नागाई माता मंदिर

कोकले, ता. साक्री, जि. धुळे

भारतात नागपुजनाची परंपरा अतिप्राचीन आहे. संरक्षक विनाशक म्हणूनही नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण शुध्द पंचमी हा खास दिवस नाग पुजनचा सोहळा म्हणून साजरा केला जातो. देशात अनेक ठिकाणी नाग देवतांची मंदिरे अनेक मंदिरात नाग प्रतिमा पुजल्या जातात. यापैकीच एक प्रसिद्ध मंदिर साक्री तालुक्यातील कोकले या गावात आहे. पांझरा नदीच्या तिरावर असलेले हे नागाई मातेचे मंदिर प्राचीन प्रसिद्ध आहे. या देवीच्या चरणाखालून निघणाऱ्या पाण्याने मनुष्य प्राणिमात्रांच्या व्याधी नाहीशा होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे

नागाई माता मंदिर हे एक हजार वर्षांहूनही प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की पांझरा नदीतिरावर असलेल्या या ठिकाणी अनेक योगी, संन्यासी महात्म्य तपाचरण करण्यासाठी येत असत. तेव्हा त्यांना येथे अनिष्ठ शक्तींपासून त्रास होत असे. हा त्रास दूर करून त्यांचे संरक्षण करावे म्हणून योगीराज नागाबाबा यांनी नागाई देवीची उपासना केली. देवीने प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले असताआपण कायम स्वरुपी येथेच वास्तव्य करावेअशी इच्छा नागाबाबांनी व्यक्त केली. तेव्हापासून नागाई देवी पाषाण स्वरूपात येथेच स्थित झाली. नागाई देवीच्या कृपेने तपाचरण पूर्ण झाल्यानंतर सन १६८४ साली नागाबाबांनी देवीच्या सानिध्यात संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांचे कार्य त्यांच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवले. त्या सर्वांचे समाधी स्थळ येथे आहे. सन १९७५ साली मंदिराचा जिर्णोद्धार होऊन त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील अनेक कुळांची कुलदेवी अशी मान्यता असलेल्या नागाई देवीच्या मंदिराभोवती आवारभिंत आहे. या भिंतीत चार चौकोनी स्तंभांवर तीन अर्धचंद्राकार कमानीचे प्रवेशद्वार आहे. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर यज्ञकुंड सुमारे १५ ते २० फूट उंचीचा त्रिशुळ आहे. असे सांगितले जाते की याच जागेवर मंदिराचा जीर्णोद्धार होण्यापूर्वी गौतम कुंड नावाचे जलकुंड होते. त्या कुंडात देवीच्या चारणाखालून निघणारे पाणी गोमुखाद्वारे पडत असे. त्या कुंडात स्नान केल्याने व्याधी समस्या दूर होत असत, अशी भाविकांची श्रद्धा होती

येथून पुढे मंदिराच्या सभामंडपाच्या चार चौकोनी स्तंभांवर तीन महिरपी कमानी असलेले प्रवेशद्वार आहे. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपात उजव्या बाजूस महंत नागाबाबा सत्पुरुषाची संजीवन समाधी आहे. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या देवकोष्टकात गणेश डावीकडे मारूती यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस अर्धंचंद्राकार कोष्टक आहे त्यात पितळी पंचफणी नाग आहे. येथील गर्भगृह हे सभामंडपापासून काहीसे उंच आहे

गर्भगृहात वज्रपिठावर देवीची संगमरवरी नागासनी चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या तीन हातांत शंख, त्रिशूल, गदा चौथा हात अभय मुद्रेत आहे. देवीच्या दोन्ही बाजूस पंचफणी पितळी नाग आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार होण्यापूर्वी येथे देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती दोन्ही बाजूस नाग कन्या होत्या. हल्ली ती मूर्ती देवीच्या वज्रपिठात गुप्त असल्याचे सांगितले जाते. देवीच्या चरणाखालून अखंड पाण्याचा स्रोत वाहत असते. ते वाहते पाणी गर्भगृहात असलेल्या लहान कुंडात संकलीत होते. या पाण्याचा अंगावर शिडकाव केल्यास भौतीक दैवी समस्या दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे

मंदिराच्या छताला चहूबाजूने कठडा त्यावर लघू शिखरे आहेत. सभामंडपाच्या छतावर डाव्या उजव्या बाजूस दोन घुमटाकार शिखरे, त्यावर आमलक कळस आहेत. गर्भगृहावर उंच चौकोनी शिखर त्यावर एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे

मंदिराच्या प्रांगणात प्राचीन नागकन्या मूर्ती आहेत. दुसऱ्या बाजूला प्राचीन शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस देवकोष्टकात हनुमानाची मूर्ती डावीकडे दोन खड्गधारी द्वारपाल आहेत. मंदिरात मध्यभागी जमिनीवर स्वयंभू शिवपिंडी आहे या पिंडीवर नाग कोरलेला आहे. मंदिरात मागील भिंतीस लागून असलेल्या देवकोष्टकात विठ्ठलरखुमाई यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. दुसऱ्या देवकोष्टकात चतुर्भुज दुर्गा देवीची मूर्ती आहे. प्रांगणात भिल्ल समाजाच्या पूज्य दैवतांच्या पाषाणमूर्ती आहेत. भिल्ल समाजातील अनेक भाविक आपल्या प्रापंचिक सामजिक कार्याच्या प्रारंभी या देवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. याशिवाय येथे नागाबाबांच्या शिष्यांचे समाधी चौथरे आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात भक्त निवास, अन्नछत्र सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी इमारत आहे. मंदिराच्या मागील टेकडीवर काकासंकट महाराजांचे स्थान असून येथे दही भाताचा नैवद्य ठेवल्यास लहान मुलांचे आजार बरे होतात, अशी मान्यता आहे.

या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. साक्री तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी ती एक मानली जाते. याशिवाय नागपंचमी, देव दिवाळी, शारदीय नवरात्रौत्सव चैत्र नवरात्री उत्सव हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी राज्यातील विविध भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, किर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, मंगळवार शुक्रवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची वर्दळ असते.

उपयुक्त माहिती

  • साक्रीपासून किमी, तर धुळे येथून ५९ किमी अंतरावर
  • साक्री येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिराच्या भक्तनिवासात निवासाची सुविधा आहे
  • संपर्क : बाबाजी, मो. ७५५९४८४४८८
Back To Home