दत्त अमरेश्वर मंदिर

औरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर

नरसोबाची वाडी हे कृष्णा पंचगंगेच्या किनाऱ्यावर असलेले भक्तप्रिय तीर्थस्थळ. येथे कायमच भक्तांची गर्दी असते. श्री दत्ताचा अवतार मानले जाणारे नरसिंह सरस्वती यांचे वास्तव्य या परिसरात होते. या कृष्णापंचगंगा संगमानजीक ते बारा वर्षे राहिले. या नरसोबाच्या वाडीच्या समोरच्या तीरावर असलेल्या औरवाड म्हणजेच अमरापूरमध्ये नदीकाठावर दत्त अमरेश्वर मंदिर आहे. या मंदिरात एकमुखी दत्त आणि अमरेश्वराचे लिंग आहे. त्याच्याच मागच्या बाजूला ६४ योगिनींचे स्थान आहे. या अमरेश्वराचे दर्शन घेणे हे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्यासारखेच असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचना केलेल्याश्रीनरसिंहसरस्वती स्तोत्रा, ‘अमरख्यपुरे योगिनीवरदो योऽखिलदोस्ति योगिनी: नृसिंहसरस्वती यतिर्भगवान् मेऽस्ति परावरा गति:असा उल्लेख आहे. या श्लोकात उल्लेख असलेले अमरापूर म्हणजेच आजचे औरवाड. .. १४२१ मध्ये नरसिंह सरस्वती हे अमरापूरला आल्याचा उल्लेख आहे. गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायात आलेल्या एका कथेत नरसिंह सरस्वती अमरापूरमध्ये एका दरिद्री ब्राम्हणाच्या घरी भिक्षेसाठी गेल्याचा आणि तिथे असलेला घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून त्याचे दारिद्र्य दूर केल्याचा प्रसंग आहे. त्याचप्रमाणे १९व्या अध्यायातअमरेश्वर्संनिधानीं। वसई चौसष्ट योगिनी। पूजा करावया माध्यान्ही। श्रीगुरुजवळी येती नित्य।।म्हणजे अमरेश्वर येथे वसत असलेल्या ६८ योगिनी रोज माध्यान्ही नरसिंह सरस्वती यांची पूजा करण्यास येत असत, असे म्हटले आहे

नरसोबावाडीतील वास्तव्यानंतर .. १४३५ मध्ये नरसिंह सरस्वती गाणगापूरला गेले. गुरुचरित्रातील कथेनुसार, त्यावेळी ६४ योगिनींनी त्यांना हे स्थान सोडून जाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितले कीतुम्हांसहित औदुंबरी। आमुच्या पादुका मनोहरी। पूजा करिती जे तत्परी। मनकामना पुरती जाणा।।म्हणजे येथे मनोहर पादुकांचा वास असेल. त्यांची जे पूजा करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. येथील ६४ योगिनींच्या मंदिरात या पादुका आहेत. या योगिनी नरसिंह सरस्वती यांच्यासमवेत काशीहून येथे आल्या होत्या असे सांगण्यात येते

येथील दत्त अमरेश्वर मंदिर प्रशस्त आहे. नव्या बांधणीचे हे मंदिर जुन्या मंदिराच्या जागी उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या आत डाव्या बाजुला गुरुचरित्रातील कथा चित्रस्वरुपात मांडण्यात आलेल्या दिसतात. या मंदिराच्या ब्रम्हस्थानी गाभारा आहे. त्या गाभाऱ्यात असलेली एकमुखी दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असल्याची माहिती येथे असलेले पुजारी देतात. या मूर्तीला सहा हात आहेत. सर्वात खालच्या उजव्या आणि डाव्या हातात कमंडलू आणि रुद्राक्षाची माळ आहे. मधल्या हातात त्रिशुल आणि डमरु आहे, तर वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि सुदर्शनचक्र आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूस अमरेश्वराचे लिंग आहे. येथील अमरेश्वरास काशी विश्वेवरस्वरुप मानले जाते. त्यात शंकरपार्वती, कार्तिकेयगणपतीची प्रतिष्ठापना असल्याचे सांगितले जाते. डाव्या बाजूला गोकर्ण महाबळेश्वराचे लिंग आहे. त्याच्या खाली पदचिन्हे आहेत. ती श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांची असल्याचे मानतात. याबरोबरच शंख, चक्र, गदा, पद्म, पादुका, रुद्राक्षांची माळ कमंडलू ही सारी चिन्हेही तिथे कोरलेली दिसतात. या गाभाऱ्याच्या ईशान्य कोपऱ्यात दत्त अमरेश्वराचे मूळ लिंग दिसते. हे फार प्राचीन असल्याचे मानतात

याविषयी आख्यायिका अशी की त्रेतायुगात जेव्हा देव दानवांची युद्धे होत असत तेव्हा दानवांचाच विजय होई. कारण त्याचे गुरु शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त होती. ते मृत्युमुखी पडलेल्या दानवांना पुन्हा जिवंत करत असत. यामुळे देवांनी ब्रम्हदेवाला साकडे घातले. आपल्यालाही अमरत्वाचे वरदान देण्याचा आग्रह त्यांनी धरला. ब्रम्हदेवांनी त्यांना या स्थानावर पाठवून शंकराची प्राणप्रतिष्ठापना करुन यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार देवांनी या स्थानी शंकारांची लिंग स्वरुपात प्रतिष्ठापना करुन यज्ञ केला. त्यानंतर त्यांना अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले. त्यामुळे या स्थानाला अमरेश्वर असे नामाभिधान प्राप्त झाले

या मंदिराच्या मागच्या बाजुला चौसष्ठ योगिनींचे मंदिर आहे. मात्र या मंदिरात केवळ आठ योगिनींच्या प्रतिमा आहेत. आठ गुणे आठ चौसष्ठ होतात, म्हणून या प्रतिमा चौसष्ठ योगिनींच्या मानल्या जातात. या आठ योगिनींच्या प्रतिमेच्या मध्यभागी नरसिंहस्वामींच्या पादूका आहेत. नरसोबाच्या वाडीला आलेल्या भक्ताने अमरेश्वराला येऊन या योगिंनीचे दर्शन घेतल्याशिवाय त्याची यात्रा सफल झाली असे मानले जात नाही. नरसिंह सरस्वती यांनी एका ब्राह्मणाच्या अंगणातील घेवडावेल उपटल्यावर त्या खाली असलेला मोहरांचा हंडा त्या ब्राम्हणाला सापडला आणि त्याचे दारिद्रय दूर झाले, ही गुरूचरित्रातील कथा जेथे घडली त्याच परिसरात नंतर हे मंदिर बांधण्यात आले आहे

दत्त अमरेश्वर मंदिरात सकाळी पाच वाजता काकड आरती आणि रात्री दहा वाजता शेजारती होते. मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. येथे गुरु प्रतिपदेस मोठा उत्सव होतो. याशिवाय गणेशोत्सव, गोपाळकाला आदी उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूरपासून ४९ किमी, तर शिरोळपासून किमी अंतरावर
  • शिरोळ कोल्हापूरहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home