ற கோல சிலை உள்ளது. தேவியின் கைகளில் பல்வேறு ஆயுதங்களும், உடலில் ஆடைகளும் ஆபரணங்களும் உள்ளன. தேவியின் தலையில் வெள்ளி கிரீடம் உள்ளது. கருவறையின் கூரையின் நான்கு மூலைகளிலும் நான்கு சிங்கச் சிற்பங்கள் உள்ளன. நடுவில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட வட்டமான, உயரமான மற்றும் மேலே கூர்மையாகும் சிகரம் உள்ளது. இந்த சிகரம் புதிதாகக் கட்டப்பட்டது என்று கூறப்படுகிறது. சிகரத்தின் கீழ் பகுதியில் தாமரை இதழ் வளையம் உள்ளது. சிகரத்தின் அனைத்து அடுக்குகளிலும் தலா ௧௨ தேவகோஷ்டங்கள் மற்றும் அவற்றில் தெய்வச் சிலைகள் உள்ளன. ஒவ்வொரு இரண்டு தேவகோஷ்டங்களுக்கு இடையில் சக்தி சிலைகள் உள்ளன. அனைத்து தேவகோஷ்டங்களின் மீதும், தேவகோஷ்டங்களுக்கு இடையில் உள்ள சக்தி சிலைகளின் மேல் பகுதியிலும் சிறு சிகரங்கள், அவற்றின் மீது ஆமலகம் மற்றும் கலசங்கள் உள்ளன. முக்கிய சிகரத்தின் உச்சியில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக மூன்று ஆமலகங்கள் மற்றும் கலசம் உள்ளது. இந்த சிகரத்தில் மொத்தம் ௧௨௧ கலசங்கள் உள்ளன.
இந்த உயரமான சிகரம் குறித்து ஒரு ஐதீகம் உள்ளது: முன்பு கோயிலில் சிகரம் இல்லை. அப்போது கிராமத்தில் இரு அடுக்கு வீடுகளைக் கட்டினால் அவை இடிந்து விழுந்துவிடும். ஆனால் சிகரம் கட்டிய பிறகு, இரு அடுக்கு வீடுகள் நிலைத்து நிற்கத் தொடங்கின. கோயிலில் சித்திரை மாதத்தில் தேவியின் வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது மேளதாளங்கள் முழங்க, குங்குமப்பூ தூவி, பல்லக்கு ஊர்வலமாக தேவி கிராமத்தை வலம் வருகிறார். அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களைச் செலுத்தவும், பல்லக்கு விழாவில் பங்கேற்கவும் வருகிறார்கள். இது தவிர, கோயிலில் சித்திரை பாட்வா, சாக்கம்வரி பௌர்ணமி, சாரதிய நவராத்திரி உற்சவம், தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- பராண்டாவிலிருந்து ௨௦ கி.மீ, தாராசிவிலிருந்து ௫௦ கி.மீ தொலைவில்
- பராண்டாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
మహాలక్ష్మి మందిరం
శిరసవ్, తా. పరాండా, జి. ధారాశివ్
మరియాయి, యమాయి, కడకలక్ష్మి, అంబాబాయి, మహాలక్ష్మి వంటి దేవతలందరిలోనూ ఒకే మాతృత్వం ఉంది. అంబాబాయి శివపత్ని అయితే, లక్ష్మి విష్ణుపత్ని. దేవి యొక్క శాక్త పంథా శైవ మరియు వైష్ణవ పంథాల కంటే భిన్నమైనది మరియు స్వతంత్రమైనది అయినప్పటికీ, దేవికి మహాదేవునితో లేదా విష్ణువుతో సంబంధాన్ని కల్పించడం ద్వారా శాక్త పంథా వల్ల శైవ మరియు వైష్ణవ వివాదాలను తొలగించే ప్రయత్నం జరిగి ఉండవచ్చు. అందుకే అంబాబాయిని మహాలక్ష్మి అని పిలిచి ఉండవచ్చని కొందరు పరిశోధకుల అభిప్రాయం. అటువంటి మహాలక్ష్మి దేవి మందిరం ఒకటి పరాండా తాలూకాలోని శిరసవ్ గ్రామంలో ఉంది. ఇక్కడి దేవి అంబాబాయి రూపంలో ఉంది మరియు ఆమెను మహాలక్ష్మి అని పిలుస్తారు. ఇక్కడి దేవికి కేవలం శాకాహార మరియు తీపి నైవేద్యాన్ని మాత్రమే సమర్పించే ఆచారం ఉంది.
సుమారు ౧,౦౦౦ సంవత్సరాల క్రితం నాటి ఈ మందిరం, దాని స్తంభాలపై ఉన్న తలకిందుల నాగ శిల్పాల వల్ల చాళుక్యుల కాలం నాటిదని స్పష్టమవుతోంది. ఈ మందిరం గురించి ఒక పురాణగాథ ఏమిటంటే, దేవదానవ యుద్ధం ప్రారంభమైన తర్వాత మహాదేవుడు దానవులతో పోరాడటానికి బయలుదేరారు. అప్పుడు పార్వతీ మాత ఆయుధధారిణియై ఆయనతో పాటు బయలుదేరింది. అయితే, “నాకంటే ఏడు కోసుల వెనుక ఆగిపో” అని మహాదేవుడు పార్వతికి చెప్పడంతో, పార్వతీ మాత ఇక్కడే ఆగిపోయి, విగ్రహ రూపంలో ఇక్కడ ప్రతిష్ఠితమైంది.
పరాండా తాలూకాలోని శిరసవ్ గ్రామంలో ఉన్న ఈ మందిరానికి ౧౫ అడుగుల ఎత్తైన బలమైన రాతి ప్రాకారం ఉంది. ప్రాకారపు రాళ్లపై వివిధ పశుపక్ష్యాదుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. మందిరానికి ప్రాకారంలో రెండు అంతస్తుల ప్రవేశద్వారం ఉంది. ౮ మెట్లు ఎక్కి ఈ రెండు అంతస్తుల ప్రవేశద్వారం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు చిత్రించబడ్డాయి. ప్రవేశద్వారం పై అంతస్తులో నగార్ఖానా ఉంది. ప్రాంగణంలో కొన్ని వృక్షాలు ఉన్నాయి మరియు వాటి అరుగులపై శివలింగం మరియు ఇతర శిల్పాలు ఉన్నాయి.
మండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం అనేవి మందిర నిర్మాణం. ఇక్కడి బహిరంగ మండపం కొత్తగా నిర్మించబడింది.
ప్రాంగణం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల మండప ప్రవేశద్వారం ముందు ౩ మెట్లు ఉన్నాయి. సభామండపంలో వృత్తాకార స్తంభాలు మరియు స్తంభాలపై పైకప్పు ఉన్నాయి. పైకప్పుకు ఇత్తడి గంటలు మరియు నేలపై హోమకుండం ఉన్నాయి. ముందు భాగంలో ప్రాచీన హేమాడపంతి వాస్తుశైలిలో రాతి నిర్మాణం కలిగిన ప్రధాన సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహం ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో ముందు భాగంలో కటకటాలు మరియు అందులో ప్రవేశద్వారం ఉంది. ప్రవేశద్వారం ముందు తాబేలు శిల్పం ఉంది. సభామండపంలో ఒక్కొక్కటి నాలుగు నగిషీలు కలిగిన స్తంభాల వరుసలు నాలుగు ఉన్నాయి. బయటి వైపు స్తంభాలు కటకటాలు మరియు గోడలలో ఉన్నాయి. మధ్యలోని నాలుగు స్తంభాల మధ్యలో రంగశిల ఉంది. అన్ని స్తంభాలు చతురస్రాకారపు పీఠాలపై నిలబడి ఉన్నాయి మరియు స్తంభ దండాలలో చతురస్రం, షట్కోణం, అష్టకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాల పైభాగంలో కణి మరియు దానిపై హస్తాలు ఉన్నాయి. ఈ హస్తాలపై తలకిందుల నాగ శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఇది చాళుక్యుల కాలం నాటి నిర్మాణానికి గుర్తు అని చెబుతారు. ప్రధాన సభామండపంలో ఎడమ వైపున మకరంలో గణపతి మరియు కుడి వైపున చతుర్భుజ భైరవ శిల్పం ఉంది. భైరవుని వెనుక రెండు చేతులలో త్రిశూలం మరియు డమరుకం, ముందు రెండు చేతులలో నాగపాశాలు ఉన్నాయి. భైరవ విగ్రహం పక్కన గోడపై నిలువు వరుసల ద్వారశాఖల వంటి నిర్మాణం ఉంది. దాని లలాటబింబ స్థానంలో దేవి శిల్పం మరియు లలాటపట్టిలో గజథర్ ఉన్నాయి. సభామండపంలో దేవి ఉత్సవాల సమయంలో ఉపయోగించే పల్లకీ ఉంది.
ముందు అంతరాళం మరియు గర్భగృహ ప్రవేశద్వారం ఉన్నాయి. అంతరాళం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల గర్భగృహ ప్రవేశద్వారం ముందు ఒక మెట్టు ఉంది. ద్వారశాఖలపై స్తంభ నగిషీలు, లలాటబింబంపై ఇష్ట శిల్పం మరియు తోరణంలో శిఖర నగిషీలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం మరియు నగిషీలు కలిగిన తలుపులకు ఇత్తడి కవచం ఉంది. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై దేవి యొక్క నల్లని శాలిగ్రామ శిలతో చేసిన చతుర్భుజ నిలువు విగ్రహం ఉంది. దేవి చేతులలో వివిధ ఆయుధాలు మరియు ఒంటిపై వస్త్రాలు, ఆభరణాలు ఉన్నాయి. దేవి తలపై వెండి కిరీటం ఉంది. గర్భగృహ పైకప్పుపై నాలుగు మూలల్లో నాలుగు సింహ శిల్పాలు ఉన్నాయి. మధ్యలో ఐదు అంతస్తుల వృత్తాకార, ఎత్తైన మరియు పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే శిఖరం ఉంది. ఈ శిఖరం కొత్తగా నిర్మించబడిందని చెబుతారు. శిఖరం కింది భాగంలో కమలదళాల వలయం ఉంది. శిఖరం యొక్క అన్ని అంతస్తులలో ఒక్కొక్కటి ౧౨ దేవకోష్ఠకాలు మరియు వాటిలో దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. ప్రతి రెండు దేవకోష్ఠకాల మధ్య శక్తి విగ్రహాలు ఉన్నాయి. అన్ని దేవకోష్ఠకాలపై మరియు దేవకోష్ఠకాల మధ్య ఉన్న శక్తి శిల్పాల పైభాగంలో లఘు శిఖరాలు, వాటిపై ఆమలకం మరియు కలశాలు ఉన్నాయి. ప్రధాన శిఖరం పైభాగంలో ఒకదానిపై ఒకటి మూడు ఆమలకాలు మరియు కలశాలు ఉన్నాయి. ఈ శిఖరంపై మొత్తం ౧౨౧ కలశాలు ఉన్నాయి.
ఈ ఎత్తైన శిఖరం గురించి పురాణగాథ ఏమిటంటే, పూర్వం మందిరంపై శిఖరం లేదు. అప్పట్లో గ్రామంలో రెండు అంతస్తుల ఇల్లు నిర్మిస్తే అది కూలిపోయేది. కానీ శిఖరం నిర్మించిన తర్వాత రెండు అంతస్తుల ఇళ్లు పటిష్టంగా ఉండటం ప్రారంభించాయి. మందిరంలో చైత్ర మాసంలో దేవి వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో డోలు వాయిద్యాల హోరులో, గులాల్ చల్లుతూ, పల్లకీ ఊరేగింపుతో దేవి గ్రామ ప్రదక్షిణ చేస్తుంది. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దేవి దర్శనం కోసం, మొక్కులు తీర్చుకోవడానికి మరియు పల్లకీ ఉత్సవంలో పాల్గొనడానికి వస్తారు. ఇది కాకుండా మందిరంలో చైత్ర పాడ్యమి, శాకంభరి పౌర్ణమి, శరన్నవరాత్రి ఉత్సవం, దసరా, దీపావళి వంటి పండుగలు మరియు ఉత్సవాలు నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పరాండా నుండి ౨౦ కి.మీ, ధారాశివ్ నుండి ౫౦ కి.మీ దూరంలో
- పరాండా నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രം
ശിരസവ്, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
മരിയായ്, യമായ്, കടകലക്ഷ്മി, അംബാബായി, മഹാലക്ഷ്മി തുടങ്ങിയ എല്ലാ ദേവതകളിലും കുടികൊള്ളുന്നത് ഒരേയൊരു മാതൃഭാവമാണ്. അംബാബായി ശിവപത്നിയും ലക്ഷ്മി വിഷ്ണുപത്നിയുമാണ്. ദേവിയുടെ ശാക്തപന്ഥം ശൈവ, വൈഷ്ണവ പന്ഥങ്ങളിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തവും സ്വതന്ത്രവുമാണെങ്കിലും, ദേവിയെ മഹാദേവനുമായോ വിഷ്ണുവിനോടോ ബന്ധിപ്പിച്ച് ശാക്തപന്ഥത്തിലൂടെ ശൈവ-വൈഷ്ണവ തർക്കങ്ങൾ ഇല്ലാതാക്കാൻ ശ്രമം നടന്നിട്ടുണ്ടാകാം. അതുകൊണ്ടാണ് അംബാബായിയെ മഹാലക്ഷ്മി എന്ന് സംബോധന ചെയ്യാൻ തുടങ്ങിയതെന്ന് ചില പണ്ഡിതന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. അത്തരത്തിലുള്ള ഒരു മഹാലക്ഷ്മി ക്ഷേത്രം പരാണ്ട താലൂക്കിലെ ശിരസവ് ഗ്രാമത്തിലുണ്ട്. ഇവിടുത്തെ ദേവി അംബാബായി രൂപത്തിലാണെങ്കിലും മഹാലക്ഷ്മി എന്നാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഇവിടെ ദേവിക്ക് സസ്യാഹാരവും മധുരപലഹാരങ്ങളും മാത്രമാണ് നിവേദ്യമായി സമർപ്പിക്കുന്നത്.
ഏകദേശം ൧൦൦൦ വർഷം പഴക്കമുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലെ തൂണുകളിൽ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്ന തലകീഴായ നാഗശില്പങ്ങൾ ഇത് ചാലൂക്യ കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് വ്യക്തമാക്കുന്നു. ദേവാസുര യുദ്ധം ആരംഭിച്ചപ്പോൾ മഹാദേവൻ അസുരന്മാരോട് യുദ്ധം ചെയ്യാൻ പുറപ്പെട്ടു. അപ്പോൾ പാർവ്വതീദേവി ആയുധധാരിണിയായി അദ്ദേഹത്തോടൊപ്പം പുറപ്പെട്ടു. എന്നാൽ, “എന്നെക്കാൾ ഏഴ് കോസ് പിന്നിൽ നിൽക്കൂ” എന്ന് മഹാദേവൻ പാർവ്വതിയോട് നിർദ്ദേശിച്ചതിനാൽ, പാർവ്വതീദേവി ഇവിടെത്തന്നെ നിൽക്കുകയും വിഗ്രഹരൂപത്തിൽ ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിതയാവുകയും ചെയ്തു എന്നാണ് ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം.
പരാണ്ട താലൂക്കിലെ ശിരസവ് ഗ്രാമത്തിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ൧൫ അടി ഉയരമുള്ള ശക്തമായ കൽമതിലുണ്ട്. മതിലിന്റെ കല്ലുകളിൽ വിവിധ മൃഗങ്ങളുടെയും പക്ഷികളുടെയും ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രമതിലിൽ ഇരുനിലകളുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. എട്ട് പടികൾ കയറി ഈ ഇരുനില പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഇവിടുത്തെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദ്വാരപാലകരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകളിലത്തെ നിലയിൽ നഗരഖാനയുണ്ട്. മുറ്റത്ത് ചില മരങ്ങളുണ്ട്, അവയുടെ തറയിൽ ശിവലിംഗവും മറ്റ് ശില്പങ്ങളുമുണ്ട്.
മണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. തുറന്ന രീതിയിലുള്ള ഇവിടുത്തെ മണ്ഡപം പുതുതായി നിർമ്മിച്ചതാണ്.
മുറ്റത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ മണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ മൂന്ന് പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളും അവയ്ക്ക് മുകളിൽ മേൽക്കൂരയുമുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ പിച്ചള മണികളും തറയിൽ ഹോമകുണ്ഡവുമുണ്ട്. മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ പുരാതന ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ള കൽനിർമ്മിതമായ പ്രധാന സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിവ കാണാം. അടഞ്ഞ രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്ത് കൈവരിയും അതിൽ പ്രവേശന കവാടവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ കൂർമ്മശില്പമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വീതം കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുടെ നാല് നിരകളുണ്ട്. പുറംഭാഗത്തെ തൂണുകൾ കൈവരിയിലും ഭിത്തിയിലുമാണ്. മധ്യഭാഗത്തുള്ള നാല് തൂണുകൾക്കിടയിൽ രംഗശിലയുണ്ട്. എല്ലാ തൂണുകളും ചതുരശ്ര ആധാരങ്ങളിൽ നിൽക്കുന്നു, തൂണുകളിൽ ചതുരം, ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളുണ്ട്. തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് കണി (ബ്രാക്കറ്റ്) അതിനു മുകളിൽ ഹസ്തങ്ങളുണ്ട്. ഈ ഹസ്തങ്ങളിൽ തലകീഴായ നാഗങ്ങളെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇത് ചാലൂക്യ കാലഘട്ടത്തിലെ നിർമ്മാണത്തിന്റെ അടയാളമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പ്രധാന സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടതുവശത്ത് മഖരത്തിൽ ഗണപതിയും വലതുവശത്ത് ചതുർഭുജ ഭൈരവ ശില്പവുമുണ്ട്. ഭൈരവന്റെ പിന്നിലെ രണ്ട് കൈകളിൽ ത്രിശൂലവും ഡമരുവും, മുന്നിലെ രണ്ട് കൈകളിൽ നാഗങ്ങളുമുണ്ട്. ഭൈരവ വിഗ്രഹത്തിന് വശങ്ങളിലായി ഭിത്തിയിൽ ദ്വാരശാഖകൾ പോലെയുള്ള നിർമ്മാണമുണ്ട്. അതിലെ ലലാടബിംബത്തിൽ ദേവീശില്പവും ലലാടപട്ടിയിൽ ഗജധരവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ദേവിയുടെ ഉത്സവകാലത്ത് ഉപയോഗിക്കുന്ന പല്ലക്കുണ്ട്.
തുടർന്ന് അന്തരാളത്തിന്റെയും ഗർഭഗൃഹത്തിന്റെയും പ്രവേശന കവാടമുണ്ട്. അന്തരാളത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ ഒരു പടിയുണ്ട്. ദ്വാരശാഖകളിൽ തൂൺ കൊത്തുപണികൾ, ലലാടബിംബത്തിൽ ഇഷ്ടശില്പം, തോരണത്തിൽ ശിഖര കൊത്തുപണികൾ എന്നിവയുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിനും കൊത്തുപണികളുള്ള വാതിലുകൾക്കും പിച്ചള ആവരണമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ കറുത്ത ശാലിഗ്രാമ ശിലയിൽ തീർത്ത ദേവിയുടെ ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. ദേവിയുടെ കൈകളിൽ വിവിധ ആയുധങ്ങളും ശരീരത്തിൽ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളുമുണ്ട്. ദേവിയുടെ തലയിൽ വെള്ളി കിരീടമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയുടെ നാല് മൂലകളിലും നാല് സിംഹശില്പങ്ങളുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് അഞ്ച് തട്ടുകളുള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള, ഉയരമുള്ള, മുകളിലേക്ക് കൂർത്തുവരുന്ന ശിഖരമുണ്ട്. ഈ ശിഖരം പുതുതായി നിർമ്മിച്ചതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ശിഖരത്തിന്റെ താഴെ ഭാഗത്ത് താമരദളങ്ങളുടെ വലയമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ എല്ലാ തട്ടുകളിലും പന്ത്രണ്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളും അവയിൽ ദേവവിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. ഓരോ രണ്ട് ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്കിടയിലും ശക്തിവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. എല്ലാ ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്ക് മുകളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങൾക്കിടയിലുള്ള ശക്തിശില്പങ്ങൾക്ക് മുകളിലും ലഘുശിഖരങ്ങളും അവയ്ക്ക് മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി മൂന്ന് ആമലകങ്ങളും കലശവുമുണ്ട്. ഈ ശിഖരത്തിൽ ആകെ ൧൨൧ കലശങ്ങളുണ്ട്.
ഈ ഉയരമുള്ള ശിഖരത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്: പണ്ട് ക്ഷേത്രത്തിന് ശിഖരം ഉണ്ടായിരുന്നില്ല. അക്കാലത്ത് ഗ്രാമത്തിൽ ഇരുനില വീട് പണിതാൽ അത് തകർന്നു വീഴുമായിരുന്നു. എന്നാൽ ശിഖരം പണിതതിന് ശേഷം ഇരുനില വീടുകൾ നിലനിൽക്കാൻ തുടങ്ങി. ക്ഷേത്രത്തിൽ ചൈത്ര മാസത്തിൽ ദേവിയുടെ വാർഷിക ജാത്രോത്സവം വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ, ഗുലാൽ വിതറി, പല്ലക്ക് ഘോഷയാത്രയായി ദേവി ഗ്രാമപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും പല്ലക്ക് ആഘോഷത്തിൽ പങ്കെടുക്കാനും വരുന്നു. ഇതുകൂടാതെ ചൈത്ര പാഡ്വ, ശാകംഭരി പൗർണ്ണമി, ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവം, ദസറ, ദീപാവലി തുടങ്ങിയ ആഘോഷങ്ങളും ക്ഷേത്രത്തിൽ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ
- പരാണ്ടയിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ, ധാരാശിവിൽ നിന്ന് ൫൦ കി.മീ അകലെ
- പരാണ്ടയിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಂದಿರ
ಶಿರಸವ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಮರಿಯಾಯಿ, ಯಮಾಯಿ, ಕಡಕಲಕ್ಷ್ಮಿ, ಅಂಬಾಬಾಯಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲಾ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದೇ ಮಾತೃತ್ವವಿದೆ. ಅಂಬಾಬಾಯಿ ಶಿವನ ಪತ್ನಿ, ಲಕ್ಷ್ಮಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಪತ್ನಿ. ದೇವಿಯ ಶಾಕ್ತ ಪಂಥವು ಶೈವ ಮತ್ತು ವೈಷ್ಣವ ಪಂಥಗಳಿಗಿಂತ ಭಿನ್ನ ಮತ್ತು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿದ್ದರೂ, ದೇವಿಯನ್ನು ಮಹಾದೇವನೊಂದಿಗೆ ಅಥವಾ ವಿಷ್ಣುವಿನೊಂದಿಗೆ ಜೋಡಿಸುವ ಮೂಲಕ ಶಾಕ್ತ ಪಂಥದಿಂದ ಶೈವ ಮತ್ತು ವೈಷ್ಣವ ವಿವಾದವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದಿರಬಹುದು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಅಂಬಾಬಾಯಿಯನ್ನು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಅಂತಹದೇ ಒಂದು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿಯ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಸವ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿ ಅಂಬಾಬಾಯಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ಆಕೆಯನ್ನು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿಗೆ ಕೇವಲ ಸಸ್ಯಾಹಾರಿ ಮತ್ತು ಸಿಹಿ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ.
ಸುಮಾರು ಒಂದು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಈ ಮಂದಿರವು, ಅದರ ಕಂಬಗಳ ಮೇಲಿರುವ ತಲೆಕೆಳಗಾದ ನಾಗ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದಾಗಿ ಚಾಲುಕ್ಯರ ಕಾಲದ್ದೆಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ದೇವ-ದಾನವ ಯುದ್ಧ ಪ್ರಾರಂಭವಾದಾಗ ಮಹಾದೇವನು ದಾನವರೊಂದಿಗೆ ಹೋರಾಡಲು ಹೊರಟನು. ಆಗ ಪಾರ್ವತಿ ಮಾತೆ ಶಸ್ತ್ರಸಜ್ಜಿತಳಾಗಿ ಅವರೊಂದಿಗೆ ಹೊರಟಳು. ಆದರೆ ನನ್ನಿಂದ ಏಳು ಕೋಸು ಹಿಂದೆ ನಿಲ್ಲು ಎಂದು ಮಹಾದೇವನು ಪಾರ್ವತಿಗೆ ಹೇಳಿದ್ದರಿಂದ, ಪಾರ್ವತಿ ಮಾತೆ ಇಲ್ಲಿಯೇ ನಿಂತು ಮೂರ್ತಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದಳು.
ಪರಾಂಡ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಸವ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ೧೫ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಭದ್ರವಾದ ಕಲ್ಲಿನ ಕೋಟೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಕೋಟೆಯ ಕಲ್ಲುಗಳ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ಪಶು ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿಗಳ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ದ್ವಿಮಹಡಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಈ ದ್ವಿಮಹಡಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಆವರಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ಆವರಣದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮರಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಇತರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ತೆರೆದ ಮಂಟಪವನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಆವರಣಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿದೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳು ಮತ್ತು ನೆಲದ ಮೇಲೆ ಹೋಮಕುಂಡವಿದೆ. ಮುಂದೆ ಪ್ರಾಚೀನ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕಟಾಂಜನ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಆಮೆ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆಗಳಿರುವ ಕಂಬಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನ ಕಂಬಗಳು ಕಟಾಂಜನ ಮತ್ತು ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಮಧ್ಯದ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳ ನಡುವೆ ರಂಗಶಿಲೆಯಿದೆ. ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಚೌಕಾಕಾರದ ಪೀಠಗಳ ಮೇಲೆ ನಿಂತಿವೆ ಮತ್ತು ಕಂಬದ ದಂಡದಲ್ಲಿ ಚೌಕ, ಷಟ್ಕೋನ, ಅಷ್ಟಕೋನ, ವೃತ್ತದಂತಹ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಣಿ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಹಸ್ತಗಳಿವೆ. ಈ ಹಸ್ತಗಳ ಮೇಲೆ ತಲೆಕೆಳಗಾದ ನಾಗಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಇದು ಚಾಲುಕ್ಯರ ಕಾಲದ ನಿರ್ಮಾಣದ ಗುರುತಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮಖರದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಚತುರ್ಭುಜ ಭೈರವ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಭೈರವನ ಹಿಂದಿನ ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಡಮರು ಹಾಗೂ ಮುಂದಿನ ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ನಾಗಗಳಿವೆ. ಭೈರವ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಂತಹ ರಚನೆಗಳಿವೆ. ಅದರ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಗಜಥರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಉತ್ಸವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಳಸುವ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅಂತರಾಳಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಒಂದು ಮೆಟ್ಟಿಲಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಕಂಬದ ನಕ್ಷೆಗಳು, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಇಷ್ಟ ಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ತೋರಣದಲ್ಲಿ ಶಿಖರದ ನಕ್ಷೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಮತ್ತು ನಕ್ಷೆಗಳಿರುವ ಬಾಗಿಲುಗಳಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಹೊದಿಕೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಕಪ್ಪು ಶಾಲಿಗ್ರಾಮ ಕಲ್ಲಿನ ಚತುರ್ಭುಜ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಿಯ ಕೈಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಆಯುಧಗಳು ಮತ್ತು ಮೈಮೇಲೆ ವಸ್ತ್ರಗಳು ಹಾಗೂ ಆಭರಣಗಳಿವೆ. ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಐದು ಹಂತಗಳ ವೃತ್ತಾಕಾರದ, ಎತ್ತರದ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಶಿಖರವಿದೆ. ಈ ಶಿಖರವನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ದಳಗಳ ವೃತ್ತವಿದೆ. ಶಿಖರದ ಎಲ್ಲಾ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಹನ್ನೆರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ದೇವಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಪ್ರತಿ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ನಡುವೆ ಶಕ್ತಿ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಎಲ್ಲಾ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ಮೇಲೆ ಮತ್ತು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳ ನಡುವಿನ ಶಕ್ತಿ ಶಿಲ್ಪದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಲಘು ಶಿಖರಗಳು, ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಮೂರು ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಒಟ್ಟು ೧೨೧ ಕಲಶಗಳಿವೆ.
ಈ ಎತ್ತರದ ಶಿಖರದ ಬಗ್ಗೆ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಹಿಂದೆ ಮಂದಿರದ ಮೇಲೆ ಶಿಖರವಿರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದ್ವಿಮಹಡಿ ಮನೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದರೆ ಅವು ಕುಸಿಯುತ್ತಿದ್ದವು. ಆದರೆ ಶಿಖರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ ನಂತರ ದ್ವಿಮಹಡಿ ಮನೆಗಳು ಸುಸ್ಥಿರವಾಗಿ ಉಳಿಯತೊಡಗಿದವು. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಡೋಲು-ತಾಳಗಳ ಸದ್ದಿನೊಂದಿಗೆ, ಗುಲಾಲು ಎರಚುತ್ತಾ, ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮೂಲಕ ದೇವಿ ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡುತ್ತಾಳೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ, ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಮತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ, ಶಾಕಂಭರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪರಾಂಡದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ, ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೫೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪರಾಂಡದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
মহালক্ষ্মী মন্দির
শিরসব, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
মরীআই, যমআই, কড়কলক্ষ্মী, অম্বাবাই, মহালক্ষ্মী ইত্যাদি সমস্ত দেবতার মধ্যেই এক মাতৃসত্তা বিদ্যমান। অম্বাবাই শিবপত্নী, আর লক্ষ্মী বিষ্ণুপত্নী। দেবীর শাক্তপন্থা শৈব ও বৈষ্ণব পন্থার চেয়ে আলাদা এবং স্বতন্ত্র হলেও, দেবীর মহাদেব কিংবা বিষ্ণুর সঙ্গে সম্পর্ক স্থাপন করে শাক্তপন্থার মাধ্যমে শৈব ও বৈষ্ণব বিবাদ দূর করার চেষ্টা করা হয়ে থাকতে পারে। সেই কারণেই অম্বাবাইকে মহালক্ষ্মী নামে সম্বোধন করা হয়ে থাকতে পারে বলে কিছু গবেষকের মত। এমনই এক মহালক্ষ্মী দেবীর মন্দির পরাণ্ডা তালুকভুক্ত শিরসব গ্রামে অবস্থিত। এখানকার দেবী অম্বাবাই রূপে বিরাজমান এবং তাঁকে মহালক্ষ্মী নামে সম্বোধন করা হয়। এখানকার দেবীকে কেবল নিরামিষ ও মিষ্টান্নের নৈবেদ্য দেখানোর প্রথা রয়েছে।
প্রায় এক হাজার বছর আগের এই মন্দিরটি তার স্তম্ভগুলিতে থাকা উল্টো নাগ ভাস্কর্যের কারণে চালুক্য আমলের বলে স্পষ্ট হয়। এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, দেব-দানব যুদ্ধ শুরু হওয়ার পর মহাদেব দানবদের সঙ্গে লড়াই করতে বেরিয়েছিলেন। সেই সময় পার্বতী মাতা অস্ত্রশস্ত্রে সজ্জিত হয়ে তাঁর সঙ্গে বেরিয়েছিলেন। কিন্তু আমার থেকে সাত ক্রোশ পেছনে থামো, মহাদেবের এই আদেশে পার্বতী মাতা এখানেই থেমে যান এবং মূর্তি রূপে এখানে প্রতিষ্ঠিত হন।
পরাণ্ডা তালুকভুক্ত শিরসব গ্রামের এই মন্দিরটির চারপাশে ১৫ ফুট উঁচু মজবুত পাথরের প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের পাথরে বিভিন্ন পশু ও প্রাণীর ভাস্কর্য খোদাই করা আছে। মন্দিরের প্রাচীরে দোতলা প্রবেশদ্বার রয়েছে। আটটি সিঁড়ি বেয়ে এই দোতলা প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। এখানকার প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপালের চিত্র অঙ্কিত আছে। প্রবেশদ্বারের ওপরের তলায় নগারখানা রয়েছে। প্রাঙ্গণে কিছু গাছ আছে এবং তাদের বেদিতে শিবলিঙ্গ ও অন্যান্য ভাস্কর্য রয়েছে।
মণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। খোলা প্রকৃতির এখানকার মণ্ডপটি নতুন করে নির্মাণ করা হয়েছে।
প্রাঙ্গণের চেয়ে উঁচুতে হওয়ায় মণ্ডপের প্রবেশদ্বারের সামনে তিনটি সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপে গোলাকার স্তম্ভ ও স্তম্ভের ওপর ছাদ রয়েছে। ছাদে পিতলের ঘণ্টা ও মাটিতে হোমকুণ্ড রয়েছে। সামনে প্রাচীন হেমাডপন্তী স্থাপত্যশৈলীর পাথরের নির্মাণযুক্ত প্রধান সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ রয়েছে। বদ্ধ প্রকৃতির সভামণ্ডপে সামনের দিকে রেলিং ও তাতে প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের সামনে কচ্ছপ ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপে চারটি করে নকশাদার স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। বাইরের দিকের স্তম্ভগুলি রেলিং ও দেওয়ালে রয়েছে। মাঝের চারটি স্তম্ভের মধ্যভাগে রঙ্গশিলা রয়েছে। সমস্ত স্তম্ভ চৌকো স্তম্ভপাদের ওপর দাঁড়িয়ে আছে এবং স্তম্ভদণ্ডে চৌকো, ষড়কোণ, অষ্টকোণ, বৃত্তের মতো বিভিন্ন জ্যামিতিক আকার রয়েছে। স্তম্ভের শীর্ষে কণি ও তার ওপর হস্ত রয়েছে। এই হস্তগুলির ওপর উল্টো নাগ খোদাই করা আছে। এটি চালুক্য আমলের নির্মাণের চিহ্ন বলে বলা হয়। প্রধান সভামণ্ডপে বাম দিকে মখরে গণপতি ও ডান দিকে চতুর্ভুজ ভৈরব ভাস্কর্য রয়েছে। ভৈরবের পেছনের দুই হাতে ত্রিশূল ও ডমরু এবং সামনের দুই হাতে নাগ রয়েছে। ভৈরব মূর্তির পাশ দিয়ে দেওয়ালে খাড়া ধারের দ্বারশাখার মতো গঠন রয়েছে। তার ললাটবিম্বের স্থানে দেবী ভাস্কর্য ও ললাটপট্টিতে গজথর রয়েছে। সভামণ্ডপে দেবীর উৎসবের সময় ব্যবহৃত পালকি রয়েছে।
সামনে অন্তরাল ও গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। অন্তরালের চেয়ে উঁচুতে হওয়ায় গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে একটি সিঁড়ি রয়েছে। দ্বারশাখায় স্তম্ভনকশা, ললাটবিম্বে ইষ্ট ভাস্কর্য ও তোরণে শিখর নকশা রয়েছে। প্রবেশদ্বার ও নকশাদার কপাটে পিতলের আচ্ছাদন রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠে দেবীর কালো শালগ্রাম পাথরের চতুর্ভুজ দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে। দেবীর হাতে বিভিন্ন আয়ুধ ও অঙ্গে বস্ত্র ও অলঙ্কার রয়েছে। দেবীর মাথায় রুপোর মুকুট রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের চারটি কোণে চারটি সিংহ ভাস্কর্য রয়েছে। মধ্যভাগে পাঁচ স্তরের গোলাকার, উঁচু ও ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া শিখর রয়েছে। এই শিখরটি নতুন করে নির্মাণ করা হয়েছে বলে বলা হয়। শিখরের নিচের দিকে পদ্মদলের বলয় রয়েছে। শিখরের সমস্ত স্তরে বারোটি করে দেবকোষ্ঠক ও তাতে দেবমূর্তি রয়েছে। প্রতি দুটি দেবকোষ্ঠকের মাঝে শক্তি মূর্তি রয়েছে। সমস্ত দেবকোষ্ঠকের ওপর ও দেবকোষ্ঠকের মাঝের শক্তি ভাস্কর্যের ওপরের দিকে লঘু শিখর, তার ওপর আমলক ও কলস রয়েছে। প্রধান শিখরের শীর্ষে একের ওপর এক তিনটি আমলক ও কলস রয়েছে। এই শিখরে মোট ১২১টি কলস রয়েছে।
এই উঁচু শিখর সম্পর্কে কিংবদন্তি হলো, আগে মন্দিরে শিখর ছিল না। সেই সময় গ্রামে দোতলা বাড়ি বানালে তা ভেঙে পড়ত। কিন্তু শিখর নির্মাণের পর দোতলা বাড়ি টিকে থাকতে শুরু করে। মন্দিরে চৈত্র মাসে দেবীর বার্ষিক যাত্রোৎসব বড় উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই সময় ঢোল-তাশার আওয়াজে, গুলাল উড়িয়ে, পালকি শোভাযাত্রার মাধ্যমে দেবী গ্রাম প্রদক্ষিণ করেন। এই সময় হাজার হাজার ভক্ত দেবীর দর্শন পেতে, মানত পূরণ করতে ও পালকি উৎসবে অংশ নিতে আসেন। এছাড়া মন্দিরে চৈত্র পাডওয়া, শাকম্ভরী পূর্ণিমা, শারদীয় নবরাত্রোৎসব, দশেরা, দীপাবলি ইত্যাদি উৎসবের আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- পরাণ্ডা থেকে ২০ কিমি, আর ধারাশিব থেকে ৫০ কিমি দূরত্বে
- পরাণ্ডা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਿਰ
ਸ਼ਿਰਸਵ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਮਰੀਆਈ, ਯਮਾਈ, ਕੜਕਲਕਸ਼ਮੀ, ਅੰਬਾਬਾਈ, ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਆਦਿ ਸਾਰੀਆਂ ਹੀ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਅੰਦਰ ਇੱਕੋ ਮਾਤ੍ਰਿਤਵ ਸਮਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਅੰਬਾਬਾਈ ਸ਼ਿਵ ਜੀ ਦੀ ਪਤਨੀ ਹੈ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਜੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੀ ਪਤਨੀ ਹਨ। ਭਾਵੇਂ ਦੇਵੀ ਦਾ ਸ਼ਾਕਤ ਪੰਥ ਸ਼ੈਵ ਅਤੇ ਵੈਸ਼ਨਵ ਪੰਥਾਂ ਨਾਲੋਂ ਵੱਖਰਾ ਅਤੇ ਸੁਤੰਤਰ ਹੈ, ਪਰ ਦੇਵੀ ਦਾ ਮਹਾਦੇਵ ਜਾਂ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨਾਲ ਸੰਬੰਧ ਜੋੜ ਕੇ ਸ਼ਾਕਤ ਪੰਥ ਰਾਹੀਂ ਸ਼ੈਵ ਅਤੇ ਵੈਸ਼ਨਵ ਵਿਵਾਦ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਗਈ ਹੋਵੇਗੀ। ਇਸੇ ਲਈ ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਅੰਬਾਬਾਈ ਨੂੰ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਸੰਬੋਧਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਪਰਾਡਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਸ਼ਿਰਸਵ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਦੇਵੀ ਅੰਬਾਬਾਈ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪੁਕਾਰਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸਿਰਫ਼ ਸ਼ਾਕਾਹਾਰੀ ਅਤੇ ਮਿੱਠੇ ਭੋਗ (ਨੈਵੇਦਯ) ਲਗਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ।
ਲਗਭਗ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਆਪਣੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਬਣੇ ਉਲਟੇ ਨਾਗਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪਾਂ ਕਾਰਨ ਚਾਲੁਕਯ ਕਾਲੀਨ ਹੋਣ ਦਾ ਪ੍ਰਮਾਣ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਦੇਵ-ਦਾਨਵ ਯੁੱਧ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ ਤਾਂ ਮਹਾਦੇਵ ਦਾਨਵਾਂ ਨਾਲ ਲੜਨ ਲਈ ਨਿਕਲੇ। ਉਸ ਸਮੇਂ ਪਾਰਵਤੀ ਮਾਤਾ ਸ਼ਸਤਰਾਂ ਨਾਲ ਲੈਸ ਹੋ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਚੱਲ ਪਈ। ਪਰ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਪਾਰਵਤੀ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਮੇਰੇ ਤੋਂ ਸੱਤ ਕੋਹ ਪਿੱਛੇ ਰੁਕ ਜਾਓ, ਇਸ ਲਈ ਪਾਰਵਤੀ ਮਾਤਾ ਇੱਥੇ ਹੀ ਰੁਕ ਗਈ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਈ।
ਪਰਾਡਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਸ਼ਿਰਸਵ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ੧੫ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮਜ਼ਬੂਤ ਪੱਥਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪੱਥਰਾਂ ਉੱਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪਸ਼ੂਆਂ ਅਤੇ ਜਾਨਵਰਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ੮ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇਸ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਉੱਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕੁਝ ਰੁੱਖ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ਉੱਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਅਤੇ ਹੋਰ ਸ਼ਿਲਪ ਮੌਜੂਦ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਖੁੱਲ੍ਹਾ ਮੰਡਪ ਨਵਾਂ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ੩ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀ ਘੰਟੀ ਅਤੇ ਜ਼ਮੀਨ ਉੱਤੇ ਹੋਮਕੁੰਡ ਹੈ। ਅੱਗੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਮੁੱਖ ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਕਟਹਿਰਾ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਕਟਹਿਰੇ ਅਤੇ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਚੌਰਸ ਆਧਾਰਾਂ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਡੰਡਿਆਂ ਵਿੱਚ ਚੌਰਸ, ਛੇ-ਕੋਣੇ, ਅੱਠ-ਕੋਣੇ, ਗੋਲ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਆਕਾਰ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਕਣੀ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਹੱਥਾਂ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਹੱਥਾਂ ਉੱਤੇ ਉਲਟੇ ਨਾਗ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਹ ਚਾਲੁਕਯ ਕਾਲ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਨਿਸ਼ਾਨੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਚਤੁਰਭੁਜ ਭੈਰਵ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਭੈਰਵ ਦੇ ਪਿਛਲੇ ਦੋ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਡਮਰੂ ਅਤੇ ਅਗਲੇ ਦੋ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਨਾਗ ਹਨ। ਭੈਰਵ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਕੰਧ ਉੱਤੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ਵਰਗੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਉਸਦੇ ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਉੱਤੇ ਦੇਵੀ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਲਲਾਟ-ਪੱਟੀ ਉੱਤੇ ਗਜਥਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਉਤਸਵ ਸਮੇਂ ਵਰਤੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਪਾਲਕੀ ਹੈ।
ਅੱਗੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਪੌੜੀ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ਉੱਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ, ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਉੱਤੇ ਇਸ਼ਟ ਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਤੋਰਣ ਵਿੱਚ ਸਿਖਰ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਅਤੇ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕਵਾੜਾਂ ਉੱਤੇ ਪਿੱਤਲ ਦੀ ਪਰਤ ਚੜ੍ਹੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਕਾਲੇ ਸ਼ਾਲੀਗ੍ਰਾਮ ਪੱਥਰ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਖੜ੍ਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਯੁਧ ਹਨ ਅਤੇ ਸਰੀਰ ਉੱਤੇ ਵਸਤਰ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਹਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ਉੱਤੇ ਚਾਰ ਸ਼ੇਰਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਵਿਚਕਾਰ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਗੋਲਾਕਾਰ, ਉੱਚਾ ਅਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਜਾਣ ਵਾਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਇਹ ਸਿਖਰ ਨਵਾਂ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਮਾਲਾ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ੧੨-੧੨ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵ-ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਹਰ ਦੋ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਕਤੀ-ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਾਰੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕਾਂ ਉੱਤੇ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ-ਸ਼ਿਲਪਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਛੋਟੇ ਸਿਖਰ, ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਤਿੰਨ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਇਸ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਕੁੱਲ ੧੨੧ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਇਸ ਉੱਚੇ ਸਿਖਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਮੰਦਿਰ ਉੱਤੇ ਸਿਖਰ ਨਹੀਂ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਜੇਕਰ ਕੋਈ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਘਰ ਬਣਾਉਂਦਾ ਸੀ ਤਾਂ ਉਹ ਡਿੱਗ ਪੈਂਦਾ ਸੀ। ਪਰ ਸਿਖਰ ਬਣਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਘਰ ਟਿਕਣ ਲੱਗੇ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦਾ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ, ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ, ਪਾਲਕੀ ਜਲੂਸ ਰਾਹੀਂ ਦੇਵੀ ਪਿੰਡ ਦਾ ਦੌਰਾ ਕਰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ, ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਅਤੇ ਪਾਲਕੀ ਸਮਾਰੋਹ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੋਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਪੜਵਾ, ਸ਼ਾਕੰਭਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤਰੀ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਰਾਡਾ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ੫੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਰਾਡਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple Tuljapur, Tal. Tuljapur, Dist. Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखें -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Paranda, Dist. Dharashiva
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखें -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीSecret Siddheshwar Temple Ter, Tal. Dharashiv, Dist. Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखें
