कुंभजाई देवी

कुंभवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे हे गाव गर्द वनराईत निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. या गावचे ग्रामदैवत असलेले कुंभजाई देवीचे मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या मंदिरामध्ये होणारा अखंड हरिनाम सप्ताह कोकणात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार येथे येतात. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो वारकऱ्यांची उपस्थिती असते. त्यामुळे या कार्यक्रमाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

कुंभजा हे देवीचे एक नाव आहे. ‘श्री ललिता त्रिशती स्तोत्रा देवीस कुंभजा या नावाने संबोधले आहे. पूर्वीच्या म्हैसूर संस्थानच्याकायो श्री गौरीया राज्यगीतामध्येहीशुंबदिमा धंभोनिधी कुंभजा निभा देवीअसा देवीनामाचा उल्लेख आढळतो. म्हैसूरचे राजे चामराजा वोडियार यांच्या शासनकाळात .. १८८१ मध्ये म्हैसूर दरबारचे दरबारी कवी बसवप्पा शास्त्री यांनी हे गीत रचले होते. कुंभजा आणि आई या शब्दसमासातून कुंभजाई हे नाम तयार झाले आहे तिच्यावरून गावास कुंभवडे हे नाव पडले, असे सांगण्यात येते. महाराष्ट्रात कुंभवडे नावाची अनेक गावे आहेत. अगदी कोकणातही दोडामार्ग, राजापूर, कणकवली या तालुक्यांत कुंभवडे आहे. मात्र वैभववाडी तालुक्यातील या कुंभवडेमध्ये कुंभजाईचे मंदिर आहे

कुंभवडेचे कुंभजाई हे मुख्य दैवत असून ते शिवलिंगाचे स्वयंभू स्थान आहे. स्वयंभूलिंग किंवा स्वयंभुवलिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते अनादी काळापासून अस्तित्वात असते. त्यामुळेच ते क्षतीग्रस्त झाले तरी त्याच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता नसते. कुंभवडेतील स्वयंभू शिवलिंग हेरुजीव पाषाणाचे म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या, एकजीव झालेल्या पाषाणाचे आहे. एका जुन्या कथेनुसार, येथे कातळावर गोल आकाराची कुंभासारखी पिंड दिसून आली, म्हणून या स्थानास कुंभजाई हे नाव पडले. असे सांगितले जाते की कुंभजाई स्थळी एक भुयार असून त्या ठिकाणी भुजंग दर्शन देत असे. गावकरी दर सोमवारी या ठिकाणी दूध ठेवत.

वैभववाडी शहरापासून सोनाळी करुळमार्गे कुंभवडे गावात येता येते. मुख्य रस्त्यापासून २० ते २५ मीटर अंतरावर कुंभजाई देवी मंदिराची कमान लागते. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे कुंभजाई मंदिरासह एकवीरादेवी, गांगेश्वर देव, हनुमान, वेताळदेव ब्राह्मणदेव यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. एकाच ठिकाणी गावातील प्रमुख मंदिरे, हे या गावचे वैशिष्ट्य आहे.

कुंभजाई मंदिराच्या प्रांगणात एक दीपमाळ आहे. उंच चौकोनी चौथऱ्यावर वर निमुळता होत गेलेला गोलाकार स्तंभ त्यावर सर्व बाजूंनी दीप ठेवण्यासाठी केलेली अर्धवर्तुळाकार आकाराची दगडी रचना, असे या दीपमालेचे स्वरूप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक तुळशी वृंदावन आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला दोन गजराज त्यांच्यामध्ये मंगल कलश, असे उठावचित्र आहे. अर्धखुला सभामंडप त्यापुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह, अशी कुंभजाई मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिरात संगमरवरी फरसबंदी आहे. सभामंडप गर्भगृह यांच्यामध्ये स्टीलचे रेलिंग लावण्यात आलेले आहेत. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू रुजीव पाषाण असून त्यावरील कुंभासारख्या आकारास तांब्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. त्यास कुंभजाई देवी म्हणून पुजले जाते. शिवपिंडीवर अनेकदा फण्याचे छत्र धरलेली नागमूर्ती दिसते. त्याचप्रमाणे येथे कुंभजाई देवीच्या मागील बाजूस पाच फण्यांची पितळी नागमूर्ती आहे

कुंभजाई देवी मंदिराच्या समोरील बाजूस एकविरा देवीचे मंदिर आहे. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभू, चौकळशी, पाचकळशी, क्षत्रिय, वैश्य आदी समाजाची एकविरा ही कुलस्वामिनी आहे. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे एकविरा देवीच्या मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडप खुला असून गर्भगृहात एका वज्रपीठावर एकविरा देवीची काळ्या दगडातील मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज शस्त्रधारी आहे. तिच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात त्रिशूल आहे. या मूर्तीच्या शेजारी एका बाजूस आणखी एक देवीची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूस साधारणतः दंडगोलाकार असलेले शिवलिंगसदृश्य दहा दगडी तांदळे आहेत. २०२२ मध्ये करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते या मंदिराचे कलशारोहण जीर्णोद्धार पार पडला. कुंभजाई देवी मंदिराच्या डाव्या बाजूला गांगो देवाचे मंदिर आहे. अष्टकोनी आकारातील या छोट्या देवळाला लहानसा सभामंडप गर्भगृह आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती गर्भगृहात शिवपिंड आहे. या तिन्ही मंदिरांवर शिखरे असून त्यापैकी कुंभजाई देवी मंदिरावरील शिखर तुलनेने मोठे आहे

रामेश्वर कुंभजाई मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. या सप्ताहास अनेक कीर्तनकारांसह हजारो वारकरी उपस्थित असतात. या सप्ताहादरम्यान मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. याच प्रमाणे गावात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्तजयंती, शिवरात्र आदी उत्सव श्रद्धेने साजरे केले जातात. कुंभजाई देवी माहेरवाशिणींच्या हाकेला तत्काळ धावून येते, अशी श्रद्धा असल्याने तिच्या उत्सवास गावातून लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रियांची मोठी गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून किमी, तर खारेपाटणपासून २६ किमी अंतरावर
  • वैभववाडी, खारेपाटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home