श्रद्धावान हिंदूंसाठी दक्षिणामूर्ती किंवा खुद्द शिवस्वरूप मानले जाणारे आदि शंकराचार्य भगवत्पाद यांना समर्पित असलेले मंदिर माटुंगा येथे आहे. दाक्षिणात्य शैलीत बांधण्यात आलेल्या श्री शंकर मठामध्ये हे मंदिर स्थित आहे. ८७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठ-मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आदि शंकराचार्य हे मुख्य आराध्य दैवत असलेले हे भारतातील मोजक्या मंदिरांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे हे असे एकमेव मंदिर आहे की जेथे कांची आणि शृंगेरी पीठाचे शंकराचार्य दरवर्षी भेट देतात. मुंबईतील वैदिक संस्कृतीचे जतन करणाऱ्या या मंदिर-मठात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.
हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार (कार्तिकेयांची उपासना करणारा पंथ) या सहा हिंदू पंथांच्या अनुयायांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक महत्कार्य साधणारे ‘षण्मठस्थापकाचार्य’ म्हणून आद्य शंकराचार्यांचा गौरव केला जातो. त्यांनी आदित्य, अंबिका, विष्णू, गणनाथ आणि महेश्वर या तत्कालीन पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या द्वारे दाखवून दिला. सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा ‘आस्तिक’ व बौद्ध, जैन, लोकायत अशा ‘नास्तिक’ दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वांत मोठे योगदान मानले जाते. त्यांच्या कार्यकाळाबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही. मात्र साधारणतः इ.स. ७८८ ते ८२० हा त्यांचा काळ मानला जातो.
आद्य शंकराचार्य यांचा जन्म केरळातील अलवाये शहरानजीकच्या कालडी नामक खेड्यात झाला होता. त्यांचे कुळ कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणांचे होते. त्यांचा जन्म, कार्यकाळ आदी बाबी विवाद्य असल्याने त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र मानले जाते व पुढील श्लोकात त्यांचे चरित्र सांगितले जाते. – ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद । षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात।।’ याचा अर्थ असा की ‘आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व ३२व्या वर्षी महाप्रस्थान.’ श्रीमद्भगवद्गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र मिळून प्रस्थानत्रयी होते. त्यावरील महान भाष्यकार, केवलाद्वैत म्हणजे एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य, जीवात्मा त्याहून भिन्न नाही व इतर सर्व विश्व मिथ्या आहे या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक आणि ‘पूर्वज वेडा होता म्हणून आपणही वेडे असायला पाहिजे असा काही नियम नाही’ (नहि पूर्वजो मूढ आसीदित्यात्मनि मूढेन भवितव्यमिति किंचिदस्ति प्रमाणम् – ब्रह्मसूत्र २.१.११) अशा मार्मिक शब्दांत धर्मसुधारणावाद प्रतिपादन करणारे युगकर्ते वेदान्ती म्हणून आद्यशंकराचार्य ओळखले जातात. आपल्या ३२ वर्षांच्या जीवनकालात आचार्यांनी प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज सुमारे ४०० स्फुट ग्रंथ लिहिले. ‘दक्षिणामूर्ती स्तोत्र’, ‘हरिमीडे’, ‘आनन्दलहरी’, ‘सौंदर्यलहरी’ ही त्यांनी रचलेली स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या तत्त्वज्ञानाची परंपरा अखंड चालू राहावी यासाठी त्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी असे भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. या चार मठांव्यतिरिक्त त्यांनी काशीचा सुमेर मठ तसेच कांचीचे कामकोटीपीठ याचीही स्थापना केली होती. या मठांवर आद्य शंकराचार्यांनी अधिकारी पीठाधीश नेमले. ती परंपरा आजही कायम आहे.
देशात आदि शंकराचार्य आराध्य दैवत असलेली मोजकी मंदिरे आहेत. त्यातील शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेले कालडी, कांचीपुरम् तसेच एनाथूर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. माटुंगा येथील शंकर मठातील मंदिर हे त्यांपैकी एक होय. या मठाच्या स्थापनेची कथा अशी सांगण्यात येते की सुब्रमण्य शास्त्रीगल हे चेन्नई मधील एक वैदिक पंडित होते. ते आदि शंकराचार्यांचे परमभक्त होते. १९३९ साली ते उपजीविकेसाठी मुंबईत आले. येथे ते वैदिक पंडित म्हणून लोकांकडून विविध धार्मिक विधी करून घेत असत. या काळात त्यांना वारंवार आदि शंकराचार्यांचा स्वप्नदृष्टांत होऊ लागला. वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्राची शिकवण लोकांना देणे, तसेच एक केंद्र सुरू करण्याची प्रेरणा या स्वप्नांद्वारे आदि शंकराचार्य त्यांना देत होते. या दृष्टान्तांनी अस्वस्थ झालेल्या सुब्रमण्य शास्त्रीगल यांनी तामिळनाडूतील कांचीपुरम् येथे जाऊन कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांची भेट घेतली. त्यावेळी स्वामींनी त्यांना आदि शंकराचार्यांनी मांडलेल्या केवलाद्वैत या तत्त्वज्ञानावर आधारित वेदवर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी १९३९ मध्ये माटुंगा येथे या मठाची स्थापना केली. असे सांगितले जाते की प्रथम सुब्रमण्य शास्त्रीगल यांच्या घरात (खोली क्र. २१८, महावीर बिल्डिंग) वेदवर्गास प्रारंभ झाला होता. शिष्यसंख्या वाढल्यानंतर हा वर्ग दोन खोल्यांच्या घरात (खोली क्र. १-२, मोहन मॅन्शन. सध्याचे धाबावाला मॅन्शन) स्थलांतरित करण्यात आला. सन १९५४ मध्ये समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन मठासाठी मोठी इमारत बांधण्याचे ठरवले. त्यानुसार माटुंगा येथील श्रीनिवास इमारत विकत घेऊन तेथे या मठाची स्थापना करण्यात आली.
सन १९५९ मध्ये एम. व्यंकटरामय्या या सद्गृहस्थांनी मठास आदि शंकराचार्यांची संगमरवरी मूर्ती अर्पण केली. या मठात बाणलिंग, पंचायतन तसेच चंदनी आचार्य-पादुका आहेत. त्या कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांनी दिल्या, तर शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी येथील गणपतीची मूर्ती आणि दैनंदिन पूजेसाठी शालिग्राम दिला. १० मे १९७८ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर द्वारका पीठाचे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद तीर्थ स्वामी यांच्या हस्ते पहिला कुंभाभिषेक करून, सध्याच्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या तीन मजली मठाच्या दुसऱ्या मजल्यावर हे मंदिर स्थित आहे. मंदिराचा दर्शनी भाग दाक्षिणात्य मंदिर शैलीत उभारलेला आहे. मंदिरास एक भव्य राजगोपुर आहे. त्यास विश्वातील पाच तत्त्वांचे वा पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारे पाच भाग आहेत. या गोपुरास स्थूल लिंग असेही म्हटले जाते. त्यात शिवशंकर, विष्णू, ब्रह्मा आणि शंकरतत्त्वांच्या प्रतिमा आहेत. गोपुराच्या दोन्ही बाजूंना शंखनिधी आणि पद्मनिधी आहेत. गोपुराच्या बाजूस असलेल्या भिंतींवर (सालाई गोपुरावर) उजवीकडील वरच्या देवकोष्ठांत गणपती, व्यास आणि अगस्ती यांच्या प्रतिमा आहेत, तर डावीकडील वरच्या देवकोष्ठांत मुरुगन, वल्ली आणि देवसेना यांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या आवारात प्रवेश करताच समोरच दहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या बाजूला ऐरावत आणि पुष्पदंत या गजराजांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या बाजूला पश्चिम आणि नैऋत्य या दिशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वायू आणि वरुणाच्या प्रतिमा आहेत. आवारात उजव्या बाजूला वरसिद्धी विनायक आणि डाव्या बाजूला आंजनेय (हनुमान) यांची सुशोभित मंदिरे आहेत. या पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो. समोरच भिंतीवर, कुरुक्षेत्रावर अर्जुनास गीतोपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भव्य उठावचित्र आहे. येथेच एका काचपेटीमध्ये अष्टभुजा दुर्गादेवीची मूर्ती विराजमान आहे. येथून डाव्या बाजूस २२ पायऱ्यांचा जिना आहे. तो चढून मंदिराच्या महामंडपात प्रवेश होतो. महामंडपाच्या प्रवेशद्वारावरील तुळईवर ३६ कमळे आहेत. त्या प्रत्येक कमळाला ३६ पाकळ्या आहेत. या प्रवेशद्वाराला ‘तोरण वासल’ असे म्हणतात. हिंदू धर्मातील सांख्य दर्शनात धर्माची २४ तत्त्वे सांगितली आहेत. पुराणे ३० तत्त्वे सांगतात, तर काश्मिरी शैव आगमामध्ये एकूण ३६ तत्त्वे सांगितलेली आहेत. यात शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्धविद्या, माया, कला, विद्या, काल, पुरुष, प्रकृती, बुद्धी, महाभूते इत्यादी तत्त्वांचा समावेश होतो. ही ३६ कमलपुष्पे या ३६ तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात.
मंदिराचा महामंडप संगमरवरी फरसबंदी असलेला व प्रशस्त स्वरूपाचा आहे. महामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच स्तंभ आहेत. त्यावर दत्तात्रेय, नारायण, पद्मोद्भव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद आणि गोविंद भगवत्पाद यांच्या मूर्ती आहेत. ही आदिगुरू शंकराचार्यांची गुरु परंपरा आहे. महामंडपाच्या भिंतींवर शंकराचार्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग रंगवलेले आहेत. वितानावर १००८ पाकळ्यांचे पौराणिक कमळ आहे. त्याच्या मध्यभागी बिंदुकोण आहे. तो आदि पराशक्तीचे निवासस्थान मानला जातो. समोर उंच व रुंद अशा अधिष्ठानावर मंदिराचे गर्भगृह आहे. पाच पायऱ्या चढून या अधिष्ठानावर प्रवेश होतो. दाक्षिणात्य शैलीतील या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस स्वर्णलक्ष्मीची प्रतिमा आहे. येथे दोन्ही बाजूला दोन द्वारसेवकांच्या मोठ्या मूर्ती आहेत. आत उंच अशा संगमरवरी वेदीवर जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांची शांत मुद्रेतील, काषायवस्त्र परिधान केलेली मूर्ती प्रतिष्ठापित आहे. ही मूर्ती पांढऱ्या संगमरवरात घडवलेली आहे. वेदीच्या पुढे छोटीशी हिमशिखरासारखी रचना आहे आणि त्यावर शिवलिंग विराजमान आहे. त्याच्या पुढे शंकराचार्यांची पंचधातूची छोटी मूर्ती विराजमान आहे. वेदीलगत उंच चौथऱ्यावर शंकराची नटराज स्वरूपातील मूर्ती आहे. गर्भगृहाबाहेरील प्राकारात आगमशास्त्रांनुसार घडवलेल्या गणेश, शक्ती, सूर्य, विष्णू, दक्षिणामूर्ती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती असलेली छोटी मंदिरे आहेत. या सर्व देवतांना केलेल्या अभिषेकाचे तीर्थ पुन्हा गर्भगृहात जाते. तेथील शिवलिंग आणि आदि शंकराचार्यांच्या मूर्तीस प्रदक्षिणा घालून ते गोमुखाद्वारे बाहेर येते. गर्भगृहाच्या मागच्या बाजूस असलेल्या भिंतीवर आदि शंकराचार्य, शृंगेरी शारदा पीठातील देवी शारदांबा यांच्या प्रतिमांबरोबरच या मंदिरास आजवर भेट देऊन गेलेल्या सर्व शंकराचार्यांच्या मोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत.
या मंदिरात भाविक रोज सकाळी ५.३० ते ११ आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ९ या दरम्यान आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. अक्षय्य तृतीयेला मंदिर प्रतिष्ठापना दिन साजरा केला जातो. या दिवसाचा प्रारंभ सूर्यनमस्काराने होतो. यानंतर मंदिरातील विविध देवतांना कलशाभिषेक केला जातो. त्यांना नववस्त्रे, अर्चना, नैवेद्य आणि दीपप्रदान हे विधी केले जातात. सन १९४१ पासून या मठमंदिरात ११ दिवसांचा शंकर जयंती सोहळा साजरा केला जातो. या काळात येथे महारुद्र केला जातो. मंदिरात कांची आणि शृंगेरी पीठाच्या आचार्यांचा जयंती आणि वर्धंती सोहळाही साजरा केला जातो. नवरात्रोत्सव, तसेच रामनवमी, स्कंद षष्ठी, गणेश चतुर्थी, अरुद्र दर्शनम, वैकुंठ एकादशी, अन्नाभिषेकम आदी सण व उत्सव वैदिक पद्धतीने साजरे केले जातात. रामनवमी उत्सवात प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस येथे संस्कृत रामायणाचा पाठ केला जातो. महाशिवरात्रीस येथे सायंकाळी ४ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत चार यमपूजा केल्या जातात. या पूजांच्या वेळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
या मठात नियमित वेद आणि संस्कृत वर्ग घेतले जातात. येथून आतापर्यंत ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी वेद शिक्षणाचा लाभ घेतला आहे. मठाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळेत सुमारे ३९ विद्यार्थी यजुर्वेद आणि सामवेदाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परीक्षा कांची मठाच्या ‘वेद रक्षण निधी ट्रस्ट’ मार्फत घेतल्या जातात. हा मठ केरळमधील पालक्कड येथील वेद संरक्षण समिती, महाराष्ट्रातील देऊळगाव राजा येथील श्रौत वेद पाठशाळा, परभणी येथील यज्ञेश्वर प्रतिष्ठान वेदशास्त्र पाठशाळा, तामिळनाडूतील ऋग्वेद पाठशाळा आणि कुंभकोणम, परभणी व पुणे येथील गुरुकुलांनाही साहाय्य करतो. याशिवाय, मठातर्फे ३१ वैदिक पंडित आणि अग्निहोत्रींना प्रत्येकी ५००० रुपये मासिक निवृत्तिवेतन दिले जाते. यातील बहुतेक पंडित ७५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. दरवर्षी एका संस्कृत विद्वानाला ‘आदि शंकर पुरस्कार’ दिला जातो. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. धार्मिक कार्यांव्यतिरिक्त मठातर्फे गरिबांना वैद्यकीय मदत, शहरातील अनेक कर्करोगग्रस्तांना अन्न आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवले जाते.
उपयुक्त माहिती
दादर रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ९ किमी
शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध
संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२४०१४३९७ मो. ७७३८६७४३९७, ७७३८४१३१२९
Adi Shankaracharya Temple / Shri Shankara Matham
Shraddhanand Marg, Matunga, Mumbai
In Matunga, there is a temple dedicated to Adi Shankaracharya Bhagavatpada, who is revered by devout Hindus as Dakshinamurti or Lord Shiva Himself. This temple is situated within the Shri Shankara Matham, which is built in the South Indian architectural style. A unique feature of this Matham-temple, established 87 years ago, is that it is one of the few temples in India where Adi Shankaracharya is the principal presiding deity. Similarly, it is the only temple where the Shankaracharyas of both Kanchi and Sringeri Peethams visit annually. This temple-Matham, which preserves Vedic culture in Mumbai, hosts various religious programs throughout the year.
Adi Shankaracharya is glorified as ‘Shanmathasthapakacharya’ (the establisher of the six systems of worship) for his great work of uniting the followers of the six Hindu sects: Shaiva, Vaishnava, Shakta, Saura, Ganapatya, and Kaumara (the sect worshipping Kartikeya). He showed the harmonious path of worshipping five popular deities of that time – Aditya, Ambika, Vishnu, Gananatha, and Maheshwara – together through the Panchayatana Puja. The systematic refutation of ‘Astika’ (theistic) philosophies like Samkhya-Yoga, Nyaya-Vaisheshika, Purva Mimamsa, and ‘Nastika’ (atheistic) philosophies like Buddhism, Jainism, and Lokayata, and establishing the Kevaladvaita (Absolute Monism) philosophy on a strong foundation, is considered the Acharya’s greatest contribution. There is no consensus among scholars regarding his period. However, his era is generally considered to be from 788 CE to 820 CE.
Adi Shankaracharya was born in a village named Kalady, near the town of Aluva in Kerala. His lineage belonged to the Nampoothiri (Nambudri) Brahmins of the Krishna Yajurveda’s Taittiriya Shakha. As matters like his birth and period are debated, his scriptures are considered his true biography, and his life story is recounted in the following shloka: ‘Ashtavarshe Chaturvedi Dvadashye Sarvashastravid. Shodashe Kritavan Bhashyam Dvatrimshe Munirabhyagat.’ This means: ‘At the age of eight, he mastered all four Vedas; at twelve, he became proficient in all scriptures; at sixteen, he composed commentaries on the Prasthanatrayi; and at thirty-two, he attained Mahaprasthana (final departure).’ The Prasthanatrayi comprises the Srimad Bhagavad Gita, the Upanishads, and the Brahma Sutras. Adi Shankaracharya is known as a great commentator on these texts, the proponent of Kevaladvaita philosophy – which states that the one attributeless Brahman alone is real, the individual soul is not different from it, and all other existence is illusory – and a transformative Vedantin who advocated religious reform with profound words like, ‘There is no rule that one should be foolish simply because one’s ancestors were foolish’ (Nahi purvojo mudha asitityatmani mudhena bhavitavyamiti kinchidasti pramanam – Brahma Sutra 2.1.11). During his 32 years of life, the Acharya wrote approximately 400 minor treatises in addition to his commentaries on the Prasthanatrayi. The stotras composed by him, such as ‘Dakshinamurti Stotram’, ‘Harim Ide’, ‘Anandalahari’, and ‘Saundaryalahari’, are particularly famous. To ensure the continuous propagation of his philosophy, he established Mathams in all four directions of India: Badrinath, Dwarka, Jagannath Puri, and Sringeri. In addition to these four Mathams, he also established the Sumer Math in Kashi and the Kanchi Kamakoti Peetham. Adi Shankaracharya appointed authoritative pontiffs (Peethadhishas) to these Mathams. That tradition continues to this day.
In the country, there are only a few temples where Adi Shankaracharya is the principal deity. Among them, the temples at Kalady (his birthplace), Kanchipuram, and Enathur are famous. The temple at Shankara Matham in Matunga is one of them. The story of the establishment of this Matham is told as follows: Subramanya Shastrigal was a Vedic scholar from Chennai. He was a supreme devotee of Adi Shankaracharya. In 1939, he came to Mumbai for his livelihood. Here, as a Vedic scholar, he performed various religious rituals for people. During this period, he repeatedly began to have visionary dreams of Adi Shankaracharya. Through these dreams, Adi Shankaracharya was inspiring him to impart the teachings of the Vedas, Upanishads, and Dharma Shastras to people and to establish a center. Disturbed by these visions, Subramanya Shastrigal went to Kanchipuram in Tamil Nadu and met the then Shankaracharya of Kanchi Kamakoti Peetham, Shri Chandrashekarendra Saraswati Swami. At that time, the Swami advised him to start Vedic classes based on the Kevaladvaita philosophy propounded by Adi Shankaracharya. Accordingly, he established this Matham in Matunga in 1939. It is said that initially, the Vedic classes began in Subramanya Shastrigal’s house (Room No. 218, Mahavir Building). After the number of disciples grew, these classes were moved to a two-room house (Room No. 1-2, Mohan Mansion, currently Dhabawala Mansion). In 1954, some prominent individuals from the community came together and decided to construct a larger building for the Matham. Accordingly, the Srinivas Building in Matunga was purchased, and the Matham was established there.
In 1959, a noble gentleman named M. Venkataramayya offered a marble idol of Adi Shankaracharya to the Matham. This Matham houses a Banalinga, a Panchayatana set, and sandalwood Acharya-Padukas (sandals). These were gifted by the Shankaracharya of Kanchi Kamakoti Peetham, while the Shankaracharya of Sringeri Peetham provided the idol of Ganesha and a Shaligram for daily worship. On May 10, 1978, on the auspicious occasion of Akshaya Tritiya, the present temple was consecrated with its first Kumbhabhishekam performed by Shankaracharya Abhinava Sachchidananda Tirtha Swami of Dwarka Peetham. This temple is located on the second floor of the three-story Matham, which was constructed at a cost of millions of rupees. The facade of the temple is built in the South Indian temple style. The temple features a magnificent Rajagopuram. It has five sections, representing the five elements or Panchamahabhutas of the universe. This Gopuram is also referred to as Sthula Linga. It features images of Shivashankara, Vishnu, Brahma, and the essence of Shankara. On both sides of the Gopuram are Shankhanidhi and Padmanidhi. On the walls adjacent to the Gopuram (on the Salai Gopuram), in the upper right niches, there are images of Ganesha, Vyasa, and Agastya. To the left, in the upper niches (devakoshthas), are enshrined the idols of Murugan, Valli, and Devasena.
Upon entering the temple precincts, one is greeted by ten steps directly ahead. Flanking these steps are the majestic idols of the elephant kings, Airavat and Pushpadant. Beside them are the images of Vayu and Varun, representing the West and Southwest directions respectively. Within the courtyard, to the right, are beautifully adorned shrines dedicated to Varsiddhi Vinayak, and to the left, to Anjaneya (Hanuman). Ascending these steps leads one into the Ardhamandapa of the temple. Directly ahead, on the wall, is a magnificent bas-relief depicting Lord Shri Krishna imparting the Gita Upadesha to Arjuna on the battlefield of Kurukshetra. Here, within a glass casing, is enshrined the idol of Ashtabhuja Durga Devi. From here, to the left, is a flight of 22 steps. Ascending these steps leads one into the Mahamandapa of the temple. On the lintel above the entrance to the Mahamandapa are 36 lotus motifs. Each of these lotus motifs has 36 petals. This entrance is known as ‘Torana Vasal’. In the Sankhya Darshana of Hindu Dharma, 24 tattvas (principles) of Dharma are expounded. The Puranas speak of 30 tattvas, while the Kashmiri Shaiva Agamas enumerate a total of 36 tattvas. These tattvas include Shiva, Shakti, Sadashiva, Ishwara, Shuddhavidya, Maya, Kala, Vidya, Kala, Purusha, Prakriti, Buddhi, Mahabhute, and others. These 36 lotus blossoms symbolize these 36 tattvas.
The Mahamandapa of the temple is spacious and adorned with marble flooring. On both sides of the Mahamandapa, there are five pillars each. Upon them are enshrined the idols of Dattatreya, Narayan, Padmodbhava, Vasistha, Shakti, Parashar, Vyas, Shuk, Gaudapada, and Govinda Bhagavatpada. This represents the Guru Parampara (lineage of preceptors) of Adi Guru Shankaracharya. On the walls of the Mahamandapa, significant events from the life of Shankaracharya are depicted in paintings. On the ceiling (vitan), there is a mythical lotus with 1008 petals. At its center is a Bindukon (a point or dot). This is considered the abode of Adi Parashakti. Ahead, on a tall and broad Adhishthana (pedestal), is the Garbhagriha (sanctum sanctorum) of the temple. One enters this Adhishthana by ascending five steps. On both sides of the entrance to this South Indian style Garbhagriha are traditional Dwarapalas (gatekeepers). Above the entrance is an image of Swarnalakshmi. Here, on both sides, are large idols of two Dwarasevakas (attendants). Inside, on a tall marble altar (vedi), is enshrined the idol of Jagadguru Adi Shankaracharya in a serene posture, adorned in saffron robes (kashayavastra). This idol is sculpted from white marble. In front of the altar is a small structure resembling a snow-capped peak, upon which a Shivalinga is enshrined. Further ahead, a small Panchadhatu (five-metal alloy) idol of Shankaracharya is enshrined. Adjacent to the altar, on a high platform, is an idol of Shiva in his Nataraja form. In the circumambulatory path (prakara) outside the Garbhagriha, there are small shrines housing idols of Ganesha, Shakti, Surya, Vishnu, Dakshinamurti, and Kartikeya, sculpted according to Agama Shastras. The sacred water (tirtha) from the abhisheka performed for all these deities flows back into the Garbhagriha. It then circumambulates the Shivalinga and the idol of Adi Shankaracharya there, before exiting through a Gomukha (cow’s mouth spout). On the wall at the rear of the Garbhagriha, along with images of Adi Shankaracharya and Devi Sharadamba of the Sringeri Sharada Peetha, large portraits of all Shankaracharyas who have visited this temple to date are displayed.
Devotees can have Darshan of the idol of Adi Shankaracharya in this temple daily from 5:30 AM to 11 AM and from 4:30 PM to 9 PM. The temple’s Pratisthapana Day (consecration anniversary) is celebrated on Akshaya Tritiya. This day commences with Suryanamaskara (sun salutations). Following this, Kalashabhisheka (ablution with sacred water from a pot) is performed for the various deities in the temple. Rituals such as offering new garments (navavastra), archana (devotional offering), naivedya (food offering), and deepapradana (offering of lamps) are performed for them. Since 1941, an 11-day Shankar Jayanti Utsava (celebration of Shankaracharya’s birth anniversary) has been observed in this Matha-temple. During this period, a Maharudra (grand ritual dedicated to Lord Shiva) is performed here. The Jayanti (birth anniversary) and Vardhanti (ascension anniversary) celebrations of the Acharyas of the Kanchi and Sringeri Peethas are also observed in the temple. Festivals and celebrations such as Navaratri Utsava, Ram Navami, Skanda Shashti, Ganesh Chaturthi, Arudra Darshanam, Vaikuntha Ekadashi, Annabhishekam, and others are observed here according to Vedic traditions. During the Ram Navami Utsava, the Sanskrit Ramayana is recited here for nine days, from Pratipada to Navami. On Maha Shivaratri, four Yama Pujas are performed here from 4 PM in the evening until 6 AM the next morning. During these pujas, a large number of devotees are present in the temple.
Regular Veda and Sanskrit classes are conducted at this Matha. To date, over 5000 students have benefited from Vedic education here. Under the guidance of the Matha, approximately 39 students are studying Yajurveda and Samaveda at the Shri Vitthal Rukmini Veda Pathshala in Pandharpur. Their examinations are conducted through the ‘Veda Rakshan Nidhi Trust’ of the Kanchi Matha. This Matha also provides assistance to the Veda Sanrakshan Samiti in Palakkad, Kerala; the Shrauta Veda Pathshala in Deulgaon Raja, Maharashtra; the Yagneshwar Pratishthan Vedshastra Pathshala in Parbhani; the Rigveda Pathshala in Tamil Nadu; and Gurukulas in Kumbakonam, Parbhani, and Pune. Furthermore, the Matha provides a monthly pension of 5000 rupees to each of 31 Vedic Pandits and Agnihotris. Most of these Pandits are over 75 years of age. Annually, a Sanskrit scholar is honored with the ‘Adi Shankar Puraskar’. This award comprises a cash prize of one lakh rupees and a citation (manpatra). In addition to religious activities, the Matha provides medical assistance to the poor, food to many cancer patients in the city, and educational materials to needy children.
Useful Information
4 km from Dadar Railway Station
9 km from Mumbai Central Railway Station and ST Bus Stand
BEST bus service is available from many parts of the city
Private vehicles can reach the temple
Many options for accommodation and breakfast are available in the vicinity
श्रद्धावान हिंदुओं के लिए दक्षिणामूर्ति अथवा स्वयं शिवस्वरूप माने जाने वाले आदि शंकराचार्य भगवत्पाद को समर्पित मंदिर माटुंगा में स्थित है। दक्षिण भारतीय शैली में निर्मित श्री शंकर मठ में यह मंदिर स्थित है। 87 वर्ष पूर्व स्थापित इस मठ-मंदिर की विशेषता यह है कि आदि शंकराचार्य को मुख्य आराध्य देव मानने वाले यह भारत के गिने-चुने मंदिरों में से एक है। इसी प्रकार, यह एकमात्र ऐसा मंदिर है जहाँ कांची और श्रृंगेरी पीठ के शंकराचार्य प्रतिवर्ष दर्शन हेतु पधारते हैं। मुंबई में वैदिक संस्कृति का संरक्षण करने वाले इस मंदिर-मठ में वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित होते रहते हैं।
हिंदू धर्म के शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य और कौमार (कार्तिकेय की उपासना करने वाला पंथ) इन छह हिंदू पंथों के अनुयायियों को एकत्रित करने का लोकसंग्राहक महत कार्य सिद्ध करने वाले ‘षण्मठस्थापकाचार्य’ के रूप में आद्य शंकराचार्य का गौरव किया जाता है। उन्होंने आदित्य, अंबिका, विष्णु, गणनाथ और महेश्वर इन तत्कालीन पाँच लोकप्रिय देवताओं की एक साथ पूजा करने का समन्वयी मार्ग पंचायतन पूजा के माध्यम से दर्शाया। सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा जैसे ‘आस्तिक’ तथा बौद्ध, जैन, लोकायत जैसे ‘नास्तिक’ दर्शनों का व्यवस्थित खंडन कर केवलाद्वैत तत्त्वज्ञान को सुदृढ़ आधार पर स्थापित करना, यह आचार्यों का सबसे बड़ा योगदान माना जाता है। उनके कार्यकाल के विषय में विद्वानों में एकमत नहीं है। किंतु सामान्यतः ई.स. 788 से 820 का काल उनका माना जाता है।
आद्य शंकराचार्य का जन्म केरल के अलवाये शहर के निकट कालडी नामक ग्राम में हुआ था। उनका कुल कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखा के नंपूतिरी (नंबुद्री) ब्राह्मणों का था। उनका जन्म, कार्यकाल आदि विषय विवादास्पद होने के कारण उनके ग्रंथ ही उनका वास्तविक जीवनचरित्र माने जाते हैं और निम्नलिखित श्लोक में उनका चरित्र बताया जाता है। – ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद । षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात।।’ इसका अर्थ है कि ‘आठवें वर्ष में चारों वेदों का अध्ययन, बारहवें वर्ष में सभी शास्त्रों का ज्ञान, सोलहवें वर्ष में प्रस्थानत्रयी पर भाष्य तथा बत्तीसवें वर्ष में महाप्रस्थान।’ श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद और ब्रह्मसूत्र मिलकर प्रस्थानत्रयी बनते हैं। उन पर महान भाष्यकार, केवलाद्वैत अर्थात् एक ही निर्गुण ब्रह्म सत्य है, जीवात्मा उससे भिन्न नहीं है और अन्य समस्त विश्व मिथ्या है – इस तत्त्वज्ञान के प्रवर्तक तथा ‘पूर्वज मूर्ख था इसलिए हमें भी मूर्ख होना चाहिए ऐसा कोई नियम नहीं है’ (नहि पूर्वजो मूढ आसीदित्यात्मनि मूढेन भवितव्यमिति किंचिदस्ति प्रमाणम् – ब्रह्मसूत्र २.१.११) ऐसे मार्मिक शब्दों में धर्मसुधारवाद का प्रतिपादन करने वाले युगकर्ता वेदान्ती के रूप में आद्यशंकराचार्य जाने जाते हैं। अपने 32 वर्षों के जीवनकाल में आचार्यों ने प्रस्थानत्रयी पर भाष्यों के अतिरिक्त लगभग 400 स्फुट ग्रंथ लिखे। ‘दक्षिणामूर्ति स्तोत्र’, ‘हरिमीडे’, ‘आनंदलहरी’, ‘सौंदर्यलहरी’ ये उनके द्वारा रचित स्तोत्र विशेष रूप से प्रसिद्ध हैं। अपने तत्त्वज्ञान की परंपरा अखंड रूप से चलती रहे, इसके लिए उन्होंने बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी और श्रृंगेरी ऐसे भारत की चारों दिशाओं में मठ स्थापित किए। इन चार मठों के अतिरिक्त उन्होंने काशी के सुमेर मठ तथा कांची के कामकोटिपीठ की भी स्थापना की थी। इन मठों पर आद्य शंकराचार्य ने अधिकारी पीठाधीश नियुक्त किए। वह परंपरा आज भी कायम है।
देश में आदि शंकराचार्य को आराध्य देव मानने वाले गिने-चुने मंदिर हैं। उनमें शंकराचार्य का जन्मस्थान कालडी, कांचीपुरम् तथा एनाथूर स्थित मंदिर प्रसिद्ध हैं। माटुंगा स्थित शंकर मठ का मंदिर उनमें से एक है। इस मठ की स्थापना की कथा इस प्रकार बताई जाती है कि सुब्रमण्य शास्त्रीगल चेन्नई के एक वैदिक पंडित थे। वे आदि शंकराचार्य के परम भक्त थे। सन् 1939 में वे आजीविका हेतु मुंबई आए। यहाँ वे वैदिक पंडित के रूप में लोगों से विविध धार्मिक विधि-विधान संपन्न करवाते थे। इस काल में उन्हें बार-बार आदि शंकराचार्य के स्वप्नदृष्टांत होने लगे। वेद, उपनिषद और धर्मशास्त्र की शिक्षा लोगों को देनी चाहिए, एक केंद्र आरंभ करने की प्रेरणा इन स्वप्नों के माध्यम से आदि शंकराचार्य उन्हें दे रहे थे। इन दृष्टांतों से व्यथित होकर सुब्रमण्य शास्त्रीगल ने तमिलनाडु के कांचीपुरम् जाकर कांची कामकोटि पीठ के तत्कालीन शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी से भेंट की। उस समय स्वामीजी ने उन्हें आदि शंकराचार्य द्वारा प्रतिपादित केवलाद्वैत तत्त्वज्ञान पर आधारित वेदवर्ग आरंभ करने का परामर्श दिया। तदनुसार उन्होंने 1939 में माटुंगा में इस मठ की स्थापना की। ऐसा बताया जाता है कि सर्वप्रथम सुब्रमण्य शास्त्रीगल के घर में (कमरा क्र. 218, महावीर बिल्डिंग) वेदवर्ग का प्रारंभ हुआ था। शिष्यसंख्या बढ़ने के उपरांत यह वर्ग दो कमरों के घर में (कमरा क्र. 1-2, मोहन मेंशन। वर्तमान धाबावाला मेंशन) स्थानांतरित किया गया। सन् 1954 में समाज के कुछ प्रतिष्ठित व्यक्तियों ने एकत्र होकर मठ के लिए एक बड़ी इमारत बनाने का निश्चय किया। तदनुसार माटुंगा स्थित श्रीनिवास इमारत खरीदकर वहाँ इस मठ की स्थापना की गई।
सन् 1959 में एम. वेंकटरमैया नामक सज्जन ने मठ को आदि शंकराचार्य की संगमरमरी प्रतिमा अर्पित की। इस मठ में बाणलिंग, पंचायतन तथा चंदन की आचार्य-पादुकाएँ हैं। वे कांची कामकोटि पीठ के शंकराचार्य ने प्रदान कीं, जबकि श्रृंगेरी पीठ के शंकराचार्य ने यहाँ की गणपति प्रतिमा और दैनिक पूजा के लिए शालिग्राम प्रदान किया। 10 मई 1978 को अक्षय्य तृतीया के शुभ मुहूर्त पर द्वारका पीठ के शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद तीर्थ स्वामी के कर-कमलों द्वारा प्रथम कुंभाभिषेक संपन्न कर, वर्तमान मंदिर का लोकार्पण किया गया। लाखों रुपये खर्च कर निर्मित तीन मंजिला मठ के द्वितीय तल पर यह मंदिर स्थित है। मंदिर का अग्रभाग दक्षिण भारतीय मंदिर शैली में निर्मित है। मंदिर में एक भव्य राजगोपुर है। उसमें विश्व के पाँच तत्त्वों अथवा पंचमहाभूतों का प्रतिनिधित्व करने वाले पाँच भाग हैं। इस गोपुर को स्थूल लिंग भी कहा जाता है। उसमें शिवशंकर, विष्णु, ब्रह्मा और शंकरतत्त्वों की प्रतिमाएँ हैं। गोपुर के दोनों ओर शंखनिधि और पद्मनिधि हैं। गोपुर के पार्श्व में स्थित दीवारों पर (सालाई गोपुर पर) दाहिनी ओर के ऊपरी देवकोष्ठों में गणपति, व्यास और अगस्त्य की प्रतिमाएँ हैं, वहीं बाईं ओर के ऊपरी देवकोष्ठों में मुरुगन, वल्ली और देवसेना की प्रतिमाएँ हैं।
मंदिर के प्रांगण में प्रवेश करते ही सामने ही दस सीढ़ियाँ हैं। इन सीढ़ियों के बगल में ऐरावत और पुष्पदंत नामक गजराजों की मूर्तियाँ हैं। उनके बगल में पश्चिम और नैऋत्य दिशाओं का प्रतिनिधित्व करने वाले वायु और वरुण की प्रतिमाएँ हैं। प्रांगण में दाईं ओर वरसिद्धी विनायक और बाईं ओर आंजनेय (हनुमान) के सुशोभित मंदिर हैं। इन सीढ़ियों पर चढ़कर मंदिर के अर्धमंडप में प्रवेश होता है। सामने ही दीवार पर, कुरुक्षेत्र में अर्जुन को गीतोपदेश देते हुए भगवान श्रीकृष्ण का भव्य उठावचित्र है। यहीं पर एक काँचपेटी में अष्टभुजा दुर्गादेवी की मूर्ति विराजमान है। यहाँ से बाईं ओर २२ सीढ़ियों का जीना है। उस पर चढ़कर मंदिर के महामंडप में प्रवेश होता है। महामंडप के प्रवेशद्वार पर स्थित शहतीर पर ३६ कमल हैं। उनमें से प्रत्येक कमल में ३६ पंखुड़ियाँ हैं। इस प्रवेशद्वार को ‘तोरण वासल’ कहा जाता है। हिंदू धर्म के सांख्य दर्शन में धर्म के २४ तत्त्व बताए गए हैं। पुराण ३० तत्त्व बताते हैं, वहीं कश्मीरी शैव आगम में कुल ३६ तत्त्व बताए गए हैं। इनमें शिव, शक्ति, सदाशिव, ईश्वर, शुद्धविद्या, माया, कला, विद्या, काल, पुरुष, प्रकृति, बुद्धि, महाभूत आदि तत्त्वों का समावेश होता है। ये ३६ कमलपुष्प इन ३६ तत्त्वों का प्रतिनिधित्व करते हैं।
मंदिर का महामंडप संगमरमरी फर्श वाला और विशाल स्वरूप का है। महामंडप के दोनों ओर प्रत्येक में पाँच स्तंभ हैं। उन पर दत्तात्रेय, नारायण, पद्मोद्भव, वसिष्ठ, शक्ति, पराशर, व्यास, शुक, गौडपाद और गोविंद भगवत्पाद की मूर्तियाँ हैं। यह आदिगुरु शंकराचार्य की गुरु परंपरा है। महामंडप की दीवारों पर शंकराचार्य के जीवन के महत्वपूर्ण प्रसंग चित्रित किए गए हैं। छत पर १००८ पंखुड़ियों वाला पौराणिक कमल है। उसके मध्य में बिंदुकोण है। उसे आदि पराशक्ति का निवास स्थान माना जाता है। सामने ऊँचे और चौड़े अधिष्ठान पर मंदिर का गर्भगृह है। पाँच सीढ़ियाँ चढ़कर इस अधिष्ठान में प्रवेश होता है। दाक्षिणात्य शैली के इस गर्भगृह के प्रवेशद्वार के दोनों ओर पारंपरिक द्वारपाल हैं। प्रवेशद्वार के ऊपरी भाग में स्वर्णलक्ष्मी की प्रतिमा है। यहाँ दोनों ओर दो द्वारसेवकों की बड़ी मूर्तियाँ हैं। अंदर ऊँची संगमरमरी वेदी पर जगद्गुरु आद्य शंकराचार्य की शांत मुद्रा में, काषायवस्त्र धारण किए हुए मूर्ति प्रतिष्ठित है। यह मूर्ति सफेद संगमरमर से निर्मित है। वेदी के आगे एक छोटी हिमशिखर जैसी संरचना है और उस पर शिवलिंग विराजमान है। उसके आगे शंकराचार्य की पंचधातु की छोटी मूर्ति विराजमान है। वेदी के पास ऊँचे चबूतरे पर शंकर की नटराज स्वरूप में मूर्ति है। गर्भगृह के बाहर के प्राकार में आगमशास्त्रों के अनुसार निर्मित गणेश, शक्ति, सूर्य, विष्णु, दक्षिणामूर्ति और कार्तिकेय की मूर्तियों वाले छोटे मंदिर हैं। इन सभी देवताओं को किए गए अभिषेक का तीर्थ पुनः गर्भगृह में जाता है। वहाँ के शिवलिंग और आदि शंकराचार्य की मूर्ति की प्रदक्षिणा कर वह गोमुख द्वारा बाहर आता है। गर्भगृह के पीछे की दीवार पर आदि शंकराचार्य, श्रृंगेरी शारदा पीठ की देवी शारदाम्बा की प्रतिमाओं के साथ ही इस मंदिर में अब तक दर्शन करने आए सभी शंकराचार्यों की बड़ी तस्वीरें लगाई गई हैं।
इस मंदिर में श्रद्धालु रोज सुबह ५:३० बजे से ११ बजे तक और शाम ४:३० बजे से रात ९ बजे तक आद्य शंकराचार्य की मूर्ति के दर्शन कर सकते हैं। अक्षय तृतीया को मंदिर प्रतिष्ठापना दिवस मनाया जाता है। इस दिन का प्रारंभ सूर्यनमस्कार से होता है। इसके बाद मंदिर में विभिन्न देवताओं को कलशाभिषेक किया जाता है। उन्हें नववस्त्र, अर्चना, नैवेद्य और दीपप्रदान के विधि किए जाते हैं। सन् १९४१ से इस मठ-मंदिर में ११ दिवसीय शंकर जयंती समारोह मनाया जाता है। इस दौरान यहाँ महारुद्र किया जाता है। मंदिर में कांची और श्रृंगेरी पीठ के आचार्यों का जयंती और वर्धंती समारोह भी मनाया जाता है। नवरात्रोत्सव, साथ ही रामनवमी, स्कंद षष्ठी, गणेश चतुर्थी, अरुद्र दर्शनम, वैकुंठ एकादशी, अन्नाभिषेकम आदि पर्व और उत्सव वैदिक पद्धति से मनाए जाते हैं। रामनवमी उत्सव में प्रतिपदा से नवमी तक नौ दिनों तक यहाँ संस्कृत रामायण का पाठ किया जाता है। महाशिवरात्रि को यहाँ शाम ४ बजे से सुबह ६ बजे तक चार यमपूजाएँ की जाती हैं। इन पूजाओं के समय मंदिर में बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहते हैं।
इस मठ में नियमित रूप से वेद और संस्कृत कक्षाएँ आयोजित की जाती हैं। यहाँ से अब तक ५००० से अधिक छात्रों ने वेद शिक्षा का लाभ उठाया है। मठ के मार्गदर्शन में पंढरपुर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाला में लगभग ३९ छात्र यजुर्वेद और सामवेद की शिक्षा प्राप्त कर रहे हैं। उनकी परीक्षाएँ कांची मठ के ‘वेद रक्षण निधि ट्रस्ट’ के माध्यम से ली जाती हैं। यह मठ केरल के पालक्कड़ स्थित वेद संरक्षण समिति, महाराष्ट्र के देऊळगाँव राजा स्थित श्रौत वेद पाठशाला, परभणी स्थित यज्ञेश्वर प्रतिष्ठान वेदशास्त्र पाठशाला, तमिलनाडु की ऋग्वेद पाठशाला और कुंभकोणम, परभणी व पुणे स्थित गुरुकुलों को भी सहायता प्रदान करता है। इसके अतिरिक्त, मठ की ओर से ३१ वैदिक पंडितों और अग्निहोत्रियों को प्रत्येक को ५००० रुपये मासिक निवृत्तिवेतन दिया जाता है। इनमें से अधिकांश पंडित ७५ वर्ष से अधिक आयु के हैं। प्रतिवर्ष एक संस्कृत विद्वान को ‘आदि शंकर पुरस्कार’ प्रदान किया जाता है। इस पुरस्कार में एक लाख रुपये नकद और मानपत्र प्रदान किया जाता है। धार्मिक कार्यों के अतिरिक्त, मठ की ओर से गरीबों को चिकित्सा सहायता, शहर के कई कैंसर पीड़ितों को भोजन और जरूरतमंद बच्चों को शैक्षणिक सामग्री उपलब्ध कराई जाती है।
उपयोगी जानकारी
दादर रेलवे स्टेशन से ४ किमी की दूरी पर
मुंबई सेंट्रल रेलवे स्टेशन और एसटी बस स्टैंड से ९ किमी की दूरी पर
शहर के कई हिस्सों से बेस्ट बस की सुविधा उपलब्ध है
निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
परिसर में आवास और नाश्ते के लिए कई विकल्प उपलब्ध हैं
संपर्क : मंदिर कार्यालय, दूरभाष : ०२२-२४०१४३९७ मो. ७७३८६७४३९७, ७७३८४१३१२९