अठराभुजा गणेश मंदिर

रामटेक, ता. रामटेक, जि. नागपूर

विदर्भाची अयोध्याम्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामटेक गडाच्या पायथ्याशी विद्येचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील १८ भुजा असलेली गणेशमूर्ती ही देशातील एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे अठराभुजा गणेशाचे मंदिर नागपूरसह विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जागृत स्थान नवसाला पावणारा गणेश, अशी या गणेशाची ख्याती असल्याने गणेशोत्सवादरम्यान हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

रामटेक शहराच्या मध्यवस्तीत शास्त्री वॉर्डात रामगिरी टेकडीच्या पायथ्याशी अठराभुजा गणेश मंदिर आहे. विशेष म्हणजे या एकाच मंदिरात गणेशाच्या रूपांचे दर्शन होते. एका आख्यायिकेनुसार, रामटेक येथील एका ब्राह्मणाला गणेशाने स्वप्नदृष्टांत देऊन आपण बाजूच्या नदीत असून तेथे शोध घेऊन माझी मंदिरात स्थापना करा, असे सांगितले. त्यानुसार शोध घेतला असता १८ हात असलेली गणेशमूर्ती सापडली. विधीपूर्वक तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून या गणेशाची पूजाअर्चा करण्यात येते. सुमारे ५०० वर्षांपूर्वी नागपूरच्या चांदरायण कुटुंबीयांच्या पूर्वजांनी मंदिराचे निर्माण केल्याचे सांगितले जाते.

ऐतिहासिक नोंदींनुसार, १६ व्या शतकात राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात गणेशमूर्ती आहे. मध्यभागी महागणपतीची सुमारे . फूट उंचीची मूर्ती आहे. या गणेशाचे मुकुट सोंड चांदीची आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यातील गणेशमूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूला फूट उंचीची १८ भुजा असणारी शुभ्र संगमरवरी गणेशमूर्ती आहे. १८ भुजांपैकी १६ भुजांमध्ये विविध शस्त्रे एका हातात मोदक एका हातात मोरपंखी लेखणी आहे. विद्यार्थ्यांनी या गणेशाची पूजा केली तर त्यांना याचा लाभ होतो, अशी श्रद्धा आहे. इतर हातांमध्ये असलेल्या शस्त्रांमध्ये गदा, बाण, पाल, तोमर, मुद्‌गल, अंकुश, सूल, परिघ आदी शस्त्रांचा समावेश आहे. या गणेशाची सोंड वेटोळी, तर डोक्यावर फण्यांचा नाग आहे. याशिवाय गळ्यात नाग कमरेला नागपट्टा आहे. १८ सिद्धींमुळे अठराभुजा गणेशाला शास्त्र पुराणांत विघ्नेश्वर म्हणून संबोधलेले आहे. या मंदिराच्या सभामंडपात भिंतींना लागून असलेल्या स्तंभांवर मुख्य अष्टविनायक विदर्भातील अष्टविनायक यांच्या मूर्ती प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या उजव्या बाजूला महालक्ष्मीची मूर्ती आहे. याशिवाय मंदिराच्या बाजूला महादेव मारुती यांची मंदिरे आहेत.

१९८० मध्ये श्री अगस्ती मुनी आश्रमाचे महंत गोपालदास महाराज यांनी या मंदिराच्या संरक्षक भिंती, तसेच इतर डागडुजी केली होती. काही वर्षांपूर्वी शहरातील तरुणांनी एकत्र येत अठराभुजा गणेश मंडळ स्थापन केले मंदिराचे नूतनीकरण केले. त्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.

विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक तीर्थस्थान असल्यामुळे या मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. प्रत्येक चतुर्थीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. या मंदिरातील अग्रपूजेचा मान आजही चांदरायण कुटुंबाकडेच आहे. रामटेकच्या प्रसिद्ध शोभायात्रेची सुरुवातही या मंदिरातूनच होते. रामटेक शहरातील कोणत्याही सार्वजनिक कार्याची सुरुवात अठराभुजा गणेश मंदिरात पूजाअर्चा करून केली जाते. दरवर्षी संक्रांतीनंतर येणाऱ्या चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. या मंदिराचा समावेशवर्ग तीर्थक्षेत्रात करण्यात आला आहे.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून ५० किमी, तर रामटेक बसस्थानकापासून . किमी अंतरावर
  • नागपूरपासून रामटेकसाठी दर तासाला एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • तालुक्याचे ठिकाण असल्याने निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home