दत्त मंदिर

सानपाडा, नवी मुंबई

सायनपनवेल महामार्गावर वाशीलगत असलेले सानपाडा हे शहर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे सध्या प्रसिद्ध आहे; परंतु हे गाव पूर्वीपासून ओळखले जाते ते येथील प्राचीन दत्तगुरू पादुका मंदिरामुळे. हे दत्त मंदिर सानपाड्यासह पंचक्रोशीतील भाविकांचे पूर्वीपासून श्रद्धास्थान आहे. येथील वैशिष्ट्य असे की शेकडो वर्षांपासून आजही या गावात गाव उपवासाची परंपरा आहे. दर गुरुवारी या गावात मांसाहार वर्ज असतो. एकाच दिवशी उपवास करण्याची ही प्रथा येथील ग्रामस्थांनी आजही टिकवून ठेवली आहे

इतिहासप्रसिद्ध बेलापूर भागातील सानपाडा हा एक छोटा पाडा होता. .. पूर्व चौथ्या शतकात हे मौर्य साम्राज्यातील एक लहानसे गाव होते. बहुधा त्याच्या आकारामुळे त्यास सानपाडा म्हणजे छोटा पाडा असे म्हणत. सातवाहन, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंब, बहामनी, सिद्दी, शिवशाही, पेशवाई अशा अनेक सत्ता या गावाने पाहिल्या. पूर्वी तीन बाजूंनी मिठागरे आणि एका बाजूला जंगल अशा निसर्गसमृद्ध परिसरात हे गाव होते. पूर्वीपासूनच ते स्वयंपूर्ण होते. या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पूर्वी १०० टक्के आगरी समाजाची वस्ती होती. येथील मिठागरातील मीठ पनवेलठाणे बाजारपेठेत विकावे आणि शेती मासेमारी करून उदरनिर्वाह करावा, अशी या गावातील ग्रामस्थांची पूर्वीपासून दिनचर्या होती. या समाजाची ऐतिहासिक परंपरा मुंगी पैठण येथे सहाशे वर्षांपूर्वी राज्य करीत असलेल्या राजा बिंबापासून सुरू होत असल्याचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनीमहिकावतीची बखरमध्ये नोंदलेले आहे

आगरी समाज मूळचा शैव संप्रदायातील असून, सानपाड्यातील आगरी समाजाची येथील बुद्धेश्वर महादेवावर नितांत श्रद्धा आहे. त्याच प्रमाणे येथे दत्तगुरूंचे भक्तगणही मोठ्या प्रमाणात आहेत. दत्त जयंतीला येथून निघणारी पालखी सानपाडा या परिसरातील अनेक गावांमधील सर्वात मोठा उत्सव समजला जात असे. दत्तावर श्रद्धा असणारे येथील ग्रामस्थ कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दत्ताच्या दर्शनाने करीत असत. आजही ही परंपरा सुरू आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी एक सिद्धयोगी साधू येथील औदुंबराच्या झाडाखाली तपश्चर्या करीत असे. त्यांचे तेजस्वी रूप पाहून अनेक भाविक त्यांच्या दर्शनाला येत. कितीही भाविक आले तरी ते साधू सगळ्यांहून उंचच दिसत असत. एकदा अचानक त्या औदुंबराच्या मुळातून झरा वाहू लागला. तेव्हापासून या स्थानाचा महिमा वाढत गेला. ते साधू दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तगुरू होते, अशी भाविकांची भावना झाली त्यातूनच हे मंदिर उभे राहिले.

मुंबईपनवेल महामार्ग मध्य रेल्वेचा वाशीपनवेल हार्बर रेल्वेमार्ग यांच्या मध्यभागी सानपाडा गावात श्रीदत्त मंदिर वसलेले आहे. सुमारे अडीच एकर इतक्या प्रशस्त प्रांगणात असलेले हे मंदिर नवी मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात येण्यासाठी पश्चिमेकडून मार्ग आहे. आवारभिंतीमध्ये असलेल्या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारापासून ते दत्त मंदिराच्या गर्भगृहापर्यंतच्या मार्गावर दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे त्यावर भाविकांच्या सोयीसाठी शेड उभारलेली आहे. या दर्शनरांगेच्या बाजूला एक लहानसे उद्यान विकसित केले आहे त्यामध्ये एक मोठी दगडी शीळा आहे. या शिळेजवळ गणेशाची मूर्ती शिवपिंडी आहे. यावर कृत्रिमरित्या पाणी विजेचा झोत सोडला जातो. त्यामुळे हा परिसर आणखी खुलून दिसतो.

खुला सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या मध्यभागी श्रीदत्ताच्या पादुका आहेत. प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या मागच्या बाजूला प्राचीन औंदुंबराचे झाड आहे. या मंदिराचे नव्याने बांधकाम करताना ते झाड मंदिरात सामावून घेण्यात आले आहे. गर्भगृहाच्या मागच्या बाजूने बाहेरून पाहिले असता शिखरासोबतच त्याच्या बाजूने भिंतीतून आलेले ते झाड दिसते. गर्भगृहाला प्रदक्षिणा घालताना भाविक या झाडाचेही दर्शन घेतात. या गर्भगृहात महिलांना जाण्यास बंदी आहे; परंतु गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातून या पादुकांचे व्यवस्थित दर्शन घेता येते.

मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या उजवीकडे विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. विश्वेश्वर महादेवाच्या गर्भगृहासमोरील एका चौथऱ्यावर नंदी कासव आहे. गर्भगृहात विश्वेश्वर महादेवाची पिंडी आहे. विश्वेश्वर मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिर बाळकृष्ण महाराज मंदिर आहे. विश्वेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आणखी तीन मंदिरे आहेत. त्यात विठ्ठलरखुमाई मंदिर, गणेश मंदिर साईबाबा मंदिर यांचा समावेश आहे. याशिवाय प्रांगणात शनिदेवाचे मंदिर आहे.

येथील दत्त मंदिरात प्रत्येक गुरुवारी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. विशेष म्हणजे तो देण्यासाठी येथे किमान एक ते दोन वर्षे आधी नोंदणी करावी लागते. याशिवाय येथे हनुमान जयंती उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

उपयुक्त माहिती

  • सानपाडा रेल्वेस्थानकापासून मिनिटे पायी अंतरावर
  • वाशी बस स्थानकापासून किमी अंतरावर
  • एनएमएमटी, एसटी तसेच बेस्टची सेवा
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध
  • संपर्क : सदानंद पाटील, अध्यक्ष, मो. ८८९८०११९५१
  • धर्मेंद्र पाटील, सचिव, मो. ९८९२२५२२७१
Back To Home