विठ्ठल मंदिर

दशेरा मैदान, धुळे, ता. जि. धुळे

संत ज्ञानेश्वरांनीज्ञानेश्वरीलिहिली मानवांतील अमंगल अशा भेदाभेद भ्रमास कडाडून विरोध केला. त्यांनी विठ्ठलभक्तीच्या भागवत धर्माचा पाया घातला. पुढे संत तुकारामांनी विठ्ठलभक्तीच्या या इमारतीवर कळस चढवला. या सर्व संतांचे माहेरघर असलेले पंढरपूर हे विठ्ठलाचे मूळपीठ असले, तरी आज प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली सुमारे चारशे ते पाचशे उपपीठे असंख्य मंदिरे देशभरात आहेत. यातीलच एक प्रसिद्ध विठ्ठल मंदिर धुळ्यातील दशेरा मैदान येथे आहे. येथील विठ्ठलाच्या दर्शनाने पंढरीच्या वारीचे पुण्य प्राप्त होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.

या मंदिराचा इतिहास असा की धुळे शहरातील त्र्यंबक गणेश गानू हे विठ्ठलभक्त सच्चिदानंद स्वामी नावाने प्रसिद्ध होते. धुळ्यात आपल्या देवाचे स्वतंत्र सुंदर देवालय असावे, अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी पाथरवट शिल्पी बोलावून आपल्या खासगी जागेत मंदिर बांधावयास सुरूवात केली. मंदिरासाठी खास चेकरवाडी येथील खाणीतून दगड आणण्यात आले. मुंबईचे शिल्पकार शिराळकर बंधू यांच्याकडून काळ्या संगमरवरी पाषाणात विठ्ठलाची मूर्ती घडवून घेतली. सच्चिदानंद स्वामी यांनी स्वखर्चाने आपल्या दैनंदिन पुजेसाठी सन १९६६ सालच्या विजया दशमीला हे मंदिर बांधून पूर्ण केले. पुढे परिसरातील शेकडो विठ्ठलभक्त येथे देवाच्या दर्शनासाठी येऊ लागले. ते पाहून सच्चिदानंद स्वामींनी हे मंदिर सर्वांसाठी खुले केले.

मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिराभोवती तीन बाजूंनी दगडी बांधणीची आवारभिंत आहे. समोर लोखंडी जाळीदार झडपा असलेली तीन प्रवेशद्वारे आहेत. मधल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन चौकोनी स्तंभ त्यावर अर्धचंद्राकार लोखंडी कमान आहे. मंदिराच्या पाषाणी फरसबंदी प्रांगणात सभोवतीने भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. तटबंदीलगत अनेक वृक्ष आहेत. मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात समोरील बाजूला दोन गोलाकार स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभांवर कणी, त्यावर तुळई तुळईवर छत आहे. छताला पितळी घंटा टांगलेली आहे. छताची मागील बाजू सभामंडपाच्या भिंतीवर आहे.

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर ललाटपट्टीवर उभ्या धारेची नक्षी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) उजेड हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. दगडी फरसबंदी असलेल्या सभामंडपात कूर्मशिल्प आहे. सभामंडपास गर्भगृहाच्या डाव्या उजव्या बाजूनेही दोन प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराचे गर्भगृह सभामंडपापेक्षा काही इंच उंचावर आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नमस्कार मुद्रेतील हनुमान उजव्या बाजूला गरुड यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती मंडारकावर व्याघ्रमुख आहे. गर्भगृहात वज्रपिठावर कटेवर कर ठेवलेल्या विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या अंगावर वस्त्रे अलंकार कोरलेले आहेत. वज्रपिठावर मूर्तीच्या दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ स्तंभांवर महिरपी कमान आहे. गर्भगृहात उजेड हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे

मुखमंडप सभामंडपाच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. मुखमंडपाच्या छतावरील कठड्यावर मध्यभागी गदाधारी वीर मारुतीची मूर्ती आहे. कठड्यात दोन्ही बाजूला अर्धस्तंभांवर आमलक आमलकावर कळस आहेत. सभामंडपाच्या छतावरील समोरील बाजूच्या कठड्यात दोन्ही कोपऱ्यावर अर्धस्तंभांवर आमलक त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावरील बाशिंगी कठड्याच्या मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक त्यावर कळस आहे

येथे आषाढी कार्तिकी एकादशी हे मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी देवाच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविक येतात. मंदिरात देवाचा महाअभिषेक करून उत्सवास सुरूवात होते. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात दर एकादशी प्रदोषाच्या दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते. दररोज सकाळी ते सायंकाळी या वेळेत भाविकांना या विठ्ठलाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती

  • धुळे बस स्थानकापासून . किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून धुळेसाठी एसटी रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home