रामवरदायिनी मंदिर

पार (जावळी खोरे), ता. महाबळेश्वर, जि. सातारा

जावळीचे खोरे हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात या खोऱ्याला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी म्हणजेच जावळीच्या खोऱ्यात शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. या ठिकाणाला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे, तसेच धार्मिकदृष्ट्याही हे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून काही अंतरावर असलेल्या पार या गावातील आदिशक्ती रामवरदायिनी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागृत स्थानांपैकी एक मानले जाते. प्रत्यक्ष श्रीरामांनी या देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

सह्याद्रीच्या कुशीत आणि दाट जंगलांनी वेढलेले पार हे गाव म्हणजे पूर्वीचे पार्वतीपूर. दैनंदिन वापरात सोयीचे व्हावे म्हणून या नावातील पहिले शेवटचे अक्षर घेऊन ते पार असे रूढ झाले. पार्वतीपूरचे पार कधी झाले, याबाबत नेमका उल्लेख नसला तरी या गावाचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांत सापडतो. येथील रामवरदायिनीची स्थापना श्रीरामांनी केल्याचा उल्लेख एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणातीलअरण्यकांडया भागात श्रीधर स्वामींच्या रामविजय ग्रंथात आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवाजी महाराजांनी केलेल्या विनंतीनुसार समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर वास्तव्यास आले होते. त्यावेळी या श्रीरामवरदायिनी देवीच्या दर्शनासाठी ते पार्वतीपूर गावात आले होते. देवीच्या चरणी त्यांनी सुवर्णपुष्पे वाहिली, डोळे मिटले आणि तिची करुणा भाकू लागले. तुळजापूर ठाकेना चालिली पश्चिमेकडे ।। पारघाटी जगन्माता सद्य येऊनी राहिली ।। ऐसी तू दयाळू माता हेमपुष्पचि घेतले ।। भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या देवीपुढे समर्थांनी हिंदवी स्वराज्याच्या उत्कर्षाचे मागणे मागितले होते.

रामवरदायिनी मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी येथे घनदाट जंगल होते. त्यात अतिबळ आणि महाबळ नावाचे न राक्षस राहत होते. या दोघांची येथे दहशत होती. त्यांचा वध करण्यासाठी देवांनी दोविष्णूकडे धाव घेतली. विष्णूबरोबर झालेल्या युद्धात अतिबळ मारला गेला; परंतु महाबळाचा मात्र विष्णूला वध करता आला नाही. म्हणून सर्व देवांनी आदिशक्तीला महाबळाचा वध करण्याची विनंती केली. त्यानुसार आदिशक्तीने महाबळावर आपली मोहिनी टाकली. आदिशक्तीच्या मोहिनीत दंग असलेल्या महाबळाने आपण सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहोत, त्यामुळे देवांनी माझ्याकडे वर मागावा, असे सांगितले. त्यानुसार देवांनी त्याचा मृत्यू व्हावा, असा वर मागितला. महाबळाने नाईलाजाने तो मान्य केला, पण त्याच वेळी त्यानेही देवांकडे एक वर मागितला तो असा की मी पर्वतरूपात येथेच वास्तव्य करेन आणि त्या पर्वतावर आदिशक्तीने वास्तव्य करावे. देवांनी त्याची इच्छा मान्य करून येथील कोयना नदीच्या तीरावर आदिशक्तीची स्थापना केली. तीच या मंदिरातील वरदायिनी देवी होय.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, रावणाकडून अपहरण झाल्यानंतर सीतेचा शोध घेणाऱ्या श्रीरामांची परीक्षा पहावी म्हणून माता पार्वती सीतेचे रूप घेऊन श्रीरामांसमोर उभी राहिली; परंतु श्रीरामांनी माता पार्वतीचे खरे स्वरूप जाणले आणि हे माते, तू का उगाच त्रास करून घेते आहेस, असे नम्रपणे विचारले. त्यावेळी माता पार्वती प्रसन्न झाली श्रीरामांना कार्यात यश येईल, असा आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. त्यानंतर श्रीरामांनी या स्थानावर तिची स्थापना केली. श्रीरामांना वर देणारी म्हणून रामवरदायिनी या नावाने ती ओळखली जाऊ लागली. या आख्यायिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून या मंदिराचे महात्म्य ते प्राचीन असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

महाबळेश्वरपोलादपूर मार्गावर प्रतापगड किल्ल्याच्या आधी कुंभरोशी गाव आहे. या मार्गावर एक कमान असून त्यातून पार गावाकडे जाता येते. कमानीपासून सुमारे चार किमी अंतरावर आदिशक्ती रामवरदायिनी देवीचे मंदिर आहे. पूर्वीचे काळ्या पाषाणातील असलेल्या या मंदिराला काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर सध्याचे स्वरूप आले आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या सर्व बाजूंनी तटबंदी असून मंदिर परिसर अतिशय स्वच्छ नीटनेटका ठेवलेला दिसतो. मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय दीपमाळ, मानाई झोळाई देवीची छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून या मंडपातून काही पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश करता येतो. येथील गाभारा देवीचे स्थान पूर्वीचेच आहे. गर्भगृहात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत, त्यापैकी डाव्या बाजूला अडीच फूट उंचीची श्री वरदायिनी देवीची मूर्ती उजव्या बाजूला तीन फूट उंचीची श्रीरामवरदायिनीची मूर्ती आहे.

आदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवीचे हे स्थान महाराष्ट्रातील एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. रामवरदायिनी देवी ही अनेक नामवंत घराण्यांची कुलदेवता आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच भाविकांचा राबता असतो. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी येथे मंदिर ट्रस्टतर्फे भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे.

चैत्र वद्य त्रयोदशीपासून वैशाख शुद्ध षष्ठीपर्यंत येथे यात्रा असते. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र अमावस्येला परिसरातील गावांमधून त्या त्या गावचे ग्रामदैवत गुढी (काठीच्या) रूपात मंदिराजवळ आणले जातात. श्रीरामवरदायिनी देवी मंदिराच्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे, तेथे बगाड लागते. यात्रेचा शेवटच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीला छबिना म्हणतात. या दिवशी पहाटे पाच वाजता देवीची मूर्ती पालखीत ठेवून गावातून वाजतगाजत तिची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मंदिरात लघुरूद्राभिषेक, होमहवन असे विविध कार्यक्रम होतात. नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यानंतर पुढील नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो.

मंदिराशिवाय या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे पार ऊर्फ पार्वतीपूर हे गाव शिवकाळापासून वाणसामान, कापड जीवनावश्यक वस्तूंची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. हे गाव पेठपार, पारपार आणि सोंडपार या तीन वस्त्यांमध्ये विभागले आहे. येथील परिसर अतिशय रम्य असून पार गावाच्या शेजारीच कोयना नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी महाराजांनी बांधलेला भक्कम, दगडी बांधणीचा, लांबरुंद पूल आहे. चार कमानी असलेल्या या पुलाची लांबी १६ मीटर, तर रुंदी मीटर इतकी आहे. हा दगडी पूल आजही उत्तम स्थितीत असून यावरून बस, ट्रक यांसारखी अवजड वाहनेही जातात. या पुलाच्या बांधकामापूर्वी खालच्या बाजूला स्वतः शिवाजी महाराजांनी ज्या गणेशाची पूजा केली होती, ती छोटेखानी गणेशमूर्तीही येथे पाहता येते.

उपयुक्त माहिती:

  • महाबळेश्वरपासून ४४ किमी, तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून किमी अंतरावर
  • महाबळेश्वरपासून गावात एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • भक्त निवासामुळे निवासाची सुविधा आहे, न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर ट्रस्ट कार्यालय : ९४२०७७१५०९, ७५८८०५९३१८, ९४०४७३४३२०

मंदिर लोकेशन :

 

Back To Home