महागणपती मंदिर

खांडोळा-माशेल, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा

आशिया खंडांतील अनेक देशांमध्ये पूजली जाणारी गणपती ही बुद्धीची देवता. हा गणांचा नायक, तसेच विघ्नहर्ता आहे. त्यामुळेच धर्मशास्त्रात गणेशाला आद्यपूजेचा मान देण्यात आलेला आहे. या गणेशाची अनेक मंदिरे गोमंतकात आहेत. त्यांतील खांडोळा येथील महागणपती मंदिर हे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. ‘श्रीगणपती नावेलकर श्रीस्थळ खांडोळे तपे प्रियोळ बागायत’ अशी नोंद असलेले हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. येथील गणपती नवसास पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येथे नेहमी भाविकांची गर्दी असते.

गोव्यातील अनेक मंदिरांप्रमाणेच हे मंदिरही येथे स्थलांतर होऊन स्थापन झालेले आहे. याचा इतिहास असा की सह्याद्री खंडामध्ये दीपावती असा उल्लेख असलेल्या दिवाडी बेटावर या गणेशाचे मूळ स्थान होते. तिसवाडी तालुक्यातील या बेटावर नावेली, गोलती, मालार आणि नार्वे ही गावे होती. त्यातील नावेली येथे या गणेशाचे प्राचीन मंदिर होते. इ.स. १५१० मध्ये गोमंतकात पोर्तुगीज फिरंग्यांचा प्रवेश झाला. पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील तत्कालिन व्हिसेरेई ऑफाँस द अल्बुकर्क याने याच्या कारकिर्दीत गोव्यात सरठाणेदार, कृष्णा शेणवी, चोडणेचे लखु नाईक, थोरल्या नेवऱ्याचे गोपू शेणवी, गोवे शहरातील अनू शेणवी मोने, दादाजी कृष्ण शेणवी अशा हिंदू आसामी राज्यकारभारात होत्या. त्या प्रारंभीच्या काळात त्याने हिंदूंना धार्मिक संरक्षणाची हमी दिली होती.

असे असले, तरी काही काळातच या अल्बुकर्कने तिसवाडीतील सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडले. इतिहासाचार्य विनायक नारायण शेणवी धुमे यांच्या ‘देवभूमी गोमंतक’ (१९८८) या पुस्तकानुसार, या अल्बुकर्कच्या काळातच, इ.स. १५१२च्या सुमारास नावेलीतील गणेश मंदिरास धोका निर्माण झाला. तेव्हा नावेलीतील महाजनांनी पोर्तुगीजांचा हल्ला होण्यापूर्वीच गुपचूप मंदिरातील मूर्ती हलवली. त्या वेळी पोर्तुगीजांच्या राज्याच्या हद्दीबाहेर असलेल्या खांडेपार येथे या गणेशमूर्तीची स्थापना केली. यानंतर काही दिवसांनी येथे अशी एक घटना घडली की त्यामुळे खांडेपार येथूनही या मूर्तीचे स्थलांतर करण्यात आले. ती घटना अशी की नावेलीमध्ये शेणवी नावेलकर या नावाचे एक गणेशभक्त राहात असत. गावातील गणेशमूर्ती खांडेपार येथे हलवण्यात आल्यानंतर गणेशाच्या वियोगाने ते बेचैन झाले होते. एके दिवशी त्यांनी ही गणेशमूर्ती परत आणण्याचा निश्चय केला. त्यानुसार काही लोकांना बरोबर घेऊन ते खांडेपारमध्ये गेले. तेथे धनत्रयोदशीच्या रात्री मंदिरात घसून त्यांनी गुपचूप गणेशमूर्ती पळवली. दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील लोकांना मूर्ती नाहिशी झाल्याचे दिसले. संतापलेल्या लोकांनी सर्वत्र मूर्तीचा शोध सुरू केला. त्या पथकातील काही जणांना खाडी ओलांडण्याच्या तयारीत असलेले लोक दिसले. त्यांच्याकडे बोचके होते. ते पाहून नावेलीतील लोकांना संशय आला. त्यांनी विचारणा केली. प्रकरण हातघाईवर आले. अखेर बोचके उघडले असता त्यात देवाची मूर्ती दिसली. ती पळवण्याचे कारण समजल्यावर मात्र लोक शांत झाले आणि अखेर असे ठरले की मूर्ती अशा ठिकाणी स्थापन करावी की जेथे सर्वांना येणे सोयीस्कर असेल. त्यानुसार भातग्राम डिचोली हद्दीत, हिंदाळे-नार्वे (नार्वे-डिचोली) येथे तिची स्थापना करण्यात आली. पुढे १७४६ ते ५१ या काळात पोर्तुगीज सेनापती मार्क्वेस डी अलोर्ना याने डिचोली, सांखळी या भागांतील किल्ल्यांवर हल्ला चढवला. त्या भयाने डिचोली तालुक्यातून गणेश मंदिराचे पुन्हा स्थलांतर करण्यात आले व ती सध्याच्या जागी खांडोळा येथे स्थापन करण्यात आली.

येथील मोठ्या प्रांगणात हे भव्य मंदिर वसले आहे. या मंदिराची संरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात खालच्या बाजूस विस्तिर्ण सभामंडप आहे. तेथून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी डावीकडे आणि उजवीकडे असे दोन जिने आहे. डावीकडे शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे, तर उजवीकडे १५ पायऱ्या चढून गेल्यानंतर गणपतीचे मंदिर आहे.

मंदिराच्या खालच्या मजल्यावरील या भव्य सभामंडपाचे उद्‌घाटन १८ एप्रिल १९७३ रोजी गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बांधणीच्या सभामंडपात प्रवेश करताना कालभैरवाचे छोटे देऊळ लागते. त्यात संगमरवरी चौथऱ्यावर कालभैरवाची पितळी मूर्ती विराजमान आहे. या मंदिरालगत सभामंडपात मोठा रंगमच उभारलेला आहे. त्याच्या डावीकडे निरंकालाची (निरंकार) देवळी आहे. आत मोठ्या चौथऱ्यावर निरंकालाची पितळी मूर्ती आहे. येथे चौकोनाकार शाळुंकेवरील लिंगावर निरंकाराची धोतर आणि मुंडासे घातलेली व हाती दंड असलेली उभी मूर्ती कोरलेली आहे. तिच्यामागे पितळेची प्रभावळ व त्यावर मोठे कीर्तिमुख आहे.

डावीकडील जिन्याने १२ पायऱ्या चढून गेल्यानंतर शांतादुर्गा देवीचे मंदिर लागते. महामंडप आणि त्यातून प्रदक्षिणामार्ग असलेले गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. महामंडपात मध्यभागी मोठी समई ठेवलेली आहे. महामंडपाच्या छतास पितळी घंटा आणि काचेची झुंबरे टांगलेली आहेत. गर्भगृहास लाकडी कोरीव काम असलेले प्रवेशद्वार आहे. येथे द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख आहे. आत चांदीच्या मोठ्या देव्हाऱ्यामध्ये शांतादुर्गा देवीची चांदीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे देवी पितळेचा मोठा घट व त्यावर रौप्य मुखवटा अशा स्वरूपात आहे. या मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. या गर्भगृहाच्या वर अष्टकोनाकार व त्यावर घुमट आणि कलश असलेले शिखर आहे.

उजवीकडील जिन्याच्या १५ पायऱ्या चढून गेल्यानंतर गणपतीचे मंदिर लागते. या मंदिराच्या अर्धमंडपात चारही कोपऱ्यांत द्वारपालांच्या मूर्ती आहेत. छताकडील भागावर काही ऋषीमुनींची उठावशिल्पे आहेत. महामंडपात बाह्यभिंतींपासून काही अंतर आत, दोन्ही बाजूंनी रुंद गोलाकार स्तंभांची रांग आहे. हे स्तंभ कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. या स्तंभांवरील देव्हाऱ्यांत अष्टविनायकांच्या मूर्ती विराजमान आहेत. छतावरील काचेच्या झुंबरांनी महामंडप सुशोभित करण्यात आला आहे. महामंडपातूनच गर्भगृहाचा प्रदक्षिणा मार्ग आहे.

गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर वरच्या बाजूला पाच मोठे देव्हारे आहेत. त्यात मध्यभागी गणेशाची उठावशिल्प स्वरूपातील मूर्ती आहे. तिच्या दोन्ही बाजूंस ऋद्धी आणि सिद्धींच्या मूर्ती आहेत. सर्वांत डावीकडील देव्हाऱ्यांत माता सरस्वतीची, तर उजवीकडे कार्तिकेयाची मूर्ती आहे. गर्भगृहास चार शाखीय प्रवेशद्वार आहे. पानाफुलांची कोरीव नक्षी आणि फुलांच्या तोरणांनी ते सुशोभित केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पुरूषभर उंचीच्या मोठ्या पितळी समया ठेवलेल्या आहेत. या समयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शीर्षभागी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची, वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारलेली गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. उच्चासनावर दोन्ही पाय खाली सोडलेल्या स्थितीत बसलेली ही मूर्ती चतुर्भूज आहे. मूर्तीच्या वरच्या हातांत नागपाश आणि परशू आहे, तर खालचा एक हात अभयमुद्रेत व दुसरा हात वरदमुद्रेत आहे. मूर्तीच्या मुकूट, कान व हातांवर चांदीचे आवरण चढवलेले आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. तिच्यावर वरच्या बाजूला कीर्तिमुख, तर खालच्या बाजूंना देवसेविकांच्या कोरीव प्रतिमा आहेत. त्यांच्यावरच्या बाजूला व्यालप्रतिमा आहेत. गणेशाची ही ५६ वर्षांपूर्वी घडवलेली नवी मूर्ती आहे. या मंदिरातील आधीची जुनी मूर्ती मुख्यासनाच्या उजव्या बाजूस आसनस्थ आहे.

गणेशाची ही जुनी मूर्ती तेराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. या पितळी मूर्तीवरील कदंब-होयसाळ कालीन कलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ती चतुर्भूज असून तिच्या वरच्या उजव्या हातात परशू आहे, तर खालचा उजवा हात अभय मुद्रेत आहे. मूर्तीचा डावा वरचा हात भग्न झालेला आहे. खालच्या डाव्या हातात लाडू आहे. मूर्तीच्या प्रभावळीवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. ही जुनी गणेशमूर्ती अत्यंत प्राचीन असल्याने, तसेच तिचे तिनदा स्थलांतर झाल्याने तिची बरीच झीज झाली होती. त्यामुळे मंदिरात नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नवी मूर्ती घडवण्यात आली व माघ शुक्ल त्रयोदशी, शुक्रवार, ३१ जानेवारी १९६९ रोजी दुपारी १.१५ वाजता पुनर्वसू नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर तिची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. गौडपादाचार्य संस्थान कैवल्यपूर मठाधीश सच्चिदानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते ही प्रतिष्ठापना करण्यात आली. नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर जुनी मूर्ती नदी वा समुद्रात विधिवत विसर्जित केली जाते. परंतु काही कारणांमुळे येथील जुनी मूर्ती मंदिरातच ठेवण्यात आली. गर्भगृहावर चौकोनाकार बांधकाम व त्यावर उतरत्या स्वरुपाचे छप्पर आणि त्यावर कलश अशा प्रकारचे शिखर आहे. या गणेश मंदिरात रवळनाथ, महालक्ष्मी, लक्ष्मीनारायण, तसेच सूर्यनारायण यांच्या पाषाणमूर्तीही स्थापित आहेत.

या देवस्थानात हिंदूंचे रामनवमी, अनंतव्रत, विजयादशमी, तुलसी विवाह, दीपावली, गणेशोत्सव आदी सर्व महत्त्वाचे सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. येथे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीस गणेशाचा शिबिकोत्सव साजरा केला जातो. त्याच प्रमाणे येथे माघ शुद्ध चतुर्थीला गणेश नवरात्र मोठ्या धुमधडाक्यात व धार्मिक वातावरणात साजरी केली जाते. या देवालयात प्रसादकौल घेण्याची वहिवाट जुन्या काळापासून सुरू आहे.

उपयुक्त माहिती:

  • फोंडा येथून १८ किमी आणि पणजी येथूनही १८ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • फोंडा येथून राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०८३२ २९१३८६२

महागणपति मंदिर

खांडोला-माशेल, तहसील फोंडा, जिला उत्तर गोवा

एशिया महाद्वीप के अनेक राष्ट्रों में पूजित श्रीगणेश बुद्धि के अधिष्ठाता देव हैं। वे गणों के नायक एवं विघ्नहर्ता हैं। इसी कारण धर्मशास्त्रों में श्रीगणेश को प्रथम पूजा (आद्यपूजा) का गौरव प्रदान किया गया है। गोमंतक की पुण्यधरा पर श्रीगणेश के अनेक देवालय सुशोभित हैं, जिनमें खांडोला स्थित महागणपति मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। ‘श्रीगणपति नावेलकर श्रीस्थल खांडोला तपे प्रियोल बागायत’ के रूप में अभिलिखित यह मंदिर सोलहवीं शताब्दी का है। श्रद्धालुओं की यह अटूट श्रद्धा है कि यहाँ के गणपति मनोकामना पूर्ण करने वाले हैं, अतः उनके दर्शन हेतु यहाँ सदैव श्रद्धालुओं का ताँता लगा रहता है।

गोवा के अन्य मंदिरों की भाँति यह मंदिर भी यहाँ स्थानांतरित होकर स्थापित हुआ है। इसका इतिहास यह है कि सह्याद्रि खंड में ‘दीपावती’ के रूप में उल्लेखित दिवाड़ी द्वीप पर इस गणेश विग्रह का मूल स्थान था। तिसवाड़ी तहसील के इस द्वीप पर नावेली, गोलती, मालार और नार्वे नामक ग्राम थे। उनमें से नावेली में इस गणेश का प्राचीन मंदिर स्थित था। ईस्वी सन १५१० में गोमंतक में पुर्तगाली आक्रांताओं का प्रवेश हुआ। पुर्तगालियों के तत्कालीन वायसराय अल्फांसो डी अल्बुकर्क के शासनकाल में गोवा में सर-थानेदार कृष्णा शेणवी, चोडण के लखु नायक, थोरले (बड़े) नेवरा के गोपू शेणवी, गोवा नगर के अनू शेणवी मोने और दादाजी कृष्ण शेणवी जैसे हिंदू जन राज्य प्रशासन में सम्मिलित थे। उस प्रारंभिक काल में उसने हिंदुओं को धार्मिक संरक्षण का आश्वासन दिया था।

यद्यपि ऐसा था, तथापि अल्प समय में ही इस अल्बुकर्क ने तिसवाड़ी के सप्तकोटेश्वर मंदिर को ध्वस्त कर दिया। इतिहासाचार्य विनायक नारायण शेणवी धुमे की पुस्तक ‘देवभूमि गोमंतक’ (१९८८) के अनुसार, इसी अल्बुकर्क के समय में, ईस्वी सन १५१२ के आसपास नावेली के गणेश मंदिर पर संकट के बादल मँडराने लगे। तब नावेली के महाजनों ने पुर्तगाली आक्रमण से पूर्व ही अत्यंत गुप्त रीति से मंदिर के विग्रह को वहाँ से हटा दिया। उस समय पुर्तगाली साम्राज्य की सीमाओं से परे स्थित खांडेपार में इस गणेश प्रतिमा की स्थापना की गई। इसके कुछ समय पश्चात वहाँ एक ऐसी घटना घटी जिसके कारण खांडेपार से भी इस विग्रह का स्थानांतरण करना पड़ा। वह वृत्तांत इस प्रकार है कि नावेली में शेणवी नावेलकर नामक एक गणेश भक्त निवास करते थे। ग्राम के गणेश विग्रह को खांडेपार ले जाए जाने के पश्चात वे विरह की व्याकुलता से अशांत रहने लगे। एक दिन उन्होंने इस गणेश प्रतिमा को पुनः लाने का संकल्प किया। तदनुसार कुछ व्यक्तियों को साथ लेकर वे खांडेपार पहुँचे। वहाँ धनत्रयोदशी की रात्रि को मंदिर में प्रवेश कर उन्होंने गुप्त रूप से गणेश प्रतिमा चुरा ली। अगले दिन प्रातःकाल ग्रामीणों ने देखा कि प्रतिमा अदृश्य है। क्रुद्ध जन समुदाय ने सर्वत्र प्रतिमा की खोज प्रारंभ कर दी। उस दल के कुछ लोगों को खाड़ी पार करने की तैयारी में जुटे कुछ व्यक्ति दिखाई दिए, जिनके पास एक पोटली थी। उन्हें देखकर नावेली के लोगों को संदेह हुआ। उन्होंने पूछताछ की और स्थिति संघर्ष तक पहुँच गई। अंततः जब पोटली खोली गई, तो उसमें देव प्रतिमा दिखाई दी। प्रतिमा ले जाने का कारण ज्ञात होने पर लोग शांत हुए और अंततः यह निर्णय लिया गया कि प्रतिमा को ऐसे स्थान पर स्थापित किया जाए जहाँ सभी के लिए आवागमन सुलभ हो। तदनुसार भातग्राम डिचोली की सीमा में, हिंदाले-नार्वे (नार्वे-डिचोली) में उसकी स्थापना की गई। कालांतर में १७४६ से १७५१ के मध्य पुर्तगाली सेनापति मार्क्विस डी अलोर्ना ने डिचोली और सांखली क्षेत्र के दुर्गों पर आक्रमण किया। उस भय से डिचोली तहसील से गणेश मंदिर का पुनः स्थानांतरण किया गया और उसे वर्तमान स्थान खांडोला में स्थापित किया गया।

विस्तृत प्रांगण में यह भव्य मंदिर प्रतिष्ठित है। इस मंदिर की संरचना विशिष्ट है। इसमें निचले भाग में एक विशाल सभामंडप है। वहाँ से द्वितीय तल पर जाने हेतु बाईं और दाईं ओर दो सोपान मार्ग हैं। बाईं ओर श्री शांतादुर्गा देवी का मंदिर है, जबकि दाईं ओर १५ सोपान चढ़ने के पश्चात श्रीगणपति का मंदिर स्थित है।

मंदिर के निचले तल के इस भव्य सभामंडप का उद्घाटन १८ अप्रैल १९७३ को गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाधीश विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी के कर-कमलों द्वारा संपन्न हुआ। इस नवनिर्मित सभामंडप में प्रवेश करते समय कालभैरव का लघु देवालय मिलता है। उसमें संगमरमर के चबूतरे पर कालभैरव की पीतल की प्रतिमा विराजमान है। इस मंदिर के निकट सभामंडप में एक विशाल रंगमंच निर्मित है। उसके बाईं ओर निरंकार का लघु मंदिर है। भीतर विशाल चबूतरे पर निरंकार की पीतल की प्रतिमा है। यहाँ चौकोर जलहरी (शालुंका) पर स्थित लिंग पर निरंकार की धोती और पगड़ी धारण किए हुए तथा हाथ में दंड लिए हुए खड़ी प्रतिमा उत्कीर्ण है। उसके पीछे पीतल की प्रभावली और उस पर विशाल कीर्तिमुख सुशोभित है।

बाईं ओर के सोपानों से १२ पद चढ़ने पर शांतादुर्गा देवी का मंदिर आता है। महामंडप और उसके पश्चात प्रदक्षिणा पथ युक्त गर्भगृह ऐसी इस मंदिर की रचना है। महामंडप के मध्य में एक विशाल दीपस्तंभ रखा गया है। महामंडप की छत से पीतल के घंटे और काँच के दीप-वृक्ष लटक रहे हैं। गर्भगृह का प्रवेश द्वार काष्ठ की नक्काशी से अलंकृत है। यहाँ द्वार की चौखट के ललाटबिंब पर कीर्तिमुख अंकित है। भीतर रजत के भव्य सिंहासन में शांतादुर्गा देवी की रजत प्रतिमा प्रतिष्ठित है। यहाँ देवी पीतल के विशाल कलश और उस पर रजत के मुखौटे के रूप में विद्यमान हैं। इस प्रतिमा के पीछे रजत की प्रभावली है। इस गर्भगृह के ऊपर अष्टकोणीय शिखर है जिस पर गुंबद और कलश सुशोभित हैं।

दाईं ओर के १५ सोपान चढ़ने के पश्चात गणपति का मंदिर आता है। इस मंदिर के अर्धमंडप के चारों कोनों में द्वारपालों की प्रतिमाएँ हैं। छत के भाग पर कुछ ऋषि-मुनियों के शिल्प उत्कीर्ण हैं। महामंडप में बाहरी भित्तियों से कुछ दूरी पर, दोनों ओर विशाल गोलाकार स्तंभों की पंक्तियाँ हैं। ये स्तंभ मेहराबों द्वारा परस्पर जुड़े हुए हैं। इन स्तंभों पर स्थित देवकोष्ठकों में अष्टविनायकों की प्रतिमाएँ विराजमान हैं। छत पर काँच के दीप-वृक्षों से महामंडप को सुसज्जित किया गया है। महामंडप से ही गर्भगृह का प्रदक्षिणा मार्ग जाता है।

गर्भगृह की सम्मुख भित्ति पर ऊपरी भाग में पाँच विशाल देवकोष्ठक हैं। उनमें मध्य में गणेश की उत्कीर्ण शिल्प प्रतिमा है। उसके दोनों ओर ऋद्धि और सिद्धि की प्रतिमाएँ हैं। दूर बाईं ओर के देवकोष्ठक में माता सरस्वती और दाईं ओर कार्तिकेय की प्रतिमा है। गर्भगृह का प्रवेश द्वार चतुशाखीय है। यह पुष्प-पल्लवों की सूक्ष्म नक्काशी और पुष्प-मालाओं से अलंकृत है। प्रवेश द्वार के दोनों पार्श्वों में पुरुष की ऊँचाई के समान विशाल पीतल के दीप रखे गए हैं। इन दीपों की विशेषता यह है कि इनके शीर्ष भाग पर गणेश की प्रतिमा अंकित है। गर्भगृह में उच्चासन पर कृष्ण पाषाण की, वस्त्राभूषणों और पुष्पमालाओं से सुसज्जित गणेश प्रतिमा प्रतिष्ठित है। उच्चासन पर दोनों चरण नीचे की ओर मुक्त स्थिति में स्थित यह प्रतिमा चतुर्भुज है। विग्रह के ऊपरी हाथों में नागपाश और परशु है, जबकि निचला एक हाथ अभय मुद्रा में और दूसरा वरद मुद्रा में है। प्रतिमा के मुकुट, कानों और हाथों पर रजत का आवरण चढ़ा हुआ है। विग्रह के पीछे रजत की प्रभावली है, जिसके ऊपरी भाग पर कीर्तिमुख और निचले भागों में परिचारिकाओं की नक्काशीदार प्रतिमाएँ हैं। उनके ऊपर व्याल प्रतिमाएँ सुशोभित हैं। श्रीगणेश की यह ५६ वर्ष पूर्व निर्मित नवीन प्रतिमा है। इस मंदिर की पूर्वकालीन प्राचीन प्रतिमा मुख्य आसन के दाईं ओर आसीन है।

विद्वानों का मत है कि गणेश की यह प्राचीन प्रतिमा तेरहवीं शताब्दी की है। इस पीतल की प्रतिमा पर कदंब-होयसल कालीन कला का प्रभाव स्पष्ट दिखाई देता है। यह चतुर्भुज है और इसके ऊपरी दाएँ हाथ में परशु है, जबकि निचला दाया हाथ अभय मुद्रा में है। प्रतिमा का बायाँ ऊपरी हाथ खंडित है। निचले बाएँ हाथ में मोदक है। प्रतिमा की प्रभावली पर सूक्ष्म नक्काशी की गई है। यह प्राचीन गणेश प्रतिमा अत्यंत पुरानी होने तथा उसका तीन बार स्थानांतरण होने के कारण काफी क्षत-विक्षत हो गई थी। अतः मंदिर में नवीन प्रतिमा प्रतिष्ठित करने का निर्णय लिया गया। तदनुसार नवीन विग्रह का निर्माण किया गया और माघ शुक्ल त्रयोदशी, शुक्रवार, ३१ जनवरी १९६९ को दोपहर १:१५ बजे पुनर्वसु नक्षत्र के शुभ मुहूर्त पर उसकी गर्भगृह में प्राण-प्रतिष्ठा की गई। गौडपादाचार्य संस्थान कैवल्यपुर मठाधीश सच्चिदानंद सरस्वती स्वामी के कर-कमलों द्वारा यह प्रतिष्ठा संपन्न हुई। नवीन प्रतिमा की स्थापना के पश्चात प्राचीन प्रतिमा को नदी अथवा समुद्र में विधिवत विसर्जित किया जाता है, किंतु किन्हीं कारणों से यहाँ की प्राचीन प्रतिमा मंदिर में ही सुरक्षित रखी गई। गर्भगृह पर चौकोर निर्माण और उस पर ढलवाँ छत तथा कलश युक्त शिखर है। इस गणेश मंदिर में रावलनाथ, महालक्ष्मी, लक्ष्मीनारायण तथा सूर्यनारायण की पाषाण प्रतिमाएँ भी स्थापित हैं।

इस देवस्थान में रामनवमी, अनंतव्रत, विजयादशमी, तुलसी विवाह, दीपावली, गणेशोत्सव आदि समस्त महत्वपूर्ण पर्व एवं उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक मनाए जाते हैं। यहाँ प्रत्येक माह की चतुर्थी को गणेश का शिबिकोत्सव (पालकी उत्सव) मनाया जाता है। इसी प्रकार यहाँ माघ शुक्ल चतुर्थी को गणेश नवरात्रि अत्यंत हर्षोल्लास एवं धार्मिक वातावरण में आयोजित की जाती है। इस देवालय में प्रसाद-कौल ग्रहण करने की परंपरा प्राचीन काल से चली आ रही है।

उपयोगी जानकारी:

  • फोंडा से १८ किमी और पणजी से भी १८ किमी की दूरी पर
  • निजी वाहन मंदिर के पार्किंग तक आ सकते हैं
  • फोंडा से राज्य परिवहन सेवा की बस सुविधा उपलब्ध है
  • परिसर में निवास एवं जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है
  • संपर्क: मंदिर कार्यालय, दूरभाष: ०८३२-२९१३८६२
Back To Home