दत्तगुरू मठ

सांगुळवाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील अन्य भागांप्रमाणेच कोकणातही दत्तभक्ती मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळते. कोकणभूमीत माणगाव, तळवडे, पाटगाव, मठ, रायपाटण अशा अनेक गावांमध्ये प्राचीन दत्त मंदिरे आहेत. त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी दत्त सांप्रदायिकांचे मठही आहेत. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील डोंगर कपारीत वसलेला दत्तगुरू मठ हा त्यातीलच एक आहे. याची स्थापना अंबरनाथ राणे महाराज यांनी केली. येथेच महाराजांची समाधी आहे. डोंगरकुशीत निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या दत्तगुरू मठात दत्त जयंती अन्य उत्सवांच्या वेळी भक्तांची मोठी गर्दी होत असते.

अंबरनाथ महाराज यांचे पूर्वचरित्र असे की त्यांचे मूळचे गाव सांगुळवाडी हेच होते. येथून ते मुंबईस नोकरीनिमित्ताने गेले. ते भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागात नोकरी करीत होते. त्यावेळी त्यांची कल्याण येथे हरिनाथ बाबा यांच्याशी भेट झाली. हरिनाथ बाबा हे दत्त सांप्रदायिक होते. त्यांच्यामुळे अंबरनाथ महाराज हे आध्यात्माकडे वळले. हरिनाथ बाबा यांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांच्या आज्ञेनुसार अंबरनाथ महाराज जपतप योगसाधना करू लागले. या काळात त्यांना अनेकदा दत्तगुरूंच्या चमत्कारांची प्रचिती आली. एकदा अंबरनाथ महाराज खूप आजारी पडले. त्यावेळी त्यांनी नोकरीचा त्याग केला ते सांगुळवाडीस आले. येथे ते अंथरुणावर पडून होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मातेस विनंती केली कीमी माझे मूल दत्तास अर्पण करते,’ असे दत्तगुरूंस सांग. त्यानुसार त्यांच्या मातेने सांगितल्यानंतर काही वेळातच अंबरनाथ महाराज आजारातून उठून बसले सांगुळवाडीतील एका वडाच्या झाडाखाली त्यांनी ध्यानधारणा सुरू केली. ती तारीख २४ मे १९३१ अशी होती. हे झाड आजही मठाच्या परिसरात आहे.

त्यानंतर त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. त्यांनी वडाच्या झाडानजीक डोंगर फोडून दत्ताचे लहानसे कौलारू मंदिर बांधले तेथे दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते येथे जपतप, योगसाधना करू लागले. त्यांच्या दर्शनासाठी हळूहळू पंचक्रोशीतील लोक येऊ लागले. मंदिरात दत्तगुरूंच्या जयंतीचा अन्य उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. अंबरनाथ महाराज यांनी १९५७ मध्ये समाधी घेतली. अंबरनाथ महाराजांनंतर त्यांची गादी त्यांचे पुत्र अवधूत महाराज, तसेच मारुती महाराज यांनी चालवली

सांगुळवाडीतील गर्द झाडीतून मठाकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. येथे काही अंतरावर उंच डोंगर कपारीत वसलेला मठ आहे. येथे येण्यासाठी एक जुना पायरी मार्ग आहे, तर नवीन डांबरी रस्त्यावरून थेट मठाकडे येता येते. या मठामध्ये दत्तगुरूंचे मंदिर आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार हे लाकडी असून त्याच्या द्वारपट्टीवर नक्षीकाम आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर लाकडात कोरलेली गणेशमूर्ती त्याच्याही वरच्या बाजूला महालक्ष्मी, दत्तगुरू आणि विठ्ठलरुख्मिणी यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सभामंडपापासून उंच जागेवर गर्भगृह आहे. येथून तीन पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश होतो. येथील पुजाऱ्यांव्यतिरिक्त गर्भगृहात जाण्यास भाविकांना अनुमती नाही. त्यामुळे सभामंडपातूनच गर्भगृहातील दत्त मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते.

गर्भगृहात वज्रपीठावर असलेल्या एका मोठ्या लाकडी देव्हाऱ्यात दत्तगुरूंची त्रिमुखी संगमरवरी मूर्ती आहे. .. १००० च्या सुमारास ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या अंशात्मक स्वरूपात दत्तात्रेयाची उपासना होऊ लागली होती. तेच स्वरूप येथे दिसते. या त्रिमुख दत्तात्रेयामागे एक गाय पायानजीक दोन श्वान आहेत. गाय हे पृथ्वीचे, तर श्वान वेदांचे प्रतीक मानले जातात. या मूर्तीजवळ बाळकृष्णाची, श्रीरामसीतालक्ष्मण यांच्या पितळी मूर्ती, तसेच पितळेचे शिवलिंग आहे. येथे चांदीच्या खडावाही आहेत.

दत्त मंदिराच्या समोरील बाजूस स्वामी अंबरनाथ महाराज यांची समाधी आहे. महाराजांनी १९५७ मध्ये संजीवन समाधी घेतल्याचे त्यांचे वंशज सांगतात. अध्यात्मशास्त्रानुसार समाधी हे योगाच्या अष्टांगांपैकी आठवे अखेरचे अंग आहे. साधकांच्या तपश्चर्येची अखेरची इच्छा म्हणजे समाधी अवस्था असते. लोकव्यवहारात जिवंत, तसेच संजीवन समाधी हे शब्द रूढ आहेत. या दोन्हींमध्ये फरक आहे. जिवंत समाधीमध्ये कालांतराने नैसर्गिक मृत्यू येऊन देहपात होत असतो. या समाधीच्या बाजूलाच त्यांच्या पत्नी अनुसया यांचीही समाधी आहे. येथेच एका खांबानजीक अंबरनाथ महाराजांचे थोरले पुत्र अवधूत महाराज यांचा खुर्चीत पाय सोडून बसलेल्या अवस्थेतील पुतळा आहे. दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला दोन मंदिरे आहेत. त्यापैकी एकात स्वामी अंबरनाथ महाराजांची मूर्ती आहे, तर दुसऱ्या मंदिरात गणेशमूर्ती आहे. मंदिर परिसरात वरच्या बाजूला अवधूत महाराज तसेच मारुती महाराज यांच्याही समाध्या आहेत.

दत्तगुरू मठामध्ये दत्त जयंतीचा उत्सव तीन दिवस असतो. यामध्ये घटस्थापना, दैनंदिन पूजा, अभिषेक, महाप्रसाद, आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, दत्तयाग होमहवन असे कार्यक्रम होतात. या उत्सवासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भाविक उपस्थित असतात. त्याच प्रमाणे येथे दरमाह पौर्णिमा उत्सवही साजरा केला जातो. याशिवाय स्वामी अंबरनाथ महाराज, माता अनुसया, स्वामी अवधूत महाराज आणि मारुती महाराज यांचे पुण्यतिथी सोहळेही येथे होतात.

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून किमी, तर खारेपाटणपासून २६ किमी अंतरावर
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून वैभववाडीसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : सुहास रावराणे, मो. ७७५६९०५३९७, ९४२१२३७४४५
Back To Home