वाघेश्वर मंदिर 

चऱ्होली बुद्रुक, पिंपरी-चिंचवड, पुणे

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पुनित झालेले शेकडो वर्षांचा इतिहास असलेले चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील सुंदर भव्य मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. ‘महास्थळम्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याच्या नोंदी आहेत. त्या आधीपासून म्हणजेच यादव काळापासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे भरणारी यात्रा प्रसिद्ध असून त्यावेळी वाघेश्वराच्या दर्शनाला हजारो भाविक येतात.

आळंदीपासून जवळच चऱ्होली हे गाव आहे. शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील टेकडीवर पुरातन वाघेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोमाजीराव दाभाडे यांच्याकडे या परिसराची जहागिरी होती. असे सांगितले जाते की सोमाजीराव दाभाडे यांचे पुत्र कृष्णाजी दाभाडे यांनी या मंदिराची उभारणी केली. त्यांनी या परिसरात अनेक मोठमोठ्या वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली. काही नोंदींमध्ये हे मंदिर यादवकालीन असल्याचे उल्लेख आहेत. असे सांगितले जाते की ज्ञानेश्वरादी भावंडांना समाजाने वाळीत टाकल्यानंतर ते अनेकदा या मंदिरात वास्तव्य करून ध्यानधारणा करीत असत. संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र लोहगाव येथे जाताना आणि तेथून परतताना या मंदिरात विश्राम करण्यासाठी थांबत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मूळ मंदिर दगडांनी बांधलेले असून मंदिर परिसराला उंच तटबंदी आहे. प्रथमदर्शनी तो किल्ला असावा असा भास होतो. १०० ते ११० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. आता थेट वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतील, असा मागच्या बाजूने रस्ता तयार करण्यात आला आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर समोरच एका भव्य चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सुंदर वर निमुळती होत जाणारी उंच दीपमाळ आहे.

२०१८१९ या वर्षी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मुखमंडप, सभामंडप, नंदी मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण कोरीव गजराज स्थानापन्न आहेत. त्यांच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यातील दगडी खांबांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. येथील सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्याला रंगमंडप असे संबोधले जाते. मंडपाच्या वितानावर (छत) संपूर्ण लाकडी सजावट केली असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. सभामंडपातच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडप आहे. दगडी खांबांच्या मधोमध नंदीची भव्य मूर्ती आहे. गर्भगृहात असलेली शिवपिंडीची शाळुंका ही षटकोनी आकाराची असून त्याच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही काळ्या पाषाणातील असून कळसाला सोनेरी रंग दिल्यामुळे ते किमी अंतरावरूनही हे मंदिर नजरेस पडते.

मंदिराच्या मागच्या बाजूला शिवपार्वती परिवाराचे दर्शन घडवणारे एक भव्य शिल्प अलीकडच्या काळात घडवण्यात आले आहे. कैलास पर्वतावर बसलेले शिवपार्वती, बाजूला एक उंच त्रिशूळ पर्वतामधून वाहती गंगा, असा सुंदर देखावा येथे करण्यात आला आहे. कृत्रिमरित्या या गंगेतून पाणी वाहत असते, तसेच रात्रीच्या वेळी मंदिरावर या शिल्पांवर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे अनेक भाविकांसह पर्यटकांचीही सायंकाळी येथे गर्दी होते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर उद्यान विकसित केले आहे. तेथे अनेक शोभेची फुलांची झाडे लावण्यात आल्याने हा परिसर खुलून दिसतो

महाशिवरात्रीला आणि श्रावणातील सोमवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्या दिवशी भजन, कीर्तन, हरिनाम असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते बैलगाडा शर्यती. शेकडो बैलगाडा मालक यात सहभागी होतात. आलेल्या भाविकांना यावेळी महाप्रसाद देण्यात येतो. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून लाखांहून अधिक लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.)

मंदिरात दररोज सकाळी सायंकाळी वाजता आरती होते. सकाळी ते रात्री १० पर्यंत भाविकांना वाघेश्वराचे दर्शन घेता येते. सोमवारच्या उत्सवांच्या दिवशी ही वेळ रात्री ११ पर्यंत असते.

उपयुक्त माहिती:

  • आळंदीपासून किमी, तर पुण्यापासून २० किमी अंतरावर
  • पुणे, पिंपरीचिंचवडमधील अनेक भागांतून पीएमपीएमएल बसची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home