शुक्लेश्वर मंदिर

भिंगार, ता./जि. अहिल्यानगर

अहिल्यानगरजवळील भिंगार येथील प्राचीन शुक्लेश्वर मंदिर हे काशी विश्वेश्वराचे प्रतिरूप म्हणून ओळखले जाते. येथील शिवलिंग वालुकामय स्वयंभू असून शिवलिंगाच्या बाजूने सतत पाणी वाहत असते. असे सांगितले जाते की गर्भगिरी डोंगरावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ वास्तव्याला असताना ते या शुक्लेश्वराच्या दर्शनाला येत असत. जे भाविक शुक्लेश्वराचे दर्शन घेतात त्यांचा वंश अखंडित राहतो, अशी या देवस्थानाबद्दल श्रद्धा आहे. ‘सूर्यपुराणकाशिखंडातया स्थानाचा उल्लेख आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की ऋषी शुक्राचार्य यांनी या परिसरात तपश्चर्या करून काशी विश्वेश्वराला प्रसन्न केले येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. महादेवांनीतथास्तुम्हणत भिंगार परिसरात वास्तव्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर येथे स्वयंभू वालुकामय शिवपिंडी प्रकट झाली. तेव्हापासून हे स्थानशुक्लेश्वरम्हणून प्रसिद्ध आहे. नवनाथांच्याही पूर्वीचे हे स्थान आहे. रामायण काळात भृगू ऋषींचे वास्तव्य लाभलेल्या भिंगारचेभृगपूरअसे नाव होतेशुक्लेश्वर महादेवाचे हे मंदिर गर्भगिरी डोंगररांगांतील नाथपंथीय शिवालय मानले जाते.

भिंगार येथील सिना नदीच्या तीरावर असलेल्या शुक्लेश्वर मंदिराचे बांधकाम आठव्या ते नवव्या शतकातील असावे. औदुंबर, पिंपळ, चिंच अशा वृक्षराजींमध्ये असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व उत्तरेकडे प्रवेशद्वारे आहेत. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या वास्तूची रचना आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वाराशेजारी नंदीमंडप आहे. ही नंदीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून नंदीच्या आयाळीत नारदाची वीणाधारी उभी मूर्ती आहे. नंदी नारद या मूर्तींवर सुबक कोरीवकाम असून त्या एकाच दगडामधून तयार केलेल्या दिसतात. नंदीच्या कपाळावर श्रीयंत्र, गळ्यात घुंगरमाळ आणि पाठीवर दोरांच्या गाठींचे नक्षीदार वळण घंटांची माळ कोरलेली आहे.

नंदी मंडपापुढे सभामंडप आहे. तेथून गाभाऱ्याकडे जाताना एका कमानीच्या

मध्यभागी असलेल्या कोनाड्यात साधूंची ध्यानाची जागा असल्याचे सांगितले जाते. आतमध्ये फूट उंच आणि २० फूट बाय १० फुटांची ती खोली आहे. सभामंडपातून पायऱ्या उतरल्यावर अंतराळात प्रवेश होतो. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणपती दोन्ही बाजूला देवळ्या दिसतात.

येथून पायऱ्या उतरून गाभाऱ्यात पोहोचल्यावर मध्यभागी वालुकामय शिवलिंग असून त्यासमोर असलेल्या भिंतीवरील कोनाड्यात हातात कमंडलू घेतलेला आशीर्वाद देताना पार्वतीची मूर्ती आहे. तसेच पश्चिम उत्तर बाजूच्या भिंतीत प्रत्येकी अशा देवळ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत, जमिनीपासून सुमारे १५ फूट खाली असलेल्या या गाभाऱ्यात दररोज सकाळी सायंकाळी सूर्यकिरणे पडतात. शाळुंका पिंड यामध्ये पूर्व दिशेला अर्धवर्तुळाकार फट असून ती बरीच खोल असल्याचे सांगितले जाते. या फटीतून पाणी पाझरत असल्याने ती नेहमी भरलेली दिसते. पावसाळ्यात पार्वती मातेच्या पायास पाणी स्पर्श करते. त्यावेळी अनेक दिवस शिवपिंडी पाण्याखाली असते.

मंदिराजवळ पुरातन चौकोनी बारव असून तिच्यामध्ये असणारे निमुळते कुंड उलट्या पिरॅमिडसारखे भासतात. मंदिराचे मुख्य शिखर १५ फूट उंचीचे असून त्याभोवती मिनार आहेत. या शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शुक्लेश्वर मंदिराच्या परिसरात अनेक साधकांच्या समाध्या आहेत.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी प्रवरासंगम येथून कावडीने आणलेल्या पाण्याने शुक्लेश्वराला अभिषेक करण्यात येतो. या कावड यात्रेत शेकडो भाविक सहभागी होतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला येथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. दर महाशिवरात्रीला हरिनाम सप्ताह महारुद्राभिषेक करण्यात येतो. दररोज शुक्लेश्वराच्या मंगलस्नानानंतर .३० वाजता सायंकाळी वाजता आरती होते. पहाटे वाजल्यापासून रात्री १० पर्यंत मंदिरात जाऊन शुक्लेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • अहिल्यानगरपासून किमी अंतरावर
  • अहिल्यानगरपासून एसटीची सुविधा
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
Back To Home