काळुबाई / काळम्मा देवी मंदिर

काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली

तंत्रमार्गाची अधिष्ठात्री देवी असलेल्या कालिका मातेचे मुख्य पीठ कोलकात्यातील कालीघाट या ठिकाणी आहे. भारतातील हे देवीचे ५१वे शक्तीपीठ मानले जाते. ‘दक्षिणकालीम्हणून ओळखली जाणारी कालिका माता बंगाली समाजात मोठ्या प्रमाणावर पूजली जाते. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ही शक्तीदेवता काळम्मा या स्वरूपात पूजली जाते. येथील देवीच्या अनेक मंदिरांपैकी एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर वाळवा तालुक्यातील काळमवाडी गावात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद मंदिराच्या भिंतीवर आहे. या मंदिराबाबत आख्यायिका अशी की या गावातील एक भक्त नित्यनेमाने देवीच्या दर्शनासाठी शाहुवाडी तालुक्यातील घनदाट जंगलातील उदगिरी येथे जात असे. वृद्धापकाळाने त्याला तेथे जाणे अशक्यप्राय झाले. आता सध्या जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी तो देवीचा धावा करीत बसले आपल्याला दर्शन द्यावे म्हणून देवीची प्रार्थना करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली. तेव्हा देवीने कायमस्वरूपी या ठिकाणी राहावे, अशी विनंती त्याने देवीस केली. भक्ताच्या इच्छेनुसार देवी या ठिकाणी मूर्तीरुपात स्थित झाली. पुढे येथे देवीचे मोठे मंदिर उभारले गेले

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, पूर्वी या परिसरात बैलगाडी घोड्यावरून व्यापार चालत असे. त्यावेळी उदगिरी (शाहूवाडी) येथून ही देवी बैलाच्या खुरातून येथे आली येथील चिंचेच्या झाडाखाली स्थित झाली. एका मुस्लिम सरदाराला या देवीच्या सामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर त्याने या ठिकाणी देवीसाठी मंदिर बांधले

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथरा त्यावर तीन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेत पायाजवळ चारी दिशांना चार गजशिल्पे वरील तीनही थरांत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. दीपमाळेच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर पाषाणी स्तंभ आहे. दीपमाळेच्या समोर दोन्ही बाजुला हत्तींची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यांचा आकार त्यावरील रंगसंगतीमुळे ते सजीव भासतात. त्यापुढे मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आवारभिंत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके, वर अर्धंचंद्राकार कमान त्यात कमळ फुलाचे उठाव शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूंस पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावरील नगारखान्याच्या सज्जास चार लाकडी स्तंभ कठडा आहे. सद्यस्थितीत या नगारखान्यात टपाल विभागाचे कार्यालय आहे.

येथून पुढे मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या दुमजली सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासव, पुढे नंदीमंडप त्यात नंदी आणि इतर काही प्राचीन मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीत असलेल्या आठ लाकडी स्तंभांवर हस्त आहेत त्यावर वरील मजल्याचा सज्जा तोलून धरलेला आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराकडे दोन, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या समोर दोन डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी सहा नक्षीदार लाकडी स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी दगडी पायावर उभे आहेत

पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. द्वारशाखेच्या खालच्या बाजूला कीर्तिमुख आहे. गर्भगृहाबाहेर डावीकडे गणपती, मारुती, विठ्ठलरुक्मिणी यांच्या मूर्ती उजवीकडे शिवपिंडी आहे. गर्भगृहात वज्रपिठावर काळम्मा देवीची मूर्ती आहे. या मूर्तीवर पितळी मुखवटा उंची वस्त्रालंकार आहेत. मूर्तीच्या शेजारी चांदीचा मोठा मुखवटा आहे. गर्भगृहाच्या छतावर कठडा, चारही कोनांत चार लघुशिखरे मध्यभागी वर निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. शिखरावर कमळ फुलाची नक्षी आहे

मंदिराच्या समोर पत्र्याचे छत असलेला प्रशस्त सभामंडप आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. मंदिरात चैत्र पाडवा, नवरात्रौत्सव दसऱ्याला वार्षिक उत्सव साजरे केले जातात. चैत्र पाडव्याला पंचांग वाचन भाकणुकीचा (भविष्यवाणी वा अंदाज व्यक्त करणे) कार्यक्रम होतो. दसऱ्याच्या दिवशी जवळच्या बनात ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत मिरवणुकीने देवीची पालखी जाते. यावेळी परिसरातील सर्व गावातील देव पालखी मिरवणुकीने बनात येतात आणि एकमेकांची भेट घेतात. यावेळी ५० ते ६० धनगरी ढोलांच्या आवाजाने परिसर दणाणून निघतो. श्रावणातील शेवटच्या सोमवारी देवीची पालखी कृष्णाकाठी बाळकोबा येथे देवाच्या भेटीला नेली जाते.

उपयुक्त माहिती

  • वाळवा शहरापासून २४ किमी, तर सांगलीपासून ५४ किमी अंतरावर
  • शिराळा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Back To Home