प्राचीन शिवमंदिर (यमाची सासुरवाडी)

सावनेर, ता. सावनेर, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यातील सावनेर या तालुक्याच्या ठिकाणी असलेले ११ व्या शतकातील हेमाडपंती रचनेचे शिवमंदिर तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. मृत्यूची देवता यम याची सासुरवाडी म्हणूनही या ठिकाणाची ख्याती आहे. कोलार नदीच्या तीरावर स्थित असलेल्या या मंदिरात वालुकामय शिवलिंग आहे. पौराणिक संदर्भांनुसार, स्वतः श्रीकृष्णाने नारदाच्या मदतीने या ठिकाणी यमाचा विवाह येथील राजकन्येशी करून दिल्यामुळे या स्थानाला महत्त्व प्रात झाले आहे. सावनेर परिसरातील सर्वात पुरातन मंदिर, अशी या मंदिराची ओळख आहे.

जैमिनी अश्वमेघग्रंथातील उल्लेखानुसार, सावनेरचा परिसर पूर्वी सारस्वतपूर म्हणून ओळखला जात असे. महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ करून दिग्विजयासाठी शामकर्ण घोडा सोडला. उत्तर भारत पादाक्रांत करीत दक्षिणेकडील दंडकारण्यात शामकर्ण शिरला आद्रिका (सध्याचे नाव आदासा) नगरी ओलांडून तो सारस्वतपूरच्या पूर्व वेशीवर लालबागेत येऊन धडकला. त्यावेळी येथे राजा वीरवर्मा याचे राज्य होते. त्याला मुले मुलगी होती. या राजपुत्रांनी हा घोडा अडविला पांडवांना युद्धाचे आव्हान दिले. यावेळी झालेल्या घनघोर युद्धात हे पाचही राजपुत्र कामी आले.

वीरवर्मा राजाची कन्या राजकुमारी मालिनी ही शंकराची परमभक्त होती. तिने मात्र हे युद्ध नेटाने सुरू ठेवले. मालिनीने या ठिकाणी एक वाळूची शिवपिंडी तयार करून तपश्चर्येच्या बळाने कोलार नदीचा प्रवाह वळविला. मालिनीची तपश्चर्या पाहून श्रीकृष्ण तेथे आले आणि त्यांनी युद्ध थांबविले. नारदाच्या मध्यस्थीने यमराजाशी मालिनीचे लग्न लावून दिले. आजही शिवमंदिराकडे कोलार नदीचा प्रवाह वळलेला दिसतो. तेव्हापासून या ठिकाणी मालिनीने स्थापन केलेल्या वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली जात असून हे ठिकाण यमराजाची सासुरवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. या विवाहप्रसंगी यमराजासोबत त्याचे ८०० मंत्री होते. हे मंत्री म्हणजे आपल्याला होणारे आजार होत.

राजकुमारी मालिनी हिने स्थापित केलेल्या शिवलिंगाभोवती असणारे मंदिर हे काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे पुढे ११ व्या शतकात हेमाद्री कारागिरांनी (हेमाडपंती) येथे दगडाचे एक शिवालय बांधले, हेच आजचे शिवमंदिर होय. या मंदिराची काही अंशी डागडुजी झाली असली तरी येथील वालुकामय शिवपिंड ही प्राचीन असल्याचे सांगितले जाते.

सावनेरच्या पाहलेपार भागात असलेले हे शिवमंदिर कोलार नदीच्या काठावर स्थित आहे. मंदिर काहीसे उंचावर असून तटभिंतीच्या कमानीतील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात जाण्यासाठी १० ते १२ पायऱ्या आहेत. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथे अनेक लहानमोठी मंदिरे दिसतात. या संपूर्ण परिसरात फरसबंदी असून येथे असलेले अनेक वृक्ष नदीच्या तीरावर असल्यामुळे हा परिसर शांत सुंदर भासतो.

मंदिराची बांधणी साधी कमी कलाकुसरीची आहे. मुख्य मंदिर हे पश्चिमाभिमुख असून सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभामंडपातील खांबांवर काहीशी नक्षी कोरलेली असून मध्यभागी नंदी विराजमान आहे. अंतराळातील गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले दिसते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर गणेशमू्र्ती असून गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडीसमोरील देवकोष्टकामध्येही गणेशाची मूर्ती विराजमान आहे. साधारणतः शिवपिंडीसमोरील देवकोष्टकांमध्ये पार्वती मातेची मूर्ती पाहायला मिळते; परंतु येथे गणेशमूर्ती आहे. मंदिर परिसरात श्रीगणेश मारुती यांची मंदिरे आहेत.

१६ व्या शतकात औरंगजेबाच्या सैन्याने परिसरातील अनेक मंदिरांची नासधूस केली. आदासा येथील शमी विघ्नेश गणेश मंदिर सावनेर येथील सारस्वत नदी तीरावरील शिवमंदिराचीही तोडफोड केली. या मंदिरालाही त्याची झळ बसली होती. त्यामुळे या परिसरात मंदिराचे काही जुने अवशेष पाहायला मिळतात. सावनेर येथील हे प्राचीन शिवमंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून ते जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारी शिवरात्रीला येथे महापूजेचे आयोजन केले जाते. या दिवशी येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून ४२ किमी, तर सावनेर 
  • बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • नागपूरमधील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • तालुक्याचे शहर असल्याने निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home