कपिल मुनी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य रामस्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले केळवद येथील कपिलेश्वर हे तीर्थक्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की कपिल मुनींनी येथील शिवपिंडीची स्थापना केली होती, त्यामुळे हे स्थान कपिलेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरासमोरील कुंडासमोर (कपिल कुंड) महादेवांची ध्यानस्थ अवस्थेत बसलेली २१ फूट उंचीची मूर्ती आहे. ही भव्य व सुबक मूर्ती येथील आकर्षण आहे.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की कपिलेश्वर मंदिरासमोर सध्या असलेल्या कुंडाच्या खालच्या बाजूस एक कपार (गुहा) होती. तेथे कपिल मुनी ध्यानधारणा करत असत. त्यांच्यासोबत कपिला नावाची गायही होती. दररोज सकाळी ही गाय कपारीतून बाहेर निघून पोहत कुंडाबाहेर येत असे व इतर गायींच्या कळपासोबत शेतांत चरायला जात असे.
सायंकाळ झाली की पुन्हा ती कुंडात उतरून तेथील कपारीत परतत असे. एकदा गुराख्याला संशय आल्याने त्याने गायीचा पाठलाग केला. कुंडातील पाण्यात गायीला उतरताना पाहिल्यावर त्याने तिची शेपटी पकडली व गायीसोबत तो त्या कपारीत गेला. गुराख्याला पाहून कपिल ऋषींनी त्याला येथे येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की ही गाय माझ्या शेतात येऊन पीक खाते, त्यामुळे माझे खूप नुकसान होत आहे.
कपिल मुनींनी गुराख्याचे बोलणे ऐकून घेतल्यावर बाजूला असलेले कोळसे एका मुठीत पकडून ते गुराख्याला दिले. यातून तुझे झालेले नुकसान भरून निघेल, असे सांगून त्याला बाहेर जायला सांगितले. कपारीतून बाहेर आल्यावर त्या गुराख्याला आपल्या घोंगडीत ऋषींनी दिलेले कोळसे दिसले. आपली फसवणूक झाली आहे, अशी समजूत करून त्याने ते कोळसे फेकून दिले. घरी आल्यावर त्यातील एक कोळसा घोंगडीला चिकटून होता, मात्र तो
सोन्याचा झाला होता. हे पाहिल्यावर त्याला कपिल मुनींची महती समजली व केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. कपिल मुनींच्या रूपाने दैवी पुरुष येथे राहत आहेत, ही वार्ता गावोगावी पसरली व तेव्हापासून हे स्थान भाविकांचे श्रद्धास्थान बनले. उन्हाळ्याच्या दिवसांत या कुंडातील पाणी कमी झाल्यावर ही कपार पाहता येते.
केळवद गावाच्या पश्चिमेकडील टेकडीवरील कपिलेश्वराचे हे स्थान प्राचीन काळापासून ऋषी–मुनींची तपोभूमी असल्याची मान्यता आहे. मंदिराच्या कमानीवजा मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. ओढ्यावरील छोट्या लोखंडी पुलावरून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. पुलावरून जाताना उजव्या हाताला एक कुंड आहे. त्यात एका मोठ्या गोमुखातून पाण्याची धार सतत पडत असते. पूल पार केल्यानंतर काहीशा उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी २१ पायऱ्या आहेत. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर संगमरवरी नंदी असून गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी आहे. मंदिराची बांधणी साधी असली तरी येथील परिसर निसर्गसंपन्न आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा यज्ञसमारंभ करण्यात येतो. श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.
मंदिराचे प्रांगण प्रशस्त असून तेथे हनुमान मंदिर, पाचमुखी नागदेवता, विठ्ठल–रुख्मिणी, भारती महाराज समाधी, दत्त मंदिर व दुर्गादेवी अशी मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला रामबाबा समाधी व तुकडोजी महाराजांचे स्थान आहे. त्या शेजारीच भाविकांना राहण्यासाठी काही खोल्या बांधण्यात आल्या आहेत.
कपिलेश्वर मंदिरापासून काही अंतरावर बनादेवीचे सती मंदिर आहे. लग्नाच्या दिवशी वरातीचा घोडा उधळल्याने नवरदेव जखमी झाला व बोहल्यावर चढण्याआधी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बनादेवी सती गेली; परंतु तिच्या तेजामुळे सौभाग्याचा हिरवा चुडा घातलेला हात अग्नीत जळू शकला नाही, तो तसाच राहिला. आजही मंदिरात बनादेवीची मूर्ती नसून तिचा हात आहे व त्या हाताचीच पूजा केली जाते.
महाराष्ट्र सरकारने कपिलेश्वर देवस्थानाला पर्यटनाच्या ‘क’ दर्जात स्थान दिल्यामुळे सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या निधीतून येथे भाविकांसाठी सोयी–सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंदिराव्यतिरिक्त केळवद हे कृषिप्रधान गाव असून कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. हे गाव येथे तयार होणाऱ्या जरीकाठी साड्यांसाठीही विदर्भात प्रसिद्ध आहे.
कपिल मुनि और राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के शिष्य रामस्वामी महाराज के निवास से पावन बना केलवद स्थित कपिलेश्वर तीर्थक्षेत्र हजारों श्रद्धालुगण का आस्था केंद्र है। कहा जाता है कि कपिल मुनि ने यहाँ शिवलिंग की स्थापना की थी। इसी कारण यह स्थान कपिलेश्वर कहलाता है। मंदिर के सम्मुख स्थित कुंड (कपिल कुंड) के समीप भगवान महादेव की पाषाण मूर्ति स्थापित है। ध्यानमग्न अवस्था में बनी यह 21 फीट ऊँची मूर्ति यहाँ का प्रमुख आकर्षण है।
मंदिर के बारे में कहा जाता है कि कपिलेश्वर मंदिर के सम्मुख बने कुंड के नीचे कभी एक गुफा थी। उसमें कपिल मुनि ध्यान साधना करते थे। उनके साथ कपिला नाम की एक गाय भी रहती थी। प्रतिदिन प्रातः यह गाय गुफा से बाहर निकलकर तैरते हुए कुंड से बाहर आती थी। वह अन्य गायों के साथ खेतों में चरने जाती थी। सायंकाल होते ही वह पुनः कुंड में उतरकर गुफा में लौट आती थी। एक दिन एक ग्वाले को संदेह हुआ। उसने गाय का पीछा किया। कुंड में उतरते समय जब उसने गाय की पूँछ पकड़ी तो वह भी उसके साथ गुफा में चला गया। ग्वाले को देखकर कपिल ऋषि ने कारण पूछा। ग्वाले ने कहा, “यह गाय मेरे खेत में आकर फसल खा जाती है। इससे मुझे भारी नुकसान हो रहा है।”
कपिल मुनि ने उसकी बात सुनकर पास रखे कोयले की एक मुट्ठी उसे दी। उन्होंने कहा, “इससे तेरा नुकसान पूरा हो जाएगा।” ग्वाले ने बाहर आकर देखा तो उसकी चादर में वे कोयले ही थे। उसे लगा कि उसके साथ छल हुआ है। इसलिए उसने वे कोयले फेंक दिए। घर आने पर उसने देखा कि चादर में चिपका एक कोयला बचा हुआ था। वह कोयला अब सोने में परिवर्तित हो चुका था। यह देखकर उसे कपिल मुनि की महानता का बोध हुआ। उसे अपने कृत्य पर पश्चाताप हुआ। इस प्रकार कपिल मुनि दिव्य पुरुष के रूप में यहाँ निवास करते हैं। यह बात हर जगह फैल गई। तब से यह स्थान श्रद्धालुगण का तीर्थ बन गया। ग्रीष्म ऋतु में जब कुंड का जल कम होता है, तब वह गुफा दिखाई देती है।
केलवद गाँव के पश्चिमी भाग की पहाड़ी पर स्थित कपिलेश्वर मंदिर प्राचीन काल से ऋषि-मुनियों की तपोभूमि माना जाता है। मंदिर के मेहराबदार मुख्य द्वार से प्रवेश होता है। मंदिर जाने का रास्ता एक छोटे लोहे के पुल से नाले के ऊपर से जाता है। पुल पार करते समय दायीं ओर एक कुंड है।
इसमें बड़े गोमुख से निरंतर जलधारा गिरती रहती है। पुल के बाद कुछ ऊँचाई पर स्थित मंदिर तक पहुँचने के लिए 21 सीढ़ियाँ हैं। मंदिर में सभामंडप और गर्भगृह है। सभामंडप के मध्य में चबूतरे पर संगमरमर का नंदी विराजमान है। गर्भगृह में प्राचीन शिवलिंग है। मंदिर की संरचना साधारण है। इसका परिसर प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण है। हर साल महाशिवरात्रि पर यहाँ विशाल यज्ञ आयोजित होता है। श्रावण मास में यहाँ श्रद्धालुगण की विशेष भीड़ रहती है।
मंदिर का प्रांगण विस्तृत है। इसमें हनुमान मंदिर, पंचमुखी नागदेवता, विठ्ठल-रुक्मिणी, भारती महाराज समाधि, दत्त मंदिर और दुर्गादेवी के मंदिर स्थित हैं। मुख्य मंदिर के पीछे रामबाबा समाधि और तुकडोजी महाराज का स्थान है। इनके समीप श्रद्धालुगण के ठहरने हेतु कुछ कक्ष निर्मित हैं।
कपिलेश्वर मंदिर से कुछ दूरी पर बनादेवी का सती मंदिर है। कथा है कि विवाह के दिन बारात के घोड़े के उधम से वर घायल हो गया। मंडप पर चढ़ने से पहले ही उसका देहांत हो गया। इस घटना के बाद बनादेवी सती हो गईं। उनके सौभाग्यसूचक हरे चूड़े से सुशोभित हाथ को अग्नि जला न सकी। वह हाथ वैसा ही रह गया। आज भी मंदिर में बनादेवी की मूर्ति नहीं, बल्कि उनका हाथ ही पूजित है।
महाराष्ट्र सरकार ने कपिलेश्वर देवस्थान को पर्यटन के ‘क’ वर्ग में सम्मिलित किया है। परिणामस्वरूप समय-समय पर प्राप्त निधि से यहाँ श्रद्धालुगण के लिए सुविधाएँ उपलब्ध कराई गई हैं। मंदिर के अतिरिक्त केलवद एक कृषि प्रधान गाँव है। यह कपास उत्पादन में अग्रणी है। यह गाँव यहाँ निर्मित जरिकाठ साड़ियों के लिए भी विदर्भ में प्रसिद्ध है।