कुंवारा भीवसन / भीमालपेन

भीवगड, ता. पारशिवनी, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात असलेल्या नवेगावखैरी येथील पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या काठावर कुंवारा भीवसन हे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान देशभरातील गोंड परधान (गोंड जातीतील एक उपप्रकार) समाजाचे आराध्य दैवत असून भीमालपेन (पेन म्हणजे देव) या नावाने ते जास्त परिचित आहे. चैत्र पौर्णिमेपासून पुढे सव्वा महिने चालणाऱ्या येथील यात्रेच्या वेळी भीमालपेनच्या दर्शनासाठी संपूर्ण विदर्भासह, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच आंध्र प्रदेशमधूनही गोंड आदिवासी तसेच गैरआदिवासी भाविकही येतात.

कुंवारा भीवसन मंदिराची आख्यायिका अशी की राजा भुरा आणि राणी कोतमा या दाम्पत्याचे भीमा हे पुत्ररत्न. भीमा यांना भाऊ आणि बहिणी होत्या. घोटुल (एक प्रकारचे गुरुकुल, विद्यापीठ) येथे राहून भीमा यांनी उत्तम शिक्षण घेतले ते सर्वगुण संपन्न अस्त्रशस्त्र पारंगत झाले. त्यांनी आपल्या हुशारीमुळे सर्व विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना जुळ्या आतेबहिणी होत्या. त्याही दैवी अवतार होत्या. त्यांची नावे बम्बलाई (बम्ब्लेश्वरी देवी) आणि तिलकाई (कोराडीची देवी) अशी होत. त्यांच्या आईवडिलांनी राजा भुरा यांच्याजवळ भीमा आणि बम्बलाईच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला; परंतु भीमांना मात्र विवाहबंधनात अडकता समाजकार्य करायचे होते. भीमांना पाहिल्यावर तिलकाई हिलाही त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली. तिनेही आईवडिलांकडे भीमांशीच लग्न लावून देण्याचा हट्ट धरला.

दोघीही भीमांशी लग्न करण्यासाठी तयार होत्या; परंतु भीमांनी त्या दोघींनाही एक अट घातली की फिरतीवर असताना वर्ष पूर्ण होण्याआधी दोघींनी त्यांना शोधून काढले तर ते त्यांच्याशी लग्न करतील, अन्यथा अविवाहित राहतील त्याही कुमारिका राहतील. तिघांनाही हा प्रस्ताव मान्य झाला. त्याप्रमाणे भीमांना शोधण्यास त्या दोघी डोंगरगडपर्यंत गेल्या. डोंगर चढून थकल्यामुळे बम्बलाई तिथेच थांबली, पण तिलकाई मात्र भीमांचा शोध घेत पुढे निघाली. तोपर्यंत भीमा नांदपूर राज्यात पोहोचले होते. तिलकाईला भ्रमित करून ते एका पहाडावर ध्यानस्थ बसलेएक वर्ष होऊन गेल्यामुळे भीमा अविवाहितच राहिले त्यामुळे त्यांना कुंवारा भीवसन नाव प्राप्त झाले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, नांदपूर राज्यात एका डोंगरावर भीमा ध्यानधारणा करत असत. त्यावेळी तेथे उईका नावाचा राजा राज्य करीत होता. काही घटनांमुळे या राजाला भीमांकडे असलेल्या अलौकिक शक्तींचा अनुभव आला होता. नांदपूर राज्य हे सुखसमृद्धीने भरलेले असले तरी येथील राजा राणी कजला यांच्यापोटी संतान नसल्यामुळे ते उदास राहत असत. भीमाने राणीला आशीर्वाद दिला की तुला पुत्ररत्न होईल. त्यानंतर काहीच दिवसांनी ती गर्भवती झाली. भीमांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरतोय हे पाहून ती राणी दररोज भीमा जेथे तपसाधना करीत तेथील गडावर जाऊन त्यांचे दर्शन घेऊ लागली. गर्भवती असताना गडावर चढउतार करणे राणीला कठीण होऊ लागल्याने राजाने गडाच्या पायथ्याशी राणीला महाल बांधून दिला.

प्रसूतीकाळ जसजसा जवळ येऊ लागला तसे राणीला गड चढणे कठीण होऊ लागले. त्यासाठी तिने भीमांना आपल्यासोबत खाली येण्याची विनंती केली. भीमाने राणीची ही विनंती स्वीकारूनतू आलीस त्याच्या विरुद्ध दिशेने खाली जा, पण मागे वळून बघू नकोसअशी तिला अट घातली. राणी खाली आल्यावर भीमांनी विक्राळ रूप धारण केले पावले टाकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विजांचा कडकडाट होऊ लागला पाऊस पडू लागला. तेव्हा तिने घाबरून मागे पाहिले असता भीमांचे विक्राळ रूप तिला दिसले. ते पाहून ती मूर्च्छित पडली तेथेच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. भीमांनी दिलेली अट राणीने मोडल्यामुळे ते तेथेच अदृश्य झाले. त्या पावलांच्या खुणा आजही येथे दाखविल्या जातात. जिथे भीमा अदृश्य झाले तेथेच भाविकांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली.

कुंवारा भीवसन ऊर्फ भीमा ऊर्फ भीमालपेन एक अवतारी पुरुष असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. पेंच नदीच्या प्रवाहापासून जवळच कुंवारा भीवसन देवस्थान आहे. सध्या हे देवस्थान त्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी गर्भगृह असून त्यामध्ये कुंवारा भीवसन यांची सुमारे फूट उंचीची मूर्ती आहे. सभामंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराचे एक प्रवेशद्वार नदीकडे, तर एक गावाकडच्या बाजूला आहे. मंदिराच्या एका बाजूला असलेल्या जंगलात राणी महल आहे. हेच कजला राणीचे विश्रामगृह म्हणून ओळखले जाते. सध्या ही वास्तू पेंच धरणाच्या पाण्याने वेढलेली असून याच्या आजूबाजूस गोंड समाजाची वस्ती आहे. हे स्थानभीमगडम्हणून प्रसिद्ध आहे.

भीमालपेन यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाल्यामुळे पौर्णिमेपासून सव्वा महिना या देवस्थानाची यात्रा असते. या यात्रेसाठी गोंडाच्या सर्व पाडी (गोत्र) परधान जमातीचे हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी भाविकांसोबत पर्यटकही मोठ्या संख्येने येथे येतात. उत्सवकाळात भीमालपेन यांची पालखी नाचविली जाते. त्यानंतर सप्तरंगी झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते. या कालावधीत दररोज सकाळी सायंकाळी वाजता आरती होते. पंचमीच्या दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतात. रात्री ते १० वाजेपर्यंतखापरीनावाचे गोंडी नृत्य सादर केले जाते. हा देव नवसाला पावतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक भाविक यात्रा काळात येथे नवसपूर्तीसाठी येतात. मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची तेथे राहण्याची सोय करण्यात येते. या देवस्थानाला राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला आहे.

उपयुक्त माहिती:

  • पारशिवनीपासून १८ किमी, तर नागपूरपासून ५३ किमी अंतरावर
  • रामटेक, मानसर, पारशिवनीपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात भक्त निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home