आशापुरी माता मंदिर

पाटण, ता. सिंदखेडा, जि. धुळे

भारतात देव पूजनाची परंपरा प्राचीन असल्याचे अनेक पुरावे संशोधनातून उपलब्ध झाले आहेत. जुने ग्रंथ, शिलालेख मौखिक साहित्याच्या अभ्यासातून समाजाने देशांतर करताना आपल्या पुज्य देवता सोबत नेल्याचे कळते. अशाच प्रकारे राजस्थानातून महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आलेल्या आशापुरी मातेचे प्राचीन प्रसिद्ध मंदिर सिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे आहे. सुमारे २५६ कुळाची कुलदेवी असलेली आशापुरी माता जागृत, नवसाला पावणारी केवळ स्मरणाने भक्तांची संकटे दूर करणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे

पं. महादेवशास्त्री जोशी संपादितभारतीय संस्कृतीकोशाच्या पहिल्या खंडानुसार, आशापुरी ही गुजरात तसेच राजस्थानमधील एक देवता आहे. तेथील अनेकांची, विशेषतः राजस्थानातील पँवार आणि जाट शिखांतील दुडी समाजाची ती कुलदेवता आहे. शाकंभरी देवीच्या रूपातही आशापुरी देवीची पूजा केली जाते. या देवीस अपत्यप्राप्तीसाठी नवसही केले जातात. राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील सांभर, पाली जिल्ह्यातील नाडोल, तसेच गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातीलमाता नो मढयेथे आशापुरी देवीची महत्त्वाची ठाणी आहेत. आपल्या कुलदेवीचे स्थान फार लांब असू नये, या उद्देशाने आशापुरी देवीची स्थापना अनेक मध्यवर्ती ठिकाणी झाल्याचे दिसते. धुळे जिल्हा हा गुजरातला लागून असल्याने या भागातही अनेक लोकांचे आशापुरी देवी हे पूज्य दैवत आहे.

पाटण येथील देवीच्या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी सिंदखेडा येथील आशापूरी देवीचे निस्सिम भक्त असलेले एक ब्राह्मण गृहस्थ प्रतिवर्षी राजस्थानातील आशापुरी देवीच्या दर्शनासाठी जात असे. पुढे वृद्धापकाळामुळे त्यास ही यात्रा झेपेनाशी झाली, म्हणून त्याने देवीला आपल्या सोबत सिंदखेडा शहरात येण्याची विनंती केली. देवीने त्याची विनंती मान्य केली, परंतु अट घातली कीमी तुझ्यामागे येईन. पण तू मागे वळून पाहायचे नाही. पाहिल्यास त्याच ठिकाणी मी मूर्तीरूपात स्थिर होईन.’ ब्राह्मणाने ती अट मान्य केली. तो आपल्या गावाच्या दिशेने चालू लागला. मजलदरमजल करत तो सिंदखेडा शहराजवळील पाटण गावी आला असता, त्याचा विश्वास डळमळला त्याने देवी खरेच आपल्या सोबत आली आहे की नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी मूर्तीरुपात येथे स्थिर झाली. तेव्हा गावकऱ्यांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधले

बुराई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे माता आशापुरी देवस्थान सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. मात्र धुळे जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार या मंदिराची उभारणी संवत १८८४ (.. १८२८) मध्ये झाली. आशापुरी ही राजस्थानातील रावळ राजघराण्याची कुलदेवता आहे. या घराण्यातील एका राजपुरूषाने येथील मंदिरास एकर जमीन इनाम दिली असल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे. मंदिराची उभारणीही रावळ राजाने केल्याचे सांगण्यात येते

पाटण गावाच्या वेशीवर एक मोठी स्वागत कमान आहे. या कमानीच्या प्रत्येक स्तंभावर एक मधल्या चंद्रकोरीवर मध्यभागी एक अशा एकूण पाच मेघडंबरी आहेत. तेथून काही अंतर पुढे आल्यावर मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार नजरेस पडते. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या प्रवेशद्वाराला लागून मंदिराची आवारभिंत आहे. पुढे मंदिराच्या सभोवती धर्मशाळेची दुमजली इमारत आहे. या इमारतीतील प्रवेशद्वारातून उंचावर असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी १२ पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या डावीकडे असलेल्या नक्षीदार पाषाणातील मेघडंबरीमध्ये प्राचीन शिवलिंग आहे. प्रांगणात एका चौथऱ्यावर प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे. चौथऱ्याच्यावर या दीपमाळेच्या आत जाण्यासाठी मार्ग आहे. तेथून गोलाकार पायरी मार्गाने दीपमाळेच्या वरच्या टोकापर्यंत जाता येते. या दीपमाळेच्या शेजारी चौथऱ्यावर पितळी सिंह जमिनीवर कासव आहे. पुढे अष्टकोनी छताखाली यज्ञकुंड त्याच्या बाजूला बारा फूट उंचीचा त्रिशूल आहे.

सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिर उंच जगतीवर असल्यामुळे काही पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रत्येक स्तंभाखाली आडव्या धारेची नक्षी असलेला पाया आहे. स्तंभांच्या शीर्षभागी नक्षीदार कणी आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले असल्यामुळे छतात नऊ घुमट साकारले गेले आहेत. पुढे गर्भगृहाचे नक्षीदार प्रवेशद्वार आहे. दोन्ही द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गजलक्ष्मी आहे. प्रवेशद्वाराच्या वरील दोन्ही कोनात हस्तांवर सिंहशिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस शिलालेख आहे.

बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात वज्रपिठावर, चार नक्षीदार अष्टकोनी स्तंभ असलेल्या मखरात, देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भूज मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात लाडू चौथा हात अभय मुद्रेत आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट अंगावर सुवर्ण अलंकार आहेत. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीवर दोन्ही बाजूस गजराज त्यांच्यामध्ये कमळ फुलाची नक्षी आहे

मंदिराच्या बाह्य बाजूस छताकडे चहूबाजूंनी हस्त त्यावर सज्जा आहे. छतावर सर्व बाजूंनी बाशिंगी कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. शिखरावर खालील बाजूस कमळदल नक्षी वर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहेत. मंदिर परिसरात स्थानिक देवतांची मंदिरे, काही पुरातन शिल्पे तसेच मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन आदी इमारती आहेत

मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्री, चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्र, पौष पौर्णिमा हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी देवीस महाअभिषेक घालून पूजन केले जाते. उत्सवांच्या वेळी दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर महिन्याची पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, मंगळवार, शुक्रवार इत्यादी दिवशी कुळाचारासाठी येणाऱ्या भाविकांची येथे गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • सिंदखेडा येथून किमी, तर धुळे येथून ४८ किमी अंतरावर
  • धुळे जिल्ह्यातील अनेक शहरांतून सिंदखेडा येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे
Back To Home