
नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील मंगळवारी पेठेत पंचमुखी महादेव व काळा गणेश ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमुळे मंगळवारी पेठ परिसराला उमरेडची प्राचीन देवस्थानांची भूमी म्हणून ओळखले जाते. येथे असलेल्या महादेवाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवपिंडी सतत पाण्याखाली असते. या मंदिरापासून १०० मीटर अंतरावर असलेले काळा गणपती मंदिरही उमरेडवासीयांचे श्रद्धास्थान आहे.
उमरेड शहरातील मेडिकल चौकाजवळ असलेले पाताळेश्वर मंदिर हे शेकडो वर्षांपासून भाविकांसोबतच अभ्यासकांनाही पडलेले एक कोडे आहे. मुख्य मार्गाला लागून असलेल्या या मंदिरात छोटेखानी सभामंडप आहे. त्यात नंदीची मूर्ती असून त्यापुढे सुमारे १० फूट खोल गाभारा आहे. या गाभाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो सतत पाण्याने भरलेला असतो. त्यातील पाण्याची पातळी कमी–जास्त होत असते; परंतु तेथील शिवपिंडी मात्र पाण्याखाली असते. गाभाऱ्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून पाण्याच्या पातळीपर्यंत पायरी मार्गाने जाता येते. गाभाऱ्यात पाणी कितीही भरलेले असले तरी ते नितळ असल्यामुळे पाण्यात असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घेता येते. येथील शिवपिंडीला ५ मुखे असल्यामुळे या देवस्थानाला पंचमुखी महादेव मंदिर असेही म्हटले जाते.
श्रावण महिन्यात गाभाऱ्यातील पाण्याची पातळी वाढत जाते. असे सांगितले जाते की मंदिरापासून सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या गांधीसागर तलावातील पाण्याची पातळी पावसाच्या पाण्याने जसजशी वाढते तशीच मंदिराच्या गाभाऱ्यात देखील वाढते. प्राचीन काळापासून तलावातील जलवाहिन्या थेट या पाताळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याशी जोडल्या गेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी स्थापत्य अभियंत्यांकडून गाभाऱ्यातील पाण्याचे जिवंत झरे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
मंदिर परिसर आटोपशीर असून छोटेसे सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिर लहान असले तरी येथील शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे ३० फूट उंच असलेल्या या शिखरावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती असून त्यावर गोलाकार कळस आहे. पाताळेश्वर मंदिर हे उमरेडमधील जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची दर्शासाठी गर्दी होते. याशिवाय श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.
पाताळेश्वर मंदिरापासून उत्तरेकडे हाकेच्या अंतरावर जागृत काळा गणेश मंदिर आहे. हे मंदिर साधारणतः २०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मेडिकल चौकात स्थित असलेल्या या प्राचीन मंदिरात सव्वादोन फूट उंचीची पूर्वाभिमुख गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेली आहे. गणेश मूर्तीच्या खाली दोन्ही बाजूला रिद्धि–सिद्धि विराजमान आहेत. डाव्या मांडीखाली मूषकराज आहेत. मूर्तीच्या एका हातात मोदक, दुसऱ्या हातात अक्षमाला, तिसऱ्या हातात अंकुश तर चौथ्यात कमळपुष्प आहे.
मंदिर गणेशपंचायतन स्वरूपाचे असून चारही बाजूने शिव–विष्णू–सूर्य–शक्तीसह मध्यवर्ती गणेशमूर्ती विराजमान आहे. गणेश मूर्तीच्या मागील डाव्या बाजूला अन्नपूर्णा माता, उजव्या बाजूला रथावर स्वार असलेली सूर्य देवतेची काळ्या पाषाणातील मूर्ती, समोरील डाव्या बाजूला विष्णूसोबत लक्ष्मी व गरुड, तर उजव्या बाजूला महादेवांची प्राचीन मूर्ती आहे. या गणेशाचे सर्व अलंकार जसे कंबरपट्टा, बाजूबंद, जाणवे व गळ्यातील कंठा यांवर सर्वत्र नाग कोरलेले आहेत म्हणून ही मूर्ती नागबंध गणेशमूर्ती म्हणून प्रचलित आहे. गणेशोत्सवातील १० दिवस येथे मोठा उत्सव असून उमरेडमधील हजारो भाविक यावेळी येथे दर्शनासाठी येतात. सार्वजनिक गणेशोत्सवात उमरेडमधील या काळा गणेश मंदिराला मानाचे स्थान असते. या मंदिरासोबतच पाताळेश्वर मंदिराच्या दक्षिणेला लाल गणपतीचे मंदिरही प्रसिद्ध आहे.
नागपुर जिले के उमरेड शहर के मंगलवारी पेठ क्षेत्र में स्थित पंचमुखी महादेव और काला गणेश के मंदिर प्रसिद्ध हैं। इन मंदिरों के कारण मंगलवारी पेठ क्षेत्र को उमरेड के प्राचीन देवस्थानों की भूमि के रूप में जाना जाता है। यहाँ स्थित महादेव मंदिर की विशेषता यह है कि यहाँ का शिवलिंग हमेशा पानी में डूबा रहता है। इस मंदिर से मात्र १०० मीटर की दूरी पर स्थित काला गणपति मंदिर भी उमरेडवासियों का श्रद्धास्थान है।
उमरेड शहर के मेडिकल चौक के पास स्थित पातालेश्वर मंदिर सैकड़ों वर्षों से न केवल श्रद्धालुओं बल्कि शोधकर्ताओं के लिए भी एक रहस्य बना हुआ है। मुख्य मार्ग पर स्थित इस मंदिर में एक छोटा सा सभामंडप है। इसमें नंदी की मूर्ति है और उसके आगे लगभग १० पद गहरा गर्भगृह है। इस गर्भगृह की विशेषता यह है कि यह हमेशा पानी से भरा होता है। इसमें पानी का स्तर घटता-बढ़ता रहता है, लेकिन शिवलिंग हमेशा पानी में रहता है। गर्भगृह में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं, जो पानी के स्तर तक जाती हैं। भले ही पानी कितना भी भरा हो, यह इतना निर्मल होता है कि उसमें डूबे शिवलिंग का दर्शन स्पष्ट रूप से किया जा सकता है। यहाँ के शिवलिंग में ५ मुख होने के कारण इस मंदिर को पंचमुखी महादेव मंदिर भी कहा जाता है।
श्रावण मास में गर्भगृह में पानी का स्तर बढ़ता जाता है। ऐसा कहा जाता है कि मंदिर से लगभग १ किमी दूर स्थित गांधीसागर तालाब का जलस्तर जैसे-जैसे वर्षा से बढ़ता है, उसी तरह इस मंदिर के गर्भगृह का भी जलस्तर बढ़ता है। प्राचीन काल से इस तालाब की जलवाहिनियाँ सीधे पातालेश्वर मंदिर के गर्भगृह से जुड़ी हुई हैं। कुछ वर्षों पहले जब मंदिर का जीर्णोद्धार किया गया, तब स्थापत्य अभियंताओं ने गर्भगृह में मौजूद जलस्रोतों को बंद करने का प्रयास किया, परंतु वे सफल नहीं हो सके।
मंदिर परिसर छोटा है। इसमें छोटा सा सभामंडप और गर्भगृह है। मंदिर भले ही छोटा हो, लेकिन इसका शिखर (कलश) विशेष रूप से आकर्षक है। लगभग ३० पद ऊँचे इस शिखर पर अनेक देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं और ऊपर वृत्ताकार कलश स्थापित है। पातालेश्वर मंदिर को उमरेड का जागृत देवस्थान माना जाता है। इसलिए हर सोमवार को श्रद्धालुओं की भीड़ यहाँ उमड़ती है। इसके अतिरिक्त श्रावण सोमवार और महाशिवरात्रि के दिन यह क्षेत्र मेले का रूप ले लेता है।
पातालेश्वर मंदिर से उत्तर दिशा में कुछ ही दूरी पर स्थित जागृत काला गणेश मंदिर है। यह मंदिर लगभग २०० वर्ष पुराना माना जाता है। मेडिकल चौक में स्थित इस प्राचीन मंदिर में लगभग २.२५ पद ऊँची, पूर्वाभिमुख, अखंड काले पाषाण से निर्मित गणेश मूर्ति है। गणेश मूर्ति के दोनों ओर नीचे रिद्धि और सिद्धि विराजमान हैं और बाईं जाँघ के नीचे मूषकराज स्थित हैं। मूर्ति के एक हाथ में मोदक, दूसरे में अक्षमाला, तीसरे में अंकुश और चौथे में कमल पुष्प है।
यह मंदिर गणेश पंचायतन शैली का है। इसमें चारों दिशाओं में शिव, विष्णु, सूर्य और शक्ति हैं और मध्य में गणेश मूर्ति विराजित है। गणेश मूर्ति के पीछे बाईं ओर अन्नपूर्णा माता, दाईं ओर रथारूढ़ सूर्य देवता की मूर्ति, सामने बाईं ओर विष्णु-लक्ष्मी-गरुड़ और दाईं ओर महादेव की प्राचीन मूर्ति स्थित है। इस गणेश मूर्ति के सभी आभूषणों जैसे कमरपट्टा, बाजूबंद, यज्ञोपवीत और गले की माला पर नागों की आकृति उकेरी गई है। इसलिए इस मूर्ति को “नागबन्ध गणेश मूर्ति” के नाम से जाना जाता है। गणेशोत्सव के १० दिनों में यहाँ भव्य उत्सव आयोजित होता है। इसमें उमरेड के हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। सार्वजनिक गणेशोत्सव में इस काले गणेश मंदिर को विशेष प्रतिष्ठा प्राप्त है। इस मंदिर के साथ-साथ, पातालेश्वर मंदिर के दक्षिण में स्थित लाल गणपति मंदिर भी प्रसिद्ध है।