पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुण्यातील गणपती म्हटले की डोळ्यांसमोर सर्वात पहिले श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे नाव येते. नवसाला पावणारा गणपती म्हणून या दैवताची ख्याती जगभर आहे. या गणपतीला पुण्यातील सर्वात श्रीमंत आणि अत्यंत उदार दैवत मानले जाते. हे मंदिर आणि दरवर्षी येथे होणारा सार्वजनिक उत्सव पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो.
या मंदिराची स्थापना १८९३ मध्ये झाली. त्यामागील कथा अशी की मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा गावचे दगडूशेठ गाडवे हे व्यवसायानिमित्त पुण्यात आले. त्यांनी बुधवार पेठेत आपला मिठाईचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसाय खूप मोठा असल्याने लोक त्यांना ‘हलवाई’ या नावाने ओळखू लागले. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले. दगडूशेठ एक यशस्वी व्यापारी होते. अत्यंत शीलवान आणि दानशूर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन ब्रिटिशांनी त्यांना ‘नगरशेठ’ हा बहुमान दिला. दगडूशेठ यांना व्यायामाची आवड होती. ते स्वतः निष्णात मल्ल होते. ते पुण्यातील प्रसिद्ध जगाबा तालमीचे वस्ताद म्हणून ओळखले जात. त्यांनी अनेक मल्ल घडवले होते.
दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यात अचानक एक दुःखद घटना घडली. १८९२ च्या सुमारास पुण्यावर प्लेगच्या महामारीचे भीषण संकट आले. या साथीच्या आजारात त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला गमावले. मुलाच्या मृत्यूमुळे या दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मनात संसाराविषयी विरक्ती निर्माण झाली. याच कठीण काळात त्यांची भेट आध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज यांच्याशी झाली. महाराजांनी या शोकाकुल दांपत्याला धीर दिला. महाराजांनी त्यांना श्रीदत्तात्रेय आणि गणपतीची मूर्ती स्थापन करण्याचा सल्ला दिला. या दैवतांची सेवा आपल्या मुलाप्रमाणे करा असे त्यांनी सांगितले. ही दैवते तुमचे नाव आणि कीर्ती जगभर पसरवतील असा आशीर्वाद महाराजांनी दिला. महाराजांच्या शब्दांनी दगडूशेठ यांना नवी उमेद मिळाली. त्यांना जगण्याचे बळ मिळाले.
त्यांनी बुधवार पेठेत गणपतीची मातीची मूर्ती आणि दत्ताची संगमरवरी मूर्ती स्थापन केली. आजही श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि गणपती मंदिर त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. या गणपतीचा इतिहास भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेला आहे. १८९३ मध्ये या गणपतीची स्थापना झाली. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मिळाले. त्या काळात ब्रिटिशांनी राजकीय सभांवर बंदी घातली होती. धार्मिक कार्यक्रमांना मात्र कायदेशीर परवानगी होती. ही संधी ओळखून लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले. यामुळे लोक एकत्र आले. त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. ही पुण्याच्या इतिहासातील मोठी घटना आहे.
सुरुवातीच्या काळात हा गणपती ‘कोतवाल चावडीचा गणपती’ म्हणून ओळखला जात असे. याला ‘बाहुलीच्या हौदाचा गणपती’ असेही म्हणत. डॉक्टर विश्राम घोले यांनी आपल्या मृत मुलीच्या स्मृतीसाठी तिथे एक हौद बांधला होता. त्या हौदावर एक बाहुली होती. त्यावरून या परिसरातील गणपतीला हे नाव पडले. आज मंदिरात जी भव्य मूर्ती आहे ती मंडळाची तिसरी मूर्ती आहे. पहिली मूर्ती १८९३ मध्ये बाबुराव नाईक यांनी तयार केली होती. ती सध्या शुक्रवार पेठेतील राम मंदिरात आहे. त्यानंतर १८९६ मध्ये दुसरी मूर्ती तयार केली. ती सध्या ट्रस्टच्या कोंढवा येथील केंद्रात आहे. सध्याची प्रसिद्ध मूर्ती १९६८ मध्ये मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केली गेली. या मूर्तीची निर्मिती कर्नाटकचे प्रख्यात शिल्पकार श्री. शंकरअप्पा शिल्पी यांनी केली.
मूर्ती बनवण्याचे काम सुरू असताना मोठे सूर्यग्रहण होते. या ग्रहणकाळात शिल्पकाराने देवाची विशेष आराधना केली. मूर्तीच्या उदरभागात एक सिद्ध केलेले श्रीयंत्र बसवले आहे. या यंत्रामुळे मूर्तीचे आध्यात्मिक तेज काळानुसार वाढत राहील अशी भक्तांची श्रद्धा आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे आकर्षण अनेक दिग्गज व्यक्तींना आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी आपले पहिले गाणे याच गणपतीच्या मंडपात गायले होते. भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी १९७५ मध्ये या गणपतीची आरती केली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी या गणपतीला नवस बोलला होता. अमिताभ बच्चन बरे झाल्यानंतर त्यांनी स्वतः पुण्यात येऊन गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले. आजही अनेक कलाकार, राजकारणी आणि खेळाडू या गणपतीच्या दर्शनासाठी येतात.
या मंदिराची स्थापत्यशैली प्राचीन भारतीय मंदिर परंपरा आणि आधुनिक भव्यता यांचा संगम आहे. मंदिराचे मुख्य बांधकाम दगडी आणि संगमरवरी पाषाणात केले आहे. प्रवेशद्वार अत्यंत भव्य आणि नक्षीदार आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भिंतींना लावलेली काचेची तावदाने. यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या भक्तांना गणेशाचे दर्शन सहज घेता येते. मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींवर बारीक आणि कलात्मक नक्षीकाम केले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी ७.५ फूट उंच आणि ४ फूट रुंद अशी गणेशाची सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती भव्य आकारासोबतच सुबकता आणि तेजामुळे भाविकांना भुरळ घालते. गणपतीचे कान, हात आणि मुकुट शुद्ध सोन्याचे आहेत. त्यावर हिरे, माणके आणि पाचू यांसारखी मौल्यवान रत्ने आहेत.
मंदिराचे शिखर आणि कळस पारंपरिक भारतीय स्थापत्यशैलीची साक्ष देतात. मंदिराच्या छतावरील कठड्यावर स्वस्तिक चिन्ह आणि मंगल कलश यांची सजावट आहे. हे शिखर अनेक स्तरांमध्ये विभागलेले आहे. वरच्या दिशेला ते निमुळते होत जाते. संपूर्ण शिखराला सोनेरी झळाळी दिली आहे. त्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर ते अधिक सुंदर दिसते. शिखराच्या प्रत्येक स्तरावर कोरीव काम केले आहे. त्यामध्ये लहान मेघडंबरी आणि गवाक्षांची रचना आहे. शिखराच्या शिरोभागी सोन्याचा कळस आहे. मुख्य शिखराच्या आजूबाजूला लहान आकाराचे घुमट आणि छत्र्यांची रचना केली आहे. यामुळे ही वास्तू एखाद्या राजवाड्यासारखी भासते. रात्रीच्या वेळी जेव्हा या शिखरावर विद्युत रोषणाई केली जाते तेव्हा मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते.
या मंदिरात गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यांसारखे सण साजरे होतात. गणेशोत्सवाच्या काळात येथे दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरांचे भव्य देखावे साकारले जातात. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत या गणपतीचा रोषणाई केलेला रथ पाहण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात. ऋषिपंचमीच्या दिवशी होणारे हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा येथील शिस्तबद्ध उपक्रम आहे. दररोज सकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना या गणपतीचे दर्शन घेता येते. सकाळी, दुपारी व सायंकाळी येथे आरती केली जाते. यासह अभिषेक आणि मूर्तीचा शृंगार केला जातो. रात्री १०.३० वाजता शेजारती होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट शैक्षणिक महत्त्वासोबतच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान देते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे आणि गरजू रुग्णांवर उपचार करणे अशा प्रकारच्या सेवाही ट्रस्टतर्फे दिल्या जातात.
उपयुक्त माहिती
पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
स्वारगेट एसटी स्थानकापासून ३.३ किमी अंतरावर
देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपब्लध
खासगी वाहने मंदिराशेजारी असणाऱ्या महापालिकेच्या वाहनतळावर ठेवता येतात
पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएल बस सुविधा
परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२० २४४९६४६४
Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Temple
Budhwar Peth, Pune City, Pune District
The Shrimant Dagadusheth Halwai Ganapati Temple holds an extremely significant place in the cultural and religious history of Pune city. When one speaks of Ganapati in Pune, the name Shrimant Dagadusheth Halwai is the first to come to mind. This deity is renowned worldwide as the Ganapati who fulfills vows. This Ganapati is considered the wealthiest and most benevolent deity in Pune. This temple and the annual public festival celebrated here are regarded as an integral part of Pune’s cultural tradition.
This temple was established in 1893. The story behind it is that Dagadusheth Gadve, originally from Ausa village in Latur district, came to Pune for business. He started his sweetmeat business in Budhwar Peth. As his business grew significantly, people began to know him by the name ‘Halwai’ (sweetmaker). This later became his surname. Dagadusheth was a successful merchant. He was renowned for his virtuous character and generosity. Recognizing his social work, the British honored him with the title ‘Nagarseth’ (City Elder). Dagadusheth had a fondness for exercise. He himself was an accomplished wrestler. He was known as the ‘Vastad’ (master) of Pune’s famous Jagaba Talim (wrestling arena). He had trained many wrestlers.
A tragic event suddenly occurred in the lives of Dagadusheth and his wife, Lakshmibai. Around 1892, Pune faced the severe calamity of the plague epidemic. In this epidemic, they lost their only son. The death of their son brought immense sorrow upon the couple. A sense of detachment from worldly life arose in their hearts. It was during this difficult period that they met their spiritual guru, Shri Madhavnath Maharaj. Maharaj consoled the grieving couple. Maharaj advised them to consecrate idols of Shri Dattatreya and Ganapati. He told them to serve these deities as if they were their own child. Maharaj blessed them, saying that these deities would spread their name and fame across the world. Maharaj’s words gave Dagadusheth new hope. He found the strength to live.
He consecrated a clay idol of Ganapati and a marble idol of Datta in Budhwar Peth. Even today, the Shrimant Lakshmibai Dagadusheth Halwai Datta Temple and Ganapati Temple are famous in their name. The history of this Ganapati is linked with the Indian freedom struggle. This Ganapati was established in 1893. The public nature of this festival was inspired by Lokmanya Tilak. During that period, the British had banned political gatherings. However, religious events were legally permitted. Recognizing this opportunity, Lokmanya Tilak called for a public Ganesh festival in 1894. This brought people together. A sense of patriotism was instilled in them. In 1896, Dagadusheth Halwai decided to celebrate the public Ganesh festival in his temple. The consecration (Pranapratishtha) of this Ganapati idol was performed by Lokmanya Tilak. This is a significant event in Pune’s history.
In the initial period, this Ganapati was known as ‘Kotwal Chavadi cha Ganapati’. It was also called ‘Bahulichya Houdacha Ganapati’ (Ganapati of the Doll’s Pond). Dr. Vishram Ghole had built a pond there in memory of his deceased daughter. There was a doll on that pond. From that, the Ganapati in this area got its name. The magnificent idol present in the temple today is the third idol of the Mandal (trust). The first idol was created by Baburao Naik in 1893. It is currently in the Ram Temple in Shukrawar Peth. Subsequently, the second idol was made in 1896. It is currently at the Trust’s center in Kondhwa. The current famous idol was created in 1968 on the occasion of the Mandal’s Amrit Mahotsav (Diamond Jubilee). This idol was crafted by the renowned sculptor from Karnataka, Shri Shankarappa Shilpi.
While the work of making the idol was underway, there was a major solar eclipse. During this eclipse period, the sculptor performed special worship of the deity. A consecrated Shri Yantra has been installed in the abdomen of the idol. Devotees believe that due to this Yantra, the spiritual radiance of the idol will continue to grow over time. The Dagadusheth Halwai Ganapati holds a special allure for many eminent personalities. Ganasamradni Lata Mangeshkar sang her first song at the age of eight in the pandal (marquee) of this very Ganapati. Former President of India, Fakruddin Ali Ahmed, performed the aarti of this Ganapati in 1975. Jaya Bachchan, wife of superstar Amitabh Bachchan, had made a vow to this Ganapati. After Amitabh Bachchan recovered, she herself came to Pune and offered golden ears to Ganapati. Even today, many artists, politicians, and athletes come to seek darshan (blessings) of this Ganapati.
The architectural style of this temple is a confluence of ancient Indian temple tradition and modern grandeur. The main construction of the temple is done in stone and marble. The entrance is extremely grand and intricately carved. A unique feature of this temple is the glass panels installed on its walls. This allows devotees passing by on the main road to easily have darshan of Ganesha. The walls of the temple’s sanctum sanctorum (garbhagriha) are adorned with delicate and artistic carvings. In the center of the garbhagriha is a beautiful idol of Ganesha, 7.5 feet tall and 4 feet wide. This idol captivates devotees not only with its grand size but also with its elegance and radiance. Ganapati’s ears, hands, and crown are made of pure gold. They are adorned with precious gems like diamonds, rubies, and emeralds.
The temple’s shikhara (spire) and kalasha (finial) bear witness to traditional Indian architectural style. The parapet on the temple’s roof is adorned with Swastika symbols and Mangal Kalash (auspicious pots). This shikhara is divided into many tiers. It tapers upwards. The entire shikhara has been given a golden sheen. It appears even more beautiful when sunlight falls upon it. Each tier of the shikhara features intricate carvings. These include small Meghadambari (canopies) and Gavaksha (arch-shaped windows) designs. At the pinnacle of the shikhara is a golden kalasha. Smaller domes and chhatris (umbrella-shaped pavilions) are designed around the main shikhara. This makes the structure resemble a royal palace. At night, when the shikhara is illuminated with electric lights, the beauty of the temple is further enhanced.
In this temple, festivals like Ganesh Jayanti, Sankashta Chaturthi, and Vinayaka Chaturthi are celebrated. During Ganesh Utsav, magnificent replicas of famous temples from across the nation are erected here every year. Thousands of devotees gather to witness this Ganpati’s illuminated chariot during the immersion procession on Anant Chaturdashi. The collective recitation of Atharvashirsha by thousands of women on Rishi Panchami is a highly disciplined and cherished event here. Devotees can have Darshan of this Ganpati daily from 5:30 AM to 11:00 PM. Aarti is performed here in the morning, afternoon, and evening. Additionally, Abhishekam and the divine adornment (Shringar) of the idol are performed. Shejarati is offered at 10:30 PM. The Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust makes significant contributions not only in the educational sphere but also in the health and social sectors. Services such as assisting underprivileged students and providing medical treatment to needy patients are also rendered by the Trust.
Useful Information
2 km from Pune Railway Station and Bus Stand
3.3 km from Swargate ST Stand
Flight, train, and bus services are available from many cities across the country to reach here
Private vehicles can be parked at the Municipal Corporation parking lot adjacent to the temple
PMPML bus facility from many parts of Pune
Many options for accommodation and breakfast in the vicinity
Contact: Temple Office, Phone: 020 24496464
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर
बुधवार पेठ, पुणे शहर, ता. जि. पुणे
पुणे शहर के सांस्कृतिक और धार्मिक इतिहास में श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिर का स्थान अत्यंत महत्वपूर्ण है। पुणे के गणपति की बात करें तो आँखों के सामने सबसे पहले श्रीमंत दगडूशेठ हलवाई का नाम आता है। मन्नतें पूरी करने वाले गणपति के रूप में इस देवता की ख्याति जगभर है। इस गणपति को पुणे का सबसे श्रीमंत और अत्यंत उदार देवता माना जाता है। यह मंदिर और हर साल यहाँ होने वाला सार्वजनिक उत्सव पुणे की सांस्कृतिक परंपरा का अविभाज्य अंग माना जाता है।
इस मंदिर की स्थापना १८९३ में हुई। इसके पीछे की कथा यह है कि मूल रूप से लातूर जिले के औसा गाँव के दगडूशेठ गाडवे व्यवसाय के निमित्त पुणे आए। उन्होंने बुधवार पेठ में अपना मिठाई का व्यवसाय शुरू किया। उनका व्यवसाय बहुत बड़ा होने के कारण लोग उन्हें ‘हलवाई’ के नाम से जानने लगे। आगे चलकर वही उनका उपनाम हो गया। दगडूशेठ एक सफल व्यापारी थे। अत्यंत शीलवान और दानवीर के रूप में वे प्रसिद्ध थे। उनके सामाजिक कार्यों को ध्यान में रखते हुए अंग्रेजों ने उन्हें ‘नगरशेठ’ का सम्मान दिया। दगडूशेठ को व्यायाम का शौक था। वे स्वयं एक निपुण पहलवान थे। वे पुणे की प्रसिद्ध जगाबा तालिम के उस्ताद के रूप में जाने जाते थे। उन्होंने अनेक पहलवानों को तैयार किया था।
दगडूशेठ और उनकी पत्नी लक्ष्मीबाई के जीवन में अचानक एक दुखद घटना घटी। १८९२ के आसपास पुणे पर प्लेग की महामारी का भीषण संकट आया। इस महामारी में उन्होंने अपने इकलौते बेटे को खो दिया। बेटे की मृत्यु से इस दंपति पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। उनके मन में संसार के प्रति विरक्ति उत्पन्न हो गई। इसी कठिन समय में उनकी भेंट आध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज से हुई। महाराज ने इस शोकाकुल दंपति को धैर्य दिया। महाराज ने उन्हें श्री दत्तात्रेय और गणपति की मूर्ति स्थापित करने की सलाह दी। उन्होंने कहा कि इन देवताओं की सेवा अपने बेटे की तरह करें। महाराज ने आशीर्वाद दिया कि ये देवता आपका नाम और कीर्ति जगभर फैलाएँगे। महाराज के शब्दों से दगडूशेठ को नई उम्मीद मिली। उन्हें जीने की शक्ति मिली।
उन्होंने बुधवार पेठ में गणपति की मिट्टी की मूर्ति और दत्तात्रेय की संगमरमरी मूर्ति स्थापित की। आज भी श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर और गणपति मंदिर उनके नाम से प्रसिद्ध है। इस गणपति का इतिहास भारतीय स्वतंत्रता संग्राम से जुड़ा हुआ है। १८९३ में इस गणपति की स्थापना हुई। इस उत्सव को सार्वजनिक स्वरूप लोकमान्य तिलक की प्रेरणा से मिला। उस समय अंग्रेजों ने राजनीतिक सभाओं पर प्रतिबंध लगा रखा था। धार्मिक कार्यक्रमों को कानूनी अनुमति थी। इस अवसर को पहचानते हुए लोकमान्य तिलक ने १८९४ में सार्वजनिक गणेशोत्सव का आह्वान किया। इससे लोग एकजुट हुए। उनमें राष्ट्रभक्ति की भावना उत्पन्न हुई। १८९६ में दगडूशेठ हलवाई ने अपने मंदिर में सार्वजनिक गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया। इस गणपति की मूर्ति की प्राणप्रतिष्ठा लोकमान्य तिलक के हाथों हुई। यह पुणे के इतिहास की एक बड़ी घटना है।
शुरुआती दौर में यह गणपति ‘कोतवाल चावड़ी का गणपति’ के नाम से जाना जाता था। इसे ‘बाहुली के हौद का गणपति’ भी कहते थे। डॉक्टर विश्राम घोले ने अपनी मृत बेटी की स्मृति में वहाँ एक हौद (कुंड) बनवाया था। उस हौद पर एक गुड़िया थी। उसी से इस क्षेत्र के गणपति को यह नाम मिला। आज मंदिर में जो भव्य मूर्ति है, वह मंडल की तीसरी मूर्ति है। पहली मूर्ति १८९३ में बाबूराव नाइक ने तैयार की थी। वह वर्तमान में शुक्रवार पेठ के राम मंदिर में है। उसके बाद १८९६ में दूसरी मूर्ति तैयार की गई। वह वर्तमान में ट्रस्ट के कोंढवा स्थित केंद्र में है। वर्तमान की प्रसिद्ध मूर्ति १९६८ में मंडल के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में तैयार की गई। इस मूर्ति का निर्माण कर्नाटक के प्रख्यात शिल्पकार श्री शंकरअप्पा शिल्पी ने किया।
मूर्ति बनाने का काम शुरू होने के दौरान एक बड़ा सूर्यग्रहण था। इस ग्रहणकाल में शिल्पकार ने देवता की विशेष आराधना की। मूर्ति के उदर भाग में एक सिद्ध किया हुआ श्रीयंत्र स्थापित किया गया है। भक्तों की श्रद्धा है कि इस यंत्र के कारण मूर्ति का आध्यात्मिक तेज समय के साथ बढ़ता रहेगा। दगडूशेठ हलवाई गणपति का आकर्षण अनेक दिग्गज व्यक्तियों को है। गानसम्राज्ञी लता मंगेशकर ने अपनी आठवें वर्ष में अपना पहला गाना इसी गणपति के मंडप में गाया था। भारत के पूर्व राष्ट्रपति फखरुद्दीन अली अहमद ने १९७५ में इस गणपति की आरती की थी। महानायक अमिताभ बच्चन की पत्नी जया बच्चन ने इस गणपति से मन्नत माँगी थी। अमिताभ बच्चन के ठीक होने के बाद उन्होंने स्वयं पुणे आकर गणपति को सोने के कान अर्पित किए। आज भी अनेक कलाकार, राजनेता और खिलाड़ी इस गणपति के दर्शन के लिए आते हैं।
इस मंदिर की स्थापत्य शैली प्राचीन भारतीय मंदिर परंपरा और आधुनिक भव्यता का संगम है। मंदिर का मुख्य निर्माण पत्थरों और संगमरमरी पाषाण में किया गया है। प्रवेश द्वार अत्यंत भव्य और नक्काशीदार है। इस मंदिर की विशेषता यहाँ की दीवारों पर लगे काँच के फलक हैं। इससे मुख्य सड़क से आने-जाने वाले भक्तों को गणेश जी के दर्शन सहजता से हो जाते हैं। मंदिर के गर्भगृह की दीवारों पर बारीक और कलात्मक नक्काशी की गई है। गर्भगृह के मध्य में ७.५ फुट ऊँची और ४ फुट चौड़ी गणेश जी की सुंदर मूर्ति है। यह मूर्ति भव्य आकार के साथ-साथ सुंदरता और तेज के कारण भक्तों को मोहित करती है। गणपति के कान, हाथ और मुकुट शुद्ध सोने के हैं। उन पर हीरे, माणिक और पन्ना जैसे बहुमूल्य रत्न जड़े हैं।
मंदिर का शिखर और कलश पारंपरिक भारतीय स्थापत्य शैली की गवाही देते हैं। मंदिर की छत पर बनी मुंडेर पर स्वस्तिक चिन्ह और मंगल कलश की सजावट है। यह शिखर अनेक स्तरों में विभाजित है। ऊपर की ओर यह संकरा होता जाता है। पूरे शिखर को सुनहरी चमक दी गई है। उस पर सूर्यप्रकाश पड़ने पर वह और भी सुंदर दिखता है। शिखर के प्रत्येक स्तर पर नक्काशी का काम किया गया है। उसमें छोटी मेघडंबरी और गवाक्षों की रचना है। शिखर के शीर्ष भाग पर सोने का कलश है। मुख्य शिखर के आसपास छोटे आकार के गुंबद और छतरियों की रचना की गई है। इससे यह वास्तुकला किसी राजमहल जैसी प्रतीत होती है। रात के समय जब इस शिखर पर विद्युत रोशनी की जाती है, तब मंदिर का सौंदर्य और भी निखर उठता है।
इस मंदिर में गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी और विनायक चतुर्थी जैसे पर्व मनाए जाते हैं। गणेशोत्सव के दौरान यहां हर साल देश के प्रसिद्ध मंदिरों की भव्य झाँकियाँ बनाई जाती हैं। अनंत चतुर्दशी की विसर्जन शोभायात्रा में इस गणपति का रोशनी से सजा रथ देखने के लिए हजारों नागरिक उमड़ पड़ते हैं। ऋषिपंचमी के दिन होने वाला हजारों महिलाओं का सामूहिक अथर्वशीर्ष पाठ यहां का एक अनुशासित कार्यक्रम है। रोज सुबह साढ़े पांच बजे से रात ग्यारह बजे तक श्रद्धालुओं को इस गणपति के दर्शन कर सकते हैं। सुबह, दोपहर और शाम को यहां आरती की जाती है। इसके साथ ही अभिषेक और मूर्ति का श्रृंगार किया जाता है। रात १०.३० बजे शेजारती होती है। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट शैक्षणिक महत्व के साथ ही स्वास्थ्य और सामाजिक क्षेत्र में भी बड़ा योगदान देता है। गरीब छात्रों की सहायता करना और जरूरतमंद मरीजों का इलाज करना, इस प्रकार की सेवाएं भी ट्रस्ट द्वारा दी जाती हैं।
उपयोगी जानकारी
पुणे रेलवे स्टेशन और बस स्टैंड से २ किमी की दूरी पर
स्वारगेट एसटी स्टैंड से ३.३ किमी की दूरी पर
देश भर के कई शहरों से यहां आने के लिए विमान, रेल और बस सेवाएं उपलब्ध हैं
निजी वाहन मंदिर के पास स्थित नगर निगम के पार्किंग स्थल पर रखे जा सकते हैं