छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतलेल्या फोंड्यातील मर्दनगडाच्या समोर बांदोड्यातील फर्मागुढीचा रमणीय परिसर आहे. येथील एका टेकडीवर गोपाल गणपतीचे प्राचीन मंदिर वसले आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बांदोडकर यांनी जीर्णोद्धारित केलेले हे ऐतिहासिक मंदिर देशविदेशातील पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की गणपतीचे हे देवस्थान जागृत आहे व येथील विघ्नहर्ता नवसाला पावणारा आहे. यामुळे येथे सातत्याने भाविकांचा राबता असतो.
बांदिवाटिका, तसेच बांदवाडा या नावाने प्राचीन काळी ओळखल्या जाणाऱ्या बांदेवाडीची स्थापना श्रीपाल नावाच्या राजाने केल्याची पंधराव्या शतकातील शिलालेखीय नोंद आहे. याच प्रमाणे बांदिवडे येथे मौर्य नृपती अनिर्जितवर्मन् याच्या कारकिर्दीतील संस्कृत भाषेतील शिलालेख सापडला आहे. तो त्यातील पेटिकाशीर्षक लिपीच्या आधारे सहाव्या वा सातव्या शतकातील आहे. यात नागपद्द, मल्लदत्त व अचल या दानकर्त्यांनी हस्तार्य नावाच्या हारित गोत्री ब्राह्मणाला काही जमीन, घरासाठी जागा, मळा आणि तलाव किंवा टाके दान केल्याचे उल्लेख आहेत. यावरून बांदिवड्याचे प्राचीनत्व स्पष्ट होते. मराठ्यांच्या इतिहासाशीही या गावचा निकटचा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ मे १६७५ रोजी गोपाल मंदिराच्या टेकडीनजीकचा फोंड्याचा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.
या वेळी महाराजांनी या किल्ल्यास मर्दनगड असे नाव दिले होते. या विजयामुळे स्वराज्यात तिसवाडी, चंद्रमहल, केपे, बाळ्ळी आणि काणकोण हे आदिलशाही प्रदेश सामील झाले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळीही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८३मध्ये येथे तळ ठोकून संभाजी राजांनी गोव्यावर स्वारी केली होती. येथील सरदेसाई दुलबाजी नाईक प्रतापराव हा पोर्तुगीजांना फितूर झाला. तेव्हा पोर्तुगीजांनी फोंडे जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु येसाजी कंक यांचा सुपुत्र कृष्णाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ करून किल्ल्याचे संरक्षण केले आणि ११ नोव्हेंबर १६८३ या दिवशी लाजिरवाणे अपयश घेऊन व्हिसेरेइ कौंट द आल्व्होर याला परतावे लागले. संभाजी राजांच्या गोवा मोहिमेतील यशाच्या प्रीत्यर्थ फोंडा किल्ल्यानजीक असलेल्या या फर्मागुढीच्या टेकडीवर ऑगस्ट १६८३मध्ये गुढी उभारण्यात आली होती. स्वतः संभाजी राजांच्या आज्ञेने ही विजयाची गुढी उभारण्यात आली होता. त्याची स्मृती म्हणून आजही अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवस्थानसमोरील पेडावर व गुडयेतेम येथील वडावर विजय-गुढी उभारली जाते.
येथील गोपाल गणपती मंदिराबाबत आख्यायिका अशी की फर्मागुढीच्या या टेकडीवर पूर्वी घनदाट जंगल होते. येथे काही गोपाल गायी-गुरे चारण्यासाठी घेऊन येत असत. एके दिवशी त्यातील एका गुराख्यास एका झुडपामध्ये गणपतीची मूर्ती दिसली. त्याने ही वार्ता ग्रामस्थांना सांगितल्यानंतर, गावकारभाऱ्यांनी या ठिकाणी झावळ्यांचे मंदिर उभारले व त्यात या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. ज्या गोपालांना ही मूर्ती सापडली होती, ते देवाच्या सेवेत रूजू झाले. यामुळे या गणेशास गोपाल गणपती या नावाने संबोधले जाऊ लागले. आज ज्या ठिकाणी मंदिराची तुळस आहे, तेथेच पूर्वी झावळ्यांचे मूळ मंदिर होते, असे सांगण्यात येते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लोकप्रिय नेते व गोवा, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कानावर या गणपतीची महती पडली. या नंतर त्यांनी फर्मागुढीस भेट देऊन झावळ्यांच्या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर काही काळाने ते येथे पुन्हा परतले. आपण जी मनोकामना केली होती, ती या गणेशाच्या आशीर्वादाने पूर्ण झाल्याचे त्यांनी येथील सेवेकऱ्यांना सांगितले व येथे मोठे मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार येथे मोठे मंदिर उभारण्यात आले.
‘गोवा गॅझेटियर’मधील नोंदीनुसार, त्यावेळी गोपाल गणेशाची धातूची मूर्ती घडवून २४ एप्रिल १९६६ रोजी तिची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
मुख्य रस्त्यापासून उंच जागी वसलेल्या या मंदिराच्या प्रांगणात काही पायऱ्या चढून यावे लागते. पायऱ्यांच्या सुरूवातीलाच उंच प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही स्तंभांलगत उभारलेल्या उभट छोट्या मंडपात द्वारसेविकांच्या प्रतिमा आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे. पायऱ्या चढून आल्यावर डावीकडे हिरवळीवर जुन्या मंदिराचा अवशेष शोभावा असा भलामोठा पाषाणी भिंतीचा भाग दिसतो. हा मंदिराच्या जगतीचा भाग असून त्यावर गजथर कोरलेला आहे. येथून काही अंतरावर उंच अधिष्ठानावर मंदिर वास्तू उभी आहे. मंदिरासमोरील ओट्यावर पत्र्याचा मंडप आहे. उजव्या बाजूला सहा स्तरांचा चौकोनाकार दीपस्तंभ आहे. मंदिर गोमंतकीय स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. छोटेखानी सभामंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभामंडप व महामंडपावर उतरते कौलारू छप्पर आहे.
गर्भगृहावर गोमंतकीय आणि नागर स्थापत्यशैलीच्या समन्वयातून निर्माण झालेले शिखर आहे. या शिखराचा खालचा भाग चौकोनाकार व त्यावर नागरशैलीतील चारी बाजूंनी वर निमुळते होत गेलेले उरुशृंग प्रकारचे शिखर आहे. त्यावर आमलक आणि कलश आहे. सभामंडपाच्या भिंतींत मोठ्या खिडक्या आहेत. दोन्ही बाजूंनी कक्षासने आहेत. मध्यभागी स्टीलचे रेलिंग लावलेल्या मोठ्या आयताकृती भागात संगमरवरी फरशांवर राधा आणि कृष्णाचे नृत्य करतानाचे मोठे चित्र रंगवलेले आहे. असे सांगण्यात येते की कृष्ण हा गोपालांचा सखा असल्याने त्याची प्रतिमा गोपाल गणेश मंदिरात औचित्यपूर्ण ठरते.
मंदिराच्या महामंडपास नक्षीदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या ललाटबिंब स्थानी ओंकार कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस वैष्णव द्वारपालांच्या दोन सुबक कोरीव मूर्ती आहेत. त्यांवरील भागात गणेशाच्या कृष्णधवल प्रतिमा लावलेल्या आहेत. महामंडपातील स्तंभही नक्षाकामाने सुशोभित आहेत. या स्तंभांवर देव-देवता व यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. छतावर पितळी घंटा, तसेच बिलोरी काचांचे झुंबर टांगलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वारही नक्षीकामाने सजवलेले आहे. आत उंच अधिष्ठानावर चांदीची गोपाल गणेशाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीसमोर दोन्ही बाजूंनी उंच समया मांडलेल्या आहेत.
या मंदिरात सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत भाविकांना श्रींचे दर्शन घेता येते. येथे विविध हिंदू सण-समारंभ उत्साहाने साजरे केले जातात. येथे माघ महिन्यातील गणेश जयंती, तसेच संकष्टी व विनायकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. या दिवशी येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. दरवर्षी येथे भाद्रपदातील गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व तितक्याच धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवात, तसेच मे महिन्यातील विनायक चतुर्थीस होणाऱ्या मंदिर वर्धापन दिन उत्सवात बांदोडा आणि फर्मागुढीतील असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. वर्धापन दिन सोहळ्यात येथे गणपती पूजन, स्थलशुद्धी, अर्थर्वशीर्ष आवृत्ती, शत-कलशाभिषेक, महाआरती आदी कार्यक्रम केले जातात. यानंतर सायंकाळी येथे गणेशाची मुषकवाहनातून भव्य मिरवणूक काढली जाते.
छत्रपति शिवाजी महाराज द्वारा आदिलशाह से जीते गए फोंडा के मर्दनगढ़ के सम्मुख बांदोड़ा के फर्मागुड़ी का मनोरम अंचल विस्तृत है। यहाँ की एक पर्वत-शृंग पर गोपाल गणपति का प्राचीन मंदिर प्रतिष्ठित है। गोवा के प्रथम मुख्यमंत्री दयानंद बांदोड़कर द्वारा जीर्णोद्धारित यह ऐतिहासिक देवालय देश-विदेश के पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र है। श्रद्धालुओं की ऐसी प्रगाढ़ श्रद्धा है कि गणपति का यह देवस्थान जाग्रत है और यहाँ के विघ्नविनाशक श्रद्धालुओं की मनोकामनाओं को पूर्ण करते हैं। इसी कारण यहाँ निरंतर श्रद्धालुओं का ताँता लगा रहता है।
बांदिवाटिका तथा बांदवाड़ा के नाम से प्राचीन काल में विख्यात बांदेवाड़ी की स्थापना श्रीपाल नामक राजा ने की थी, जिसका उल्लेख पंद्रहवीं शताब्दी के एक शिलालेख में मिलता है। इसी प्रकार बांदिवड़ा में मौर्य राजा अनिर्जितवर्मन के शासनकाल का संस्कृत भाषा में उत्कीर्ण शिलालेख उपलब्ध हुआ है। लिपिशास्त्र के आधार पर वह छठी अथवा सातवीं शताब्दी का प्रतीत होता है। इसमें नागपद्द, मल्लदत्त एवं अचल नामक दानदाताओं द्वारा हस्तार्य नामक हारित गोत्रीय ब्राह्मण को भूमि, गृह-स्थान, उपवन तथा सरोवर दान करने का विवरण अंकित है। इससे बांदिवड़ा की प्राचीनता सुस्पष्ट होती है। मराठा इतिहास से भी इस ग्राम का घनिष्ठ संबंध है। छत्रपति शिवाजी महाराज ने ८ मई १६७५ को गोपाल मंदिर की पहाड़ी के समीप स्थित फोंडा के दुर्ग को आदिलशाह से जीता था।
उस समय महाराज ने इस दुर्ग को ‘मर्दनगढ़’ नाम दिया था।
इस विजय के फलस्वरूप स्वराज्य में तिसवाड़ी, चंद्रमहल, केपे, बाल्ली और काणकोण जैसे आदिलशाही प्रदेश सम्मिलित हुए। छत्रपति संभाजी महाराज के समय में भी यह दुर्ग मराठा शक्ति के अधीन था। १६८३ में यहाँ सैन्य शिविर स्थापित कर संभाजी राजा ने गोवा पर आक्रमण किया था। यहाँ के सरदेसाई दुलबाजी नायक प्रतापराव ने पुर्तगालियों के साथ संधि कर विश्वासघात किया, तब पुर्तगालियों ने फोंडा को अपने अधिकार में लेने का प्रयास किया। किंतु येसाजी कंक के सुपुत्र कृष्णाजी कंक ने पराक्रम की पराकाष्ठा करते हुए दुर्ग की रक्षा की और ११ नवंबर १६८३ के दिन लज्जाजनक विफलता लेकर वाइसरॉय काउंट डी एल्वोर को लौटना पड़ा। संभाजी राजा के गोवा अभियान की सफलता के उपलक्ष्य में फोंडा दुर्ग के निकट स्थित इसी फर्मागुड़ी की पहाड़ी पर अगस्त १६८३ में विजयपताका स्थापित की गई थी। स्वयं संभाजी राजा की आज्ञा से यह विजयध्वज फहराया गया था। उसकी स्मृति में आज भी अनंत चतुर्दशी के दिन देवस्थान के सम्मुख स्थित चबूतरे पर तथा गुड़येतेम के वटवृक्ष पर विजय-पताका स्थापित की जाती है।
यहाँ के गोपाल गणपति मंदिर के विषय में एक जनश्रुति है कि फर्मागुड़ी की इस पहाड़ी पर पूर्व में सघन वन था।
यहाँ कुछ ग्वाले गायों को चराने के लिए आया करते थे। एक दिन उनमें से एक चरवाहे को सघन झाड़ियों के बीच गणपति की एक प्रतिमा के दर्शन प्राप्त हुए। जब उसने यह समाचार ग्रामवासियों को सुनाया, तब गाँव के प्रबुद्ध जनों ने उस स्थान पर पर्णकुटी के समान मंदिर का निर्माण कर उसमें उस गणेश प्रतिमा को प्रतिष्ठित किया। जिन ग्वालों को यह प्रतिमा प्राप्त हुई थी, वे देव-सेवा में संलग्न हो गए। इसी कारण इन गणेश को ‘गोपाल गणपति’ के नाम से पुकारा जाने लगा। कहा जाता है कि आज जिस स्थान पर मंदिर का तुलसी-वृंदावन है, वहीं पूर्व में मूल पर्ण-मंदिर स्थित था। महाराष्ट्रवादी गोमंतक दल के लोकप्रिय नेता तथा गोवा, दमन और दीव केंद्रशासित प्रदेशों के प्रथम मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोड़कर ने जब इस गणपति की महिमा सुनी, तब उन्होंने फर्मागुड़ी आकर उस छोटे मंदिर में गणेश के दर्शन किए। कुछ समय पश्चात वे पुनः यहाँ पधारे। उन्होंने सेवकों को बताया कि उनकी मनोकामना गणेश के आशीर्वाद से पूर्ण हुई है और यहाँ एक भव्य मंदिर निर्माण की इच्छा व्यक्त की। तदनुसार यहाँ विशाल मंदिर का निर्माण हुआ। ‘गोवा राजपत्र’ के विवरणानुसार, उस समय गोपाल गणेश की एक धातु-निर्मित प्रतिमा बनवाकर २४ अप्रैल १९६६ को मंदिर में उसकी प्राण-प्रतिष्ठा की गई।
मुख्य मार्ग से ऊँचे स्थल पर स्थित इस मंदिर के प्रांगण में सोपानों के माध्यम से प्रवेश करना होता है। सोपानों के प्रारंभ में ही एक भव्य प्रवेश द्वार है। उसके दोनों स्तंभों के समीप निर्मित छोटे मंडपों में द्वारसेविकाओं की प्रतिमाएँ उत्कीर्ण हैं। प्रवेश द्वार के शीर्ष पर गणेश की प्रतिमा विराजमान है। सोपानों से ऊपर आने पर बाईं ओर हरित घास के मैदान पर प्राचीन मंदिर के अवशेष के रूप में एक विशाल पत्थरभित्ति दिखाई देती है। यह मंदिर की जगती का भाग है जिस पर हाथियों की पंक्ति अंकित है। यहाँ से कुछ दूरी पर ऊँचे अधिष्ठान पर मंदिर का भवन निर्मित है। मंदिर के सम्मुख स्थित चबूतरे पर धातु की चादरों का मंडप है। दक्षिण दिशा में छह स्तरों का चौकोर दीपस्तंभ स्थित है। मंदिर का निर्माण गोमंतकीय स्थापत्य शैली में किया गया है। इसमें छोटे सभामंडप, महामंडप और गर्भगृह की संरचना है। सभामंडप और महामंडप पर ढालू खपरैल की छत है। गर्भगृह के ऊपर गोमंतकीय और नागर स्थापत्य शैली के समन्वय से निर्मित शिखर है। इस शिखर का निचला भाग चौकोर है और उस पर नागर शैली का चारों दिशाओं से क्रमशः संकुचित होता हुआ उरुशृंग प्रकार का शिखर है। उसके शीर्ष पर आमलक और कलश सुशोभित हैं। सभामंडप की दीवारों में विशाल खिड़कियाँ हैं। दोनों ओर बैठने के स्थान हैं।
मध्य भाग में इस्पात की रेलिंग से घिरे आयताकार क्षेत्र में संगमरमर की शिलाओं पर राधा और कृष्ण के नृत्य का मनोहारी चित्र अंकित है। ऐसा कहा जाता है कि श्री कृष्ण ग्वालों के सखा हैं, अतः गोपाल गणेश मंदिर में उनकी प्रतिमा अत्यंत सुसंगत प्रतीत होती है।
मंदिर के महामंडप में एक नक्काशीदार प्रवेश द्वार है, जिसके ललाट-बिंब पर ओंकार उत्कीर्ण है। प्रवेश द्वार के दोनों पार्श्वों में वैष्णव द्वारपालों की दो सुंदर नक्काशीदार प्रतिमाएँ हैं। उनके ऊपरी भाग में गणेश के श्वेत-श्याम चित्र सुसज्जित हैं। महामंडप के स्तंभ भी शिल्पकारी से अलंकृत हैं। इन स्तंभों पर देवी-देवताओं एवं यक्ष-यक्षिणी की प्रतिमाएँ उत्कीर्ण हैं। छत से पीतल के घंटे एवं स्फटिक के झूमर लटक रहे हैं। गर्भगृह का प्रवेश द्वार भी सूक्ष्म नक्काशी से सज्जित है। अंतर्भाग में ऊँचे अधिष्ठान पर रजत निर्मित गोपाल गणेश की प्रतिमा विराजमान है। प्रतिमा के सम्मुख दोनों ओर ऊँचे दीपाधार स्थापित हैं।
इस मंदिर में प्रातः छह बजे से रात्रि नौ बजे तक श्रद्धालु भगवान के दर्शन कर सकते हैं। यहाँ विविध हिंदू पर्व एवं उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक आयोजित किए जाते हैं। माघ मास की गणेश जयंती तथा संकष्टी एवं विनायकी चतुर्थी के अवसर पर श्रद्धालुओं का अपार जनसमूह उमड़ता है। इन तिथियों पर यहाँ श्रद्धालुओं को महाप्रसाद का वितरण किया जाता है।
हर साल यहाँ भाद्रपद मास में गणेशोत्सव अत्यंत हर्षोल्लास एवं धार्मिक वातावरण में संपन्न होता है। इस उत्सव में तथा मई मास में विनायक चतुर्थी को आयोजित होने वाले मंदिर के वार्षिकोत्सव में बांदोड़ा और फर्मागुड़ी के असंख्य श्रद्धालु पूर्ण श्रद्धा के साथ सम्मिलित होते हैं। वार्षिकोत्सव के आयोजन में यहाँ गणपति पूजन, स्थल-शुद्धि, अथर्वशीर्ष पाठ, शत-कलशाभिषेक, महाआरती इत्यादि धार्मिक अनुष्ठान किए जाते हैं। इसके पश्चात सायंकाल में गणेश की मूषक-वाहन पर भव्य शोभायात्रा निकाली जाती है।