मुक्ताबाई समाधी मंदिर

कोथळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव 

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या धाकट्या भगिनी मुक्ताबाई. त्या वारकरी संतांच्या मांदियाळीतील वयाने सर्वांत लहान, परंतु अधिकाराने मोठ्या असलेल्या स्त्रीसंत होत. ‘आदिशक्ती मुक्ताबाई। दासी जनी लागे पायी।।अशा शब्दांत संत जनाबाईंनी त्यांची थोरवी गायलेली आहे. ‘जाणते नेणा नेणते जाणा। जाणते नेणते दोनी ही नेणा।।असा आध्यात्मिक विचार मांडणाऱ्या मुक्ताबाई तापीतीरावर अचानकअंतर्धानपावल्या. हे स्थान मुक्ताईनगरपासून काही अंतरावर कोथळी येथे आहे. येथे मुक्ताबाईंचे भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे.

संत तोची जाणा जगीं। दया क्षमा ज्याचे अंगी।। लोभ अहंता नये मना। जगीं विरक्त तोची जाणाअशी संतांची लक्षणे सांगणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई यांचेताटीचे अभंगसुप्रसिद्ध आहेत. सनातनी धर्ममार्तंडांनी निवृत्तीज्ञानदेवसोपानमुक्ताबाई या भावंडांचा चालविलेला छळ असह्य होऊन एकदा ज्ञानदेवांनी उद्वेगाने स्वतःला कोंडून घेतले. आळंदीतील सिद्धबेटावरील आपल्या झोपडीची ताटी लावून ते बसले. त्यावेळी मुक्ताबाईंनी त्यांना केलेला विनवणीयुक्त उपदेश हाताटीचे अभंगया नावाने ओळखला जातो. ताटीच्या अभंगांप्रमाणेच मुक्ताबाईंनी इतरही बरीच अभंगरचना केलेली आहे. त्यांचाज्ञानबोधहा संवादात्मक अभंगांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आपल्या योगसिद्धीचा गर्व करणाऱ्या चांगदेवांच्या त्या गुरू होत.

... निवृत्तीमहाराज वक्ते यांच्याब्रह्मचित्कलादर्शन अर्थात श्रीमुक्ताबाई चरित्र गाथाया ग्रंथानुसार, मुक्ताबाईंचा जन्म आपेगाव येथे सोपानदेवांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी, प्रमाथीनाम संवत्सर, अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ (शुक्रवार, ता. १२ ऑक्टोबर १२७९) रोजी झाला. संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, तसेच योगी चांगदेव यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंच्या मनात उदासीनता दाटून आली. संत नामदेवांच्या अभंगांत याचे वर्णन आले आहे. ते सांगतात, मुक्ताई फार उदास झाली. आता हे शरीर रक्षू नये असे वाटून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. ते पाहून संत निवृत्तीनाथ मनात तळमळू लागले. मुक्ताईला जपा, असे ते सर्वांना सांगू लागले. अशात ते तापीच्या तीरावर महत्‌ग्राम येथे आले. या ठिकाणी निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना विचारले की तुझ्या गमनाचा दिवस कोणता ठरविला आहेस? त्यावरमुक्ताई म्हणे जावें यावें कोठें। अवघें निघोट स्वरूप स्वामीम्हणजेआता जाणार तरी कुठे येणार तरी कुठून? सर्वकाही माझेच तर स्वरूप आहे’, असे उत्तर तिने दिले. वैशाख वद्य दशमीच्या दिवशी ते सर्व जण तापी नदीवर स्नानास गेले होते. त्यावेळी अचानक दाही दिशा कोंदून आल्या. प्रळयीच्या विजा वर्षू लागल्या. ते स्नान करून बाहेर येऊन बसले असता वादळ सुटले. अचानक वीज कोसळली आणि मुक्ताबाई दिसेनाशा झाल्या.

संत नामदेवांच्या अभंगांतील वर्णनानुसार हे ठिकाण मेहूण येथे असल्याचे सांगण्यात येते. तेथेही मुक्ताबाईंचे मोठे मंदिर उभारलेले आहे. मात्र निवृत्तीमहाराज वक्ते यांच्या मते महत्‌नगर म्हणजेच मुक्ताईनगर (पूर्वीचे एदलाबाद) आहे येथेच मुक्ताबाई अंतर्धान पावल्या. एदलाबाद येथे परशगंगा आहे. त्याला गंगाधार म्हणतात. तेथे सोमेश्वराचे मंदिर होते. या गंगाधारेवर वीज कडाडल्यावर मुक्ताबाई गुप्त झाल्या. वक्ते यांनी त्यांच्या पुस्तकात असे म्हटले आहे की ती वीज एदलाबादजवळ पडली. तेथे मोठा खड्डा पडून त्यातून जिवंत पाण्याचा झरा सुरू होऊन पुष्करणी तयार झाली. ज्या विजेसरशी मुक्ताबाई गुप्त झाली त्या विजेपासून झालेल्या झऱ्याबरोबर तेथे लहानशा फूटभर उंचीच्या आकाराच्या बाहुलीच्या रूपाने मुक्ताबाई एदलाबादला प्रगट झाली. या स्वयंभू बाहुलीस्वरूप मूर्तीकरीता गोविंदबुवा उत्राणकर यांनी मंदिर बांधले. कालांतराने टेंभुर्णेचे टीकाराम स्वामी संन्यासी यांनी तेथे दुसरी दीड फूट उंचीची मूर्ती बसवली. .. १९०० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे मुक्ताबाईंच्या शुभ्र संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती राजे रामचंद्रराव देशमुख रावेरकर यांनी जोधपूर येथून आणली होती.

पुण्याच्या रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले डॉ. रघुनाथ शुक्ल यांनी कोथळी येथेच मुक्ताबाईंचे अंतर्धान स्थान असल्याचे म्हटले आहे. १९७२ मध्ये त्यांनी कोथळी येथे शास्त्रीय संशोधन केले. या विषयीची माहिती संत परंपरेचा सामाजिकसांस्कृतिक मागोवा घेणाऱ्यारिंगणया वार्षिकाच्या संत मुक्ताबाई विशेषांकातीलवीज म्हणाली कोथळीचया अमृता देसर्डा यांच्या लेखात देण्यात आली आहे. त्यानुसार, शुक्ल यांनी कोथळीतील जागेतील मातीची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यानुसार वीज पडली ते स्थान निश्चित करण्यात आले. विजेमुळे मातीचे जे भस्म होते, ते प्रयोगशाळेत तपासूनआयसोटोप सी१४ कार्बन डेटिंगपद्धतीने तिचे कालमापन केले. त्यात हे भस्म ७०० ते ७५० वर्षांपूर्वी तयार झाल्याचे समोर आले. हा काळ मुक्ताबाई अंतर्धान पावल्या त्याच्याशी मिळता जुळता आहे. त्यावरून मुक्ताईंचे गमनस्थान हे कोथळीच असल्याचे मत शुक्ल यांनी व्यक्त केले

मुक्ताईंचे हे अंतर्धान समाधीस्थळ मुक्ताईनगरपासून दोन कि.मी. अंतरावर नदीकाठावर वसलेले आहे. या मंदिराचा सव्वाशे वर्षांत चार वेळा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या मागील बाजूने हतनूर धरणाचे बॅकवॉटर आहे. पूर्वीचे मंदिर पूर आल्यानंतर पाण्यात बुडत असल्याने १९८९९०मध्ये मुक्ताईनगर येथे नवे मंदिर उभारण्यात आले. मंदिर प्रांगणाच्या प्रवेश भागात मोठा मंडप त्यावर घुमटाकार शिखर आहे. तेथून मंदिराच्या प्रशस्त अशा दर्शनबारीत प्रवेश होतो. मंदिराभोवती भाविकांच्या मुक्कामासाठी मोठ्या ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मध्यभागी दगडात बांधलेले भव्य मंदिर आहे. लांब रूंद सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मोठ्या दगडी चौकोनाकार स्तंभांनी उभारलेला हा सभामंडप सर्व बाजूंनी खुला आहे. येथून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. आत संगमरवरी वज्रपिठावर मुक्ताबाईंची प्रसन्न वदन पांढरीशुभ्र संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. नऊवार लुगडे नेसलेल्या मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकूट गळ्यात विविध अलंकार आहेत. मूर्तीच्या मागे सोनेरी लेप दिलेली नक्षीदार महिरप आहे. मूर्तीनजीक विठ्ठलरुक्मिणीच्या काळ्या पाषाणातील लहान मूर्ती आहेत.

नागरशौलीतील या देखण्या मंदिराच्या गर्भगृहावर उरूशृंग प्रकारचे शिखर आहे. त्यावर वैष्णव ध्वज फडकत आहे. मंदिराच्या ओवरीत लहान बालकांसह येणाऱ्या महिला भाविकांसाठी एक स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. त्यास हिरकणी असे नाव देण्यात आले आहे. आषाढीकार्तिकी एकादशीला तेथे विधीवत पूजा, तसेच भजन कीर्तन होत असते. येथून दरवर्षी आषाढीसाठी मुक्ताईंची पालखी पंढरपूरला जाते. वाखरीच्या तळावर याच पालखीला मुक्ताईंची पालखी म्हणून मान देण्यात येतो. येथून ज्येष्ठ चतुर्थीला पालखी प्रस्थान करते आषाढी एकादशीच्या तीन दिवस आधी पंढरपूरला पोचते. महाशिवरात्रीस चांगदेवमुक्ताई यात्रा असते.

उपयुक्त माहिती

  • मुक्ताईनगरपासून दोन किमी, तर जळगावपासून ५८ किमी अंतरावर
  • मुक्ताईनगर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे 
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६९८११११७१, ९४२२६०९८६८
Back To Home