
नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरातील टेकडी गणेश हे देवस्थान विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. मुद्गल पुराणात या स्थानाचा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या मध्यभागी पिंपळाच्या झाडाखाली असलेली या मंदिरातील मूर्ती शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. हे देवस्थान नागपूरमधील सर्वात श्रीमंत म्हणून गणले जाते. नागपूर शहरातील टेकडीवर स्थित असल्यामुळे या गणेशाचे नाव ‘टेकडी गणेश’ असे रूढ झाले.
मंदिराबाबत असे सांगितले जाते की १८६६ मध्ये येथील टेकडी फोडून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करताना कामगारांना गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती सापडली. ज्यावेळी ही मूर्ती कामगारांना दिसली त्यावेळी अचानक आकाश भरून आले व विजांचा कडकडाट सुरू झाला. कामगारांनी तेथून मूर्ती काढून एका पिंपळाच्या झाडाखाली तिची प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या मूर्तीची पूजा–अर्चा सुरू आहे. १८६५ मधील नागपूरच्या नकाशात या मंदिराचा उल्लेख नाही; म्हणजे त्या आधीच्या काळात केव्हातरी तिथे असलेले प्राचीन गणेश स्थान जमीनदोस्त वा उद्ध्वस्त झाले असावे. कारण त्यापूर्वी येथे मंदिर असल्याची नोंद सापडते. यादवांच्या कार्यकाळात रामटेकला राम मंदिर उभारण्याबरोबरच हेमाद्री पंडितांनी टेकडीचे गणेश मंदिर बांधले. यादव घराण्याकडून या गणेशाची पूजा होत असे, अशी नोंद आहे; परंतु ही मूर्ती यादवकाळातील असण्याबाबत अभ्यासकांमध्ये साशंकता आहे.
मराठा साम्राज्याचे सरदार रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर १८९६ मध्ये इंग्रज नागपुरात आले. सध्या जेथे मंदिर आहे त्या सीताबर्डी टेकडीच्या खालीच इंग्रज रेसिडन्सी होती. तेव्हापासून हा परिसर इंग्रजांकडे होता व स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यदलाच्या अधिपत्याखाली आहे. इंग्रजांच्या काळात सीताबर्डी किल्ल्यात कोणाही स्थानिकांना प्रवेश दिला जात नव्हता. लष्करी छावणी बाजूला असल्यामुळे इंग्रजांनी या मूर्तीवर केवळ एक पत्र्याची झोपडी उभारण्याची परवानगी दिली. त्यानुसार १९३६ मध्ये या गणेशमूर्तीभोवती झोपडी उभारण्यात आली. १९६५ पर्यंत मंदिर त्याच अवस्थेत होते. त्यानंतर उत्तरोत्तर जीर्णोद्धार व नूतनीकरण होत गेले. २०२० मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. फिकट लालसर दगडामध्ये राजस्थानी कारागिरांनी हे भव्य मंदिर बांधले आहे. त्यावरील नक्षीकाम व मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण भासते. २०,००० चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे आहे.
रेल्वेमार्गाच्या बाजूस पूर्वेकडे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या पिंपळवृक्षाखाली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशमूर्तीचे मुकुट व डोळे हे चांदीचे आहेत. दर मंगळवारी या मूर्तीवर शेंदूरलेपन केले जाते.
मूर्तीच्या मागे डाव्या बाजूला ५ फूट उंचीची काळभैरवाची मूर्ती, तर उजव्या बाजूला नंदीवर आरूढ शिवलिंग आहे. येथील पिंपळ वृक्षाशेजारी राधा–कृष्ण मंदिर आहे. याशिवाय येथे राम–सीता–लक्ष्मण, दक्षिणमुखी हनुमान तसेच महालक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत.
प्रत्येक मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनाला येतात. अंगारकी चतुर्थीला, गणेश जयंती, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दिवसांमध्ये येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. याशिवाय कालभैरव जयंती, हनुमान जयंती, कोजागरी पौर्णिमा या दिवशीही उत्सव साजरे केले जातात. हे भव्य व जागृत देवस्थान असून येथील गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच हजारो भाविक दररोज दर्शनाला येतात. माघ शुद्ध चतुर्थीला (तिळी चतुर्थी) येथे मोठी यात्रा भरते.
असे सांगितले जाते की या मंदिरात देशाचे माजी प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, श्रीमती आशा भोसले, अनुप जलोटा, जितेंद्र अभिषेकी, सुनील दत्त यांनी दर्शन घेतले आहे. नागपूरमध्ये जेव्हा क्रिकेट सामने असत त्यावेळी सचिन तेंडूलकरही आवर्जून या गणेशाच्या दर्शनाला येत असे. दररोज ४ वेळा गणेशाची आरती होते. संकष्टी चतुर्थी व एकादशीच्या दिवशी या गणेश मूर्तीला साजशृंगारांनी सजविले जाते. दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेता येते.

नागपुर शहर के सीताबर्डी क्षेत्र में स्थित टेकड़ी गणेश का यह देवस्थान विदर्भ के अष्टविनायकों में से एक माना जाता है। मुद्गल पुराण में इस स्थान का उल्लेख मिलता है। मंदिर के मध्य भाग में पीपल के वृक्ष के नीचे स्थित यह मूर्ति सैकड़ों वर्ष पुरानी बताई जाती है। यह मंदिर नागपुर के सबसे समृद्ध देवस्थानों में गिना जाता है। चूँकि यह मंदिर नागपुर शहर की पहाड़ी पर स्थित है, इसलिए इस गणेश का नाम “टेकड़ी गणेश” प्रचलित हुआ।
कहा जाता है कि 1866 में जब यहाँ की पहाड़ी को काटकर रेलवे लाइन बिछाने का काम चल रहा था, उस समय खुदाई करते हुए मजदूरों को सिंदूर चढ़ी हुई गणेश मूर्ति प्राप्त हुई। जैसे ही यह मूर्ति दिखाई दी आसमान घिर गया और बिजली कड़कने लगी। मजदूरों ने मूर्ति को वहीं पास के पीपल वृक्ष के नीचे स्थापित किया। तभी से इस मूर्ति की पूजा-अर्चना प्रारंभ हुई।
1865 के नागपुर के नक्शे में इस मंदिर का उल्लेख नहीं मिलता। इससे अनुमान लगाया जाता है कि इससे पहले यहाँ स्थित प्राचीन गणेश मंदिर नष्ट या ध्वस्त हो चुका था। पहले यहाँ मंदिर होने का उल्लेख अन्य जगहों पर मिलता है।
यादव काल में रामटेक में राम मंदिर निर्माण के साथ हेमाद्री पंडितों ने टेकड़ी गणेश मंदिर का भी निर्माण कराया ऐसा वर्णन मिलता है।
कहा जाता है कि यादव वंश की ओर से इस गणेश की पूजा होती थी। परंतु यह मूर्ति यादव काल की है या नहीं, इस पर शोधकर्ताओं में मतभेद है।
मराठा साम्राज्य के सरदार रघुजी भोसले की मृत्यु के बाद 1896 में अंग्रेज नागपुर में आए। वर्तमान में जहाँ मंदिर स्थित है, उस सीताबर्डी पहाड़ी के नीचे ही अंग्रेजों की रेजीडेंसी थी। तब से यह क्षेत्र अंग्रेजों के अधीन था। स्वतंत्रता के बाद यह परिसर भारतीय सेना के नियंत्रण में है। अंग्रेजों के समय सीताबर्डी किले में स्थानीय नागरिकों को प्रवेश की अनुमति नहीं थी। सैनिक छावनी नजदीक होने के कारण अंग्रेजों ने गणेश मूर्ति पर केवल एक टीन की झोपड़ी बनाने की अनुमति दी।
उसी अनुसार 1936 में गणेश मूर्ति के चारों ओर झोपड़ी बनाई गई। 1965 तक मंदिर इसी रूप में रहा। उसके बाद धीरे-धीरे जीर्णोद्धार और नवीनीकरण हुआ। 2020 में हुए नवीनीकरण के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप मिला। यह मंदिर हल्के गुलाबी पाषाणों से राजस्थान के कारीगरों द्वारा निर्मित है। इसकी नक्काशी व संरचना विशिष्ट प्रतीत होती है। 20,000 वर्ग फुट क्षेत्र में यह मंदिर फैला हुआ है। मंदिर का प्रवेशद्वार रेलवे लाइन की ओर पूर्व दिशा में है। सभामंडप के मध्य स्थित पीपल वृक्ष के नीचे दाहिनी सूंड़ वाले गणेश की मूर्ति है। इस मूर्ति का मुकुट और आँखें चाँदी की हैं। प्रत्येक मंगलवार को इस मूर्ति पर सिंदूर चढ़ाया जाता है।
मूर्ति के पीछे बाईं ओर 5 फुट ऊँची कालभैरव की मूर्ति और दाईं ओर नंदी पर आरूढ़ शिवलिंग स्थित है। यहाँ पीपल वृक्ष के समीप राधा-कृष्ण मंदिर भी है। इसके अलावा राम-सीता-लक्ष्मण, दक्षिणमुखी हनुमान तथा महालक्ष्मी की मूर्तियाँ भी यहाँ स्थापित हैं।
प्रत्येक मंगलवार और संकष्टी चतुर्थी को हजारों श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती, गणेश चतुर्थी से अनंत चतुर्दशी के बीच यहाँ मेले जैसा वातावरण रहता है। इसके अलावा कालभैरव जयंती, हनुमान जयंती, कोजागरी पूर्णिमा को भी उत्सव मनाए जाते हैं।
यह भव्य और जागृत देवस्थान है। यहाँ के गणपति मनोकामना पूर्ण करते हैं, ऐसी श्रद्धालुओं की आस्था है। इसलिए हजारों श्रद्धालु प्रतिदिन दर्शन हेतु आते हैं। माघ शुक्ल चतुर्थी के दिन यहाँ विशाल मेला आयोजित किया जाता है।
ऐसा कहा जाता है कि इस मंदिर में पूर्व प्रधानमंत्री पी. वी. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गायिका आशा भोसले, अनुप जलोटा, जितेंद्र अभिषेकी, सुनील दत्त आदि दर्शन के लिए आए हैं। नागपुर में जब क्रिकेट मैच होते थे तब सचिन तेंदुलकर भी विशेष रूप से दर्शन हेतु यहाँ आते थे। प्रतिदिन 4 बार गणेश की आरती होती है। संकष्टी चतुर्थी और एकादशी के दिन इस गणेश मूर्ति को विशेष श्रृंगार से सजाया जाता है। प्रतिदिन सुबह 6 बजे से रात 12 बजे तक श्रद्धालु मंदिर में दर्शन कर सकते हैं।