संकष्टाई देवी मंदिर

विरल विहार, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार

मध्यप्रदेशात उगम पावून पुढे महाराष्ट्र गुजरात राज्यातून प्रवास करणाऱ्या तापी नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार शहरात अनेक प्राचीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे, १०७ शिवपिंडी अनेक मंदिरे असलेले प्रकाशा हे तीर्थक्षेत्र नंदुरबार शहरापासून जवळ आहे. या शहराची ग्रामदेवता असलेली संकष्टाई वा संकष्टा देवी ही जागृत नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश गुजरात राज्यांतील अनेक भाविक येथे येतात

नंदुरबार शहराच्या ग्रामदेवतेचे हे मंदिर सुमारे अकराव्या ते बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. प्राचीन काळी नंदुरबार ही नंद राजाची राजधानी होती. येथील संकष्टा देवी ही त्यांची कुलदेवता होती तिची स्थापनाही नंद राजाने केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच नंद राजाच्या येथील गढीच्या बाजूलाच हे मंदिर स्थित आहे. पुढे वेगवेगळ्या राजवटीत विविध राजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला मंदिरास राजाश्रय मिळत गेला. चालुक्य, शिलाहार, यादव आदी राजवटीत या मंदिरास आर्थिक राजकीय पाठबळ मिळाले असल्याचे येथील पुजारी सांगतात.

या देवीची अख्यायिका अशी की सुमारे शंभर वर्षापूर्वी ललिता पंचमीच्या दिवशी एक व्यापारी चांदीचा मुखवटा घेऊन या मंदिरात आला. त्याने तो मुखवटा संकष्टा देवीला लावण्याची विनंती येथील पुजाऱ्यांकडे केला. पुजाऱ्याने त्याच्या विनंतीनुसार तो मुखवटा देवीच्या चेहऱ्यावर लावून मागे पाहिले असता तो व्यापारी तेथे नव्हता. तेव्हा देवीने स्वतः मुखवटा आणून मूर्तीस लावण्याचा आग्रह केला, अशी पुजाऱ्यांची येथील ग्रामस्थांची खात्री झाली. तेव्हापासून दर वर्षी ललिता पंचमीच्या दिवशी तो चांदीचा मुखवटा देवीस लावण्याचा प्रघात सुरू आहे.

भर वस्तीत आजूबाजूला असलेल्या घरांच्या दाटीत हे मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. सभामंडपात डाव्या बाजूच्या भिंतीलगत वरील मजल्यावर जाण्यासाठी जीना आहे. त्या शेजारी काचबंद देवकोष्टकात श्रीदत्ताची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पानफुलांची नक्षी असलेले चौकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत कमानींवर मध्यभागी किर्तीमुख दोन्ही बाजूस पानफुलांच्या नक्षी आहेत. गर्भगृहात प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर चांदीचे कासव शिल्प पादुका आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत.

गर्भगृहात वज्रपिठावर संकष्टा देवीची चतुर्भुज पाषाणमूर्ती आहे. देवीच्या एका हातात पद्म, दुसऱ्या हातात कमंडलू, तिसरा हात अभय मुद्रेत चौथा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आणि अंगावर वस्त्रे अलंकार आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस चांदीच्या दोन स्तंभांवर देवीच्या शक्ती देवतांची शिल्पे आहेत. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत पाचफणी नाग त्याच्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेले गजराज आहेत. त्यावरील तोरणात कीर्तीमुख दोन्ही बाजूंनी मकरतोरण आहे. प्रभावळीत बाह्य बाजूस शंख, चक्र, ध्वज, सूर्य चंद्र यांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे.

मंदिराच्या छतावर दोन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. पहिल्या थरात अष्टकोनी रचनेतील उभ्या भिंती त्यावर निमुळते होत जाणारी अष्टकोनी रचना आहे. शिखरात शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. या मंदिराच्या शेजारी प्राचीन काशी विश्वनाथ महादेव श्रीमंत बाबा गणपती ही मंदिरेही आहेत

मंदिरात दहा दिवसांचा शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रथमदिनी घटस्थापना करून देवीचा महाअभिषेक केला जातो. पाचव्या दिवशी देवीस चांदीचा मुखवटा लावून सजवले जाते. अष्टमीस देवीची व्याघ्रारूढ रूपातील दसऱ्याला महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधली जाते. अष्टमीच्या दिवशी नवचंडी होमाचे आयोजन केले जाते. दहाव्या दिवशी सीमोल्लंघनानंतर देवीस सोने अर्पण केले जाते. मंदिरात दहा दिवस नामजप, भजन, किर्तन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • नंदुरबार बस स्थानकापासून एक किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून नंदुरबारसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८२७५१६००६०
Back To Home