आई तुळजाभवानी मंदिर
अनिकट, ता. अकोला, जि. अकोला
साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रात परिचित आहे. तुळजापूरची भवानी ही साक्षात् छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी होती. शिवाजी महाराज अनेकदा कार्यारंभी या देवीचा कौल घेत असल्याच्या नोंदी ऐतिहासिक बखरींमध्ये आहेत. भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती, ही आख्यायिका महाराष्ट्रात सुपरिचित आहे. अशा या देवीची महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची मंदिरे राज्यात विविध ठिकाणी आहेत. यापैकी अनिकट येथील तुळजाभवानी मंदिर हे अकोल्यातील प्रतितुळजापूर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी तुळजाभवानी स्वयंभू आसरांसह विराजमान आहे.
‘भव’ या शब्दाचे महादेव, मदन व संसार असे अर्थ आहेत. त्या सर्वांना चैतन्य देणारी देवी ती भवानी, असे स्पष्टीकरण अठराव्या शतकात होऊन गेलेले तंत्रशास्त्रातील थोर विद्वान व भाष्यकार भास्करराय यांनी दिले आहे. भव म्हणजे शंकराची पत्नी ती भवानी अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, तंत्रशास्त्रातील अनेक सिद्धांत शिव-पार्वती संवादरूपानेच आले आहेत, म्हणजेच अनेक रूपे धारण करून विविध कार्ये करणारी शिवशक्ती हीच देवी किंवा भवानी आहे. संस्कृतातील सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, देवी भागवत, भवानी भुजंगम स्तोत्र इ. ग्रंथांत शक्तिरूपिणी देवीची म्हणजे भवानीची अनेक कार्ये वर्णिली आहेत. ती पंजाबमधील थानेसर (ठाणेश्वर) येथील शक्तिपिठाची अधिष्ठात्री देवता आहे, तर महाराष्ट्रातील उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळाजापूर हे भवानीचे शक्तिपीठ म्हणून ख्यातकीर्त आहे.
‘तुळजा माहात्म्या’त देवीविषयी अशी पौराणिक आख्यायिका सांगितली आहे की कृतयुगात कर्दम नामक एक विप्र राहात असत. त्यांच्या मृत्यूच्या समयी त्यांची अनुभूती नामक पत्नी गरोदर होती. त्यामुळे ती पतीसमवेत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूत झाल्यानंतर तिने मंदाकिनी नदीतीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तेथे शिकारीच्या निमित्ताने आलेल्या कुक्कुट नामक दैत्याने तिला पाहिले. तिचे तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहीत झाला. त्याने तिच्या देहाला स्पर्श केला.
तेव्हा अनुभूतीने मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात् पार्वती तेथे भवानी स्वरूपात प्रकट झाली व तिने कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेस त्वरित धावून आली म्हणून या देवीस तुरजा वा त्वरिता असे संबोधले जाऊ लागले. या आख्यायिकेस जोडून अशी कथा आहे, की कुक्कुट दैत्याने मरता मरता महिषासुराचे रूप घेतले होते. देवीने त्याचा वध केला. त्यामुळे देवी तुळजापूर येथे महिषासूरमर्दिनीच्या स्वरूपात विराजमान आहे.
देवीचे येथील मंदिर पूर्वी छोटेखानी स्वरूपाचे होते. १९९९ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मोर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत व त्या भिंतीत देवीचे वाहन सिंहाचा मुखवटा असलेले आकर्षक प्रवेशद्वार आहे. १८ फूट उंच व १३ फूट रुंद असलेले हे प्रवेशद्वार लोखंडी गज व सिमेंट काँक्रिटचा वापर करून उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातील उद्यानात कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय गणेश व कार्तिकेयासह शिव-पार्वतीची शिल्पे आहेत.
मूळ मंदिरासमोर असलेल्या खुल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सिंहशिल्पे आहेत. सभामंडपासमोरील एका चौथऱ्यावर कालभैरवाचे स्थान व येथून काही पावलांवरच देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या सभामंडपावर पत्र्याचे छप्पर आहे. येथील सभामंडपात मध्यभागी होमकुंड व बाजूने भाविकांसाठी आसने आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभशाखांवर नक्षीकाम आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर तुळजाभवानी मातेची सुंदर मूर्ती विराजमान आहे. या वस्त्रालंकारित देवीच्या शिरावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहातील देवकोष्टकांत गणपतीची मूर्ती, गजानन महाराजांची मूर्ती व तुळजाभवानीची प्रतिमा आहेत.
या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूने जमिनीखाली असणाऱ्या आसरा मातेच्या स्थानाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सहा ते सात पायऱ्या उतरून मूळ गर्भगृहाच्या खाली जमिनीत असणाऱ्या आसरा मातेच्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात स्वयंभू आसरा मातेचे स्थान आहे. येथील एका स्वयंभू शेंदूरचर्चित पाषाणावर देवीच्या सात प्रतिमा रंगविलेल्या आहेत. हा पाषाण आसरा माता म्हणून पुजला जातो. या पाषाणाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात देवीची मूर्ती आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. येथे चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवानिमित्त गोंधळ, हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील असंख्य भाविक या उत्सवांच्या प्रसंगी देवीच्या दर्शनासाठी येतात. दररोज सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे देवदर्शन करता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोला येथून २ किमी अंतरावर
- अकोला येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : शंकरराव गेडाम, अध्यक्ष, मो. ९९७५८९७५५७
Aai Tulja Bhavani Temple
Anikat, Taluka Akola, District Akola
The Tulja Bhavani Temple of Tuljapur, one of the three and a half Shakti Peethas, is well-known in Maharashtra. Tuljapur’s Bhavani was the Kulswamini (family deity) of Chhatrapati Shivaji Maharaj himself. Historical chronicles record that Maharaj often sought the Goddess’s counsel (Kaul) before embarking on any mission. The legend that the Bhavani sword was gifted to him by Tulja Bhavani herself is widely known across Maharashtra. Temples dedicated to this Kulswamini of Maharashtra are found in various places across the state. Among these, the Tulja Bhavani Temple at Anikat is famous as the Prati-Tuljapur (replica of Tuljapur) of Akola. Here, Goddess Tulja Bhavani resides along with the Swayambhu (self-manifested) Asara Mata.
The word ‘Bhava’ has meanings such as Mahadeva, Madan, and the world. The great scholar and commentator of Tantra Shastra from the eighteenth century, Bhaskararaya, explained that Bhavani is the Goddess who gives consciousness to all these. Another etymology suggests that Bhavani means the wife of Shiva (Bhava). According to the Marathi Vishwakosh, many principles of Tantra Shastra have emerged through the dialogue between Shiva and Parvati, meaning that the Devi or Bhavani is the Shiva-Shakti who assumes various forms to perform diverse functions. The various roles of the Shakti-form Goddess, Bhavani, are described in texts such as the Saundarya Lahari, Lalita Sahasranama, Devi Bhagavata, and Bhavani Bhujangam Stotram. While she is the presiding deity of the Shakti Peetha at Thanesar (Thaneshwar) in Punjab, Tuljapur in the Osmanabad (Dharashiv) district of Maharashtra is renowned as a Shakti Peetha of Bhavani.
In the ‘Tulja Mahatmya’, a mythological legend about the Goddess is narrated: In the Krita Yuga, a Brahmin named Kardam lived. At the time of his death, his wife, Anubhuti, was pregnant, and thus she could not perform Sahagamana (sati) with her husband. After giving birth some days later, she began penance on the banks of the Mandakini River. Once, a demon named Kukkut, who had come there for hunting, saw her. Mesmerized by her radiant form, he touched her.
Anubhuti then prayed to Mother Parvati in her heart. Hearing her call, Parvati herself appeared in the form of Bhavani and slew the demon Kukkut. Because she rushed immediately to the call of her devotee, the Goddess came to be known as Turja or Twarita (the swift one). Linked to this legend is the story that as the demon Kukkut was dying, he assumed the form of Mahishasura. The Goddess slew him, and thus, the Goddess resides in Tuljapur in the form of Mahishasuramardini.
The temple of the Goddess here was originally small. In 1999, after the villagers renovated the temple, it attained its current form. Situated on the banks of the Morna River, the temple premises are peaceful and serene. The temple is surrounded by a boundary wall on all four sides, and the entrance gate features an attractive mask of a lion, the Goddess’s vehicle. This entrance, 18 feet high and 13 feet wide, was constructed using iron bars and cement concrete. One enters the temple courtyard through this gate. In the garden within the courtyard, there is a beautiful idol of Shri Krishna performing Kaliya Mardana. Additionally, there are sculptures of Shiva-Parvati along with Ganesha and Kartikeya.
On both sides of the entrance to the open Sabha Mandap (assembly hall) in front of the main temple, there are lion sculptures. On a platform in front of the Sabha Mandap is the seat of Kalbhairava, and just a few steps away is the sculpture of the lion, the vehicle of the Goddess. For the convenience of devotees, this Sabha Mandap has a metal roof. In the center of the Sabha Mandap is a Homa Kunda (sacrificial fire pit), and there are seats for devotees along the sides. Beyond the Sabha Mandap, leaving space for the circumambulation path (Pradakshina Marg), is the Garbhagriha (sanctum sanctorum). The pillars at the entrance of the Garbhagriha are intricately carved. A beautiful idol of Mother Tulja Bhavani is seated on a Vajrapitha inside the Garbhagriha. This adorned Goddess wears a silver crown on her head. In the niches of the Garbhagriha, there are idols of Ganpati, Gajanan Maharaj, and an image of Tulja Bhavani.
On both sides of this Garbhagriha, there are stairs leading down to the underground seat of Asara Mata. Descending six to seven steps, one enters the Garbhagriha of Asara Mata located beneath the main sanctum. In this chamber is the Swayambhu seat of Asara Mata. On a Swayambhu vermilion-smeared stone here, seven images of the Goddess are painted. This stone is worshipped as Asara Mata. In a niche on the wall behind this stone, there is an idol of the Goddess.
Daily worship is performed in this temple. Chaitri and Sharadiya Navratri festivals are celebrated here with great enthusiasm. Various religious programs such as Gondhal and Havan are organized on the occasion of these festivals. Countless devotees from the surrounding areas come to seek the blessings of the Goddess during these festivals. Devotees can visit the temple daily from 6:00 in the morning to 8:00 in the evening.
Useful Information:
- 2 km from Akola
- ST bus and private vehicle facilities available from Akola
- Private vehicles can reach the temple parking area
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
- Contact: Shankarrao Gedam, President, Mob. 9975897557
आई तुलजाभवानी मंदिर
अनिकट, ता. अकोला, जि. अकोला
साढ़े तीन शक्तिपीठों में से एक तुलजापुर का तुलजाभवानी मंदिर महाराष्ट्र में प्रसिद्ध है। तुलजापुर की भवानी साक्षात छत्रपति शिवाजी महाराज की कुलस्वामिनी थीं। ऐतिहासिक बखरों (वृत्तांतों) में उल्लेख है कि शिवाजी महाराज अक्सर किसी भी कार्य के आरंभ में देवी से ‘कौल’ (आशीर्वाद/अनुमति) लेते थे। यह किंवदंती महाराष्ट्र में अत्यंत प्रसिद्ध है कि भवानी तलवार उन्हें साक्षात तुलजाभवानी ने ही प्रदान की थी। ऐसी इस महाराष्ट्र की कुलस्वामिनी के मंदिर राज्य में विभिन्न स्थानों पर स्थित हैं। इनमें से अनिकट स्थित तुलजाभवानी मंदिर अकोला के ‘प्रति-तुलजापुर’ के रूप में प्रसिद्ध है। यहाँ देवी तुलजाभवानी स्वयंभू आसरा माताओं के साथ विराजमान हैं।
‘भव’ शब्द के महादेव, मदन और संसार जैसे अर्थ हैं। अठारहवीं शताब्दी के तंत्रशास्त्र के महान विद्वान और भाष्यकार भास्करराय ने स्पष्ट किया है कि जो उन सबको चैतन्य प्रदान करती हैं, वे देवी भवानी हैं। ‘भव’ यानी शंकर की पत्नी, वे भवानी हैं, ऐसी भी इस नाम की व्युत्पत्ति बताई जाती है। मराठी विश्वकोश के अनुसार, तंत्रशास्त्र के अनेक सिद्धांत शिव-पार्वती संवाद के रूप में आए हैं, अर्थात अनेक रूप धारण कर विविध कार्य करने वाली शिवशक्ति ही देवी या भवानी हैं। संस्कृत के सौंदर्य लहरी, ललिता सहस्रनाम, देवी भागवत, भवानी भुजंगम स्तोत्र आदि ग्रंथों में शक्तिरूपिणी देवी यानी भवानी के अनेक कार्यों का वर्णन है। वे पंजाब के थानेसर (ठाणेश्वर) स्थित शक्तिपीठ की अधिष्ठात्री देवता हैं, तो महाराष्ट्र के उस्मानाबाद (धाराशिव) जिले का तुलजापुर भवानी के शक्तिपीठ के रूप में विख्यात है।
‘तुलजा महात्म्य’ में देवी के विषय में यह पौराणिक कथा बताई गई है कि कृतयुग में कर्दम नामक एक विप्र रहते थे। उनकी मृत्यु के समय उनकी पत्नी अनुभूती गर्भवती थीं, इसलिए वे अपने पति के साथ सती नहीं हो सकीं। कुछ दिनों बाद प्रसव के पश्चात उन्होंने मंदाकिनी नदी के तट पर तपस्या शुरू की। एक बार वहाँ शिकार के निमित्त आए कुक्कुट नामक दैत्य ने उन्हें देखा। उनका तेजस्वी रूप देखकर वह उन पर मोहित हो गया और उसने उनके शरीर को स्पर्श किया।
तब अनुभूती ने मन ही मन पार्वती माता का आह्वान किया। उनकी पुकार सुनकर साक्षात पार्वती वहाँ भवानी के रूप में प्रकट हुईं और उन्होंने कुक्कुट दैत्य का वध किया। भक्त की पुकार पर तुरंत दौड़कर आने के कारण इस देवी को ‘तुरजा’ या ‘त्वरिता’ कहा जाने लगा। इस कथा के साथ यह भी जुड़ा है कि मरते समय कुक्कुट दैत्य ने महिषासुर का रूप धारण कर लिया था। देवी ने उसका वध किया, इसीलिए देवी तुलजापुर में महिषासुरमर्दिनी के रूप में विराजमान हैं।
देवी का यहाँ का मंदिर पहले छोटे स्वरूप में था। १९९९ में ग्रामीणों द्वारा इस मंदिर का जीर्णोद्धार करने के बाद इसे वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ। मोर्णा नदी के तट पर बसा इस मंदिर का परिसर शांत और प्रसन्न है। मंदिर के चारों ओर चारदीवारी है और उस दीवार में देवी के वाहन सिंह का मुखौटा लगा हुआ आकर्षक प्रवेश द्वार है। १८ फुट ऊँचा और १३ फुट चौड़ा यह प्रवेश द्वार लोहे की छड़ों और सीमेंट कंक्रीट का उपयोग करके बनाया गया है। इस प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण के उद्यान में कालियामर्दन करते हुए श्रीकृष्ण की सुंदर मूर्ति है। इसके अलावा गणेश और कार्तिकेय के साथ शिव-पार्वती की प्रतिमाएँ हैं।
मूल मंदिर के सामने स्थित खुले सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर सिंह की प्रतिमाएँ हैं। सभामंडप के सामने एक चबूतरे पर कालभैरव का स्थान है और यहाँ से कुछ ही कदमों पर देवी का वाहन सिंह की प्रतिमा है। भक्तों की सुविधा के लिए इस सभामंडप पर टीन की छत है। यहाँ सभामंडप में मध्य में होमकुंड और बगल में भक्तों के बैठने के लिए स्थान है। सभामंडप के आगे प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह है। गर्भगृह के प्रवेश द्वार के स्तंभों पर नक्काशी है। गर्भगृह के वज्रपीठ पर तुलजाभवानी माता की सुंदर मूर्ति विराजमान है। वस्त्र और आभूषणों से सुसज्जित देवी के सिर पर चाँदी का मुकुट है। गर्भगृह के देवकोष्ठकों में गणपति की मूर्ति, गजानन महाराज की मूर्ति और तुलजाभवानी की प्रतिमा है।
इस गर्भगृह के दोनों ओर जमीन के नीचे स्थित आसरा माता के स्थान तक जाने के लिए सीढ़ियाँ हैं। छह से सात सीढ़ियाँ उतरकर मूल गर्भगृह के नीचे जमीन में स्थित आसरा माता के गर्भगृह में प्रवेश होता है। इस गर्भगृह में स्वयंभू आसरा माता का स्थान है। यहाँ एक स्वयंभू सिंदूर-लेपित पत्थर पर देवी की सात प्रतिमाएँ अंकित हैं। इस पत्थर को आसरा माता के रूप में पूजा जाता है। इस पत्थर के पीछे की दीवार के देवकोष्ठक में देवी की मूर्ति है।
इस मंदिर में नित्य नियम से पूजा-अर्चना की जाती है। यहाँ चैत्री और शारदीय नवरात्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं। इन उत्सवों के अवसर पर गोंधल, हवन आदि विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। परिसर के असंख्य भक्त इन उत्सवों के अवसर पर देवी के दर्शन के लिए आते हैं। प्रतिदिन सुबह छह बजे से रात आठ बजे तक भक्त यहाँ दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- अकोला से २ किमी की दूरी पर
- अकोला से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क : शंकरराव गेडाम, अध्यक्ष, मो. ९९७५८९७५५७
આઈ તુળજાભવાની મંદિર
અનિકટ, તા. અકોલા, જિ. અકોલા
સાડા ત્રણ શક્તિપીઠોમાંની એક એવી તુળજાપુરની તુળજાભવાની માતાનું મંદિર મહારાષ્ટ્રમાં સુવિદિત છે. તુળજાપુરની ભવાની માતા સાક્ષાત્ છત્રપતિ શિવાજી મહારાજની કુળસ્વામિની હતી. શિવાજી મહારાજ અનેકવાર કાર્યના આરંભે આ દેવીનો કૌલ (આશીર્વાદ/સંમતિ) લેતા હોવાની નોંધ ઐતિહાસિક બખરોમાં મળે છે. ભવાની તલવાર તેમને સાક્ષાત્ તુળજાભવાનીએ જ આપી હતી, તે આખ્યાયિકા મહારાષ્ટ્રમાં ખૂબ જાણીતી છે. આવી આ દેવીની, મહારાષ્ટ્રની કુળસ્વામિનીનાં મંદિરો રાજ્યમાં વિવિધ સ્થળોએ આવેલાં છે. આ પૈકી અનિકટ ખાતેનું તુળજાભવાની મંદિર અકોલાના પ્રતિ-તુળજાપુર તરીકે પ્રસિદ્ધ છે. અહીં દેવી તુળજાભવાની સ્વયંભૂ આસરાઓ સાથે બિરાજમાન છે.
‘ભવ’ શબ્દના મહાદેવ, મદન અને સંસાર એવા અર્થો છે. તે સૌને ચૈતન્ય આપનારી દેવી તે ભવાની, તેવું સ્પષ્ટીકરણ અઢારમી સદીમાં થઈ ગયેલા તંત્રશાસ્ત્રના મહાન વિદ્વાન અને ભાષ્યકાર ભાસ્કરરાયે આપ્યું છે. ભવ એટલે શંકરની પત્ની તે ભવાની, એવી પણ આ નામની વ્યુત્પત્તિ જણાવવામાં આવે છે. મરાઠી વિશ્વકોશની નોંધ અનુસાર, તંત્રશાસ્ત્રના અનેક સિદ્ધાંતો શિવ-પાર્વતી સંવાદરૂપે જ આવ્યા છે, એટલે કે અનેક રૂપો ધારણ કરીને વિવિધ કાર્યો કરનારી શિવશક્તિ જ દેવી અથવા ભવાની છે. સંસ્કૃતના સૌંદર્ય લહરી, લલિતા સહસ્રનામ, દેવી ભાગવત, ભવાની ભુજંગમ સ્તોત્ર વગેરે ગ્રંથોમાં શક્તિરૂપિણી દેવી એટલે કે ભવાનીનાં અનેક કાર્યો વર્ણવવામાં આવ્યાં છે. તે પંજાબના થાનેસર (ઠાણેશ્વર) ખાતેના શક્તિપીઠની અધિષ્ઠાત્રી દેવતા છે, જ્યારે મહારાષ્ટ્રના ઉસ્માનાબાદ (ધારાશિવ) જિલ્લાનું તુળજાપુર ભવાનીના શક્તિપીઠ તરીકે વિખ્યાત છે.
‘તુળજા માહાત્મ્ય’માં દેવી વિશે એવી પૌરાણિક આખ્યાયિકા કહેવામાં આવી છે કે કૃતયુગમાં કર્દમ નામના એક વિપ્ર રહેતા હતા. તેમના મૃત્યુ સમયે તેમની અનુભૂતિ નામની પત્ની ગર્ભવતી હતી. તેથી તે પતિ સાથે સતી થઈ શકી નહીં. થોડા દિવસો પછી પ્રસૂતિ થયા બાદ તેણે મંદાકિની નદીના તીરે તપસ્યા શરૂ કરી. એકવાર ત્યાં શિકારના નિમિત્તે આવેલા કુકુટ નામના દૈત્યે તેને જોઈ. તેનું તેજસ્વી રૂપ જોઈને તે તેના પર મોહિત થયો. તેણે તેના દેહને સ્પર્શ કર્યો.
ત્યારે અનુભૂતિએ મનોમન પાર્વતી માતાનું સ્મરણ કર્યું. તેની હાક સાંભળીને સાક્ષાત્ પાર્વતી ત્યાં ભવાની સ્વરૂપે પ્રગટ થયા અને તેમણે કુકુટ દૈત્યનો વધ કર્યો. ભક્તની હાક સાંભળીને ત્વરિત દોડી આવ્યાં, તેથી આ દેવીને તુરજા અથવા ત્વરિતા તરીકે સંબોધવામાં આવવા લાગ્યા. આ આખ્યાયિકા સાથે એવી કથા જોડાયેલી છે કે કુકુટ દૈત્યે મરતી વખતે મહિષાસુરનું રૂપ લીધું હતું. દેવીએ તેનો વધ કર્યો. તેથી દેવી તુળજાપુર ખાતે મહિષાસુરમર્દિનીના સ્વરૂપે બિરાજમાન છે.
દેવીનું અહીંનું મંદિર અગાઉ નાના સ્વરૂપનું હતું. ૧૯૯૯માં ગ્રામજનોએ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કર્યા બાદ તેને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું. મોર્ણા નદીના કાંઠે વસેલા આ મંદિરનો પરિસર શાંત અને પ્રસન્ન છે. મંદિરને ચારે બાજુથી આવારદીવાલ અને તે દીવાલમાં દેવીના વાહન સિંહનું મુખવટું ધરાવતું આકર્ષક પ્રવેશદ્વાર છે. ૧૮ ફૂટ ઊંચું અને ૧૩ ફૂટ પહોળું આ પ્રવેશદ્વાર લોખંડના સળિયા અને સિમેન્ટ કોંક્રીટનો ઉપયોગ કરીને બનાવવામાં આવ્યું છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણના બગીચામાં કાલિયમર્દન કરતા શ્રીકૃષ્ણની સુંદર મૂર્તિ છે. આ ઉપરાંત ગણેશ અને કાર્તિકેય સાથે શિવ-પાર્વતીની શિલ્પકૃતિઓ છે.
મૂળ મંદિરની સામે આવેલા ખુલ્લા સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ સિંહશિલ્પો છે. સભામંડપની સામે એક ચોતરા પર કાલભૈરવનું સ્થાન અને અહીંથી થોડા ડગલાં દૂર દેવીના વાહન સિંહનું શિલ્પ છે. ભક્તોની સુવિધા માટે આ સભામંડપ પર પતરાનું છાપરું છે. અહીંના સભામંડપમાં મધ્યમાં હોમકુંડ અને બાજુમાં ભક્તો માટે બેઠકો છે. સભામંડપની આગળના ભાગમાં પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પરના સ્તંભો પર નકશીકામ છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર તુળજાભવાની માતાની સુંદર મૂર્તિ બિરાજમાન છે. આ વસ્ત્રાલંકારિત દેવીના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે. ગર્ભગૃહના દેવકોષ્ઠમાં ગણપતિની મૂર્તિ, ગજાનન મહારાજની મૂર્તિ અને તુળજાભવાનીની પ્રતિમા છે.
આ ગર્ભગૃહની બંને બાજુએ જમીનની નીચે રહેલા આસરા માતાના સ્થાન તરફ જવા માટે પગથિયાં છે. છ થી સાત પગથિયાં ઉતરીને મૂળ ગર્ભગૃહની નીચે જમીનમાં રહેલા આસરા માતાના ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. આ ગર્ભગૃહમાં સ્વયંભૂ આસરા માતાનું સ્થાન છે. અહીં એક સ્વયંભૂ સિંદૂરચર્ચિત પાષાણ પર દેવીની સાત પ્રતિમાઓ આલેખાયેલી છે. આ પાષાણ આસરા માતા તરીકે પૂજાય છે. આ પાષાણની પાછળની દીવાલના દેવકોષ્ઠમાં દેવીની મૂર્તિ છે.
આ મંદિરમાં નિત્યક્રમ મુજબ પૂજા-અર્ચના કરવામાં આવે છે. અહીં ચૈત્રી તેમજ શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવ નિમિત્તે ગોંધળ, હવન વગેરે વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આસપાસના અસંખ્ય ભક્તો આ ઉત્સવના પ્રસંગે દેવીના દર્શન માટે આવે છે. દરરોજ સવારે છ વાગ્યાથી રાત્રે આઠ વાગ્યા સુધી ભક્તો અહીં દેવદર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- અકોલાથી ૨ કિમી અંતરે
- અકોલાથી એસટી અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક: શંકરરાવ ગેટામ, અધ્યક્ષ, મો. ૯૯૭૫૮૯૭૫૫૭
ஆய் துளஜாபவானி கோயில்
அனிகட், தாலுகா அகோலா, மாவட்டம் அகோலா
மூன்றரை சக்திபீடங்களில் ஒன்றான துளஜாபுரத்தின் துளஜாபவானி கோயில் மகாராஷ்டிராவில் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. துளஜாபுரத்தின் பவானி மாதா, சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் குலதெய்வம் ஆவார். சிவாஜி மகாராஜா எந்தவொரு காரியத்தைத் தொடங்குவதற்கு முன்பும் இந்த தேவியிடம் ‘கவுல்’ (அனுமதி/வாக்கு) பெறுவார் என்று வரலாற்று ஆவணங்கள் கூறுகின்றன. பவானி வாளை அவருக்கு நேரில் துளஜாபவானியே வழங்கினார் என்ற ஐதீகம் மகாராஷ்டிராவில் மிகவும் புகழ்பெற்றது. இத்தகைய மகாராஷ்டிராவின் குலதெய்வமான தேவியின் கோயில்கள் மாநிலத்தின் பல்வேறு இடங்களில் உள்ளன. இதில் அனிகட்டில் உள்ள துளஜாபவானி கோயில், அகோலாவின் ‘பிரதி துளஜாபுரம்’ (மறுவடிவ துளஜாபுரம்) என்று அழைக்கப்படுகிறது. இங்கு தேவி துளஜாபவானி, சுயம்புவான ஆசராக்களுடன் வீற்றிருக்கிறார்.
‘பவ’ என்ற சொல்லுக்கு மகாதேவர், மதன் மற்றும் சம்சார (உலகம்) என்று பொருள்கள் உண்டு. அவர்கள் அனைவருக்கும் உயிர்ச்சக்தியை அளிப்பவள் பவானி என்று, பதினெட்டாம் நூற்றாண்டில் வாழ்ந்த தந்திர சாஸ்திரத்தின் சிறந்த அறிஞரும் பாஷ்யகாரருமான பாஸ்கர் ராய் விளக்கியுள்ளார். பவன் என்றால் சங்கரர், அவரது மனைவி பவானி என்றும் இந்த பெயருக்குப் பிறப்பியல் கூறப்படுகிறது. மராத்தி விஸ்வகோஷத்தின்படி, தந்திர சாஸ்திரத்தின் பல கோட்பாடுகள் சிவ-பார்வதி உரையாடல்களாகவே வந்துள்ளன, அதாவது பல வடிவங்களை எடுத்து பல்வேறு பணிகளைச் செய்யும் சிவ சக்தியே தேவி அல்லது பவானி ஆவார். சமஸ்கிருதத்தில் உள்ள சௌந்தர்ய லஹரி, லலிதா சகஸ்ரநாமம், தேவி பாகவதம், பவானி புஜங்கம் ஸ்தோத்திரம் போன்ற நூல்களில் சக்தி ரூபிணியான தேவியின், அதாவது பவானியின் பல பணிகள் விவரிக்கப்பட்டுள்ளன. அவர் பஞ்சாபில் உள்ள தானேசர் (தாணேஸ்வரம்) சக்திபீடத்தின் அதிதேவதை ஆவார், அதே சமயம் மகாராஷ்டிராவின் உஸ்மானாபாத் (தாராசிவ) மாவட்டத்தில் உள்ள துளஜாபுரம் பவானியின் சக்திபீடமாகப் போற்றப்படுகிறது.
‘துளஜா மகாத்மியத்தில்’ தேவியைப் பற்றிய புராணக் கதை ஒன்று சொல்லப்பட்டுள்ளது. கிருதயுகத்தில் கர்தமர் என்ற அந்தணர் வாழ்ந்து வந்தார். அவர் இறக்கும் போது, அவரது மனைவி அனுபூதி கர்ப்பிணியாக இருந்தார். அதனால் அவர் கணவருடன் உடன்கட்டை ஏற முடியவில்லை. சில நாட்களுக்குப் பிறகு பிரசவித்த அவர், மந்தாகினி நதிக்கரையில் தவம் செய்யத் தொடங்கினார். ஒருமுறை வேட்டையாட வந்த குக்குடன் என்ற அரக்கன் அவளைப் பார்த்தான். அவளது தேஜஸ் நிறைந்த வடிவத்தைக் கண்டு அவன் அவள் மீது மோகம் கொண்டான். அவன் அவளது உடலைத் தீண்டினான்.
அப்போது அனுபூதி மனதார பார்வதி மாதாவை வேண்டினாள். அவளது அழைப்பைக் கேட்டு, பார்வதி தேவி நேரில் பவானி வடிவில் தோன்றி குக்குடன் அரக்கனைக் கொன்றார். பக்தனின் அழைப்பிற்கு விரைந்து வந்ததால், இந்த தேவி ‘துர்ஜா’ அல்லது ‘த்வரிதா’ என்று அழைக்கப்படலானார். இந்த கதையுடன் தொடர்புடைய மற்றொரு செய்தி என்னவென்றால், குக்குடன் அரக்கன் இறக்கும் தருவாயில் மகிஷாசுரனின் வடிவத்தை எடுத்தான். தேவி அவனைக் கொன்றார். அதனால் தேவி துளஜாபுரத்தில் மகிஷாசுரமர்த்தினி வடிவில் வீற்றிருக்கிறார்.
இங்குள்ள தேவியின் கோயில் முன்பு சிறியதாக இருந்தது. 1999 இல் கிராம மக்கள் இந்த கோயிலைப் புதுப்பித்த பிறகு, அது தற்போதைய வடிவத்தைப் பெற்றது. மோரணா நதிக்கரையில் அமைந்துள்ள இந்த கோயிலின் சூழல் அமைதியாகவும் மனதிற்கு இதமாகவும் உள்ளது. கோயிலைச் சுற்றி நான்கு பக்கங்களிலும் மதில் சுவர் உள்ளது, அந்தச் சுவரில் தேவியின் வாகனமான சிங்கத்தின் முகமூடி கொண்ட அழகான நுழைவாயில் உள்ளது. 18 அடி உயரமும் 13 அடி அகலமும் கொண்ட இந்த நுழைவாயில் இரும்பு கம்பிகள் மற்றும் சிமெண்ட் கான்கிரீட் பயன்படுத்தி கட்டப்பட்டுள்ளது. இந்த நுழைவாயில் வழியாக கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் உள்ள பூங்காவில் காளியமர்த்தனம் செய்யும் ஸ்ரீகிருஷ்ணரின் அழகான சிலை உள்ளது. இது தவிர கணேசர் மற்றும் கார்த்திகேயருடன் கூடிய சிவ-பார்வதி சிலைகளும் உள்ளன.
மூலக் கோயிலுக்கு முன்னால் உள்ள திறந்தவெளி சபாமண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் சிங்கச் சிலைகள் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள ஒரு மேடையில் காலபைரவரின் சன்னதி உள்ளது, அங்கிருந்து சில அடிகள் தொலைவில் தேவியின் வாகனமான சிங்கத்தின் சிலை உள்ளது. பக்தர்களின் வசதிக்காக இந்த சபாமண்டபத்தின் மீது தகரக் கூரை அமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள சபாமண்டபத்தின் நடுவில் ஹோமகுண்டமும், பக்கவாட்டில் பக்தர்களுக்கான இருக்கைகளும் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு அடுத்தபடியாக பிரதட்சிண பாதை விட்டு கருவறை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலில் உள்ள தூண்களில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் உள்ள வஜ்ரபீடத்தில் துளஜாபவானி மாதாவின் அழகான சிலை வீற்றிருக்கிறது. ஆபரணங்கள் அணிந்த இந்த தேவியின் தலையில் வெள்ளி கிரீடம் உள்ளது. கருவறையில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் கணபதி சிலை, கஜானன் மகாராஜ் சிலை மற்றும் துளஜாபவானியின் படம் உள்ளன.
இந்த கருவறையின் இருபுறமும் நிலத்தடியில் உள்ள ஆசரா மாதா சன்னதிக்குச் செல்ல படிக்கட்டுகள் உள்ளன. ஆறு முதல் ஏழு படிகள் இறங்கிச் சென்றால், மூலக் கருவறைக்குக் கீழே நிலத்தடியில் உள்ள ஆசரா மாதாவின் கருவறைக்குச் செல்லலாம். இந்தக் கருவறையில் சுயம்புவான ஆசரா மாதாவின் சன்னதி உள்ளது. இங்குள்ள ஒரு சுயம்புவான, சந்தனம் பூசப்பட்ட கல்லில் தேவியின் ஏழு உருவங்கள் வரையப்பட்டுள்ளன. இந்தக் கல் ஆசரா மாதாவாக வழிபடப்படுகிறது. இந்தக் கல்லுக்குப் பின்னால் உள்ள சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் தேவியின் சிலை உள்ளது.
இந்தக் கோயிலில் தினசரி பூஜைகள் நடைபெறுகின்றன. இங்கு சைத்ர மற்றும் சாரதீய நவராத்திரி உற்சவங்கள் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த உற்சவத்தை முன்னிட்டு கோந்தல், ஹவனம் போன்ற பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இப்பகுதியைச் சேர்ந்த ஏராளமான பக்தர்கள் இந்த உற்சவங்களின் போது தேவியைத் தரிசிக்க வருகிறார்கள். தினமும் காலை 6 மணி முதல் இரவு 8 மணி வரை பக்தர்கள் இங்கு தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்:
- அகோலாவிலிருந்து 2 கி.மீ தொலைவில்
- அகோலாவிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் தனியார் வாகன வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு: சங்கர்ராவ் கேடம், தலைவர், அலைபேசி: 9975897557
ఐ తుळజాభవాని మందిరం
అనికట్, తా. అకోలా, జి. అకోలా
సాడేతీన్ శక్తిపీఠాలలో ఒకటిగా ఉన్న తుళజాపూర్ యొక్క తుళజాభవాని మందిరం మహారాష్ట్రలో సుపరిచితం. తుళజాపూర్ భవాని సాక్షాత్తు ఛత్రపతి శివాజీ మహారాజుల కులస్వామిని. శివాజీ మహారాజులు అనేకసార్లు కార్యారంభంలో ఈ దేవి యొక్క కౌలు (ఆశీస్సు/అనుమతి) తీసుకునేవారని చారిత్రక బఖరులలో నమోదై ఉంది. భవాని ఖడ్గాన్ని సాక్షాత్తు తుళజాభవానియే వారికి ప్రసాదించిందని, ఈ ఐతిహ్యం మహారాష్ట్రలో ఎంతో ప్రసిద్ధి. అటువంటి ఈ దేవి, మహారాష్ట్ర కులస్వామిని మందిరాలు రాష్ట్రంలో వివిధ చోట్ల ఉన్నాయి. వీటిలో అనికట్ వద్ద ఉన్న తుళజాభవాని మందిరం అకోలాలోని ప్రతి-తుళజాపూర్ అని ప్రసిద్ధి చెందింది. ఇక్కడ దేవి తుళజాభవాని స్వయంభూ ఆసరాలతో విరాజమానమై ఉంది.
‘భవ’ అనే పదానికి మహాదేవుడు, మదనుడు మరియు సంసారం అని అర్థాలు ఉన్నాయి. వారందరికీ చైతన్యాన్ని ఇచ్చే దేవి భవాని అని, పద్దెనిమిదవ శతాబ్దంలో జీవించిన తంత్రశాస్త్రంలోని గొప్ప విద్వాంసుడు మరియు భాష్యకారుడు భాస్కరరాయలు వివరించారు. భవుడంటే శంకరుడు, ఆయన భార్య భవాని అని కూడా ఈ నామానికి వ్యుత్పత్తి చెబుతారు. మరాఠీ విశ్వకోశంలోని నమోదుల ప్రకారం, తంత్రశాస్త్రంలోని అనేక సిద్ధాంతాలు శివ-పార్వతుల సంవాద రూపంలోనే వచ్చాయి, అంటే అనేక రూపాలను ధరించి వివిధ కార్యాలను చేసే శివశక్తే దేవి లేదా భవాని. సంస్కృతంలోని సౌందర్య లహరి, లలితా సహస్రనామం, దేవీ భాగవతం, భవాని భుజంగం స్తోత్రం మొదలైన గ్రంథాలలో శక్తిరూపిణి దేవి అంటే భవాని యొక్క అనేక కార్యాలు వర్ణించబడ్డాయి. ఆమె పంజాబ్లోని థానేసర్ (ఠాణేశ్వర్) లోని శక్తిపీఠానికి అధిష్ఠాతృ దేవత, అయితే మహారాష్ట్రలోని ఉస్మానాబాద్ (ధారాశివ) జిల్లాలోని తుళజాపూర్ భవాని యొక్క శక్తిపీఠంగా ప్రసిద్ధి చెందింది.
‘తుళజా మాహాత్మ్యం’లో దేవి గురించి ఇటువంటి పౌరాణిక ఐతిహ్యం చెప్పబడింది: కృతయుగంలో కర్దముడనే ఒక విప్రుడు నివసించేవాడు. ఆయన మరణ సమయంలో ఆయన భార్య అనుభూతి గర్భవతిగా ఉండేది. అందువల్ల ఆమె పతితో పాటు సహగమనం చేయలేకపోయింది. కొన్ని రోజుల తర్వాత ప్రసవించిన పిదప, ఆమె మందాకినీ నదీ తీరాన తపస్సు ప్రారంభించింది. ఒకసారి అక్కడ వేట కోసం వచ్చిన కుక్కుటుడనే దైత్యుడు ఆమెను చూశాడు. ఆమె తేజోవంతమైన రూపాన్ని చూసి అతను ఆమెపై మోహితుడయ్యాడు. అతను ఆమె దేహాన్ని తాకాడు.
అప్పుడు అనుభూతి మనసులో పార్వతీ మాతను ప్రార్థించింది. ఆమె పిలుపు విని సాక్షాత్తు పార్వతి అక్కడ భవాని స్వరూపంలో ప్రత్యక్షమై కుక్కుట దైత్యాన్ని వధించింది. భక్తుని పిలుపునకు వెంటనే పరుగెత్తుకు వచ్చింది కాబట్టి ఈ దేవిని తురజ లేదా త్వరిత అని పిలవసాగారు. ఈ ఐతిహ్యానికి అనుబంధంగా మరొక కథ ఉంది, కుక్కుట దైత్యుడు చనిపోయేటప్పుడు మహిషాసురుని రూపాన్ని ధరించాడని, దేవి అతనిని వధించిందని చెబుతారు. అందుకే దేవి తుళజాపూర్లో మహిషాసురమర్దిని స్వరూపంలో విరాజమానమై ఉంది.
దేవి యొక్క ఈ మందిరం పూర్వం చిన్నదిగా ఉండేది. 1999లో గ్రామస్థులు ఈ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేసిన తర్వాత దీనికి ప్రస్తుత రూపం లభించింది. మోర్ణా నది ఒడ్డున ఉన్న ఈ మందిర ప్రాంగణం ప్రశాంతంగా మరియు ఆహ్లాదకరంగా ఉంటుంది. మందిరానికి నాలుగు వైపులా ప్రహరీ గోడ మరియు ఆ గోడలో దేవి వాహనమైన సింహం ముఖద్వారం కలిగిన ఆకర్షణీయమైన ప్రవేశద్వారం ఉంది. 18 అడుగుల ఎత్తు మరియు 13 అడుగుల వెడల్పు ఉన్న ఈ ప్రవేశద్వారాన్ని ఇనుప గ్రిల్స్ మరియు సిమెంట్ కాంక్రీటు ఉపయోగించి నిర్మించారు. ఈ ప్రవేశద్వారం గుండా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలోని ఉద్యానవనంలో కాళీయమర్దనం చేస్తున్న శ్రీకృష్ణుని అందమైన విగ్రహం ఉంది. ఇది కాకుండా గణేశుడు మరియు కార్తికేయునితో కూడిన శివ-పార్వతుల శిల్పాలు ఉన్నాయి.
మూల మందిరం ముందున్న బహిరంగ సభామండపం ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా సింహ శిల్పాలు ఉన్నాయి. సభామండపం ముందున్న ఒక చావడిపై కాలభైరవుని స్థానం మరియు ఇక్కడి నుండి కొన్ని అడుగుల దూరంలోనే దేవి వాహనమైన సింహం శిల్పం ఉంది. భక్తుల సౌకర్యార్థం ఈ సభామండపంపై రేకుల పైకప్పు ఉంది. ఇక్కడి సభామండపంలో మధ్యభాగంలో హోమకుండం మరియు పక్కన భక్తుల కోసం ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపం ముందు భాగంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి గర్భాలయం ఉంది. గర్భాలయ ప్రవేశద్వారంపై ఉన్న స్తంభాలపై నగిషీలు ఉన్నాయి. గర్భాలయంలోని వజ్రపీఠంపై తుళజాభవాని మాత అందమైన విగ్రహం విరాజమానమై ఉంది. వస్త్రాలంకారాలతో ఉన్న ఈ దేవి శిరస్సుపై వెండి కిరీటం ఉంది. గర్భాలయంలోని దేవకోష్ఠాలలో గణపతి విగ్రహం, గజానన మహారాజుల విగ్రహం మరియు తుళజాభవాని ప్రతిమలు ఉన్నాయి.
ఈ గర్భాలయానికి ఇరువైపులా భూమికి దిగువన ఉన్న ఆసరా మాత స్థానానికి వెళ్లడానికి మెట్లు ఉన్నాయి. ఆరు నుండి ఏడు మెట్లు దిగితే మూల గర్భాలయానికి కింద భూమిలో ఉన్న ఆసరా మాత గర్భాలయంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ గర్భాలయంలో స్వయంభూ ఆసరా మాత స్థానం ఉంది. ఇక్కడి ఒక స్వయంభూ సింధూర చర్చిత పాషాణంపై దేవి యొక్క ఏడు ప్రతిమలు చిత్రించబడి ఉన్నాయి. ఈ పాషాణాన్ని ఆసరా మాతగా పూజిస్తారు. ఈ పాషాణం వెనుక గోడలోని దేవకోష్ఠంలో దేవి విగ్రహం ఉంది.
ఈ మందిరంలో నిత్యం పూజా కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఇక్కడ చైత్ర మరియు శరన్నవరాత్రి ఉత్సవాలను ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ ఉత్సవాల సందర్భంగా గొంధళ, హవనం వంటి వివిధ ధార్మిక కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. పరిసర ప్రాంతాల నుండి అనేకమంది భక్తులు ఈ ఉత్సవాల సమయంలో దేవి దర్శనానికి వస్తారు. ప్రతిరోజూ ఉదయం ఆరు గంటల నుండి రాత్రి ఎనిమిది గంటల వరకు భక్తులు ఇక్కడ దేవీ దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అకోలా నుండి 2 కి.మీ దూరంలో
- అకోలా నుండి ఎస్.టి మరియు ప్రైవేట్ వాహన సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: శంకరరావు గెడమ్, అధ్యక్షుడు, మొ. 9975897557
आई तुळजाभवानी मंदिर
अनिकट, ता. अकोला, जि. अकोला
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. तुळजापूरची भवानी ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी होती. शिवाजी महाराज अनेकदा कार्यारंभी या देवीचा कौल घेत असत, अशा नोंदी ऐतिहासिक बखरींमध्ये आढळतात. भवानी तलवार त्यांना साक्षात तुळजाभवानीनेच दिली होती, ही आख्यायिका महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. अशा या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची मंदिरे राज्यात विविध ठिकाणी आहेत. यापैकी अनिकट येथील तुळजाभवानी मंदिर हे अकोल्यातील ‘प्रतितुळजापूर’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी तुळजाभवानी स्वयंभू आसरांसह विराजमान आहे.
‘भव’ या शब्दाचे महादेव, मदन व संसार असे अर्थ आहेत. त्या सर्वांना चैतन्य देणारी देवी ती भवानी, असे स्पष्टीकरण अठराव्या शतकातील तंत्रशास्त्रातील थोर विद्वान व भाष्यकार भास्करराय यांनी दिले आहे. भव म्हणजे शंकराची पत्नी ती भवानी, अशीही या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, तंत्रशास्त्रातील अनेक सिद्धांत शिव-पार्वती संवादरूपानेच आले आहेत, म्हणजेच अनेक रूपे धारण करून विविध कार्ये करणारी शिवशक्ती हीच देवी किंवा भवानी आहे. संस्कृतातील सौंदर्यलहरी, ललिता सहस्रनाम, देवी भागवत, भवानी भुजंगम स्तोत्र इत्यादी ग्रंथांत शक्तिरूपिणी देवीची म्हणजे भवानीची अनेक कार्ये वर्णिली आहेत. ती पंजाबमधील थानेसर (ठाणेश्वर) येथील शक्तिपीठाची अधिष्ठात्री देवता आहे, तर महाराष्ट्रातील उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील तुळजापूर हे भवानीचे शक्तिपीठ म्हणून ख्यातकीर्त आहे.
‘तुळजा माहात्म्या’त देवीविषयी अशी पौराणिक आख्यायिका सांगितली आहे की, कृतयुगात कर्दम नावाचे एक विप्र राहत असत. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची अनुभूती नावाची पत्नी गरोदर होती. त्यामुळे ती पतीसमवेत सहगमन करू शकली नाही. काही दिवसांनी प्रसूती झाल्यानंतर तिने मंदाकिनी नदीतीरावर तपश्चर्या सुरू केली. एकदा तेथे शिकारीच्या निमित्ताने आलेल्या कुक्कुट नावाच्या दैत्याने तिला पाहिले. तिचे तेजस्वी रूप पाहून तो तिच्यावर मोहित झाला. त्याने तिच्या देहाला स्पर्श केला.
तेव्हा अनुभूतीने मनोमन पार्वती मातेचा धावा केला. तिची हाक ऐकून साक्षात पार्वती तेथे भवानी स्वरूपात प्रकट झाली व तिने कुक्कुट दैत्याचा वध केला. भक्ताच्या हाकेस त्वरित धावून आली म्हणून या देवीस ‘तुरजा’ वा ‘त्वरिता’ असे संबोधले जाऊ लागले. या आख्यायिकेस जोडून अशी कथा आहे की, कुक्कुट दैत्याने मरताना महिषासुराचे रूप घेतले होते. देवीने त्याचा वध केला. त्यामुळे देवी तुळजापूर येथे महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात विराजमान आहे.
देवीचे येथील मंदिर पूर्वी छोटेखानी होते. १९९९ मध्ये ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. मोर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराचा परिसर शांत व प्रसन्न आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत असून त्या भिंतीत देवीचे वाहन सिंहाचा मुखवटा असलेले आकर्षक प्रवेशद्वार आहे. १८ फूट उंच व १३ फूट रुंद असलेले हे प्रवेशद्वार लोखंडी गज व सिमेंट काँक्रिटचा वापर करून उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणातील उद्यानात कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय गणेश व कार्तिकेयासह शिव-पार्वतीची शिल्पे आहेत.
मूळ मंदिरासमोर असलेल्या खुल्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सिंहशिल्पे आहेत. सभामंडपासमोरील एका चौथऱ्यावर कालभैरवाचे स्थान व येथून काही पावलांवरच देवीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या सभामंडपावर पत्र्याचे छप्पर आहे. येथील सभामंडपात मध्यभागी होमकुंड व बाजूने भाविकांसाठी आसने आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील स्तंभशाखांवर नक्षीकाम आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर तुळजाभवानी मातेची सुंदर मूर्ती विराजमान आहे. या वस्त्रालंकारित देवीच्या शिरावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहातील देवकोष्टकांत गणपतीची मूर्ती, गजानन महाराजांची मूर्ती व तुळजाभवानीची प्रतिमा आहेत.
या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंनी जमिनीखाली असणाऱ्या आसरा मातेच्या स्थानाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सहा ते सात पायऱ्या उतरून मूळ गर्भगृहाच्या खाली जमिनीत असणाऱ्या आसरा मातेच्या गर्भगृहात प्रवेश होतो. या गर्भगृहात स्वयंभू आसरा मातेचे स्थान आहे. येथील एका स्वयंभू शेंदूरचर्चित पाषाणावर देवीच्या सात प्रतिमा रंगविलेल्या आहेत. हा पाषाण आसरा माता म्हणून पूजला जातो. या पाषाणाच्या मागील भिंतीतील देवकोष्टकात देवीची मूर्ती आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. येथे चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवानिमित्त गोंधळ, हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील असंख्य भाविक या उत्सवांच्या प्रसंगी देवीच्या दर्शनासाठी येतात. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना येथे देवदर्शन करता येते.
उपयुक्त माहिती:
- अकोला येथून २ किमी अंतरावर
- अकोला येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : शंकरराव गेडाम, अध्यक्ष, मो. ९९७५८९७५५७
ತಾಯಿ ತುಳಜಾಭವಾನಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಅಣಿಕಟ್, ತಾ. ಅಕೋಲಾ, ಜಿ. ಅಕೋಲಾ
ಸಾಡೇತೀನ್ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ತುಳಜಾಪುರದ ತುಳಜಾಭವಾನಿ ದೇವಸ್ಥಾನವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸುಪರಿಚಿತವಾಗಿದೆ. ತುಳಜಾಪುರದ ಭವಾನಿ ದೇವಿಯು ಸಾಕ್ಷಾತ್ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿಯಾಗಿದ್ದಳು. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಅನೇಕ ಬಾರಿ ಕಾರ್ಯಾರಂಭದ ಮೊದಲು ಈ ದೇವಿಯ ಕೌಲನ್ನು (ಆಶೀರ್ವಾದ/ಅಪ್ಪಣೆ) ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖಗಳು ಐತಿಹಾಸಿಕ ಬಖೈರುಗಳಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತವೆ. ಭವಾನಿ ತಲವಾರನ್ನು ಅವರಿಗೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ತುಳಜಾಭವಾನಿಯೇ ನೀಡಿದ್ದಳು ಎಂಬ ಐತಿಹ್ಯವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸುಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಂತಹ ದೇವಿಯ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿಯ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ರಾಜ್ಯದ ವಿವಿಧ ಕಡೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಅಣಿಕಟ್ನಲ್ಲಿರುವ ತುಳಜಾಭವಾನಿ ದೇವಸ್ಥಾನವು ಅಕೋಲೆಯ ‘ಪ್ರತಿ-ತುಳಜಾಪುರ’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿ ತುಳಜಾಭವಾನಿಯು ಸ್ವಯಂಭೂ ಆಸರಾ ಮಾತೆಯರೊಂದಿಗೆ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
‘ಭವ’ ಎಂಬ ಪದಕ್ಕೆ ಮಹಾದೇವ, ಮದನ ಮತ್ತು ಸಂಸಾರ ಎಂಬ ಅರ್ಥಗಳಿವೆ. ಅವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಚೈತನ್ಯ ನೀಡುವ ದೇವಿಯೇ ಭವಾನಿ, ಎಂದು ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನದ ತಂತ್ರಶಾಸ್ತ್ರದ ಮಹಾನ್ ವಿದ್ವಾಂಸ ಮತ್ತು ಭಾಷ್ಯಕಾರ ಭಾಸ್ಕರರಾಯರು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಭವ ಎಂದರೆ ಶಂಕರ, ಅವರ ಪತ್ನಿ ಭವಾನಿ ಎಂಬ ವ್ಯುತ್ಪತ್ತಿಯನ್ನೂ ಈ ಹೆಸರಿಗೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮರಾಠಿ ವಿಶ್ವಕೋಶದ ಉಲ್ಲೇಖದ ಪ್ರಕಾರ, ತಂತ್ರಶಾಸ್ತ್ರದ ಅನೇಕ ಸಿದ್ಧಾಂತಗಳು ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ ಸಂವಾದ ರೂಪದಲ್ಲೇ ಬಂದಿವೆ, ಅಂದರೆ ಅನೇಕ ರೂಪಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವ ಶಿವಶಕ್ತಿಯೇ ದೇವಿ ಅಥವಾ ಭವಾನಿ. ಸಂಸ್ಕೃತದ ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿ, ಲಲಿತಾ ಸಹಸ್ರನಾಮ, ದೇವಿ ಭಾಗವತ, ಭವಾನಿ ಭುಜಂಗಂ ಸ್ತೋತ್ರ ಮುಂತಾದ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿರೂಪಿಣಿಯಾದ ದೇವಿಯ ಅಂದರೆ ಭವಾನಿಯ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಈಕೆಯು ಪಂಜಾಬಿನ ಥಾನೇಸರ್ (ಠಾಣೇಶ್ವರ) ದಲ್ಲಿರುವ ಶಕ್ತಿಪೀಠದ ಅಧಿಷ್ಠಾತ್ರಿ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದರೆ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಉಸ್ಮಾನಾಬಾದ್ (ಧಾರಾಶಿವ) ಜಿಲ್ಲೆಯ ತುಳಜಾಪುರವು ಭವಾನಿಯ ಶಕ್ತಿಪೀಠವಾಗಿ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದೆ.
‘ತುಳಜಾ ಮಾಹಾತ್ಮ್ಯ’ದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಕುರಿತು ಇಂತಹ ಪೌರಾಣಿಕ ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೇಳಲಾಗಿದೆ: ಕೃತಯುಗದಲ್ಲಿ ಕರ್ದಮ ಎಂಬ ವಿಪ್ರರು ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಮರಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಪತ್ನಿ ಅನುಭೂತಿ ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿದ್ದಳು. ಆದ್ದರಿಂದ ಅವಳು ಪತಿಯೊಂದಿಗೆ ಸಹಗಮನ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಕೆಲವು ದಿನಗಳ ನಂತರ ಪ್ರಸವದ ಬಳಿಕ ಅವಳು ಮಂದಾಕಿನಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಳು. ಒಮ್ಮೆ ಅಲ್ಲಿ ಬೇಟೆಯಾಡಲು ಬಂದ ಕುಕ್ಕುಟ ಎಂಬ ದೈತ್ಯನು ಅವಳನ್ನು ನೋಡಿದನು. ಅವಳ ತೇಜಸ್ವಿಯಾದ ರೂಪವನ್ನು ಕಂಡು ಅವನು ಅವಳ ಮೇಲೆ ಮೋಹಿತನಾದನು. ಅವನು ಅವಳ ದೇಹವನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಿದನು.
ಆಗ ಅನುಭೂತಿಯು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಪಾರ್ವತಿ ಮಾತೆಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದಳು. ಅವಳ ಕರೆಗೆ ಓಗೊಟ್ಟು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪಾರ್ವತಿಯು ಅಲ್ಲಿ ಭವಾನಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡು ಕುಕ್ಕುಟ ದೈತ್ಯನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು. ಭಕ್ತರ ಕರೆಗೆ ತಕ್ಷಣವೇ ಧಾವಿಸಿ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಈ ದೇವಿಯನ್ನು ‘ತುರಜಾ’ ಅಥವಾ ‘ತ್ವರಿತಾ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾರಂಭಿಸಿದರು. ಈ ಐತಿಹ್ಯಕ್ಕೆ ಜೋಡಣೆಯಾಗಿರುವ ಕಥೆಯೆಂದರೆ, ಕುಕ್ಕುಟ ದೈತ್ಯನು ಸಾಯುವಾಗ ಮಹಿಷಾಸುರನ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿದ್ದನು. ದೇವಿಯು ಅವನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು. ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇವಿ ತುಳಜಾಪುರದಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ.
ದೇವಿಯ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಹಿಂದೆ ಚಿಕ್ಕದಾಗಿತ್ತು. ೧೯೯೯ ರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಈಗಿನ ರೂಪ ದೊರೆಯಿತು. ಮೋರ್ಣಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಪರಿಸರವು ಶಾಂತ ಮತ್ತು ಪ್ರಸನ್ನವಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಆವರಣ ಗೋಡೆ ಮತ್ತು ಆ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಸಿಂಹದ ಮುಖವಾಡವಿರುವ ಆಕರ್ಷಕ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ೧೮ ಅಡಿ ಎತ್ತರ ಮತ್ತು ೧೩ ಅಡಿ ಅಗಲವಿರುವ ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ಕಬ್ಬಿಣದ ಸರಳು ಮತ್ತು ಸಿಮೆಂಟ್ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಬಳಸಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಕಾಲಿಯಮರ್ದನ ಮಾಡುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕೇಯರೊಂದಿಗೆ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿಯರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಮೂಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಎದುರಿಗಿರುವ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎದುರಿನ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕಾಲಭೈರವನ ಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ಕೆಲವೇ ಹೆಜ್ಜೆಗಳ ದೂರದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಸಿಂಹದ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಈ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ತಗಡಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಮಕುಂಡ ಮತ್ತು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಆಸನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ತುಳಜಾಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ವಸ್ತ್ರಾಲಂಕಾರಿತ ದೇವಿಯ ಶಿರದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ, ಗಜಾನನ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ತುಳಜಾಭವಾನಿಯ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ.
ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಿಂದ ಭೂಮಿಯ ಕೆಳಗೆ ಇರುವ ಆಸರಾ ಮಾತೆಯ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಆರು-ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಹೋದರೆ ಮೂಲ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಕೆಳಗೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವ ಆಸರಾ ಮಾತೆಯ ಗರ್ಭಗುಡಿಗೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಆಸರಾ ಮಾತೆಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಸ್ವಯಂಭೂ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಏಳು ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಲ್ಲನ್ನು ಆಸರಾ ಮಾತೆ ಎಂದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಕಲ್ಲಿನ ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿತ್ಯವೂ ಪೂಜಾ-ಅರ್ಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಮಾಸದ ಹಾಗೂ ಶಾರदीय ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಗೊಂಡಳ, ಹವನ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಈ ಉತ್ಸವಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಆರು ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ಎಂಟು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ದೇವದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಅವಕಾಶವಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಕೋಲಾದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಅಕೋಲಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಶಂಕರರಾವ್ ಗೇಡಮ್, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೯೭೫೮೯೭೫೫೭
আই তুলাজভবানী মন্দির
অনিকট, তা. অকোলা, জি. অকোলা
সাড়ে তিন শক্তিপীঠের অন্যতম তুলজাপুরের তুলজভবানী মন্দির মহারাষ্ট্রে সুপরিচিত। তুলজাপুরের ভবানী ছিলেন স্বয়ং ছত্রপতি শিবাজী মহারাজের কুলস্বামিনী। ঐতিহাসিক নথিপত্র ও বখরে উল্লেখ আছে যে, শিবাজী মহারাজ প্রায়শই কোনো গুরুত্বপূর্ণ কাজ শুরুর আগে এই দেবীর কাছে কৌল (আদেশ) নিতেন। ভবানী তলোয়ার তাঁকে স্বয়ং তুলজভবানীই দিয়েছিলেন, এই কিংবদন্তি মহারাষ্ট্রে অত্যন্ত পরিচিত। এমন এই দেবীর, অর্থাৎ মহারাষ্ট্রের কুলস্বামিনীর মন্দির রাজ্যের বিভিন্ন স্থানে রয়েছে। এর মধ্যে অনিকটের তুলজভবানী মন্দিরটি অকোলা জেলার ‘প্রতিতুলজাপুর’ হিসেবে বিখ্যাত। এখানে দেবী তুলজভবানী স্বয়ংভু আসরামাতার সঙ্গে বিরাজমান।
‘ভব’ শব্দের অর্থ মহাদেব, মদন ও সংসার। যিনি এই সবকিছুর মধ্যে চৈতন্য সঞ্চার করেন, তিনিই ভবানী— অষ্টাদশ শতাব্দীর তন্ত্রশাস্ত্রের মহান পণ্ডিত ও ভাষ্যকার ভাস্কররায় এমন ব্যাখ্যা দিয়েছেন। ভব অর্থাৎ শঙ্করের পত্নী, তাই তিনি ভবানী— এমন ব্যুৎপত্তিও এই নামের ক্ষেত্রে বলা হয়। মারাঠি বিশ্বকোষের তথ্য অনুযায়ী, তন্ত্রশাস্ত্রের অনেক সিদ্ধান্তই শিব-পার্বতী সংবাদের মাধ্যমে এসেছে, অর্থাৎ বিভিন্ন রূপ ধারণ করে বিবিধ কার্য সম্পাদনকারী শিবশক্তিই হলেন দেবী বা ভবানী। সংস্কৃতের সৌন্দর্য লহরী, ললিতা সহস্রনাম, দেবী ভাগবত, ভবানী ভুজঙ্গম স্তোত্র ইত্যাদি গ্রন্থে শক্তিূপিণী দেবীর অর্থাৎ ভবানীর অনেক কার্যের বর্ণনা রয়েছে। তিনি পাঞ্জাবের থানেসরের (ঠাণেশ্বর) শক্তিপীঠের অধিষ্ঠাত্রী দেবতা, আর মহারাষ্ট্রের ওসমানাবাদ (ধারাশিব) জেলার তুলজাপুর ভবানীর শক্তিপীঠ হিসেবে খ্যাত।
‘তুলজা মাহাত্ম্য’-এ দেবী সম্পর্কে এই পৌরাণিক আখ্যান বলা হয়েছে যে, সত্যযুগে কর্দম নামে এক বিপ্র বাস করতেন। তাঁর মৃত্যুর সময় তাঁর স্ত্রী অনুভূতি গর্ভবতী ছিলেন। তাই তিনি স্বামীর সঙ্গে সহগমন করতে পারেননি। কিছু দিন পর সন্তান প্রসবের পর তিনি মন্দাকিনী নদীর তীরে তপস্যা শুরু করেন। একবার সেখানে শিকারের উদ্দেশ্যে আসা কুক্কুট নামক দৈত্য তাঁকে দেখতে পায়। তাঁর তেজস্বী রূপ দেখে সে মোহিত হয় এবং তাঁর দেহ স্পর্শ করার চেষ্টা করে।
তখন অনুভূতি মনে মনে পার্বতী মাতার শরণাপন্ন হন। তাঁর ডাক শুনে স্বয়ং পার্বতী সেখানে ভবানী রূপে প্রকট হন এবং কুক্কুট দৈত্যকে বধ করেন। ভক্তের ডাকে দ্রুত সাড়া দিয়েছিলেন বলে এই দেবীকে ‘তুরজা’ বা ‘ত্বরিতা’ নামে সম্বোধন করা হয়। এই আখ্যানের সঙ্গে যুক্ত আরেকটি কাহিনী হলো, কুক্কুট দৈত্য মরার সময় মহিষাসুরের রূপ ধারণ করেছিল। দেবী তাকে বধ করেন। তাই দেবী তুলজাপুরে মহিষাসুরমর্দিনী রূপে বিরাজমান।
এখানে দেবীর মন্দিরটি আগে ছোট আকারের ছিল। ১৯৯৯ সালে গ্রামবাসীরা এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার করার পর এটি বর্তমান রূপ লাভ করে। মোর্না নদীর তীরে অবস্থিত এই মন্দিরের পরিবেশ শান্ত ও মনোরম। মন্দিরের চারদিকে প্রাচীর রয়েছে এবং সেই প্রাচীরে দেবীর বাহন সিংহের মুখাকৃতিবিশিষ্ট একটি আকর্ষণীয় প্রবেশদ্বার আছে। ১৮ ফুট উঁচু ও ১৩ ফুট চওড়া এই প্রবেশদ্বারটি লোহার রড ও সিমেন্ট কংক্রিট ব্যবহার করে তৈরি করা হয়েছে। এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। প্রাঙ্গণের বাগানে কালীয়মর্দনরত শ্রীকৃষ্ণের একটি সুন্দর মূর্তি রয়েছে। এ ছাড়া গণেশ ও কার্তিকেয়সহ শিব-পার্বতীর ভাস্কর্যও রয়েছে।
মূল মন্দিরের সামনে খোলা সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের দুই পাশে সিংহমূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের সামনে একটি বেদিতে কালভৈরবের স্থান এবং এখান থেকে কয়েক কদম দূরেই দেবীর বাহন সিংহের ভাস্কর্য রয়েছে। ভক্তদের সুবিধার জন্য এই সভামণ্ডপে টিনের ছাউনি আছে। এখানকার সভামণ্ডপের মাঝখানে হোমকুণ্ড এবং পাশে ভক্তদের বসার জায়গা রয়েছে। সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ পেরিয়ে গর্ভগৃহ। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের স্তম্ভে চমৎকার খোদাই করা কাজ রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠে তুলজভবানী মাতার সুন্দর মূর্তি বিরাজমান। বস্ত্রালঙ্কারে ভূষিত এই দেবীর মস্তকে রৌপ্যমুকুট রয়েছে। গর্ভগৃহের কুলুঙ্গিতে গণপতির মূর্তি, গজানন মহারাজের মূর্তি ও তুলজভবানীর প্রতিমা রয়েছে।
এই গর্ভগৃহের দুই পাশ দিয়ে মাটির নিচে থাকা আসরামাতার স্থানে যাওয়ার সিঁড়ি রয়েছে। ছয় থেকে সাতটি সিঁড়ি নেমে মূল গর্ভগৃহের নিচে মাটির নিচের গর্ভগৃহে প্রবেশ করা যায়। এই গর্ভগৃহে স্বয়ংভু আসরামাতার স্থান রয়েছে। এখানকার একটি স্বয়ংভু সিঁদুরচর্চিত পাথরে দেবীর সাতটি প্রতিমা অঙ্কিত আছে। এই পাথরটিই আসরামাতা হিসেবে পূজিত হয়। এই পাথরের পেছনের দেয়ালের কুলুঙ্গিতে দেবীর মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরে নিত্যপূজা ও অর্চনা করা হয়। এখানে চৈত্রীয় ও শারদীয় নবরাত্র উৎসব অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। এই উৎসব উপলক্ষে গোধল, যজ্ঞসহ বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এলাকার অসংখ্য ভক্ত এই উৎসবের সময় দেবীর দর্শনে আসেন। প্রতিদিন সকাল ৬টা থেকে রাত ৮টা পর্যন্ত ভক্তরা এখানে দেবদর্শন করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- অকোলা থেকে ২ কিমি দূরত্বে
- অকোলা থেকে এসটি ও ব্যক্তিগত যানবাহনের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা আছে
- যোগাযোগ: শঙ্কররাও গেদাম, সভাপতি, মো. ৯৯৭৫৮৯৭৫৫৭
ਆਈ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਮੰਦਿਰ
ਅਨਿਕਟ, ਤਾ. ਅਕੋਲਾ, ਜਿ. ਅਕੋਲਾ
ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਤੁਲਜਾਪੁਰ ਦਾ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਮੰਦਿਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਭਵਾਨੀ ਸਾਖਿਆਤ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਕੁਲਸਵਾਮਿਨੀ ਸੀ। ਇਤਿਹਾਸਕ ਬਖਰਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਗੱਲ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ ਕਿ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਅਕਸਰ ਕਿਸੇ ਵੀ ਕਾਰਜ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕਰਨ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇਵੀ ਦਾ ਕੌਲ (ਆਸ਼ੀਰਵਾਦ) ਲੈਂਦੇ ਸਨ। ਇਹ ਕਥਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਕਿ ਭਵਾਨੀ ਤਲਵਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਾਖਿਆਤ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਨੇ ਹੀ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਅਜਿਹੀ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ, ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੀ ਕੁਲਸਵਾਮਿਨੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਰਾਜ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਨਿਕਟ ਸਥਿਤ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਮੰਦਿਰ ਅਕੋਲਾ ਦਾ ‘ਪ੍ਰਤੀ-ਤੁਲਜਾਪੁਰ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਸਵੈਯੰਭੂ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦੇ ਨਾਲ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹਨ।
‘ਭਵ’ ਸ਼ਬਦ ਦੇ ਅਰਥ ਮਹਾਦੇਵ, ਮਦਨ ਅਤੇ ਸੰਸਾਰ ਹਨ। ਅਠਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਮਹਾਨ ਤੰਤਰਸ਼ਾਸਤਰੀ ਵਿਦਵਾਨ ਅਤੇ ਭਾਸ਼ਯਕਾਰ ਭਾਸਕਰਰਾਏ ਨੇ ਸਪੱਸ਼ਟ ਕੀਤਾ ਹੈ ਕਿ ਜੋ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਚੇਤਨਾ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਦੀ ਹੈ, ਉਹ ਦੇਵੀ ਭਵਾਨੀ ਹੈ। ਇਸ ਨਾਮ ਦੀ ਉਤਪਤੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਭਵ ਭਾਵ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਪਤਨੀ ਉਹ ਭਵਾਨੀ ਹੈ। ਮਰਾਠੀ ਵਿਸ਼ਵਕੋਸ਼ ਅਨੁਸਾਰ, ਤੰਤਰਸ਼ਾਸਤਰ ਦੇ ਕਈ ਸਿਧਾਂਤ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ ਸੰਵਾਦ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੀ ਆਏ ਹਨ, ਭਾਵ ਕਈ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕਰਕੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਰਜ ਕਰਨ ਵਾਲੀ ਸ਼ਿਵਸ਼ਕਤੀ ਹੀ ਦੇਵੀ ਜਾਂ ਭਵਾਨੀ ਹੈ। ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦੇ ਸੌਂਦਰਯ ਲਹਿਰੀ, ਲਲਿਤਾ ਸਹਸ੍ਰਨਾਮ, ਦੇਵੀ ਭਾਗਵਤ, ਭਵਾਨੀ ਭੁਜੰਗਮ ਸਤੋਤਰ ਆਦਿ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਕਤੀਰੂਪਿਣੀ ਦੇਵੀ ਭਾਵ ਭਵਾਨੀ ਦੇ ਅਨੇਕ ਕਾਰਜਾਂ ਦਾ ਵਰਣਨ ਹੈ। ਉਹ ਪੰਜਾਬ ਦੇ ਥਾਨੇਸਰ (ਠਾਨੇਸ਼ਵਰ) ਸਥਿਤ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਦੀ ਅਧਿਸ਼ਠਾਤਰੀ ਦੇਵਤਾ ਹੈ, ਜਦਕਿ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਉਸਮਾਨਾਬਾਦ (ਧਾਰਾਸ਼ਿਵ) ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਤੁਲਜਾਪੁਰ ਭਵਾਨੀ ਦੇ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
‘ਤੁਲਜਾ ਮਾਹਾਤਮਯ’ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਬਾਰੇ ਇਹ ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਦੱਸੀ ਗਈ ਹੈ ਕਿ ਕ੍ਰਿਤਯੁਗ ਵਿੱਚ ਕਰਦਮ ਨਾਮਕ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਉਸਦੀ ਮੌਤ ਦੇ ਸਮੇਂ ਉਸਦੀ ਪਤਨੀ ਅਨੁਭੂਤੀ ਗਰਭਵਤੀ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਉਹ ਆਪਣੇ ਪਤੀ ਨਾਲ ਸਤੀ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕੀ। ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਬਾਅਦ ਬੱਚੇ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸਨੇ ਮੰਦਾਕਿਨੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਤਪੱਸਿਆ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਉੱਥੇ ਸ਼ਿਕਾਰ ਕਰਨ ਆਏ ਕੁੱਕੁਟ ਨਾਮਕ ਦੈਂਤ ਨੇ ਉਸਨੂੰ ਦੇਖਿਆ। ਉਸਦਾ ਤੇਜਸਵੀ ਰੂਪ ਦੇਖ ਕੇ ਉਹ ਮੋਹਿਤ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਨੇ ਉਸਦੇ ਸਰੀਰ ਨੂੰ ਛੂਹਿਆ।
ਤਦ ਅਨੁਭੂਤੀ ਨੇ ਮਨ ਹੀ ਮਨ ਪਾਰਵਤੀ ਮਾਤਾ ਨੂੰ ਪੁਕਾਰਿਆ। ਉਸਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣ ਕੇ ਸਾਖਿਆਤ ਪਾਰਵਤੀ ਉੱਥੇ ਭਵਾਨੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਅਤੇ ਉਸਨੇ ਕੁੱਕੁਟ ਦੈਂਤ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ। ਭਗਤ ਦੀ ਪੁਕਾਰ ‘ਤੇ ਤੁਰੰਤ ਦੌੜ ਕੇ ਆਉਣ ਕਾਰਨ ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ‘ਤੁਰਜਾ’ ਜਾਂ ‘ਤਵਰਿਤਾ’ ਕਿਹਾ ਜਾਣ ਲੱਗਿਆ। ਇਸ ਕਥਾ ਨਾਲ ਜੁੜੀ ਇੱਕ ਹੋਰ ਕਹਾਣੀ ਇਹ ਹੈ ਕਿ ਕੁੱਕੁਟ ਦੈਂਤ ਨੇ ਮਰਦੇ ਸਮੇਂ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਰੂਪ ਧਾਰ ਲਿਆ ਸੀ। ਦੇਵੀ ਨੇ ਉਸਦਾ ਵਧ ਕੀਤਾ, ਇਸ ਲਈ ਦੇਵੀ ਤੁਲਜਾਪੁਰ ਵਿੱਚ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪਹਿਲਾਂ ਛੋਟੇ ਆਕਾਰ ਦਾ ਸੀ। ੧੯੯੯ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੁਆਰਾ ਮੰਦਿਰ ਦੇ ਜੀਰੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਮੋਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪਰਿਸਰ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਪ੍ਰਸੰਨ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਕੰਧ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੇ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਲੱਗਿਆ ਇੱਕ ਆਕਰਸ਼ਕ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ੧੮ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਅਤੇ ੧੩ ਫੁੱਟ ਚੌੜਾ ਇਹ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਰਾਡਾਂ ਅਤੇ ਸੀਮਿੰਟ ਕੰਕਰੀਟ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਬਾਗ ਵਿੱਚ ਕਾਲੀਆਮਰਦਨ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੇਯ ਸਮੇਤ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਹਨ।
ਮੂਲ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ੇਰਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਕਾਲਭੈਰਵ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਕੁਝ ਕਦਮਾਂ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੇ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ‘ਤੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੋਮਕੁੰਡ ਅਤੇ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਬੈਠਣ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅੱਗੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਵਸਤਰ-ਅਲੰਕਾਰਿਤ ਦੇਵੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ, ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ।
ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦੇ ਸਥਾਨ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਛੇ ਤੋਂ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਮੂਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਹੇਠਾਂ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਵੈਯੰਭੂ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਸਵੈਯੰਭੂ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੇ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਸੱਤ ਤਸਵੀਰਾਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਪੱਥਰ ਨੂੰ ਆਸਰਾ ਮਾਤਾ ਵਜੋਂ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੱਥਰ ਦੀ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਿੱਤ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਚੈਤਰੀ ਅਤੇ ਸ਼ਾਰਦੀਆ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਗੋਂਧਲ, ਹਵਨ ਆਦਿ ਕਈ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਲਾਕੇ ਦੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਨ੍ਹਾਂ ਉਤਸਵਾਂ ਦੌਰਾਨ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੮ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅਕੋਲਾ ਤੋਂ ੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਅਕੋਲਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਸ਼ੰਕਰਰਾਓ ਗੇਡਾਮ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੯੭੫੮੯੭੫੫੭
मंदिरे
Temples
मंदिर
-
वटेश्वर महादेव मंदिर खानापूर, ता. पातूर, जि. अकोला
अधिक माहितीVateshwar Mahadev Temple Khanapur, Tal. Patur, Dist. Akola
View Detailsवटेश्वर महादेव मंदिर खानापुर, ता. पातूर, जि. अकोला
विवरण देखें -
राजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
अधिक माहितीRajeshwar Mahadev Temple Rajnapur (Khinkhini), Tal. Murtijapur, Dist. Akola
View Detailsराजेश्वर महादेव मंदिर राजनापूर (खिनखिनी), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला
विवरण देखें -
गौतमेश्वर महादेव मंदिर तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला
अधिक माहितीGautameshwar Mahadev Temple Telhara, Tal. Telhara, Dist. Akola
View Detailsगौतमेश्वर महादेव मंदिर तेलहारा, ता. तेलहारा, जि. अकोला
विवरण देखें
