देवी चामुंडेश्वरी हे आदिशक्ती पार्वतीचे एक रूप असल्याचे मानले जाते. शक्तीस्वरूप असलेली ही देवी गोव्यातील कदंब राजवंशाची कुलदेवता होती. गोव्यातील अनेक मंदिरांतील देवतांप्रमाणेच या देवीचेही पिळगावनजीकच्या वरगाव येथे सुमारे ५०० वर्षांपूर्वी स्थलांतर झाले. या देवीचे येथील स्थान जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने अनेक लोक कार्यारंभी येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. येथे देवीस कौल प्रसाद लावण्याचीही प्रथा आहे. येथे पौषातील कृष्ण प्रतिपदेस देवीचा मोठा जत्रोत्सव भरतो.
नवदुर्गांपैकी चामुंडा देवी म्हणजेच चामुंडेश्वरी देवी होय. देवीच्या उत्पत्तीची कहाणी ‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्या’च्या सातव्या अध्यायात कथन केलेली आहे. ती अशी की शुंभ-निशुंभ या दैत्यांनी इंद्राकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा त्यांच्या वधाकरीता पार्वतीमातेच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ-निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो, असा निरोप पाठवला.
अंबिकेने त्यास धुडकावून लावल्यावर तिला पकडून आणण्यासाठी शुंभ-निशुंभाने चंड-मुंडांना पाठवले. त्यावेळी अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंड-मुंडांचा वध केला. यामुळे देवी अंबिकेने कालीदेवीस चामुंडा असे नाव दिले. उत्तर भारतात ती चामुंडा याच नावाने, तर दक्षिण भारतात चौंढेश्वरी, चौडेश्वरी वा चामुंडेश्वरी या नावाने पूजली जाते.
चामुंडेश्वरी ही गोमंतकात इ.स. १००० ते १२३७ या कालखंडात राज्य करणाऱ्या कदंब घराण्याची कुलदेवता होती. गोवा बेटावरील गोपकपट्टण (वेल्हा गोवा म्हणजेच थोरले गोवा) ही कदंबांची राजधानी होती. येथील एका डोंगरावर देवीचे भव्य मंदिर वसले होते. इ.स. १२३७ मध्ये येथे त्रिभुवनमल्ल हा कदंब राजा राज्य करीत होता. देवगिरी येथील यादवनृपती सिंघण याच्या पदरी बिच्चण व खोलेश्वर हे दोन सेनापती होते. यांतील बिच्चणाकडे दक्षिणेकडील राज्यविस्तार वाढवण्याची जबाबदारी होती. त्याने गोवेकर कदंबांवर आक्रमण केले. राजा त्रिभुवनमल्ल यास ठार मारले. त्याचे राज्य यादव साम्राज्यास जोडून कदंबांना आपले मांडलिक बनवले. पुढे इ.स. १३१२मध्ये अल्लाउद्दिन खिलजीचा सेनापती मलिक कफूर याने देवगिरीच्या यादवांवर स्वारी केली. त्याने रामदेवरायाचा पुत्र शंकरदेवराय यास ठार मारून मुलुख लुटला व देवगिरी येथे ठाणे दिले. मलिक कफूर हा मूळचा मथुरेतील हिंदू होता. गुजरातेतील खंबायतमधील एका व्यापाऱ्याचा तो गुलाम होता. हजार दिनार देऊन त्याला खरेदी करण्यात आल्याने त्यास हजार दिनारी असे नाव पडले होते. पुढे तो अल्लाउद्दिनचा सेनापती झाला.
गोवा गॅझेटियरमध्ये असे म्हटले आहे की मलिक कफूरने १३१२ मध्ये केलेल्या आक्रमणादरम्यान गोपकपट्टण म्हणजेच वेल्हा गोवा ही कदंबांची राजधानी उद्ध्वस्त केली असावी. यामुळे कदंबांनी आपली राजधानी चंद्रपूर येथे हलवली. याच धामधुमीत वेल्हा गोवा येथील चामुंडेश्वरीच्या मंदिरास हानी पोचली असावी.
काही अभ्यासकांच्या मते, चामुंडेश्वरी देवीच्या मूळ मंदिरास मुस्लिम फौजेने नव्हे, तर पोर्तुगीज सैन्य व धर्मगुरुंनी हानी पोचवली. १५१०च्या नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीजांचा हिंदुस्थानातील तत्कालिन व्हिसेरेई ऑफाँस द अल्बुकर्क याने गोवा बेट जिंकले. येथील हिंदूंनी पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांचे स्वागत केले. आपण हिंदुंना धार्मिक स्वातंत्र्य देऊ असे अल्बुकर्क याने जाहीर केले होते. पण लवकरच त्याने तिसवाडीतील सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडून, तेथे चर्च बांधून धर्मांधतेचा नमुना दाखवला.
या नंतरच्या काळात तिसवाडी, बार्देश, सासष्टी प्रांतात पोर्तुगीजांचे अत्याचार वाढतच गेले. या कालखंडात, इ.स. १५३०च्या सुमारास पोर्तुगीजांनी तिसवाडीतील थोरल्या गोव्यातील चामुंडेश्वरीचे मंदिर उद्ध्वस्त केले. मात्र तत्पूर्वी चामुंडेश्वरीच्या भक्त महाजनांनी मंदिरातील देवीची मूर्ती सुखरूप वरगाव येथे आणली. ती नेमकी कधी, कशी आणि कोणत्या मार्गाने आणली गेली याबाबतची ठोस माहिती अनुपलब्ध आहे.
चामुंडेश्वरी मंदिराच्या ऐतिहासिकतेविषयीचे एक प्रमाण येथे सापडलेल्या एका शिलालेखातून प्राप्त झाले आहे. चामुंडेश्वरी मंदिरातील तलावात सापडलेल्या कालभैरवाच्या मूर्तीच्या मागच्या भागात हा कोकणी भाषेतील तीन ओळींचा लेख कोरलेला आहे. त्यांत ‘गोंये सिंहासमी’, ‘गोंए’ व ‘गोंयांत चंडिका’ असे शब्द आहेत. गोव्यातील इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर यांच्या मते, ही कालभैरवाची मूर्ती १५७९मधील आहे. येथे ती १५८३मध्ये स्थापित करण्यात आली असावी. मंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, त्यावेळी या मूर्तीचे तलावात विसर्जन करण्यात आले. या शिलालेखातील गोंयात चंडिका या शब्दांवरून व ही मूर्ती चामुंडेश्वरी मंदिराच्या तलावात आढळली यावरून, येथील मंदिर १५७९ मध्ये अस्तित्वात होते हे स्पष्ट होते. सध्या येथे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १६२५मध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराचा १९६९मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.
याच प्रमाणे येथे २१ डिसेंबर २००८ रोजी, सर्वधारी नाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या मुहुर्तावर चामुंडेश्वरी देवीची पुनःप्रतिष्ठा करण्यात आली.
भव्य सभामंडप, अर्धमंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपासमोर सहा स्तरीय दीपस्तंभ आहे. सभामंडप उंच, प्रशस्त आणि खुल्या प्रकारचा आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी उतरते कौलारू छप्पर आहे. आत अनेक गोलाकार स्तंभ आहेत. बाजूला कक्षासने आहेत. मध्यभागी होमकुंड आहे. येथून चार पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो.
अर्धमंडपास कमानीकृती प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस मोठा देव्हारा बसवलेला आहे. त्याच्या वरच्या भागात कृष्णप्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर, येथील स्तंभांवर, तसेच महामंडपाच्या प्रवेशद्वारावर कावी कला प्रकारातील नक्षी कोरलेली आहे. महामंडपात बाह्यभिंतीपासून आत डावीकडून व उजवीकडून काही अंतर सोडून रुंद गोलाकार स्तंभरांग आहे. रुंद कमानीने हे स्तंभ एकमेकांस जोडलेले आहेत. छतावरील तुळईला मोठी पितळी घंटा टांगलेली आहे.
गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीस संगमरवरी फरशा बसवलेल्या आहेत. येथील प्रवेशद्वार गोमंतकातील अन्य मंदिरांतील प्रवेशद्वाराप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेले रौप्यावरण चढवण्यात आले आहे. द्वारचौकटीच्या खालच्या भागात द्वारपालांच्या मूर्ती, तर ललाटबिंबस्थानी कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहात मोठ्या लाकडी मखरामध्ये वज्रपीठावर चामुंडेश्वरीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीस पितळी मुखवटा घातलेला आहे व ती भरजरी वस्त्रालंकारांनी आणि पुष्पमालांनी शृंगारलेली आहे. गर्भगृहावर गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य असलेले, खाली अष्टकोनाकार आणि त्यावर घुमटाकार असे शिखर आहे.
या मंदिरात वर्षभरातील विविध धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे करण्यात येतात. शारदीय नवरात्रोत्सव हा त्यातील एक सर्वांत मोठा उत्सव असतो. या काळात मंदिरात होणारा मखरोत्सव पाहण्यासाठी येथे शेकडो भाविकांची गर्दी होते. पौष कृष्ण पक्ष प्रतिपदेस येथे मोठी जत्रा भरते. या दिवशी रात्री देवीला भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंची पावणी म्हणजे लिलाव होतो. रात्री ११ वाजता चामुंडेश्वरीची पालखी निघते. येथील मंदिरालगत असलेल्या मोठ्या तलावामध्ये पालखीचा नौकाविहार होतो. या यात्रेत प्रतिवर्षी दशावतारी नाटकाचा प्रयोग होतो. केवळ गोव्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देवीचे महाजन व भक्त या यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.
देवी चामुंडेश्वरी को आदि-शक्ति महामाया पार्वती का ही एक मंगलमय रूप स्वीकार किया गया है। शक्ति-स्वरूपा यह देवी गोवा के गौरवशाली कदंब राजवंश की कुलस्वामिनी रही हैं। गोवा के अन्य बहुसंख्यक देव-विग्रहों की भाँति, इस देवी का भी पिलगाँव के निकटवर्ती वरगाँव क्षेत्र में लगभग ५०० वर्ष पूर्व स्थानांतरण हुआ था। श्रद्धालुओं की अटूट श्रद्धा है कि इस पावन स्थल पर देवी का चैतन्य जाग्रत है; अतः श्रद्धालु किसी भी शुभ कार्य के शुभारंभ पर यहाँ देवी के दर्शनार्थ उपस्थित होते हैं। यहाँ देवी को ‘कौल प्रसाद’ (दैवीय आज्ञा) अर्पित करने की भी पुरातन परिपाटी है। पौष मास की कृष्ण प्रतिपदा को यहाँ देवी का एक विशाल मेला आयोजित होता है।
नवदुर्गाओं में परिगणित माँ चामुंडा ही चामुंडेश्वरी देवी हैं। भगवती की उत्पत्ति की पुण्य कथा ‘मार्कंडेय पुराण’ के ‘देवी महात्म्य’ के सप्तम अध्याय में वर्णित है। कथा के अनुसार, जब शुंभ-निशुंभ नामक दानवों ने इंद्र से त्रिलोक का आधिपत्य छीन लिया, तब उनके संहार हेतु पार्वती माता के देह-कोष से देवी अंबिका का प्रादुर्भाव हुआ। चंड और मुंड शुंभ-निशुंभ के अनुचर थे। उन्होंने अंबिका के अलौकिक रूप-सौंदर्य का अवलोकन कर उसका वर्णन शुंभ के सम्मुख किया।
शुंभ ने अंबिका के पास विवाह का प्रस्ताव प्रेषित किया। जब अंबिका ने उसे ठुकरा दिया, तब उसे बलपूर्वक लाने हेतु शुंभ-निशुंभ ने चंड-मुंड को नियुक्त किया। उस समय अंबिका के श्रीविग्रह से प्रकट हुई महाकाली ने चंड-मुंड का विनाश किया। इसी कारण देवी अंबिका ने काली को ‘चामुंडा’ नाम से संबोधित किया। उत्तर भारत में वे इसी चामुंडा नाम से विख्यात हैं, तो दक्षिण भारत में उन्हें चौंढेश्वरी, चौडेश्वरी अथवा चामुंडेश्वरी के नाम से पूजा जाता है।
चामुंडेश्वरी गोमंतक में ईस्वी १००० से १२३७ के कालखंड में शासन करने वाले कदंब राजवंश की अधिष्ठात्री देवी थीं। गोवा द्वीप पर स्थित गोपकपट्टण कदंबों की राजधानी थी। यहाँ के एक गिरिशिखर पर देवी का भव्य मंदिर सुशोभित था। ईस्वी १२३७ में यहाँ त्रिभुवनमल्ल नामक कदंब नरेश राज्य कर रहे थे। देवगिरि के यादव नृपति सिंघण के दरबार में बिच्चण और खोलेश्वर नामक दो सेनापति थे। बिच्चण पर दक्षिण दिशा में साम्राज्य विस्तार का उत्तरदायित्व था। उसने गोवेकर कदंबों पर आक्रमण किया, राजा त्रिभुवनमल्ल का वध कर दिया और उनके राज्य को यादव साम्राज्य में सम्मिलित कर कदंबों को अपना मांडलिक बना लिया। कालांतर में ईस्वी १३१२ में अलाउद्दीन खिलजी के सेनापति मलिक काफूर ने देवगिरि के यादवों पर आक्रमण किया। उसने रामदेवराय के पुत्र शंकरदेवराय का वध कर प्रदेश को लूटा और देवगिरि पर अपना सैन्य शिविर स्थापित किया।
मलिक काफूर मूलतः मथुरा का एक हिंदू था, जो गुजरात के खंभात के एक व्यापारी का दास था। उसे सहस्र दीनार में खरीदे जाने के कारण ‘हजार दीनारी’ भी कहा जाता था। आगे चलकर वह अलाउद्दीन का प्रधान सेनापति बना। गोवा के गजेटियर में यह उल्लेख प्राप्त होता है कि मलिक काफूर द्वारा १३१२ में किए गए आक्रमण के समय ही कदंबों की राजधानी गोपकपट्टण संभवतः ध्वस्त कर दी गई होगी। इस कारण कदंबों ने अपनी राजधानी चंद्रपुर स्थानांतरित की। इसी अस्थिरता के काल में वेल्हा गोवा स्थित चामुंडेश्वरी मंदिर को भी क्षति पहुँची होगी।
कतिपय विद्वानों का मत है कि चामुंडेश्वरी देवी के मूल मंदिर को मुस्लिम सेना ने नहीं, अपितु पुर्तगाली सेना और धर्मगुरुओं ने क्षतिग्रस्त किया। नवंबर १५१० में पुर्तगाल के तत्कालीन वाइसराय अल्फोंसो डी अल्बुकर्क ने गोवा द्वीप पर विजय प्राप्त की। स्थानीय हिंदुओं ने पुर्तगाली सत्ता का स्वागत किया था। अल्बुकर्क ने हिंदुओं को धार्मिक स्वतंत्रता प्रदान करने की घोषणा की थी, किंतु शीघ्र ही उसने तिसवाडी के सप्तकोटेश्वर मंदिर को ध्वस्त कर वहाँ गिरजाघर का निर्माण कराकर अपनी धर्मांधता का परिचय दिया।
इसके पश्चात तिसवाडी, बार्देश और सासष्टी प्रांतों में पुर्तगालियों के अत्याचार बढ़ते गए। इसी कालखंड में, ईस्वी १५३० के लगभग पुर्तगालियों ने तिसवाडी स्थित वृहद् गोवा के चामुंडेश्वरी मंदिर को नष्ट कर दिया। किंतु उससे पूर्व ही चामुंडेश्वरी के अनन्य श्रद्धालु महाजनों ने मंदिर की प्रतिमा को सुरक्षित वरगाँव पहुँचा दिया था। वह प्रतिमा किस समय, किस प्रकार और किस मार्ग से लाई गई, इस विषय में कोई प्रामाणिक सूचना उपलब्ध नहीं है।
चामुंडेश्वरी मंदिर की ऐतिहासिकता का एक प्रमाण यहाँ प्राप्त एक शिलालेख से मिलता है। मंदिर के सरोवर में प्राप्त कालभैरव की प्रतिमा के पृष्ठ भाग पर कोंकणी भाषा की तीन पंक्तियों का लेख उत्कीर्ण है। उसमें ‘गोये सिंहासमी’, ‘गोए’ तथा ‘गोयांत चंडिका’ जैसे शब्द अंकित हैं। गोवा के इतिहासवेत्ता डॉ. रोहित फलगाँवकर के मतानुसार, यह कालभैरव प्रतिमा १५७९ की है, जिसे यहाँ संभवतः १५८३ में स्थापित किया गया होगा। जब मंदिर में नवीन प्रतिमा की प्रतिष्ठा हुई, तब इस प्रतिमा का सरोवर में विसर्जन कर दिया गया। इस शिलालेख के ‘गोयांत चंडिका’ शब्दों और इस प्रतिमा के चामुंडेश्वरी मंदिर के सरोवर में मिलने से यह स्पष्ट होता है कि यहाँ का मंदिर १५७९ में अस्तित्व में था।
वर्तमान में स्थित मंदिर का निर्माण ईस्वी १६२५ में होने की बात कही जाती है। मंदिर के गर्भगृह के शिखर का १९६९ में जीर्णोद्धार किया गया। इसी प्रकार २१ दिसंबर २००८ को, सर्वधारी नाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्ण दशमी के शुभ मुहूर्त पर चामुंडेश्वरी देवी की पुनःप्रतिष्ठा संपन्न हुई।
भव्य सभामंडप, अर्धमंडप, महामंडप और गर्भगृह इस मंदिर की वास्तु-संरचना के अंग हैं। सभामंडप के सम्मुख छह-स्तरीय दीपस्तंभ स्थित है। सभामंडप ऊँचा, विस्तृत और मुक्त स्थापत्य का है, जिस पर दोनों ओर ढलवाँ खपरैल की छत है। इसके भीतर अनेक गोलाकार स्तंभ सुशोभित हैं। पार्श्व में बैठने हेतु स्थान निर्मित हैं और मध्य में होमकुंड है। यहाँ से चार सोपान चढ़कर मंदिर के अर्धमंडप में प्रवेश होता है। अर्धमंडप का प्रवेशद्वार मेहराबदार है। प्रवेशद्वार के ऊपरी भाग में एक विशाल देवकोष्ठक स्थापित है, जिसके ऊपरी भाग में श्री कृष्ण की प्रतिमा है। प्रवेशद्वार की मेहराब पर, स्तंभों पर तथा महामंडप के द्वार पर ‘कावी’ कला शैली की नक्काशी उत्कीर्ण है। महामंडप में बाहरी दीवारों से भीतर की ओर बाईं और दाईं ओर कुछ रिक्त स्थान छोड़कर गोलाकार स्तंभों की दीर्घा है।
ये स्तंभ सुंदर मेहराबों से परस्पर जुड़े हुए हैं। छत की शहतीर से एक विशाल पीतल का घंटा लटका हुआ है। गर्भगृह की दर्शनीय दीवार पर संगमरमर के पत्थर लगाए गए हैं। यहाँ का प्रवेशद्वार गोमंतक के अन्य मंदिरों की भाँति ही विशिष्ट है, जिस पर सूक्ष्म कलाकृति युक्त चांदी का आवरण चढ़ाया गया है। द्वार-चौखट के निचले भाग में द्वारपालों की मूर्तियाँ हैं, तो ललाटबिंब पर कीर्तिमुख उत्कीर्ण है। गर्भगृह में एक विशाल लकड़ी से निर्मित सुसज्जित मंडप में वज्रपीठिका पर चामुंडेश्वरी की कृष्ण-पाषाण की प्रतिमा विराजमान है। इस विग्रह पर पीतल का मुखौटा लगाया गया है और वह दिव्य वस्त्राभूषणों तथा पुष्पमालाओं से सुसज्जित है। गर्भगृह के ऊपर गोमंतकीय मंदिर स्थापत्य शैली की विशेषता लिए हुए, निचले भाग में अष्टकोणीय और ऊपर गुंबदाकार शिखर सुशोभित है।
इस मंदिर में निरंतर विविध धार्मिक उत्सव अत्यंत उत्साह के साथ मनाए जाते हैं। शारदीय नवरात्रोत्सव इनमें से सबसे बड़ा पर्व है। इस अवधि में मंदिर में होने वाले ‘मंडपोत्सव’ (मखरोत्सव) का दर्शन करने हेतु सहस्रों श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है। पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा को यहाँ एक विशाल मेले का आयोजन होता है। इस दिन रात्रि में देवी को श्रद्धालुओं द्वारा अर्पित वस्तुओं की नीलामी होती है। रात्रि ११ बजे चामुंडेश्वरी की पालकी निकलती है। मंदिर के निकट स्थित विशाल सरोवर में पालकी का नौका-विहार आयोजित होता है। इस यात्रा में हर साल दशावतारी नाटक का मंचन होता है। न केवल गोवा, अपितु महाराष्ट्र एवं कर्नाटक के श्रद्धालु इस उत्सव में बड़ी संख्या में सम्मिलित होते हैं।