
‘विदर्भाची काशी’ अशी ख्याती असलेल्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर महादेवाचे मंदिर विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. हे देवस्थान सुमारे ४००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, असा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर निसर्गसमृद्ध प्रदेशात ज्या टेकडीवर हे मंदिर आहे, ती भस्माची टेकडी असल्याचे सांगितले जाते. केवळ या मंदिराभोवती वर्धा नदी उत्तर वाहिनी होऊन मंदिराला प्रदक्षिणा घालते व पुन्हा पूर्व–पश्चिम वाहते हे येथील आश्चर्य व वैशिष्ट्य मानले जाते.
कोटेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की ऋषी विश्वामित्र या नदीकिनारी भ्रमण करीत असताना त्यांना श्रीरामांचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे शतपुत्र येथील अरण्यात निद्रिस्त अवस्थेत दिसले. हे पाहून विश्वामित्रांचा क्रोध अनावर झाला व त्यांनी निद्रिस्त असलेल्या शतपुत्रांवर आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून
भस्म केले. ध्यानधारणेत मग्न असलेल्या वशिष्ठ ऋषींना जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी येथे कोटीयज्ञ केले व या नदीचा प्रवाह उत्तर वाहिनी व्हावा म्हणून तिला प्रसन्न करून घेतले. वशिष्ठांच्या विनंतीवरून ही नदी येथे उत्तरवाहिनी झाली व त्या पवित्र पाण्याने त्यांनी आपल्या पुत्राला पुन्हा जिवंत केले. कार्यसिद्धीनंतर त्यांनी या भस्माच्या टेकडीवरच शिवलिंगाची स्थापना केली. तेच हे आजचे कोटेश्वर मंदिरात असलेले शिवलिंग आहे, असे म्हटले जाते. या परिसरात खोदकाम केले असता येथे मातीऐवजी तुपाचा सुगंध असलेले यज्ञाचे भस्म सापडते.
वर्धा–यवतमाळ मार्गावर वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिर परिसरात श्रीरामांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंती रचनेची असून बांधकामात लांब व मोठ्या आकाराच्या दगडी चिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. पुराच्या पाण्याने मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणून मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीच्या सर्व बाजूंनी दगडी संरक्षक भिंत घालण्यात आली आहे. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण असून ५ ते ६ फूट उंच चौथऱ्यावर मंदिराचे बांधकाम आहे. प्रांगणातून १२ ते १३ पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार व त्याभोवती असलेली द्वारपट्टी पितळेची असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस उभा नंदी, तर त्याच्याही वर छतावर असलेल्या देवळीमध्ये महादेवाची मूर्ती आहे.
प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर प्राचीन व मूळ मंदिर दिसते. अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. अंतराळात पितळी नंदी आहे. येथील गर्भगृह अंतराळापासून ३ फूट खोलवर असून त्यात असलेल्या प्राचीन शिवपिंडीला पितळी पत्र्याने मढविलेले आहे. येथील गाभाऱ्यामध्ये अनेकदा अचानक गंगा अवतीर्ण होऊन शिवपिंडीवर दीड ते दोन फूट पाणी येते व काही वेळाने ते ओसरून जाते.
वर्धा नदी ही वर्धा व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. कोटेश्वर मंदिराच्या पलीकडील तीरावर खटेश्वर नावाचे देवस्थान आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात येते. या दोन्ही मंदिरांना जोडण्यासाठी शासनाच्या निधीतून नदीवर झुलता पूल बनविण्याचे काम सुरू आहे. हा विदर्भातील अशा प्रकारचा पहिलाच पूल होणार असून तो येथील आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीपासून येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर महाशिवरात्री व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला दहीहांडी, गोपालकाला, महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता होते. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवादरम्यान १,००,००० पेक्षा
अधिक भाविक कोटेश्वर महादेवाच्या दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. याशिवाय श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात.
मंदिराच्या परिसरात अनेक साधू–संतांची समाधी स्थाने आहेत. वर्धा नदीच्या पूर्वेकडील बाजूस श्रीरामांचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की वर्धा नदी कधीही कोरडी पडत नाही. उन्हाळ्यातसुद्धा नदीला भरपूर पाणी असते. विशेष म्हणजे बेलाचे पान नदीत टाकले तर ते पान या नदीत तरंगत नाही, ते थेट बुडते. उत्तर वाहिनी असल्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे. कोटेश्वर येथे रक्षा विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दररोज रक्षा विसर्जनासाठी अनेक लोक येत असतात.
देवळी तालुक्यातील या प्राचीन देवस्थानावर भाविकांची असलेली श्रद्धा, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या व निसर्गसमृद्ध परिसरामुळे पर्यटकांचीही या स्थानाला असणारी पसंती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब‘ दर्जा देण्यात आला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या मंदिर परिसराच्या विकासासाठी ९,००,००,०००/- रुपयांचा (नऊ कोटी) निधी दिला आहे. इतर पर्यटनस्थळांप्रमाणे कोटेश्वर मंदिर व या परिसराचाही विकास होत आहे.

‘विदर्भ की काशी’ के रूप में विख्यात देवली तहसील का कोटेश्वर महादेव मंदिर विदर्भ के प्राचीन और प्रमुख श्रद्धा-केंद्रों में से एक माना जाता है। प्राचीन ग्रंथों में उल्लेख है कि यह देवस्थान लगभग चार हजार वर्षों से अस्तित्व में है। यह मंदिर वर्धा नदी के पश्चिमी तट पर स्थित है। यह प्राकृतिक रूप से समृद्ध क्षेत्र में ‘भस्म-पहाड़ी’ पर बना हुआ है। विशेष बात यह है कि मंदिर के चारों ओर वर्धा नदी उत्तर-वाहिनी होकर मंदिर की परिक्रमा करती है। इसके पश्चात यह नदी पूर्व-पश्चिम दिशा में बहती है।
कोटेश्वर मंदिर की पौराणिक कथा के अनुसार, ऋषि विश्वामित्र नदी के तट पर भ्रमण कर रहे थे। उस समय उन्होंने श्रीराम के गुरु, वशिष्ठ ऋषि के सौ पुत्रों को निद्रावस्था में देखा। यह देखकर विश्वामित्र अत्यंत कुपित हो उठे। उन्होंने उन सभी को अपने कमंडल के जल से भस्म कर दिया। जब ध्यानस्थ वशिष्ठ को इसकी जानकारी मिली, तो उन्होंने यहाँ कोटि-यज्ञ किया। उन्होंने नदी को उत्तर-वाहिनी बनाने का कार्य किया। इसके साथ ही उन्होंने भस्म हुए पुत्रों के पुनर्जीवन की प्रक्रिया संपन्न कराई। उन्होंने ‘भस्म-पहाड़ी’ पर शिवलिंग की स्थापना की। यही शिवलिंग आज कोटेश्वर मंदिर में प्रतिष्ठित है। इस क्षेत्र में आज भी खनन करने पर यज्ञ की विभूति की सुगंध आती है।
वर्धा-यवतमाल मार्ग पर वर्धा नदी के तट पर स्थित इस मंदिर परिसर में श्रीराम का वास माना जाता है। मंदिर की स्थापत्य शैली हेमाडपंती है। इसमें बड़े और लंबे आकार के पत्थरों का प्रयोग किया गया है। बाढ़ के जल से होने वाली क्षति से बचाने के लिए पहाड़ी के चारों ओर सुरक्षात्मक पत्थर की दीवार बनाई गई है। मंदिर के सम्मुख एक विशाल प्रांगण है। इसमें पाँच-छह फिट ऊँचे चबूतरे पर मंदिर का निर्माण किया गया है। प्रांगण से बारह-तेरह सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के सभामंडप के प्रवेश द्वार तक पहुँचा जा सकता है। प्रवेश द्वार और उसके आसपास की द्वारपट्टी पीतल की है। इस पर विशिष्ट नक्काशी की गई है। प्रवेश द्वार के ऊपर पाषाण निर्मित नंदी की मूर्ति है। छत पर स्थित दीवार में महादेव की पाषाण मूर्ति स्थापित है।
प्रवेश द्वार के आगे प्राचीन और मूल मंदिर स्थित है। मंदिर का स्वरूप अंतराल और गर्भगृह में विभाजित है। अंतराल में पीतल का नंदी है। गर्भगृह अंतराल से तीन फिट गहरा है। इसमें प्राचीन शिवलिंग है। इसे पीतल के आवरण से ढका गया है।
गर्भगृह में कभी-कभी गंगा-जल अचानक अवतरित होता है। उस समय शिवलिंग पर डेढ़ से दो फिट पानी भर जाता है। यह जल कुछ समय बाद स्वतः उतर जाता है।
वर्धा नदी वर्धा और यवतमाल जिलों की सीमा है। कोटेश्वर मंदिर के दूसरी ओर यवतमाल जिले में खटेश्वर देवस्थान है। दोनों मंदिरों को जोड़ने के लिए सरकार की निधि से नदी पर झूला-पुल बनाया जा रहा है। यह पुल विदर्भ का पहला ऐसा पुल होगा। यह स्थानीय पर्यटन का केंद्र बनेगा।
माघ शुक्ल चतुर्थी से मंदिर में महाशिवरात्रि मेला प्रारंभ होता है। महाशिवरात्रि और फाल्गुन शुक्ल प्रतिपदा को दही-हांडी, गोपाल-काला और महाप्रसाद जैसे कार्यक्रमों के साथ उत्सव संपन्न होता है। इस दौरान एक लाख से अधिक श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। श्रावण मास में भी हजारों श्रद्धालु दर्शन हेतु आते हैं।
मंदिर परिसर में कई साधु-संतों की समाधियाँ हैं। वर्धा नदी के पूर्वी तट पर श्रीराम मंदिर स्थित है। कहा जाता है कि वर्धा नदी कभी सूखती नहीं है। ग्रीष्म ऋतु में भी इसमें पर्याप्त जल रहता है। विशेष रूप से यदि बिल्वपत्र नदी में डाला जाए, तो वह डूब जाता है और तैरता नहीं है। उत्तर-वाहिनी होने के कारण नदी का विशेष महत्व है। कोटेश्वर में अस्थि-विसर्जन करने से मृत व्यक्ति को मोक्ष मिलता है। ऐसी आस्था के कारण यहाँ प्रतिदिन कई श्रद्धालु आते हैं।
महाराष्ट्र सरकार ने इस प्राचीन देवस्थान को तीर्थस्थल की ‘ब’ श्रेणी में सम्मिलित किया है। वर्तमान में सरकार ने मंदिर परिसर के विकास के लिए नौ लाख रुपये की निधि उपलब्ध कराई है। अन्य पर्यटन स्थलों की भाँति कोटेश्वर मंदिर और इसका परिसर भी विकसित हो रहा है।