ब्राह्मणदेव मंदिर / विठ्ठल मंदिर

नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग


मुंबईगोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे या गावातून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाधवडे हे गाव आहे. या गावाच्या दक्षिणेस पालखी डोंगराच्या पायथ्याला निसर्गसमृद्ध परिसरात ब्राह्मणदेव मंदिर आहे. दरवर्षी येथे तीन दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. सप्ताहाच्या वेळी या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. या वेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित असतात. येथे होणारा दहिकाला उत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. येथे सुमारे आठ ते नऊ फूट उंचावर दहीहंडी लावलेली असते भाविकांनी ती उडी मारून डोक्याने फोडायची असते. या उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे

ब्राह्मणदेवाच्या धर्मइतिहासानुसार ही रक्षकदेवता आहे. त्यासबारांचा ब्राह्मणअसेही म्हणतात. हे स्थळ कऱ्हाडे ब्राह्मणांकडे असते. कोकणातील गावरहाटीतबारापाचही संज्ञासंकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. बारा तत्त्वे आणि पाच ठिकाणे मिळून ही संज्ञा तयार झालेली आहे. कोकणातील प्रत्येक गावाची रचना ही पूर्वीपासून साधारणतः १२ वाड्यांची असे. या बारा बलुतेदारांच्या बारा वाड्यांतील समाजाचा अंश (यास वस असे म्हणतात) यापासून बारा तत्त्वांची निर्मिती झाली आणि त्यांना पाच वर्ण म्हणजेच पाच माया मिळून बारापाच हा गावरहाटीचा संप्रदाय निर्माण झाला, असे सांगण्यात येते. कोकणात देवदेवतांना घालण्यात येणाऱ्या गाऱ्हाण्यांतबारा पाचाचे गणित एक करअसे म्हटले जाते. असे सांगितले जाते की यातील पाच म्हणजे विष्णू, गणपती, सूर्य, देवी आणि शिव या देवता, तर बारामध्ये पूर्वसत्ता (बारांचा पूर्वस मायेचा पूर्वस), राजसत्ता (विठ्ठलादेवी किंवा इटलाई), गावडा, गांगो, खातया (रामपुरुष वा सुतारदेव), मडवळ, जैन (नितकारी), ब्राह्मण, भराडी (भद्रकाली किंवा भवाई), बेळा, तसेच पान ही स्थळे आहेत. यात आठव्या स्थळी ब्राह्मण ही देवता येते.

नाधवडे गावाच्या एका टोकास डोंगरपायथ्याशी या ब्राह्मणदेवाचे मंदिर आहे. या मंदिराला सर्व बाजूंनी तटबंदी आहे. तटबंदीमध्ये मोठी महिरपी कमानदार वेस आहे. या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेश कमानीच्या डाव्या उजव्या बाजूला मोठ्या आकाराचे दोन चौथरे बांधण्यात आले आहेत. उत्सव काळात या चौथऱ्यांवर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या प्रांगणात संपूर्ण फरसबंदी केलेली आहे. प्रांगणात मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील एका चौथऱ्यावर तुळशी वृंदावन स्थानिक देव आहेत

दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ पाताळलिंग असलेले गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपातून तीन पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील दर्शनमंडप खुल्या स्वरूपाचा सभामंडप हा अर्धखुल्या प्रकारातील आहे. सभामंडप आयताकृती प्रशस्त आहे. त्याच्या डाव्या उजव्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. येथे सर्वत्र संगमरवरी फरशा बसवण्यात आलेल्या आहेत. या कक्षासनांच्या मध्ये बांधण्यात आलेले सभामंडपातील स्तंभ खालच्या बाजूने चौरसाकृती आहेत. त्यावरील पलगईवरून मंडपाच्या कमानीचा निम्नभाग सुरू होतो. या कमानीने हे स्तंभ एकमेकांशी जोडलेले आहेत. कोकणातील नैसर्गिक वातावरणास अनुसरून सभामंडपाचे छत म्हणजेच वितान हे उतरत्या छपराचे आहे. सभामंडपातून अंतराळ अंतराळातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात सुमारे दोन ते अडीच फूट खोलगट भागात ब्राह्मणदेवाचा स्वयंभू अनघड दगड आहे. त्यास लिंग असेही म्हटले जाते. त्यावर अभिषेकपात्र तसेच पितळी घंटा टांगलेल्या आहेत

मंदिराच्या दर्शनमंडपावर एक लहानसे शिखर आहे, तर गर्भगृहावर मोठे उंच, वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. गर्भगृहावरील हे शिखर उरूशृंग प्रकारचे म्हणजे त्यावर एकावर एक अशा प्रकारे त्याच शिखराच्या प्रतिकृती बसविलेल्या असे आहे. त्यावर द्विस्तरीय आमलक त्यावर पितळी कळस आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस एक जांभ्या दगडातील चौकोनी कुंड आहे. या कुंडात बाराही महिने पाणी असते. ब्राह्मणदेव मंदिरात हरिनाम सप्ताह वा अन्य धार्मिक कार्यक्रम होतात. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. हा महाप्रसाद बनविण्यासाठी ग्रामस्थांनी खास व्यवस्था केली आहे. त्याकरीता मंदिर परिसरातच मोठे स्वयंपाकगृह बनविण्यात आलेले आहे.

नाधवडे गावात ब्राह्मणदेवाच्या मंदिरापासून काही अंतरावर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्राचीन विठ्ठलरुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की मंदिराच्या समोरील बाजूस जांभ्या दगडाचे बांधकाम असलेले एक पाण्याचे कुंड आहे. असे सांगितले जाते की या कुंडात विठ्ठलरुक्मिणीच्या चरणाखालून हे पाणी येते. हे पाणी बाराही महिने वाहत असते. या मंदिराच्या समोरील बाजूस एका पिंपळाच्या झाडाखाली पुंडलिकाचे लहानसे मंदिर आहे. कार्तिकी एकादशीला येथे भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मंदिरात तुळशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी मागच्या वर्षभरात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या येथील भाविकांना मानाचे स्थान दिले जाते. प्रथम ते भाविक विठ्ठलरखुमाईच्या मंदिरात येतात. यावेळी त्यांची स्वागत दिंडी काढली जाते

उपयुक्त माहिती

  • वैभववाडीपासून ११ किमी, तर सिंधुदुर्गपासून ५७ किमी अंतरावर
  • वैभववाडी, खारेपाटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home