हनुमान मंदिर

तुंग, ता. मिरज, जि. सांगली

गावे, शहरे, वाड्या अशा मानवी वस्त्यांचे प्राचीन काळापासून अनेक कारणांनी स्थलांतर होत आले आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप हे त्याचे मुख्य कारण ठरते. गावांच्या स्थलांतरासोबत गावातील मंदिरांचेही स्थलांतर झाल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. परंतु मिरज तालुक्यातील तुंग येथील हनुमान मंदिर हे गावासोबतच मूळ मंदिराच्या बांधकामातील पाषाणांसह येथे स्थलांतरीत झालेले आहे. हा जागृत देव नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दर शनिवारी येथे साप्ताहिक यात्रा भरते हजारो भाविक येथे देवाच्या दर्शनासाठी येतात.

हे मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केले असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र समर्थानी स्थापन केलेल्या प्रसिद्ध अकरा मारुती मंदिरांत याची गणना होत नाही. या मारूतीचे समर्थ रामदास स्वामींनी दर्शन घेतले होते, असेही सांगण्यात येते. पूर्वी हे गाव नदीतीरावर होते. मात्र सतत येणाऱ्या पुरामुळे गावास मोठी झळ बसत असे. त्यामुळे .. १८७५ मध्ये गाव स्थलांतरित करण्याचे ठरले. त्यावेळी हे मंदिरही गावासोबत तुंग या उंचावरील ठिकाणी स्थानांतरित झाले. या ठिकाणी मूळ मंदिराच्या बांधकामातील पाषाण आणून मंदिर आधी जसे होते तसेच बांधण्यात आले. उंचावर म्हणजेच उत्तुंग ठिकाणी वसल्यामुळे या देवास तुंग मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले. १८७५ पासून आजतागायत येथे मारूती जन्मोत्सव मोठ्या थाटामाटाने उत्साहाने साजरा केला जातो.

मंदिरासमोर प्रांगणात त्रिस्तरीय गोलाकार दीपमाळ आहे. त्याशेजारी चौथऱ्यावर तुलसी वृंदावन भस्मकुंड आहे. प्रांगणापेक्षा मंदिराचा मुखमंडप काहीसा उंचावर आहे. मुखमंडपात सहा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. वर्तुळाकार स्तंभपाद काहीसे अधिक रुंद आहेत. त्यात एकावर एक असे तीन रिंगण आहेत. स्तंभांवर उभ्या धारेची नक्षी शीर्षभागी चौकोनी कणी आहे. कणीवरील हस्तांमुळे स्तंभांवर अर्धचंद्राकार पाच कमानी तयार झाल्या आहेत. मुखमंडपात डाव्या उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत.

मुखमंडपापेक्षा उंचावर असलेल्या लाकडी दुमजली बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या रांगातील स्तंभ भिंतीत आहेत. लाकडी स्तंभांचे दगडी स्तंभपाद चौकोनी आहेत. सभामंडपाच्या जमिनीवर कूर्मशिल्प आहे. भिंतीलगत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी जीना आहे. सभामंडपास गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या उजव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत.

पुढे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले, मंदिराचे प्राचीन गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या पहिल्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. दुसऱ्या द्वारशाखांवर खालील बाजूस द्वारपाल वर पानाफुलांची नक्षी आहे. मंडारकावर कीर्तिमुख आहे. द्वारशाखा ललाटपट्टी रजतपटल अच्छादित आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर मारुतीची उभी मूर्ती आहे. मूळ मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. १९८० साली त्यावर पंचधातूचे वज्रलेपन केलेले आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग दाखवणारी चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार लघू शिखरे मध्यभागी उंच निमुळत्या होत गेलेल्या मुख्य शिखरात उरूशृंग प्रकारची सोळा उपशिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक अशा दोन कमळ फुलांची प्रतिकृती असलेले आमलक त्यावर कळस आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दत्तात्रेयांचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती पादुका आहेत. या मंदिराच्या बाजूला महादेव मंदिर आहे. मंदिरासमोर वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती गर्भगृहात शिवपिंडी आहे. प्रांगणात काही नागशिळा आहेत. प्रांगणाच्या अर्ध्या भागात अन्नछत्र मंडप उभारण्यात आलेला आहे.

मंदिरात चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा केला जातो. एप्रिल हा मंदिराचा वर्धापन दिवस मारुतीचा जन्मोत्सव म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. वार्षिक उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, संगीत नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी मारुतीरायाचा पालखी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात जल्लोषात साजरा केला जातो. हजारो भाविक गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी होतात. दर शनिवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दररोज अन्नछत्र चालवले जाते. दर शनिवारी सुमारे पाच हजार भाविक येथील महाप्रसादाचा लाभ घेतात.

उपयुक्त माहिती

  • मिरजपासून २८ किमी, तर सांगली येथून १५ किमी अंतरावर
  • मिरज सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६३७६९१३४७, ८००७६५८४५८
Back To Home