शनीदेव देवस्थान

शनिमांडल, ता. नंदुरबार, जि. नंदुरबार

हिंदू धर्मात ग्रहताऱ्यांच्या पूजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक शुभकार्यप्रसंगी नवग्रहांचे पूजन केले जाते. अनेक मंदिरांतही नवग्रहांचे स्थान असते. या ग्रहांमधे शनी ग्रहाला विशेष महत्त्व आहे. शनी पूजनाची परंपरा अती प्राचीन आहे. तमिळनाडू राज्यात थिरुनल्लर, मध्यप्रदेशात इंदौर, उत्तर प्रदेशातील प्रतापगड महाराष्ट्रात शनी शिंगणापूर या प्रमुख मंदिरांशिवाय देशभरात अनेक प्राचीन प्रसिद्ध शनिमंदिरे आहेत. यापैकीच एक मंदिर नंदुरबार जिल्ह्यात शनीमांडल गावात आहे. येथील दर्शनाने शनीची साडेसाती संपते, अशी भाविकांची श्रद्धा आहे

मंदिराची आख्यायिका अशी की थोर सम्राट राजा विक्रमादित्य याच्या दरबारात महापंडितांकडून नवग्रहांवर चर्चा सुरू होती. ज्यावेळी शनिग्रहाचे महत्त्व विशद करण्यात येत होते, तेव्हा विक्रमादित्याने शनिदेवांची थट्टा केली. आकाशमार्गे जाणाऱ्या शनिदेवाने ते ऐकले क्रोधित होऊन विमानासह ते दरबारात आले. ‘मी तुझ्या राशीला येतोयअसे सांगून ते तेथून निघून गेले. तेव्हापासून विक्रमादित्याची साडेसाती सुरू झाली. या कालावधीत विक्रमादित्य एकदा उज्जैन येथील बाजारात घोडे खरेदीसाठी आला होता. त्यावेळी शनिदेव घोडेविक्रेत्याचे रूप घेऊन त्याच्यासमोर आले. विक्रेत्याकडील घोडा

पसंत पडल्याने त्याने मोल विचारले. त्यावेळी विक्रेत्याने आधी घोड्यावर बसून पाहा आणि मग मोल द्या, असे सांगितले. विक्रमादित्य बसताच घोडा वायुवेगाने तेथून निघाला. त्याने राजाला या परिसरातील एका घनदाट जंगलात आणून सोडले आणि तो अदृश्य झाला. त्यामुळे भयाण जंगलात विक्रमादित्यला रात्र काढावी लागली. त्यावेळी शनिदेवाचा कोप सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले

घनदाट जंगलातून कसाबसा मार्ग काढत सध्या जेथे मंदिर आहे त्या गावात आल्यावर विक्रमादित्य एका दुकानात चाकरी करू लागला. तेथेही दुकानदाराच्या मुलीचा रत्नहार चोरल्याचा त्याच्यावर आळ घेण्यात आला. त्यामुळे तेथील राजा चंद्रसेन याने विक्रमादित्याला हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. तशाही अवस्थेत एका तेल घाण्यावर तो काम करू लागला. विक्रमादित्य हा संगीतात पारंगत होता. एकदा मध्यरात्री अंधारात निपचित पडलेल्या विक्रमादित्याने दीपराग आळवला आणि राज्यातील दिवे लागले. हे जेव्हा चंद्रसेन राजाच्या मुलीला समजले तेव्हा तिने विक्रमादित्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. हातपाय नसतानाही ती विवाह करायला तयार झाली. त्याचदरम्यान विक्रमादित्याच्या साडेसातीचा काळ संपत आल्याने शनिदेव प्रसन्न झाले विक्रमादित्याला वर मागायला सांगितले. त्यावेळी विक्रमादित्याने मला जशी पिडा दिली तशी यापुढे कोणाला देऊ नका, असे सांगून भाविकांना आपले दर्शन घेता यावे यासाठी येथेच थांबावे, अशी विनंती केली. शनिदेवानेही राजाचे शरीर पूर्ववत करून त्याचे वैभव त्याला परत केले. विक्रमादित्याची विनंती मान्य करून शनिदेवाने येथे राहण्याचे कबूल केले. शनिदेवांच्या वास्तव्यामुळे या गावालाही शनीमांडल असे नाव पडले. कालांतराने या ठिकाणी शनी मंदिर उभारले गेले. येथील दर्शनाने शनीची साडेसाती संपते म्हणून हे मंदिरसाडेसाती मुक्तीधाम शक्तिपीठम्हणून ओळखले जाते

सातशे ते आठशे वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराला काही वर्षापूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. अनेक ठिकाणी शनिदेवाच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नाही अथवा मूर्तीस स्पर्श करण्यापासून रोखले जाते. मात्र या मंदिरात महिलांसाठी असे कोणतेही निर्बंध नाहीत. येथे शनिदेवाच्या वज्रपिठापर्यंत महिलांना प्रवेश दिला जातो, हे येथील वैशिष्ट आहे. शनिमांडल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीत असलेल्या मोठ्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भालदार चोपदार वेशातील द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या सज्जावर दक्षिण भारतीय शैलीतील तीन मेघडंबरी त्यात सरस्वती, पार्वती कालिका यांच्या मूर्ती आहेत

मंदिराच्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या मध्यभागी प्रांगणात गोलाकार कठड्यात नक्षीदार कारंजे आहे. प्रांगणापेक्षा काहीशा उंच असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रवेश होतो. उजेड हवा येण्यासाठी येथे अनेक खिडक्या आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर सुंदर रंगकाम आहे छताकडील भागावर विविधरंगी काचा लावलेल्या आहेत. सभामंडपात भिंतीस लागून एका चौथऱ्यावर गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे

पुढे गर्भगृहात संगमरवरी मखरातील वज्रपिठावर शनीदेवाची त्यांच्या शक्तींसहीत काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. लहान बालक तीन स्त्रियांसह कुटुंबवत्सल स्वरूपातील शनिदेवाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती येथे आहे. मूर्तीवर वस्त्रे अलंकार कोरलेले आहेत. मूर्तीच्या मागील संगमरवरी प्रभावळीत मध्यभागी सूर्यदेवाची सुवर्ण प्रतिमा आहे. वज्रपिठाच्या उजव्या बाजूस देवकोष्टकात हनुमान डावीकडे तापी नर्मदा यांच्या मत्स्य मगर या वाहनासह मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या भोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे. येथील भिंती वितानावर काचेच्या नक्षी आहेत

मंदिराच्या छतावर चहुबाजीने कठडा आहे. या कठड्यावर असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. कठड्यात चारही कोनांवर लघुशिखरे त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर नागर शैलीतील, लहान लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांच्या रचनेचे शिखर अनेक उपशिखरे आहेत. शिखराच्या शीर्षभागी अष्टकोनी स्तुपिका त्यावर सुवर्ण कळस आहे. या मंदिराच्या शेजारी महादेवाचे मंदिर आहे. येथील महादेवाच्या पिंडीसमोर दगडी दिवा म्हणजेमाल्टाआहे

शनी मंदिरात वैशाख अमावस्येला शनैश्वर जयंती तसेच शनी अमावस्येला (जेव्हा अमावस्या शनिवारी येते) जत्रोत्सव साजरा केला जातो. या वेळी देवाचे दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातून हजारो भाविक येथे येतात

उपयुक्त माहिती

  • नंदुरबारपासून २० किमी अंतरावर
  • नंदूरबार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home