अकलूज शहराची ग्रामदेवता असलेल्या अकलाई देवीचे मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की या देवीच्या स्थानावरून शहराला अकलूज हे नाव पडले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या शहरातील नीरा नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. ही जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे संतानप्राप्तीसाठी या देवीचा नवस करण्याची आणि नवजात बालकाला देवीच्या चरणावर ठेऊन तिचा आशीर्वाद घेण्याची येथे प्रथा आहे.
ऐतिहासिक दस्तऐवजांत इ.स. १२११ साली यादव वंशीय सिंघण राजाने अकलूज हे शहर आणि येथील किल्ला वसवल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर या भागावर बहामनी, आदिलशाह, मुघल बादशाह आणि मग मराठ्यांनी सत्ता गाजवली. असे सांगितले जाते की इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महाराज अकलूजमध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते. १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात औरंगजेबही या परिसरात मुक्कामाला होता. त्याकाळात संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी समजताच औरंगजेबाने आनंद साजरा करण्यासाठी तत्काळ अकलूजचे नाव अदसपूर केले होते. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे आणि कालांतराने ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी या ठिकाणी काही काळ मुक्काम केल्याचाही संदर्भ मिळतो.
अकलाई हे पार्वती देवीचे उग्र रूप असल्याची मान्यता आहे. या मंदिराची अख्यायिका अशी की अंकलेश्वर नावाचा राक्षस या परिसरातील ऋषीमुनींना त्रास देत होता. तेव्हा त्यांनी पार्वतीची आराधना करून तिच्याकडे आपले गाऱ्हाणे माडले. त्यावेळी पार्वतीने या असुराचा वध केला व येथे स्थित झाली. एका लोककथेनुसार पार्वतीने एकदा शंकराबरोबर स्मशानात जाण्याचा हट्ट धरला. सर्व देवांनी तिला त्यापासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले. पण पार्वतीने त्यांचे ऐकले नाही. अखेर ती शंकरामागून या परिसरात आली. यावेळी शंकराने तिच्या रक्षणासाठी आपले वाहन नंदी तिच्यासोबत दिला. त्यामुळे या मंदिराबाहेर नंदीची मूर्ती आहे. देवी मंदिरात नंदी असमे हे दुर्मिळ समजले जाते.
अकलूज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे अकलाई देवीचे मंदिर हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. पेशवेकाळात व त्यानंतरही झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. वाहनतळापासून मंदिरापर्यंत असलेल्या मोठ्या जागेत अनेक उपहारगृहे व पुजासाहित्याची दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत मंदिराची स्वागतकमान आहे. या कमानीत एक मुख्य व दोन उप असे तीन दरवाजे आहे. चार पायऱ्या चढून या कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे व येथे सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. या उद्यानातून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी शेड टाकलेली आहे. मंदिराच्या डावीकडे एक मोठी दीपमाळ आहे.
मंदिरासमोर एका उंच चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीमूर्ती आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणातून सात पायऱ्या चढून मुखमंडपात प्रवेश होतो. मुखमंडपातील चार स्तंभावर छत आहे. त्यातील दोन स्तंभ हे समोर तर उर्वरित स्तंभ हे सभामंडपाच्या भिंतीत आहेत. मुखमंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. बंदिस्त सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी जाळीदार भिंतींची रचना आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी सभामंडपातून दर्शनरांगेची व्यवस्था आहे. सभामंडपाच्या सर्व भिंतींमध्ये कक्षासने आहेत. सभामंडपाच्या पुढे अंतराळ व गर्भगृह आहे. गर्भगृहाचा आकार अष्टकोनी आहे. त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या लाकडी मखरात अकलाई देवीची मूर्ती आहे. देवीच्या मस्तकी मुकुट, नाकात मोत्यांची नथ, अंगावर विविध दागिने व वस्त्रे आहेत. या मंदिराच्या सभामंडप, अंतराळ व गर्भगृहावर प्रत्येकी एक अशी तीन शिखरे आहेत. गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. या मंदिरावर एकूण सत्तावीस लहान मोठ्या शिखरांच्या प्रतिकृती आहेत. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक समजले जातात.
या मंदिरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाकंभरी पौर्णिमेलाही ६५ भाज्याचा नेवैद्य दाखवून या वनदेवीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अर्पण केलेल्या फळभाज्यांनी येथील गर्भगृह आणि सभामंडप अनोख्या रितीने सजवला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघतो. कोजागिरी पोर्णिमेच्या आधी तीन दिवस देवी निद्रेला जाण्याची आणि पौर्णिमेला दुधाचा नेवैद्य दाखवून देवीला जागे करण्याची प्रथाही येथे पाळण्यात येते. आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अकलाई देवीची यात्रा असते. यात्रेच्या दिवशी सायंकाळी होणाऱ्या दीपप्रज्वलन उत्सवाला शेकडो भाविक हजेरी लावतात. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावामध्ये देवीचा छबिना काढण्यात येतो. येथे भाविकांसाठी धर्मशाळाही उभारण्यात आली आहे.
उपयुक्त माहिती
अकलूज बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून अकलूजसाठी एसटीची सुविधा
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९६३७९४८३४१
अकलाई देवी मंदिर
Akluj, Taluka Malshiras, District Solapur
The Akalai Devi Temple, the presiding deity (Gramdevata) of Akluj town, is renowned throughout the district. It is said that the town of Akluj derived its name from the sacred abode of this Goddess. This temple is situated on the banks of the Nira River in this historically significant town. Devotees believe that this awakened Goddess grants wishes. Therefore, it is a custom here to make vows to this Goddess for progeny and to place newborn children at Her feet to receive Her divine blessings.
Historical documents mention that in 1211 CE, King Singhana of the Yadava dynasty established the town of Akluj and its fort. Subsequently, this region was ruled by the Bahmanis, Adilshahs, Mughal Emperors, and then the Marathas. It is said that in 1679 CE, Diler Khan and Chhatrapati Sambhaji Maharaj resided in Akluj for four months. From December 14, 1688, to February 15, 1689, Aurangzeb also stayed in this area. Upon hearing the news of Chhatrapati Sambhaji Maharaj’s capture at Sangameshwar during that period, Aurangzeb immediately renamed Akluj to Adaspur to celebrate his joy. After the British abolished the Peshwai, there are also references to Bajirao II Peshwe and, later, British Governor Lord Dalhousie, having stayed here for some time.
Akalai is believed to be a fierce form of Goddess Parvati. The legend of this temple states that a demon named Ankaleshwar was tormenting the sages and hermits in this region. They then worshipped Parvati and presented their grievances to Her. At that time, Parvati slew this demon and took Her abode here. According to a folk tale, Parvati once insisted on accompanying Lord Shiva to the cremation ground. All the deities tried to dissuade Her from this, but Parvati did not listen to them. Finally, She followed Lord Shiva to this area. At this time, Lord Shiva sent His vehicle, Nandi, with Her for Her protection. Therefore, there is an idol of Nandi outside this temple. The presence of Nandi in a Devi temple is considered rare.
This Akalai Devi Temple, located in the central part of Akluj town, is said to be a thousand to twelve hundred years old. After renovations during the Peshwa period and thereafter, the temple has attained its current form. In the large area from the parking lot to the temple, there are many eateries and shops selling puja items. Within the compound walls surrounding the temple, there is a welcoming arch. This arch has three gates: one main and two subsidiary. Ascending four steps, one enters the temple courtyard through this arch. The temple courtyard is spacious, and a beautiful garden has been developed here. A shed has been erected for the convenience of devotees on the path leading from this garden to the temple. To the left of the temple, there is a large Deepmala (lamp tower).
In front of the temple, on a raised platform, there is a monolithic idol of Nandi. The structure of this temple comprises a Mukhamandapa (front hall), Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). One enters the Mukhamandapa by ascending seven steps from the courtyard. The Mukhamandapa has a roof supported by four pillars. Two of these pillars are at the front, while the remaining pillars are integrated into the walls of the Sabhamandapa. The Mukhamandapa has seating arrangements (kaksasanas) for devotees. The enclosed Sabhamandapa features latticed walls to allow for air and light. To manage the crowd of devotees, there is a queue system for Darshan (viewing the deity) from the Sabhamandapa. All the walls of the Sabhamandapa have seating arrangements (kaksasanas). Beyond the Sabhamandapa are the Antarala and the Garbhagriha. The Garbhagriha is octagonal in shape. It has ventilators to allow for light and air. Inside the Garbhagriha, the idol of Akalai Devi is enshrined in a wooden shrine (makhar) placed on a Vajrapitha (diamond pedestal). The Goddess wears a crown on Her head, a pearl nose-ring (nath) in Her nose, and various ornaments and garments on Her divine body. This temple has three Shikharas (spires), one each above the Sabhamandapa, Antarala, and Garbhagriha. The main Shikhara of the Garbhagriha features many small replicas of Shikharas. In total, there are twenty-seven replicas of Shikharas, both small and large, on this temple. These twenty-seven Kalashas (finials/spires) are considered symbols of the twenty-seven Nakshatras (lunar constellations).
The Navaratri festival is celebrated with great enthusiasm in this temple. On Shakambhari Pournima, the festival of this Vanadevi (forest goddess) is celebrated by offering a Nivedya (food offering) of 65 vegetables. On this day, the Garbhagriha and Sabhamandapa are uniquely adorned with the fruits and vegetables offered. On Tripurari Pournima, the temple premises are illuminated with countless lamps. The custom of the Goddess going to sleep three days before Kojagiri Pournima and being awakened on Pournima by offering milk Nivedya is also observed here. The Yatra (pilgrimage fair) of Akalai Devi takes place on the Tuesday or Friday following Ashadhi Pournima. Hundreds of devotees attend the Deep Prajvalan Utsav (lamp lighting ceremony) held in the evening on the day of the Yatra. On the second day, a Chhabina (procession) of the Goddess is taken out throughout the entire village. A Dharmashala (pilgrim rest house) has also been constructed here for devotees.
Useful Information
2 km from Akluj Bus Stand
ST (State Transport) bus facility available to Akluj from many towns in Solapur district
Private vehicles can reach the temple
Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
Contact: Temple Office, Mobile: 9637948341
अकलाई देवी मंदिर
अकलूज, तहसील माळशिरस, जिला सोलापूर
अकलूज शहर की ग्रामदेवता अकलाई देवी का मंदिर जिले में प्रसिद्ध है। ऐसा कहा जाता है कि इस देवी के स्थान के कारण ही शहर का नाम अकलूज पड़ा। ऐतिहासिक दृष्टि से महत्वपूर्ण इस शहर में नीरा नदी के तट पर यह मंदिर स्थित है। यह जागृत देवी भक्तों की मनोकामनाएं पूर्ण करती हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसलिए संतान प्राप्ति के लिए इस देवी का नवस (मन्नत) करने और नवजात शिशु को देवी के चरणों में रखकर उनका आशीर्वाद लेने की यहाँ प्रथा है।
ऐतिहासिक दस्तावेजों में ई.स. 1211 में यादव वंशीय राजा सिंघण द्वारा अकलूज शहर और यहाँ के किले की स्थापना का उल्लेख मिलता है। उसके बाद इस क्षेत्र पर बहमनी, आदिलशाह, मुगल बादशाह और फिर मराठों ने शासन किया। ऐसा कहा जाता है कि ई.स. 1679 में दिलेरखान और संभाजी महाराज अकलूज में चार महीने तक रहे थे। 14 दिसंबर 1688 से 15 फरवरी 1689 के दौरान औरंगजेब भी इस क्षेत्र में ठहरा था। उस समय संभाजी महाराज को संगमेश्वर में पकड़े जाने की खबर मिलते ही औरंगजेब ने खुशी मनाने के लिए तुरंत अकलूज का नाम अदसपुर कर दिया था। अंग्रेजों द्वारा पेशवाई समाप्त करने के बाद दूसरे बाजीराव पेशवे और बाद में ब्रिटिश गवर्नर लॉर्ड डलहौजी ने भी इस स्थान पर कुछ समय तक डेरा डाला था, इसका भी संदर्भ मिलता है।
अकलाई को पार्वती देवी का उग्र रूप माना जाता है। इस मंदिर की किंवदंती यह है कि अंकलेश्वर नामक राक्षस इस क्षेत्र के ऋषि-मुनियों को परेशान कर रहा था। तब उन्होंने पार्वती की आराधना कर उनसे अपनी व्यथा कही। उस समय पार्वती ने इस असुर का वध किया और यहीं विराजमान हो गईं। एक लोककथा के अनुसार, पार्वती ने एक बार शंकर के साथ श्मशान जाने की जिद की। सभी देवताओं ने उन्हें इससे रोकने का प्रयास किया। परंतु पार्वती ने उनकी बात नहीं मानी। अंततः वह शंकर के पीछे-पीछे इस क्षेत्र में आ गईं। इस समय शंकर ने उनकी रक्षा के लिए अपना वाहन नंदी उनके साथ भेजा। इसलिए इस मंदिर के बाहर नंदी की मूर्ति है। देवी मंदिर में नंदी का होना दुर्लभ माना जाता है।
अकलूज शहर के मध्य भाग में स्थित यह अकलाई देवी का मंदिर हजार से बारह सौ वर्ष पुराना बताया जाता है। पेशवा काल में और उसके बाद भी हुए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। पार्किंग स्थल से मंदिर तक के बड़े क्षेत्र में अनेक उपहारगृह (रेस्तरां) और पूजा सामग्री की दुकानें हैं। मंदिर के चारों ओर की चारदीवारी में मंदिर का स्वागत द्वार है। इस द्वार में एक मुख्य और दो उप-द्वार ऐसे कुल तीन दरवाजे हैं। चार सीढ़ियाँ चढ़कर इस द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर का प्रांगण विशाल है और यहाँ एक सुंदर उद्यान विकसित किया गया है। इस उद्यान से मंदिर की ओर आने वाले मार्ग पर भक्तों की सुविधा के लिए शेड लगाया गया है। मंदिर के बाईं ओर एक विशाल दीपमाला है।
मंदिर के सामने एक ऊँचे चबूतरे पर अखंड पाषाण से निर्मित नंदी की मूर्ति है। मुखमंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह – ऐसी इस मंदिर की संरचना है। प्रांगण से सात सीढ़ियाँ चढ़कर मुखमंडप में प्रवेश होता है। मुखमंडप के चार स्तंभों पर छत है। उनमें से दो स्तंभ सामने हैं जबकि शेष स्तंभ सभामंडप की दीवारों में हैं। मुखमंडप में भक्तों के बैठने के लिए बेंचों की व्यवस्था है। बंद सभामंडप में हवा और प्रकाश आने के लिए जालीदार दीवारों की संरचना है। भक्तों की भीड़ के प्रबंधन के लिए सभामंडप से दर्शन पंक्ति की व्यवस्था है। सभामंडप की सभी दीवारों में बेंचें हैं। सभामंडप के आगे अंतराळ और गर्भगृह है। गर्भगृह का आकार अष्टकोणीय है। उसमें प्रकाश और हवा आने के लिए वातायन (खिड़कियाँ) हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित लकड़ी के मखर (सिंहासन) में अकलाई देवी की मूर्ति है। देवी के मस्तक पर मुकुट, नाक में मोतियों की नथ, और शरीर पर विभिन्न आभूषण व वस्त्र हैं। इस मंदिर के सभामंडप, अंतराळ और गर्भगृह पर प्रत्येक एक-एक ऐसे तीन शिखर हैं। गर्भगृह के मुख्य शिखर पर अनेक छोटे-छोटे शिखरों की प्रतिकृतियाँ हैं। इस मंदिर पर कुल सत्ताईस छोटे-बड़े शिखरों की प्रतिकृतियाँ हैं। सत्ताईस कलश (शिखर) सत्ताईस नक्षत्रों के प्रतीक माने जाते हैं।
इस मंदिर में नवरात्रि उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। शाकंभरी पूर्णिमा को भी 65 सब्जियों का नैवेद्य अर्पित कर इस वनदेवी का उत्सव मनाया जाता है। इस दिन अर्पित की गई फल-सब्जियों से यहाँ का गर्भगृह और सभामंडप अनोखे ढंग से सजाया जाता है। त्रिपुरारी पूर्णिमा को मंदिर परिसर दीपों से जगमगा उठता है। कोजागिरी पूर्णिमा से तीन दिन पहले देवी के निद्रा में जाने और पूर्णिमा को दूध का नैवेद्य अर्पित कर देवी को जगाने की प्रथा भी यहाँ निभाई जाती है। आषाढ़ी पूर्णिमा के बाद आने वाले मंगलवार या शुक्रवार को अकलाई देवी की यात्रा (मेला) होती है। यात्रा के दिन शाम को होने वाले दीप प्रज्वलन उत्सव में सैकड़ों भक्त उपस्थित होते हैं। दूसरे दिन पूरे गाँव में देवी का छबिना (शोभायात्रा) निकाला जाता है। यहाँ भक्तों के लिए धर्मशाला भी बनाई गई है।
उपयोगी जानकारी
अकलूज बस स्टैंड से 2 किमी की दूरी पर
सोलापूर जिले के कई शहरों से अकलूज के लिए एसटी (राज्य परिवहन) की सुविधा