महादेव मंदिर
उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव
भारतात चालुक्य राजवंशाची सत्ता जवळपास ६०० वर्षे टिकली. या काळात त्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणांसोबत मंदिर स्थापत्यकलेचा विकास केला. त्यांनी बांधलेली मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. चालुक्यांनी बांधलेल्या प्रसिद्ध मंदिरांत पट्टडक्कल येथील विरूपाक्ष मंदिर, येहोले येथील लाड खान मंदिर, एलोरा येथील रामेश्वर, धर्मापुरी येथील केदारेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कंकाळेश्वर मंदिर आदी मंदिरांचा सामावेश होतो. याच पठडीतील एक चालुक्यकालीन प्रसिद्ध मंदिर उमरगा येथे आहे. तीन गर्भगृहे व तीन मुख्य देवता असलेले हे शिल्पांकित मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
हे मंदिर चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या कार्यकाळात बांधले गेले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शैव वैष्णव वादावर समेट घडवण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. त्रिगुणात्मक त्रिदेव एकच आहेत, हे या मंदिराच्या रचनेतून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असे सांगितले जाते. या तारकाकृती मंदिरातील शिल्पकला, सभामंडपातील अष्टदिक्पाल मूर्ती, तीन अंतराळ व गर्भगृहांची रचना अनोखी आहे.
उमरगा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात दोन चौथरे व त्यांवर गोलाकार दीपमाळा आहेत.
दोन्ही दीपमाळांच्या मधल्या चौथऱ्यावर नाग युगुल शिल्प, नंदी व शिवपिंडी आहेत. प्रांगणात डेरेदार वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिरालगत मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी डावीकडील मंदिरात गणेशमूर्ती व उजवीकडे देवीची मूर्ती आहे. महादेवाचे हे मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी सहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी चौथऱ्यांच्या स्वरूपात सुरक्षाकठडे आहेत. सुरक्षाकठड्यावर पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला शिल्पे आहेत.
मुखमंडपाच्या प्रवेशद्वारास दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ, त्यावर अर्धचंद्राकार शिला, त्यावर मध्यभागी ललाटबिंब व ललाटपट्टीवर शिल्पे कोरलेली आहेत. मुखमंडपात असलेली ही रचना दुर्मिळ व अनोखी आहे. मुखमंडपात दोन्ही बाजूला कक्षासनांची रचना आहे. पुढे सभामंडपाचे पाच शाखीय प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास सिंहशाखा, गजशाखा, शुकशाखा, अश्वशाखा व पुष्पशाखा आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगेवर मकरतोरण आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे स्तंभ व त्यावरील हस्त आणि तुळईंवर नक्षीकाम आहे. सभामंडपात पुढील चार स्तंभांच्या मधील जागेत रंगशिला आहे. येथे एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथील वितानावर अष्टदिक्पाल शिल्पे आहेत. येथील स्तंभ व तुळईवर कीर्तीमुखे व सप्तमातृका शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात शिवतांडव शिल्पे आहेत. सभामंडपाच्या भिंतीतील देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपापुढे तीन अंतराळ व तीन गर्भगृहे आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. अंतराळाच्या डाव्या व उजव्या बाजूला देवकोष्टके आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात शिवपिंडी आहे.
येथील अंतराळातील देवकोष्टकांत बसवप्पा व संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पुष्पशाखा, वेलबुट्टीशाखा, स्तंभशाखा, पर्णलताशाखा व पुष्पलताशाखा आहेत. ललाटबिंबावरील उत्तरांगावर शिखर शिल्पे आहेत. नक्षीदार मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे.
डाव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालिका शिल्पे व नक्षीदार द्वारशाखा आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. येथील प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर विष्णूची चतुर्भुज उठाव शैलीतील मूर्ती व शिवपिंडी आहे. मंदिरातील उजव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास उभ्या धारेच्या नक्षी असलेल्या द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वारास पाच नक्षीदार द्वारशाखा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर ब्रह्मदेवाची मूर्ती व बाजूला शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा व मध्यभागी शिवपिंडीची विशाल प्रतिकृती आहे. हे मंदिर पंचरथ प्रकारचे आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सलग आठ दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील सर्व सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- उमरगा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
- धाराशिव जिल्ह्यातील अनेक शहरांतून उमरग्यासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Mahadeva Temple
Omerga, Taluka Omerga, District Dharashiv
The rule of the Chalukya dynasty lasted in India for nearly six hundred years. During this period, along with social and economic reforms, they developed temple architecture. The temples built by them are in a good state of preservation even today. Among the famous temples built by the Chalukyas are the Virupaksha Temple at Pattadakal, the Lad Khan Temple at Aihole, the Rameshwar at Ellora, the Kedareshwar at Dharmapuri, Aundha Nagnath in Hingoli district, and the Kankaleshwar Temple, amongst others. A famous temple of the Chalukyan era belonging to this very tradition is located at Omerga. This sculpted temple, featuring three sanctums (garbhagrihas) and three principal deities, is considered unique.
Scholars believe that this temple was built during the reign of the Chalukya Emperor Pulakeshin II. It represents a unique attempt to reconcile the conflicts between Shaivism and Vaishnavism. It is said that the architectural design of this temple was an effort to demonstrate that the Trigunatmak Trinity is fundamentally one. The sculpture in this star-shaped temple, the sculptures of the Ashta Dikpala (guardians of the eight directions) in the assembly hall (sabhamandapa), and the unique arrangement of the three vestibules (antaralas) and sanctums are remarkable.
In the courtyard of this temple, situated in the central part of Omerga city, there are two raised platforms featuring circular lamp towers (deepamalas).
On the platform between the two lamp towers, there is a sculpture of intertwined serpents (Naga Yugula), Nandi, and a Shiva Linga. The courtyard has shady trees and seating arrangements for devotees. Adjacent to the temple, on both sides of the entrance porch (mukhamandapa), there are two small shrines; the one on the left houses the idol of Lord Ganesha and the one on the right houses the idol of the Goddess. This Mahadeva temple stands on a raised platform (jagati) about four feet high. The structure of the temple comprises a mukhamandapa, a sabhamandapa, antaralas, and garbhagrihas. There are six steps to go from the mukhamandapa into the sabhamandapa. On both sides of these steps, there are protective balustrades in the form of stone platforms adorned with sculptures on either side of the stairway.
On both sides of the entrance to the mukhamandapa are two ornate pillars, above which lies a semi-circular stone slab, featuring the central deity emblem (lalatbimba) and sculptures carved on the lintel band (lalatpatti). This architectural feature in the mukhamandapa is rare and unique. The mukhamandapa has stone bench seats (kakshasanas) on both sides. Further ahead is the five-fold entrance (pancha-shakha praveshdwara) of the sabhamandapa, which includes the lion band (simhashakha), elephant band (gajashakha), parrot band (shukashakha), horse band (ashvashakha), and floral band (pushpashakha). The lalatbimba features the image of Goddess Gajalakshmi, and the architrave above it bears a makara-torana (decorative arch).
The enclosed sabhamandapa contains four rows of four ornate pillars each. These pillars, along with their brackets and beams, are exquisitely carved. In the space between the front four pillars of the sabhamandapa is the central ritual floor slab (rangashila). Here, on a raised platform, sits a black stone idol of Nandi. The ceiling features Ashta Dikpala sculptures. Kirtimukhas and Sapta Matrika sculptures are carved on the pillars and beams. The sabhamandapa also features sculptures of Shiva Tandava. The wall niches (devakoshthakas) of the sabhamandapa contain idols of various deities.
Ahead of the sabhamandapa are three antaralas and three garbhagrihas. The entrance to the antarala features ornate door jambs (dwarashakhas) and a moonstone (chandrashila) at the threshold (mandarka). There are wall niches on the left and right sides of the antarala. The central main sanctum houses a Shiva Linga.
The wall niches in the antarala here contain idols of Basaveshwara and Saint Tukaram. Both sides of the garbhagriha entrance feature guardian sculptures of Dwarpala and Dwarpalika. The entrance of the garbhagriha is adorned with a floral band (pushpashakha), creeper band (velbutti-shakha), pillar band (stambha-shakha), leaf-creeper band (parnalata-shakha), and flower-creeper band (pushpalata-shakha). The architrave above the lalatbimba features spire sculptures. The ornate threshold features a moonstone. In the center of the garbhagriha floor lies the Shiva Linga.
On both sides of the entrance to the left-side antarala, there are Dwarpalika sculptures and ornate door jambs, with a moonstone at the threshold. Both sides of the garbhagriha entrance feature Dwarpala and Dwarpalika sculptures. This entrance has five door jambs and a moonstone at the threshold. Inside the garbhagriha, against the back wall on a vajrapitha (diamond pedestal), are an embossed four-armed idol of Lord Vishnu and a Shiva Linga. The entrance to the right-side antarala of the temple features door jambs with vertical-edge carvings and a moonstone at the threshold. The entrance has five ornate door jambs. Inside the garbhagriha, on a vajrapitha, is an idol of Lord Brahma along with a Shiva Linga beside it. On the roof of the temple, there is a Bashingi railing running along all four sides, with a large replica of a Shiva Linga in the center. This temple is of the pancharatha architectural style.
Maha Shivaratri is the primary annual festival celebrated here with great enthusiasm. On this occasion, a Harinam Saptaha (seven-day chanting of the Lord’s name) is organized at the temple. For eight consecutive days, events such as bhajans, kirtans, discourses (pravachanas), and Mahaprasad are held. At this time, thousands of devotees from the surrounding region visit to have the darshan of the deity and to fulfill their vows (navas). A large crowd of devotees also gathers here on all Mondays of the holy month of Shravana.
Useful Information
- Five hundred meters away from Omerga Bus Stand
- ST (State Transport) bus services available to Omerga from many cities in Dharashiv district
- Private vehicles can reach up to the temple
- Numerous options for accommodation and breakfast available in the vicinity
महादेव मंदिर
उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव
भारत में चालुक्य राजवंश की सत्ता लगभग ६०० वर्षों तक टिकी रही। इस काल में उन्होंने सामाजिक और आर्थिक सुधारों के साथ-साथ मंदिर वास्तुकला का विकास किया। उनके द्वारा बनाए गए मंदिर आज भी अच्छी स्थिति में हैं। चालुक्य द्वारा निर्मित प्रसिद्ध मंदिरों में पट्टदकल का विरुपाक्ष मंदिर, ऐहोल का लाड खान मंदिर, एलोरा का रामेश्वर, धर्मापुरी का केदारेश्वर, हिंगोली जिले का औंढा नागनाथ, कंकाळेश्वर मंदिर आदि मंदिरों का समावेश होता है। इसी श्रेणी का एक चालुक्यकालीन प्रसिद्ध मंदिर उमरगा में स्थित है। तीन गर्भगृहों और तीन मुख्य देवताओं वाले इस शिल्पान्वित मंदिर को अत्यंत विशिष्ट माना जाता है।
यह मंदिर चालुक्य सम्राट पुलकेशिन द्वितीय के कार्यकाल में बनाया गया था, ऐसा अभ्यासकों का मत है। यह शैव-वैष्णव विवाद पर समन्वय स्थापित करने का एक अनूठा प्रयास है। त्रिगुणात्मक त्रिदेव एक ही हैं, यह इस मंदिर की रचना से दर्शाने का प्रयास किया गया होगा, ऐसा बताया जाता है। इस ताराकृती (तारा आकार के) मंदिर की शिल्पकला, सभामंडप की अष्टदिक्पाल मूर्तियाँ, तीन अंतराल और गर्भगृहों की रचना अनूठी है।
उमरगा शहर के मध्यवर्ती भाग में स्थित इस मंदिर के प्रांगण में दो चबूतरे और उनपर गोलाकार दीपमालिकाएँ हैं।
दोनों दीपमालिकों के बीच के चबूतरे पर नाग युगुल शिल्प, नंदी और शिवपिंडी हैं। प्रांगण में छायादार वृक्ष और श्रद्धालुओं के बैठने के लिए आसन हैं। मंदिर के पास मुखमंडप के दोनों ओर दो छोटे मंदिर हैं। उनमें से बाईं ओर के मंदिर में गणेशमूर्ति और दाईं ओर देवी की मूर्ति है। महादेव का यह मंदिर लगभग चार फीट ऊँची जगती (प्लेटफ़ॉर्म) पर स्थित है। मुखमंडप, सभामंडप, अंतराल और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। मुखमंडप से सभामंडप में जाने के लिए छह सीढ़ियाँ हैं। इन सीढ़ियों के दोनों किनारों पर पत्थरों के चबूतरों के रूप में सुरक्षा कठघरे हैं। सुरक्षा कठघरे पर सीढ़ी मार्ग के दोनों ओर शिल्प बने हैं।
मुखमंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर दो नक्काशीदार स्तंभ, उस पर अर्धचंद्राकार शिला, उस पर मध्य में ललाटबिंब और ललाटपट्टी पर शिल्प उकेरे गए हैं। मुखमंडप में बनी यह रचना दुर्लभ और अनूठी है। मुखमंडप में दोनों ओर कक्षासन की रचना है। आगे सभामंडप का पाँच शाखाओं वाला प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार पर सिंहशाखा, गजशाखा, शुकशाखा, अश्वशाखा और पुष्पशाखा हैं। ललाटबिंब पर गजलक्ष्मी की मूर्ति और उसके ऊपर उत्तरांग पर मकरतोरण है।
बंद स्वरूप के सभामंडप में प्रत्येक चार नक्काशीदार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। इन स्तंभों और उनपर के हस्त तथा कड़ियों पर नक्काशी की गई है। सभामंडप में अगले चार स्तंभों के बीच की जगह में रंगशिला है। यहाँ एक चबूतरे पर नंदी की काले पाषाण की मूर्ति है। यहाँ की छत पर अष्टदिक्पाल शिल्प हैं। यहाँ के स्तंभों और कड़ियों पर कीर्तिमुख और सप्तमातृका शिल्प उकेरे गए हैं। सभामंडप में शिवतांडव शिल्प हैं। सभामंडप की दीवारों के देवकोष्टकों में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं।
सभामंडप के आगे तीन अंतराल और तीन गर्भगृह हैं। अंतराल के प्रवेश द्वार पर नक्काशीदार द्वारशाखा और मंदिर की देहरी पर चंद्रशिला है। अंतराल के बाएं और दाएं ओर देवकोष्टक हैं। बीच में स्थित मुख्य गर्भगृह में शिवपिंडी है।
यहाँ के अंतराल के देवकोष्टकों में बसवप्पा और संत तुकाराम की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपाल और द्वारपालिका शिल्प हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार पर पुष्पशाखा, वेलबुट्टीशाखा, स्तंभशाखा, पर्णलताशाखा और पुष्पलताशाखा हैं। ललाटबिंब के ऊपर के उत्तरांग पर शिखर शिल्प हैं। नक्काशीदार देहरी पर चंद्रशिला है। गर्भगृह में फर्श पर मध्य में शिवपिंडी है।
बाईं ओर के अंतराल के प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालिका शिल्प और नक्काशीदार द्वारशाखाएँ हैं। देहरी पर चंद्रशिला है। गर्भगृह के प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपाल और द्वारपालिका शिल्प हैं। यहाँ के प्रवेश द्वार पर पाँच द्वारशाखाएँ और देहरी पर चंद्रशिला है। गर्भगृह में पीछे की दीवार के पास वज्रपीठ पर विष्णु की चतुर्भुज उत्कीर्ण शैली की मूर्ति और शिवपिंडी है। मंदिर के दाईं ओर के अंतराल के प्रवेश द्वार पर सीधी धार की नक्काशी वाली द्वारशाखाएँ और देहरी पर चंद्रशिला है। प्रवेश द्वार पर पाँच नक्काशीदार द्वारशाखाएँ हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर ब्रह्मदेव की मूर्ति और बाजू में शिवपिंडी है। मंदिर की छत पर चारों ओर बाशिंगी कठघरा और मध्य में शिवपिंडी की विशाल प्रतिकृति है। यह मंदिर पंचरथ प्रकार का है।
महाशिवरात्रि यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव बहुत उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर मंदिर में हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। लगातार आठ दिनों तक मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन और महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवसर पर परिसर के हज़ारों श्रद्धालु भगवान के दर्शन के लिए और मन्नत पूरी होने पर उसे चुकाने (नवस फेडण्यासाठी) आते हैं। श्रावण मास के सभी सोमवारों को भी यहाँ श्रद्धालुओं की भीड़ होती है।
उपयुक्त जानकारी
- उमरगा बस स्टैंड से ५०० मीटर की दूरी पर
- धाराशिव जिले के अनेक शहरों से उमरगा के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
महादेव मंदिर
उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव
भारतात चालुक्य राजवंशाची सत्ता जवळपास ६०० वर्षे टिकली. या काळात त्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणांसोबत मंदिर स्थापत्यकलेचा विकास केला. त्यांनी बांधलेली मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. चालुक्यांनी बांधलेल्या प्रसिद्ध मंदिरांत पट्टडक्कल येथील विरूपाक्ष मंदिर, येहोले येथील लाड खान मंदिर, एलोरा येथील रामेश्वर, धर्मापुरी येथील केदारेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कंकाळेश्वर मंदिर आदी मंदिरांचा समावेश होतो. याच पठडीतील एक चालुक्यकालीन प्रसिद्ध मंदिर उमरगा येथे आहे. तीन गर्भगृहे व तीन मुख्य देवता असलेले हे शिल्पांकित मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
हे मंदिर चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या कार्यकाळात बांधले गेले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शैव वैष्णव वादावर समेट घडवण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. त्रिगुणात्मक त्रिदेव एकच आहेत, हे या मंदिराच्या रचनेतून दाखविण्याचा प्रयत्न केला असावा, असे सांगितले जाते. या तारकाकृती मंदिरातील शिल्पकला, सभामंडपातील अष्टदिक्पाल मूर्ती, तीन अंतराळ व गर्भगृहांची रचना अनोखी आहे.
उमरगा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात दोन चौथरे व त्यांवर गोलाकार दीपमाळा आहेत.
दोन्ही दीपमाळांच्या मधल्या चौथऱ्यावर नाग युगुल शिल्प, नंदी व शिवपिंडी आहेत. प्रांगणात डेरेदार वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मंदिरालगत मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी डावीकडील मंदिरात गणेशमूर्ती व उजवीकडे देवीची मूर्ती आहे. महादेवाचे हे मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून सभामंडपात जाण्यासाठी सहा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी चौथऱ्यांच्या स्वरूपात सुरक्षाकठडे आहेत. सुरक्षाकठड्यावर पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूला शिल्पे आहेत.
मुखमंडपाच्या प्रवेशद्वारास दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ, त्यावर अर्धचंद्राकार शिला, त्यावर मध्यभागी ललाटबिंब व ललाटपट्टीवर शिल्पे कोरलेली आहेत. मुखमंडपात असलेली ही रचना दुर्मिळ व अनोखी आहे. मुखमंडपात दोन्ही बाजूला कक्षासनांची रचना आहे. पुढे सभामंडपाचे पाच शाखीय प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास सिंहशाखा, गजशाखा, शुकशाखा, अश्वशाखा व पुष्पशाखा आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगेवर मकरतोरण आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. हे स्तंभ व त्यावरील हस्त आणि तुळईंवर नक्षीकाम आहे. सभामंडपात पुढील चार स्तंभांच्या मधील जागेत रंगशिला आहे. येथे एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथील वितानावर अष्टदिक्पाल शिल्पे आहेत. येथील स्तंभ व तुळईवर कीर्तीमुखे व सप्तमातृका शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपात शिवतांडव शिल्पे आहेत. सभामंडपाच्या भिंतीतील देवकोष्टकांमध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपापुढे तीन अंतराळ व तीन गर्भगृहे आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारास नक्षीदार द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. अंतराळाच्या डाव्या व उजव्या बाजूला देवकोष्टके आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात शिवपिंडी आहे.
येथील अंतराळातील देवकोष्टकांत बसवप्पा व संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास पुष्पशाखा, वेलबुट्टीशाखा, स्तंभशाखा, पर्णलताशाखा व पुष्पलताशाखा आहेत. ललाटबिंबावरील उत्तरांगावर शिखर शिल्पे आहेत. नक्षीदार मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे.
डाव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालिका शिल्पे व नक्षीदार द्वारशाखा आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व द्वारपालिका शिल्पे आहेत. येथील प्रवेशद्वाराला पाच द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर विष्णूची चतुर्भुज उठाव शैलीतील मूर्ती व शिवपिंडी आहे. मंदिरातील उजव्या बाजूच्या अंतराळाच्या प्रवेशद्वारास उभ्या धारेच्या नक्षी असलेल्या द्वारशाखा व मंडारकास चंद्रशिला आहे. प्रवेशद्वारास पाच नक्षीदार द्वारशाखा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर ब्रह्मदेवाची मूर्ती व बाजूला शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी बाशिंगी कठडा व मध्यभागी शिवपिंडीची विशाल प्रतिकृती आहे. हे मंदिर पंचरथ प्रकारचे आहे.
महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सलग आठ दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील सर्व सोमवारीही येथे भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- उमरगा बस स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर
- धाराशिव जिल्ह्यातील अनेक शहरांतून उमरग्यासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
மகாதேவ கோயில்
உமர்கா, தாலுகா உமர்கா, மாவட்டம் தாராஷிவ்
இந்தியாவில் சாளுக்கிய வம்சத்தின் ஆட்சி தோராயமாக ௬௦௦ ஆண்டுகள் நீடித்தது. இக்காலத்தில் அவர்கள் சமூக மற்றும் பொருளாதார சீர்திருத்தங்களுடன் கோயில் கட்டடக் கலையையும் வளர்த்தனர். அவர்கள் கட்டிய கோயில்கள் இன்றும் நல்ல நிலையில் உள்ளன. சாளுக்கியர்கள் கட்டிய புகழ்பெற்ற கோயில்களில் பட்டதக்கலில் உள்ள விருபாக்ஷர் கோயில், ஐஹொளேயில் உள்ள லாட் கான் கோயில், எல்லோராியில் உள்ள ராமேசுவரர், தர்மபுரியில் உள்ள கேதாரேசுவரர், ஹிங்கோலி மாவட்டத்தைச் சேர்ந்த ஒளண்டா நாகநாத், கங்காளேசுவரர் கோயில் உள்ளிட்ட கோயில்கள் அடங்கும். இதே பாணியைச் சேர்ந்த சாளுக்கிய காலத்து புகழ்பெற்ற கோயில் உமர்காவில் உள்ளது. மூன்று கருவறைகளும் மூன்று முக்கிய தெய்வங்களைக் கொண்டதும் சிற்ப வேலைப்பாடு நிறைந்ததுமான இக்கோயில் தனிச்சிறப்பு வாய்ந்தது எனக் கருதப்படுகிறது.
இக்கோயில் சாளுக்கிய மன்னன் இரண்டாம் புலிகேசியின் காலத்தில் கட்டப்பட்டதாக ஆய்வாளர்கள் கருதுகின்றனர். சைவ வைணவ மோதலுக்கு இடையே சமாதானத்தை ஏற்படுத்த மேற்கொள்ளப்பட்ட ஒரு விசித்திரமான முயற்சி இதுவாகும். மும்மூர்த்திகளும் ஒருவரே என்பதை இக்கோயிலின் அமைப்பின் மூலம் உணர்த்தும் முயற்சி செய்யப்பட்டிருக்கலாம் எனக் கூறப்படுகிறது. இந்த நட்சத்திர வடிவக் கோயிலில் உள்ள சிற்பக்கலை, சபாமண்டபத்தில் உள்ள அஷ்டதிக்பாலகர் மூர்த்திகள், மூன்று அந்தராளங்கள் மற்றும் கருவறைகளின் அமைப்பு ஆகியவை தனித்துவமானவை.
உமர்கா நகரின் மையப் பகுதியில் அமைந்துள்ள இக்கோயிலின் பிரகாரத்தில் இரண்டு மேடைகளும் அவற்றின் மீது வட்ட வடிவ தீபத்தூண்களும் உள்ளன.
இரண்டு தீபத்தூண்களுக்கு நடுவில் உள்ள மேடையில் நாக ஜோடிச் சிற்பம், நந்தி மற்றும் சிவலிங்கம் உள்ளன. பிரகாரத்தில் படர்ந்திருக்கும் மரங்களும் பக்தர்களின் அமர்வதற்காக இருக்கைகளும் உள்ளன. கோயிலையொட்டி முகமண்டபத்தின் இருபுறமும் இரண்டு சிறிய கோயில்கள் உள்ளன. அவற்றுள் இடதுபுறக் கோயிலில் விநாயகர் மூர்த்தியும் வலதுபுறம் தேவியின் மூர்த்தியும் உள்ளன. மகாதேவனின் இக்கோயில் தோராயமாக நான்கு அடி உயரமான ஜகதி (அடிப்பீடம்) மீது அமைந்துள்ளது. முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராள மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. முகமண்டபத்திலிருந்து சபாமண்டபத்திற்குச் செல்ல ஆறு படிகள் உள்ளன. இப்படிகளின் இருபுறமும் கல் மேடைகளின் வடிவில் பாதுகாப்புத் தடுப்புகள் உள்ளன. பாதுகாப்புத் தடுப்பின் மீது படியின் இருபுறமும் சிற்பங்கள் உள்ளன.
முகமண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் இரண்டு அலங்கரிக்கப்பட்ட தூண்கள், அதன் மீது பிறைநிலா போன்ற பலகை, அதன் மீது நடுவில் லலாடபிம்பம் மற்றும் லலாடப்பட்டையில் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. முகமண்டபத்தில் உள்ள இந்த அமைப்பு அரிதானதும் தனித்துவமானதும் ஆகும். முகமண்டபத்தில் இருபுறமும் கக்ஷசனங்களின் (சாய்வுப் பலகைகள் கொண்ட இருக்கைகள்) அமைப்பு உள்ளது. தொடர்ந்து சபாமண்டபத்தின் ஐந்து கிளைகளைக் கொண்ட நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலில் சிம்மக்கிளை, கஜக்கிளை, சுக்ரகிளை, அசுவக்கிளை மற்றும் புஷ்பக்கிளை ஆகியவை உள்ளன. லலாடபிம்பத்தின் மீது கஜலட்சுமி மூர்த்தியும் அதன் உத்திராங்கத்தின் மீது மகரதோரணமும் உள்ளது.
மூடிய வடிவிலான சபாமண்டபத்தில் தலா நான்கு அலங்கரிக்கப்பட்ட தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. இத்தூண்களும் அவற்றின் மீதான கைகள் மற்றும் உத்திரங்களின் மீதும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் அடுத்த நான்கு தூண்களுக்கு இடைப்பட்ட இடத்தில் ரங்கசிலை (மேடை போன்ற பகுதி) உள்ளது. இங்கு ஒரு மேடையில் கருங்கல்லால் ஆன Nநந்தியின் மூர்த்தி உள்ளது. இங்கேயுள்ள விதானத்தில் (உச்சந்தூக்கு) அஷ்டதிக்பாலகர் சிற்பங்கள் உள்ளன. இங்கேயுள்ள தூண்கள் மற்றும் உத்திரங்களில் கீர்த்திமுகங்கள் மற்றும் சப்தமாதர் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்தில் சிவ தாண்டவ சிற்பங்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் சுவரில் உள்ள தேவகோட்டங்களில் (சுவர் மாடங்கள்) பல்வேறு தெய்வங்களின் மூர்த்திகள் உள்ளன.
சபாமண்டபத்தைத் தொடர்ந்து மூன்று அந்தராளங்களும் மூன்று கருவறைகளும் உள்ளன. அந்தராளத்தின் நுழைவாயிலில் அலங்கரிக்கப்பட்ட வாசற்கிளையும் மந்தாரகத்தின் மீது சந்திரசிலையும் உள்ளது. அந்தராளத்தின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் தேவகோட்டங்கள் உள்ளன. நடுப்பகுதியில் அமைந்துள்ள முக்கிய கருவறையில் சிவலிங்கம் உள்ளது.
இங்கேயுள்ள அந்தராளத்தின் தேவகோட்டங்களில் பசவண்ணா மற்றும் சந்த் Tukaram (சந்த் துகாராம்) ஆகியோரின் மூர்த்திகள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் மற்றும் துவாரபாலிகா சிற்பங்கள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயிலில் புஷ்பக்கிளை, கொடிவேலைப்பாட்டுக் கிளை, தூண்கிளை, பர்ணலதாகிளை மற்றும் புஷ்பலதாகிளை ஆகியவை உள்ளன. லலாடபிம்பத்தின் மீதான உத்திராங்கத்தில் சிகரச் சிற்பங்கள் உள்ளன. அலங்கரிக்கப்பட்ட மந்தாரகத்தின் மீது சந்திரசிலை உள்ளது. கருவறையில் தரையில் நடுப்பகுதியில் சிவலிங்கம் உள்ளது.
இடது பக்க அந்தராள நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலிகா சிற்பங்களும் அலங்கரிக்கப்பட்ட வாசற்கிளைகளும் உள்ளன. மந்தாரகத்தின் மீது சந்திரசிலை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் மற்றும் துவாரபாலிகா சிற்பங்கள் உள்ளன. இங்கேயுள்ள நுழைவாயிலில் ஐந்து வாசற்கிளைகளும் மந்தாரகத்தின் மீது சந்திரசிலையும் உள்ளது. கருவறையில் பின்பக்கச் சுவரையொட்டி வஜ்ரபீடத்தின் மீது விஷ்ணுவின் நான்கு திருக்கரங்களைக் கொண்ட புடைப்புச் சிற்ப மூர்த்தியும் சிவலிங்கமும் உள்ளன. கோயிலின் வலது பக்க அந்தராள நுழைவாயிலில் செங்குத்தான வரிகளுடன் கூடிய வேலைப்பாடுகளைக் கொண்ட வாசற்கிளைகளும் மந்தாரகத்தின் மீது சந்திரசிலையும் உள்ளது. நுழைவாயிலில் ஐந்து அலங்கரிக்கப்பட்ட வாசற்கிளைகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது பிரம்மதேவரின் மூர்த்தியும் அருகில் சிவலிங்கமும் உள்ளது. கோயிலின் கூரையின் மீது நாற்புறமும் பாசிங் போன்ற தடுப்பும் நடுவில் சிவலிங்கத்தின் பிரம்மாண்டமான வடிவமும் உள்ளது. இக்கோயில் பஞ்சரத வகையைச் சேர்ந்ததாகும்.
மகா சிவராத்திரி இங்கேயுள்ள முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இதனையொட்டி கோயிலில் ஹரிநாம சப்தா நிகழ்வு ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. தொடர்ந்து எட்டு நாட்கள் கோயிலில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு மற்றும் மகাপ্রசாமு உள்ளிட்ட நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்நிகழ்வின்போது சுற்றுவட்டாரத்தைச் சேர்ந்த ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் சுவாமி தரிசனத்திற்காக மற்றும் நேர்த்திக்கடன் செலுத்த வருகை தருகிறார்கள். श्रावण (ஷ்ராவண) மாதத்தின் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் கூட இங்கு பக்தர்களின் கூட்டம் நிரம்பி வழியும்.
பயனுள்ள தகவல்
- உமர்கா பேருந்து நிலையத்திலிருந்து ௧௦௦ மீட்டர் தொலைவில்
- தாராஷிவ் மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து உமர்காவிற்கு பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- சுற்றிலும் தங்குவதற்கும் சிற்றுண்டிக்கும் பல வழிகள்
మహాదేవ ఆలయం
ఉమర్గా, తా. ఉమర్గా, జి. ధారాశివ
ভারতে চালুক্য রাজবংশের শাসন প্রায় ৬০০ বছর ধরে টিকে ছিল। এই সময়ে তারা সামাজিক ও অর্থনৈতিক সংস্কারের পাশাপাশি মন্দির স্থাপত্যকলার বিকাশ ঘটান। তাদের দ্বারা নির্মিত মন্দিরগুলি আজও সচ্ছল অবস্থায় রয়েছে। চালুক্যদের দ্বারা নির্মিত বিখ্যাত মন্দিরগুলির মধ্যে পাট্টদাকলের বিরূপাক্ষ মন্দির, এহোলির লাড খান মন্দির, ইলোরার রামেশ্বর, ধর্মাপুরীর কেদারেশ্বর, হিঙ্গোলি জেলার ঔন্থা নাগনাথ, কঙ্কাটেশ্বর মন্দির ইত্যাদি মন্দিরগুলি অন্তর্ভুক্ত। এই ধারারই একটি চালুক্য আমলের বিখ্যাত মন্দির উমরগায় রয়েছে। তিনটি গর্ভগৃহ ও তিনটি প্রধান দেবতাযুক্ত এই ভাস্কর্যখচিত মন্দিরটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ বলে মনে করা হয়।
এই মন্দিরটি চালুক্য সম্রাট দ্বিতীয় পুলকেশীর কার্যকালে নির্মিত হয়েছিল বলে গবেষকদের মত। শৈব ও বৈষ্ণব মতবাদের মধ্যে সমঝোতা ঘটানোর এটি একটি অনন্য প্রচেষ্টা। ত্রিগুণাত্মক ত্রিদেব একই, তা এই মন্দিরের গঠনশৈলীর মাধ্যমে ফুটিয়ে তোলার চেষ্টা করা হয়েছিল বলে ধারণা করা হয়। এই তারকাকৃতি মন্দিরের ভাস্কর্যকলা, সভামণ্ডপের অষ্টদিকপাল মূর্তি, তিনটি অন্তরাল ও গর্ভগৃহের গঠন অত্যন্ত অনন্য।
উমরগা শহরের মধ্যবর্তী অংশে অবস্থিত এই মন্দিরের প্রাঙ্গণে দুটি বেদিকা এবং তার ওপর গোলাকার দীপমালা রয়েছে।
উভয় দীপমালার মাঝখানের বেদিকার ওপর নাগযুগল ভাস্কর্য, নন্দী ও শিবলিঙ্গ রয়েছে। প্রাঙ্গণে ছায়াসুনিবিড় গাছ এবং ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে। মন্দিরের সংলগ্ন মুখমণ্ডপের উভয় পাশে দুটি ছোট মন্দির রয়েছে। যার মধ্যে বামদিকের মন্দিরে গণেশ মূর্তি এবং ডানদিকে দেবীর মূর্তি রয়েছে। মহাদেবের এই মন্দিরটি প্রায় চার ফুট উঁচু জগতির ওপর অবস্থিত। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে এই মন্দিরের গঠনপ্রণালী। মুখমণ্ডপ থেকে সভামণ্ডপে যাওয়ার জন্য ছয়টি সিঁড়ি রয়েছে। এই সিঁড়িগুলির উভয় পাশে পাথরের বেদিকার আকারে সুরক্ষা রেলিং রয়েছে। সুরক্ষা রেলিংয়ের ওপর সিঁড়িমার্গের উভয় পাশে ভাস্কর্য রয়েছে।
মুখমণ্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দুটি অলঙ্কৃত স্তম্ভ, তার ওপর অর্ধচন্দ্রাকার শিলা, তার ওপর মাঝখানে ললাটবিম্ব এবং ললাটপট্রির ওপর ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। মুখমণ্ডপে থাকা এই গঠনপ্রণালী অত্যন্ত দুর্লভ ও অনন্য। মুখমণ্ডপে উভয় পাশে কক্ষাশনের গঠন রয়েছে। এরপর সভামণ্ডপের পাঁচটি শাখা বিশিষ্ট প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারে সিংহশাখা, গজশাখা, শুকশাখা, অশ্বশাখা ও পুষ্পশাখা রয়েছে। ললাটবিম্বের ওপর গজলক্ষ্মীর মূর্তি এবং তার ওপরের উত্তারাঙ্গে মকরতোরণ রয়েছে।
বদ্ধ প্রকৃতির সভামণ্ডপে প্রতিটিতে চারটি করে অলঙ্কৃত স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। এই স্তম্ভ এবং তার ওপরের হস্ত ও ধারিগুলির ওপর নক্সার কাজ করা রয়েছে। সভামণ্ডপে সামনের চারটি স্তম্ভের মাঝখানের জায়গায় রঙশিলা রয়েছে। এখানে একটি বেদিকার ওপর কাল পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে। এখানকার ছাদের ওপর অষ্টদিকপাল ভাস্কর্য রয়েছে। এখানকার স্তম্ভ ও ধারিগুলির ওপর কীর্তিমুখ ও সপ্তমাতৃকা ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। সভামণ্ডপে শিবতাণ্ডব ভাস্কর্য রয়েছে। সভামণ্ডপের দেওয়ালের দেবকোষ্ঠগুলিতে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপের সামনে তিনটি অন্তরাল ও তিনটি গর্ভগৃহ রয়েছে। অন্তরালের প্রবেশদ্বারে অলঙ্কৃত দ্বারশাখা এবং মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে। অন্তরালের বাম ও ডান পাশে দেবকোষ্ঠ রয়েছে। মাঝখানে থাকা প্রধান গর্ভগৃহটিতে শিবলিঙ্গ রয়েছে।
এখানকার অন্তরালের দেবকোষ্ঠগুলিতে বসভাপ্পা ও সন্ত তুকারামের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপাল ও দ্বারপালিকামূর্তির ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে পুষ্পশাখা, লতাবেষ্টিনী শাখা, স্তম্ভশাখা, পর্ণলতশাখা ও পুষ্পলতশাখা রয়েছে। ললাটবিম্বের ওপরের উত্তারাঙ্গে শিখর ভাস্কর্য রয়েছে। অলঙ্কৃত মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের মেঝের মাঝখানে শিবলিঙ্গ রয়েছে।
বামদিকের অন্তরালের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপালিকামূর্তির ভাস্কর্য এবং অলঙ্কৃত দ্বারশাখা রয়েছে। মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের উভয় পাশে দ্বারপাল ও দ্বারপালিকামূর্তির ভাস্কর্য রয়েছে। এখানকার প্রবেশদ্বারে পাঁচটি দ্বারশাখা এবং মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের পেছনের দেওয়ালের সংলগ্ন বজ্রপীঠের ওপর বিষ্ণুর চতুর্বাহু উঁচু ভাস্কর্য শৈলীর মূর্তি এবং শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের ডানদিকের অন্তরালের প্রবেশদ্বারে উল্লম্ব ধারের নক্সাযুক্ত দ্বারশাখা এবং মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে। প্রবেশদ্বারে পাঁচটি অলঙ্কৃত দ্বারশাখা রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠের ওপর ব্রহ্মার মূর্তি এবং পাশে শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের চালের ওপর চারপাশ জুড়ে বাশিম্বি রেলিং এবং মাঝখানে শিবলিঙ্গের বিশাল প্রতিকৃতি রয়েছে। এই মন্দিরটি পঞ্চরথ ধরনের।
মহাশিবরাত্রি এখানকার প্রধান বাৎসরিক উৎসব অত্যন্ত উল্লাসের সাথে উদযাপিত হয়। এই উপলক্ষে মন্দিরে হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। পরপর আট দিন মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন ও মহাপ্রসাদের মতো অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই উপলক্ষে আশেপাশের হাজার হাজার ভক্ত ভগবানের দর্শনের জন্য এবং মানত পূর্ণ করতে আসেন। শ্রাবণের সমস্ত সোমবারগুলিতেও এখানে ভক্তদের ভিড় থাকে।
উপযোগী তথ্য
- উমরগা বাস স্ট্যান্ড থেকে ৫০০ মিটার দূরত্বে
- ধারাশিব জেলার বিভিন্ন শহর থেকে উমরগার জন্য বাস পরিসেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- চত্বরে থাকা ও জলখাবারের জন্য একাধিক বিকল্প
महादेव मंदिर
ഉമർഗ, താലൂക്ക്: ഉമർഗ, ജില്ല: ധാരാശിവ്
भारतात चालुक्य ರಾಜവംശത്തിന്റെ ഭരണം ഏകദേശം ൬൦൦ വർഷത്തോളം നിലനിന്നു. ഈ കാലയളവിൽ അവർ സാമൂഹിക-സാമ്പത്തിക പരിഷ്കാരങ്ങൾക്കൊപ്പം ക്ഷേത്ര വാസ്തുശില്പകലയും വികസിപ്പിച്ചെടുത്തു. അവർ നിർമ്മിച്ച ക്ഷേത്രങ്ങൾ ഇന്നും നല്ല നിലയിലുണ്ട്. चालुक്യർ നിർമ്മിച്ച പ്രശസ്തമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ പട്ടടക്കലിലെ വീരപക്ഷ ക്ഷേത്രം, ഐഹോളിലെ ലാഡ് ഖാൻ ക്ഷേത്രം, എല്ലോറയിലെ രാമേശ്വര ക്ഷേത്രം, ധർമ്മപുരിയിലെ കേದಾರೇಶ್വര ക്ഷേത്രം, ഹിംഗോളി ജില്ലയിലെ ഔണ്ഢാ നാഗനാഥ്, കങ്കാളേശ്വര ക്ഷേത്രം തുടങ്ങിയവ ഉൾപ്പെടുന്നു. ഇതേ മാതൃകയിലുള്ള ഒരു പ്രശസ്തമായ ചാലുക്യകാലഘട്ടത്തിലെ ക്ഷേത്രമാണ് ഉമർഗയിലുള്ളത്. മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങളും മൂന്ന് പ്രധാന പ്രതിഷ്ഠകളുമുള്ള ഈ ശില്പഭംഗിയാർന്ന ക്ഷേത്രം വളരെ സവിശേഷമായ ഒന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ചാലുക്യ ചക്രവർത്തിയായ പുൽകേശി രണ്ടാമന്റെ കാലഘട്ടത്തിലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടത് എന്ന് ചരിത്രകാരന്മാർ കരുതുന്നു. ശൈവ-വൈഷ്ണവ തർക്കങ്ങൾക്ക് വിരാമമിടാനുള്ള ഒരു അപൂർവ്വ ശ്രമമാണിത്. ത്രിഗുണാത്മകരായ ത്രിമൂർത്തികൾ ഒന്നുതന്നെയാണെന്ന് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടനയിലൂടെ കാണിക്കാൻ ശ്രമിച്ചിട്ടുണ്ടാകാം എന്ന് പറയപ്പെടുന്നു. നക്ഷത്രാകൃതിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശില്പകല, സഭാമണ്ഡപത്തിലെ അഷ്ടദിക്പാലകരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ, മൂന്ന് അന്തരാളങ്ങളുടെയും ഗർഭഗൃഹങ്ങളുടെയും ഘടന എന്നിവ വളരെ അപൂർവ്വമാണ്.
ഉമർഗ നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ അങ്കണത്തിൽ രണ്ട് തറകളും അതിനുമുകളിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള ദീപമാലകളുമുണ്ട്.
രണ്ട് ദീപമാലകൾക്കും ഇടയിലുള്ള തറയിൽ നാഗയുകള ശില്പവും നന്ദിയും ശിവലിംഗവുമുണ്ട്. അങ്കണത്തിൽ പടർന്നുപന്തലിച്ച വൃക്ഷങ്ങളും ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള ഇരിപ്പിടങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തോടനുബന്ധിച്ച് മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലുമായി രണ്ട് ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അതിൽ ഇട侧ത്തെ ക്ഷേത്രത്തിൽ ഗണേശവിഗ്രഹവും വല侧ത്ത് ദേവിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. മഹാദേവന്റെ ഈ ക്ഷേത്രം ഏകദേശം നാല് അടി ഉയരമുള്ള ജഗതിക്ക് (അടിത്തറയ്ക്ക്) മുകളിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപത്തിൽ നിന്നും സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ ആറ് പടികളുണ്ട്. ഈ പടികളുടെ ഇരുവശങ്ങളിലും കൽത്തറകളുടെ രൂപത്തിൽ സംരക്ഷണഭിത്തികളുണ്ട്. സംരക്ഷണഭിത്തിക്ക് മുകളിൽ പടിവഴിയുടെ ഇരുവശങ്ങളിലും ശില്പങ്ങളുണ്ട്.
മുഖമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും രണ്ട് കൊത്തുപണികളുള്ള സ്തംഭങ്ങളും അതിനുമുകളിൽ അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള ശിലയും അതിനുമുകളിൽ നടുവിലായി ലലാടബിംബവും ലലാടപട്ടിയിൽ ശില്പങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിലുള്ള ഈ നിർമ്മാണരീതി വളരെ ദുർലഭവും അപൂർവ്വവുമാണ്. മുഖമണ്ഡപത്തിൽ ഇരുവശങ്ങളിലും കക്ഷാസനങ്ങളുടെ ഘടനയുണ്ട്. മുന്നോട്ട് പോയാൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ അഞ്ച് ശാഖകളുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൽ സിംഹശാഖ, ഗജശാഖ, ശുകശാഖ, അശ്വശാഖ, പുഷ്പശാഖ എന്നിവയുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗജലക്ഷ്മിയുടെ വിഗ്രഹവും അതിനുമുകളിലുള്ള ഉത്തരാംഗത്തിൽ മകരതോരണവുമുണ്ട്.
അടച്ചുകെട്ടിയ സ്വഭാവത്തിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് കൊത്തുപണി ചെയ്ത സ്തംഭങ്ങൾ വീതമുള്ള നാല് നിരകളുണ്ട്. ഈ സ്തംഭങ്ങളിലും അതിനുമുകളിലുള്ള കൈകളിൽ (ഹസ്തങ്ങളിലും) കഴുക്കോലുകളിലും കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ മുൻവശത്തെ നാല് സ്തംഭങ്ങൾക്കിടയിലുള്ള സ്ഥലത്ത് രംഗശിലയുണ്ട്. ഇവിടെ ഒരു തറയിൽ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടുത്തെ വിതാനത്തിൽ (മേൽക്കൂരയിൽ) അഷ്ടദിക്പാലകരുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഇവിടുത്തെ സ്തംഭങ്ങളിലും കഴുക്കോലുകളിലും കീർത്തിമുഖങ്ങളും സപ്തമാതൃക ശില്പങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ശിവതാണ്ഡവ ശില്പങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തിയിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലായി മൂന്ന് അന്തരാളങ്ങളും മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങളുമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ കൊത്തുപണിയുള്ള ദർവാസഖയും മന്ദാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ ഇടത്, വലത് വശങ്ങളിൽ ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. നടുവിലായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിലാണ് ശിവലിംഗമുള്ളത്.
ഇവിടുത്തെ അന്തരാളത്തിലെ ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ബസവണ്ണയുടെയും സന്തോഷ് തുക്കാറാമിന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. (ശ്രദ്ധിക്കുക: സന്ത് തുക്കാറാം) ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദാരപാല, ദാരപാലികാ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ പുഷ്പശാഖ, വല്ലിശാഖ (വെല്ലുബട്ടിശാഖ), സ്തംഭശാഖ, പർണ്ണലതാശാഖ, പുഷ്പലതാശാഖ എന്നിവയുണ്ട്. ലലാടബിംബത്തിന് മുകളിലുള്ള ഉത്തരാംഗത്തിൽ ശിഖരശില്പങ്ങളുണ്ട്. കൊത്തുപണിയുള്ള മന്ദാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയുടെ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗമുണ്ട്.
ഇടതുവശത്തെ അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദാരപാലികാ ശില്പങ്ങളും കൊത്തുപണിയുള്ള ദാരശാഖകളുമുണ്ട്. മന്ദാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദാരപാല, ദാരപാലികാ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഇവിടുത്തെ പ്രവേശന കവാടത്തിൽ അഞ്ച് ദാരശാഖകളും മന്ദാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ പിന്നിലെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ വിഷ്ണുവിന്റെ ചതുർബാഹുവായ റിലീഫ് (ഉത്ഥാവ) ശൈലിയിലുള്ള വിഗ്രഹവും ശിവലിംഗവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ വലതുവശത്തെ അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ലംബമായ വരകളുടെ കൊത്തുപണിയുള്ള ദാരശാഖകളും മന്ദാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൽ അഞ്ച് കൊത്തുപണിയുള്ള ദാരശാഖകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ ബ്രഹ്മാവിന്റെ വിഗ്രഹവും വശത്തായി ശിവലിംഗവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാലുവശത്തും ബാശിംഗി കൈവരിയും (ബേഷിംഗി കഠഡ) നടുവിലായി ശിവലിംഗത്തിന്റെ വിശാലമായ പ്രതികൃതിയുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രം പഞ്ചരഥ തരത്തിലുള്ളതാണ്.
മഹാശിവരാത്രിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം, ഇത് വളരെ ആവേശത്തോടെയാണ് ആഘോഷിക്കപ്പെടുന്നത്. ഈ അവസരത്തിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഹരിനാമസപ്താഹം സംഘടിപ്പിക്കുന്നു. തുടർച്ചയായ എട്ട് ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഭജനം, കീർത്തനം, പ്രവചനം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കപ്പെടുന്നു. ഈ അവസരത്തിൽ ചുറ്റുമുള്ള പ്രദേശങ്ങളിൽ നിന്നുള്ള ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും വഴിപാടുകൾ നേർച്ച തീർക്കാനും എത്താറുണ്ട്. കർക്കടക മാസത്തിലെ (ശ്രാവണ മാസത്തിലെ) എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഇവിടെ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഉമർഗ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്നും ൫൦൦ മീറ്റർ അകലെ
- ധാരാശിവ് ജില്ലയിലെ വിവിധ നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഉമർഗയിലേക്ക് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (എസ്.ടി) സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് അടുത്തേക്ക് വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി മാർഗ്ഗങ്ങൾ
महादेव मंदिर
ಉಮರ್ಗಾ, ತಾ. ಉಮರ್ಗಾ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಭಾರತದಲ್ಲಿ ಚಾಲುಕ್ಯ ರಾಜವಂಶದ ಆಳ್ವಿಕೆಯು ಸುಮಾರು ೬०० ವರ್ಷಗಳ ಕಾಲ §ಉಳಿಯಿತು. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಸುಧಾರಣೆಗಳೊಂದಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಸ್ತುಶಿಲೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು §ಮಾಡಿದರು. ಅವರು ನಿರ್ಮಿಸಿದ ದೇವಾಲಯಗಳು ಇಂದಿಗೂ ಉತ್ತಮ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ. ಚಾಲುಕ್ಯರು ನಿರ್ಮಿಸಿದ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಪಟ್ಟದಕಲ್ಲಿನ ವಿರೂಪಾಕ್ಷ ದೇವಾಲಯ, ಐಹೊಳೆಯ ಲಾಡ್ ಖಾನ್ ದೇವಾಲಯ, ಎಲ್ಲೋರಾದ ರಾಮೇಶ್ವರ, ಧರ್ಮಾಪುರಿಯ ಕೇದಾರೇಶ್ವರ, ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಔಂಧಾ ನಾಗನಾಥ, ಕಂಕಾಳೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಮುಂತಾದ ದೇವಾಲಯಗಳು ಸೇರಿವೆ. ಇದೇ ಶೈಲಿಯ ಚಾಲುಕ್ಯ ಕಾಲದ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯವು ಉಮರ್ಗಾದಲ್ಲಿದೆ. ಮೂರು ಗರ್ಭಗೃಹಗಳು ಮತ್ತು ಮೂರು ಮುಖ್ಯ ದೇವತೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಶಿಲ್ಪಕಲೆಯ ದೇವಾಲಯವು ವಿಶಿಷ್ಟವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಚಾಲುಕ್ಯ সম্রাট ಎರಡನೇ ಪುಲಕೇಶಿಯ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂದು ತಜ್ಞರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಶೈವ ಹಾಗೂ ವೈಷ್ಣವ ವಿವಾದದ ಮೇಲೆ ಸಮನ್ವಯ ಸಾಧಿಸುವ ಅಪೂರ್ವ ಪ್ರಯತ್ನ ಇದಾಗಿದೆ. ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕ ತ್ರಿದೇವರು ಒಬ್ಬರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯ ಮೂಲಕ ತೋರಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರಬಹುದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನಕ್ಷತ್ರಾಕಾರದ ದೇವಾಲಯದ ಶಿಲ್ಪಕಲೆ, ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿರುವ ಅಷ್ಟದಿಕ್ಪಾಲಕರ ಮೂರ್ತಿಗಳು, ಮೂರು ಅಂತರಾಳ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗೃಹಗಳ ರಚನೆಯು ಅನನ್ಯವಾಗಿದೆ.
ಉಮರ್ಗಾ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಟ್ಟೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ गोलाಕಾರದ (ವರ್ತುಲಾಕಾರದ) ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ.
ಎರಡೂ ದೀಪಮಾಲೆಗಳ ನಡುವಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಾಗಯುಗಳ ಶಿಲ್ಪ, ನಂದಿ ಹಾಗೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ದೆಡ್ಡ ಮರಗಳು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮುಖಮಂಡಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಹಾದೇವನ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗತಿಯ ಮೇಲಿದೆ. ಮುಖಮಂಡಪ, ಸಭಾಮಂಡಪ, ಅಂತರಾಳ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಡಪದಿಂದ ಸಭಾಮಂಡಪಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಆರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕಟ್ಟೆಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಾ ಬೇಲಿಗಳಿವೆ. ಸುರಕ್ಷಾ ಬೇಲಿಯ ಮೇಲೆ ಮೆಟ್ಟಿಲು ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಮುಖಮಂಡಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಸ್ತಂಭಗಳು, ಅದರ ಮೇಲೆ ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ಶಿಲೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಲಲಾಟಬಿಂಬ ಹಾಗೂ ಲಲಾಟಪಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಡಪದಲ್ಲಿರುವ ಈ ರಚನೆಯು ಅಪರೂಪ ಹಾಗೂ ಅನನ್ಯವಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಡಪದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಸನಗಳ ರಚನೆಯಿದೆ. ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಡಪದ ಐದು ಶಾಖೆಗಳ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಸಿಂಹಶಾಖೆ, ಗಜಶಾಖೆ, ಶುಕಶಾಖೆ, ಅಶ್ವಶಾಖೆ ಹಾಗೂ ಪುಷ್ಪಶಾಖೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಜಲಕ್ಷ್ಮಿಯ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲಿನ ಉತ್ತರಾಂಗದ ಮೇಲೆ ಮಕರ ತೋರಣವಿದೆ.
ಬಂದ್ ಸ್ವರೂಪದ ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಈ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ಹಸ್ತ ಹಾಗೂ ತೊಲೆಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳ ನಡುವಿನ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಂಗಶಿಲೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಪಾಷಾಣದ ನಂದಿ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮೇಲ್ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಅಷ್ಟದಿಕ್ಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಸ್ತಂಭ ಹಾಗೂ ತೊಲೆಗಳ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖಗಳು ಹಾಗೂ ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಡಪದಲ್ಲಿ ಶಿವತಾಂಡವ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಡಪದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಡಪದ ಮುಂದೆ ಮೂರು ಅಂತರಾಳ ಹಾಗೂ ಮೂರು ಗರ್ಭಗೃಹಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ದ್ವಾರಶಾಖೆ ಹಾಗೂ ಮಂದಾರಕಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಎಡ ಹಾಗೂ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳದ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಬಸವಪ್ಪ ಹಾಗೂ ಸಂತ ತುಕಾರಾಮರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲ ಹಾಗೂ ದ್ವಾರಪಾಲಿಕೆ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಪುಷ್ಪಶಾಖೆ, ಬಳ್ಳ (ವೆಲ್ಲಬುಟ್ಟಿ) ಶಾಖೆ, ಸ್ತಂಭಶಾಖೆ, ಪर्णಲತಾಶಾಖೆ ಹಾಗೂ ಪುಷ್ಪಲತಾಶಾಖೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲಿನ ಉತ್ತರಾಂಗದ ಮೇಲೆ ಶಿಖರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮಂದಾರಕಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಎಡಭಾಗದ ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಿಕೆ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಿವೆ. ಮಂದಾರಕಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲ ಹಾಗೂ ದ್ವಾರಪಾಲಿಕೆ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಐದು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಮಂದಾರಕಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಚತುರ್ಭುಜ ಉಬ್ಬು ಶೈಲಿಯ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಬಲಭಾಗದ ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಲಂಬ ಅಂಚಿನ ನಕ್ಷೆ ಇರುವ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳು ಮತ್ತು ಮಂದಾರಕಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಐದು ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವರ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಬಾಸಿಂಗಿ ಬೇಲಿ ಹಾಗೂ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗದ ವಿಶಾಲ ಪ್ರತಿಕೃತಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯವು ಪಂಚರಥ ಪ್ರಕಾರದ್ದಾಗಿದೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನಿಮಿತ್ತ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸತತ ಎಂಟು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಹಾಗೂ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಂದೂ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಉಮರ್ಗಾ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ
- ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಉಮರ್ಗಾಗೆ ಕೆ.ಎಸ್.ಆರ್.ಟಿ.ಸಿ (ಎಸ್.ಟಿ) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
মহাদেব মন্দির
উমরগা, তা. উমরগা, জি. ধারাশিব
ভারতে চালুক্য রাজবংশের শাসন প্রায় ৬০০ বছর স্থায়ী হয়েছিল। এই সময়ে তারা সামাজিক ও অর্থনৈতিক সংস্কারের পাশাপাশি মন্দির স্থাপত্যকলার বিকাশ ঘটান। তাঁরা যে সমস্ত মন্দির নির্মাণ করেছিলেন তা আজও সচ্ছল অবস্থায় রয়েছে। চালুক্যদের দ্বারা নির্মিত বিখ্যাত মন্দিরগুলির মধ্যে পট্টদকলের বিরূপাক্ষ মন্দির, ঐহোলির লাড খান মন্দির, ইলোরার রামেশ্বর, ধর্মাপুরীর কেদারেশ্বর, হিঙ্গোলি জেলার ঔন্থা নাগনাথ, কঙ্কালেশ্বর মন্দির ইত্যাদি মন্দির অন্তর্ভুক্ত। এই ধারারই একটি চালুক্য আমলের বিখ্যাত মন্দির উমরগায় অবস্থিত। তিনটি গর্ভগৃহ এবং তিনটি প্রধান দেবতাযুক্ত এই ভাস্কর্যময় মন্দিরটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ বলে মনে করা হয়।
এই মন্দিরটি চালুক্য সম্রাট দ্বিতীয় পুলকেশীর কার্যকালে নির্মিত হয়েছিল বলে গবেষকদের মত। এটি শৈব ও বৈষ্ণব মতবাদের মধ্যে আপোস ঘটানোর একটি অভিনব প্রচেষ্টা। ত্রিগুণাত্মক ত্রিমূর্তী যে একই, তা এই মন্দিরটির বিন্যাসের মাধ্যমে ফুটিয়ে তোলার চেষ্টা করা হয়ে থাকতে পারে, এমনটাই বলা হয়। এই তারা আকৃতির মন্দিরের ভাস্কর্যকলা, সভামন্ডপের অষ্টা দিকপাল মূর্তি, তিনটি অন্তরাল ও গর্ভগৃহের গঠনশৈলী অত্যন্ত অনন্য।
উমরগা শহরের মধ্যবর্তী অংশে অবস্থিত এই মন্দিরটির প্রাঙ্গণে দুটি চাতাল এবং তার ওপরে গোলাকার দীপমালা রয়েছে।
দুটি দীপমালার মধ্যবর্তী চাতালে নাগযুগল ভাস্কর্য, নন্দী ও শিবলিঙ্গ রয়েছে। প্রাঙ্গণে ছায়াঘেরা বৃক্ষ এবং ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে। মন্দিরসংলগ্ন মুখমন্ডপের উভয় পার্শ্বে দুটি ছোট মন্দির রয়েছে। যার মধ্যে বামদিকের মন্দিরে গণেশমূর্তি এবং ডানদিকে দেবীর মূর্তি রয়েছে। মহাদেবের এই মন্দিরটি প্রায় চার ফুট উঁচু জগতির ওপর অবস্থিত। মুখমন্ডপ, সভামন্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরটির স্থাপত্যরীতি গঠিত। মুখমন্ডপ থেকে সভামন্ডপে যাওয়ার জন্য ছটি সিঁড়ি রয়েছে। এই সিঁড়িগুলির উভয় পার্শ্বে পাথরের চাতালের আকারে সুরক্ষাবেষ্টনী রয়েছে। সুরক্ষাবেষ্টনীর ওপর সিঁড়িপথের উভয় পার্শ্বেই ভাস্কর্য রয়েছে।
মুখমন্ডপের প্রবেশদ্বারের উভয় পার্শ্বে দুটি নকশাদার স্তম্ভ, তার ওপর অর্ধচন্দ্রাকার শিলা, তার ওপর মধ্যভাগে ললাটবিম্ব এবং ললাটপটিতে ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। মুখমন্ডপে অবস্থিত এই গঠনরীতি অত্যন্ত দুর্লভ ও অনন্য। মুখমন্ডপে উভয় পার্শ্বেই কক্ষাশনের বিন্যাস রয়েছে। এরপরে সভামন্ডপের পাঁচটি শাখা বিশিষ্ট প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারে সিংহশাখা, গজশাখা, শুকশাখা, অশ্বশাখা ও পুষ্পশাখা রয়েছে। ললাটবিম্বের ওপর গজলক্ষ্মীর মূর্তি এবং তার ওপরের উত্তরাঙ্গে মকরতোরণ রয়েছে।
আবদ্ধ প্রকৃতির সভামন্ডপে প্রতিটিতে চারটি করে নকশাদার স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। এই স্তম্ভগুলি এবং তাদের ওপরের হাত ও কড়িকাঠের ওপর নকশার কাজ করা রয়েছে। সভামন্ডপে সামনের চারটি স্তম্ভের মধ্যবর্তী স্থানে রঙ্গশিলা রয়েছে। এখানে একটি চাতালের ওপর কাল পাথরের নন্দীমূর্তি রয়েছে। এখানকার ছাদের ওপরে অষ্টা দিকপাল ভাস্কর্য রয়েছে। এখানকার স্তম্ভ ও কড়িকাঠে কীর্তিমুখ ও সপ্তমাতৃকা ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। সভামন্ডপে শিবতাণ্ডব ভাস্কর্য রয়েছে। সভামন্ডপের দেওয়ালের দেবকোষ্ঠগুলিতে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে।
সভামন্ডপের সামনে তিনটি অন্তরাল ও তিনটি গর্ভগৃহ রয়েছে। অন্তরালের প্রবেশদ্বারে নকশাদার দ্বারশাখা এবং মান্দারকে চন্দ্রশিলা রয়েছে। অন্তরালের বাম ও ডান পার্শ্বে দেবকোষ্ঠ রয়েছে। মধ্যভাগে অবস্থিত প্রধান গর্ভগৃহে শিবলিঙ্গ রয়েছে।
এখানের অন্তরালের দেবকোষ্ঠগুলিতে বসভাপ্পা ও সন্ত তুকারামের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের উভয় পার্শ্বে দ্বারপাল ও দ্বারপালা ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে পুষ্পশাখা, লতানির্ভর শাখা, স্তম্ভশাখা, পর্ণলতাশাখা ও পুষ্পলতাশাখা রয়েছে। ললাটবিম্বের ওপরের উত্তরাঙ্গে শিখর ভাস্কর্য রয়েছে। নকশাদার মান্দারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মধ্যভাগে শিবলিঙ্গ রয়েছে।
বাম পার্শ্বের অন্তরালের প্রবেশদ্বারের উভয় পার্শ্বে দ্বারপালা ভাস্কর্য এবং নকশাদার দ্বারশাখা রয়েছে। মান্দারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের উভয় পার্শ্বে দ্বারপাল ও দ্বারপালা ভাস্কর্য রয়েছে। এখানের প্রবেশদ্বারে পাঁচটি দ্বারশাখা এবং মান্দারকে চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহের পেছনের দেওয়ালসংলগ্ন বজ্রপিঠে বিষ্ণুর চতুর্বাহু উঁচু নিচু ভাস্কর্য শৈলীর মূর্তি এবং শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের ডান পার্শ্বের অন্তরালের প্রবেশদ্বারে লম্বালম্বি ধারের নকশা বিশিষ্ট দ্বারশাখা এবং মান্দারকে চন্দ্রশিলা রয়েছে। প্রবেশদ্বারে পাঁচটি নকশাদার দ্বারশাখা রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপিঠে ব্রহ্মদেবের মূর্তি এবং পার্শ্বে শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের চালের ওপর চারপাশেই বাশিংী রেলিং এবং মধ্যভাগে শিবলিঙ্গের বিশাল প্রতিকৃতি রয়েছে। এই মন্দিরটি পঞ্চরথ প্রকৃতির।
মহাশিবরাত্রি এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব অত্যন্ত উৎসাহ ও উদ্দীপনার সাথে উদযাপিত হয়। এই উপলক্ষে মন্দিরে হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। পরপর আট দিন মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন ও মহাপ্রসাদ ইত্যাদির মতো নানা অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই উপলক্ষে আশেপাশের অঞ্চলের হাজার হাজার ভক্ত ঈশ্বরের দর্শন পেতে এবং মানত পূরণ করতে আসেন। শ্রাবণের সমস্ত সোমবারেই এখানে ভক্তদের ভিড় লেগেই থাকে।
উপযোগী তথ্য
- উমরগা বাস স্ট্যান্ড থেকে ৫০০ মিটার দূরত্বে
- ধারাশিব জেলার নানা শহর থেকে উমরগার জন্য বাস (এসটি) পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এই চত্বরে থাকা এবং জলখাবারের জন্য বহু বিকল্প উপলব্ধ
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਓਮਰਗਾ, ਤਾਲੁਕਾ ਓਮਰਗਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਚਾਲੁਕ੍ਯ ਰਾਜਵੰਸ਼ ਦਾ ਰਾજ ਲਗਭਗ ੬੦੦ ਸਾਲ ਰਿਹਾ। ਇਸ ਸਮهਦੌਰਾਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਮਾਜਿਕ ਅਤੇ ਆਰਥਿਕ ਸੁਧਾਰਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੰਦਿਰ ਵਾਸਤੂਕਲਾ ਦਾ ਵਿਕਾਸ ਕੀਤਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਵੱਲੋਂ ਬਣਾਏ ਗਏ ਮੰਦਿਰ ਅੱਜ ਵੀ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਹਨ। ਚਾਲੁਕ੍ਯਾਂ ਦੁਆਰਾ ਬਣਾਏ ਗਏ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਪੱਟਡਕਲ ਦਾ ਵਿਰੂಪಾਸ਼ ਮੰਦਿਰ, ਇਹੋਲੇ ਦਾ ਲਾਡ ਖਾਨ ਮੰਦਿਰ, ਇਲੋਰਾ ਦਾ ਰਾਮੇਸ਼ਵਰ, ਧਰਮਪੁਰੀ ਦਾ ਕੇਦਾਰੇਸ਼ਵਰ, ਹਿੰਗੋਲੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਔਂਢਾ ਨਾਗਨਾਥ, ਕੰਕਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਆਦਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਸੇ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਇੱਕ ਚਾਲੁਕ੍ਯ ਕਾਲੀਨ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਓਮਰਗਾ ਵਿਖੇ ਹੈ। ਤਿੰਨ ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹਾਂ ਅਤੇ ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਵਾਲਾ ਇਹ ਮੂਰਤੀ-ਕਲਾ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਮੰਦਿਰ ਬਹੁਤ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਿਰ ਚਾਲੁਕ੍ਯ ਸਮ্রਾਟ ਪੁਲਕੇਸ਼ੀ ਦੂਜੇ ਦੇ ਕਾਰਜਕਾਲ ਦੌਰਾਨ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਹ ਸ਼ੈਵ ਅਤੇ ਵੈਸ਼ਣਵ ਮੱਤਾਂ ਵਿਚਕਾਰ ਸਮਝੌਤਾ ਕਰਵਾਉਣ ਦਾ ਇੱਕ ਅਨੋਖਾ ਯਤਨ ਹੈ। ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਰਾਹੀਂ ਇਹ ਦਰਸਾਉਣ ਦਾ ਯਤਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੋਵੇਗਾ ਕਿ ਤਿੰਨ ਗੁਣਾਂ ਵਾਲੇ ਤ੍ਰਿਦੇਵ ਇੱਕੋ ਹੀ ਹਨ। ਇਸ ਤਾਰਾ-ਨੁਮਾ ਮੰਦਿਰ ਦੀ ਮੂਰਤੀ-ਕਲਾ, ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅਸ਼ਟ-ਦਿਕਪਾਲ ਮੂਰਤੀਆਂ, ਤਿੰਨ ਅੰਤਰਾਲਾਂ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਅਨੋਖੀ ਹੈ।
ਓਮਰਗਾ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੋ ਚਬੂਤਰੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ।
ਦੋਵਾਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਨਾਗ-ਜੁਗਲ ਮੂਰਤੀ, ਨੰਦੀ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸੰਘਣੇ ਰੁੱਖ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲुओं ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਬੈਂਚ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਵੱਲ ਦੋ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਜਗਤੀ (ਪੀਠ) ਉੱਤੇ ਸਥિત ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਤੋਂ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਛੇ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗਸ ਹਨ। ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਉੱਤੇ ਪੌੜੀ ਦੇ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਵੱਲ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦੋ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਥੰਮ੍ਹ, ਉਸ ਉੱਤੇ ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਸਿਲ੍ਹਾ, ਉਸ ਉੱਤੇ ਵਿਚਕਾਰ ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਅਤੇ ਲਲਾਟ-ਪੱਟੀ ਉੱਤੇ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਇਹ ਬਣਤਰ ਦੁਰਲੱਭ ਅਤੇ ਅਨੋਖੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਕਕਸ਼ਾਸਨਾਂ (ਬੈਠਣ ਵਾਲੀ ਥਾਂ) ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅੱਗੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪੰਜ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਵਾਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਸਿੰਘ-ਸ਼ਾਖਾ, ਗਜ-ਸ਼ਾਖਾ, ਸ਼ੁਕ-ਸ਼ਾਖਾ, ਅਸ਼ਵ-ਸ਼ਾਖਾ ਅਤੇ ਪੁਸ਼ਪ-ਸ਼ਾਖਾ ਹਨ। ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਜਲੱਛਮੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਉੱਤਰਾ
ਬੰਦ ਸਰੂਪ ਵਾਲੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਰ ਇੱਕ ਵਿੱਚ ਚਾਰ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਇਹ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਹੱਥ ਅਤੇ ਸ਼ਤੀਰਾਂ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅਗਲੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਰੰਗਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਛੱਤ ਉੱਤੇ ਅਸ਼ਟ-ਦਿਕਪਾਲ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਅਤੇ ਸ਼ਤੀਰ ਉੱਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਸਪਤ-ਮਾਤ੍ਰਿਕਾ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ-ਤਾਂਡਵ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਦੀਵਾਰ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ (ਛੋਟੇ ਆਲ੍ਹਣਿਆਂ) ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਅੱਗੇ ਤਿੰਨ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਤਿੰਨ ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾ ਅਤੇ ਮੰਦਾਰਕ ਉੱਤੇ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ।
ਇੱਥੇ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਬਸਵੱਪਾ ਅਤੇ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦੁਆਰਪਾਲ ਅਤੇ ਦੁਆਰਪਾਲਿਕਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਪੁਸ਼ਪ-ਸ਼ਾਖਾ, ਵੇਲ-ਬੁੱਟੀ-ਸ਼ਾਖਾ, ਥੰਮ੍ਹ-ਸ਼ਾਖਾ, ਪਰ੍ਣਲਤਾ-ਸ਼ਾਖਾ ਅਤੇ ਪੁਸ਼ਪਲਤਾ-ਸ਼ਾਖਾ ਹਨ। ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਉੱਤੇ ਉੱਤਰਾੰਗ ਉੱਤੇ ਸਿਖਰ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਮੰਦਾਰਕ ਉੱਤੇ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਵਿੱਚ ਫਰਸ਼ ਉੱਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ।
ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦੁਆਰਪਾਲਿਕਾ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਹਨ। ਮੰਦਾਰਕ ਉੱਤੇ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਉੱਤੇ ਦੁਆਰਪਾਲ ਅਤੇ ਦੁਆਰਪਾਲਿਕਾ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਪੰਜ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਅਤੇ ਮੰਦਾਰਕ ਉੱਤੇ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਵਿੱਚ ਪਿਛਲੀ ਦੀਵਾਰ ਦੇ ਨਾਲ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਉਭਰੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹਵੇਂ ਕਿਨਾਰੇ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀਆਂ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਅਤੇ ਮੰਦਾਰਕ ਉੱਤੇ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਪੰਜ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਿਹ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਨਾਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਰੇਲਿੰਗ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਪ੍ਰਤੀਕਿਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੰਚਰਥ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਹੈ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤ੍ਰੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲਗਾਤਾਰ ਅੱਠ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕਿਆਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਲਾਹੁਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸਾਉਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਵੀ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਓਮਰਗਾ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੫੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਓਮਰਗਾ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple Tuljapur, Tal. Tuljapur, Dist. Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखें -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Paranda, Dist. Dharashiva
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखें -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीSecret Siddheshwar Temple Ter, Tal. Dharashiv, Dist. Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखें
