चौरंगीनाथ मंदिर

सोनसल, ता. कडेगाव, जि. सांगली

हिंदू धर्मातील विविध तत्वप्रणालीत नाथपंथीय तत्वप्रणालीचे वेगळे महत्व आहे. देशात नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धांची मंदिरे अनेक ठिकाणी आहेत. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य चौऱ्यांशी सिद्धांपैकी एक मानले गेलेले चौरंगीनाथ यांच्या कथा महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल, गुजरात, पंजाब, आंध्र, तेलंगण आदी राज्यांत प्रचलित आहेत. त्यांचे एक मुख्य मंदिर पाकिस्तानातील सियालकोट येथे आहे. त्याच पंक्तीतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर सोनसलजवळील डोंगर माथ्यावर आहे. हे प्राचीन देवस्थान अत्यंत जागृत आहे चौरंगीनाथ भक्तांच्या हाकेला धावून येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे

चौरंगीनाथ यांनासारंगधर’, ‘पूरण भगत’, ‘चौरंगीपा’, तसेचगाभूरया नावांनीही ओळखले जाते. त्यांचे गुरूबंधू गोरक्षनाथ यांचा काळ .. १०५० ते ११५० हा मानला जातो. त्यामुळे चौरंगीनाथांचाही काळ बाराव्या शतकापूर्वीचा असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. ‘मराठी ज्ञानकोशातील नोंदीनुसार, चौरंगीनाथ यांच्या नावाचा सर्वांत जुना उल्लेख ११ ते १३व्या शतकातील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचीत आढळतो. ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात त्यांचा उल्लेख आहे. तो असा, ‘तो मत्स्येंद्र सप्तशृंगी। भग्नावयवा चौरंगी। भेटला कीं तो सर्वांगी। संपूर्ण जाला।।’. चांगदेवांच्या चौदाव्या शतकातीलतत्त्वसारया ग्रंथात, तसेचनवनाथ चरित्रम्’, ‘कदलीमंजुनाथमाहात्म्यआदी ग्रंथांतील नवनाथांच्या सूचीतही त्यांचे नाव आहे. त्यांनीप्राणसंकलीनावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी स्वतःस राजा सालवाहनाचा पुत्र म्हटले आहे

चौरंगीनाथ यांच्या नाना चरित्रकथा आहेत. गोरक्षनाथांच्याकिमयागारया ग्रंथावरून धुंडीसूत मालू या कवीनेनवनाथ भक्तिसारहा ग्रंथ रचला. या सांप्रदायिक ग्रंथाच्या ३०व्या अध्यायात, चौरंगीनाथ हे वैदर्भ देशाच्या शशांगर नामक राजाचे अयोनीसंभव पुत्र असल्याचा उल्लेख आहे. त्या कथेनुसार, त्यांचे आधीचे नाव कृष्णागर होते. त्यांच्या सावत्र मातेने त्यांच्यावर चारित्र्यहननाचा खोटा आरोप केला. त्यावरून शशांगर राजाने त्यांचे हातपाय तोडून त्यांना एका चौकात टाकून दिले. तेथून जात असताना मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथांनी त्यांना पाहिले स्वतःबरोबर नेले. यानंतर चौरंगीनाथांनी मत्स्येंद्रनाथांचे शिष्यत्व स्वीकारले त्यांनी दिलेल्या योगदीक्षेनुसार एका बंदिस्त गुहेत बारा वर्षे तपसाधना केली. त्यामुळे त्यांना आपले हातपाय पुन्हा प्राप्त झाले. सोनसल गावच्या डोंगरातील याच गुहेत चौरंगीनाथांना योगसिद्धी प्राप्त झाली, अशी मान्यता आहे. त्यामुळे येथील मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे

डोंगर माथ्यावर असलेल्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून पायरीमार्ग गाडीरस्ता असे दोन मार्ग आहेत. प्रारंभ बिंदूवर स्वागत कमान ३८० पायऱ्या असलेल्या पायरी मार्गाने चालून किंवा रस्त्याने मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराच्या प्रांगणात मंदिरासमोरील चौथऱ्यावर तीन थरांची गोलाकार दीपमाळ आहे. वर्तुळाकार रिंगणाने या दीपमाळेचे थर विभागलेले आहेत. दीपमाळेच्या चौथऱ्यावर नंदीच्या आठ ते दहा लहान मूर्ती जमिनीवर एक मोठी मूर्ती आहे. या प्राचीन मूर्तींची बरीच झीज झालेली आहे. चौथऱ्याच्या बाजूला तुलसी वृंदावन आहे

मंदिराच्या अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर शेंदूर लावलेले चौकोनी पाषाण आहे. पाषाणाभोवती स्टेनलेस स्टीलच्या नळ्या लावून सुरक्षा कठडा तयार करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या पाषाणाखाली असलेल्या गुहेत चौरंगीनाथांनी तपसाधना केली होती. सभामंडपात चारही कोनांवर चार नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. स्तंभांवर उभ्या धारेची नक्षी आहे. स्तंभपाद वर्तुळाकार अधिक रुंद आहेत. सभामंडपात दोन्ही बाजूस असलेल्या कठड्यात कक्षासने आहेत. डाव्या बाजूच्या कठड्यातील देवकोष्टकात गणेश मूर्ती त्यासमोरील उजव्या बाजूच्या कठड्यातील देवकोष्टकात मारुतीची मूर्ती आहे. सभामंडपात समोरील बाजूस संगमरवरी स्तंभ असलेल्या काचेच्या मखरात श्रीदत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे

पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या अंतराळात जाण्यासाठी दत्तात्रेयांच्या मखराच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार पायऱ्या आहेत. खुल्या स्वरूपाच्या अंतराळात दोन्ही बाजूला प्रत्येकी पाच मध्यभागी चार नक्षीदार गोलाकार स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर मधल्या स्तंभांच्यामध्ये चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीवरील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले अभिषेक पात्र टांगलेले आहे. मंदिराच्या सभामंडपावर चार, अंतराळावर एक गर्भगृहावर मुख्य अशी एकूण सहा शिखरे आहेत. मुख्य शिखर सोडून सर्व शिखरे घुमटाकार नक्षीदार आहेत. मुख्य शिखर चौकोनी उरूशृंग प्रकारचे आहे. त्यात ५३ उपशिखरे आहेत. मुख्य शिखरात शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहे. चौरंगीनाथ मंदिरात दत्त जयंती उत्सव गुरूपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरे केले जातात. दररोज सकाळी सायंकाळी वाजता येथे आरती होते. डोंगर माथ्यावरील या मंदिरात भाविकांची तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • कडेगावपासून १७ किमी, तर सांगलीपासून ६४ किमी अंतरावर
  • कडेगाव येथून सोनसलपर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : नाना पुजारी, मो. ९०४९४७२९३३, रमेश पुजारी, मो. ८०५५१६५५३०
Back To Home