सूर्यनारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
जगभरात सूर्योपासनेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात विशेषतः हिंदू धर्मपरंपरेत सूर्योपासनेला स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. आपल्या देशात सुमारे सातव्या शतकापासून सूर्यमंदिरांचा इतिहास लिखित स्वरूपात ज्ञात आहे. भारतात अनेक सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय आठव्या शतकातील जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि गुजरात मधील पुष्पावती नदीकाठावर वसलेले मोढेरा येथील सूर्यमंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणारे एक प्राचीन सूर्यमंदिर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बरबाडा या गावात वसलेले आहे. बरबाडा येथील या ऐतिहासिक सूर्यमंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि धनसंपदा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिक पातळीवर एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. प्राचीन काळी या परिसरात एका ब्रह्मराक्षसाचा वावर होता. त्याच्या त्रासामुळे परिसरातील ग्रामस्थ विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. ही बाब जेव्हा संत महंत रामगिरी महाराज यांना समजली, तेव्हा त्यांनी या समस्येचे निवारण करण्याचे ठरवले. त्यांनी याच ठिकाणी आपली तपोभूमी निर्माण केली आणि ते तपस्येला बसले. रामगिरी महाराजांनी सलग बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून तपोबल प्राप्त केले. आपल्या या तपोबलाने त्यांनी परिसराला त्रास देणाऱ्या त्या ब्रह्मराक्षसाचा पूर्णपणे नायनाट केला.
भविष्यात या भागात पुन्हा कधीही अशा नकारात्मक शक्तींचा उपद्रव होऊ नये, या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सूर्यमंदिराची स्थापना केली.
हे मंदिर बरबाडा गावापासून काही अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. मुख्य गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या समोरील भागात झाडांच्या छायेत एक प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी आसने, स्वच्छतागृह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक खुले व्यासपीठ बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना आहे, तर प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लागणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. सूर्यनारायण मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर प्रामुख्याने गर्भगृह स्वरूपाचे आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे दोन फूट उंच अशा दगडी अधिष्ठानावर म्हणजेच चौथऱ्यावर आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्यावर महिरप तोरण दिसते. मंदिराच्या आत गर्भगृहात वज्रपीठावर भगवान सूर्यदेवाची मूर्ती प्रस्थापित आहे. ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील आहे आणि ती सप्तअश्वरथावर आरूढ आहे. सूर्यदेवाची ही पाषाणमूर्ती वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेली असते. मंदिराच्या छताच्या चार कोनांवर ऋषींची शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागावर गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखराच्या माथ्यावरील आमलकावर कळस आणि ध्वजपताका आहे.
मुख्य सूर्यमंदिराच्या बाजूलाच महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरासमोर दगडी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. हे महादेव मंदिर प्रांगणाच्या जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असल्यामुळे याच्या प्रवेशद्वाराला चार पायऱ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड स्थापित आहे. या शिवपिंडीवर जलधारेसाठी छताला तांब्याचे अभिषेक पात्र टांगले आहे.
मंदिराच्या छतावर गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या आतील आणि खालील थरावर पद्मदल मंडळाचे म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांचे कोरीव काम दिसते. शिखराच्या वरच्या भागावर आमलक आणि त्यावर कळस आहे.
महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि मुख्य गर्भगृह अशा दोन भागांत आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृहाचा भाग अधिक उंचावर असल्यामुळे तेथे येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या वर असलेल्या दगडी चौथऱ्यावर रामगिरी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर महंत रामगिरी महाराज यांची ध्यानस्थ पाषाणमूर्ती प्रस्थापित आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरामध्ये आठ देवकोष्टके आहेत. या एकूण चोवीस देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक दोन आमलक आणि त्यावर कळस आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच इतर दिवंगत महंतांची छोटी समाधी मंदिरे आहेत. तसेच येथे मंदिराचे स्वयंपाकघर, नियमित चालणारे अन्नछत्र, सेवेकरी व भाविकांची निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत.
बरबाडा येथील या सूर्यमंदिरात दरवर्षी मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी सुहासिनी आणि इतर भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. ते तीळ-गुळाचा नैवेद्य आणि मातीची पारंपरिक सुगडे सूर्यदेवाला अर्पण करतात. वर्षभरातील इतर सर्व प्रमुख हिंदू सण आणि उत्सवांच्या वेळीही भाविक या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांकडून अन्न वाटपाचे नवस बोलले जातात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी येथे नियमितपणे अन्नछत्र चालवले जाते. उत्सवाच्या दिवसांमध्ये अनेक भजनी मंडळे आणि कीर्तनकार मंदिरात भजन व कीर्तन सेवा सादर करतात. प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि करिदिन या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ७ किमी अंतरावर
- जालना शहरापासून ६१ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
Suryanarayan Temple
Barbada, Taluka Mantha, District Jalna
The tradition of sun worship has been practiced across the world since ancient times. In India, particularly within the Hindu religious tradition, sun worship holds a distinct and significant place. The documented history of sun temples in our country dates back to approximately the seventh century. Many sun temples are famous in India, among which the Sun Temple at Konark in Odisha is world-renowned. Additionally, the eighth-century Martand Sun Temple in Jammu and Kashmir and the Sun Temple at Modhera, situated on the banks of the Pushpavati River in Gujarat, are especially famous. Carrying forward this historical legacy, an ancient sun temple is situated in the village of Barbada in the Mantha taluka of Jalna district. Devotees believe that by seeking blessings at this historical sun temple in Barbada, one attains excellent health, prosperity, and wealth. This temple in the rural area is a revered place for devotees.
An ancient legend is prevalent at the local level regarding the establishment of the temple. In ancient times, a Brahmarakshasa haunted this area. Due to the suffering caused by it, the villagers in the vicinity were troubled by various physical and mental ailments. When Saint Mahant Ramgiri Maharaj learned of this, he decided to resolve the problem. He established his place of penance here and sat for meditation. Ramgiri Maharaj performed rigorous penance for twelve consecutive years and attained spiritual power. Through this spiritual power, he completely eradicated the Brahmarakshasa that was troubling the area.
With the intention that such negative forces would never again trouble this region in the future, he established the Sun Temple here.
This temple is situated in a nature-rich area at a short distance from Barbada village. There is a paved road facility from the main village to the temple. In the area in front of the temple, there is a spacious parking lot under the shade of trees. In the vicinity of this parking lot, seats for the rest of devotees, restrooms, and an open platform for various cultural programs have been built. The main temple is protected by a fortification on all four sides. A two-story entrance gate has been built within this fortification. There is a drum house (Nagarkhana) on the first floor of this entrance, and an idol of Ganesha is carved on the front wall of the entrance. There is a dome-shaped spire on the roof of the entrance. In the spacious courtyard that one enters after passing through the gate, there are ancient trees. The architecture of the Suryanarayan Temple is unique. This temple is primarily in the form of a sanctum sanctorum (Garbhagriha). The entire temple stands on a stone foundation, or plinth, about two feet high from the ground.
There are four steps to enter the temple. On the doorframes on both sides of the entrance to the sanctum, carvings of leaves and flowers are visible. An idol of Ganesha is carved on the lintel of this entrance, and an arched toran is seen above it. Inside the sanctum of the temple, the idol of Lord Suryadev is installed on a Vajrapitha (diamond throne). This idol is four-armed and is mounted on a chariot with seven horses. This stone idol of Suryadev is adorned with clothes and ornaments. Sculptures of sages are carved on the four corners of the temple ceiling. On the central part of the ceiling, there is a circular spire that tapers towards the top. On the Amalaka at the top of this spire, there is a finial (Kalash) and a flag (Dhvajapataka).
Beside the main Sun Temple, there is a small temple of Mahadeva. In front of this temple, there is an idol of Nandi made of black stone on a stone Vajrapitha. Since this Mahadeva temple is slightly higher than the ground level of the courtyard, there are four steps to its entrance. A Shiva Linga is installed in the sanctum of the temple. A copper vessel for ritual bathing (Abhishek) is hung from the ceiling for the water flow over this Shiva Linga.
A circular spire is built on the roof of the temple. On the inner and lower layers of the spire, carvings of a lotus petal circle (Padmadal Mandala) are visible. There is an Amalaka on the upper part of the spire and a finial on top of it.
Behind the Mahadeva temple is the Samadhi temple of Mahant Ramgiri Maharaj. The structure of this temple consists of two parts: a assembly hall (Sabhamandap) and the main sanctum. The assembly hall here is open in nature. Since the sanctum part is at a higher level compared to the assembly hall, there are five steps to reach it. On the stone plinth above these steps, the footprints (Padukas) of Ramgiri Maharaj are installed. Leaf and flower patterns are carved on the doorframes and the lintel of the sanctum entrance. Inside the sanctum, a stone idol of Mahant Ramgiri Maharaj in a meditative posture is installed on a Vajrapitha. On the roof of the sanctum, there is a three-layered circular spire. In each layer of this spire, there are eight niches for deities. In these twenty-four niches in total, there are idols of various goddesses and gods. On the top of the spire, there are two Amalakas one above the other, and a finial on top. Beside the Samadhi temple, there are small Samadhi temples of other late Mahants. Also, there is the temple kitchen, a regularly operating food charity (Annachhatra), residences for servants and devotees, and other structures.
In this Sun Temple at Barbada, two main annual festivals, Makar Sankranti and Ratha Saptami, are celebrated on a large scale every year. During these festivals, married women and other devotees come to the temple for darshan. They offer sesame-jaggery offerings and traditional earthen pots (Sugade) to the Sun God. Devotees also come for darshan to this Suryanarayan Temple during all other major Hindu festivals and celebrations throughout the year. Vows of food distribution are made by devotees at this temple, and to fulfill these vows, a food charity is regularly operated here. During festival days, many Bhajan groups and Kirtankars present Bhajan and Kirtan services in the temple. The number of devotees visiting the temple for darshan is higher on special days like every Sunday, full moon (Purnima), new moon (Amavasya), and auspicious days. Devotees can have darshan here every day from six in the morning until eight in the evening.
Useful Information
- 7 km from Mantha
- 61 km from Jalna city
- ST bus facility from Mantha city
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities are available in the area
- Contact: Temple Office, Mob. 09769249318
सूर्यनारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
विश्व भर में सूर्योपासना की परंपरा प्राचीन काल से चली आ रही है। भारत में विशेषकर हिंदू धर्म परंपरा में सूर्योपासना को स्वतंत्र और महत्वपूर्ण स्थान प्राप्त है। हमारे देश में लगभग सातवीं शताब्दी से सूर्य मंदिरों का इतिहास लिखित रूप में ज्ञात है। भारत में अनेक सूर्य मंदिर प्रसिद्ध हैं, जिनमें ओडिशा के कोणार्क स्थित सूर्य मंदिर विश्व प्रसिद्ध है। इसके अलावा आठवीं शताब्दी का जम्मू-कश्मीर स्थित मार्तंड सूर्य मंदिर और गुजरात में पुष्पावती नदी के तट पर बसा मोढेरा का सूर्य मंदिर विशेष रूप से प्रसिद्ध है। इसी ऐतिहासिक परंपरा का वारिस एक प्राचीन सूर्य मंदिर जालना जिले के मंठा तहसील के बरबाडा गांव में स्थित है। बरबाडा के इस ऐतिहासिक सूर्य मंदिर में दर्शन करने से भक्तों को उत्तम स्वास्थ्य, ऐश्वर्य और धन-संपदा प्राप्त होती है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। ग्रामीण क्षेत्र का यह मंदिर भक्तों का श्रद्धा केंद्र है।
मंदिर की स्थापना के विषय में स्थानीय स्तर पर एक प्राचीन किंवदंती प्रचलित है। प्राचीन काल में इस परिसर में एक ब्रह्मराक्षस का वास था। उसके त्रास से क्षेत्र के ग्रामीण विभिन्न प्रकार के शारीरिक और मानसिक व्याधियों से ग्रस्त थे। यह बात जब संत महंत रामगिरी महाराज को पता चली, तब उन्होंने इस समस्या का निवारण करने का निर्णय लिया। उन्होंने इसी स्थान पर अपनी तपोभूमि बनाई और वे तपस्या में लीन हो गए। रामगिरी महाराज ने लगातार १२ वर्षों तक कठोर तपस्या कर तपोबल प्राप्त किया। अपने इस तपोबल से उन्होंने क्षेत्र को त्रस्त करने वाले उस ब्रह्मराक्षस का पूर्णतः विनाश किया।
भविष्य में इस क्षेत्र में पुनः कभी ऐसी नकारात्मक शक्तियों का उपद्रव न हो, इस उद्देश्य से उन्होंने यहाँ सूर्य मंदिर की स्थापना की।
यह मंदिर बरबाडा गांव से कुछ दूरी पर प्रकृति से समृद्ध परिसर में स्थित है। मुख्य गांव से मंदिर तक आने के लिए पक्की सड़क की सुविधा है। मंदिर के सामने के भाग में पेड़ों की छाया में एक प्रशस्त वाहन पार्किंग है। इस पार्किंग परिसर में भक्तों के विश्राम के लिए आसन, स्वच्छता गृह और विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए एक खुला मंच बनाया गया है। मुख्य मंदिर की सुरक्षा के लिए चारों ओर चारदीवारी है। इस चारदीवारी में एक दोमंजिला प्रवेश द्वार बनाया गया है। इस प्रवेश द्वार की पहली मंजिल पर नगारखाना है, जबकि प्रवेश द्वार की सामने की दीवार पर गणेशजी का शिल्प उकेरा हुआ दिखाई देता है। प्रवेश द्वार की छत पर गुंबदाकार शिखर है। प्रवेश द्वार से अंदर आने पर लगने वाले प्रशस्त प्रांगण में प्राचीन वृक्ष हैं। सूर्यनारायण मंदिर की रचना वैशिष्ट्यपूर्ण है। यह मंदिर मुख्य रूप से गर्भगृह स्वरूप का है। संपूर्ण मंदिर जमीन से लगभग २ फुट ऊंचे पत्थर के अधिष्ठान यानी चबूतरे पर है।
मंदिर में प्रवेश करने के लिए ४ सीढ़ियां हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार के दोनों ओर की द्वार शाखाओं पर फूल-पत्तियों की नक्काशी दिखाई देती है। इस प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणेशजी की मूर्ति उकेरी गई है और उस पर तोरण दिखाई देता है। मंदिर के भीतर गर्भगृह में वज्रपीठ पर भगवान सूर्यदेव की मूर्ति स्थापित है। यह मूर्ति चतुर्भुज स्वरूप में है और वह सप्तअश्व रथ पर आरूढ़ है। सूर्यदेव की यह पाषाण मूर्ति वस्त्रों और अलंकारों से सुसज्जित रहती है। मंदिर की छत के चार कोनों पर ऋषियों के शिल्प उकेरे गए हैं। छत के मध्य भाग पर गोलाकार और ऊपर की ओर संकरा होता गया शिखर है। इस शिखर के शीर्ष पर स्थित आमलक पर कलश और ध्वज पताका है।
मुख्य सूर्य मंदिर के पास ही महादेव का छोटा मंदिर है। इस मंदिर के सामने पत्थर के वज्रपीठ पर काले पत्थर की नंदी की मूर्ति है। यह महादेव मंदिर प्रांगण की जमीन से कुछ ऊंचाई पर होने के कारण इसके प्रवेश द्वार तक ४ सीढ़ियां हैं। मंदिर के गर्भगृह में शिवपिंड स्थापित है। इस शिवपिंड पर जलधारा के लिए छत से तांबे का अभिषेक पात्र लटका हुआ है।
मंदिर की छत पर गोलाकार शिखर बनाया गया है। शिखर के भीतर और निचले स्तर पर पद्मदल मंडल यानी कमल की पंखुड़ियों की नक्काशी दिखाई देती है। शिखर के ऊपरी भाग पर आमलक और उस पर कलश है।
महादेव मंदिर के पीछे की ओर महंत रामगिरी महाराज का समाधि मंदिर है। इस मंदिर की रचना सभामंडप और मुख्य गर्भगृह ऐसे दो भागों में है। यहाँ का सभामंडप खुले स्वरूप का है। सभामंडप की तुलना में गर्भगृह का भाग अधिक ऊंचाई पर होने के कारण वहां जाने के लिए ५ सीढ़ियां हैं। इन सीढ़ियों के ऊपर स्थित पत्थर के चबूतरे पर रामगिरी महाराज की पादुकाएं स्थापित की गई हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वार शाखाओं और ललाट पट्टी पर फूल-पत्तियों की नक्काशी की गई है। गर्भगृह के भीतर वज्रपीठ पर महंत रामगिरी महाराज की ध्यानस्थ पाषाण मूर्ति स्थापित है। गर्भगृह की छत पर ३ स्तरों वाला गोलाकार शिखर है। इस शिखर के प्रत्येक स्तर में ८ देवकोष्ठक हैं। इन कुल २४ देवकोष्ठकों में विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियां हैं। शिखर के शीर्ष पर एक के ऊपर एक २ आमलक और उस पर कलश है। समाधि मंदिर के पास ही अन्य दिवंगत महंतों के छोटे समाधि मंदिर हैं। साथ ही यहाँ मंदिर की रसोई, नियमित चलने वाला अन्नक्षेत्र, सेवकों व भक्तों के निवास स्थान और अन्य इमारतें हैं।
बरबाडा के इस सूर्य मंदिर में प्रतिवर्ष मकर संक्रांति और रथसप्तमी ये दो मुख्य वार्षिक उत्सव बड़े पैमाने पर मनाए जाते हैं। इन उत्सवों के समय सुहागिनें और अन्य भक्त दर्शन के लिए मंदिर आते हैं। वे तिल-गुड़ का नैवेद्य और मिट्टी के पारंपरिक सुगड़े सूर्यदेव को अर्पित करते हैं। वर्ष भर के अन्य सभी प्रमुख हिंदू त्योहारों और उत्सवों के समय भी भक्त इस सूर्यनारायण मंदिर में दर्शन के लिए आते हैं। इस मंदिर में भक्तों द्वारा अन्न वितरण की मन्नतें मांगी जाती हैं और इन मन्नतों को पूरा करने के लिए यहाँ नियमित रूप से अन्नक्षेत्र चलाया जाता है। उत्सव के दिनों में अनेक भजनी मंडल और कीर्तनकार मंदिर में भजन व कीर्तन सेवा प्रस्तुत करते हैं। प्रत्येक रविवार, पूर्णिमा, अमावस्या और विशेष दिनों में मंदिर में दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन सुबह ६ बजे से रात ८ बजे तक भक्त यहाँ दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी
- मंठा से ७ किमी की दूरी पर
- जालना शहर से ६१ किमी की दूरी पर
- मंठा शहर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास व भोजन की सुविधा है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
सूर्यनारायण મંદિર
બરબાડા, તા. મંઠા, જિ. જાલના
વિશ્વભરમાં સૂર્યોપાસનાની પરંપરા પ્રાચીન કાળથી ચાલી આવી છે. ભારતમાં વિશેષ કરીને હિંદુ ધર્મપરંપરામાં સૂર્યોપાસનાને સ્વતંત્ર અને મહત્વનું સ્થાન પ્રાપ્ત થયું છે. આપણા દેશમાં આશરે સાતમી સદીથી સૂર્યમંદિરોનો ઇતિહાસ લેખિત સ્વરૂપમાં જાણીતો છે. ભારતમાં અનેક સૂર્યમંદિરો પ્રસિદ્ધ છે, જેમાં ઓડિશાના કોણાર્ક ખાતેનું સૂર્યમંદિર વિશ્વપ્રસિદ્ધ છે. આ ઉપરાંત આઠમી સદીનું જમ્મુ-કાશ્મીરનું માર્તંડ સૂર્યમંદિર અને ગુજરાતમાં પુષ્પાવતી નદીના કિનારે વસેલું મોઢેરાનું સૂર્યમંદિર વિશેષ પ્રસિદ્ધ છે. આ જ ઐતિહાસિક પરંપરાનો વારસો જણાવતું એક પ્રાચીન સૂર્યમંદિર જાલના જિલ્લાના મંઠા તાલુકાના બરબાડા ગામમાં વસેલું છે. બરબાડા ખાતેના આ ઐતિહાસિક સૂર્યમંદિરમાં દર્શન કરવાથી ભક્તોને ઉત્તમ આરોગ્ય, ઐશ્વર્ય અને ધનસંપત્તિ પ્રાપ્ત થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. ગ્રામીણ વિસ્તારનું આ મંદિર ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
મંદિરની સ્થાપના વિશે સ્થાનિક સ્તરે એક પ્રાચીન આખ્યાયિકા પ્રચલિત છે. પ્રાચીન કાળમાં આ વિસ્તારમાં એક બ્રહ્મરાક્ષસનો વાસ હતો. તેના ત્રાસને કારણે આસપાસના ગ્રામજનો વિવિધ પ્રકારના શારીરિક અને માનસિક વ્યાધિઓથી પીડાતા હતા. આ બાબત જ્યારે સંત મહંત રામગિરી મહારાજને જાણ થઈ, ત્યારે તેમણે આ સમસ્યાનું નિવારણ કરવાનું નક્કી કર્યું. તેમણે આ જ જગ્યાએ પોતાની તપોભૂમિ બનાવી અને તેઓ તપસ્યા પર બેઠા. રામગિરી મહારાજે સતત બાર વર્ષ કઠોર તપસ્યા કરીને તપોબળ પ્રાપ્ત કર્યું. પોતાના આ તપોબળથી તેમણે વિસ્તારને ત્રાસ આપતા તે બ્રહ્મરાક્ષસનો સંપૂર્ણ નાશ કર્યો.
ભવિષ્યમાં આ ભાગમાં ફરી ક્યારેય આવી નકારાત્મક શક્તિઓનો ઉપદ્રવ ન થાય, તે હેતુથી તેમણે આ જગ્યાએ સૂર્યમંદિરની સ્થાપના કરી.
આ મંદિર બરબાડા ગામથી થોડા અંતરે કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર વિસ્તારમાં વસેલું છે. મુખ્ય ગામથી મંદિર સુધી આવવા માટે પાકા રસ્તાની સુવિધા છે. મંદિરની સામેના ભાગમાં વૃક્ષોની છાયામાં એક વિશાળ પાર્કિંગ છે. આ પાર્કિંગના વિસ્તારમાં ભક્તો માટે આરામ કરવા માટે બેઠકો, શૌચાલય અને વિવિધ સાંસ્કૃતિક કાર્યક્રમો માટે એક ખુલ્લું મંચ બાંધેલું છે. મુખ્ય મંદિરના રક્ષણ માટે ચારે બાજુથી કિલ્લેબંધી છે. આ કિલ્લેબંધીમાં એક બે માળનું પ્રવેશદ્વાર બાંધવામાં આવ્યું છે. આ પ્રવેશદ્વારના પહેલા માળે નગારખાનું છે, જ્યારે પ્રવેશદ્વારની સામેની દીવાલ પર ગણેશજીનું શિલ્પ કોતરેલું જોવા મળે છે. પ્રવેશદ્વારની છત પર ગુંબજાકાર શિખર છે. પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવ્યા પછી લાગતા વિશાળ આંગણામાં પ્રાચીન વૃક્ષો છે. સૂર્યનારાયણ મંદિરની રચના વિશિષ્ટ છે. આ મંદિર મુખ્યત્વે ગર્ભગૃહ સ્વરૂપનું છે. સંપૂર્ણ મંદિર જમીનથી આશરે બે ફૂટ ઊંચા પથ્થરના પાયા એટલે કે ચોતરા પર છે.
મંદિરમાં પ્રવેશવા માટે ચાર પગથિયાં છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બંને બાજુની દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલોનું કોતરણીકામ જોવા મળે છે. આ પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ કોતરેલી છે અને તેના પર તોરણ જોવા મળે છે. મંદિરની અંદર ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ભગવાન સૂર્યદેવની મૂર્તિ સ્થાપિત છે. આ મૂર્તિ ચતુર્ભુજ સ્વરૂપમાં છે અને તે સાત અશ્વોના રથ પર સવાર છે. સૂર્યદેવની આ પાષાણમૂર્તિ વસ્ત્રો અને અલંકારોથી શણગારેલી હોય છે. મંદિરની છતના ચાર ખૂણાઓ પર ઋષિઓની મૂર્તિઓ કોતરેલી છે. છતના મધ્યભાગ પર ગોળાકાર અને ઉપરની તરફ સાંકડું થતું જતું શિખર છે. આ શિખરના મથાળે આવેલા આમલક પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
મુખ્ય સૂર્યમંદિરની બાજુમાં જ મહાદેવનું નાનું મંદિર છે. આ મંદિરની સામે પથ્થરની વજ્રપીઠ પર કાળા પાષાણના નંદીની મૂર્તિ છે. આ મહાદેવ મંદિર આંગણની જમીન કરતા થોડું ઊંચું હોવાથી તેના પ્રવેશદ્વારને ચાર પગથિયાં છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં શિવલિંગ સ્થાપિત છે. આ શિવલિંગ પર જલધારા માટે છત પર તાંબાનું અભિષેક પાત્ર લટકાવેલું છે.
મંદિરની છત પર ગોળાકાર શિખર બાંધેલું છે. શિખરના અંદરના અને નીચેના સ્તર પર પદ્મદલ મંડળ એટલે કે કમળની પાંખડીઓનું કોતરણીકામ જોવા મળે છે. શિખરના ઉપરના ભાગ પર આમલક અને તેના પર કળશ છે.
મહાદેવ મંદિરની પાછળના ભાગમાં મહંત રામગિરી મહારાજનું સમાધિ મંદિર છે. આ મંદિરની રચના સભામંડપ અને મુખ્ય ગર્ભગૃહ એમ બે ભાગમાં છે. અહીંનો સભામંડપ ખુલ્લા સ્વરૂપનો છે. સભામંડપની સરખામણીએ ગર્ભગૃહનો ભાગ વધુ ઊંચાઈ પર હોવાથી ત્યાં જવા માટે પાંચ પગથિયાં છે. આ પગથિયાંની ઉપર આવેલા પથ્થરના ચોતરા પર રામગિરી મહારાજની પાદુકાઓ સ્થાપિત કરવામાં આવી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર અને લલાટપટ્ટી પર પાન-ફૂલોની નકશી કોતરેલી છે. ગર્ભગૃહની અંદર વજ્રપીઠ પર મહંત રામગિરી મહારાજની ધ્યાનસ્થ પાષાણમૂર્તિ સ્થાપિત છે. ગર્ભગૃહની છત પર ત્રણ સ્તરનું ગોળાકાર શિખર છે. આ શિખરના દરેક સ્તરમાં આઠ દેવકોષ્ઠકો છે. આ કુલ ચોવીસ દેવકોષ્ઠકોમાં વિવિધ દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. શિખરના મથાળે એકની ઉપર એક બે આમલક અને તેના પર કળશ છે. સમાધિ મંદિરની બાજુમાં જ અન્ય દિવંગત મહંતોના નાના સમાધિ મંદિરો છે. તેમજ અહીં મંદિરનું રસોડું, નિયમિત ચાલતું અન્નક્ષેત્ર, સેવકો અને ભક્તોના નિવાસસ્થાનો અને અન્ય ઇમારતો છે.
બરબાડા ખાતેના આ સૂર્યમંદિરમાં દર વર્ષે મકર સંક્રાંતિ અને રથસપ્તમી એ બે મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવો મોટા પાયે ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવો સમયે સુવાસિની અને અન્ય ભક્તો દર્શન માટે મંદિરે આવે છે. તેઓ તલ-ગોળનો નૈવેદ્ય અને માટીના પરંપરાગત સુગડા સૂર્યદેવને અર્પણ કરે છે. વર્ષભરના અન્ય તમામ મુખ્ય હિંદુ તહેવારો અને ઉત્સવો સમયે પણ ભક્તો આ સૂર્યનારાયણ મંદિરે દર્શન માટે આવે છે. આ મંદિરમાં ભક્તો દ્વારા અન્નદાનના નવસ (બાધા) રાખવામાં આવે છે અને આ નવસ પૂર્ણ કરવા માટે અહીં નિયમિતપણે અન્નક્ષેત્ર ચલાવવામાં આવે છે. ઉત્સવના દિવસોમાં અનેક ભજન મંડળીઓ અને કીર્તનકારો મંદિરમાં ભજન અને કીર્તનની સેવા રજૂ કરે છે. દરેક રવિવાર, પૂનમ, અમાસ અને ખાસ દિવસોએ મંદિરમાં દર્શન માટે આવતા ભક્તોની સંખ્યા વધુ હોય છે. દરરોજ સવારે છ વાગ્યાથી રાત્રે આઠ વાગ્યા સુધી ભક્તો અહીં દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- મંઠાથી ૭ કિમી અંતરે
- જાલના શહેરથી ૬૧ કિમી અંતરે
- મંઠા શહેરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૦૯૭૬૯૨૪૯૩૧૮
सूर्यनारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
जगभरात सूर्योपासनेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात विशेषतः हिंदू धर्मपरंपरेत सूर्योपासनेला स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. आपल्या देशात सुमारे सातव्या शतकापासून सूर्यमंदिरांचा इतिहास लिखित स्वरूपात ज्ञात आहे. भारतात अनेक सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय आठव्या शतकातील जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि गुजरात मधील पुष्पावती नदीकाठावर वसलेले मोढेरा येथील सूर्यमंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणारे एक प्राचीन सूर्यमंदिर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बरबाडा या गावात वसलेले आहे. बरबाडा येथील या ऐतिहासिक सूर्यमंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि धनसंपदा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिक पातळीवर एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. प्राचीन काळी या परिसरात एका ब्रह्मराक्षसाचा वावर होता. त्याच्या त्रासामुळे परिसरातील ग्रामस्थ विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. ही बाब जेव्हा संत महंत रामगिरी महाराज यांना समजली, तेव्हा त्यांनी या समस्येचे निवारण करण्याचे ठरवले. त्यांनी याच ठिकाणी आपली तपोभूमी निर्माण केली आणि ते तपस्येला बसले. रामगिरी महाराजांनी सलग बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून तपोबल प्राप्त केले. आपल्या या तपोबलाने त्यांनी परिसराला त्रास देणाऱ्या त्या ब्रह्मराक्षसाचा पूर्णपणे नायनाट केला.
भविष्यात या भागात पुन्हा कधीही अशा नकारात्मक शक्तींचा उपद्रव होऊ नये, या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सूर्यमंदिराची स्थापना केली.
हे मंदिर बरबाडा गावापासून काही अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. मुख्य गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या समोरील भागात झाडांच्या छायेत एक प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी आसने, स्वच्छतागृह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक खुले व्यासपीठ बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना आहे, तर प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लागणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. सूर्यनारायण मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर प्रामुख्याने गर्भगृह स्वरूपाचे आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे २ फूट उंच अशा दगडी अधिष्ठानावर म्हणजेच चौथऱ्यावर आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्यावर महिरप तोरण दिसते. मंदिराच्या आत गर्भगृहात वज्रपीठावर भगवान सूर्यदेवाची मूर्ती प्रस्थापित आहे. ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील आहे आणि ती सप्तअश्वरथावर आरूढ आहे. सूर्यदेवाची ही पाषाणमूर्ती वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेली असते. मंदिराच्या छताच्या चार कोनांवर ऋषींची शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागावर गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखराच्या माथ्यावरील आमलकावर कळस आणि ध्वजपताका आहे.
मुख्य सूर्यमंदिराच्या बाजूलाच महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरासमोर दगडी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. हे महादेव मंदिर प्रांगणाच्या जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असल्यामुळे याच्या प्रवेशद्वाराला ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड स्थापित आहे. या शिवपिंडीवर जलधारेसाठी छताला तांब्याचे अभिषेक पात्र टांगले आहे.
मंदिराच्या छतावर गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या आतील आणि खालील थरावर पद्मदल मंडळाचे म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांचे कोरीव काम दिसते. शिखराच्या वरच्या भागावर आमलक आणि त्यावर कळस आहे.
महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि मुख्य गर्भगृह अशा दोन भागांत आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृहाचा भाग अधिक उंचावर असल्यामुळे तेथे येण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या वर असलेल्या दगडी चौथऱ्यावर रामगिरी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर महंत रामगिरी महाराज यांची ध्यानस्थ पाषाणमूर्ती प्रस्थापित आहे. गर्भगृहाच्या छतावर ३ थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरामध्ये ८ देवकोष्टके आहेत. या एकूण २४ देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक २ आमलक आणि त्यावर कळस आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच इतर दिवंगत महंतांच्या छोट्या समाधी मंदिरे आहेत. तसेच येथे मंदिराचे स्वयंपाकघर, नियमित चालणारे अन्नछत्र, सेवेकरी व भाविकांच्या निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत.
बरबाडा येथील या सूर्यमंदिरात दरवर्षी मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे २ मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी सुहासिनी आणि इतर भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. ते तीळ-गुळाचा नैवेद्य आणि मातीची पारंपरिक सुगडे सूर्यदेवाला अर्पण करतात. वर्षभरातील इतर सर्व प्रमुख हिंदू सण आणि उत्सवांच्या वेळीही भाविक या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांकडून अन्न वाटपाचे नवस बोलले जातात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी येथे नियमितपणे अन्नछत्र चालवले जाते. उत्सवाच्या दिवसांमध्ये अनेक भजनी मंडळे आणि कीर्तनकार मंदिरात भजन व कीर्तन सेवा सादर करतात. प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि करिदिन या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ७ किमी अंतरावर
- जालना शहरापासून ६१ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
सूर्యనारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
ప్రపంచవ్యాప్తంగా సూర్యోపాసన సంప్రదాయం ప్రాచీన కాలం నుండి కొనసాగుతోంది. భారతదేశంలో, ముఖ్యంగా హిందూ ధర్మ సంప్రదాయంలో సూర్యోపాసనకు ప్రత్యేకమైన మరియు ముఖ్యమైన స్థానం ఉంది. మన దేశంలో సుమారు ఏడవ శతాబ్దం నుండి సూర్యాలయాల చరిత్ర లిఖితపూర్వకంగా తెలుస్తోంది. భారతదేశంలో అనేక సూర్యాలయాలు ప్రసిద్ధి చెందాయి, అందులో ఒడిశాలోని కోణార్క్లో ఉన్న సూర్యాలయం ప్రపంచ ప్రసిద్ధమైనది. ఇది కాకుండా, ఎనిమిదవ శతాబ్దానికి చెందిన జమ్మూ-కశ్మీర్లోని మార్తాండ సూర్యాలయం మరియు గుజరాత్లోని పుష్పావతి నదీ తీరాన ఉన్న మోఢేరా సూర్యాలయం ప్రత్యేకంగా ప్రసిద్ధి చెందాయి. ఇదే చారిత్రక సంప్రదాయ వారసత్వాన్ని చాటిచెప్పే ఒక ప్రాచీన సూర్యాలయం జాల్నా జిల్లాలోని మంఠా తాలూకాలో ఉన్న बरबाडा గ్రామంలో ఉంది. बरबाడలోని ఈ చారిత్రక సూర్యాలయంలో దర్శనం చేసుకోవడం వల్ల భక్తులకు ఉత్తమ ఆరోగ్యం, ఐశ్వర్యం మరియు ధనసంపద లభిస్తాయని భక్తుల విశ్వాసం. గ్రామీణ ప్రాంతంలోని ఈ ఆలయం భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం.
ఆలయ స్థాపన గురించి స్థానిక స్థాయిలో ఒక ప్రాచీన ఐతిహ్యం ప్రచారంలో ఉంది. ప్రాచీన కాలంలో ఈ ప్రాంతంలో ఒక బ్రహ్మరాక్షసుడు సంచరించేవాడు. దాని బాధల వల్ల పరిసర ప్రాంతాల గ్రామస్థులు వివిధ రకాల శారీరక మరియు మానసిక వ్యాధులతో బాధపడుతుండేవారు. ఈ విషయం సંત మహంత్ రామగిరి మహారాజ్కు తెలిసినప్పుడు, వారు ఈ సమస్యను పరిష్కరించాలని నిర్ణయించుకున్నారు. వారు ఇదే ప్రదేశాన్ని తమ తపోభూమిగా చేసుకుని తపస్సు చేశారు. రామగిరి మహారాజ్ వరుసగా ౧౨ ఏళ్ల పాటు కఠోర తపస్సు చేసి తపోబలాన్ని పొందారు. తమ తపోబలంతో ఆ ప్రాంతాన్ని పీడిస్తున్న ఆ బ్రహ్మరాక్షసుడిని పూర్తిగా అంతం చేశారు.
భవిష్యత్తులో ఈ ప్రాంతంలో మరెప్పుడూ అటువంటి ప్రతికూల శక్తుల ఉపద్రవం కలగకూడదనే ఉద్దేశంతో, వారు ఇక్కడ సూర్యాలయాన్ని స్థాపించారు.
ఈ ఆలయం बरबाडा గ్రామానికి కొంత దూరంలో ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాల్లో ఉంది. ప్రధాన గ్రామం నుండి ఆలయం వరకు చేరుకోవడానికి పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది. ఆలయం ముందు భాగంలో చెట్ల నీడలో విశాలమైన వాహన పార్కింగ్ ఉంది. ఈ పార్కింగ్ ప్రాంతంలో భక్తుల విశ్రాంతి కోసం ఆసనాలు, మరుగుదొడ్లు మరియు వివిధ సాంస్కృతిక కార్యక్రమాల కోసం ఒక బహిరంగ వేదిక నిర్మించబడింది. ప్రధాన ఆలయ రక్షణ కోసం నాలుగు వైపులా ప్రాకారం ఉంది. ఈ ప్రాకారంలో ఒక రెండంతస్తుల ప్రవేశద్వారం నిర్మించబడింది. ఈ ప్రవేశద్వారం మొదటి అంతస్తులో నగారఖానా ఉంది, ప్రవేశద్వారం ముందు గోడపై గణేశుని శిల్పం చెక్కబడి ఉంది. ప్రవేశద్వారం పైకప్పుపై గుమ్మటాకార శిఖరం ఉంది. ప్రవేశద్వారం నుండి లోపలికి రాగానే ఉండే విశాలమైన ప్రాంగణంలో ప్రాచీన వృక్షాలు ఉన్నాయి. सूर्యనారాయణ ఆలయ నిర్మాణం విశిష్టమైనది. ఈ ఆలయం ప్రధానంగా గర్భాలయం రూపంలో ఉంది. మొత్తం ఆలయం భూమి నుండి సుమారు ౨ అడుగుల ఎత్తైన రాతి అధిష్ఠానంపై అంటే చౌరస్తాపై ఉంది.
ఆలయంలోకి ప్రవేశించడానికి ౪ మెట్లు ఉన్నాయి. గర్భాలయ ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా ఉన్న ద్వారశాఖలపై ఆకుపూల చెక్కడాలు కనిపిస్తాయి. ఈ ప్రవేశద్వారం లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం చెక్కబడి ఉంది మరియు దానిపై తోరణం కనిపిస్తుంది. ఆలయం లోపలి గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై భగవాన్ సూర్యదేవుని విగ్రహం ప్రతిష్ఠించబడింది. ఈ విగ్రహం చతుర్భుజ రూపంలో ఉండి, ఏడు గుర్రాల రథంపై ఆసీనమై ఉంది. సూర్యదేవుని ఈ పాషాణ విగ్రహం వస్త్రాలు మరియు అలంకారాలతో శృంగారించబడి ఉంటుంది. ఆలయ పైకప్పు నాలుగు మూలలపై ఋషుల శిల్పాలు చెక్కబడ్డాయి. పైకప్పు మధ్య భాగంలో వృత్తాకారంలో ఉండి పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే శిఖరం ఉంది. ఈ శిఖరం పైభాగంలోని ఆమలకంపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
ప్రధాన సూర్యాలయానికి పక్కనే చిన్న శివాలయం ఉంది. ఈ ఆలయం ముందు రాతి వజ్రపీఠంపై నల్ల రాతి నంది విగ్రహం ఉంది. ఈ శివాలయం ప్రాంగణం భూమి కంటే కొంత ఎత్తులో ఉన్నందున, దీని ప్రవేశద్వారానికి ౪ మెట్లు ఉన్నాయి. ఆలయ గర్భాలయంలో శివలింగం ప్రతిష్ఠించబడింది. ఈ శివలింగంపై జలధార కోసం పైకప్పుకు రాగి అభిషేక పాత్ర వేలాడదీయబడింది.
ఆలయ పైకప్పుపై వృత్తాకార శిఖరం నిర్మించబడింది. శిఖరం లోపలి మరియు కింది పొరలపై పద్మదళ మండలం అంటే తామర రేకుల చెక్కడాలు కనిపిస్తాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉంది.
శివాలయానికి వెనుక భాగంలో మహంత్ రామగిరి మహారాజ్ సమాధి మందిరం ఉంది. ఈ ఆలయ నిర్మాణం సభామండపం మరియు ప్రధాన గర్భాలయం అనే రెండు భాగాల్లో ఉంది. ఇక్కడి సభామండపం బహిరంగంగా ఉంటుంది. సభామండపంతో పోలిస్తే గర్భాలయ భాగం ఎక్కువ ఎత్తులో ఉన్నందున అక్కడికి వెళ్లడానికి ౫ మెట్లు ఉన్నాయి. ఈ మెట్ల పైన ఉన్న రాతి చౌరస్తాపై రామగిరి మహారాజ్ పాదుకలు ప్రతిష్ఠించబడ్డాయి. గర్భాలయ ప్రవేశద్వారం ద్వారశాఖలపై మరియు లలాటపట్టిపై ఆకుపూల నగిషీలు చెక్కబడ్డాయి. గర్భాలయం లోపల వజ్రపీఠంపై మహంత్ రామగిరి మహారాజ్ ధ్యానస్థ పాషాణ విగ్రహం ప్రతిష్ఠించబడింది. గర్భాలయ పైకప్పుపై మూడు పొరల వృత్తాకార శిఖరం ఉంది. ఈ శిఖరం ప్రతి పొరలో ౮ దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. ఈ మొత్తం ౨౪ దేవకోష్టకాలలో వివిధ దేవీ-దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఒకదానిపై ఒకటి రెండు ఆమలకాలు మరియు దానిపై కలశం ఉంది. సమాధి మందిరానికి పక్కనే ఇతర దివంగత మహంతుల చిన్న సమాధి మందిరాలు ఉన్నాయి. అలాగే ఇక్కడ ఆలయ వంటగది, నిరంతరం సాగే అన్నదానం, సేవకులు మరియు భక్తుల నివాస గృహాలు మరియు ఇతర నిర్మాణాలు ఉన్నాయి.
बरबाडाలోని ఈ సూర్యాలయంలో ప్రతి సంవత్సరం మకర సంక్రాంతి మరియు రథసప్తమి అనే రెండు ప్రధాన వార్షిక ఉత్సవాలు ఘనంగా నిర్వహించబడతాయి. ఈ ఉత్సవాల సమయంలో సువాసినులు మరియు ఇతర భక్తులు దర్శనం కోసం ఆలయానికి వస్తారు. వారు నువ్వులు-బెల్లం నైవేద్యం మరియు మట్టితో చేసిన సాంప్రదాయ సుగడెలను సూర్యదేవునికి సమర్పిస్తారు. ఏడాది పొడవునా ఇతర అన్ని ప్రధాన హిందూ పండుగలు మరియు ఉత్సవాల సమయంలో కూడా భక్తులు ఈ सूर्యనారాయణ ఆలయానికి దర్శనం కోసం వస్తారు. ఈ ఆలయంలో భక్తులు అన్నదాన మొక్కులు మొక్కుకుంటారు మరియు ఈ మొక్కులను తీర్చుకోవడానికి ఇక్కడ క్రమం తప్పకుండా అన్నదానం నిర్వహిస్తారు. ఉత్సవాల రోజుల్లో అనేక భజన మండళ్లు మరియు కీర్తనకారులు ఆలయంలో భజన మరియు కీర్తన సేవలను సమర్పిస్తారు. ప్రతి ఆదివారం, పౌర్ణమి, అమావాస్య మరియు పర్వదినాలలో ఆలయానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతిరోజూ ఉదయం ౬ గంటల నుండి రాత్రి ౮ గంటల వరకు భక్తులు ఇక్కడ దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మంఠా నుండి ౭ కి.మీ దూరంలో
- జాల్నా నగరం నుండి ౬౧ కి.మీ దూరంలో
- మంఠా నగరం నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : ఆలయ కార్యాలయం, మొ. ౦౯౭౬౯౨౪౯౩౧౮
सूर्యనारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
जगभरात सूर्योपासनेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात विशेषतः हिंदू धर्मपरंपरेत सूर्योपासनेला स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. आपल्या देशात सुमारे सातव्या शतकापासून सूर्यमंदिरांचा इतिहास लिखित स्वरूपात ज्ञात आहे. भारतात अनेक सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय आठव्या शतकातील जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि गुजरात मधील पुष्पावती नदीकाठावर वसलेले मोढेरा येथील सूर्यमंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणारे एक प्राचीन सूर्यमंदिर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बरबाडा या गावात वसलेले आहे. बरबाडा येथील या ऐतिहासिक सूर्यमंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि धनसंपदा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिक पातळीवर एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. प्राचीन काळी या परिसरात एका ब्रह्मराक्षसाचा वावर होता. त्याच्या त्रासामुळे परिसरातील ग्रामस्थ विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. ही बाब जेव्हा संत महंत रामगिरी महाराज यांना समजली, तेव्हा त्यांनी या समस्येचे निवारण करण्याचे ठरवले. त्यांनी याच ठिकाणी आपली तपोभूमी निर्माण केली आणि ते तपस्येला बसले. रामगिरी महाराजांनी सलग बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून तपोबल प्राप्त केले. आपल्या या तपोबलाने त्यांनी परिसराला त्रास देणाऱ्या त्या ब्रह्मराक्षसाचा पूर्णपणे नायनाट केला.
भविष्यात या भागात पुन्हा कधीही अशा नकारात्मक शक्तींचा उपद्रव होऊ नये, या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सूर्यमंदिराची स्थापना केली.
हे मंदिर बरबाडा गावापासून काही अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. मुख्य गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या समोरील भागात झाडांच्या छायेत एक प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी आसने, स्वच्छतागृह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक खुले व्यासपीठ बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना आहे, तर प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लागणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. सूर्यनारायण मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर प्रामुख्याने गर्भगृह स्वरूपाचे आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे २ फूट उंच अशा दगडी अधिष्ठानावर म्हणजेच चौथऱ्यावर आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्यावर महिरप तोरण दिसते. मंदिराच्या आत गर्भगृहात वज्रपीठावर भगवान सूर्यदेवाची मूर्ती प्रस्थापित आहे. ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील आहे आणि ती सप्तअश्वरथावर आरूढ आहे. सूर्यदेवाची ही पाषाणमूर्ती वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेली असते. मंदिराच्या छताच्या चार कोनांवर ऋषींची शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागावर गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखराच्या माथ्यावरील आमलकावर कळस आणि ध्वजपताका आहे.
मुख्य सूर्यमंदिराच्या बाजूलाच महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरासमोर दगडी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. हे महादेव मंदिर प्रांगणाच्या जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असल्यामुळे याच्या प्रवेशद्वाराला ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड स्थापित आहे. या शिवपिंडीवर जलधारेसाठी छताला तांब्याचे अभिषेक पात्र टांगले आहे.
मंदिराच्या छतावर गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या आतील आणि खालील थरावर पद्मदल मंडळाचे म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांचे कोरीव काम दिसते. शिखराच्या वरच्या भागावर आमलक आणि त्यावर कळस आहे.
महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि मुख्य गर्भगृह अशा दोन भागांत आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृहाचा भाग अधिक उंचावर असल्यामुळे तेथे येण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या वर असलेल्या दगडी चौथऱ्यावर रामगिरी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर महंत रामगिरी महाराज यांची ध्यानस्थ पाषाणमूर्ती प्रस्थापित आहे. गर्भगृहाच्या छतावर ३ थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरामध्ये ८ देवकोष्टके आहेत. या एकूण २४ देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक २ आमलक आणि त्यावर कळस आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच इतर दिवंगत महंतांची छोटी समाधी मंदिरे आहेत. तसेच येथे मंदिराचे स्वयंपाकघर, नियमित चालणारे अन्नछत्र, सेवेकरी व भाविकांची निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत.
बरबाडा येथील या सूर्यमंदिरात दरवर्षी मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी सुहासिनी आणि इतर भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. ते तीळ-गुळाचा नैवेद्य आणि मातीची पारंपरिक सुगडे सूर्यदेवाला अर्पण करतात. वर्षभरातील इतर सर्व प्रमुख हिंदू सण आणि उत्सवांच्या वेळीही भाविक या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांकडून अन्न वाटपाचे नवस बोलले जातात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी येथे नियमितपणे अन्नछत्र चालवले जाते. उत्सवाच्या दिवसांमध्ये अनेक भजनी मंडळे आणि कीर्तनकार मंदिरात भजन व कीर्तन सेवा सादर करतात. प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि करिदिन या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ७ किमी अंतरावर
- जालना शहरापासून ६१ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
सूर्यनारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
जगभरात सूर्योपासनेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात विशेषतः हिंदू धर्मपरंपरेत सूर्योपासनेला स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. आपल्या देशात सुमारे सातव्या शतकापासून सूर्यमंदिरांचा इतिहास लिखित स्वरूपात ज्ञात आहे. भारतात अनेक सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय आठव्या शतकातील जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि गुजरात मधील पुष्पावती नदीकाठावर वसलेले मोढेरा येथील सूर्यमंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणारे एक प्राचीन सूर्यमंदिर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बरबाडा या गावात वसलेले आहे. बरबाडा येथील या ऐतिहासिक सूर्यमंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि धनसंपदा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिक पातळीवर एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. प्राचीन काळी या परिसरात एका ब्रह्मराक्षसाचा वावर होता. त्याच्या त्रासामुळे परिसरातील ग्रामस्थ विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. ही बाब जेव्हा संत महंत रामगिरी महाराज यांना समजली, तेव्हा त्यांनी या समस्येचे निवारण करण्याचे ठरवले. त्यांनी याच ठिकाणी आपली तपोभूमी निर्माण केली आणि ते तपस्येला बसले. रामगिरी महाराजांनी सलग १२ वर्षे कठोर तपश्चर्या करून तपोबल प्राप्त केले. आपल्या या तपोबलाने त्यांनी परिसराला त्रास देणाऱ्या त्या ब्रह्मराक्षसाचा पूर्णपणे नायनाट केला.
भविष्यात या भागात पुन्हा कधीही अशा नकारात्मक शक्तींचा उपद्रव होऊ नये, या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सूर्यमंदिराची स्थापना केली.
हे मंदिर बरबाडा गावापासून काही अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. मुख्य गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या समोरील भागात झाडांच्या छायेत एक प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी आसने, स्वच्छतागृह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक खुले व्यासपीठ बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना आहे, तर प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लागणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. सूर्यनारायण मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर प्रामुख्याने गर्भगृह स्वरूपाचे आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे २ फूट उंच अशा दगडी अधिष्ठानावर म्हणजेच चौथऱ्यावर आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्यावर महिरप तोरण दिसते. मंदिराच्या आत गर्भगृहात वज्रपीठावर भगवान सूर्यदेवाची मूर्ती प्रस्थापित आहे. ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील आहे आणि ती सप्तअश्वरथावर आरूढ आहे. सूर्यदेवाची ही पाषाणमूर्ती वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेली असते. मंदिराच्या छताच्या चार कोनांवर ऋषींची शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागावर गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखराच्या माथ्यावरील आमलकावर कळस आणि ध्वजपताका आहे.
मुख्य सूर्यमंदिराच्या बाजूलाच महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरासमोर दगडी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. हे महादेव मंदिर प्रांगणाच्या जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असल्यामुळे याच्या प्रवेशद्वाराला ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड स्थापित आहे. या शिवपिंडीवर जलधारेसाठी छताला तांब्याचे अभिषेक पात्र टांगले आहे.
मंदिराच्या छतावर गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या आतील आणि खालील थरावर पद्मदल मंडळाचे म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांचे कोरीव काम दिसते. शिखराच्या वरच्या भागावर आमलक आणि त्यावर कळस आहे.
महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि मुख्य गर्भगृह अशा दोन भागांत आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृहाचा भाग अधिक उंचावर असल्यामुळे तेथे येण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या वर असलेल्या दगडी चौथऱ्यावर रामगिरी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर महंत रामगिरी महाराज यांची ध्यानस्थ पाषाणमूर्ती प्रस्थापित आहे. गर्भगृहाच्या छतावर ३ थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरामध्ये ८ देवकोष्टके आहेत. या एकूण २४ देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक २ आमलक आणि त्यावर कळस आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच इतर दिवंगत महंतांची छोटी समाधी मंदिरे आहेत. तसेच येथे मंदिराचे स्वयंपाकघर, नियमित चालणारे अन्नछत्र, सेवेकरी व भाविकांची निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत.
बरबाडा येथील या सूर्यमंदिरात दरवर्षी मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी सुहासिनी आणि इतर भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. ते तीळ-गुळाचा नैवेद्य आणि मातीची पारंपरिक सुगडे सूर्यदेवाला अर्पण करतात. वर्षभरातील इतर सर्व प्रमुख हिंदू सण आणि उत्सवांच्या वेळीही भाविक या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांकडून अन्न वाटपाचे नवस बोलले जातात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी येथे नियमितपणे अन्नछत्र चालवले जाते. उत्सवाच्या दिवसांमध्ये अनेक भजनी मंडळे आणि कीर्तनकार मंदिरात भजन व कीर्तन सेवा सादर करतात. प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि करिदिन या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ७ किमी अंतरावर
- जालना शहरापासून ६१ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
सूर्यनारायण मंदिर
बरबाडा, ता. मंठा, जि. जालना
जगभरात सूर्योपासनेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात विशेषतः हिंदू धर्मपरंपरेत सूर्योपासनेला स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान लाभले आहे. आपल्या देशात सुमारे सातव्या शतकापासून सूर्यमंदिरांचा इतिहास लिखित स्वरूपात ज्ञात आहे. भारतात अनेक सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय आठव्या शतकातील जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्यमंदिर आणि गुजरात मधील पुष्पावती नदीकाठावर वसलेले मोढेरा येथील सूर्यमंदिर विशेष प्रसिद्ध आहे. याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणारे एक प्राचीन सूर्यमंदिर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील बरबाडा या गावात वसलेले आहे. बरबाडा येथील या ऐतिहासिक सूर्यमंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि धनसंपदा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ग्रामीण भागातील हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या स्थापनेविषयी स्थानिक पातळीवर एक प्राचीन आख्यायिका प्रचलित आहे. प्राचीन काळी या परिसरात एका ब्रह्मराक्षसाचा वावर होता. त्याच्या त्रासामुळे परिसरातील ग्रामस्थ विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधींनी त्रस्त झाले होते. ही बाब जेव्हा संत महंत रामगिरी महाराज यांना समजली, तेव्हा त्यांनी या समस्येचे निवारण करण्याचे ठरवले. त्यांनी याच ठिकाणी आपली तपोभूमी निर्माण केली आणि ते तपस्येला बसले. रामगिरी महाराजांनी सलग बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून तपोबल प्राप्त केले. आपल्या या तपोबलाने त्यांनी परिसराला त्रास देणाऱ्या त्या ब्रह्मराक्षसाचा पूर्णपणे नायनाट केला.
भविष्यात या भागात पुन्हा कधीही अशा नकारात्मक शक्तींचा उपद्रव होऊ नये, या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी सूर्यमंदिराची स्थापना केली.
हे मंदिर बरबाडा गावापासून काही अंतरावर निसर्गसमृद्ध परिसरात वसलेले आहे. मुख्य गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या समोरील भागात झाडांच्या छायेत एक प्रशस्त वाहनतळ आहे. या वाहनतळाच्या परिसरात भाविकांना विश्रांतीसाठी आसने, स्वच्छतागृह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक खुले व्यासपीठ बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये एक दुमजली प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर नगारखाना आहे, तर प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीवर गणेशाचे शिल्प कोरलेले दिसते. प्रवेशद्वाराच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लागणाऱ्या प्रशस्त प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. सूर्यनारायण मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर प्रामुख्याने गर्भगृह स्वरूपाचे आहे. संपूर्ण मंदिर जमिनीपासून सुमारे दोन फूट उंच अशा दगडी अधिष्ठानावर म्हणजेच चौथऱ्यावर आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी चार पायऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम दिसते. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे आणि त्यावर महिरप तोरण दिसते. मंदिराच्या आत गर्भगृहात वज्रपीठावर भगवान सूर्यदेवाची मूर्ती प्रस्थापित आहे. ही मूर्ती चतुर्भुज स्वरूपातील आहे आणि ती सप्तअश्वरथावर आरूढ आहे. सूर्यदेवाची ही पाषाणमूर्ती वस्त्रे आणि अलंकारांनी शृंगारलेली असते. मंदिराच्या छताच्या चार कोनांवर ऋषींची शिल्पे कोरलेली आहेत. छताच्या मध्यभागावर गोलाकार आणि वरच्या बाजूला निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखराच्या माथ्यावरील आमलकावर कळस आणि ध्वजपताका आहे.
मुख्य सूर्यमंदिराच्या बाजूलाच महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरासमोर दगडी वज्रपीठावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. हे महादेव मंदिर प्रांगणाच्या जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असल्यामुळे याच्या प्रवेशद्वाराला चार पायऱ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंड स्थापित आहे. या शिवपिंडीवर जलधारेसाठी छताला तांब्याचे अभिषेक पात्र टांगले आहे.
मंदिराच्या छतावर गोलाकार शिखर बांधलेले आहे. शिखराच्या आतील आणि खालील थरावर पद्मदल मंडळाचे म्हणजेच कमळाच्या पाकळ्यांचे कोरीव काम दिसते. शिखराच्या वरच्या भागावर आमलक आणि त्यावर कळस आहे.
महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या मंदिराची रचना सभामंडप आणि मुख्य गर्भगृह अशा दोन भागांत आहे. येथील सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपाच्या तुलनेत गर्भगृहाचा भाग अधिक उंचावर असल्यामुळे तेथे येण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या वर असलेल्या दगडी चौथऱ्यावर रामगिरी महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर महंत रामगिरी महाराज यांची ध्यानस्थ पाषाणमूर्ती प्रस्थापित आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरामध्ये आठ देवकोष्टके आहेत. या एकूण चोवीस देवकोष्टकांमध्ये विविध देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या माथ्यावर एकावर एक दोन आमलक आणि त्यावर कळस आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच इतर दिवंगत महंतांच्या छोट्या समाधी मंदिरे आहेत. तसेच येथे मंदिराचे स्वयंपाकघर, नियमित चालणारे अन्नछत्र, सेवेकरी व भाविकांच्या निवासस्थाने आणि इतर वास्तू आहेत.
बरबाडा येथील या सूर्यमंदिरात दरवर्षी मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी सुहासिनी आणि इतर भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. ते तीळ-गुळाचा नैवेद्य आणि मातीची पारंपरिक सुगडे सूर्यदेवाला अर्पण करतात. वर्षभरातील इतर सर्व प्रमुख हिंदू सण आणि उत्सवांच्या वेळीही भाविक या सूर्यनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांकडून अन्न वाटपाचे नवस बोलले जातात आणि हे नवस पूर्ण करण्यासाठी येथे नियमितपणे अन्नछत्र चालवले जाते. उत्सवाच्या दिवसांमध्ये अनेक भजनी मंडळे आणि कीर्तनकार मंदिरात भजन व कीर्तन सेवा सादर करतात. प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि करिदिन या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मंठा येथून ७ किमी अंतरावर
- जालना शहरापासून ६१ किमी अंतरावर
- मंठा शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९७६९२४९३१८
ਸੂਰਯਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ
ਬਰਬਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਮੰਠਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਾਲਨਾ
ਦੁਨੀਆ ਭਰ ਵਿੱਚ ਸੂਰਯ ਉਪਾਸਨਾ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਚਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਪਰੰਪਰਾ ਵਿੱਚ ਸੂਰਯ ਉਪਾਸਨਾ ਨੂੰ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਅਤੇ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਸਥਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ। ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਸੱਤਵੀਂ ਸਦੀ ਤੋਂ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਲਿਖਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਈ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਉੜੀਸਾ ਦੇ ਕੋਨਾਰਕ ਸਥਿਤ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਵਿਸ਼ਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਅੱਠਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਜੰਮੂ-ਕਸ਼ਮੀਰ ਦਾ ਮਾਰਤੰਡ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਵਿੱਚ ਪੁਸ਼ਪਾਵਤੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਮੋਢੇਰਾ ਦਾ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸੇ ਇਤਿਹਾਸਕ ਪਰੰਪਰਾ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਜਾਲਨਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਮੰਠਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਬਰਬਾਡਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਬਰਬਾਡਾ ਦੇ ਇਸ ਇਤਿਹਾਸਕ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਉੱਤਮ ਸਿਹਤ, ਐਸ਼ਵਰਿਆ ਅਤੇ ਧਨ-ਦੌਲਤ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਪੇਂਡੂ ਖੇਤਰ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਬਾਰੇ ਸਥਾਨਕ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਬ੍ਰਹਮਰਾਖਸ਼ ਦਾ ਵਾਸ ਸੀ। ਉਸਦੇ ਕਸ਼ਟਾਂ ਕਾਰਨ ਖੇਤਰ ਦੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਰੀਰਕ ਅਤੇ ਮਾਨਸਿਕ ਬਿਮਾਰੀਆਂ ਤੋਂ ਪੀੜਤ ਸਨ। ਜਦੋਂ ਇਹ ਗੱਲ ਸੰਤ ਮਹੰਤ ਰਾਮਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗੀ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਸਮੱਸਿਆ ਦਾ ਨਿਵਾਰਨ ਕਰਨ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਆਪਣੀ ਤਪੋਭੂਮੀ ਬਣਾਈ ਅਤੇ ਉਹ ਤਪੱਸਿਆ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਗਏ। ਰਾਮਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਲਗਾਤਾਰ ਬਾਰਾਂ ਸਾਲ ਕਠੋਰ ਤਪੱਸਿਆ ਕਰਕੇ ਤਪੋਬਲ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤਾ। ਆਪਣੇ ਇਸ ਤਪੋਬਲ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਖੇਤਰ ਨੂੰ ਤੰਗ ਕਰਨ ਵਾਲੇ ਉਸ ਬ੍ਰਹਮਰਾਖਸ਼ ਦਾ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਨਾਸ਼ ਕਰ ਦਿੱਤਾ।
ਭਵਿੱਖ ਵਿੱਚ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਦੁਬਾਰਾ ਕਦੇ ਵੀ ਅਜਿਹੀਆਂ ਨਕਾਰਾਤਮਕ ਸ਼ਕਤੀਆਂ ਦਾ ਪ੍ਰਕੋਪ ਨਾ ਹੋਵੇ, ਇਸ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਰਬਾਡਾ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੁੱਖ ਪਿੰਡ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆਉਣ ਲਈ ਪੱਕੀ ਸੜਕ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਰੁੱਖਾਂ ਦੀ ਛਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਪਾਰਕਿੰਗ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਆਰਾਮ ਲਈ ਬੈਠਣ ਦੀ ਜਗ੍ਹਾ, ਪਖਾਨੇ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਇੱਕ ਖੁੱਲ੍ਹਾ ਮੰਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਲਈ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕੰਧ ਹੈ। ਇਸ ਕੰਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਪਹਿਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਮਿਲਣ ਵਾਲੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰੁੱਖ ਹਨ। ਸੂਰਯਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਮੁੱਖ ਤੌਰ ‘ਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਪੂਰਾ ਮੰਦਿਰ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਲਗਭਗ ਦੋ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਲਈ ਚਾਰ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਤੋਰਣ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਦਰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਭਗਵਾਨ ਸੂਰਯਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਚਤੁਰਭੁਜ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਸੱਤ ਘੋੜਿਆਂ ਵਾਲੇ ਰੱਥ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਹੈ। ਸੂਰਯਦੇਵ ਦੀ ਇਹ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸ਼ਿੰਗਾਰੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਚਾਰ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਰਿਸ਼ੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਗੋਲਾਕਾਰ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਜਾਣ ਵਾਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਇਸ ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਅਮਲਕ, ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੱਥਰ ਦੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਵਿਹੜੇ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਨਾਲੋਂ ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲਈ ਚਾਰ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਜਲਧਾਰਾ ਲਈ ਛੱਤ ਨਾਲ ਤਾਂਬੇ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਲਟਕਾਇਆ ਗਿਆ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਸਿਖਰ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਅੰਦਰੂਨੀ ਅਤੇ ਹੇਠਲੇ ਪਰਤ ‘ਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀਆਂ ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਅਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਮਹੰਤ ਰਾਮਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੇ ਦੋ ਭਾਗਾਂ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਮੁਕਾਬਲੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਹਿੱਸਾ ਵਧੇਰੇ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉੱਥੇ ਜਾਣ ਲਈ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪੱਥਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਰਾਮਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਅੰਦਰ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਮਹੰਤ ਰਾਮਗਿਰੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਧਿਆਨਮਗਨ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਗੋਲਾਕਾਰ ਸਿਖਰ ਹੈ। ਇਸ ਸਿਖਰ ਦੀ ਹਰੇਕ ਪਰਤ ਵਿੱਚ ਅੱਠ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਕੁੱਲ ਚੌਵੀ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਅਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਹੋਰ ਮਰਹੂਮ ਮਹੰਤਾਂ ਦੇ ਛੋਟੇ ਸਮਾਧੀ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਰਸੋਈ, ਨਿਯਮਿਤ ਚੱਲਣ ਵਾਲਾ ਅੰਨ-ਖੇਤਰ, ਸੇਵਕਾਂ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਰਿਹਾਇਸ਼ੀ ਸਥਾਨ ਅਤੇ ਹੋਰ ਇਮਾਰਤਾਂ ਹਨ।
ਬਰਬਾਡਾ ਦੇ ਇਸ ਸੂਰਯ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਮਕਰ ਸੰਕ੍ਰਾਂਤੀ ਅਤੇ ਰਥ ਸਪਤਮੀ ਇਹ ਦੋ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਸੁਹਾਗਣਾਂ ਅਤੇ ਹੋਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਉਹ ਤਿਲ-ਗੁੜ ਦਾ ਨੈਵੇਦ ਅਤੇ ਮਿੱਟੀ ਦੇ ਰਵਾਇਤੀ ਸੁਗੜੇ ਸੂਰਯਦੇਵ ਨੂੰ ਅਰਪਿਤ ਕਰਦੇ ਹਨ। ਸਾਲ ਭਰ ਦੇ ਹੋਰ ਸਾਰੇ ਪ੍ਰਮੁੱਖ ਹਿੰਦੂ ਤਿਉਹਾਰਾਂ ਅਤੇ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਸੂਰਯਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਅੰਨ ਵੰਡਣ ਦੀਆਂ ਸੁੱਖਾਂ ਮੰਨੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਸੁੱਖਾਂ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਅੰਨ-ਖੇਤਰ ਚਲਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਕਈ ਭਜਨ ਮੰਡਲੀਆਂ ਅਤੇ ਕੀਰਤਨਕਾਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਭਜਨ ਅਤੇ ਕੀਰਤਨ ਸੇਵਾ ਪੇਸ਼ ਕਰਦੇ ਹਨ। ਹਰ ਐਤਵਾਰ, ਪੂਰਨਿਮਾ, ਅਮਾਵਸਿਆ ਅਤੇ ਖਾਸ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੮ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮੰਠਾ ਤੋਂ ੭ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਾਲਨਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੬੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੰਠਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੦੯੭੬੯੨੪੯੩੧੮
मंदिरे
Temples
मंदिर
-
चक्रधर स्वामी ज्ञानमंदिर भोकरदन शहर, ता. भोकरदन, जि. जालना
अधिक माहितीChakradhar Swami Dnyanmandir, Bhokardan City, Taluka Bhokardan, District Jalna.
View Detailsचक्रधर स्वामी ज्ञानमंदिर, भोकरदन शहर, तालुका भोकरदन, जिला जालना।
विवरण देखें -
बागेश्वरी देवी मंदिर अंबा, ता. परतुर, जि. जालना
अधिक माहितीBageshwari Devi Temple Amba, Partur, Dist. Jalna
View Detailsबागेश्वरी देवी मंदिर अम्बा, परतूर, जिला. जलना
विवरण देखें -
नागेश्वर महादेव मंदिर सावरगाव म्हस्के, ता. जाफराबाद, जि. जालना
अधिक माहितीNageshwar Mahadev Temple Savargaon Mhske, Jaffrabad, Dist. Jalna
View Detailsनागेश्वर महादेव मंदिर सावरगांव म्हस्के, जाफराबाद, जिला. जलना
विवरण देखें