बल्लाळेश्वर मंदिर

पाली, ता. सुधागड, जि. रायगड

कोकणपट्टा हा अनेक प्राचीन मंदिरे आणि देवदेवतांसाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायकांतील दोन तीर्थस्थळे ही कोकणातील रायगड जिल्ह्यात येतात. त्यापैकी सुधागड तालुक्यातील पाली येथील बल्लाळेश्वर गणेशाचे स्थान भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरात गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दक्षिणायनात म्हणजेच २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत सूर्योदयाच्यावेळी मंदिरातील गणेशमूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडतात. या मंदिरासंदर्भातील उल्लेख गणेश पुराण मुद्‌गल पुराणात आढळतो. तेथे पालीसपल्लीअसे म्हटलेले आहे

गणेश पुराण मुद्‌गल पुराण हे गाणपत्यपंथातील दोन प्रमुख ग्रंथ आहेत त्यांना उपपुराण समजले जाते. .. १००० ते ११०० हा गणेश पुराणाचा रचनाकाल आहे. या पुराणाच्या प्रथम खंडातील चौथ्या अध्यायात, विदर्भातील कौंडिण्यपूरचा राजा भीम याच्या उपाख्यानामध्ये बल्लाळेश्वराची कथा सांगण्यात आली आहे. त्यानुसार, सिंधु देशात पल्ली नामक गावात (म्हणजेच आजच्या पालीमध्ये) कल्याण नावाचा एक धनिक वैश्य राहात असे. एकदा त्याचा पुत्र बल्लाळ हा काही सवंगड्यांसमवेत वनात गेला होता. तेथे त्यांना एक मूर्ती दिसली. त्यांनी त्या मूर्तीचे नाव गणेश्वर असे ठेवले तिची पूजा

सुरू केली. सर्वांनी मिळून तेथे मंडप उभारला. उत्सवाची तयारी केली. तेव्हापासून आपल्या सर्व मित्रांसह तो बल्लाळ तेथेच राहून गणेशाची उपासना करू लागला. हे पाहून त्याच्या मित्रांचे आईवडील संतापले. त्यांनी कल्याणाकडे जाऊन बल्लाळाची तक्रार केली. तो अरण्यातील कुठल्यातरी शिळेचे पूजन करतो आहे. त्यास रोखावे अन्यथा आम्ही कठोर व्यवहार करू, असे त्यांनी कल्याण यास धमकावले. तेव्हा कल्याणाने वनात जाऊन ती मूर्ती फेकून दिली. त्यावर बल्लाळाने पित्यास हात जोडले. सर्वात्मा भगवान गणाध्यक्षाचा निरादर करू नका, असे विनवले. ते विघ्नहर्ते आहेत सर्वांत मोठे देव आहेत, असे बल्लाळ म्हणाला. ते ऐकून कल्याणाने आपल्या त्या मुलाला एका झाडास बांधले आणि म्हणाला की आता पाहतो की तुझा गणाध्यक्ष तुझे विघ्न कसे दूर करतो ते. बल्लाळाला तेथेच सोडून कल्याण परतला. ती निष्ठुरता पाहून बल्लाळ क्रोधित झाला. त्याने पित्यास शाप दिला की तू आंधळा, मुका, बहिरा आणि विकलांग होशील. त्यानंतर बल्लाळाने गणेशाचा धावा सुरू केला. अखेरीस निराश होऊन त्याने आत्मत्याग करण्याचे ठरवले तो झाडावर डोके आपटू लागला. एवढ्यात तेथे ब्राह्मणाच्या रूपात गणपती आला. त्याने बल्लाळास मुक्त केले सांगितले की आजपासून हे स्थानबल्लाळ विनायकया नावाने प्रसिद्ध होईल.

बल्लाळेश्वर देवस्थान हे गणेशभक्त असलेल्या पेशव्यांच्या आमदनीत महत्त्व पावलेल्या अष्टविनायकांपैकी एक आहे. पाली येथील हे मंदिर सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे आहे. येथील मूळचे मंदिर लाकडी होते, असे सांगण्यात येते. .. १७६० मध्ये तिसऱ्या पानिपत युद्धाच्या सुमारास पेशवाईतील चतुर मुत्सद्दी नाना फडणीस यांचे चुलत बंधू मोरोबादादा फडणीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी येथे सध्याचे ताशीव दगडातील भव्य मंदिर उभारले. यानंतर १९३२ मध्ये पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराची बांधणी आवार चिरेबंदी आहे. पूर्वेकडे देवळालगत दोन प्रशस्त घाटदार तलाव आहेत. मंदिर परिसरात मागच्या बाजूने प्रवेश केला जातो. दोन्ही बाजूंनी असलेल्या प्रसाद पूजा साहित्याच्या दुकानांच्या रांगेतून पुढे जाताच प्रथम धुंडीविनायकाचे मंदिर आहे. भक्त बल्लाळाने ज्याची पूजा केली तोच हा गणेश, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनाआधी धुंडीविनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर भक्त बल्लाळाची पौराणिक कथा सांगणारी चित्रे रंगवण्यात आली आहेत. येथून दर्शन रांगेतून पुढे जाताच प्रथम मंदिराच्या शिखराचे दर्शन होते. शिखर अष्टकोनी आहे ते वर निमुळते होत जाते. त्यावर अनेक देवकोष्टके कोरलेली आहेत. शीर्षस्थानी आमलक आणि सोनेरी कळस आहे. मुख्य मंदिराकडे जात असताना मंदिराच्या मागच्या बाजूस एक भलेमोठे चाक दिसते. या मंदिराच्या बांधकामासाठीचा चुना ज्या घाणीच्या चाकाने मळण्यात आला होता ते हे चाक. ते दीड फूट जाड सव्वापाच फूट व्यासाचे आहे. हे चाक आकाराने एवढे मोठे आहे की ते ओढण्यास हत्ती जुंपत असावेत, अशी माहिती येथे सांगितली जाते.

मंदिराची संरचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडप कोकणी वास्तुशैलीनुसार बांधण्यात आलेला आहे. प्रवेशद्वाराजवळ मोठी पंचधातूची घंटा टांगण्यात आलेली आहे. .. १७३९ मध्ये चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकला. त्या विजयाप्रीत्यर्थ त्यांनी ही घंटा बल्लाळेश्वरास अर्पण केली होती. सभामंडपात आठ लाकडी नक्षीदार स्तंभ आहेत. तळाशी छोटे दगडी चौथरे आणि वरच्या बाजूस महिरपी कमानीने जोडलेले, असे या स्तंभांचे स्वरूप आहे. या स्तंभांवर अष्टविनायकाच्या तसबिरी लावण्यात आलेल्या आहेत. या सभामंडपाचे दर्शनी काम .. १९१० च्या सुमारास पालीचेच गणेशभक्त कृष्णाजी नारायण रिंगे यांनी केले होते. त्या कामासाठी तेव्हा १८ हजार रुपये खर्च आला होता. सभामंडपातून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाचे प्रवेशद्वार पाषाणाचे महिरपी कमानदार आहे. आत गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची मूर्ती आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार त्रिशाखीय आहे. या दगडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. ललाटबिंबस्थानी शेंदूरचर्चित गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपीठावर बल्लाळेश्वराची मूर्ती विराजमान आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. नाभीपासूनचा भाग सिंहासनाच्या वर आहे. मूर्तीच्या बेंबीत डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मागील बाजूस चांदीची प्रभावळ आहे. दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी आहेत. मूर्तीवर अंदाजे साडेचार किलोचा चांदीचा सुंदर कोरीव मुकुट आहे

मंदिरात रोज बल्लाळेश्वराची नित्य पूजा आरती असा कार्यक्रम असतो. प्रत्येक संकष्टी विनायक चतुर्थीस पालखी निघते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध षष्ठीपर्यंतचा भाद्रपदी उत्सव असतो. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध षष्ठीपर्यंतचा गणेश जन्मोत्सव साजरा होतो. माघातील चतुर्थीला या ठिकाणी श्रीगणेश मध्यरात्री भोजनासाठी प्रत्यक्ष अवतरतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे

येथे पहाटे चार ते सकाळी आठपर्यंत गाभाऱ्यात जाऊन स्वहस्ते पूजा करता येते. मात्र संकष्टी विनायकी चतुर्थीला असलेल्या गर्दीमुळे अशी पूजा करता येत नाही. सकाळी आठनंतर गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन घेता येते. लघुरुद्र, महापूजा, अभिषेक अशा विधी येथे करता येतात. ‘नवसाला पावणारा गणपतीअशी या तीर्थाची ख्याती असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • मुंबईगोवा महामार्गावर पाली फाट्यापासून किमी
  • खोपोलीपासून ३८ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, अलिबाग खोपोलीहून पालीसाठी थेट एसटीची सोय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२१४२ २४२२६३ 
Back To Home