केशवराज मंदिर
राम गल्ली, लातूर, ता. जि. लातूर
हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापैकी सृष्टीचे पालनकर्ते असलेल्या भगवान विष्णूचे केशव हे एक लोकप्रिय रूप आहे. ‘सुंदर केस असलेला देव’ अशी मान्यता असलेल्या या केशवराजाचे एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर लातूर शहरातील राम गल्ली येथे वसलेले आहे. भाविकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक व्याधी दूर करणारा हा एक जागृत देव असल्याची भाविकांची नितांत श्रद्धा आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील केशवराजाची मूर्ती हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते.
मराठवाड्यातील वैष्णव परंपरेची साक्ष देणाऱ्या या मंदिराची उभारणी बाराव्या शतकात म्हणजेच यादव काळात झाली होती. तत्कालीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या वास्तूचे १९९३ च्या विनाशकारी किल्लारी भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. मात्र, स्थानिकांनी आणि भक्तांनी एकत्र येत लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे, हे नूतनीकरण करताना जुन्या मंदिराचे दगड व साहित्य वापरून मूळ वास्तूचे ऐतिहासिक सौंदर्य जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की बाराव्या शतकात या भागात घनदाट जंगल असताना, येथे गुरे चारणाऱ्या एका मेंढपाळाला जमिनीतून एका मूर्तीचे टोक बाहेर आलेले दिसले.
/उत्सुकतेने केलेल्या खोदकामात तिथे विष्णूच्या दहा अवतारांचे कोरीव काम असलेली एक सुबक मूर्ती सापडली. पुढे याच ठिकाणी पूजा-अर्चा सुरू झाली आणि वैष्णवपंथीय यादव राजांच्या आश्रयाने येथे मंदिर उभे राहिले. हेच मंदिर आज लातूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम गल्ली परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस सिद्धराज महर्षी गृत्समद ऋषींचे समाधी मंदिर आहे. वैदिक काळातील एक प्रमुख ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळातील अनेक सूक्तांचे द्रष्टेपण त्यांच्याकडे असल्याचे मानले जाते. ते अंगिरस वंशातील शुनहोत्र आंगिरस यांचे पुत्र होते; पण ते भृगु वंशात म्हणजेच भार्गव वंशात दत्तक घेतले गेले. त्यामुळे ते शौनक भृगु यांचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या गृत्समद या नावाचा अर्थ ‘समाधीमध्ये आनंदित’ असा सांगितला जातो.
मुख्य मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या अर्धखुल्या स्वरूपाच्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या डावीकडे ओवऱ्या व उजवीकडे सभागृहासारखी रचना आहे. मंडपात मध्यभागी चौथऱ्यावर गरुड मूर्ती आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या खुल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कक्षासनासारखे दगडी चौथरे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी चार दगडी स्तंभ आहेत. पूर्वी या खांबांच्या मध्यभागी रंगशिळा असावी, अशी येथील रचना भासते. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांत शिवशंकर, गणपती, ब्रह्मदेव आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे काही प्राचीन मूर्तीही आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकात द्वारपालांची शिल्पे आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर चांदीच्या प्रभावळीत विष्णूची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती स्थापित आहे. सुमारे चार फूट उंचीच्या या मूर्तीभोवती असलेल्या प्रभावळीत मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा दहा अवतारांचे चित्रण आहे. चतुर्भुज विष्णूमूर्तीच्या चार हातांत शंख, चक्र, गदा आणि कमळ आहेत. मूर्तीच्या सान्निध्यात लक्ष्मी, बृहस्पती आणि नारद मुनींच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला सभागृहासारखी रचना आहे. मंदिरातील उत्सवांच्या वेळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दगडी भिंतीवर लहान लहान मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात निजानंद सरस्वती महाराजांची समाधी, रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे जीवनकलामंदिर आणि सप्तमातृकांचे शिल्पही पाहायला मिळते.
लातूरच्या या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी दर मंगळवारी, शुक्रवारी आणि एकादशीला भक्तांची गर्दी असते. विशेषतः कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीला इथे दीपोत्सव होतो आणि हरिहराच्या (विष्णू आणि शिव) भेटीचा सोहळा रंगतो. दिवाळी, तुळशी विवाह यांसारखे सण इथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. मोठ्या उत्सवांनंतर देवाचा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षालपूजा म्हणजेच महाभिषेक करून महाप्रसाद वाटला जातो. भाविकांसाठी हे मंदिर सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती:
- लातूर बस स्थानकापासून १.४ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Keshavraj Temple
Ram Galli, Latur, Taluka & District Latur
In Hindu Dharma, the Trinity of Brahma, Vishnu, and Mahesh holds unparalleled significance. Among them, Keshav is a popular form of Lord Vishnu, the preserver of the universe. A very ancient and famous temple of this Keshavraj, known as the ‘God with beautiful hair,’ is situated in Ram Galli in the city of Latur. Devotees have immense faith that this is a ‘Jagrut Deva’ (an awakened deity) who alleviates the physical, mental, and financial sufferings of his followers. The idol of Keshavraj in the sanctum sanctorum of this temple is believed to be over a thousand years old.
This temple, which stands as a testament to the Vaishnava tradition in Marathwada, was built in the twelfth century during the Yadava period. The structure, influenced by the Hemadpanti architectural style of that era, suffered significant damage during the devastating 1993 Killari earthquake. However, locals and devotees came together to restore the temple through public contributions. Notably, during this renovation, a conscious effort was made to preserve the historical beauty of the original structure by using the stones and materials from the old temple.
Legend has it that in the twelfth century, when this area was a dense forest, a shepherd grazing his cattle saw the tip of an idol protruding from the ground.
Excavations carried out out of curiosity revealed a beautiful idol carved with the ten avatars of Vishnu. Subsequently, worship began at this very spot, and with the patronage of the Vaishnava Yadava kings, a temple was erected here. This temple has since become an inseparable part of Latur’s religious and cultural life.
The temple is located in the Ram Galli area in the heart of Latur city. Near the main entrance of the temple is a small Hanuman temple. Behind this temple is the Samadhi temple of Siddharaj Maharshi Gritsamada Rishi. He is recognized as a prominent sage of the Vedic period. He is believed to be the seer of many hymns in the second Mandala of the Rigveda. He was the son of Shunahotra Angiras of the Angiras lineage, but he was adopted into the Bhrigu lineage, or Bhargava lineage. Thus, he came to be known as the son of Shaunaka Bhrigu. His name, Gritsamada, is interpreted as ‘one who is joyful in Samadhi.’
One enters the semi-open pavilion of the temple through the entrance in the boundary wall surrounding the main temple. To the left of this pavilion are cloisters, and to the right is a hall-like structure. In the center of the pavilion, on a raised platform, is an idol of Garuda. The temple is structured with a Sabha Mandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the open entrance to the Sabha Mandapa are stone platforms resembling seats. There are four stone pillars in the center of the Sabha Mandapa. The structure suggests that there might have been a ‘Rangshila’ (performance stage) between these pillars in the past. In the niches of the walls of the Sabha Mandapa are idols of Shivshankar, Ganpati, Brahmadev, and Hanuman. Additionally, there are some other ancient idols here. In the niche to the right of the sanctum sanctorum, there are sculptures of Dwarapalas (gatekeepers).
In the sanctum sanctorum, an idol of Vishnu carved in black stone is installed on a Vajrapitha within a silver Prabhavali (arch). The Prabhavali surrounding this approximately four-foot-tall idol depicts the ten avatars: Matsya, Kurma, Varaha, Narasimha, Vamana, Parashurama, Rama, Krishna, Buddha, and Kalki. The four-armed Vishnu idol holds a conch, discus, mace, and lotus. In the vicinity of the idol are images of Lakshmi, Brihaspati, and Narada Muni.
Along the circumambulation path of the temple, there is a hall-like structure. Various programs are organized here during temple festivals. On the stone wall at the back of the temple, there are small idols. In the temple premises, one can also see the Samadhi of Nijanand Saraswati Maharaj, the Jeevankala Mandir of Ramchandra Maharaj Parnerkar, and a sculpture of the Saptamatrikas.
Devotees flock to see this presiding deity of Latur every Tuesday, Friday, and on Ekadashi. Especially on Vaikuntha Chaturdashi, which follows Kartiki Ekadashi, a Deepotsav (festival of lights) is held here, and the celebration of the meeting of Harihara (Vishnu and Shiva) takes place. Festivals like Diwali and Tulsi Vivah are celebrated here with great enthusiasm. After major festivals, to relieve the deity of fatigue, a ‘Prakshal Puja’ (Mahabhishek) is performed, and Mahaprasad is distributed. For devotees, this temple is open for darshan from 6 AM to 9 PM.
Useful Information:
- 1.4 km from Latur Bus Stand
- ST bus service available from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
केशवराज मंदिर
राम गली, लातूर, तहसील व जिला लातूर
हिंदू धर्म में ब्रह्मा, विष्णु और महेश इन त्रिदेवों का अनन्यसाधारण महत्त्व है। इनमें से सृष्टि के पालनकर्ता भगवान विष्णु का ‘केशव’ एक लोकप्रिय रूप है। ‘सुंदर केश वाले देव’ के रूप में मान्य इस केशवराज का एक अत्यंत प्राचीन और प्रसिद्ध मंदिर लातूर शहर की राम गली में स्थित है। भक्तों की अटूट श्रद्धा है कि यह एक जागृत देव हैं, जो भक्तों के शारीरिक, मानसिक और आर्थिक कष्टों को दूर करते हैं। इस मंदिर के गर्भगृह में स्थित केशवराज की मूर्ति को एक हजार वर्ष से अधिक प्राचीन माना जाता है।
मराठवाड़ा की वैष्णव परंपरा की साक्षी यह मंदिर बारहवीं शताब्दी में, यानी यादव काल में निर्मित हुआ था। तत्कालीन हेमाडपंती स्थापत्य शैली से प्रभावित इस वास्तुकला को १९९३ के विनाशकारी किल्लारी भूकंप से भारी नुकसान पहुँचा था। हालाँकि, स्थानीय निवासियों और भक्तों ने एकजुट होकर जनसहयोग से इस मंदिर का जीर्णोद्धार किया। विशेष बात यह है कि इस नवीनीकरण के दौरान पुराने मंदिर के पत्थरों और सामग्री का उपयोग करके मूल वास्तुकला के ऐतिहासिक सौंदर्य को बनाए रखने का सचेत प्रयास किया गया।
इस मंदिर के संदर्भ में किंवदंती है कि बारहवीं शताब्दी में जब यह क्षेत्र घने जंगल से घिरा था, तब यहाँ पशु चराने वाले एक चरवाहे को जमीन से बाहर निकली हुई एक मूर्ति का सिरा दिखाई दिया।
उत्सुकतापूर्वक की गई खुदाई में वहाँ विष्णु के दस अवतारों की नक्काशी वाली एक सुंदर मूर्ति मिली। आगे चलकर इसी स्थान पर पूजा-अर्चना शुरू हुई और वैष्णव पंथी यादव राजाओं के संरक्षण में यहाँ मंदिर का निर्माण हुआ। यही मंदिर आज लातूर के धार्मिक और सांस्कृतिक जीवन का एक अभिन्न अंग बन गया है।
लातूर शहर के मध्यवर्ती क्षेत्र में स्थित राम गली में यह मंदिर है। मंदिर के मुख्य प्रवेश द्वार के समीप हनुमान जी का एक छोटा मंदिर है। इस मंदिर के पीछे की ओर सिद्धराज महर्षि गृत्समद ऋषि का समाधि मंदिर है। वे वैदिक काल के एक प्रमुख ऋषि के रूप में जाने जाते हैं। माना जाता है कि ऋग्वेद के दूसरे मंडल के अनेक सूक्तों के वे द्रष्टा थे। वे अंगिरस वंश के शुनहोत्र आंगिरस के पुत्र थे, लेकिन उन्हें भृगु वंश यानी भार्गव वंश में गोद लिया गया था। इसलिए वे शौनक भृगु के पुत्र के रूप में पहचाने जाने लगे। उनके नाम ‘गृत्समद’ का अर्थ ‘समाधि में आनंदित’ बताया जाता है।
मुख्य मंदिर के चारों ओर स्थित प्रांगण की दीवार के प्रवेश द्वार से मंदिर के अर्ध-खुले मंडप में प्रवेश किया जाता है। इस मंडप के बाईं ओर ओवरी (कक्ष) और दाईं ओर सभागार जैसी संरचना है। मंडप के मध्य में चबूतरे पर गरुड़ की मूर्ति है। सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। सभामंडप के खुले प्रवेश द्वार के दोनों ओर कक्षासन जैसे पत्थर के चबूतरे हैं। सभामंडप के मध्य में चार पत्थर के स्तंभ हैं। यहाँ की संरचना को देखकर ऐसा प्रतीत होता है कि पूर्व में इन खंभों के बीच में रंगशिला रही होगी। सभामंडप की दीवारों में बने देवकोष्ठों (आलों) में शिवशंकर, गणपति, ब्रह्मदेव और हनुमान की मूर्तियाँ हैं। इसके अलावा यहाँ कुछ अन्य प्राचीन मूर्तियाँ भी हैं। गर्भगृह के दाईं ओर के देवकोष्ठ में द्वारपालों की प्रतिमाएँ हैं।
गर्भगृह में वज्रपीठ पर चांदी की प्रभावली में काले पत्थर से निर्मित विष्णु की मूर्ति स्थापित है। लगभग चार फीट ऊँची इस मूर्ति के चारों ओर बनी प्रभावली में मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध और कल्कि इन दस अवतारों का चित्रण है। चतुर्भुज विष्णु मूर्ति के चार हाथों में शंख, चक्र, गदा और कमल हैं। मूर्ति के सान्निध्य में लक्ष्मी, बृहस्पति और नारद मुनि की प्रतिमाएँ हैं।
मंदिर के प्रदक्षिणा पथ के किनारे सभागार जैसी संरचना है। मंदिर में उत्सवों के दौरान यहाँ विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। मंदिर के पीछे की पत्थर की दीवार पर छोटी-छोटी मूर्तियाँ हैं। मंदिर परिसर में निजानंद सरस्वती महाराज की समाधि, रामचंद्र महाराज पारनेरकर का जीवनकला मंदिर और सप्तमातृकाओं का शिल्प भी देखने को मिलता है।
लातूर के इस ग्रामदेवता के दर्शन के लिए प्रत्येक मंगलवार, शुक्रवार और एकादशी को भक्तों की भीड़ उमड़ती है। विशेष रूप से कार्तिकी एकादशी के बाद आने वाली वैकुंठ चतुर्दशी को यहाँ दीपोत्सव मनाया जाता है और हरिहर (विष्णु और शिव) मिलन का उत्सव आयोजित होता है। दिवाली, तुलसी विवाह जैसे त्योहार यहाँ बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं। बड़े उत्सवों के बाद भगवान की थकान दूर करने के लिए प्रक्षाल पूजा यानी महाभिषेक किया जाता है और महाप्रसाद वितरित किया जाता है। भक्तों के लिए यह मंदिर सुबह ६ बजे से रात ९ बजे तक दर्शन के लिए खुला रहता है।
उपयोगी जानकारी:
- लातूर बस स्टैंड से १.४ किमी की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में ठहरने और भोजन के लिए अनेक विकल्प उपलब्ध
કેશવરાજ મંદિર
રામ ગલી, લાતુર, તા. જિ. લાતુર
હિન્દુ ધર્મમાં બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશ આ ત્રિદેવોનું અનન્ય મહત્વ છે. આ પૈકી સૃષ્ટિના પાલનહાર ભગવાન વિષ્ણુનું ‘કેશવ’ એક લોકપ્રિય સ્વરૂપ છે. ‘સુંદર કેશ ધરાવનાર દેવ’ એવી માન્યતા ધરાવતા આ કેશવરાજનું એક અત્યંત પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર લાતુર શહેરની રામ ગલીમાં આવેલું છે. ભક્તોની શારીરિક, માનસિક અને આર્થિક વ્યાધિઓ દૂર કરનાર આ એક જાગૃત દેવ હોવાની ભક્તોની અતૂટ શ્રદ્ધા છે. આ મંદિરના ગર્ભગૃહમાં રહેલી કેશવરાજની મૂર્તિ એક હજાર વર્ષથી વધુ પ્રાચીન હોવાનું માનવામાં આવે છે.
મરાઠવાડાની વૈષ્ણવ પરંપરાની સાક્ષી પૂરતું આ મંદિર બારમી સદીમાં એટલે કે યાદવ કાળમાં બંધાયું હતું. તત્કાલીન હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનો પ્રભાવ ધરાવતી આ વાસ્તુને ૧૯૯૩ના વિનાશકારી કિલ્લારી ભૂકંપમાં મોટું નુકસાન થયું હતું. જોકે, સ્થાનિકો અને ભક્તોએ એકત્ર થઈને લોકફાળા દ્વારા આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યો. વિશેષ વાત એ છે કે, આ નૂતનીકરણ કરતી વખતે જૂના મંદિરના પથ્થરો અને સામગ્રીનો ઉપયોગ કરીને મૂળ વાસ્તુનું ઐતિહાસિક સૌંદર્ય જાળવવાનો જાગૃત પ્રયાસ કરવામાં આવ્યો હતો.
આ મંદિર સંદર્ભે એવી આખ્યાયિકા છે કે બારમી સદીમાં જ્યારે આ વિસ્તારમાં ગીચ જંગલ હતું, ત્યારે અહીં પશુ ચરાવતા એક ભરવાડને જમીનમાંથી એક મૂર્તિનો ઉપરનો ભાગ બહાર આવેલો દેખાયો.
ઉત્સુકતાથી કરેલા ખોદકામમાં ત્યાં વિષ્ણુના દશ અવતારોનું કોતરકામ ધરાવતી એક સુરેખ મૂર્તિ મળી આવી. ત્યારબાદ આ જ સ્થળે પૂજા-અર્ચના શરૂ થઈ અને વૈષ્ણવપંથી યાદવ રાજાઓના આશ્રયે અહીં મંદિર ઊભું થયું. આ મંદિર આજે લાતુરના ધાર્મિક અને સાંસ્કૃતિક જીવનનો એક અભિન્ન ભાગ બની ગયું છે.
લાતુર શહેરના મધ્યવર્તી વિસ્તારમાં આવેલી રામ ગલીમાં આ મંદિર સ્થિત છે. મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વાર પાસે હનુમાનજીનું નાનું મંદિર છે. આ મંદિરની પાછળની બાજુએ સિદ્ધરાજ મહર્ષિ ગૃત્સમદ ઋષિનું સમાધિ મંદિર છે. વૈદિક કાળના એક પ્રમુખ ઋષિ તરીકે તેમની ઓળખ છે. ઋગ્વેદના બીજા મંડળના અનેક સૂક્તોના દ્રષ્ટા તેઓ હોવાનું માનવામાં આવે છે. તેઓ અંગિરસ વંશના શુનહોત્ર આંગિરસના પુત્ર હતા; પરંતુ તેમને ભૃગુ વંશમાં એટલે કે ભાર્ગવ વંશમાં દત્તક લેવામાં આવ્યા હતા. તેથી તેઓ શૌનક ભૃગુના પુત્ર તરીકે ઓળખાવા લાગ્યા. તેમના ‘ગૃત્સમદ’ નામનો અર્થ ‘સમાધિમાં આનંદિત’ એવો થાય છે.
મુખ્ય મંદિરની આસપાસની દીવાલના પ્રવેશદ્વારથી મંદિરના અર્ધખુલ્લા મંડપમાં પ્રવેશ થાય છે. આ મંડપની ડાબી બાજુએ ઓસરીઓ અને જમણી બાજુએ સભાગૃહ જેવી રચના છે. મંડપમાં મધ્યમાં ચોતરા પર ગરુડની મૂર્તિ છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપના ખુલ્લા પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ કક્ષાસન જેવા પથ્થરના ચોતરા છે. સભામંડપની મધ્યમાં ચાર પથ્થરના સ્તંભ છે. અગાઉ આ સ્તંભોની વચ્ચે રંગશિલા હોવી જોઈએ, તેવી અહીંની રચના જણાય છે. સભામંડપની દીવાલોમાં રહેલા દેવકોષ્ઠોમાં શિવશંકર, ગણપતિ, બ્રહ્મદેવ અને હનુમાનજીની મૂર્તિઓ છે. આ ઉપરાંત અહીં કેટલીક પ્રાચીન મૂર્તિઓ પણ છે. ગર્ભગૃહની જમણી બાજુના દેવકોષ્ઠમાં દ્વારપાળોની શિલ્પકૃતિઓ છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ચાંદીની પ્રભાવળિમાં વિષ્ણુની કાળા પાષાણમાં કંડારેલી મૂર્તિ સ્થાપિત છે. આશરે ચાર ફૂટ ઊંચી આ મૂર્તિની આસપાસ રહેલી પ્રભાવળિમાં મત્સ્ય, કૂર્મ, વરાહ, નરસિંહ, વામન, પરશુરામ, રામ, કૃષ્ણ, બુદ્ધ અને કલ્કિ એમ દશ અવતારોનું ચિત્રણ છે. ચતુર્ભુજ વિષ્ણુમૂર્તિના ચાર હાથમાં શંખ, ચક્ર, ગદા અને કમળ છે. મૂર્તિના સાન્નિધ્યમાં લક્ષ્મી, બૃહસ્પતિ અને નારદ મુનિની પ્રતિમાઓ છે.
મંદિરના પ્રદક્ષિણા માર્ગની બાજુમાં સભાગૃહ જેવી રચના છે. મંદિરમાં ઉત્સવો દરમિયાન વિવિધ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મંદિરની પાછળની બાજુએ આવેલી પથ્થરની દીવાલ પર નાની-નાની મૂર્તિઓ છે. મંદિરના પરિસરમાં નિજાનંદ સરસ્વતી મહારાજની સમાધિ, રામચંદ્ર મહારાજ પારનેરકરનું જીવનકલા મંદિર અને સપ્તમાતૃકાનું શિલ્પ પણ જોવા મળે છે.
લાતુરના આ ગ્રામદૈવતના દર્શન માટે દર મંગળવારે, શુક્રવારે અને એકાદશીએ ભક્તોની ભીડ હોય છે. ખાસ કરીને કાર્તિકી એકાદશી પછી આવતી વૈકુંઠ ચતુર્દશીએ અહીં દીપોત્સવ ઉજવાય છે અને હરિહર (વિષ્ણુ અને શિવ) મિલનનો સોહળો રચાય છે. દિવાળી, તુલસી વિવાહ જેવા તહેવારો અહીં ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવાય છે. મોટા ઉત્સવો પછી દેવનો શ્રમ દૂર કરવા માટે પ્રક્ષાલપૂજા એટલે કે મહાઅભિષેક કરીને મહાપ્રસાદ વહેંચવામાં આવે છે. ભક્તો માટે આ મંદિર સવારે ૬ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી દર્શન માટે ખુલ્લું રહે છે.
ઉપયોગી માહિતી:
- લાતુર બસ સ્ટેન્ડથી ૧.૪ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
केशवराज मंदिर
राम गल्ली, लातूर, ता. जि. लातूर
இந்து மதத்தில் பிரம்மா, விஷ்ணு மற்றும் மகேசன் ஆகிய மும்மூர்த்திகளுக்குத் தனிச்சிறப்பு வாய்ந்த முக்கியத்துவம் உண்டு. இவர்களில் சிருஷ்டியைப் பரிபாலனம் செய்யும் பகவான் விஷ்ணுவின் ஒரு பிரபலமான வடிவமே கேசவர் ஆவார். ‘அழகிய கேசங்களைக் கொண்ட தெய்வம்’ என்று போற்றப்படும் இந்த கேசவராஜாவின் மிகவும் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற ஆலயம், லாத்தூர் நகரின் ராம் கள்ளியில் அமைந்துள்ளது. பக்தர்களின் உடல், மன மற்றும் பொருளாதாரத் துயரங்களைப் போக்கும் ஒரு জাগ্রத தெய்வமாக இந்த கேசவராஜாவை பக்தர்கள் ஆழ்ந்த நம்பிக்கையுடன் வழிபடுகின்றனர். இந்த ஆலயத்தின் கருவறையில் உள்ள கேசவராஜாவின் திருவுருவம் ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு மேலான பழமையானது என்று கருதப்படுகிறது.
மராத்வாடாவின் வைணவ பாரம்பரியத்திற்குச் சான்றாக விளங்கும் இந்த ஆலயம், பன்னிரண்டாம் நூற்றாண்டில் அதாவது யாதவ காலத்தில் கட்டப்பட்டது. அக்காலத்திய ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் அமைந்த இந்த ஆலயம், 1993-ஆம் ஆண்டு ஏற்பட்ட பேரழிவுகரமான கில்லாரி நிலநடுக்கத்தால் பெரும் சேதமடைந்தது. இருப்பினும், உள்ளூர் மக்களும் பக்தர்களும் ஒன்றிணைந்து, பொதுமக்களின் பங்களிப்புடன் இந்த ஆலயத்தைப் புனரமைத்தனர். குறிப்பாக, இந்த மறுசீரமைப்பின் போது பழைய ஆலயத்தின் கற்கள் மற்றும் கட்டுமானப் பொருட்களைப் பயன்படுத்தி, மூலக் கட்டமைப்பின் வரலாற்று அழகைப் பாதுகாக்க மிகுந்த கவனம் செலுத்தப்பட்டது.
இந்த ஆலயம் குறித்த ஐதீகம் என்னவென்றால், பன்னிரண்டாம் நூற்றாண்டில் இப்பகுதி அடர்ந்த காடாக இருந்தபோது, கால்நடைகளை மேய்த்துக் கொண்டிருந்த ஒரு இடையருக்கு, மண்ணிலிருந்து ஒரு திருவுருவத்தின் நுனி வெளியே தெரிவது கண்டறியப்பட்டது.
ஆர்வத்துடன் தோண்டிப் பார்த்தபோது, விஷ்ணுவின் தசாவதாரங்கள் செதுக்கப்பட்ட ஒரு அழகான திருவுருவம் கிடைத்தது. பின்னர், அதே இடத்தில் வழிபாடுகள் தொடங்கப்பட்டு, வைணவப் பற்றுக் கொண்ட யாதவ மன்னர்களின் ஆதரவுடன் இங்கு ஆலயம் எழுப்பப்பட்டது. இந்த ஆலயமே இன்று லாத்தூரின் ஆன்மீக மற்றும் கலாச்சார வாழ்வின் பிரிக்க முடியாத அங்கமாக மாறியுள்ளது.
லாத்தூர் நகரின் மையப்பகுதியில் உள்ள ராம் கள்ளி பகுதியில் இந்த ஆலயம் அமைந்துள்ளது. ஆலயத்தின் முதன்மை நுழைவாயிலுக்கு அருகில் சிறிய அனுமன் ஆலயம் உள்ளது. இந்த ஆலயத்தின் பின்புறம் சித்தராஜ் மஹரிஷி கிருத்சமத முனிவரின் சமாதி ஆலயம் உள்ளது. வேத காலத்தின் முக்கிய முனிவர்களில் ஒருவராக அவர் அறியப்படுகிறார். ரிக் வேதத்தின் இரண்டாம் மண்டலத்தில் உள்ள பல சூக்தங்களை அருளியவர் இவரே என்று நம்பப்படுகிறது. அவர் அங்கீரஸ வம்சத்தைச் சேர்ந்த சுன்ஹோத்ர அங்கீரஸரின் புதல்வர்; ஆனால் அவர் பிருகு வம்சத்தில், அதாவது பார்கவ வம்சத்தில் தத்தெடுக்கப்பட்டார். அதனால் அவர் சௌனக பிருகுவின் புதல்வராக அறியப்பட்டார். அவரது ‘கிருத்சமத’ என்ற பெயருக்கு ‘சமாதியில் ஆனந்தமடைபவர்’ என்று பொருள்.
முதன்மை ஆலயத்தைச் சுற்றியுள்ள சுற்றுச்சுவரின் நுழைவாயில் வழியாக ஆலயத்தின் அரை-திறந்த மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இந்த மண்டபத்தின் இடதுபுறம் திண்ணைகளும், வலதுபுறம் சபா மண்டபம் போன்ற அமைப்பும் உள்ளன. மண்டபத்தின் நடுவில் உள்ள மேடையில் கருடாழ்வார் திருவுருவம் உள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த ஆலயம் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் திறந்த நுழைவாயிலின் இருபுறமும் கற்களால் ஆன மேடைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நடுவில் நான்கு கல் தூண்கள் உள்ளன. முன்னொரு காலத்தில் இந்தத் தூண்களுக்கு நடுவில் ரங்கசிலை இருந்திருக்கலாம் என்று இக்கட்டமைப்பு உணர்த்துகிறது. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் சிவபெருமான், கணபதி, பிரம்மதேவர் மற்றும் அனுமனின் திருவுருவங்கள் உள்ளன. இது தவிர, இங்கு சில பழமையான சிலைகளும் உள்ளன. கருவறையின் வலதுபுறம் உள்ள தேவகோஷ்டத்தில் துவாரபாலகர்களின் சிற்பங்கள் உள்ளன.
கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது, வெள்ளிப் பிரபாவளியுடன் கூடிய கறுப்புப் பாறையில் செதுக்கப்பட்ட விஷ்ணுவின் திருவுருவம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. சுமார் நான்கு அடி உயரமுள்ள இந்தத் திருவுருவத்தைச் சுற்றியுள்ள பிரபாவளியில் மத்ஸ்ய, கூர்ம, வராஹ, நரசிம்ம, வாமன, பரசுராம, ராம, கிருஷ்ண, புத்த மற்றும் கல்கி ஆகிய தசாவதாரங்கள் சித்தரிக்கப்பட்டுள்ளன. சதுர்புஜ விஷ்ணுவின் நான்கு கைகளில் சங்கு, சக்கரம், கதை மற்றும் தாமரை உள்ளன. திருவுருவத்தின் அருகில் லக்ஷ்மி, பிரஹஸ்பதி மற்றும் நாரத முனிவரின் பிம்பங்கள் உள்ளன.
ஆலயத்தின் பிரகாரத்தைச் சுற்றி சபா மண்டபம் போன்ற அமைப்பு உள்ளது. ஆலயத் திருவிழாக்களின் போது இங்கு பல்வேறு நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. ஆலயத்தின் பின்புறம் உள்ள கல் சுவரில் சிறிய சிலைகள் உள்ளன. ஆலய வளாகத்தில் நிஜானந்த சரஸ்வதி மஹாராஜின் சமாதி, ராமச்சந்திர மஹாராஜ் பார்னேர்க்கரின் ஜீவன்கலா மந்திர் மற்றும் சப்தமாதாக்களின் சிற்பத்தையும் காணலாம்.
லாத்தூரின் இந்த கிராம தேவதையை தரிசிக்க ஒவ்வொரு செவ்வாய், வெள்ளி மற்றும் ஏகாதசி நாட்களில் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். குறிப்பாக கார்த்திகை ஏகாதசிக்கு அடுத்ததாக வரும் வைகுண்ட சதுர்த்தியன்று இங்கு தீப உற்சவம் நடைபெறுகிறது மற்றும் ஹரிஹர (விஷ்ணு மற்றும் சிவன்) சந்திப்பு விழா கோலாகலமாகக் கொண்டாடப்படுகிறது. தீபாவளி, துளசி விவாகம் போன்ற பண்டிகைகள் இங்கு மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. பெரிய உற்சவங்களுக்குப் பிறகு இறைவனின் களைப்பைப் போக்க பிரக்ஷால பூஜை எனப்படும் மஹாபிஷேகம் செய்யப்பட்டு மஹாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. பக்தர்களுக்காக இந்த ஆலயம் காலை 6 மணி முதல் இரவு 9 மணி வரை தரிசனத்திற்காகத் திறந்திருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- லாத்தூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 1.4 கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் ஆலயம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
కేశవరాజ మందిరం
రామ్ గల్లీ, లాతూర్, తా. జి. లాతూర్
హిందూ ధర్మంలో బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరులనే త్రిదేవులకు అత్యంత ప్రాముఖ్యత ఉంది. వీరిలో సృష్టిని పాలించే భగవాన్ విష్ణువు యొక్క ఒక ప్రసిద్ధ రూపమే కేశవుడు. ‘అందమైన కేశాలు కలిగిన దేవుడు’ అని పిలవబడే ఈ కేశవరాజు యొక్క అత్యంత ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ మందిరం లాతూర్ నగరంలోని రామ్ గల్లీలో ఉంది. భక్తుల శారీరక, మానసిక మరియు ఆర్థిక బాధలను తొలగించే ఈ దేవుడు అత్యంత శక్తివంతమైనవాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఈ మందిర గర్భాలయంలోని కేశవరాజు విగ్రహం వెయ్యి సంవత్సరాల కంటే పురాతనమైనదని నమ్ముతారు.
మరాఠ్వాడాలోని వైష్ణవ సంప్రదాయానికి సాక్షిగా నిలిచిన ఈ మందిరం పన్నెండవ శతాబ్దంలో, అంటే యాదవ కాలంలో నిర్మించబడింది. నాటి హేమాడపంతి నిర్మాణ శైలి ప్రభావం ఉన్న ఈ కట్టడం 1993 నాటి వినాశకరమైన కిల్లా రీ భూకంపం వల్ల తీవ్రంగా దెబ్బతింది. అయితే, స్థానికులు మరియు భక్తులు కలిసి ప్రజా విరాళాలతో ఈ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు. విశేషమేమిటంటే, ఈ పునరుద్ధరణ చేసేటప్పుడు పాత మందిరంలోని రాళ్లను మరియు సామగ్రిని ఉపయోగించి, అసలు నిర్మాణపు చారిత్రక సౌందర్యాన్ని కాపాడటానికి ప్రత్యేక శ్రద్ధ వహించారు.
ఈ మందిరానికి సంబంధించి ఒక ఐతిహ్యం ఉంది; పన్నెండవ శతాబ్దంలో ఈ ప్రాంతం దట్టమైన అడవిగా ఉన్నప్పుడు, పశువులను కాసే ఒక గొర్రెల కాపరికి భూమిలో నుండి ఒక విగ్రహం పైభాగం బయటకు రావడం కనిపించింది.
కుతూహలంతో తవ్వకాలు జరపగా, అక్కడ విష్ణువు యొక్క దశావతారాలు చెక్కబడిన ఒక సుందరమైన విగ్రహం లభించింది. ఆ తర్వాత ఇదే ప్రదేశంలో పూజా కార్యక్రమాలు ప్రారంభమయ్యాయి మరియు వైష్ణవ సంప్రదాయాన్ని అనుసరించే యాదవ రాజుల ఆశ్రయంతో ఇక్కడ మందిరం నిర్మించబడింది. ఈ మందిరం నేడు లాతూర్ యొక్క ఆధ్యాత్మిక మరియు సాంస్కృతిక జీవనంలో అంతర్భాగమైంది.
లాతూర్ నగర మధ్యభాగంలోని రామ్ గల్లీ ప్రాంతంలో ఈ మందిరం ఉంది. మందిర ప్రధాన ద్వారం వద్ద హనుమంతుని చిన్న మందిరం ఉంది. ఈ మందిరానికి వెనుక భాగంలో సిద్ధరాజ మహర్షి గృత్సమద ఋషుల సమాధి మందిరం ఉంది. వేద కాలంలోని ప్రముఖ ఋషులలో ఒకరిగా ఆయన గుర్తింపు పొందారు. ఋగ్వేదంలోని రెండవ మండలంలోని అనేక సూక్తాలను దర్శించిన వారు ఆయన అని నమ్ముతారు. ఆయన అంగీరస వంశానికి చెందిన శునహోత్ర ఆంగీరసుని కుమారుడు; కానీ ఆయన భృగు వంశంలో, అంటే భార్గవ వంశంలో దత్తత తీసుకోబడ్డారు. అందుకే ఆయన శౌనక భృగుని కుమారునిగా పిలవబడ్డారు. ఆయన పేరు ‘గృత్సమద’ అంటే ‘సమాధిలో ఆనందించేవాడు’ అని అర్థం.
మందిరం చుట్టూ ఉన్న ప్రాకార గోడలోని ద్వారం ద్వారా మందిరపు అర్థ-ఓపెన్ మండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ మండపానికి ఎడమవైపు ఓవరీలు (గదులు) మరియు కుడివైపు సభాగ్రహం వంటి నిర్మాణం ఉంది. మండపం మధ్యలో ఉన్న వేదికపై గరుడ విగ్రహం ఉంది. సభామండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. సభామండపం యొక్క బహిరంగ ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా రాతి వేదికలు ఉన్నాయి. సభామండపం మధ్యలో నాలుగు రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. పూర్వం ఈ స్తంభాల మధ్యలో రంగశిల ఉండేదని ఇక్కడి నిర్మాణాన్ని చూస్తే అనిపిస్తుంది. సభామండపం గోడలలో ఉన్న దేవకోష్టాలలో (గూళ్లలో) శివశంకర్, గణపతి, బ్రహ్మదేవుడు మరియు హనుమంతుని విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇవి కాకుండా ఇక్కడ కొన్ని ప్రాచీన విగ్రహాలు కూడా ఉన్నాయి. గర్భాలయానికి కుడివైపున ఉన్న దేవకోష్టంలో ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి.
గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై వెండి ప్రభావళిలో విష్ణువు యొక్క నల్లరాతి విగ్రహం ప్రతిష్ఠించబడింది. సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తు ఉన్న ఈ విగ్రహం చుట్టూ ఉన్న ప్రభావళిలో మత్స్య, కూర్మ, వరాహ, నరసింహ, వామన, పరశురామ, రామ, కృష్ణ, బుద్ధ మరియు కల్కి అనే దశావతారాల చిత్రణ ఉంది. చతుర్భుజ విష్ణుమూర్తి నాలుగు చేతులలో శంఖం, చక్రం, గద మరియు పద్మం ఉన్నాయి. విగ్రహం సమీపంలో లక్ష్మీదేవి, బృహస్పతి మరియు నారద మునుల ప్రతిమలు ఉన్నాయి.
మందిర ప్రదక్షిణ మార్గం పక్కన సభాగ్రహం వంటి నిర్మాణం ఉంది. మందిరంలో ఉత్సవాల సమయంలో ఇక్కడ వివిధ కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మందిరం వెనుక భాగంలో ఉన్న రాతి గోడపై చిన్న చిన్న విగ్రహాలు ఉన్నాయి. మందిర ప్రాంగణంలో నిజానంద సరస్వతీ మహారాజ్ సమాధి, రామచంద్ర మహారాజ్ పారనేర్కర్ జీవనకళా మందిరం మరియు సప్తమాతృకల శిల్పం కూడా చూడవచ్చు.
లాతూర్ గ్రామదేవత అయిన ఈ స్వామిని దర్శించుకోవడానికి ప్రతి మంగళవారం, శుక్రవారం మరియు ఏకాదశి రోజుల్లో భక్తులు అధిక సంఖ్యలో వస్తుంటారు. ముఖ్యంగా కార్తీక ఏకాదశి తర్వాత వచ్చే వైకుంఠ చతుర్దశి నాడు ఇక్కడ దీపోత్సవం జరుగుతుంది మరియు హరిహర (విష్ణువు మరియు శివుడు) భేటీ వేడుక కన్నుల పండుగగా సాగుతుంది. దీపావళి, తులసీ వివాహం వంటి పండుగలు ఇక్కడ ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. పెద్ద ఉత్సవాల తర్వాత దేవుని అలసటను తీర్చడానికి ప్రక్షాళ పూజ అంటే మహాభిషేకం చేసి మహాప్రసాదాన్ని పంచుతారు. భక్తుల కోసం ఈ మందిరం ఉదయం 6 నుండి రాత్రి 9 గంటల వరకు దర్శనానికి తెరిచి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- లాతూర్ బస్ స్టాండ్ నుండి 1.4 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు
केशवराज मंदिर
राम गल्ली, लातूर, ता. जि. लातूर
हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापैकी सृष्टीचे पालनकर्ते असलेल्या भगवान विष्णूचे केशव हे एक लोकप्रिय रूप आहे. ‘सुंदर केस असलेला देव’ अशी मान्यता असलेल्या या केशवराजाचे एक अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर लातूर शहरातील राम गल्ली येथे वसलेले आहे. भाविकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक व्याधी दूर करणारा हा एक जागृत देव असल्याची भाविकांची नितांत श्रद्धा आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील केशवराजाची मूर्ती हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते.
मराठवाड्यातील वैष्णव परंपरेची साक्ष देणाऱ्या या मंदिराची उभारणी बाराव्या शतकात म्हणजेच यादव काळात झाली होती. तत्कालीन हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या वास्तूचे १९९३ च्या विनाशकारी किल्लारी भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. मात्र, स्थानिकांनी आणि भक्तांनी एकत्र येत लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे, हे नूतनीकरण करताना जुन्या मंदिराचे दगड व साहित्य वापरून मूळ वास्तूचे ऐतिहासिक सौंदर्य जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
या मंदिरासंदर्भात आख्यायिका अशी की बाराव्या शतकात या भागात घनदाट जंगल असताना, येथे गुरे चारणाऱ्या एका मेंढपाळाला जमिनीतून एका मूर्तीचे टोक बाहेर आलेले दिसले.
/उत्सुकतेने केलेल्या खोदकामात तिथे विष्णूच्या दहा अवतारांचे कोरीव काम असलेली एक सुबक मूर्ती सापडली. पुढे याच ठिकाणी पूजा-अर्चा सुरू झाली आणि वैष्णवपंथीय यादव राजांच्या आश्रयाने येथे मंदिर उभे राहिले. हेच मंदिर आज लातूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम गल्ली परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे लहान मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस सिद्धराज महर्षी गृत्समद ऋषींचे समाधी मंदिर आहे. वैदिक काळातील एक प्रमुख ऋषी म्हणून त्यांची ओळख आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळातील अनेक सूक्तांचे द्रष्टेपण त्यांच्याकडे असल्याचे मानले जाते. ते अंगिरस वंशातील शुनहोत्र आंगिरस यांचे पुत्र होते; पण ते भृगु वंशात म्हणजेच भार्गव वंशात दत्तक घेतले गेले. त्यामुळे ते शौनक भृगु यांचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या गृत्समद या नावाचा अर्थ ‘समाधीमध्ये आनंदित’ असा सांगितला जातो.
मुख्य मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या अर्धखुल्या स्वरूपाच्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या डावीकडे ओवऱ्या व उजवीकडे सभागृहासारखी रचना आहे. मंडपात मध्यभागी चौथऱ्यावर गरुड मूर्ती आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या खुल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कक्षासनासारखे दगडी चौथरे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी चार दगडी स्तंभ आहेत. पूर्वी या खांबांच्या मध्यभागी रंगशिळा असावी, अशी येथील रचना भासते. सभामंडपाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकांत शिवशंकर, गणपती, ब्रह्मदेव आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे काही प्राचीन मूर्तीही आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकात द्वारपालांची शिल्पे आहेत.
गर्भगृहात वज्रपीठावर चांदीच्या प्रभावळीत विष्णूची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती स्थापित आहे. सुमारे चार फूट उंचीच्या या मूर्तीभोवती असलेल्या प्रभावळीत मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा दहा अवतारांचे चित्रण आहे. चतुर्भुज विष्णूमूर्तीच्या चार हातांत शंख, चक्र, गदा आणि कमळ आहेत. मूर्तीच्या सान्निध्यात लक्ष्मी, बृहस्पती आणि नारद मुनींच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला सभागृहासारखी रचना आहे. मंदिरातील उत्सवांच्या वेळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दगडी भिंतीवर लहान लहान मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात निजानंद सरस्वती महाराजांची समाधी, रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे जीवनकलामंदिर आणि सप्तमातृकांचे शिल्पही पाहायला मिळते.
लातूरच्या या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी दर मंगळवारी, शुक्रवारी आणि एकादशीला भक्तांची गर्दी असते. विशेषतः कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीला इथे दीपोत्सव होतो आणि हरिहराच्या (विष्णू आणि शिव) भेटीचा सोहळा रंगतो. दिवाळी, तुळशी विवाह यांसारखे सण इथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. मोठ्या उत्सवांनंतर देवाचा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षालपूजा म्हणजेच महाभिषेक करून महाप्रसाद वाटला जातो. भाविकांसाठी हे मंदिर सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती:
- लातूर बस स्थानकापासून १.४ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
ಕೇಶವರಾಜ ಮಂದಿರ
ರಾಮ ಗಲ್ಲಿ, ಲಾತೂರ್, ತಾ. ಜಿ. ಲಾತೂರ್
ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಮಹೇಶ ಎಂಬ ತ್ರಿಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಅನನ್ಯವಾದ ಮಹತ್ವವಿದೆ. ಇವರಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಯ ಪಾಲನಕರ್ತರಾದ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವಿನ ‘ಕೇಶವ’ ಎಂಬುದು ಒಂದು ಜನಪ್ರಿಯ ರೂಪವಾಗಿದೆ. ‘ಸುಂದರವಾದ ಕೇಶವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ದೇವರು’ ಎಂದು ನಂಬಲಾದ ಈ ಕೇಶವರಾಜನ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವು ಲಾತೂರ್ ನಗರದ ರಾಮ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಭಕ್ತರ ದೈಹಿಕ, ಮಾನಸಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವ ಜಾಗೃತ ದೇವರೆಂದು ಭಕ್ತರು ಈ ದೇವರನ್ನು ಅಚಲವಾಗಿ ನಂಬುತ್ತಾರೆ. ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ಕೇಶವರಾಜನ ಮೂರ್ತಿಯು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಿಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಚೀನವಾದುದೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಮರಾಠವಾಡದ ವೈಷ್ಣವ ಪರಂಪರೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಯಾದವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಅಂದಿನ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಪ್ರಭಾವ ಹೊಂದಿದ್ದ ಈ ಕಟ್ಟಡವು 1993ರ ವಿನಾಶಕಾರಿ ಕಿಲ್ಲಾರಿ ಭೂಕಂಪದಿಂದಾಗಿ ಭಾರಿ ಹಾನಿಗೊಳಗಾಗಿತ್ತು. ಆದಾಗ್ಯೂ, ಸ್ಥಳೀಯರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಒಗ್ಗೂಡಿ, ಸಾರ್ವಜನಿಕ ದೇಣಿಗೆಯ ಮೂಲಕ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ವಿಶೇಷವೆಂದರೆ, ಈ ನವೀಕರಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹಳೆಯ ಮಂದಿರದ ಕಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಮೂಲ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಐತಿಹಾಸಿಕ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಯಿತು.
ಈ ಮಂದಿರದ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶವು ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯವಾಗಿದ್ದಾಗ, ಇಲ್ಲಿ ದನಗಳನ್ನು ಮೇಯಿಸುತ್ತಿದ್ದ ಒಬ್ಬ ಕುರುಬನಿಗೆ ಭೂಮಿಯಿಂದ ಹೊರಬಂದಿದ್ದ ಮೂರ್ತಿಯ ತುದಿ ಕಂಡುಬಂದಿತು.
ಕುತೂಹಲದಿಂದ ಅಗೆದು ನೋಡಿದಾಗ, ಅಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ದಶಾವತಾರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾದ ಸುಂದರವಾದ ಮೂರ್ತಿಯೊಂದು ದೊರೆಯಿತು. ಮುಂದೆ ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪೂಜೆ-ಪುನಸ್ಕಾರಗಳು ಆರಂಭವಾದವು ಮತ್ತು ವೈಷ್ಣವ ಪಂಥದ ಯಾದವ ರಾಜರ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮಂದಿರವು ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಇದೇ ಮಂದಿರವು ಇಂದು ಲಾತೂರಿನ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಜೀವನದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿದೆ.
ಲಾತೂರ್ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ರಾಮ ಗಲ್ಲಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದ ಬಳಿ ಹನುಮಂತನ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹರ್ಷಿ ಗೃತ್ಸಮದ ಋಷಿಗಳ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವಿದೆ. ವೈದಿಕ ಕಾಲದ ಪ್ರಮುಖ ಋಷಿಗಳೆಂದು ಅವರು ಪರಿಚಿತರು. ಋಗ್ವೇದದ ಎರಡನೇ ಮಂಡಲದ ಅನೇಕ ಸೂಕ್ತಗಳ ದ್ರಷ್ಟಾರರೆಂದು ಅವರನ್ನು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಅಂಗಿರಸ ವಂಶದ ಶುನಹೋತ್ರ ಆಂಗಿರಸರ ಪುತ್ರರಾಗಿದ್ದರು; ಆದರೆ ಅವರು ಭೃಗು ವಂಶದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಭಾರ್ಗವ ವಂಶದಲ್ಲಿ ದತ್ತು ಸ್ವೀಕರಿಸಲ್ಪಟ್ಟರು. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಶೌನಕ ಭೃಗು ಅವರ ಪುತ್ರರೆಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟರು. ಅವರ ‘ಗೃತ್ಸಮದ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಅರ್ಥ ‘ಸಮಾಧಿಯಲ್ಲಿ ಆನಂದಿತ’ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಆವರಣ ಗೋಡೆಯ ದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಮಂಟಪದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಓವರಿಗಳು (ಗ್ಯಾಲರಿಗಳು) ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಸಭಾಂಗಣದಂತಹ ರಚನೆಯಿದೆ. ಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಗರುಡನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ತೆರೆದ ದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಸನದಂತಹ ಕಲ್ಲಿನ ವೇದಿಕೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಹಿಂದೆ ಈ ಕಂಬಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ರಂಗಶಿಲೆ ಇರಬಹುದೆಂದು ಇಲ್ಲಿನ ರಚನೆಯಿಂದ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ಶಿವಶಂಕರ, ಗಣಪತಿ, ಬ್ರಹ್ಮದೇವ ಮತ್ತು ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳೂ ಇವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಬಲಭಾಗದ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಸುತ್ತಲಿರುವ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಮತ್ಸ್ಯ, ಕೂರ್ಮ, ವರಾಹ, ನರಸಿಂಹ, ವಾಮನ, ಪರಶುರಾಮ, ರಾಮ, ಕೃಷ್ಣ, ಬುದ್ಧ ಮತ್ತು ಕಲ್ಕಿ ಎಂಬ ದಶಾವತಾರಗಳ ಚಿತ್ರಣವಿದೆ. ಚತುರ್ಭುಜ ವಿಷ್ಣು ಮೂರ್ತಿಯ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ ಮತ್ತು ಕಮಲಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಿ, ಬೃಹಸ್ಪತಿ ಮತ್ತು ನಾರದ ಮುನಿಗಳ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದ ಬದಿಯಲ್ಲಿ ಸಭಾಂಗಣದಂತಹ ರಚನೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಲಿನ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಿಜಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ, ರಾಮಚಂದ್ರ ಮಹಾರಾಜ ಪಾರನೇರಕರ್ ಅವರ ಜೀವನಕಲಾ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಸಪ್ತಮಾತೃಕೆಯರ ಶಿಲ್ಪವನ್ನೂ ಕಾಣಬಹುದು.
ಲಾತೂರಿನ ಈ ಗ್ರಾಮದೈವದ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ, ಶುಕ್ರವಾರ ಮತ್ತು ಏಕಾದಶಿಯಂದು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾರ್ತಿಕ ಏಕಾದಶಿಯ ನಂತರ ಬರುವ ವೈಕುಂಠ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ದೀಪೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಹರಿಹರನ (ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಶಿವ) ಭೇಟಿಯ ಸೋಹಳವು ನಡೆಯುತ್ತದೆ. ದೀಪಾವಳಿ, ತುಳಸಿ ವಿವಾಹದಂತಹ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವಗಳ ನಂತರ ದೇವರ ಆಯಾಸವನ್ನು ದೂರ ಮಾಡಲು ಪ್ರಕ್ಷಾಲ ಪೂಜೆ ಅಂದರೆ ಮಹಾಭಿಷೇಕವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಈ ಮಂದಿರವು ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ತೆರೆದಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಲಾತೂರ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 1.4 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
केशवराज मंदिर
राम गल्ली, लातूर, ता. जि. लातूर
হিন্দু ধর্মে ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশ—এই ত্রিদেবের গুরুত্ব অপরিসীম। এদের মধ্যে সৃষ্টির পালনকর্তা ভগবান বিষ্ণুর একটি জনপ্রিয় রূপ হলো কেশব। ‘সুন্দর কেশধারী দেবতা’ হিসেবে পরিচিত এই কেশবরাজের একটি অত্যন্ত প্রাচীন ও প্রসিদ্ধ মন্দির লাতুর শহরের রাম গলিতে অবস্থিত। ভক্তদের বিশ্বাস, এই জাগ্রত দেবতা ভক্তদের শারীরিক, মানসিক ও আর্থিক ব্যাধি দূর করেন। এই মন্দিরের গর্ভগৃহে অবস্থিত কেশবরাজের মূর্তিটি হাজার বছরেরও বেশি প্রাচীন বলে মনে করা হয়।
মারাঠওয়াড়ার বৈষ্ণব ঐতিহ্যের সাক্ষী এই মন্দিরটি দ্বাদশ শতাব্দীতে অর্থাৎ যাদব যুগে নির্মিত হয়েছিল। তৎকালীন হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর প্রভাবে নির্মিত এই স্থাপত্যটি ১৯৯৩ সালের বিধ্বংসী কিলারী ভূমিকম্পে ব্যাপকভাবে ক্ষতিগ্রস্ত হয়েছিল। তবে স্থানীয় বাসিন্দা ও ভক্তরা একত্রিত হয়ে জনসহযোগিতার মাধ্যমে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেন। বিশেষ উল্লেখযোগ্য যে, এই সংস্কারের সময় পুরনো মন্দিরের পাথর ও উপকরণ ব্যবহার করে মূল স্থাপত্যের ঐতিহাসিক সৌন্দর্য রক্ষার সচেতন প্রচেষ্টা করা হয়েছে।
এই মন্দির সম্পর্কে লোককথা এই যে, দ্বাদশ শতাব্দীতে এই অঞ্চল যখন ঘন জঙ্গলে আবৃত ছিল, তখন এক মেষপালক গরু চরাতে গিয়ে মাটির নিচ থেকে একটি মূর্তির অগ্রভাগ বেরিয়ে থাকতে দেখেন।
কৌতূহলবশত খননকার্য চালালে সেখানে বিষ্ণুর দশ অবতার খোদাই করা একটি সুদৃশ্য মূর্তি পাওয়া যায়। পরবর্তীতে এই স্থানে পূজা-অর্চনা শুরু হয় এবং বৈষ্ণবপন্থী যাদব রাজাদের আশ্রয়ে এখানে মন্দির নির্মিত হয়। এই মন্দিরটিই আজ লাতুরের ধর্মীয় ও সাংস্কৃতিক জীবনের অবিচ্ছেদ্য অংশ হয়ে উঠেছে।
লাতুর শহরের কেন্দ্রস্থলে রাম গলি এলাকায় এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারের কাছে হনুমানের একটি ছোট মন্দির রয়েছে। এই মন্দিরের পিছনের দিকে সিদ্ধরাজ মহর্ষি গৃৎসমদ ঋষির সমাধি মন্দির রয়েছে। তিনি বৈদিক যুগের একজন প্রধান ঋষি হিসেবে পরিচিত। ঋগ্বেদের দ্বিতীয় মণ্ডলের অনেক সূক্তের দ্রষ্টা তাঁকে মনে করা হয়। তিনি অঙ্গিরস বংশের শুনহোত্র আঙ্গিরাস-এর পুত্র ছিলেন; কিন্তু তিনি ভৃগু বংশে অর্থাৎ ভার্গব বংশে দত্তক গৃহীত হন। তাই তিনি শৌনক ভৃগু-এর পুত্র হিসেবে পরিচিত হন। তাঁর ‘গৃৎসমদ’ নামের অর্থ ‘সমাধিতে আনন্দিত’ বলে ব্যাখ্যা করা হয়।
প্রধান মন্দিরের চারপাশের প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের অর্ধ-উন্মুক্ত মণ্ডপে প্রবেশ করা যায়। এই মণ্ডপের বাম দিকে বারান্দা এবং ডান দিকে সভাকক্ষের মতো কাঠামো রয়েছে। মণ্ডপের মাঝখানে বেদীর ওপর গরুড় মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের উন্মুক্ত প্রবেশদ্বারের উভয় পাশে আসন সদৃশ পাথরের বেদী রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে চারটি পাথরের স্তম্ভ রয়েছে। পূর্বে এই স্তম্ভগুলোর মাঝখানে সম্ভবত রঙ্গশিলা ছিল বলে এখানকার গঠন দেখে মনে হয়। সভামণ্ডপের দেওয়ালে থাকা কুলুঙ্গিতে শিবশঙ্কর, গণপতি, ব্রহ্মা ও হনুমানের মূর্তি রয়েছে। এছাড়া এখানে আরও কিছু প্রাচীন মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ডান দিকের কুলুঙ্গিতে দ্বারপালদের ভাস্কর্য রয়েছে।
গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর রৌপ্য প্রভামণ্ডলে বিষ্ণুর কালো পাথরে নির্মিত মূর্তি প্রতিষ্ঠিত। প্রায় চার ফুট উচ্চতার এই মূর্তির চারপাশের প্রভামণ্ডলে মৎস্য, কূর্ম, বরাহ, নরসিংহ, বামন, পরশুরাম, রাম, কৃষ্ণ, বুদ্ধ ও কল্কি—এই দশ অবতারের চিত্রণ রয়েছে। চতুর্ভুজ বিষ্ণুমূর্তির চার হাতে শঙ্খ, চক্র, গদা ও পদ্ম রয়েছে। মূর্তির সান্নিধ্যে লক্ষ্মী, বৃহস্পতি ও নারদ মুনির প্রতিমা রয়েছে।
মন্দিরের প্রদক্ষিণ পথের পাশে সভাকক্ষের মতো কাঠামো রয়েছে। মন্দিরের উৎসবের সময় এখানে বিভিন্ন অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মন্দিরের পিছনের দিকে পাথরের দেওয়ালে ছোট ছোট মূর্তি রয়েছে। মন্দির চত্বরে নিজানন্দ সরস্বতী মহারাজের সমাধি, রামচন্দ্র মহারাজ পারনেকর-এর জীবনকলামন্দির এবং সপ্তমাতৃকার ভাস্কর্যও দেখতে পাওয়া যায়।
লাতুরের এই গ্রামদেবতার দর্শনের জন্য প্রতি মঙ্গলবার, শুক্রবার ও একাদশীতে ভক্তদের ভিড় থাকে। বিশেষত কার্তিকী একাদশীর পর আসা বৈকুণ্ঠ চতুর্দশীতে এখানে দীপোৎসব হয় এবং হরিহরের (বিষ্ণু ও শিব) মিলনের উৎসব পালিত হয়। দীপাবলি, তুলসী বিবাহের মতো উৎসব এখানে অত্যন্ত উৎসাহের সাথে উদযাপিত হয়। বড় উৎসবের পর দেবতার ক্লান্তি দূর করার জন্য প্রক্ষাল পূজা অর্থাৎ মহাভিষেক করে মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। ভক্তদের জন্য এই মন্দির প্রতিদিন সকাল ৬টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত দর্শনের জন্য খোলা থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- লাতুর বাস স্ট্যান্ড থেকে ১.৪ কিমি দূরত্বে
- জেলার বিভিন্ন শহর থেকে এসটি (ST) বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ
ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਮੰਦਰ
ਰਾਮ ਗਲੀ, ਲਾਤੂਰ, ਤਾ. ਜ਼ਿ. ਲਾਤੂਰ
ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ (ਸ਼ਿਵ) ਇਹਨਾਂ ਤ੍ਰਿਦੇਵਾਂ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਪਾਲਣਹਾਰ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ‘ਕੇਸ਼ਵ’ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਰੂਪ ਹੈ। ‘ਸੁੰਦਰ ਵਾਲਾਂ ਵਾਲੇ ਦੇਵਤਾ’ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਇਸ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਦਾ ਇੱਕ ਬਹੁਤ ਹੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਲਾਤੂਰ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਰਾਮ ਗਲੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੱਲ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਤਾ ਹਨ, ਜੋ ਭਗਤਾਂ ਦੇ ਸਰੀਰਕ, ਮਾਨਸਿਕ ਅਤੇ ਆਰਥਿਕ ਦੁੱਖਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਤੋਂ ਵੀ ਵੱਧ ਪੁਰਾਣੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਮਰਾਠਵਾੜਾ ਦੀ ਵੈਸ਼ਨਵ ਪਰੰਪਰਾ ਦੀ ਗਵਾਹੀ ਭਰਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ, ਯਾਦਵ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਦੀ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਤੋਂ ਪ੍ਰਭਾਵਿਤ ਇਹ ਇਮਾਰਤ 1993 ਦੇ ਵਿਨਾਸ਼ਕਾਰੀ ਕਿੱਲਾਰੀ ਭੂਚਾਲ ਕਾਰਨ ਬੁਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਨੁਕਸਾਨੀ ਗਈ ਸੀ। ਹਾਲਾਂਕਿ, ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਕੇ ਲੋਕ-ਚੰਦੇ ਰਾਹੀਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਨਵੀਨੀਕਰਨ ਦੌਰਾਨ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪੱਥਰਾਂ ਅਤੇ ਸਮੱਗਰੀ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਮੂਲ ਇਮਾਰਤ ਦੀ ਇਤਿਹਾਸਕ ਸੁੰਦਰਤਾ ਨੂੰ ਬਰਕਰਾਰ ਰੱਖਣ ਦਾ ਸੁਚੇਤ ਯਤਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਇਹ ਇਲਾਕਾ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਸੀ, ਤਾਂ ਇੱਥੇ ਪਸ਼ੂ ਚਰਾਉਣ ਵਾਲੇ ਇੱਕ ਗਡਰੀਏ ਨੂੰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਦਾ ਸਿਰਾ ਬਾਹਰ ਨਿਕਲਿਆ ਹੋਇਆ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ।
ਉਤਸੁਕਤਾ ਨਾਲ ਕੀਤੀ ਗਈ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਉੱਥੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਦਸ ਅਵਤਾਰਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ ਅਤੇ ਵੈਸ਼ਨਵ ਪੰਥੀ ਯਾਦਵ ਰਾਜਿਆਂ ਦੀ ਸਰਪ੍ਰਸਤੀ ਹੇਠ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਹੋਈ। ਇਹ ਮੰਦਰ ਅੱਜ ਲਾਤੂਰ ਦੇ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਜੀਵਨ ਦਾ ਇੱਕ ਅਨਿੱਖੜਵਾਂ ਅੰਗ ਬਣ ਗਿਆ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਲਾਤੂਰ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਖੇਤਰ ਰਾਮ ਗਲੀ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸਿੱਧਰਾਜ ਮਹਾਰਿਸ਼ੀ ਗ੍ਰਿਤਸਮਦ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਹੈ। ਉਹ ਵੈਦਿਕ ਕਾਲ ਦੇ ਇੱਕ ਪ੍ਰਮੁੱਖ ਰਿਸ਼ੀ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਰਿਗਵੇਦ ਦੇ ਦੂਜੇ ਮੰਡਲ ਦੇ ਕਈ ਸੂਕਤਾਂ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾ (ਰਚੇਤਾ) ਸਨ। ਉਹ ਅੰਗਿਰਾ ਵੰਸ਼ ਦੇ ਸ਼ੁਨਹੋਤਰ ਆਂਗਿਰਸ ਦੇ ਪੁੱਤਰ ਸਨ, ਪਰ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਭ੍ਰਿਗੂ ਵੰਸ਼ ਵਿੱਚ ਗੋਦ ਲਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਉਹ ਸ਼ੌਨਕ ਭ੍ਰਿਗੂ ਦੇ ਪੁੱਤਰ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਣ ਲੱਗੇ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਨਾਮ ‘ਗ੍ਰਿਤਸਮਦ’ ਦਾ ਅਰਥ ‘ਸਮਾਧੀ ਵਿੱਚ ਅਨੰਦਿਤ’ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਬਰਾਮਦਗੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਭਾ-ਭਵਨ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਗਰੁੜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੰਡੀ ਹੋਈ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚਾਰ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਹਨਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਰੰਗਸ਼ਿਲਾ (ਨਾਚ-ਮੰਚ) ਰਹੀ ਹੋਵੇਗੀ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਬਣੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ, ਗਣਪਤੀ, ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਕੁਝ ਹੋਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਦਰਵਾਨਾਂ (ਦੁਆਰਪਾਲਾਂ) ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵਿੱਚ ਮਤਸਯ, ਕੂਰਮ, ਵਰਾਹ, ਨਰਸਿੰਘ, ਵਾਮਨ, ਪਰਸ਼ੂਰਾਮ, ਰਾਮ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਬੁੱਧ ਅਤੇ ਕਲਕੀ ਅਵਤਾਰਾਂ ਦਾ ਚਿਤਰਣ ਹੈ। ਚਤੁਰਭੁਜ ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਦੇ ਚਾਰ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ ਅਤੇ ਕਮਲ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨੇੜੇ ਲਕਸ਼ਮੀ, ਬ੍ਰਹਸਪਤੀ ਅਤੇ ਨਾਰਦ ਮੁਨੀ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਸਭਾ-ਭਵਨ ਵਰਗੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਿਜਾਨੰਦ ਸਰਸਵਤੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ, ਰਾਮਚੰਦਰ ਮਹਾਰਾਜ ਪਾਰਨੇਰਕਰ ਦਾ ਜੀਵਨਕਲਾ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸਪਤਮਾਤ੍ਰਿਕਾਵਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਵੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ।
ਲਾਤੂਰ ਦੇ ਇਸ ਗ੍ਰਾਮ-ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਹਰ ਮੰਗਲਵਾਰ, ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਅਤੇ ਇਕਾਦਸ਼ੀ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਖਾਸ ਤੌਰ ‘ਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਉਣ ਵਾਲੀ ਵੈਕੁੰਠ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਦੀਪ-ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਹਰੀਹਰ (ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਸ਼ਿਵ) ਦੇ ਮਿਲਣ ਦਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੀਵਾਲੀ, ਤੁਲਸੀ ਵਿਆਹ ਵਰਗੇ ਤਿਉਹਾਰ ਇੱਥੇ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਵੱਡੇ ਉਤਸਵਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਥਕਾਵਟ ਦੂਰ ਕਰਨ ਲਈ ਪ੍ਰਕਸ਼ਾਲ ਪੂਜਾ (ਮਹਾਭਿਸ਼ੇਕ) ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇਹ ਮੰਦਰ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 9 ਵਜੇ ਤੱਕ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਖੁੱਲ੍ਹਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਲਾਤੂਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 1.4 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੇ ਕਈ ਵਿਕਲਪ ਮੌਜੂਦ
मंदिरे
Temples
मंदिर
-
हत्तीबेट देवर्जन, ता. उदगीर, जि. लातूर
अधिक माहितीHattibet Devarjan, Taluka Udgir, District Latur
View Detailsहट्टीबेट देवर्जन, तालुका उदगीर, जिला लातूर
विवरण देखें -
वटसिद्ध नागनाथ मंदिर आणि संजीवनी बेट वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर
अधिक माहितीVatsiddha Nagnath Temple and Sanjeevani Island Vadval Nagnath, Taluka Chakur, District Latur
View Detailsवटसिद्ध नागनाथ मंदिर और संजीवनी द्वीप वडवल नागनाथ, तालुका चाकुर, जिला लातूर
विवरण देखें -
सिद्धेश्वर नागनाथ मंदिर नवकुंड झरी, ता. चाकूर, जि. लातूर
अधिक माहितीSiddheshwar Nagnath Temple Navkund Jhari, Taluka Chakur, District Latur
View Detailsसिद्धेश्वर नागनाथ मंदिर नवकुंड झारी, तालुका चाकुर, जिला लातूर
विवरण देखें
