बालाजी मंदिर

खोळ गल्ली, धुळे, ता. जि. धुळे 

भारतातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानचा उल्लेख केला जातो. येथील देवस्थानाला जगभरातून दरवर्षी कोट्यवधी भाविक भेटी देतात. विष्णूचा अवतार असलेला बालाजी वेंकटेश्वर, वेंकटेश आदी नावानेही ओळखला जातो. या देवाची भारतभर अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध आहेत. यापैकीच बालाजीचे दक्षिणी स्थापत्यशैलीतील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर धुळे शहरातील खोळ गल्ली येथे स्थित आहे. दसऱ्याला साजरा होणारा येथील रथोत्सव प्रसिद्ध असून त्यास १४५ वर्षांची परंपरा आहे.

बालाजी देवाबाबत आख्यायिका अशी की सत्य युगात ऋषी मुनींच्या तपाचे फळसंचित कोणत्या देवाला द्यावे, याबाबत परीक्षा घेण्याकरिता भृगू ऋषी विष्णूकडे गेले. देवाची परीक्षा घेण्यासाठी भृगू ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. तेव्हा विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी रागावून देवलोक सोडून पृथ्वीवर आली. विष्णूने भृगू ऋषींच्या पायाला श्रम पडले म्हणून त्यांचे पाय कुरवाळले त्यांच्या पायाला असलेल्या गर्वाच्या डोळ्याचा नाश केला. तेव्हा भृगू ऋषींनी सर्व संचितफळ विष्णूला अर्पण केले कलियुगात पृथ्वीवर प्रत्येक याचकाच्या इच्छा तू पूर्ण करशील, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विष्णू पृथ्वीवर बालाजी रूपात स्थापित होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करू लागला

शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिरास भक्कम तटबंदी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिणी शैलीतील गोपुरम् पद्धतीचे आहे. रस्त्यांपेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या द्वारपालपीठावर शंख, चक्र गदाधारी चतुर्भुज द्वारपाल आहेत. द्वारशाखेवर वेलबुट्टी नक्षी, ललाटबिंबावर विष्णू टिळा लालटपट्टीवर शुभचिन्हे अंकित आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या छतावर पाच थरांचे गोपुरम् शिखर आहे. त्यातील प्रत्येक थरात कुट, शाल, कळस विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरात शीर्षभागी आडव्या पद्धतीचे शाल त्यावर कळस आहेत. मंदिराच्या संगमरवरी फरसबंदी असलेल्या प्रांगणात चौथऱ्यावर, दाक्षिणात्य मंदिरशैलीतील महत्त्वाचा भाग असलेला नक्षीदार ध्वजस्तंभ आहे. स्तंभाच्या बाजूला गरुड हनुमान यांची लहान मंदिरे आहेत

ध्वजस्तंभाच्या पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपाची समोरील बाजू पूर्ण खुली आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभांत चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तूळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई त्यावर छताचा भार आहे. वितानावर चक्रनक्षी आहे सर्वत्र पितळी घंटा टांगलेल्या आहेत. बंदिस्त स्वरुपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत. सभामंडपात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कूर्मशिल्प आहे.

गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींना असलेल्या चांदीच्या आच्छादनावर नक्षीकाम आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर मध्यभागी बालाजी, पद्मावती लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या मागील सुवर्ण प्रभावळीवर पानाफुलांची नक्षी वर किर्तीमुख आहे. वज्रपिठावर बालाजीच्या डाव्या बाजूला राधाकृष्ण यांच्या मूर्ती, तर उजव्या बाजूला बालाजी, पद्मावती लक्ष्मी यांच्या उत्सवमूर्तीसहित गरुड, चक्र, शंख आदी शिल्पे आहेत. संगमरवरी वज्रपिठावर संगमरवरी मखर आहे. मखरात चार नक्षीदार स्तंभ, त्यावर कमानी छत आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरही नक्षीदार स्तंभ आहेत

सभामंडपाच्या छतावर चहूबाजूंनी कठडा आहे. त्यात देवकोष्टके मंदिर शिल्पे आहेत. देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर दक्षिणी शैलीतील शिखर, त्यावर कळस ध्वजपताका आहे. शारदीय नवरात्रात बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी दहा दिवस देवाचा महाअभिषेक करून विशेष पूजा केली जाते. या काळात मंदिरात सतत भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याला देवाची रथ मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत नगर प्रदक्षिणा घातली जाते. रथोत्सवात राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होतात. या रथोत्सवास १४५ वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. चैत्र पाडव्यास देवाचा वसंतोत्सव सुरू होतो. सुमारे चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या शिवाय मार्गशिर्ष, श्रावण अधिक मासात विशेष उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

उपयुक्त माहिती

  • धुळे बस स्थानकापासून . किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून धुळेसाठी एसटी रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home