सप्तशृंगी माता मंदिर
शिरागड, ता. यावल, जि. जळगाव

आदिमाया भगवतीच्या १०८ शक्तिपीठांपैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहुरची महाकाली (रेणुकादेवी) ही पूर्णपीठे, तर वणीची सप्तशृंगी देवी हे आद्य व अर्धपीठ मानले जाते. सप्तशृंगी गडावर स्थित असलेली ही देवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरूप असल्याचे मानले जाते. अशी मान्यता आहे की सप्तश्रृंगी गडावर जाण्याआधी देवीचे वास्तव्य हे शिरागड येथील या डोंगरावर होते. त्यामुळे आजही या स्थानाला देवीचे माहेर व लहानगड असे संबोधले जाते.
पौराणिक आख्यायिकांनुसार, देवी सती राजा दक्ष प्रजापतीची मुलगी आणि महादेवाची पत्नी होय. एकदा राजा दक्षाने यज्ञाचे आयोजन केले व महादेव सोडून सर्व देवांना त्यासाठी आमंत्रित केले. सतीला हे समजल्यानंतर तिने वडिलांकडे जाऊन याचा जाब विचारला. त्यावेळी दक्षाने महादेवाची निंदा केली. पतीबद्दलचे ते अपमानकारक उद्गार ऐकून सती क्रोधित झाली व त्या
क्रोधातच तेथे सुरू असलेल्या यज्ञामध्ये तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. शंकरास हे समजल्यावर ते प्रचंड क्रोधीत झाले. यज्ञस्थळी येऊन त्यांनी सतीचे मृत शरीर त्या यज्ञातून बाहेर काढले. ते हातात घेऊन ते शोकसंतापाने इकडे–तिकडे भटकू लागले. रुद्रावतार धारण करून शंकराने तांडव नृत्य करू केले. त्यातून पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले.
त्यावेळी भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या देहाचे भाग आणि अंगावरील दागिने ज्या ज्या ठिकाणी पडले ते देवीचे शक्तिपीठ बनले. देवीची अशी ५१ शक्तिपीठे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत. देवीभागवत या ग्रंथांमधील उल्लेखानुसार अशी १०८ शक्तिपिठे आहेत.
शिरागड येथील सप्तश्रृंगी मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथून जवळ असलेल्या आडगाव परिसरात ऋषिमुनींकडून विश्वकल्याणासाठी महायज्ञ केला जात होता. त्यात महिषासूर राक्षस विघ्ने आणत होता. त्यावेळी ऋषिमुनींसह अनेक देवतांनी आदिमातेकडे महिषासूराचा बंदोबस्त
करण्याची विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदिमाता आडगाव येथे प्रगट झाली व महिषासुराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाली. देवीचे महिषासुराशी युद्ध ज्या ठिकाणी झाले ते स्थान म्हणजे शिरागड येथील सध्या मंदिर असलेली टेकडी होय. या युद्धात देवीपुढे महिषासुराचा निभाव लागला नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी महिषासूर या ठिकाणावरून पळून गेला व सप्तश्रृंगी गडावर जाऊन लपून पसला. परंतु देवी पाठलाग करत तेथेही पोचली व तिने तेथे त्याचा वध केला. ज्या ठिकाणी महिषासूराचा वध झाला त्याच ठिकाणी मग देवीने वास्तव्य केले. सप्तश्रृंगी निवासिनी म्हणून देवीला सप्तश्रृंगी हे नाव पडले. तेव्हापासून सप्तश्रृंगी हा मोठा गड व शिरागड येथील देवीचे जागृत स्थान लहानगड म्हणून प्रसिद्ध आहे.
शिरागड गावाच्या वेशीवर, तापी नदीच्या काठावर, सप्तश्रृंगी देवीचे हे जागृत स्थान आहे. शिरागड गावापासून नदीपात्रातून होडीने या मंदिरात यावे लागते. नदीच्या तिरावरून सुमारे १५० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो.
लहानशा टेकडीच्या पठारावर हे मंदिर स्थित आहे. येथील मंदिरासमोर होमकुंड व मोठा त्रिशुळ आहे. सभामंडप व प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस सूर्य व चंद्र यांच्या प्रतिमा आहेत. सभामंडपात मध्यभागी देवीचे वाहन असलेल्या वाघाची मूर्ती व त्यासमोर पितळी कूर्ममूर्ती आहे. सभामंडाच्या भिंतींवर देवीच्या विविध रूपातील प्रतिमा रेखाटलेल्या आहेत.
गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या सोनेरी नक्षीदार मखरात, चार फूट उंचीची, पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती आहे. सिंहावर आरूढ असलेल्या या देवीचे रूप सौम्य भासते. देवीच्या १८ हातांमध्ये विविध आयुधे आहेत. त्यामुळे या देवीला ‘अष्टादश देवी’ असेही म्हणतात. देवीचा डावा हात कानामागे आणि मान तिरकी आहे. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, हातांत हिरव्या बांगड्या, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार आहेत. या मूर्तीच्या समोर देवीची छोटी शेंदूरचर्चित व्याघ्रारूढ पाषाणमूर्ती आहे. तर वज्रपिठाच्या समोरच्या बाजूला खाली देवळीत गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे.
मंदिराच्या आवारात हनुमानाची मोठी प्राचीन मूर्ती आहे. एका हातात द्रोणागिरी पर्वत व दुसऱ्या हातात गदा घेतलेली, अशी ही शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे. देवीच्या मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला एका छोट्या मंदिरातही सप्तशृंगीची देवीची मोठी मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन इत्यादी उत्सव साजरे केले जातात. या सोहळ्याच्या वेळी अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रीत येणाऱ्या हजारो भाविकांमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप येते.
उपयुक्त माहिती
- यावलपासून २४ किमी, तर जळगाव येथून २० किमी अंतरावर
- यावल व जळगाव येथून एसटीची सुविधा
- वाहनतळापासून पुढे होडीचा प्रवास आहे
- खासगी वाहने शिरागड येथील मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Saptashrungi Mata Temple
Shiragad, Taluka Yawal, District Jalgaon

Out of the one hundred and eight Shaktipeeths of the Primordial Mother Bhagwati, three and a half are located in Maharashtra. The Mahalakshmi of Kolhapur, Bhavani Mata of Tuljapur, and Mahakali (Renukadevi) of Mahur are considered the full Peeths, while the Saptashrungi Devi of Vani is considered the primordial and half-Peeth. The Goddess situated on the Saptashrungi fort is believed to be the trigunatmaka (three-fold) manifestation of Mahakali, Mahalakshmi, and Mahasaraswati. It is believed that before residing on the Saptashrungi fort, the Goddess dwelt on this hill at Shiragad. Therefore, even today, this place is referred to as the Goddess’s maternal home and the ‘Lahangad’ (Small Fort).
According to mythological legends, Goddess Sati was the daughter of King Daksha Prajapati and the wife of Mahadeva. Once, King Daksha organized a Yajna and invited all the gods except Mahadeva. Upon learning this, Sati went to her father to demand an explanation. At that time, Daksha insulted Mahadeva. Hearing those derogatory words about her husband, Sati became enraged, and in that
fury, she sacrificed her life in the Yajna being performed there. When Shankar learned of this, He became extremely enraged. He arrived at the Yajna site and retrieved Sati’s lifeless body from the fire. Carrying it in His arms, He began to wander here and there in grief and anger. Assuming the Rudra avatar, Shankar began to perform the Tandava dance. All the gods became worried, fearing that this would lead to the destruction of the earth.
At that time, Lord Vishnu used His Sudarshan Chakra to dismember Sati’s body. The places where the parts of Sati’s body and her ornaments fell became Shaktipeeths. There are fifty-one such Shaktipeeths of the Goddess across India, Pakistan, Bangladesh, Nepal, and Tibet. According to mentions in the Devi Bhagavata Purana, there are one hundred and eight such Shaktipeeths.
The legend of the Saptashrungi temple at Shiragad states that in ancient times, sages were performing a great Yajna for the welfare of the world in the nearby Adgaon area. The demon Mahishasura was creating obstacles in it. At that time, many deities, along with the sages, requested the Primordial Mother to put an end to Mahishasura.
Respecting everyone’s request, the Primordial Mother appeared at Adgaon and prepared to fight Mahishasura. The place where the Goddess fought Mahishasura is the hill where the temple is currently located at Shiragad. In this battle, Mahishasura could not withstand the Goddess. To save his life, Mahishasura fled from this place and went to hide on the Saptashrungi fort. However, the Goddess pursued him, reached there, and slew him. The Goddess then resided at the very place where Mahishasura was slain. The Goddess was named Saptashrungi as the resident of Saptashrungi. Since then, Saptashrungi has been famous as the ‘Motagad’ (Big Fort), and the awakened place of the Goddess at Shiragad is known as ‘Lahangad’.
This awakened place of Saptashrungi Devi is located on the outskirts of Shiragad village, on the banks of the Tapi river. One has to reach this temple from Shiragad village by boat through the riverbed. After climbing about one hundred and fifty steps from the riverbank, one enters the temple courtyard.
The temple is situated on a small hill plateau. In front of the temple here, there is a Homa-kunda (sacrificial fire pit) and a large Trishula. The structure of the temple consists of a Sabha-mandapa (assembly hall), a Pradakshina-marga (circumambulation path), and the Garbhagriha (sanctum sanctorum). There are images of the Sun and Moon above the entrance. In the center of the Sabha-mandapa, there is an idol of a tiger, the vehicle of the Goddess, and in front of it, a brass Kurma (tortoise) idol. The walls of the Sabha-mandapa are adorned with paintings of the various forms of the Goddess.
In the Garbhagriha, on a Vajra-pitha (diamond throne), inside a golden ornamental arch, stands a four-foot-tall stone idol of the Goddess. The form of the Goddess, mounted on a lion, appears gentle. The Goddess has various weapons in her eighteen hands. Therefore, this Goddess is also called ‘Ashtadasha Devi’. The Goddess’s left hand is behind her ear, and her neck is tilted. She is adorned with ornaments such as a crown on her head, earrings, a nose ring, a Mangalsutra, a necklace of gold coins, green bangles on her hands, a waistband, and anklets. In front of this idol is a small vermilion-smeared stone idol of the Goddess riding a tiger. In a small niche in front of the Vajra-pitha, an idol of Ganesha smeared with vermilion is seated.
In the temple premises, there is a large, ancient idol of Hanuman. It is a vermilion-smeared stone idol holding the Dronagiri mountain in one hand and a mace in the other. Behind the main temple of the Goddess, a large idol of Saptashrungi Devi is also enshrined in a small temple. Festivals such as Sharadiya Navaratri, Chaitra Navaratri, Kojagiri Purnima, Gudi Padwa, Gokulashtami, and Lakshmi Pujan are celebrated in this temple. During these celebrations, many devotees come to seek the blessings of the Goddess. Due to the thousands of devotees arriving during Navaratri, the area takes on the atmosphere of a pilgrimage.
Useful Information
- Twenty-four km from Yawal and twenty km from Jalgaon
- ST bus service available from Yawal and Jalgaon
- Boat journey from the parking area
- Private vehicles can reach the parking area of the temple at Shiragad
- No accommodation or dining facilities available in the area
सप्तशृंगी माता मंदिर
शिरागड, तहसील यावल, जिला जलगाँव

आदिमाया भगवती के १०८ शक्तिपीठों में से साढ़े तीन पीठ महाराष्ट्र में स्थित हैं। कोल्हापुर की महालक्ष्मी, तुलजापुर की भवानी माता, माहुर की महाकाली (रेणुकादेवी) ये पूर्ण पीठ हैं, जबकि वणी की सप्तशृंगी देवी को आद्य और अर्धपीठ माना जाता है। सप्तशृंगी गढ़ पर स्थित यह देवी महाकाली, महालक्ष्मी और महासरस्वती, इन तीनों स्थानों का त्रिगुणात्मक स्वरूप मानी जाती हैं। ऐसी मान्यता है कि सप्तशृंगी गढ़ पर जाने से पहले देवी का निवास शिरागढ़ स्थित इस पर्वत पर था। इसीलिए आज भी इस स्थान को देवी का मायका और लहानगढ़ कहकर संबोधित किया जाता है।
पौराणिक आख्यायिकाओं के अनुसार, देवी सती राजा दक्ष प्रजापति की पुत्री और महादेव की पत्नी हैं। एक बार राजा दक्ष ने यज्ञ का आयोजन किया और महादेव को छोड़कर सभी देवताओं को उसके लिए आमंत्रित किया। सती को जब यह ज्ञात हुआ, तो उन्होंने अपने पिता के पास जाकर इसका कारण पूछा। उस समय दक्ष ने महादेव की निंदा की। अपने पति के प्रति वे अपमानजनक शब्द सुनकर सती क्रोधित हो गईं और उस
क्रोध में आकर उन्होंने वहाँ चल रहे यज्ञ में अपने प्राणों की आहुति दे दी। जब शंकर को यह ज्ञात हुआ, तो वे अत्यंत क्रोधित हो गए। यज्ञस्थल पर पहुँचकर उन्होंने सती के मृत शरीर को उस यज्ञ से बाहर निकाला। उसे हाथों में लेकर वे शोक और संताप में इधर-उधर भटकने लगे। रुद्रावतार धारण कर शंकर ने तांडव नृत्य करना आरंभ किया। इससे पृथ्वी का विनाश हो सकता था, इसलिए सभी देवता चिंता में पड़ गए।
उस समय भगवान विष्णु ने सुदर्शन चक्र से सती के शरीर के टुकड़े कर दिए। सती के देह के भाग और आभूषण जिन-जिन स्थानों पर गिरे, वे देवी के शक्तिपीठ बन गए। देवी के ऐसे ५१ शक्तिपीठ भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल और तिब्बत इन देशों में स्थित हैं। देवीभागवत ग्रंथ में उल्लेख के अनुसार ऐसी १०८ शक्तिपीठें हैं।
शिरागड स्थित सप्तश्रृंगी मंदिर की आख्यायिका यह है कि प्राचीन काल में यहाँ के निकटवर्ती आडगांव क्षेत्र में ऋषियों-मुनियों द्वारा विश्व कल्याण के लिए महायज्ञ किया जा रहा था। उसमें महिषासुर राक्षस बाधाएँ उत्पन्न कर रहा था। उस समय ऋषियों-मुनियों सहित अनेक देवताओं ने आदिमाता से महिषासुर का बंदोबस्त करने की प्रार्थना की।
करने का अनुरोध किया। सभी के अनुरोध को मान देकर आदिमाता आडगांव में प्रकट हुईं और महिषासुर से युद्ध करने के लिए तैयार हो गईं। देवी का महिषासुर के साथ युद्ध जिस स्थान पर हुआ, वह शिरागड की वर्तमान मंदिर वाली पहाड़ी है। इस युद्ध में देवी के सामने महिषासुर टिक नहीं सका। अतः अपनी जान बचाने के लिए महिषासुर इस स्थान से भाग गया और सप्तश्रृंगी गड पर जाकर छिप गया। परंतु देवी पीछा करते हुए वहां भी पहुंच गईं और उन्होंने वहां उसका वध कर दिया। जिस स्थान पर महिषासुर का वध हुआ, उसी स्थान पर फिर देवी ने निवास किया। सप्तश्रृंगी निवासिनी के रूप में देवी को सप्तश्रृंगी नाम प्राप्त हुआ। तब से सप्तश्रृंगी बड़ा गड और शिरागड स्थित देवी का जागृत स्थान छोटे गड के रूप में प्रसिद्ध है।
शिरागड गाँव की सीमा पर, तापी नदी के तट पर, सप्तश्रृंगी देवी का यह जागृत स्थान है। शिरागड गाँव से नदी के पात्र से नाव द्वारा इस मंदिर में आना पड़ता है। नदी के तट से लगभग १५० सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है।
यह मंदिर एक छोटी पहाड़ी के पठार पर स्थित है। यहाँ मंदिर के सामने होमकुंड और एक बड़ा त्रिशूल है। इस मंदिर की संरचना में सभामंडप और प्रदक्षिणामार्ग को छोड़कर गर्भगृह है। प्रवेश द्वार के ऊपरी भाग पर सूर्य और चंद्र की प्रतिमाएँ हैं। सभामंडप में मध्य भाग में देवी के वाहन बाघ की मूर्ति और उसके सामने पीतल की कूर्ममूर्ति है। सभामंडप की दीवारों पर देवी के विभिन्न रूपों की प्रतिमाएँ अंकित हैं।
गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित सुनहरी नक्काशीदार मखमल में, चार फुट ऊँची, पाषाण में उत्कीर्ण देवी की मूर्ति है। सिंह पर आरूढ़ इस देवी का स्वरूप सौम्य प्रतीत होता है। देवी के १८ हाथों में विभिन्न आयुध हैं। इसीलिए इस देवी को ‘अष्टादश देवी’ भी कहा जाता है। देवी का बायाँ हाथ कान के पीछे है और गर्दन तिरछी है। सिर पर मुकुट, कानों में कर्णफूल, नाक में नथ, गले में मंगलसूत्र, पुतलियों का हार, हाथों में हरी चूड़ियाँ, कमर में करधनी, पैरों में तोड़े जैसे अलंकार सुशोभित हैं। इस मूर्ति के सामने देवी की छोटी सिंदूर-लेपित व्याघ्रारूढ़ पाषाण मूर्ति है। वहीं वज्रपीठ के सामने की ओर नीचे देवली में गणेश जी की सिंदूर-लेपित मूर्ति विराजमान है।
मंदिर के परिसर में हनुमान जी की एक विशाल प्राचीन मूर्ति है। एक हाथ में द्रोणागिरी पर्वत और दूसरे हाथ में गदा लिए हुए, यह सिंदूर से सुशोभित पाषाण मूर्ति है। देवी के मुख्य मंदिर के पीछे की ओर एक छोटे मंदिर में भी सप्तशृंगी देवी की एक बड़ी मूर्ति विराजमान है। इस मंदिर में शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव, कोजागिरी पूर्णिमा, गुड़ी पड़वा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन आदि उत्सव मनाए जाते हैं। इन समारोहों के समय अनेक भक्त इस देवी के दर्शन के लिए आते हैं। नवरात्र में आने वाले हज़ारों भक्तों के कारण यह परिसर एक तीर्थस्थल का रूप ले लेता है।
उपयोगी जानकारी
- यावल से २४ किमी, तो जलगाँव से २० किमी की दूरी पर
- यावल और जलगाँव से एसटी की सुविधा
- पार्किंग से आगे नाव की यात्रा है।
- निजी वाहनें शिरागड स्थित मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकती हैं।
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है।
સપ્તશૃંગી માતા મંદિર
શિરાગઢ, તા. યાવલ, જિ. જળગાંવ

આદિમાયા ભગવતીના ૧૦૮ શક્તિપીઠો પૈકી સાડા ત્રણ પીઠ મહારાષ્ટ્રમાં આવેલા છે. કોલ્હાપુરની મહાલક્ષ્મી, તુલજાપુરની ભવાની માતા, માહુરની મહાકાલી (રેણુકાદેવી) આ પૂર્ણપીઠ છે, જ્યારે વણીની સપ્તશૃંગી દેવીને આદ્ય અને અર્ધપીઠ માનવામાં આવે છે. સપ્તશૃંગી ગઢ પર સ્થિત આ દેવી મહાકાલી, મહાલક્ષ્મી અને મહાસરસ્વતી આ ત્રણેય સ્થાનોનું ત્રિગુણાત્મક સ્વરૂપ હોવાનું મનાય છે. એવી માન્યતા છે કે સપ્તશૃંગી ગઢ પર જતા પહેલા દેવીનું નિવાસસ્થાન શિરાગઢના આ પહાડ પર હતું. તેથી આજે પણ આ સ્થાનને દેવીનું પિયર અને લહાનગઢ તરીકે સંબોધવામાં આવે છે.
પૌરાણિક આખ્યાયિકાઓ અનુસાર, દેવી સતી રાજા દક્ષ પ્રજાપતિની પુત્રી અને મહાદેવની પત્ની છે. એકવાર રાજા દક્ષે યજ્ઞનું આયોજન કર્યું અને મહાદેવ સિવાયના તમામ દેવોને તે માટે આમંત્રિત કર્યા. સતીને આ સમજાયા પછી તેણે પિતા પાસે જઈને આનો જવાબ માંગ્યો. તે સમયે દક્ષે મહાદેવની નિંદા કરી. પતિ વિશેના તે અપમાનજનક શબ્દો સાંભળીને સતી ક્રોધિત થઈ અને તે
ક્રોધાવેશમાં આવીને ત્યાં ચાલી રહેલા યજ્ઞમાં તેમણે પોતાના પ્રાણની આહુતિ આપી. શંકરને આ વાતની જાણ થતાં તેઓ અત્યંત ક્રોધિત થયા. યજ્ઞસ્થળે આવીને તેમણે સતીના મૃત શરીરને તે યજ્ઞમાંથી બહાર કાઢ્યું. તેને હાથમાં લઈને તેઓ શોક અને સંતાપમાં આમ-તેમ ભટકવા લાગ્યા. રુદ્રાવતાર ધારણ કરીને શંકરે તાંડવ નૃત્ય કરવાનું શરૂ કર્યું. તેનાથી પૃથ્વીનો વિનાશ થઈ શકે તેમ હોવાથી બધા દેવો ચિંતામાં મુકાઈ ગયા.
ત્યારે ભગવાન વિષ્ણુએ સુદર્શન ચક્ર વડે સતીના શરીરના ટુકડા કર્યા. સતીના દેહના ભાગો અને આભૂષણો જે જે સ્થળે પડ્યા તે દેવીના શક્તિપીઠ બન્યા. દેવીનાં આવાં ૫૧ શક્તિપીઠ ભારત, પાકિસ્તાન, બાંગ્લાદેશ, નેપાળ અને તિબેટ જેવા દેશોમાં આવેલાં છે. દેવીભાગવત ગ્રંથમાં ઉલ્લેખ અનુસાર આવાં ૧૦૮ શક્તિપીઠ છે.
શિરાગઢ સ્થિત સપ્તશૃંગી મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે પ્રાચીન કાળમાં અહીં નજીકના આડગામ વિસ્તારમાં ઋષિમુનિઓ દ્વારા વિશ્વકલ્યાણ માટે મહાયજ્ઞ કરવામાં આવી રહ્યો હતો. તેમાં મહિષાસુર રાક્ષસ વિઘ્નો નાખી રહ્યો હતો. તે સમયે ઋષિમુનિઓ સાથે અનેક દેવતાઓએ આદિમાતા પાસે મહિષાસુરનો બંધોબસ્ત
કરવાની વિનંતી કરી. સૌની વિનંતીને માન આપીને આદિમાતા આડગામ ખાતે પ્રગટ થયાં અને મહિષાસુર સાથે યુદ્ધ કરવા માટે સજ્જ થયાં. દેવીનું મહિષાસુર સાથે જે સ્થળે યુદ્ધ થયું હતું, તે સ્થાન એટલે શિરાગઢ ખાતે આવેલી હાલની મંદિરવાળી ટેકરી છે. આ યુદ્ધમાં દેવી સામે મહિષાસુર ટકી શક્યો નહીં. તેથી જીવ બચાવવા માટે મહિષાસુર આ સ્થળેથી ભાગી ગયો અને સપ્તશૃંગી ગઢ પર જઈને છુપાઈ ગયો. પરંતુ દેવી તેનો પીછો કરતાં ત્યાં પણ પહોંચ્યાં અને તેમણે ત્યાં તેનો વધ કર્યો. જે સ્થળે મહિષાસુરનો વધ થયો, તે જ સ્થળે પછી દેવીએ નિવાસ કર્યો. સપ્તશૃંગી નિવાસિની તરીકે દેવીને સપ્તશૃંગી એવું નામ મળ્યું. ત્યારથી સપ્તશૃંગી એ મોટો ગઢ અને શિરાગઢ ખાતેનું દેવીનું જાગૃત સ્થાન નાનો ગઢ તરીકે પ્રસિદ્ધ છે.
શિરાગઢ ગામના પાદરે, તાપી નદીના કિનારે, સપ્તશૃંગી દેવીનું આ જાગૃત સ્થાન છે. શિરાગઢ ગામથી નદીના પાત્રમાંથી હોડી દ્વારા આ મંદિરે આવવું પડે છે. નદીના તટ પરથી આશરે ૧૫૦ પગથિયાં ચઢીને મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે.
આ મંદિર એક નાનકડી ટેકરીના ઉચ્ચપ્રદેશ પર સ્થિત છે. અહીં મંદિરની સામે હોમકુંડ અને એક વિશાળ ત્રિશૂળ છે. સભામંડપ અને પ્રદક્ષિણામાર્ગ છોડીને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ સૂર્ય અને ચંદ્રની પ્રતિમાઓ છે. સભામંડપમાં મધ્યભાગમાં દેવીનું વાહન એવા વાઘની મૂર્તિ અને તેની સામે પિત્તળની કૂર્મમૂર્તિ છે. સભામંડપની દીવાલો પર દેવીના વિવિધ રૂપોની પ્રતિમાઓ આલેખાયેલી છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર રહેલા સુવર્ણ જડિત મખમલમાં, ચાર ફૂટ ઊંચી, પાષાણમાં કોતરેલી દેવીની મૂર્તિ છે. સિંહ પર આરૂઢ થયેલા આ દેવીનું સ્વરૂપ સૌમ્ય લાગે છે. દેવીના ૧૮ હાથોમાં વિવિધ આયુધો છે. તેથી આ દેવીને ‘અષ્ટાદશ દેવી’ પણ કહેવામાં આવે છે. દેવીનો ડાબો હાથ કાનની પાછળ અને ગરદન નમેલી છે. માથા પર મુકુટ, કાનમાં કર્ણફૂલ, નાકમાં નથણી, ગળામાં મંગળસૂત્ર, સોનાના સિક્કાનો હાર, હાથમાં લીલી બંગડીઓ, કમર પર કમરપટ્ટો, પગમાં તોડા જેવા અલંકારો છે. આ મૂર્તિની સામે દેવીની નાની સિંદૂરથી લેપિત વાઘ પર સવાર પાષાણમૂર્તિ છે. તો વજ્રપીઠની સામેની બાજુએ નીચે દેવળીમાં ગણેશજીની સિંદૂરથી લેપિત મૂર્તિ બિરાજમાન છે.
મંદિરના પરિસરમાં હનુમાનજીની એક વિશાળ પ્રાચીન મૂર્તિ છે. એક હાથમાં દ્રોણાગિરિ પર્વત અને બીજા હાથમાં ગદા ધારણ કરેલી, આ સિંદૂરથી લેપિત પાષાણની મૂર્તિ છે. દેવીના મુખ્ય મંદિરની પાછળના ભાગમાં એક નાના મંદિરમાં પણ સપ્તશૃંગી દેવીની વિશાળ મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મંદિરમાં શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ, ચૈત્ર નવરાત્રિ ઉત્સવ, કોજાગિરી પૂર્ણિમા, ગુડી પડવો, ગોકુળાષ્ટમી, લક્ષ્મીપૂજન વગેરે ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. આ ઉત્સવો દરમિયાન અનેક ભાવિકો દેવીના દર્શન કરવા માટે આવે છે. નવરાત્રિમાં આવતા હજારો ભક્તોને કારણે આ પરિસર જાણે કોઈ યાત્રાધામ જેવું લાગે છે.
ઉપયોગી માહિતી
- યાવલથી ૨૪ કિમી, તો જળગાંવથી ૨૦ કિમી અંતરે
- યાવલ અને જળગાંવથી એસ.ટી. (GSRTC) ની સુવિધા
- પાર્કિંગથી આગળ હોડીની મુસાફરી છે.
- ખાનગી વાહનો શિરાગઢ સ્થિત મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે.
- પરિસરમાં રહેઠાણ અને નાસ્તાની સુવિધા નથી.
சப்தசிருங்கி மாதா கோவில்
ஷிராகட், தாலுகா யாவல், மாவட்டம் ஜள்காவ்

ஆதிமாயா பகவதியின் ௧௦௮ சக்தி பீடங்களில் மூன்றரை பீடங்கள் மகாராஷ்டிராவில் உள்ளன. கோலாப்பூரின் மஹாலக்ஷ்மி, துல்ஜாப்பூரின் பவானி மாதா, மாஹூரின் மஹாகாளி (ரேணுகாதேவி) ஆகியவை முழு பீடங்கள், அதேபோல் வணியின் சப்தசிருங்கி தேவி ஆத்ய மற்றும் அரை பீடமாகக் கருதப்படுகிறது. சப்தசிருங்கி மலையில் அமைந்துள்ள இந்த தேவி, மஹாகாளி, மஹாலக்ஷ்மி, மஹாசரஸ்வதி ஆகிய மூன்று இடங்களின் முக்குண வடிவமாகத் திகழ்கிறார் என்று நம்பப்படுகிறது. சப்தசிருங்கி மலைக்குச் செல்வதற்கு முன்பு தேவி ஷிராகட் என்ற இந்த மலையில் வசித்து வந்தார் என்பது ஐதீகம். எனவே, இன்றும் இந்த இடம் தேவியின் தாய்வீடு மற்றும் சிறிய மலை (லஹான்கட்) என்று அழைக்கப்படுகிறது.
புராணக் கதைகளின்படி, தேவி சதி ராஜா தக்ஷ பிரஜாபதியின் மகள் மற்றும் மஹாதேவனின் மனைவி. ஒருமுறை ராஜா தக்ஷன் யாகத்தை ஏற்பாடு செய்து, மஹாதேவனைத் தவிர மற்ற அனைத்து தேவர்களையும் அதற்கு அழைத்தார். இதையறிந்த சதி, தன் தந்தையிடம் சென்று இதற்கான காரணத்தைக் கேட்டார். அப்போது தக்ஷன் மஹாதேவனை இழிவுபடுத்தினான். தன் கணவரைப் பற்றிய அந்த அவமானகரமான சொற்களைக் கேட்டு சதி கோபமடைந்து, அந்த
கோபத்திலேயே அங்கு நடைபெற்றுக்கொண்டிருந்த யாகத்தில் தன் உயிரைத் தியாகம் செய்தார். இதையறிந்த சங்கரர் மிகுந்த கோபமடைந்தார். யாக இடத்திற்கு வந்து, சதியின் இறந்த உடலை யாகத்திலிருந்து வெளியே எடுத்தார். அதை கையில் ஏந்தி, துக்கத்தாலும் கோபத்தாலும் அங்கும் இங்கும் அலைந்தார். ருத்ராவதாரம் எடுத்த சங்கரர் தாண்டவ நடனம் ஆடினார். இதனால் பூமி அழியக்கூடும் என்பதால் அனைத்து தேவர்களும் கவலையடைந்தனர்.
அப்போது பகவான் விஷ்ணு சுதர்சன சக்கரத்தால் சதியின் உடலைத் துண்டாக்கினார். சதியின் உடலின் பாகங்கள் மற்றும் ஆபரணங்கள் விழுந்த இடங்கள் தேவியின் சக்தி பீடங்களாக மாறின. தேவியின் இத்தகைய ௫௧ சக்தி பீடங்கள் இந்தியா, பாகிஸ்தான், வங்கதேசம், நேபாளம் மற்றும் திபெத் ஆகிய நாடுகளில் உள்ளன. தேவிபாகவதம் நூலில் உள்ள குறிப்புகளின்படி ௧௦௮ சக்தி பீடங்கள் உள்ளன.
ஷிராகட்டில் உள்ள சப்தசிருங்கி கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், பண்டைய காலத்தில் அருகில் உள்ள ஆட்காவ் பகுதியில் முனிவர்கள் உலக நலனுக்காக மஹா யாகம் செய்து வந்தனர். அதில் மகிஷாசுரன் என்ற அரக்கன் இடையூறு செய்து வந்தான். அப்போது முனிவர்களுடன் பல தேவர்கள் ஆதிமாதாவிடம் மகிஷாசுரனை ஒழிக்க
வேண்டுகோள் விடுத்தனர். அனைவரின் வேண்டுகோளையும் ஏற்று ஆதிமாதா ஆட்காவ் பகுதியில் தோன்றி, மகிஷாசுரனுடன் போரிடத் தயாரானார். தேவி மகிஷாசுரனுடன் போரிட்ட இடமே ஷிராகட்டில் தற்போது கோவில் உள்ள மலை ஆகும். இந்த போரில் தேவிக்கு முன்னால் மகிஷாசுரனால் தாக்குப்பிடிக்க முடியவில்லை. அதனால் உயிரைக் காப்பாற்றிக்கொள்ள மகிஷாசுரன் இந்த இடத்திலிருந்து தப்பி ஓடி சப்தசிருங்கி மலைக்குச் சென்று ஒளிந்துகொண்டான். ஆனால் தேவி துரத்திச் சென்று அங்கேயும் அவனை வதம் செய்தார். மகிஷாசுரன் வதம் செய்யப்பட்ட இடத்திலேயே தேவி குடியேறினார். சப்தசிருங்கி வாசினி என்பதால் தேவிக்கு சப்தசிருங்கி என்ற பெயர் வந்தது. அன்றிலிருந்து சப்தசிருங்கி பெரிய மலை என்றும், ஷிராகட்டில் உள்ள தேவியின் ஜாக்ருத (விழித்திருக்கும்) இடம் சிறிய மலை என்றும் புகழ்பெற்றது.
ஷிராகட் கிராமத்தின் எல்லையில், தாபி நதிக்கரையில் தேவியின் இந்த ஜாக்ருத தலம் உள்ளது. ஷிராகட் கிராமத்திலிருந்து நதி வழியாகப் படகில் இந்த கோவிலுக்கு வர வேண்டும். நதிக்கரையிலிருந்து சுமார் ௧௫௦ படிகள் ஏறி கோவிலின் வளாகத்திற்குள் நுழையலாம்.
சிறிய மலையின் மேட்டுப்பகுதியில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள கோவிலுக்கு முன்னால் ஹோமகுண்டம் மற்றும் பெரிய திரிசூலம் உள்ளது. சபாமண்டபம் மற்றும் பிரதட்சிண பாதை தவிர கருவறை என இந்த கோவிலின் அமைப்பு உள்ளது. நுழைவாயிலின் மேற்புறத்தில் சூரியன் மற்றும் சந்திரனின் உருவங்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் நடுவில் தேவியின் வாகனமான புலியின் சிலையும், அதற்கு முன்னால் பித்தளை கூர்ம (ஆமை) சிலையும் உள்ளது. சபாமண்டபத்தின் சுவர்களில் தேவியின் பல்வேறு வடிவங்கள் வரையப்பட்டுள்ளன.
கருவறையில் வஜ்ர பீடத்தில் உள்ள தங்க வேலைப்பாடுகள் கொண்ட மகுடத்தில், நான்கு அடி உயரமுள்ள, கல்லில் செதுக்கப்பட்ட தேவியின் சிலை உள்ளது. சிங்கத்தின் மீது அமர்ந்திருக்கும் இந்த தேவியின் வடிவம் சாந்தமாகத் தோன்றுகிறது. தேவியின் ௧௮ கைகளில் பல்வேறு ஆயுதங்கள் உள்ளன. எனவே இந்த தேவியை ‘அஷ்டாதச தேவி’ என்றும் அழைக்கிறார்கள். தேவியின் இடது கை காதிற்குப் பின்னால் உள்ளது மற்றும் கழுத்து சாய்ந்த நிலையில் உள்ளது. தலையில் கிரீடம், காதில் கடுக்கண், மூக்கில் மூக்குத்தி, கழுத்தில் மங்கலசூத்திரம், கைகளில் பச்சை வளையல்கள், இடுப்பில் ஒட்டியாணம், காலில் கொலுசு போன்ற ஆபரணங்கள் உள்ளன. இந்த சிலைக்கு முன்னால் தேவியின் சிறிய குங்குமம் பூசப்பட்ட புலியின் மீது அமர்ந்திருக்கும் கல் சிலை உள்ளது. வஜ்ர பீடத்தின் முன்புறம் கீழே உள்ள சிறிய அறையில் கணேஷரின் குங்குமம் பூசப்பட்ட சிலை வீற்றிருக்கிறது.
கோவில் வளாகத்தில் ஹனுமானின் பெரிய பழமையான சிலை உள்ளது. ஒரு கையில் துரோணகிரி மலையையும், மறு கையில் கதையையும் ஏந்தியபடி, குங்குமம் பூசப்பட்ட இந்த கல் சிலை உள்ளது. தேவியின் முக்கிய கோவிலுக்குப் பின்னால் உள்ள ஒரு சிறிய கோவிலிலும் சப்தசிருங்கி தேவியின் பெரிய சிலை வீற்றிருக்கிறது. இந்த கோவிலில் சாரதீய நவராத்திரி விழா, சைத்ர நவராத்திரி விழா, கோஜாகிரி பௌர்ணமி, குடிபட்வா, கோகுலாஷ்டமி, லக்ஷ்மி பூஜை போன்ற விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த விழாக்களின் போது பல பக்தர்கள் தேவியின் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள். நவராத்திரியில் வரும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களால் இந்த பகுதி திருவிழாக் கோலம் பூணுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- யாவலிலிருந்து ௨௪ கி.மீ, ஜள்காவிலிருந்து ௨௦ கி.மீ தொலைவில்
- யாவல் மற்றும் ஜள்காவிலிருந்து GSRTC பேருந்து வசதி
- வாகன நிறுத்துமிடத்திலிருந்து படகுப் பயணம் உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் ஷிராகட் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவக வசதி இல்லை
సప్తశృంగి మాత ఆలయం
శిరాగడ, తా. యావల్, జి. జలగావ్

ఆదిమాయ భగవతి యొక్క ౧౦౮ శక్తిపీఠాలలో మూడున్నర పీఠాలు మహారాష్ట్రలో ఉన్నాయి. కొల్హాపూర్ మహాలక్ష్మి, తులజాపూర్ భవాని మాత, మహూర్ మహాకాళి (రేణుకాదేవి) అనేవి పూర్ణపీఠాలు, అలాగే వణిలోని సప్తశృంగి దేవిని ఆద్య మరియు అర్ధపీఠంగా పరిగణిస్తారు. సప్తశృంగి గడపై కొలువై ఉన్న ఈ దేవి, మహాకాళి, మహాలక్ష్మి, మహాసరస్వతి అనే మూడు స్థానాల త్రిగుణాత్మక స్వరూపమని నమ్ముతారు. సప్తశృంగి గడకు వెళ్లే ముందు దేవి శిరాగడలోని ఈ కొండపై నివసించేదని ఒక నమ్మకం ఉంది. అందుకే నేటికీ ఈ స్థానాన్ని దేవి పుట్టినిల్లు మరియు లహన్గడ అని పిలుస్తారు.
పురాణ గాథల ప్రకారం, దేవీ సతి రాజా దక్ష ప్రజాపతి కుమార్తె మరియు మహాదేవుని భార్య. ఒకసారి రాజా దక్షుడు యజ్ఞాన్ని నిర్వహించి, మహాదేవుని మినహాయించి మిగిలిన దేవతలందరినీ దానికి ఆహ్వానించాడు. సతికి ఈ విషయం తెలిసినప్పుడు, ఆమె తన తండ్రి వద్దకు వెళ్లి దీని గురించి నిలదీసింది. ఆ సమయంలో దక్షుడు మహాదేవుని నిందించాడు. తన భర్త గురించి ఆ అవమానకరమైన మాటలను విని సతి క్రోధావేశానికి లోనై, ఆ
కోపంతోనే అక్కడ జరుగుతున్న యజ్ఞంలో ఆమె తన ప్రాణాలను అర్పించింది. ఈ విషయం తెలిసిన శంకరుడు అత్యంత ఆగ్రహోదగ్రుడయ్యారు. యజ్ఞస్థలానికి చేరుకుని, ఆయన సతీదేవి మృతదేహాన్ని ఆ యజ్ఞం నుండి బయటకు తీశారు. ఆ దేహాన్ని చేతుల్లో పట్టుకుని శోకసంతాపంతో అటు ఇటు తిరగసాగారు. రుద్రావతారాన్ని ధరించి శంకరుడు తాండవ నృత్యం చేయడం ప్రారంభించారు. దానివల్ల భూమి నాశనమయ్యే ప్రమాదం ఉందని దేవతలందరూ ఆందోళన చెందారు.
ఆ సమయంలో భగవాన్ విష్ణువు సుదర్శన చక్రంతో సతీదేవి శరీరాన్ని ఖండించారు. సతీదేవి దేహ భాగాలు మరియు ఆభరణాలు ఏ ఏ ప్రదేశాలలో పడ్డాయో, ఆ ప్రదేశాలు శక్తిపీఠాలుగా వెలిశాయి. అటువంటి ౫౧ శక్తిపీఠాలు భారతదేశం, పాకిస్థాన్, బంగ్లాదేశ్, నేపాల్ మరియు టిబెట్ దేశాలలో ఉన్నాయి. దేవీ భాగవత గ్రంథంలోని ఉల్లేఖన ప్రకారం, మొత్తం ౧౦౮ శక్తిపీఠాలు ఉన్నాయి.
శిరాగడలోని సప్తశృంగి మాతా మందిరానికి సంబంధించిన పురాణగాథ ఏమిటంటే, ప్రాచీన కాలంలో ఇక్కడికి సమీపంలో ఉన్న ఆడ్గావ్ ప్రాంతంలో ఋషిమునులు లోకకల్యాణం కోసం ఒక మహా యజ్ఞాన్ని నిర్వహిస్తుండేవారు. ఆ యజ్ఞానికి మహిషాసురుడనే రాక్షసుడు అనేక విఘ్నాలు కలిగిస్తుండేవాడు. ఆ సమయంలో ఋషిమునులతో పాటు అనేకమంది దేవతలు ఆదిమాతను ప్రార్థించి, మహిషాసురుడిని అంతం చేయవలసిందిగా కోరారు.
అభ్యర్థించారు. అందరి అభ్యర్థనను మన్నించి ఆదిమాత ఆడగావ్లో ప్రత్యక్షమై మహిషాసురుడితో యుద్ధం చేయడానికి సిద్ధమైంది. దేవికి మహిషాసురుడికి యుద్ధం జరిగిన ప్రదేశమే శిరాగడ్లోని ప్రస్తుతం ఆలయం ఉన్న కొండ. ఈ యుద్ధంలో దేవి ముందు మహిషాసురుడు నిలవలేకపోయాడు. దాంతో ప్రాణాలు కాపాడుకోవడానికి మహిషాసురుడు ఈ ప్రదేశం నుండి పారిపోయి సప్తశృంగి గడకు వెళ్లి దాక్కున్నాడు. కానీ దేవి వెంబడిస్తూ అక్కడికి కూడా చేరుకుని, అక్కడ వాడిని సంహరించింది. మహిషాసురుడిని సంహరించిన చోటే దేవి నివాసం ఏర్పరుచుకుంది. సప్తశృంగి నివాసినిగా దేవికి సప్తశృంగి అనే పేరు వచ్చింది. అప్పటి నుండి సప్తశృంగి పెద్ద గడగా, శిరాగడ్లోని దేవి యొక్క జాగృత స్థానం చిన్న గడగా ప్రసిద్ధి చెందాయి.
శిరాగడ గ్రామం సరిహద్దులో, తాపీ నది ఒడ్డున, సప్తశృంగీ దేవి యొక్క ఈ జాగృత క్షేత్రం వెలసి ఉంది. శిరాగడ గ్రామం నుండి నదీ ప్రవాహం మీదుగా పడవలో ఈ ఆలయానికి చేరుకోవాలి. నది ఒడ్డు నుండి సుమారు ౧౫౦ మెట్లు ఎక్కి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు.
ఈ ఆలయం ఒక చిన్న కొండ పీఠభూమిపై ఉంది. ఇక్కడి ఆలయానికి ముందు హోమగుండం మరియు పెద్ద త్రిశూలం ఉన్నాయి. ఈ ఆలయ నిర్మాణం సభామండపం, ప్రదక్షిణ మార్గం మరియు గర్భాలయాన్ని కలిగి ఉంటుంది. ప్రవేశ ద్వారం పైభాగంలో సూర్య మరియు చంద్రుల ప్రతిమలు ఉన్నాయి. సభామండపంలో మధ్యభాగంలో దేవి వాహనమైన పులి విగ్రహం మరియు దానికి ఎదురుగా ఇత్తడి కూర్మమూర్తి ఉన్నాయి. సభామండపం గోడలపై దేవి యొక్క వివిధ రూపాల చిత్రాలు చిత్రీకరించబడ్డాయి.
గర్భాలయంలోని వజ్రపీఠంపై ఉన్న బంగారు నగిషీలు కలిగిన మకరంలో, నాలుగు అడుగుల ఎత్తు గల, పాషాణంతో చెక్కబడిన దేవీ విగ్రహం ఉంది. సింహవాహిని అయిన ఈ దేవి రూపం సౌమ్యంగా కనిపిస్తుంది. దేవి యొక్క ౧౮ చేతులలో వివిధ ఆయుధాలు ఉన్నాయి. అందుకే ఈ దేవిని ‘అష్టాదశ దేవి’ అని కూడా పిలుస్తారు. దేవి ఎడమ చేయి చెవి వెనుక భాగంలో ఉండి, మెడ వంగి ఉంటుంది. తలపై కిరీటం, చెవులకు కమ్మలు, ముక్కుకు ముక్కుపుడక, మెడలో మంగళసూత్రం, పుత్తడి గొలుసులు, చేతులకు పచ్చని గాజులు, నడుముకు వడ్డాణం, పాదాలకు అందెలు వంటి ఆభరణాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహం ముందు దేవికి చెందిన చిన్న సింధూర పూజితమైన వ్యాఘ్రారూఢ పాషాణ విగ్రహం ఉంది. అలాగే వజ్రపీఠానికి ముందు భాగంలో క్రింద ఉన్న దేవాలయంలో గణేశుని సింధూర పూజిత విగ్రహం కొలువై ఉంది.
ఆలయ ప్రాంగణంలో హనుమంతుని యొక్క పెద్ద ప్రాచీన విగ్రహం ఉంది. ఒక చేతిలో ద్రోణగిరి పర్వతాన్ని మరియు మరొక చేతిలో గదను ధరించి ఉన్న ఈ సింధూర లేపిత పాషాణ విగ్రహం ఎంతో అద్భుతంగా ఉంటుంది. దేవి ప్రధాన ఆలయానికి వెనుక భాగంలో ఉన్న ఒక చిన్న ఆలయంలో కూడా సప్తశృంగి దేవి యొక్క పెద్ద విగ్రహం కొలువై ఉంది. ఈ ఆలయంలో శరన్నవరాత్రి ఉత్సవం, చైత్ర నవరాత్రి ఉత్సవం, కోజాగరి పౌర్ణమి, గుడిపడ్వా, గోకులాష్టమి, లక్ష్మీపూజ మొదలైన పండుగలను ఘనంగా జరుపుకుంటారు. ఈ వేడుకల సమయంలో అనేకమంది భక్తులు ఈ దేవిని దర్శించుకోవడానికి వస్తారు. నవరాత్రులలో వచ్చే వేలాది మంది భక్తుల వల్ల ఈ ప్రాంతం ఒక జాతరలా కనిపిస్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- యావల నుండి ౨౪ కి.మీ., అలాగే జలగావ్ నుండి ౨౦ కి.మీ. దూరంలో
- యావల్ మరియు జలగావ్ నుండి ఎస్టి (GSRTC) సౌకర్యం కలదు.
- వాహన పార్కింగ్ నుండి ముందుకు పడవ ప్రయాణం ఉంటుంది.
- ప్రైవేటు వాహనాలు షిరాగడ్ ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు.
- ఆ ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యాలు లేవు.
സപ്തശൃംഗി മാതാ ക്ഷേത്രം
ഷിരാഗഡ്, താലൂക്ക് യാവൽ, ജില്ല ജൽഗാവ്

ആദിമായാ ഭഗവതിയുടെ ൧൦൮ ശക്തിപീഠങ്ങളിൽ മൂന്നര പീഠങ്ങൾ മഹാരാഷ്ട്രയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കൊൽഹാപ്പൂരിലെ മഹാലക്ഷ്മി, തുൾജാപ്പൂരിലെ ഭവാനി മാതാ, മാഹൂരിലെ മഹാകാളി (രേണുകാദേവി) എന്നിവ പൂർണ്ണപീഠങ്ങളും, വണിയിലെ സപ്തശൃംഗി ദേവി ആദ്യാർദ്ധപീഠമായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. സപ്തശൃംഗി ഗഡിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ദേവി, മഹാകാളി, മഹാലക്ഷ്മി, മഹാസരസ്വതി എന്നീ മൂന്ന് ഭാവങ്ങളുടെയും ത്രിഗുണാത്മകമായ സ്വരൂപമാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. സപ്തശൃംഗി ഗഡിലേക്ക് പോകുന്നതിന് മുൻപ് ദേവി വസിച്ചിരുന്നത് ശിരാഗഡിലെ ഈ മലയിലായിരുന്നു എന്നാണ് വിശ്വാസം. അതിനാൽ ഇന്നും ഈ സ്ഥലത്തെ ദേവിയുടെ ‘മാഹേർ’ (തറവാട്) എന്നും ‘ലഹാൻഗഡ്’ എന്നും വിളിക്കുന്നു.
പുരാണ ഐതിഹ്യങ്ങൾ അനുസരിച്ച്, ദേവി സതി രാജാവ് ദക്ഷ പ്രജാപതിയുടെ മകളും മഹാദേവന്റെ പത്നിയുമാണ്. ഒരിക്കൽ രാജാവ് ദക്ഷൻ ഒരു യാഗം സംഘടിപ്പിക്കുകയും, മഹാദേവനെ ഒഴികെ മറ്റെല്ലാ ദേവന്മാരെയും അതിലേക്ക് ക്ഷണിക്കുകയും ചെയ്തു. സതി ഇതറിഞ്ഞപ്പോൾ, പിതാവിന്റെ അടുക്കൽ ചെന്ന് ഇതിനെക്കുറിച്ച് ചോദിച്ചു. ആ സമയത്ത് ദക്ഷൻ മഹാദേവനെ നിന്ദിച്ചു. ഭർത്താവിനെക്കുറിച്ചുള്ള ആ അപമാനകരമായ വാക്കുകൾ കേട്ട സതി കോപിഷ്ഠയാവുകയും ആ
ക്രോധാവേശത്തോടെ അവിടെ നടന്നുകൊണ്ടിരുന്ന യജ്ഞത്തിൽ അവൾ തന്റെ ജീവൻ ബലിയർപ്പിച്ചു. ഇതറിഞ്ഞ ശങ്കരൻ അതീവ കോപിഷ്ഠനായി. യജ്ഞസ്ഥലത്തെത്തി അദ്ദേഹം സതിയുടെ മൃതദേഹം ആ യജ്ഞത്തിൽ നിന്ന് പുറത്തെടുത്തു. അത് കൈയ്യിലേന്തി അദ്ദേഹം തീരാദുഃഖത്തോടെയും രോഷത്തോടെയും അങ്ങുമിങ്ങും അലഞ്ഞുനടന്നു. രൗദ്രാവതാരം പൂണ്ട ശങ്കരൻ താണ്ഡവനൃത്തം ആരംഭിച്ചു. ഇതിനാൽ പ്രപഞ്ചം നശിച്ചേക്കുമെന്ന് ഭയന്ന ദേവന്മാരെല്ലാം അതീവ ചിന്താകുലരായി.
ആ സമയത്ത് ഭഗവാൻ വിഷ്ണു സുദർശന ചക്രം കൊണ്ട് സതീദേവിയുടെ ശരീരം ഖണ്ഡിച്ചു. സതീദേവിയുടെ ശരീരഭാഗങ്ങളും ആഭരണങ്ങളും എവിടെയെല്ലാം പതിച്ചുവോ, അവിടെയെല്ലാം ദേവിയുടെ ശക്തിപീഠങ്ങൾ ഉണ്ടായി. ദേവിയുടെ അത്തരം ൫൧ ശക്തിപീഠങ്ങൾ ഭാരതം, പാകിസ്ഥാൻ, ബംഗ്ലാദേശ്, നേപ്പാൾ, ടിബറ്റ് എന്നീ രാജ്യങ്ങളിലായി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ദേവീഭാഗവതം എന്ന ഗ്രന്ഥത്തിലെ പരാമർശമനുസരിച്ച് ഇത്തരം ൧൦൮ ശക്തിപീഠങ്ങളാണുള്ളത്.
ഷിരഗഡിലെ സപ്തശൃംഗി ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: പുരാതന കാലത്ത് സമീപത്തുള്ള ആഡ്ഗാവ് പ്രദേശത്ത് ഋഷിമുനിമാർ ലോകക്ഷേമത്തിനായി ഒരു മഹായാഗം നടത്തിയിരുന്നു. അതിൽ മഹിഷാസുരൻ എന്ന രാക്ഷസൻ വിഘ്നങ്ങൾ സൃഷ്ടിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. ആ സമയത്ത് ഋഷിമുനിമാരും മറ്റ് ദേവതകളും ചേർന്ന് മഹിഷാസുരനെ നിഗ്രഹിക്കുന്നതിനായി ആദിമാതാവിനോട് പ്രാർത്ഥിച്ചു.
അഭ്യർത്ഥന മാനിച്ചുകൊണ്ട് ആദിമാതാവ് ആഡ്ഗാവിലെത്തി മഹിഷാസുരനുമായി യുദ്ധം ചെയ്യാൻ സജ്ജയായി. ദേവി മഹിഷാസുരനുമായി യുദ്ധം ചെയ്ത സ്ഥലമാണ് ഷിരാഗഡിലെ നിലവിൽ ക്ഷേത്രമുള്ള കുന്നിൻ പ്രദേശം. ഈ യുദ്ധത്തിൽ ദേവിക്ക് മുന്നിൽ പിടിച്ചുനിൽക്കാൻ മഹിഷാസുരന് കഴിഞ്ഞില്ല. അതിനാൽ ജീവൻ രക്ഷിക്കാനായി മഹിഷാസുരൻ ഈ സ്ഥലത്തുനിന്നും ഓടിപ്പോവുകയും സപ്തശൃംഗി ഗഡിൽ പോയി ഒളിക്കുകയും ചെയ്തു. എന്നാൽ ദേവി അവനെ പിന്തുടർന്ന് അവിടെയെത്തുകയും അവിടെ വെച്ച് അവനെ വധിക്കുകയും ചെയ്തു. മഹിഷാസുരനെ വധിച്ച അതേ സ്ഥലത്ത് ദേവി വസിച്ചു. സപ്തശൃംഗിയിൽ വസിക്കുന്നവൾ എന്ന അർത്ഥത്തിൽ ദേവിക്ക് സപ്തശൃംഗി എന്ന പേര് ലഭിച്ചു. അന്നുമുതൽ സപ്തശൃംഗി വലിയ ഗഡായും ഷിരാഗഡിലെ ദേവിയുടെ ജാഗൃത സ്ഥാനം ചെറിയ ഗഡായും പ്രശസ്തമായി.
ഷിരാഗഡ് ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ, താപി നദിയുടെ തീരത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സപ്തശൃംഗി ദേവിയുടെ ഈ പുണ്യസ്ഥലം അതീവ ചൈതന്യവത്താണ്. ഷിരാഗഡ് ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് നദിയിലൂടെ വള്ളത്തിൽ വേണം ഈ ക്ഷേത്രത്തിലെത്താൻ. നദീതീരത്തുനിന്ന് ഏകദേശം ൧൫൦ പടികൾ കയറിയാൽ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് എത്തിച്ചേരാം.
ഒരു ചെറിയ കുന്നിൻ മുകളിലെ പീഠഭൂമിയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ഹോമകുണ്ഡവും വലിയൊരു തൃശൂലവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും പ്രദക്ഷിണവഴിയും കഴിഞ്ഞ് ഗർഭഗൃഹം എന്ന രീതിയിലാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. പ്രവേശന കവാടത്തിന് മുകൾഭാഗത്തായി സൂര്യന്റെയും ചന്ദ്രന്റെയും പ്രതിമകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ദേവിയുടെ വാഹനമായ കടുവയുടെ പ്രതിമയും അതിന് മുന്നിലായി പിച്ചളയിൽ നിർമ്മിച്ച കൂർമ്മമൂർത്തിയുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഭിത്തികളിൽ ദേവിയുടെ വിവിധ രൂപങ്ങളിലുള്ള ചിത്രങ്ങൾ ആലേഖനം ചെയ്തിട്ടുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്വർണ്ണനിർമ്മിതമായ മഖ്റത്തിൽ, നാല് അടി ഉയരമുള്ള, ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്ത ദേവീവിഗ്രഹമാണുള്ളത്. സിംഹാരൂഢയായ ഈ ദേവിയുടെ രൂപം അതീവ സൗമ്യമാണ്. ദേവിയുടെ ൧൮ കൈകളിലും വിവിധ ആയുധങ്ങളുണ്ട്. അതിനാൽ ഈ ദേവിയെ ‘അഷ്ടാദശ ദേവി’ എന്നും വിളിക്കുന്നു. ദേവിയുടെ ഇടതുകൈ ചെവിക്ക് പിന്നിലായും കഴുത്ത് അല്പം ചരിഞ്ഞുമിരിക്കുന്നു. ശിരസ്സിൽ കിരീടം, ചെവിയിൽ കമ്മലുകൾ, മൂക്കിൽ മൂക്കുത്തി, കഴുത്തിൽ മംഗല്യസൂത്രം, സ്വർണ്ണനാണയങ്ങൾ കോർത്ത മാല, കൈകളിൽ പച്ച വളകൾ, അരയിൽ അരപ്പട്ട, കാലുകളിൽ പാദസരം തുടങ്ങിയ ആഭരണങ്ങൾ അണിഞ്ഞിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിന് മുന്നിലായി സിന്ദൂരമണിഞ്ഞ, വ്യാഘ്രാരൂഢയായ ദേവിയുടെ ചെറിയൊരു ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. വജ്രപീഠത്തിന്റെ മുൻവശത്തായി താഴെയുള്ള ചെറിയ അറയിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഹനുമാന്റെ വലിയൊരു പുരാതന വിഗ്രഹമുണ്ട്. ഒരു കൈയിൽ ദ്രോണഗിരി പർവ്വതവും മറുകൈയിൽ ഗദയും വഹിച്ചിരിക്കുന്ന സിന്ദൂരമണിഞ്ഞ ശിലാവിഗ്രഹമാണിത്. ദേവിയുടെ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലായുള്ള ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രത്തിൽ സപ്തശൃംഗി ദേവിയുടെ വലിയൊരു വിഗ്രഹവും പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവം, ചൈത്ര നവരാത്രി ഉത്സവം, കൊജാഗിരി പൗർണ്ണമി, ഗുഡിപഡ്വ, ഗോകുലാഷ്ടമി, ലക്ഷ്മിപൂജ തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ വിശേഷദിവസങ്ങളിൽ നിരവധി ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനായി എത്തുന്നു. നവരാത്രിയിൽ എത്തുന്ന ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ കാരണം ഈ പ്രദേശം ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ പ്രതീതി ഉളവാക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- യാവലിൽ നിന്ന് ൨൪ കി.മീ, ജൽഗാവുവിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ അകലെ
- യാവലിൽ നിന്നും ജൽഗാവുവിൽ നിന്നും ജി.എസ്.ആർ.ടി.സി. (GSRTC) ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- വാഹന പാര്ക്കിംഗിന് ശേഷം ബോട്ട് യാത്രയുണ്ട്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ഷിരാഗഡ് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണമോ ലഭ്യമല്ല.
ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ಶಿರಾಘಡ, ತಾ. ಯಾವಲ್, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್

ಆದಿಮಾಯಾ ಭಗವತಿಯ ೧೦೮ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಮೂರೂವರೆ ಪೀಠಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿವೆ. ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ತುಳಜಾಪುರದ ಭವಾನಿ ಮಾತೆ, ಮಾಹುರದ ಮಹಾಕಾಳಿ (ರೇಣುಕಾ ದೇವಿ) ಇವು ಪೂರ್ಣಪೀಠಗಳಾದರೆ, ವಣಿಯ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೇವಿಯನ್ನು ಆದ್ಯ ಮತ್ತು ಅರ್ಧಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಪ್ತಶೃಂಗ ಗಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ದೇವಿಯು ಮಹಾಕಾಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಮಹಾಸರಸ್ವತಿ ಎಂಬ ಮೂರೂ ಸ್ಥಾನಗಳ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕ ಸ್ವರೂಪವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಸಪ್ತಶೃಂಗ ಗಡಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮುನ್ನ ದೇವಿಯು ಶಿವಾಗಡದ ಈ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದಳು ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಂದಿಗೂ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ದೇವಿಯ ತವರು ಮನೆ ಮತ್ತು ಲಹನಗಡ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ.
ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ದೇವಿ ಸತಿಯು ರಾಜ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿಯ ಮಗಳು ಮತ್ತು ಮಹಾದೇವನ ಪತ್ನಿ. ಒಮ್ಮೆ ರಾಜ ದಕ್ಷನು ಯಜ್ಞವೊಂದನ್ನು ಆಯೋಜಿಸಿ, ಮಹಾದೇವನನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಉಳಿದೆಲ್ಲ ದೇವತೆಗಳನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನಿಸಿದನು. ಸತಿಗೆ ಈ ವಿಷಯ ತಿಳಿದಾಗ, ಅವಳು ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನಿಸಿದಳು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದಕ್ಷನು ಮಹಾದೇವನನ್ನು ನಿಂದಿಸಿದನು. ತನ್ನ ಪತಿಯ ಬಗ್ಗೆ ಆ ಅವಮಾನಕರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಸತಿಯು ಕ್ರೋಧಗೊಂಡಳು ಮತ್ತು ಆ
ಕೋಪದಿಂದಲೇ ಅಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದ ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ಆಕೆಯು ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಆಹುತಿಯಾಗಿ ನೀಡಿದಳು. ಇದು ತಿಳಿದು ಶಿವನು ಅತ್ಯಂತ ಕ್ರೋಧಗೊಂಡನು. ಯಜ್ಞಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಆತನು ಸತಿಯ ಮೃತದೇಹವನ್ನು ಆ ಯಜ್ಞದಿಂದ ಹೊರತೆಗೆದನು. ಅದನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಶೋಕ ಮತ್ತು ಆಕ್ರೋಶದಿಂದ ಇತ್ತ-ಅತ್ತ ಅಲೆಯತೊಡಗಿದನು. ರುದ್ರಾವತಾರವನ್ನು ತಾಳಿ ಶಿವನು ತಾಂಡವ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಾರಂಭಿಸಿದನು. ಇದರಿಂದ ಭೂಮಿಯೇ ನಾಶವಾಗಬಹುದು ಎಂದು ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಚಿಂತಾಕ್ರಾಂತರಾದರು.
ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವು ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರದಿಂದ ಸತಿಯ ದೇಹವನ್ನು ತುಂಡರಿಸಿದನು. ಸತಿಯ ದೇಹದ ಭಾಗಗಳು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳು ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದವೋ, ಆ ಸ್ಥಳಗಳು ದೇವಿಯ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಾದವು. ದೇವಿಯ ಇಂತಹ ೫೧ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳು ಭಾರತ, ಪಾಕಿಸ್ತಾನ, ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ, ನೇಪಾಳ ಮತ್ತು ಟಿಬೆಟ್ ದೇಶಗಳಲ್ಲಿವೆ. ದೇವೀಭಾಗವತ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿನ ಉಲ್ಲೇಖದ ಪ್ರಕಾರ ಇಂತಹ ೧೦೮ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಿವೆ.
ಶಿರಾಘಡದ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪವಿರುವ ಆಡಗಾಂವ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಋಷಿಮುನಿಗಳು ವಿಶ್ವಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಮಹಾಯಜ್ಞವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರನೆಂಬ ರಾಕ್ಷಸನು ವಿಘ್ನಗಳನ್ನು ಉಂಟುಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಆಗ ಋಷಿಮುನಿಗಳೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ದೇವತೆಗಳು ಆದಿಮಾತೆಯ ಬಳಿ ಮಹಿಷಾಸುರನ ಸಂಹಾರಕ್ಕಾಗಿ ಮೊರೆಹೊಕ್ಕರು.
ಮಾಡಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿದರು. ಎಲ್ಲರ ಕೋರಿಕೆಯನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಆದಿಮಾತೆಯು ಆಡಗಾಂವಿನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡು ಮಹಿಷಾಸುರನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧಳಾದಳು. ದೇವಿಯು ಮಹಿಷಾಸುರನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದ ಸ್ಥಳವೇ ಶಿरागಡದಲ್ಲಿ ಈಗ ದೇವಾಲಯವಿರುವ ಬೆಟ್ಟವಾಗಿದೆ. ಈ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಮುಂದೆ ಮಹಿಷಾಸುರನ ಆಟ ನಡೆಯಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಮಹಿಷಾಸುರನು ಈ ಸ್ಥಳದಿಂದ ಓಡಿಹೋಗಿ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಗಡಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಡಗಿಕೊಂಡನು. ಆದರೆ ದೇವಿಯು ಬೆನ್ನಟ್ಟುತ್ತಾ ಅಲ್ಲಿಗೂ ತಲುಪಿ, ಅಲ್ಲಿ ಅವನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು. ಮಹಿಷಾಸುರನ ವಧೆಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ದೇವಿಯು ನೆಲೆಸಿದಳು. ಸಪ್ತಶೃಂಗಿ ನಿವಾಸಿನಿಯಾಗಿರುವುದರಿಂದ ದೇವಿಗೆ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೊಡ್ಡ ಗಡವೆಂದೂ, ಶಿरागಡದಲ್ಲಿರುವ ದೇವಿಯ ಜಾಗೃತ ಸ್ಥಾನವು ಸಣ್ಣ ಗಡವೆಂದೂ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಶಿವಾಗಡ ಗ್ರಾಮದ ಗಡಿಯಲ್ಲಿ, ತಾಪಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ, ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೇವಿಯ ಈ ಜಾಗೃತ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಶಿವಾಗಡ ಗ್ರಾಮದಿಂದ ನದಿಯ ಪಾತ್ರದ ಮೂಲಕ ದೋಣಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ನದಿಯ ದಡದಿಂದ ಸುಮಾರು ೧೫೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸಣ್ಣ ಬೆಟ್ಟದ ಪ್ರಸ್ಥಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಮಕುಂಡ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ತ್ರಿಶೂಲವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಪಥವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುವ ರಚನೆಯನ್ನು ಈ ದೇವಾಲಯ ಹೊಂದಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ ಮತ್ತು ಚಂದ್ರರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಾಹನವಾದ ಹುಲಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಕೂರ್ಮಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಚಿನ್ನದ ಕೆತ್ತನೆಯ ಮಖರದಲ್ಲಿ, ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ, ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ದೇವಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಸಿಂಹದ ಮೇಲೆ ಆರೂಢಳಾಗಿರುವ ಈ ದೇವಿಯ ರೂಪವು ಸೌಮ್ಯವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ೧೮ ಕೈಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಆಯುಧಗಳಿವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ದೇವಿಯನ್ನು ‘ಅಷ್ಟಾದಶ ದೇವಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ದೇವಿಯ ಎಡಗೈ ಕಿವಿಯ ಹಿಂದಿದ್ದು, ಕುತ್ತಿಗೆಯು ಓರೆಯಾಗಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಓಲೆಗಳು, ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನತ್ತು, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಂಗಳಸೂತ್ರ, ಪುತಳಿಗಳ ಸರ, ಕೈಗಳಲ್ಲಿ ಹಸಿರು ಬಳೆಗಳು, ಸೊಂಟದಲ್ಲಿ ಒಡ್ಯಾಣ, ಪಾದಗಳಲ್ಲಿ ತೋಡೆ ಮುಂತಾದ ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿದ್ದಾಳೆ. ಈ ವಿಗ್ರಹದ ಮುಂದೆ ದೇವಿಯ ಸಣ್ಣ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ವ್ಯಾಘ್ರಾರೂಢ ಶಿಲಾಮೂರ್ತಿಯಿದೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ದ್ರೋಣಗಿರಿ ಪರ್ವತ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಗದೆಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ, ಸಿಂಧೂರ ಲೇಪಿತವಾದ ಈ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದೆ. ದೇವಿಯ ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿಯೂ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಶಾರदीय ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ಚೈತ್ರ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ಕೋಜಾಗಿರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಗುಡಿಪಾಡವ, ಗೋಕುಲಾಷ್ಟಮಿ, ಲಕ್ಷ್ಮೀಪೂಜೆ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಾರಂಭಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಬರುವ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಯಾವಲ್ನಿಂದ ೨೪ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಯಾವಲ್ ಮತ್ತು ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದಿಂದ ಮುಂದೆ ದೋಣಿಯ ಪ್ರಯಾಣವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಶಿರಾಘಡದ ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ.
সপ্তশৃঙ্গী মাতা মন্দির
শিরাগড়, তা. ইয়াওল, জি. জলগাঁও

আদিমায়া ভগবতী দেবীর ১০৮টি শক্তিপীঠের মধ্যে সাড়ে তিনটি পীঠ মহারাষ্ট্রে অবস্থিত। কোলাপুরের মহালক্ষ্মী, তুলজাপুরের ভবানী মাতা, মাহুরের মহাকালী (রেণুকা দেবী) হলো পূর্ণপীঠ এবং বাণীর সপ্তশৃঙ্গী দেবীকে আদ্য ও অর্ধপীঠ হিসেবে গণ্য করা হয়। সপ্তশৃঙ্গী গড়ে অবস্থিত এই দেবী মহাকালী, মহালক্ষ্মী ও মহাসরস্বতী—এই তিন স্থানের ত্রিগুণাত্মক স্বরূপ বলে মানা হয়। এমন বিশ্বাস রয়েছে যে, সপ্তশৃঙ্গী গড়ে যাওয়ার আগে দেবীর নিবাস ছিল শিরাগড় নামক এই পাহাড়ে। সেই কারণে আজও এই স্থানটিকে দেবীর বাপের বাড়ি এবং লহানগড় বলে সম্বোধন করা হয়।
পৌরাণিক আখ্যান অনুসারে, দেবী সতী রাজা দক্ষ প্রজাপতির কন্যা এবং মহাদেবের পত্নী। একবার রাজা দক্ষ এক যজ্ঞের আয়োজন করেছিলেন এবং মহাদেব ব্যতীত সকল দেবতাকে তাতে আমন্ত্রণ জানিয়েছিলেন। সতী এই কথা জানতে পেরে পিতার কাছে গিয়ে এর কৈফিয়ত চাইলেন। সেই সময় দক্ষ মহাদেবের নিন্দা করলেন। স্বামীর প্রতি সেই অপমানজনক উক্তি শুনে সতী ক্রুদ্ধ হলেন এবং সেই
ক্রোধবশত সেখানে চলমান যজ্ঞে তিনি নিজের প্রাণ আহুতি দিলেন। শঙ্কর এ কথা জানতে পেরে অত্যন্ত ক্রুদ্ধ হলেন। যজ্ঞস্থলে এসে তিনি সতীর মৃতদেহ সেই যজ্ঞ থেকে বের করে আনলেন। তা হাতে নিয়ে তিনি শোক ও ক্ষোভে ইতস্তত ঘুরে বেড়াতে লাগলেন। রুদ্রাবতার ধারণ করে শঙ্কর তাণ্ডব নৃত্য শুরু করলেন। এর ফলে পৃথিবীর বিনাশ হতে পারে ভেবে সমস্ত দেবতারা চিন্তিত হয়ে পড়লেন।
সেই সময়ে ভগবান বিষ্ণু সুদর্শন চক্র দিয়ে সতীর দেহ খণ্ড-বিখণ্ড করেছিলেন। সতীর দেহের অংশ এবং অলঙ্কার যে যে স্থানে পতিত হয়েছিল, সেই স্থানগুলি দেবীশক্তিপীঠ হিসেবে পরিচিতি লাভ করে। দেবীর এইরূপ ৫১টি শক্তিপীঠ ভারত, পাকিস্তান, বাংলাদেশ, নেপাল এবং তিব্বত এই দেশগুলিতে অবস্থিত। দেবীভাগবত পুরাণ অনুযায়ী এইরূপ ১০৮টি শক্তিপীঠের উল্লেখ রয়েছে।
শিরাগড়স্থিত সপ্তশৃঙ্গী মন্দিরের কিংবদন্তি এই যে, প্রাচীনকালে এখান থেকে নিকটবর্তী আড়গাঁও এলাকায় ঋষি-মুনিদের দ্বারা বিশ্বকল্যাণের জন্য এক মহাযজ্ঞ অনুষ্ঠিত হচ্ছিল। সেই যজ্ঞে মহিষাসুর নামক রাক্ষস বিঘ্ন সৃষ্টি করছিল। সেই সময় ঋষি-মুনিদের সঙ্গে অনেক দেবতা আদিমাতার কাছে মহিষাসুরকে দমন করার জন্য প্রার্থনা করেছিলেন।
অনুরোধ করলেন। সকলের অনুরোধে সাড়া দিয়ে আদিমাতা আড়গাঁওয়ে প্রকট হলেন এবং মহিষাসুরের সঙ্গে যুদ্ধ করার জন্য প্রস্তুত হলেন। দেবী যেখানে মহিষাসুরের সঙ্গে যুদ্ধ করেছিলেন, সেই স্থানটি হলো শিরাগড়-এর বর্তমান মন্দিরস্থিত পাহাড়। এই যুদ্ধে দেবী মহিষাসুরকে পরাস্ত করলেন। প্রাণ বাঁচানোর জন্য মহিষাসুর সেই স্থান থেকে পালিয়ে গিয়ে সপ্তশৃঙ্গী গড়ে গিয়ে লুকিয়ে পড়ল। কিন্তু দেবী তার পিছু ধাওয়া করে সেখানেও পৌঁছালেন এবং তাকে বধ করলেন। যে স্থানে মহিষাসুর বধ হয়েছিল, সেই স্থানেই দেবী বসবাস শুরু করলেন। সপ্তশৃঙ্গী নিবাসিনী হিসেবে দেবীর নাম হলো সপ্তশৃঙ্গী। সেই থেকে সপ্তশৃঙ্গী বড় গড় এবং শিরাগড়স্থিত দেবীর জাগ্রত স্থানটি ছোট গড় হিসেবে প্রসিদ্ধ।
শিরাগড় গ্রামের প্রবেশদ্বারে, তাপি নদীর তীরে, সপ্তশৃঙ্গী দেবীর এই জাগ্রত স্থানটি অবস্থিত। শিরাগড় গ্রাম থেকে নদীর বুক চিরে নৌকায় করে এই মন্দিরে আসতে হয়। নদীর তীর থেকে প্রায় ১৫০টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়।
একটি ছোট পাহাড়ের মালভূমিতে এই মন্দিরটি অবস্থিত। এখানকার মন্দিরের সামনে হোমকুণ্ড ও একটি বড় ত্রিশূল রয়েছে। সভামণ্ডপ ও প্রদক্ষিণপথ বাদ দিয়ে গর্ভগৃহ—এইভাবে মন্দিরটির গঠন বিন্যাস করা হয়েছে। প্রবেশদ্বারের উপরের দিকে সূর্য ও চন্দ্রের প্রতিচ্ছবি রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে দেবীর বাহন বাঘের মূর্তি এবং তার সামনে পিতলের কূর্মমূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের দেওয়ালে দেবীর বিভিন্ন রূপের প্রতিচ্ছবি অঙ্কিত রয়েছে।
গর্ভগৃহের বজ্রপীঠে অবস্থিত সোনালি নকশাদার মখমলের সিংহাসনে চার ফুট উচ্চতার, পাথরে খোদাই করা দেবীর মূর্তি রয়েছে। সিংহের ওপর আরূঢ় দেবীর এই রূপ অত্যন্ত সৌম্য। দেবীর ১৮টি হাতে বিভিন্ন আয়ুধ রয়েছে। সেই কারণে এই দেবীকে ‘অষ্টাদশ দেবী’ বলেও অভিহিত করা হয়। দেবীর বাম হাত কানের পেছনে এবং ঘাড় ঈষৎ হেলানো। মাথায় মুকুট, কানে কর্ণফুল, নাকে নথ, গলায় মঙ্গলসূত্র, পুতলিযুক্ত হার, হাতে সবুজ চুড়ি, কোমরে কোমরবন্ধ এবং পায়ে তোড়া অলঙ্কার হিসেবে শোভা পাচ্ছে। এই মূর্তির সামনে দেবীর একটি ছোট সিঁদুরচর্চিত ব্যাঘ্রারূঢ় পাষাণমূর্তি রয়েছে। এছাড়া বজ্রপীঠের সামনের দিকে নিচের কুলুঙ্গিতে গণেশের সিঁদুরচর্চিত মূর্তি বিরাজমান।
মন্দিরের প্রাঙ্গণে হনুমানের একটি বিশাল প্রাচীন মূর্তি রয়েছে। এক হাতে দ্রোণগিরি পর্বত এবং অন্য হাতে গদা ধারণ করা এই সিঁদুরচর্চিত পাষাণ মূর্তিটি অত্যন্ত মনোরম। দেবীর প্রধান মন্দিরের পিছনের দিকে একটি ছোট মন্দিরেও সপ্তশৃঙ্গী দেবীর একটি বিশাল মূর্তি বিরাজমান। এই মন্দিরে শারদীয়া নবরাত্রি উৎসব, চৈত্র নবরাত্রি উৎসব, কোজাগরী পূর্ণিমা, গুড়ি পাড়বা, গোকুলাষ্টমী, লক্ষ্মীপূজন ইত্যাদি উৎসব পালন করা হয়। এই উৎসবগুলির সময় বহু ভক্ত দেবীর দর্শনের জন্য আসেন। নবরাত্রিতে আগত হাজার হাজার ভক্তের সমাগমে এই এলাকাটি তীর্থক্ষেত্রের রূপ ধারণ করে।
প্রয়োজনীয় তথ্য
- যাবল থেকে ২৪ কিমি, এবং জলগাঁও থেকে ২০ কিমি দূরত্বে
- যাবল ও জলগাঁও থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ।
- পার্কিং থেকে এগিয়ে নৌকায় যাত্রা করতে হয়।
- ব্যক্তিগত যানবাহন শিরাগড় মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে।
- এই চত্বরে থাকা এবং জলখাবারের কোনো ব্যবস্থা নেই।
ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਮਾਤਾ ਮੰਦਿਰ
ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਯਾਵਲ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ

ਆਦਿਮਾਇਆ ਭਗਵਤੀ ਦੀਆਂ ੧੦੮ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਪੀਠ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਹਨ। ਕੋਲਹਾਪੁਰ ਦੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ, ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ, ਮਾਹੂਰ ਦੀ ਮਹਾਕਾਲੀ (ਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ) ਇਹ ਪੂਰਨ ਪੀਠ ਹਨ, ਜਦਕਿ ਵਣੀ ਦੀ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਆਦਿ ਅਤੇ ਅਰਧ-ਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਗੜ੍ਹ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਦੇਵੀ ਮਹਾਕਾਲੀ, ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਮਹਾਸਰਸਵਤੀ ਇਨ੍ਹਾਂ ਤਿੰਨਾਂ ਸਥਾਨਾਂ ਦਾ ਤ੍ਰਿਗੁਣਾਤਮਕ ਸਰੂਪ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਗੜ੍ਹ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇਵੀ ਦਾ ਨਿਵਾਸ ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਸਥਿਤ ਇਸ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਅੱਜ ਵੀ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦਾ ਪੇਕਾ ਘਰ ਅਤੇ ਲਹਾਨਗੜ੍ਹ (ਛੋਟਾ ਗੜ੍ਹ) ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਦੇਵੀ ਸਤੀ ਰਾਜਾ ਦਕਸ਼ ਪ੍ਰਜਾਪਤੀ ਦੀ ਪੁੱਤਰੀ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਤਨੀ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਰਾਜਾ ਦਕਸ਼ ਨੇ ਯੱਗ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਸੱਦਾ ਦਿੱਤਾ। ਸਤੀ ਨੂੰ ਇਹ ਪਤਾ ਲੱਗਣ ‘ਤੇ ਉਹ ਆਪਣੇ ਪਿਤਾ ਕੋਲ ਗਈ ਅਤੇ ਇਸ ਬਾਰੇ ਸਵਾਲ ਕੀਤਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਦਕਸ਼ ਨੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਨਿੰਦਾ ਕੀਤੀ। ਪਤੀ ਬਾਰੇ ਉਹ ਅਪਮਾਨਜਨਕ ਸ਼ਬਦ ਸੁਣ ਕੇ ਸਤੀ ਕ੍ਰੋਧਿਤ ਹੋ ਗਈ ਅਤੇ ਉਸੇ
ਕ੍ਰੋਧ ਵਿੱਚ ਉੱਥੇ ਚੱਲ ਰਹੇ ਯੱਗ ਵਿੱਚ ਉਸਨੇ ਆਪਣੇ ਪ੍ਰਾਣਾਂ ਦੀ ਆਹੂਤੀ ਦੇ ਦਿੱਤੀ। ਸ਼ੰਕਰ ਨੂੰ ਇਹ ਪਤਾ ਲੱਗਣ ‘ਤੇ ਉਹ ਬਹੁਤ ਕ੍ਰੋਧਿਤ ਹੋਏ। ਯੱਗ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪਹੁੰਚ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਤੀ ਦੇ ਮ੍ਰਿਤਕ ਸਰੀਰ ਨੂੰ ਯੱਗ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਕੱਢਿਆ। ਉਸਨੂੰ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਲੈ ਕੇ ਉਹ ਸ਼ੋਕ ਅਤੇ ਗੁੱਸੇ ਵਿੱਚ ਇੱਧਰ-ਉੱਧਰ ਭਟਕਣ ਲੱਗੇ। ਰੁਦ੍ਰ ਅਵਤਾਰ ਧਾਰਨ ਕਰਕੇ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਤਾਂਡਵ ਨ੍ਰਿਤ ਕਰਨਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ। ਇਸ ਨਾਲ ਧਰਤੀ ਦਾ ਵਿਨਾਸ਼ ਹੋ ਸਕਦਾ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਸਾਰੇ ਦੇਵਤੇ ਚਿੰਤਤ ਹੋ ਗਏ।
ਉਸ ਸਮੇਂ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੇ ਸੁਦਰਸ਼ਨ ਚੱਕਰ ਨਾਲ ਸਤੀ ਦੇ ਸਰੀਰ ਦੇ ਟੁਕੜੇ ਕਰ ਦਿੱਤੇ। ਸਤੀ ਦੇ ਦੇਹ ਦੇ ਭਾਗ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਜਿੱਥੇ-ਜਿੱਥੇ ਡਿੱਗੇ, ਉਹ ਦੇਵੀ ਦੇ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਬਣ ਗਏ। ਦੇਵੀ ਦੇ ਅਜਿਹੇ ੫੧ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਭਾਰਤ, ਪਾਕਿਸਤਾਨ, ਬੰਗਲਾਦੇਸ਼, ਨੇਪਾਲ ਅਤੇ ਤਿੱਬਤ ਦੇਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਦੇਵੀ ਭਾਗਵਤ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਕੀਤੇ ਗਏ ਉਲੇਖ ਅਨੁਸਾਰ ਅਜਿਹੇ ੧੦੮ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਹਨ।
ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਦੇ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਦੇ ਆਡਗਾਓਂ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਦੁਆਰਾ ਵਿਸ਼ਵ ਕਲਿਆਣ ਲਈ ਮਹਾਯੱਗ ਕੀਤਾ ਜਾ ਰਿਹਾ ਸੀ। ਉਸ ਵਿੱਚ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਰਾਖਸ਼ ਵਿਘਨ ਪਾ ਰਿਹਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਸਮੇਤ ਕਈ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਆਦਿਮਾਤਾ ਨੂੰ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਅੰਤ
ਕਰਨ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਸਾਰਿਆਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ਨੂੰ ਮੰਨ ਕੇ ਆਦਿਮਾਤਾ ਆਡਗਾਓਂ ਵਿਖੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਅਤੇ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਨਾਲ ਯੁੱਧ ਕਰਨ ਲਈ ਤਿਆਰ ਹੋ ਗਈ। ਦੇਵੀ ਦਾ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਨਾਲ ਯੁੱਧ ਜਿਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹੋਇਆ, ਉਹ ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਦੀ ਉਹ ਪਹਾੜੀ ਹੈ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਯੁੱਧ ਵਿੱਚ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦੇਵੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਟਿਕ ਨਾ ਸਕਿਆ। ਇਸ ਲਈ ਆਪਣੀ ਜਾਨ ਬਚਾਉਣ ਲਈ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਇਸ ਸਥਾਨ ਤੋਂ ਭੱਜ ਗਿਆ ਅਤੇ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਗੜ੍ਹ ‘ਤੇ ਜਾ ਕੇ ਲੁਕ ਗਿਆ। ਪਰ ਦੇਵੀ ਪਿੱਛਾ ਕਰਦੀ ਹੋਈ ਉੱਥੇ ਵੀ ਪਹੁੰਚ ਗਈ ਅਤੇ ਉਸਨੇ ਉੱਥੇ ਉਸਦਾ ਵਧ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਜਿਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਹੋਇਆ, ਉੱਥੇ ਹੀ ਦੇਵੀ ਨੇ ਨਿਵਾਸ ਕੀਤਾ। ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਨਿਵਾਸੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਨਾਮ ਮਿਲਿਆ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਵੱਡਾ ਗੜ੍ਹ ਅਤੇ ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਸਥਿਤ ਦੇਵੀ ਦਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਲਹਾਨਗੜ੍ਹ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ, ਤਾਪੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ, ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਹੈ। ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਪਿੰਡ ਤੋਂ ਨਦੀ ਦੇ ਰਸਤੇ ਕਿਸ਼ਤੀ ਰਾਹੀਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆਉਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਤੋਂ ਲਗਭਗ ੧੫੦ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਪਹਾੜੀ ਦੇ ਪਠਾਰ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੋਮਕੁੰਡ ਅਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਸੂਰਜ ਅਤੇ ਚੰਦਰਮਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਦੇਵੀ ਦਾ ਵਾਹਨ ਸ਼ੇਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਿੱਤਲ ਦੀ ਕੱਛੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੂਪਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸੁਨਹਿਰੀ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਮਖਰ ਵਿੱਚ, ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੀ, ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸ਼ੇਰ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਇਸ ਦੇਵੀ ਦਾ ਰੂਪ ਸੌਮਯ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ੧੮ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਯੁਧ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਦੇਵੀ ਨੂੰ ‘ਅਸ਼ਟਾਦਸ਼ ਦੇਵੀ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦਾ ਖੱਬਾ ਹੱਥ ਕੰਨ ਦੇ ਪਿੱਛੇ ਹੈ ਅਤੇ ਗਰਦਨ ਥੋੜ੍ਹੀ ਟੇਢੀ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਕੁੰਡਲ, ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਮੰਗਲਸੂਤਰ, ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਹਰੀਆਂ ਚੂੜੀਆਂ, ਕਮਰਬੰਦ, ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਤੋੜੇ ਵਰਗੇ ਗਹਿਣੇ ਹਨ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦੇਵੀ ਦੀ ਇੱਕ ਛੋਟੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਸ਼ੇਰ ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਵਜ੍ਰਪੀਠ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੇਠਾਂ ਇੱਕ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਇੱਕ ਵੱਡੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਦ੍ਰੋਣਾਗਿਰੀ ਪਰਬਤ ਅਤੇ ਦੂਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗਦਾ ਲਈ ਹੋਈ, ਇਹ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਵੀ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਦੇਵੀ ਦੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ, ਚੈਤਰ ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਉਤਸਵ, ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਗੁੜੀ ਪੜਵਾ, ਗੋਕੁਲਾਸ਼ਟਮੀ, ਲਕਸ਼ਮੀ ਪੂਜਨ ਆਦਿ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਸਮਾਗਮਾਂ ਸਮੇਂ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤ੍ਰੀ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਕਾਰਨ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਯਾਵਲ ਤੋਂ ੨੪ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ੨੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਯਾਵਲ ਅਤੇ ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਪਾਰਕਿੰਗ ਤੋਂ ਅੱਗੇ ਕਿਸ਼ਤੀ ਦਾ ਸਫ਼ਰ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸ਼ਿਰਾਗੜ੍ਹ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
