
घोगरा महादेव हे पारशिवनी तालुक्यातील दुंडाखैरी येथून वाहणाऱ्या पेंच नदीच्या पात्रातील मोठमोठ्या खडकांच्या (कातळ) मध्यभागी वसलेले देवस्थान आहे. अभ्यासकांच्या मते, हे स्थान १००० वर्षांपूर्वीचे असून विदर्भातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील खडकांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण आकार हे येथील आकर्षण आहे. हे ठिकाण मंदिरासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणूनही विदर्भात प्रसिद्ध असून नागपूर जिल्ह्यातील पहिल्या ५ पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश होतो.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या तालुक्याच्या शहरापासून जवळच असलेल्या दुंडाखैरी गावात घोगरा महादेवाचे स्थान आहे. सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावणाऱ्या व नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच नदीच्या पात्रामधून या देवस्थानाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावर नदीपात्रात सुमारे ३० ते ४० पूजा साहित्य व भाकरी–ठेच्याची दुकाने आहेत. येथील ज्वारीची भाकरी व मिरचीचा ठेचा प्रसिद्ध आहे. या दुकानांच्या पुढे गेल्यावर नदीपात्रात पाणी वाहत असते.
या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथून वाहणारे पाणी हे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असते. या वाहत्या पाण्यातूनच घोगरा महादेवाच्या स्थानापर्यंत जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. आजूबाजूने वाहणारा नदीचा प्रवाह, मध्यभागी पांढऱ्या खडकांपासून बनलेला ‘चक्रव्यूह’ असून त्यात हे स्थान आहे. त्यामुळे या स्थानाला ‘विदर्भाचे कैलास’ असेही म्हटले जाते.
पायरी मार्गावरून देवस्थानाकडे जाताना प्रथम गणेशाचे दर्शन होते. येथे एका उंचवट्यावर प्राचीन गणेशमूर्ती आहे. याशिवाय एका छोट्याशा मंदिरामध्ये कश्यप, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भरद्वाज, अभेय व वशिष्ठ ऋषी यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्यासमोर एक शिवलिंग आहे. तेथून खडकांमधील रस्त्याने पुढे गेल्यावर श्री नागदेवतेचे स्थान आहे. एका उंच चौथऱ्यावर ५ फण्यांची नागदेवता असून त्याच्या समोरील बाजूस नंदीचे स्थान आहे. या
नागदेवतेसमोर अनेक त्रिशूळ आहेत. भाविकांनी नवसपूर्तीसाठी ते वाहिलेले आहेत.
नागदेवतेच्या स्थानापासून घोगरा महादेव मंदिरासाठी पुढे खडकांतून मार्ग सुरू होतो. विविध रंगांच्या व आकाराच्या खडकांतून वाट काढत पुढे जावे लागते. नदी पात्रातील खडकांची नैसर्गिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे खडक निर्माण झाल्याचे सांगितले जाते. ऊन, वारा, पाऊस व नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे या खडकांची झीज होऊन त्यावर नैसर्गिकरित्या तयार झालेले नक्षीकाम अतीव सुंदर भासते. या खडकांच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो. (जबलपूरमधील बंदर कुदनी या स्थानावर नर्मदा नदी संगमरवरी पर्वतातून अशा चिंचोळ्या स्थानातून वाहत असते. असे सांगितले जाते की या स्थानावर नर्मदा नदीची खोली सर्वाधिक आहे. घोगरा महादेव येथील हे स्थान पाहिल्यावर बंदर कुदनी या नर्मदेवरील स्थानाचा भास होतो.)
येथून पुढे घोगरा महादेवाचे स्थान आहे. एका उंच स्थानावर महादेवांची निळ्या रंगातील मूर्ती असून बाजूला नंदी आहे. त्याच्या खालच्या भागातील एका खडकाला शिवलिंगासारखा आकार आलेला आहे. हा खडक म्हणजे येथील पवित्र ज्योतिर्लिंग असल्याचे भाविक मानतात. असे सांगितले जाते की येथील शेकडो खडकांवर ऊन,
पाऊस, हवा, पाण्याचा प्रवाह याचा परिणाम होऊन त्यांची झीज वा आकार बदलले असले तरी कित्येक वर्षांपासून या ज्योतिर्लिंगाच्या खडकाचा आकार मात्र तसाच आहे. याशिवाय या ज्योतिर्लिंगाच्या बाजूला एका खडकाच्या खोलीत नागदेवतेचा आकार आलेला असून त्याखाली स्वयंभू शिवपिंडी आहे. येथील विविध खडकांच्या खोलीत श्री नारायण देव, मोतण शेष व अनेक स्वयंभू शिवलिंग आहेत.
प्रत्येक शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी येथे हजारो भाविक व पर्यटकांची गर्दी होते. या दिवसांमध्ये परिसराला जत्रेचे स्वरूप येते.
पेंच नदी पात्रातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासोबतच येथील स्थानिक महिलांनी बनविलेल्या चुलीवरच्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीच्या ठेच्याचाही आस्वाद पर्यटकांकडून आवर्जून घेतला जातो. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्या दिवशी १ लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीला पाणी जास्त असल्यामुळे नदी पात्रात असलेल्या घोगरा महादेवाच्या दर्शनाला जाता येत नाही; परंतु तेव्हाही पर्यटनासाठी या परिसरात पर्यटकांची गर्दी असतेच.

घोगरा महादेव का यह देवस्थान पारशिवनी तहसील के दुंडाखैरी गाँव से बहने वाली पेंच नदी की धारा में स्थित विशाल शिलाखंडों के मध्य भाग में स्थित है। विद्वानों के अनुसार, यह स्थान लगभग १००० वर्ष प्राचीन है। यह विदर्भ के प्राचीन व प्रसिद्ध मंदिरों में से एक है। जलप्रवाह के कारण यहाँ के शिलाखंडों को प्राप्त विशिष्ट आकार इस स्थान का आकर्षण हैं। यह स्थान मंदिर होने के साथ-साथ पर्यटन क्षेत्र के रूप में भी विदर्भ में प्रसिद्ध है। नागपुर जिले के पहले ५ पर्यटन स्थलों में यह सम्मिलित है।
नागपुर जिले की पारशिवनी तहसील के पास स्थित दुंडाखैरी गाँव में घोगरा महादेव का स्थान है। सातपुड़ा पर्वत श्रेणी से उत्पन्न और नागपुर शहर को जलापूर्ति करने वाली पेंच नदी की धारा से होकर इस देवस्थान तक जाने का मार्ग है। इस मार्ग पर नदी तल में लगभग ३० से ४० पूजा सामग्री तथा ज्वार की रोटी व मिर्च की चटनी की दुकानें हैं। यहाँ की ज्वार की रोटी और मिर्च की चटनी प्रसिद्ध है। इन दुकानों के आगे बढ़ने पर नदी की धारा में बहता हुआ जल मिलता है। इस स्थान की विशेषता यह है कि यहाँ बहने वाला जल स्फटिक के समान स्वच्छ होता है। इसी बहते पानी से होकर घोगरा महादेव के स्थान तक पहुँचने के लिए सीढ़ी मार्ग है।
चारों ओर बहता नदी का प्रवाह, बीच में श्वेत शिलाखंडों से बना ‘चक्रव्यूह’ और उसके भीतर यह स्थान स्थित है। इसी कारण इसे ‘विदर्भ का कैलाश’ भी कहा जाता है।
सीढ़ी मार्ग से देवस्थान की ओर जाते समय सबसे पहले गणेश के दर्शन होते हैं। यहाँ एक उभार पर प्राचीन गणेश पाषाण मूर्ति है। इसके अतिरिक्त एक छोटे से मंदिर में कश्यप, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, भरद्वाज, अभेय और वशिष्ठ ऋषि की पाषाण मूर्तियाँ हैं। उनके सामने एक शिवलिंग स्थापित है। वहाँ से शिलाखंडों के बीच बने मार्ग से आगे बढ़ने पर श्री नागदेवता का स्थान आता है। एक ऊँचे चबूतरे पर पाँच फनों वाले नागदेवता विराजमान हैं। उनके सामने नंदीमंडप है। नागदेवता के सम्मुख अनेक त्रिशूल हैं, जिन्हें श्रद्धालुओं ने इच्छापूर्ति के लिए अर्पित किया है।
नागदेवता के स्थान से घोगरा महादेव मंदिर के लिए आगे शिलाखंडों के बीच से मार्ग शुरू होता है। विभिन्न रंगों और आकारों के शिलाखंडों के बीच से होकर आगे जाना पड़ता है।
नदी तल के शिलाखंडों की प्राकृतिक रचना विशिष्ट है। कहा जाता है कि ये शिलाखंड ज्वालामुखी के विस्फोट से बने हैं। धूप, हवा, वर्षा और नदी के प्रवाह से इन शिलाखंडों का क्षरण होकर उन पर प्राकृतिक रूप से बना अलंकरण अत्यंत मनोहर प्रतीत होता है। इन शिलाखंडों की दरारों से जलधारा प्रवाहित रहती है। (जबलपुर के बंदरकुदनी नामक स्थान पर नर्मदा नदी संगमरमर पर्वतों के बीच ऐसे ही संकरे स्थान से बहती है। कहा जाता है कि वहाँ नर्मदा की गहराई सर्वाधिक है। घोगरा महादेव का यह स्थान देखने पर बंदरकुदनी का आभास होता है।)
यहाँ से आगे घोगरा महादेव का स्थान है। एक ऊँचे स्थान पर महादेव की नीले रंग की पाषाण मूर्ति है और पास में नंदीमंडप है। उसके नीचे के भाग में एक शिलाखंड को शिवलिंग जैसा आकार प्राप्त है। श्रद्धालु इसे यहाँ का पवित्र ज्योतिर्लिंग मानते हैं। कहा जाता है कि सैकड़ों शिलाखंड धूप, बारिश, हवा और जलप्रवाह से घिसकर बदल गए। परंतु अनेक वर्षों से इस ज्योतिर्लिंग वाले शिलाखंड का आकार यथावत है।
इसके अतिरिक्त इस ज्योतिर्लिंग के पास ही एक शिला की गहराई में नागदेवता का आकार बना है। उसके नीचे स्वयंभू शिवलिंग है। यहाँ विभिन्न शिलाओं की गहराइयों में श्री नारायण देव, मोतण शेष और अनेक स्वयंभू शिवलिंग हैं।
प्रत्येक शनिवार, रविवार तथा सार्वजनिक अवकाश के दिनों में यहाँ हज़ारों श्रद्धालु और पर्यटक आते हैं। इन दिनों में परिसर का रूप मेले जैसा हो जाता है।
पेंच नदी की धारा के प्राकृतिक सौंदर्य का आस्वादन करने के साथ-साथ यहाँ स्थानीय महिलाओं द्वारा चूल्हे पर बनाई गई ज्वार की रोटी और मिर्च की चटनी का स्वाद भी पर्यटक विशेष रूप से लेते हैं। महाशिवरात्रि को यहाँ विशाल मेला लगता है।
उस दिन १ लाख से अधिक श्रद्धालु दर्शन को आते हैं, ऐसा उल्लेख है। वर्षा ऋतु में नदी में पानी अधिक होने से नदी तल में स्थित घोगरा महादेव के दर्शन के लिए जाना संभव नहीं होता।
परंतु तब भी पर्यटन के लिए इस क्षेत्र में पर्यटकों की भीड़ रहती है।