ढगाई देवी मंदिर

होळ, ता. बारामती, जि. पुणे

होळ, ता. फलटण, जि. सातारा

पुणे सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या निरा नदीच्या पात्रात मधोमध असलेले ढगाई देवीचे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जलदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीची ठाणी असून त्यातील ठाणे नदीपात्रात, तर आणखी ठाणी ही या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर असलेल्या होळ गावांमध्ये स्थित आहेत. त्यातील एक ठाणे हे बारामती तालुक्यातील होळ या गावी, तर दुसरे मंदिर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ गावी आहे. नवसाला पावणारी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी भाविकांची या देवीवर श्रद्धा आहे.

ढगाई देवीचे प्राचीन मूळ मंदिर हे नदी पात्रात एका खडकावर स्थित आहे. पुणे सातारा जिल्ह्याच्या वेशीवरील होळ गावात हे देवीचे स्थान आहे. निरा नदीच्या अल्याड पल्याड असलेल्या दोन्ही गावांचे नावहोळहेच आहे. पूर्वी या दोन्ही गावांमधूनचा प्रवास होडीतून होत असे. आता या नदीवर पूल झाल्याने रस्ता मार्गाने ही दोन्ही गावे जोडली गेली आहेत. देवीच्या दर्शनाला फलटण तालुक्यातील होळ येथून होडीने जाता येते. निरा नदीच्या पात्रात मधोमध असलेल्या एका मोठ्या खडकावर देवीचे दगडी बांधणीतील पुरातन मंदिर आहे. या गर्भगृहात ढगाई देवीची मूर्ती आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नदीला जेव्हा जास्त पाणी असते तेव्हा हे मंदिर पाण्याखाली जाते.

या मंदिरांबाबत असे सांगितले जाते की पावसाळ्याच्या दिवसांत देवीचे मूळ मंदिर पाण्यात असल्यामुळे भाविकांना तेथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नसे. त्यामुळे देवीने स्वतः या दोन्ही गावांत प्रकट होऊन भाविकांना तेथे तिची स्थापना करण्याबाबत दृष्टांत दिला. तेव्हापासून या दोन्ही गावांत देवीची स्वतंत्र मंदिरे असून ती बारामती फलटण तालुक्यात असलेल्या मंदिरांमधील महत्त्वाची तीर्थस्थाने मानली जातात.

बारामती तालुक्यात असलेल्या ढगाई देवीचे मंदिर निरा नदीच्या काठावर चिंचेच्या बनात आहे. या मंदिराचा परिसर प्रशस्त असून मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी करण्यात आलेली आहे. मंदिरासमोर दीपमाळ असून मुख्य मंदिर हे सभामंडप गर्भगृह अशा रचनेचे आहे. उंच चौथऱ्यावर असलेल्या या मंदिराचा सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्याला रंगमंडप असे संबोधले जाते. गर्भगृहात मध्यभागी देवीच्या शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्तीला वस्त्रालंकार परिधान केले जातात. गर्भगृहाच्या बाहेरून प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून सभामंडपाच्या वरच्या बाजूला अनेक संत देवतांच्या मूर्ती आहेत. काहीशा अशाच रचनेचे मंदिर हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ येथे आहे. या मंदिरातील गर्भगृहातील देवीच्या मूर्तीवर पितळी मुखवटा असून मूर्तीला विविध अलंकार वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रांनी सजविले जाते. या दोन्ही मंदिरांच्या सभामंडपातून पाहिले असता निरा नदीच्या पात्रातील मूळ ढगाई देवीच्या मंदिराचे दर्शन होते. दोन्ही मंदिरांमध्ये रस्तामार्गे जाण्यासाठी एक किमी इतके अंतर आहे.

दुर्गाष्टमीला येथे मोठा उत्सव होतो. गुरुपौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार रविवारी भाविक दर्शनासाठी येत असतात. संपूर्ण आषाढ महिन्यात या मंदिर परिसरात यात्रेचे वातावरण असते. आषाढ महिन्याच्या मंगळवारी, शुक्रवारी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. नवरात्रोत्सवातही येथे भाविकांची गर्दी असते. नदीचा शेजार, चिंचेचे बन सुंदर मंदिर परिसर या सर्व निसर्गरम्य वातावरणामुळे येथे अनेक चित्रपट मालिकांचे चित्रीकरण होत असते.

बारामती तालुक्यातील ढगाई देवी मंदिराला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचावर्ग दर्जा देण्यात आला आहे. ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षाला लाखांहून जास्त लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो. त्या दर्जानुसार येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी शासनाकडून निधी उपलब्ध होतो.

उपयुक्त माहिती:

  • बारामतीहून ३३ किमी, तर फलटणहून १९ किमी अंतरावर
  • बारामती फलटण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home