रामेश्वर मंदिर

डोंगरगण, ता. / जि. अहिल्यानगर

पावसाळ्याच्या दिवसांत खळाळून वाहणारे ओहोळ, हिवाळ्यात धुक्याची पसरलेली चादर, सदैव कुजन करणारे पक्षी हिरव्यागार दुलईत लपेटलेल्या डोंगरगण परिसराचे वातावरण मोहून टाकणारे आहे. इंग्रजांचे हे आवडते पर्यटन स्थळ होते, त्यामुळे त्यांनी या परिसराचे नामकरणहॅपी व्हॅलीअसे केले होते. या निसर्गसमृद्ध परिसरात डोंगरदरीत असलेले प्राचीन रामेश्वर मंदिर हे श्रीरामांनी स्थापन केलेल्या महादेवांच्या प्रमुख स्थानांपैकी एक जागृत शिवस्थान मानले जाते.

देश स्वतंत्र होईपर्यंत डोंगरगणहॅपी व्हॅलीमध्ये इंग्रजांचे वास्तव्य होते. अहिल्यानगरला येणारे इंग्रज अधिकारी येथे आवर्जून भेट देत असत. त्यांच्या अनेक प्रवास वर्णनांमध्येही या परिसराबद्दल लिहिलेले आहे. ‘लाईफ इन बॉम्बे अँड इटस् नेबरिंग आऊट स्टेशन्सया १८५१ च्या इंग्रजी पुस्तकात लेखक या परिसराचे वर्णन करताना लिहितो, ‘इंग्लंडमधील निसर्गरम्य ठिकाणांचा अभिमान असणाऱ्यांना नक्कीच कबूल करावे लागेल की डोंगरगणजवळचीहॅपी व्हॅलीएक मोहवून टाकणारे ठिकाण आहे. अनादिकाळापासून मौन व्रत स्वीकारलेल्या निसर्गाने मौन सोडून खळाळून केलेले हास्य म्हणजेहॅपी व्हॅली!’ जेव्हा आपण हॅपी व्हॅलीच्या कड्यावरून खाली नजर टाकतो, तेव्हा एखाद्या यक्षाने निसर्गाचे तुकडेतुकडे जोडून पृथ्वीवर हे नंदनवन निर्माण केले की काय, असा भास होतो. खडकांतून खाली उड्या घेणारे लहानलहान ओहोळ, दरीत पसरलेली हिरवीगार वनश्री मनाला भुरळ घालते.’

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या डोंगरगण भूमीला ऐतिहासिक पौराणिक वारसा लाभला आहे. ‘रामविजयग्रंथामधील उल्लेखानुसार, डोंगरगण परिसरात सध्या जेथे मंदिर आहे तेथे शरभंग ऋषींचा आश्रम होता. शरभंग ऋषींच्या शरीरात छिद्रे पडून त्यातून रक्त पू येत असल्याने दुर्गंधी येत असे. आपल्या वनवासकाळात लक्ष्मण सीतेसह श्रीराम एकदा त्यांच्या आश्रमाजवळ आले. ऋषींच्या इच्छेनुसार त्यांनी दिवस येथे वास्तव्य केले. शरभंग ऋषींचा आजार बरा व्हावा यासाठी श्रीरामांनी येथे अग्निबाण मारून गरम पाण्याचा झरा तयार केला. येथील वास्तव्याच्या काळात महादेवांच्या नित्यपूजेत खंड पडू नये यासाठी श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली. त्यावेळी महादेव प्रकट झाले येथे येणारे भाविक माझ्या आधी श्रीरामांचे नाव घेतील, असे सांगितले. तेव्हापासून या स्थानालारामेश्वरहे नाव पडले.

श्रीराम, श्री शरभंग ऋषी महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे ठिकाण डोंगरगण गावाच्या उत्तरेकडे आहे. येथील मोठ्या डोंगरातील खडकात कोरलेल्या सुमारे ५० पायऱ्या उतरून रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतोसंपूर्ण मंदिर प्रांगणात फरसबंदी असून उंचच उंच वृक्षांच्या मधोमध हे मंदिर आहे. मंदिराचे स्वरूप सभामंडप गर्भगृह असे आहे. वाई येथील शेंडे घराण्याने या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. सभामंडपात असलेल्या नंदीच्या शेजारीच लहानसे राम मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी असून त्याच्यासमोरील बाजूला पार्वतीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच खालील बाजूस पाण्याचे कुंड आहे.

मंदिर परिसरात दत्तमंदिर, रामकुंड, हनुमान मंदिर, सद्गुरू मंदिर, सीता न्हाणी आणि आनंद सागर ही स्थाने आहेत. याशिवाय येथून जवळच शरभंग ऋषींचा आश्रम आहे. रामेश्वर मंदिरामागे श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. महाशिवरात्री श्रावण महिन्याच्या सर्व सोमवारी येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. तिसऱ्या चौथ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. रामेश्वराच्या दर्शनाने रामेश्वरधाम १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसरात निजामकालीन दगडी बांधकाम असलेली दुमजली इमारत आहे. तेव्हा ही इमारतहवामहलम्हणून प्रसिद्ध होती. ब्रिटिशांच्या काळात या इमारतीमधून न्यायालयीन कामकाज चालत असे. आजही ही इमारत सुस्थितीत आहे. सध्या सरकारी अधिकारी पर्यटकांनाही येथे निवासाची सुविधा उपलब्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • वांबोरीपासून किमी, तर अहिल्यानगरपासून १७ किमी अंतरावर
  • अहिल्यानगरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home