माहिजी देवी मंदिर

माहिजी, ता. पाचोरा, जि. जळगाव

पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले माहिजी हे गाव येथील जागृत माहिजी देवी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या देवीच्या नावावरून गावाला माहिजी हे नाव पडले आहे. दुर्गादेवीचे एक रूप असलेली ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अठराव्या शतकात स्थापना झालेल्या या मंदिरात भरणारी १५ दिवसांची यात्रा ही खान्देशातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते.

जळगाव गॅझेटियरमध्ये या देवीची आख्यायिका देण्यात आली आहे ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जामनेरनजीक असलेल्या हिवरी येथे माहेजी ही तिलोरी कुणबी समाजातील स्त्री राहात होती. सासरच्या छळामुळे घर सोडून ती साध्वी बनली होती. तुरणमल टेकडीवरील एका साधूकडून दीक्षा घेतल्यानंतर तिने देशभ्रमण सुरू केले. तिच्या अंगातील साधुत्व, पवित्रता पाहून तिच्या जन्मकाळातच अनेक लोक तिला नवस बोलू लागले होते. देशभ्रमण केल्यानंतर ती चिंचखेड येथे राहू लागली. येथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केल्यानंतर तिने जीवंत समाधी घेतली. यानंतर येथे तिचे मोठे मंदिर उभारण्यात आले. तिच्या नावावरून चिंचखेडला माहिजी असे नाव पडले, असे सांगण्यात येते

येथील मंदिरात माहिजी देवीची एक वेगळी आख्यायिका सांगण्यात येते ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या बोरनार येथील एक सासुरवाशीण आपल्या लहान बहिणीसह या गावात आली होती. परक्या गावातून आल्यामुळे ती भेदरल्यासारखी दिसत होती. त्यामुळे येथील लहान मुले त्यांच्यावर दगड भिरकावून त्यांना हिणवू लागली. अखेर त्या स्त्रीचा संयम सुटला तिने मागे वळून त्या मुलांकडे रोखून पाहिले. त्याबरोबर ती मुले बेशुद्ध पडली. त्यावरून ग्रामस्थांच्या लक्षात आले की ही स्त्री कोणीतरी अवतारी आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरून तिने या मुलांना शुद्धीवर आणले. तेव्हापासून जगदंबेचा अवतार समजून लोक तिची पूजा करू लागले. काही काळाने तिने येथे जिवंत समाधी घेतली. त्याआधी तिने ग्रामस्थांना सांगितले होते की माझ्या समाधीवर शेंदराचे बाण निघाले की माझी या जागेवर स्थापना करा. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी या जागेवर तिचे मंदिर उभारले. आपल्या गावात चक्क माय (देवी) प्रकटली, म्हणून हे गाव मायजी आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन माहिजी या नावाने ते ओळखले जाऊ लागले, असे सांगण्यात येते

जळगाव पाचोरा मार्गावरील नांद्रा येथून जवळच माहिजी हे गाव आहे. गावाच्या वेशीनजीक विस्तिर्ण परिसरात हे भव्य मंदिर वसलेले आहे. मंदिराभोवती असलेल्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिरासमोर हवनकुंड आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात आठ पायऱ्या चढून प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजुला तुलसीवृंदावन आहेत. सभामंडप, अंतराळ प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यात अनेक स्तंभ आहेत त्यावर दुसरा मजला स्थित आहे. या सभामंडपातून दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाण्यासाठी जिना आहे

येथील अंतराळ गर्भगृह हे सभामंडपापेक्षा उंचावर आहेत. अकरा पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला कासवशिल्प आहे. त्यापुढे असलेल्या गर्भगृहात माहिजी देवी तिची बहिण यांच्या मूर्ती आहेत. माहिजी देवीची मूर्ती काहीशी उग्र आहे. केस मोकळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, गळ्यात दागिने असे या मूर्तीचे स्वरूप आहे. त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक सोनेरी मुखवटा परिधान केलेली दुसरी मूर्ती आहे. तिच्या ही नाकात नथ, गळ्यात दागदागिने कपाळावर कुंकू आहे. या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरून गिरणा नदीचे दर्शन होते. मंदिराच्या गर्भगृहावर सुमारे ३० फूट उंचीचे शिखर त्यावर कळस आहे

पौष शुद्ध चतुर्दशीपासून पुढे १५ दिवस येथे मोठा यात्रोत्सव असतो. या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गुजरात येथून भाविक येतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी वाजता माहिजीदेवीच्या पादुकांचे पूजन होते. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक निघते. या यात्रेदरम्यान होम, हवन, सत्संग, भजन असे कार्यक्रम होतात. असे सांगितले जाते की पूर्वी ही यात्रा सलग तीन महिने भरत असे. बुऱ्हाणपूर, मुंबई, भिवंडी येथील व्यापारी या यात्रेसाठी आवर्जून येथे येत. जळगाव जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार १८०३मध्ये आलेल्या आपत्तीनंतर पुढची चार वर्षे या यात्रोत्सवात खंड पडला. त्यानंतर आजतागायत येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ही यात्रा भरते. .. १८६९ मध्ये ,५८,१७५ .. १८७९ मध्ये ,२४,३२६ रुपयांची या यात्रेत खरेदी विक्री झाली होती. नवसफेड करण्यासाठी येणारे भाविक यावेळी देवीला पात, चोळी बांगड्या अर्पण करतात. नवसाने संतती प्राप्त झालेल्या स्त्रिया निमसाडा पैलूचा नवस फेडतात. या यात्रा कालावधीत पाचोरा, जळगाव एरंडोल येथून भाविकांसाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जातात

उपयुक्त माहिती

  • पाचोरा येथून २१ किमी, तर जळगाव येथून ३९ किमी अंतरावर
  • पाचोरा जळगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home