पाण्यातील बहिरीदेव
दिवाळे गाव, बेलापूर, नवी मुंबई

हिंदू धर्मात ‘अतिथी देवो भव’ म्हणजेच अतिथीलाच देव मानण्याची पद्धत आहे, पण नवी मुंबईत दिवाळे हे असे एक गाव आहे की जेथे देवच अतिथी म्हणून येत असतो. हा देव आहे बहिरीदेव किंवा भैरीदेव. हा पाहुणा केवळ अडीच दिवसांसाठी गावात येतो. बाकी वर्षभर तो घारापुरी बेटाजवळील समुद्राच्या तळाशी असतो. दिवाळीत अश्विन शुद्ध अमावस्येपासून तीन दिवसांसाठी येथे बहिरीदेवाची मोठी यात्रा भरते. कोणतेही मंदिर नसताना काही तासांसाठी गावात आलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांची येथे रीघ लागते.
‘एकविसाव्या शतकातील शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या नियोजनबद्ध शहरात पूर्वी अनेक गावे आणि पाडे वसलेले होते. बेलापूर हे त्यातील एक महत्त्वाचे गाव. पनवेल खाडीच्या तोंडावर असलेल्या या गावास पूर्वी शाबाज किंवा शाहबाज असे म्हणत. येथील किल्ल्यावरून पनवेल व पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर नियंत्रण ठेवता येत असे. या गावाला लागूनच
दिवाळे हे गाव वसलेले आहे. खाडीकिनारी वसलेले हे गाव आता बेलापूरचाच एक भाग झालेले आहे. बहिरीदेव हे येथील ग्रामदैवत आहे. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथे बहिरीदेवाचे मंदिर नाही, तरीही शेकडो वर्षांपासून येथील प्रत्येक घरात बहिरीदेवाची नित्यनेमाने पूजा केली जाते.
बहिरोबा, भैरोबा या ग्रामदेवता आहेत. त्यांचे शिवाशी तादात्म्य मानले गेल्यानंतर त्यांच्या नावाचे भैरव असे संस्कृतीकरण झाल्याची शक्यता ‘मराठी विश्वकोश’कारांनी मांडली आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला भैरव असे म्हणतात. त्याच प्रमाणे भैरव हा शिवाचा प्रमुख गण असल्याचेही मानले जाते. आगरी आणि कोळी समाजातील अनेकांचे खंडोबा, बहिरोबा हे कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांत बहिरोबाची मंदिरे आढळतात. दिवाळे या गावातील बहिरोबाचे वास्तव्य मात्र समुद्राच्या तळाशी असते.
दिवाळीच्या तोंडावर दिवाळेतील ग्रामस्थांचा उत्साह कित्येक पटींनी वाढू लागतो. कारण या काळात त्यांचा लाडका भैरीदेव समुद्राचा तळ सोडून गावकऱ्यांना दर्शन देण्यासाठी येणार असतो. त्यासाठी प्रत्येक घरात रंगरंगोटी सुरू होते. रोषणाई केली जाते. परिसर सजू लागतो. घरांसमोर रांगोळ्या दिसू लागतात. या सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. आजची पिढीही तेवढ्याच उत्साहाने तो उत्सव साजरा करते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी हा देव समुद्रातून आणण्यासाठी कौल लावण्यात येतो. कौल मिळाला की दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतील ३०० ते ४०० तरुण होड्या, बोटी घेऊन समुद्राच्या तळाशी वास्तव्यास असणाऱ्या आपल्या देवाला आणण्यासाठी निघतात. हा सोहळा पाहण्यासाठी उरण, घारापुरी, ट्रॉम्बे परिसरातील अनेक भाविक होड्या, बोटींतून या ठिकाणी येतात.
घारापुरी बेटाजवळील खोल समुद्रात हे तरुण बहिरीदेवाचा शोध घेण्यास प्रारंभ करतात. त्याआधी देवाचा मान म्हणून जिवंत पापलेट व शेवंडी तेथे सोडली जाते. वैशिष्ट्य असे की मागच्या वर्षी ज्या ठिकाणी हा देव सोडलेला असतो, ती जागा त्या अथांग समुद्रातही या तरुणांना अचूक सापडते. बुडी मारून मूर्ती शोधण्याचे काम गावातील तांडेल कुटुंबातील पुरुषांचे. त्यांनाच ही मूर्ती सापडते, असे म्हणतात. ही मूर्ती म्हणजे काळ्या पाषाणातील टाक आहे. मूर्तीवर मध्यभागी अश्वारूढ देवाची प्रतिमा आहे. सोबतीला माधो–ईर बंधू यांच्या प्रतिमा आहेत. अनेक वर्षे पाण्यात राहिल्यामुळे या पाषाण–टाकावरील शिल्प अस्पष्ट झालेले आहे.
मूर्ती सापडल्यानंतर देवाला स्नान घातले जाते, मग शेंदूरलेपन करून मानाच्या पालखीत बसवून, वाजत–गाजत, गुलालाची उधळण करत मिरवणुकीने आणले जाते. ही मिरवणूक गावातील तांडेल यांच्या घराजवळ येते. त्यांच्या देवघरात देवाची मनोभावे पूजा होते. खास बांधलेल्या ठिकाणी बहिरोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे बहिरीदेवाला अभिषेक करण्यात येतो. मस्तकावर चांदीचा मुकुट चढविला जातो. पानाफुलांची सजावट केली जाते. त्यानंतर तेथे दर्शनाकरीता व नवस फेडण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातून भक्तांची रीघ लागते.
यावेळी तीन दिवस गावाला जत्रेचे स्वरूप येते. त्या रात्री गावात देवाची पालखी फिरते. भाविकांकडून यावेळी दिवाळीचा फराळ, नारळ, हार व फुले अर्पण केले जातात. पारंपरिक कोळीगीते, गोंधळ, भजन–कीर्तनाने हा उत्सव साजरा होतो.
तिसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेला देव पुन्हा समुद्रातील आपल्या स्थानावर जाण्यासाठी पालखीत बसतो. देवाची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी देवाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक किनाऱ्यावर जमा होतात. जड अंत:करणाने व साश्रुनयनांनी तो सोहळा पार पडतो. मग पुन्हा होड्यांतून ३०० ते ४०० तरुण देवाला आपल्या जागेवर सोडण्यासाठी निघतात. देव समुद्राच्या तळाशी बसून बारा महिने तप करतो अशी लोकसमजूत आहे. येथील बहुसंख्य ग्रामस्थांचा व्यवसाय मासेमारीचा असल्याने समुद्रात जावेच लागते. तेथे बहिरीदेवच आपले रक्षण करतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.
उपयुक्त माहिती
- पनवेलपासून १२ किमी, तर कोकण भवनपासून १ किमी अंतरावर
- पनवेल, बेलापूर येथून एनएमएमटी बसची सुविधा
- खासगी वाहने गावात येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Bahiridev in the Water
Diwale Village, Belapur, Navi Mumbai

In Hindu Dharma, there is a tradition of ‘Atithi Devo Bhava’, which means treating a guest as God, but in Navi Mumbai, there is a village called Diwale where God himself comes as a guest. This God is Bahiridev or Bhairidev. This guest comes to the village for only two and a half days. For the rest of the year, he resides at the bottom of the sea near Gharapuri Island. During Diwali, a grand fair for Bahiridev is held here for three days, starting from Ashwin Shuddha Amavasya. Despite there being no temple, thousands of devotees line up to seek the blessings of this God, who visits the village for a few hours, and to fulfill their vows.
In the planned city of Navi Mumbai, known as the ‘city of the twenty-first century’, there were formerly many villages and hamlets. Belapur was one of the important villages among them. Situated at the mouth of the Panvel creek, this village was formerly known as Shahbaz. From the fort here, one could control the route leading towards Panvel and Pune. Adjacent to this village
The village of Diwale is situated here. Located along the creek, this village has now become a part of Belapur. Bahiridev is the presiding village deity here. The unique feature of this village is that although there is no temple of Bahiridev, the deity has been worshipped daily in every household here for hundreds of years.
Bahiroba and Bhairoba are village deities. The compilers of the ‘Marathi Vishwakosh’ have suggested that after their identification with Shiva, their names were Sanskritized to Bhairava. The southern face of the five-faced Shiva is known as Bhairava. Similarly, Bhairava is also considered to be the chief attendant of Shiva. For many in the Agri and Koli communities, Khandoba and Bahiroba are family deities. Temples of Bahiroba are found in many villages across Maharashtra. However, the abode of the Bahiroba in the village of Diwale is at the bottom of the sea.
As Diwali approaches, the enthusiasm of the villagers of Divala begins to multiply manifold. This is because, during this time, their beloved Bhairidev leaves the depths of the sea to come and grant darshan to the villagers. For this, painting and renovation work begins in every home. Decorations are put up, and the surroundings begin to adorn themselves. Rangolis start appearing in front of houses. It is said that this celebration has a tradition spanning hundreds of years. The current generation also celebrates this festival with equal fervor. During Diwali, on the day before Naraka Chaturdashi, a Kaul (divine permission) is sought to bring the deity from the sea. Once the permission is granted, the next day, three hundred to four hundred youths from the surrounding five villages set out in boats and vessels to bring back their deity, who resides at the bottom of the sea. To witness this ceremony, many devotees from the Uran, Gharapuri, and Trombay regions arrive at this place in boats and vessels.
In the deep sea near Gharapuri Island, these young men begin the search for the deity Bahirideva. Before doing so, as an offering to the deity, a live pomfret and a lobster are released into the water. A unique feature is that these young men accurately locate the exact spot in the vast ocean where the deity was immersed the previous year. The task of diving to retrieve the idol belongs to the men of the Tandel family of the village. It is said that only they are able to find this idol. This idol is a stone tablet made of black rock. In the center of the idol, there is an image of the deity mounted on a horse. Accompanying him are the images of the brothers Madho and Ir. Due to remaining in the water for many years, the carving on this stone tablet has become indistinct.
After the idol is discovered, the deity is given a ritual bath, then anointed with vermilion, placed in a ceremonial palanquin, and brought in a grand procession accompanied by music and the showering of gulal. This procession arrives near the house of the village Tandel. In their prayer room, the deity is worshipped with deep devotion. The idol of Bahiroba is then consecrated in a specially constructed place. On the next day, which is the day of Lakshmi Pujan, an abhishek is performed for Bahiridev at dawn. A silver crown is placed upon the head, and the idol is decorated with leaves and flowers. Following this, a steady stream of devotees from Navi Mumbai, as well as the districts of Mumbai, Thane, and Raigad, arrives to seek blessings and fulfill their vows.
During this time, the village takes on the appearance of a fair for three days. That night, the deity’s palanquin is carried in a procession through the village. Devotees offer Diwali snacks, coconuts, garlands, and flowers on this occasion. This festival is celebrated with traditional Koli songs, Gondhal, Bhajans, and Kirtans.
On the third day, that is, on Balipratipada, the Deity sits in a palanquin to return to His abode in the sea. A grand procession of the Deity is taken out amidst music and fanfare. At this time, thousands of devotees gather on the shore to bid farewell to the Deity. The ceremony concludes with heavy hearts and tearful eyes. Then, three hundred to four hundred youths set out in boats to escort the Deity back to His place. It is a popular belief that the Deity sits at the bottom of the sea and performs penance for twelve months. Since the occupation of the majority of the villagers here is fishing, they must venture into the sea. They have deep faith that it is Bahiridev who protects them there.
Useful Information
- Twelve kilometers from Panvel and one kilometer from Konkan Bhavan
- NMMT bus service available from Panvel and Belapur
- Private vehicles are permitted to enter the village.
- Accommodation and breakfast facilities available in the vicinity
जलमग्न बहिरीदेव
दिवाळे गाँव, बेलापुर, नवी मुंबई

हिंदू धर्म में ‘अतिथि देवो भव’ अर्थात अतिथि को ही देवता मानने की परंपरा है, लेकिन नवी मुंबई में दिवाळे एक ऐसा गाँव है जहाँ स्वयं देव अतिथि के रूप में आते हैं। ये देव हैं बहिरीदेव या भैरीदेव। यह मेहमान केवल ढाई दिनों के लिए गाँव में आते हैं। शेष वर्ष भर वे घारापुरी द्वीप के पास समुद्र की तलहटी में रहते हैं। दीपावली में अश्विन शुक्ल अमावस्या से तीन दिनों के लिए यहाँ बहिरीदेव की भव्य यात्रा आयोजित होती है। बिना किसी मंदिर के, कुछ घंटों के लिए गाँव में पधारे इन देव के दर्शन और मन्नत पूरी करने के लिए हजारों भक्तों की कतार लग जाती है।
‘इक्कीसवीं सदी का शहर’ के रूप में पहचाने जाने वाले नवी मुंबई जैसे नियोजित शहर में पहले कई गाँव और बस्तियाँ बसी हुई थीं। बेलापुर उनमें से एक महत्वपूर्ण गाँव है। पनवेल खाड़ी के मुहाने पर स्थित इस गाँव को पहले शाबाज या शाहबाज कहा जाता था। यहाँ के किले से पनवेल और पुणे जाने वाले मार्ग पर नियंत्रण रखा जा सकता था। इस गाँव से सटा हुआ ही
दिवाळे गाँव बसा है। खाड़ी किनारे स्थित यह गाँव अब बेलापुर का ही एक हिस्सा बन चुका है। बहिरीदेव यहाँ के ग्रामदेवता हैं। इस गाँव की विशेषता यह है कि यहाँ बहिरीदेव का मंदिर नहीं है, फिर भी सैकड़ों वर्षों से यहाँ के प्रत्येक घर में बहिरीदेव की नित्य नियम से पूजा की जाती है।
बहिरोबा, भैरोबा ग्रामदेवता हैं। शिव के साथ उनका तादात्म्य माने जाने के बाद उनके नाम का भैरव के रूप में संस्कृतीकरण होने की संभावना ‘मराठी विश्वकोश’ के लेखकों ने व्यक्त की है। पंचमुखी शिव के दक्षिण मुख को भैरव कहा जाता है। इसी प्रकार भैरव को शिव का प्रमुख गण भी माना जाता है। आगरी और कोली समाज के अनेक लोगों के खंडोबा, बहिरोबा कुलदेवता हैं। महाराष्ट्र के अनेक गाँवों में बहिरोबा के मंदिर पाए जाते हैं। दिवाळे गाँव के बहिरोबा का निवास स्थान मात्र समुद्र की तलहटी में है।
दीपावली के आगमन पर दिवाळे के ग्रामीणों का उत्साह कई गुना बढ़ जाता है। क्योंकि इस दौरान उनके लाडले भैरीदेव समुद्र की तलहटी छोड़कर ग्रामीणों को दर्शन देने आने वाले होते हैं। इसके लिए हर घर में रंगाई-पुताई शुरू हो जाती है। रोशनी की जाती है। परिसर सजने लगता है। घरों के सामने रंगोलियाँ दिखाई देने लगती हैं। इस उत्सव की सैकड़ों वर्षों की परंपरा बताई जाती है। आज की पीढ़ी भी उतने ही उत्साह से यह उत्सव मनाती है। दीपावली में नरक चतुर्दशी के एक दिन पहले इस देव को समुद्र से लाने के लिए कौल (अनुमति) लिया जाता है। कौल मिलने पर अगले दिन पंचक्रोशी के ३०० से ४०० युवा नौकाओं और नावों के साथ समुद्र की तलहटी में निवास करने वाले अपने देव को लाने के लिए निकलते हैं। इस उत्सव को देखने के लिए उरण, घारापुरी, ट्रॉम्बे परिसर के अनेक भक्त नौकाओं और नावों से यहाँ आते हैं।
घारापुरी द्वीप के पास गहरे समुद्र में ये युवा बहिरीदेव की खोज शुरू करते हैं। उससे पहले देव के सम्मान में जीवित पापलेट और झींगा वहाँ छोड़े जाते हैं। विशेषता यह है कि पिछले वर्ष जिस स्थान पर देव को छोड़ा गया था, उस अथांग समुद्र में भी ये युवा उस जगह को सटीक ढूँढ लेते हैं। गोता लगाकर मूर्ति खोजने का काम गाँव के तांडेल परिवार के पुरुषों का है। कहते हैं कि उन्हें ही यह मूर्ति मिलती है। यह मूर्ति काले पत्थर का एक टाक (शिलाखंड) है। मूर्ति पर मध्य में अश्वारूढ़ देव की प्रतिमा है। साथ में माधो-ईर बंधुओं की प्रतिमाएँ हैं। अनेक वर्षों तक पानी में रहने के कारण इस पाषाण-टाक पर उकेरा गया शिल्प अस्पष्ट हो गया है।
मूर्ति मिलने के बाद देव को स्नान कराया जाता है, फिर सिंदूर लेपन कर सम्मान के साथ पालकी में बैठाकर, बाजे-गाजे के साथ, गुलाल उड़ाते हुए शोभायात्रा निकाली जाती है। यह शोभायात्रा गाँव में तांडेल के घर के पास आती है। उनके देवघर में देव की मनोभाव से पूजा होती है। विशेष रूप से बनाए गए स्थान पर बहिरोबा की मूर्ति की प्रतिष्ठापना की जाती है। अगले दिन यानी लक्ष्मीपूजन के दिन तड़के बहिरीदेव का अभिषेक किया जाता है। मस्तक पर चांदी का मुकुट चढ़ाया जाता है। फूल-पत्तियों से सजावट की जाती है। उसके बाद वहाँ दर्शन और मन्नत पूरी करने के लिए नवी मुंबई सहित मुंबई, ठाणे और रायगढ़ जिले से भक्तों की कतार लग जाती है।
इस समय तीन दिनों तक गाँव में मेले का स्वरूप होता है। उस रात गाँव में देव की पालकी घूमती है। भक्तों द्वारा इस समय दीपावली का फराळ, नारियल, हार और फूल अर्पित किए जाते हैं। पारंपरिक कोली गीत, गोंधल, भजन-कीर्तन के साथ यह उत्सव मनाया जाता है।
तीसरे दिन यानी बलिप्रतिपदा को देव पुनः समुद्र में अपने स्थान पर जाने के लिए पालकी में बैठते हैं। देव की बाजे-गाजे के साथ शोभायात्रा निकाली जाती है। इस समय देव को विदाई देने के लिए हजारों भक्त तट पर जमा होते हैं। भारी मन और नम आँखों से वह उत्सव संपन्न होता है। फिर पुनः नौकाओं से ३०० से ४०० युवा देव को उनके स्थान पर छोड़ने के लिए निकलते हैं। ऐसी लोकमान्यता है कि देव समुद्र की तलहटी में बैठकर बारह महीने तपस्या करते हैं। यहाँ के अधिकांश ग्रामीणों का व्यवसाय मछली पकड़ने का होने के कारण उन्हें समुद्र में जाना ही पड़ता है। उनकी श्रद्धा है कि वहाँ बहिरीदेव ही उनकी रक्षा करते हैं।
उपयोगी जानकारी
- पनवेल से १२ किमी, तो कोकण भवन से १ किमी की दूरी पर
- पनवेल, बेलापुर से एनएमएमटी बस की सुविधा
- निजी वाहन गाँव तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा
પાણીમાં બિરાજમાન બહિરીદેવ
દિવાળે ગામ, બેલાપુર, નવી મુંબઈ

હિન્દુ ધર્મમાં ‘અતિથિ દેવો ભવ’ એટલે કે અતિથિને જ દેવ માનવાની પરંપરા છે, પરંતુ નવી મુંબઈમાં દિવાળે એક એવું ગામ છે જ્યાં સ્વયં દેવ અતિથિ તરીકે પધારે છે. આ દેવ છે બહિરીદેવ અથવા ભૈરીદેવ. આ મહેમાન માત્ર અઢી દિવસ માટે ગામમાં આવે છે. બાકીના આખા વર્ષ દરમિયાન તેઓ ઘારાપુરી ટાપુ પાસે સમુદ્રના તળિયે બિરાજમાન હોય છે. દિવાળીમાં અશ્વિન શુદ્ધ અમાસથી ત્રણ દિવસ માટે અહીં બહિરીદેવનો ભવ્ય મેળો ભરાય છે. કોઈ પણ મંદિર ન હોવા છતાં, થોડા કલાકો માટે ગામમાં પધારેલા આ દેવના દર્શન અને માનતા પૂરી કરવા માટે હજારો ભક્તોની કતાર લાગે છે.
‘એકવીસમી સદીનું શહેર’ તરીકે ઓળખાતા નવી મુંબઈ જેવા આયોજનબદ્ધ શહેરમાં અગાઉ અનેક ગામો અને પાડા વસેલા હતા. બેલાપુર તેમાંથી એક મહત્વનું ગામ છે. પનવેલ ખાડીના મુખ પર આવેલા આ ગામને અગાઉ શાબાઝ અથવા શાહબાઝ કહેતા. અહીંના કિલ્લા પરથી પનવેલ અને પુણે તરફ જતા માર્ગ પર નિયંત્રણ રાખી શકાતું હતું. આ ગામને અડીને જ
દિવાળે ગામ વસેલું છે. ખાડી કિનારે વસેલું આ ગામ હવે બેલાપુરનો જ એક ભાગ બની ગયું છે. બહિરીદેવ અહીંના ગ્રામદેવતા છે. આ ગામની વિશેષતા એ છે કે અહીં બહિરીદેવનું મંદિર નથી, છતાં સેંકડો વર્ષોથી અહીંના દરેક ઘરમાં બહિરીદેવની નિત્ય નિયમ મુજબ પૂજા કરવામાં આવે છે.
બહિરોબા, ભૈરોબા આ ગ્રામદેવતાઓ છે. તેમનું શિવ સાથે તાદાત્મ્ય માનવામાં આવ્યા બાદ તેમના નામનું ભૈરવ તરીકે સંસ્કૃતિકરણ થયું હોવાની શક્યતા ‘મરાઠી વિશ્વકોશ’ના લેખકોએ વ્યક્ત કરી છે. પંચમુખી શિવના દક્ષિણ દિશાના મુખને ભૈરવ કહેવામાં આવે છે. તે જ પ્રમાણે ભૈરવ એ શિવના મુખ્ય ગણ હોવાનું પણ માનવામાં આવે છે. આગરી અને કોળી સમાજના ઘણા લોકોના ખંડોબા, બહિરોબા કુળદેવતા છે. મહારાષ્ટ્રના અનેક ગામોમાં બહિરોબાના મંદિરો જોવા મળે છે. દિવાળે ગામના બહિરોબાનું નિવાસસ્થાન માત્ર સમુદ્રના તળિયે હોય છે.
દિવાળીના સમયે દિવાળેના ગ્રામજનોનો ઉત્સાહ અનેકગણો વધી જાય છે. કારણ કે આ સમયગાળામાં તેમના લાડકા ભૈરીદેવ સમુદ્રનું તળિયું છોડીને ગ્રામજનોને દર્શન આપવા આવવાના હોય છે. તે માટે દરેક ઘરમાં રંગરોગાન શરૂ થાય છે. રોશની કરવામાં આવે છે. પરિસર શણગારવામાં આવે છે. ઘરની સામે રંગોળીઓ જોવા મળે છે. આ ઉત્સવને સેંકડો વર્ષોની પરંપરા હોવાનું કહેવાય છે. આજની પેઢી પણ તેટલા જ ઉત્સાહથી આ ઉત્સવ ઉજવે છે. દિવાળીમાં નરક ચતુર્દશીના એક દિવસ પહેલા આ દેવને સમુદ્રમાંથી લાવવા માટે કૌલ (આજ્ઞા) લેવામાં આવે છે. કૌલ મળે એટલે બીજા દિવસે પંચક્રોશીના ૩૦૦ થી ૪૦૦ યુવાનો હોડીઓ અને બોટ લઈને સમુદ્રના તળિયે વસતા પોતાના દેવને લાવવા નીકળે છે. આ ઉત્સવ જોવા માટે ઉરણ, ઘારાપુરી, ટ્રોમ્બે વિસ્તારના અનેક ભક્તો હોડીઓ અને બોટ દ્વારા અહીં આવે છે.
ઘારાપુરી ટાપુ પાસેના ઊંડા સમુદ્રમાં આ યુવાનો બહિરીદેવની શોધ શરૂ કરે છે. તે પહેલા દેવના માન તરીકે જીવંત પાપલેટ અને ઝીંગા ત્યાં છોડવામાં આવે છે. વિશેષતા એ છે કે ગયા વર્ષે જે જગ્યાએ આ દેવને છોડવામાં આવ્યા હોય, તે જગ્યા આ અફાટ સમુદ્રમાં પણ આ યુવાનોને ચોક્કસ મળી જાય છે. ડૂબકી મારીને મૂર્તિ શોધવાનું કામ ગામના તાંડેલ પરિવારના પુરુષોનું છે. તેમને જ આ મૂર્તિ મળે છે, તેમ કહેવાય છે. આ મૂર્તિ એટલે કાળા પાષાણનો ટાંક (શિલાલેખ) છે. મૂર્તિ પર મધ્યમાં અશ્વ પર સવાર દેવની પ્રતિમા છે. સાથે માધો-ઈર બંધુઓની પ્રતિમાઓ છે. અનેક વર્ષો સુધી પાણીમાં રહેવાને કારણે આ પાષાણ-ટાંક પરનું શિલ્પ અસ્પષ્ટ થઈ ગયું છે.
મૂર્તિ મળ્યા પછી દેવને સ્નાન કરાવવામાં આવે છે, ત્યારબાદ સિંદૂર લેપન કરીને માનની પાલખીમાં બેસાડીને, વાજતે-ગાજતે, ગુલાલની ઉડતી છોળો વચ્ચે સરઘસ કાઢીને લાવવામાં આવે છે. આ સરઘસ ગામના તાંડેલના ઘર પાસે આવે છે. તેમના દેવઘરમાં દેવની ભાવપૂર્વક પૂજા થાય છે. ખાસ બાંધેલી જગ્યાએ બહિરોબાની મૂર્તિની પ્રતિષ્ઠા કરવામાં આવે છે. બીજા દિવસે એટલે કે લક્ષ્મી પૂજનના દિવસે વહેલી સવારે બહિરીદેવનો અભિષેક કરવામાં આવે છે. મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ પહેરાવવામાં આવે છે. પાન-ફૂલોથી શણગાર કરવામાં આવે છે. ત્યારબાદ ત્યાં દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા માટે નવી મુંબઈ સહિત મુંબઈ, થાણે અને રાયગઢ જિલ્લામાંથી ભક્તોની કતાર લાગે છે.
આ સમયે ત્રણ દિવસ સુધી ગામમાં મેળા જેવું વાતાવરણ હોય છે. તે રાત્રે ગામમાં દેવની પાલખી ફરે છે. ભક્તો દ્વારા આ સમયે દિવાળીનો ફરાળ, નાળિયેર, હાર અને ફૂલો અર્પણ કરવામાં આવે છે. પરંપરાગત કોળી ગીતો, ગુંધળ, ભજન-કીર્તન સાથે આ ઉત્સવ ઉજવાય છે.
ત્રીજા દિવસે એટલે કે બલિ પ્રતિપદાના દિવસે દેવ ફરીથી સમુદ્રમાં પોતાના સ્થાને જવા માટે પાલખીમાં બિરાજમાન થાય છે. દેવની વાજતે-ગાજતે શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. આ સમયે દેવને વિદાય આપવા માટે હજારો ભક્તો કિનારે એકઠા થાય છે. ભારે હૈયે અને આંખમાં આંસુ સાથે આ ઉત્સવ સંપન્ન થાય છે. ત્યારબાદ ફરીથી હોડીઓમાં ૩૦૦ થી ૪૦૦ યુવાનો દેવને તેમના સ્થાને મૂકવા માટે નીકળે છે. દેવ સમુદ્રના તળિયે બેસીને બારે મહિના તપ કરે છે એવી લોકમાન્યતા છે. અહીંના મોટાભાગના ગ્રામજનોનો વ્યવસાય માછીમારી હોવાથી સમુદ્રમાં જવું જ પડે છે. ત્યાં બહિરીદેવ જ તેમનું રક્ષણ કરે છે, એવી તેમની શ્રદ્ધા છે.
ઉપયોગી માહિતી
- પનવેલથી ૧૨ કિમી, તો કોંકણ ભવનથી ૧ કિમી અંતરે
- પનવેલ, બેલાપુરથી એનએમએમટી (NMMT) બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો ગામમાં આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા
நீருக்கடியில் உறையும் பகிரிதேவர்
திவாலே கிராமம், பேலாப்பூர், நவி மும்பை

இந்து தர்மத்தில் ‘அதிதி தேவோ பவ’ அதாவது விருந்தினரை தெய்வமாக மதிக்கும் முறை உள்ளது. ஆனால், நவி மும்பையில் உள்ள திவாலே அத்தகைய ஒரு கிராமமாகும், அங்கு தெய்வமே விருந்தினராக வருகை தருகிறார். அவரே பகிரிதேவர் அல்லது பைரிதேவர் ஆவார். இந்த விருந்தினர் இரண்டரை நாட்களுக்கு மட்டுமே கிராமத்திற்கு வருகிறார். மற்றபடி ஆண்டு முழுவதும் அவர் காராபுரி தீவுக்கு அருகில் உள்ள கடலின் அடியில் வசிக்கிறார். தீபாவளியின் போது அஸ்வின் சுத்த அமாவாசையிலிருந்து மூன்று நாட்களுக்கு இங்கு பகிரிதேவரின் பிரம்மாண்டமான திருவிழா நடைபெறுகிறது. கோயில் ஏதுமில்லாத இந்த கிராமத்திற்குச் சில மணிநேரங்களுக்கு வரும் இந்தத் தெய்வத்தைத் தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வரிசையில் நிற்கின்றனர்.
‘இருபத்தோராம் நூற்றாண்டின் நகரம்’ என்று அழைக்கப்படும் நவி மும்பை எனும் திட்டமிடப்பட்ட நகரத்தில், முன்னதாகப் பல கிராமங்களும் குடியிருப்புகளும் இருந்தன. பேலாப்பூர் அவற்றில் முக்கியமான ஒரு கிராமம். பன்வேல் வளைகுடாவின் முகப்பில் அமைந்துள்ள இந்த கிராமத்தை முன்னதாக ஷாபாஸ் என்று அழைத்தனர். இங்குள்ள கோட்டையிலிருந்து பன்வேல் மற்றும் புனே செல்லும் பாதையைக் கண்காணிக்க முடிந்தது. இந்த கிராமத்தை ஒட்டியே
திவாலே கிராமம் அமைந்துள்ளது. வளைகுடா ஓரத்தில் அமைந்துள்ள இந்த கிராமம் இப்போது பேலாப்பூரின் ஒரு பகுதியாக மாறிவிட்டது. பகிரிதேவர் இக்கிராமத்தின் காவல் தெய்வம். இந்த கிராமத்தின் சிறப்பு என்னவென்றால், இங்கு பகிரிதேவருக்குக் கோயில் இல்லை, இருப்பினும் பல நூற்றாண்டுகளாக இங்குள்ள ஒவ்வொரு வீட்டிலும் பகிரிதேவர் நித்தியமாக வழிபடப்படுகிறார்.
பகிரோபா, பைரோபா என்பவை கிராம தெய்வங்கள். சிவனுடன் இவர்களுக்குள்ள ஒற்றுமையைக் கருத்தில் கொண்டு, இவர்களின் பெயர்கள் பைரவர் என்று சமஸ்கிருதமயமாக்கப்பட்டிருக்கலாம் என்று ‘மராத்தி விஸ்வகோஷ்’ ஆசிரியர்கள் கருதுகின்றனர். பஞ்சமுக சிவபெருமானின் தெற்கு முகத்தை பைரவர் என்று அழைப்பர். அதேபோல் பைரவர் சிவனின் முதன்மைக் கணங்களில் ஒருவர் என்றும் கருதப்படுகிறது. ஆகரி மற்றும் கோலி சமூகத்தைச் சேர்ந்த பலருக்கு கண்டோபா, பகிரோபா குலதெய்வமாக உள்ளனர். மகாராஷ்டிராவின் பல கிராமங்களில் பகிரோபா கோயில்கள் காணப்படுகின்றன. ஆனால், திவாலே கிராமத்தின் பகிரோபாவின் இருப்பிடம் கடலின் அடியில்தான் உள்ளது.
தீபாவளி நெருங்கும்போது திவாலே கிராம மக்களின் உற்சாகம் பல மடங்கு அதிகரிக்கிறது. ஏனெனில், இந்த காலகட்டத்தில் அவர்களின் அன்பிற்குரிய பைரிதேவர் கடலின் அடியிலிருந்து வெளியே வந்து கிராம மக்களுக்குத் தரிசனம் அளிக்க வருகிறார். இதற்காக ஒவ்வொரு வீட்டிலும் வர்ணம் பூசும் பணிகள் தொடங்குகின்றன. மின்விளக்கு அலங்காரங்கள் செய்யப்படுகின்றன. சுற்றுப்புறம் அழகுற மாறுகிறது. வீடுகளின் முன் கோலங்கள் காணப்படுகின்றன. இந்த விழாவுக்குப் பல நூற்றாண்டுகால பாரம்பரியம் இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. இன்றைய தலைமுறையினரும் அதே உற்சாகத்துடன் இந்த விழாவைக் கொண்டாடுகின்றனர். தீபாவளியில் நரக சதுர்த்தசிக்கு முந்தைய நாள், தெய்வத்தைக் கடலிலிருந்து கொண்டு வருவதற்காகக் குறி கேட்கப்படுகிறது (கவுல்). குறி கிடைத்ததும், அடுத்த நாள் சுற்றியுள்ள ஐந்து கிராமங்களைச் சேர்ந்த ௩௦௦ முதல் ௪௦௦ இளைஞர்கள் படகுகள் மற்றும் கப்பல்களில் கடலின் அடியில் வசிக்கும் தங்கள் தெய்வத்தை அழைத்து வரப் புறப்படுகின்றனர். இந்த விழாவைக் காண உரன், காராபுரி, ட்ராம்பே பகுதிகளைச் சேர்ந்த பல பக்தர்கள் படகுகள் மூலம் இங்கு வருகின்றனர்.
காராபுரி தீவுக்கு அருகில் உள்ள ஆழ்கடலில் இந்த இளைஞர்கள் பகிரிதேவரைத் தேடத் தொடங்குகின்றனர். அதற்கு முன்னதாக, தெய்வத்திற்கு மரியாதையாக உயிருள்ள பாப்லெட் மீன் மற்றும் இறால் கடலில் விடப்படுகின்றன. இதன் சிறப்பு என்னவென்றால், முந்தைய ஆண்டு எந்த இடத்தில் தெய்வத்தை விட்டார்களோ, அந்த இடத்தை அந்தப் பரந்த கடலிலும் இந்த இளைஞர்கள் துல்லியமாகக் கண்டறிகின்றனர். கடலில் மூழ்கிச் சிலையைத் தேடும் பணி கிராமத்தில் உள்ள தாண்டேல் குடும்பத்தைச் சேர்ந்த ஆண்களுடையது. அவர்களுக்கே இந்தச் சிலை கிடைப்பதாகக் கூறப்படுகிறது. இந்தச் சிலை கருங்கல்லால் ஆன ஒரு சிறிய வடிவம். சிலையின் நடுவில் குதிரை மீது அமர்ந்திருக்கும் தெய்வத்தின் உருவம் உள்ளது. உடன் மாதோ-ஈர் சகோதரர்களின் உருவங்கள் உள்ளன. பல ஆண்டுகள் நீரில் இருந்ததால், இந்தச் சிலையில் உள்ள சிற்பங்கள் மங்கலாகிவிட்டன.
சிலை கிடைத்த பிறகு, தெய்வத்திற்கு நீராட்டு விழா நடத்தப்பட்டு, சந்தனம் பூசப்பட்டு, மரியாதைக்குரிய பல்லக்கில் அமர்த்தி, மேளதாளங்களுடன், குலால் தூவி ஊர்வலமாக அழைத்து வரப்படுகிறது. இந்த ஊர்வலம் கிராமத்தில் உள்ள தாண்டேல் அவர்களின் வீட்டிற்கு வருகிறது. அவர்களின் பூஜை அறையில் தெய்வத்திற்கு மனதாரப் பூஜை செய்யப்படுகிறது. பிரத்யேகமாக அமைக்கப்பட்ட இடத்தில் பகிரோபாவின் சிலை பிரதிஷ்டை செய்யப்படுகிறது. அடுத்த நாள், அதாவது லட்சுமி பூஜையன்று அதிகாலையில் பகிரிதேவருக்கு அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. தலையில் வெள்ளி மகுடம் சூட்டப்படுகிறது. மலர்களால் அலங்காரம் செய்யப்படுகிறது. அதன் பிறகு, தரிசனம் செய்யவும் நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் நவி மும்பை மட்டுமின்றி மும்பை, தானே மற்றும் ராய்கட் மாவட்டங்களிலிருந்து பக்தர்கள் வரிசையில் நிற்கின்றனர்.
இந்த மூன்று நாட்களும் கிராமம் திருவிழாக் கோலம் பூணுகிறது. அன்று இரவு கிராமத்தில் தெய்வத்தின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. பக்தர்கள் தீபாவளி பலகாரங்கள், தேங்காய், மாலை மற்றும் மலர்களைச் சமர்ப்பிக்கின்றனர். பாரம்பரிய கோலி பாடல்கள், கொண்டல், பஜனை மற்றும் கீர்த்தனைகளுடன் இந்த விழா கொண்டாடப்படுகிறது.
மூன்றாவது நாள், அதாவது பலி பிரதமை அன்று, தெய்வம் மீண்டும் கடலில் உள்ள தனது இடத்திற்குச் செல்லப் பல்லக்கில் அமர்கிறது. தெய்வத்தின் ஊர்வலம் மேளதாளங்களுடன் நடைபெறுகிறது. அப்போது தெய்வத்திற்கு விடை கொடுக்க ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கடற்கரையில் கூடுகின்றனர். கனத்த இதயத்துடனும் கண்ணீருடனும் அந்த விழா நிறைவடைகிறது. பின்னர் மீண்டும் படகுகளில் ௩௦௦ முதல் ௪௦௦ இளைஞர்கள் தெய்வத்தைத் தங்கள் இடத்தில் விடப் புறப்படுகின்றனர். தெய்வம் கடலின் அடியில் அமர்ந்து பன்னிரண்டு மாதங்கள் தவம் செய்கிறது என்பது மக்களின் நம்பிக்கை. இங்குள்ள பெரும்பாலான கிராம மக்களின் தொழில் மீன்பிடித்தல் என்பதால், அவர்கள் கடலுக்குச் சென்றே ஆக வேண்டும். அங்கு பகிரிதேவரே தங்களைக் காக்கிறார் என்பது அவர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை.
பயனுள்ள தகவல்கள்
- பன்வேலிலிருந்து ௧௨ கி.மீ, கொங்கண் பவனிலிருந்து ௧ கி.மீ தொலைவில்
- பன்வேல், பேலாப்பூரிலிருந்து என்.எம்.எம்.டி (NMMT) பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் கிராமத்திற்குள் வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உண்டு
జలగర్భంలో కొలువై ఉండే బహిరీదేవుడు
దివాళే గ్రామం, బేలాపూర్, నవీ ముంబై

హిందూ ధర్మంలో ‘అతిథి దేవో భవ’ అంటే అతిథిని దైవంగా భావించే సంప్రదాయం ఉంది, కానీ నవీ ముంబైలోని దివాళే అటువంటి గ్రామం, ఇక్కడ సాక్షాత్తు దేవుడే అతిథిగా వస్తాడు. ఆ దేవుడే బహిరీదేవుడు లేదా భైరీదేవుడు. ఈ అతిథి కేవలం రెండున్నర రోజుల పాటు మాత్రమే గ్రామానికి వస్తాడు. మిగిలిన ఏడాది అంతా ఆయన ఘారాపురి ద్వీపం సమీపంలోని సముద్ర గర్భంలో ఉంటాడు. దీపావళి సమయంలో అశ్విజ శుద్ధ అమావాస్య నుండి మూడు రోజుల పాటు ఇక్కడ బహిరీదేవుని భారీ జాతర జరుగుతుంది. ఎటువంటి ఆలయం లేకపోయినా, కొన్ని గంటల పాటు గ్రామానికి వచ్చే ఈ దేవుని దర్శనం కోసం మరియు మొక్కులు చెల్లించుకోవడానికి వేలాది మంది భక్తులు బారులు తీరుతారు.
‘ఇరవై ఒకటవ శతాబ్దపు నగరం’గా పిలువబడే నవీ ముంబై అనే ఈ ప్రణాళికాబద్ధమైన నగరంలో గతంలో అనేక గ్రామాలు, పాడెలు ఉండేవి. బేలాపూర్ అందులోని ఒక ముఖ్యమైన గ్రామం. పన్వేల్ అఖాతం (క్రీక్) ముఖద్వారం వద్ద ఉన్న ఈ గ్రామాన్ని పూర్వం షాబాజ్ అని పిలిచేవారు. ఇక్కడి కోట నుండి పన్వేల్ మరియు పూణే వైపు వెళ్లే మార్గాలను నియంత్రించేవారు. ఈ గ్రామానికి ఆనుకునే
దివాళే గ్రామం ఉంది. అఖాతం తీరాన ఉన్న ఈ గ్రామం ఇప్పుడు బేలాపూర్లో ఒక భాగంగా మారింది. బహిరీదేవుడు ఇక్కడి గ్రామదేవత. ఈ గ్రామం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ బహిరీదేవునికి ఆలయం లేకపోయినా, వందల ఏళ్లుగా ప్రతి ఇంట్లో బహిరీదేవుని నిత్యం పూజిస్తారు.
బహిరోబా, భైరోబా అనేవి గ్రామదేవతలు. వారిని శివుని స్వరూపంగా భావించిన తర్వాత, వారి పేరు ‘భైరవ’గా సంస్కృతీకరణ చెంది ఉండవచ్చని ‘మరాఠీ విశ్వకోశ’ రచయితలు అభిప్రాయపడ్డారు. పంచముఖ శివుని దక్షిణ ముఖాన్ని భైరవుడు అని పిలుస్తారు. అలాగే భైరవుడు శివుని ప్రధాన గణమని కూడా నమ్ముతారు. అగ్రి మరియు కోలీ సమాజంలోని అనేక మందికి ఖండోబా, బహిరోబా కులదైవాలు. మహారాష్ట్రలోని అనేక గ్రామాల్లో బహిరోబా ఆలయాలు కనిపిస్తాయి. అయితే దివాళే గ్రామంలోని బహిరోబా నివాసం మాత్రం సముద్ర గర్భంలో ఉంటుంది.
దీపావళి రాకతో దివాళే గ్రామస్థుల ఉత్సాహం రెట్టింపు అవుతుంది. ఎందుకంటే ఈ సమయంలోనే వారి ప్రియతమ భైరీదేవుడు సముద్ర గర్భాన్ని వదిలి గ్రామస్థులకు దర్శనమివ్వడానికి వస్తాడు. ఇందుకోసం ప్రతి ఇంట్లో రంగులు వేయడం ప్రారంభిస్తారు. విద్యుత్ దీపాలతో అలంకరిస్తారు. పరిసరాలు శోభాయమానంగా మారుతాయి. ఇళ్ల ముందు ముగ్గులు కనిపిస్తాయి. ఈ వేడుకకు వందల ఏళ్ల సంప్రదాయం ఉందని చెబుతారు. నేటి తరం కూడా అంతే ఉత్సాహంతో ఈ ఉత్సవాన్ని జరుపుకుంటుంది. దీపావళిలో నరక చతుర్దశికి ముందు రోజు దేవుడిని సముద్రం నుండి తీసుకురావడానికి ‘కౌల్’ (ప్రశ్న అడగడం) వేస్తారు. కౌల్ లభించిన మరుసటి రోజు, చుట్టుపక్కల ప్రాంతాల నుండి ౩౦౦ నుండి ౪౦౦ మంది యువకులు పడవలు, నావలలో సముద్ర గర్భంలో నివసించే తమ దేవుడిని తీసుకురావడానికి బయలుదేరుతారు. ఈ వేడుకను చూడటానికి ఉరాన్, ఘారాపురి, ట్రోంబే ప్రాంతాల నుండి అనేక మంది భక్తులు పడవల్లో ఇక్కడికి వస్తారు.
ఘారాపురి ద్వీపం సమీపంలోని లోతైన సముద్రంలో ఈ యువకులు బహిరీదేవుని కోసం అన్వేషణ ప్రారంభిస్తారు. అంతకుముందు దేవునికి గౌరవ సూచకంగా సజీవమైన పాంఫ్రెట్ చేపను మరియు రొయ్యను అక్కడ వదులుతారు. విశేషమేమిటంటే, గత ఏడాది దేవుడిని ఎక్కడ వదిలారో, ఆ అగాధ సముద్రంలో కూడా ఆ స్థలాన్ని ఈ యువకులు ఖచ్చితంగా కనుగొంటారు. నీటిలోకి మునిగి విగ్రహాన్ని వెతికే పనిని గ్రామంలోని తాండేల్ కుటుంబానికి చెందిన పురుషులు చేస్తారు. వారికే ఈ విగ్రహం దొరుకుతుందని చెబుతారు. ఈ విగ్రహం నల్ల రాతితో చేసిన ఒక చిన్న శిల (టాక్). విగ్రహం మధ్యలో అశ్వారూఢుడైన దేవుని ప్రతిమ ఉంటుంది. తోడుగా మాధో-ఈర్ సోదరుల ప్రతిమలు ఉంటాయి. అనేక ఏళ్లు నీటిలో ఉండటం వల్ల ఈ రాతి శిల్పంపై ఉన్న బొమ్మలు అస్పష్టంగా మారాయి.
విగ్రహం దొరికిన తర్వాత దేవునికి స్నానం చేయించి, సింధూరం పూసి, గౌరవప్రదమైన పల్లకీలో ఉంచి, మేళతాళాలు, గులాల్ చల్లుతూ ఊరేగింపుగా తీసుకువస్తారు. ఈ ఊరేగింపు గ్రామంలోని తాండేల్ ఇంటికి చేరుకుంటుంది. వారి దేవుని గదిలో దేవునికి భక్తిశ్రద్ధలతో పూజలు చేస్తారు. ప్రత్యేకంగా నిర్మించిన ప్రదేశంలో బహిరోబా విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠిస్తారు. మరుసటి రోజు అంటే లక్ష్మీపూజ రోజున తెల్లవారుజామున బహిరీదేవునికి అభిషేకం చేస్తారు. శిరస్సుపై వెండి కిరీటాన్ని అలంకరిస్తారు. పూలు, ఆకులతో అలంకరణ చేస్తారు. ఆ తర్వాత దర్శనం కోసం మరియు మొక్కులు చెల్లించుకోవడానికి నవీ ముంబైతో పాటు ముంబై, థానే మరియు రాయగడ్ జిల్లాల నుండి భక్తులు బారులు తీరుతారు.
ఈ సమయంలో మూడు రోజుల పాటు గ్రామం జాతరలా మారుతుంది. ఆ రాత్రి గ్రామంలో దేవుని పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. భక్తులు దీపావళి పిండివంటలు, కొబ్బరికాయలు, పూలమాలలు సమర్పిస్తారు. సాంప్రదాయ కోలీ గీతాలు, గొంధళ్, భజన-కీర్తనలతో ఈ ఉత్సవం జరుగుతుంది.
మూడవ రోజు అంటే బలిప్రతిపద నాడు దేవుడు తిరిగి సముద్రంలోని తన స్థానానికి వెళ్లడానికి పల్లకీలో కూర్చుంటాడు. దేవుని ఊరేగింపు ఘనంగా జరుగుతుంది. ఈ సమయంలో దేవుడికి వీడ్కోలు పలకడానికి వేలాది మంది భక్తులు తీరానికి చేరుకుంటారు. భారమైన హృదయంతో, కన్నీటి పర్యంతమవుతూ ఆ వేడుక ముగుస్తుంది. ఆపై ౩౦౦ నుండి ౪౦౦ మంది యువకులు పడవల్లో దేవుడిని తన స్థానంలో వదలడానికి బయలుదేరుతారు. దేవుడు సముద్ర గర్భంలో కూర్చుని పన్నెండు నెలలు తపస్సు చేస్తాడని ప్రజల నమ్మకం. ఇక్కడి గ్రామస్థులలో ఎక్కువ మంది మత్స్యకారులు కావడంతో సముద్రంలోకి వెళ్లక తప్పదు. అక్కడ బహిరీదేవుడే తమను రక్షిస్తాడని వారి ప్రగాఢ విశ్వాసం.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పన్వేల్ నుండి ౧౨ కి.మీ, కొంకణ్ భవన్ నుండి ౧ కి.మీ దూరంలో
- పన్వేల్, బేలాపూర్ నుండి ఎన్.ఎమ్.ఎమ్.టి బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు గ్రామంలోకి రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం
ജലത്തിലെ ബഹിരിദേവൻ
ദിവാളേ ഗ്രാമം, ബേലാപ്പൂർ, നവി മുംബൈ

ഹിന്ദുധർമ്മത്തിൽ ‘അതിഥി ദേവോ ഭവ’ അഥവാ അതിഥിയെ ദൈവമായി കാണുന്ന രീതിയുണ്ട്, എന്നാൽ നവി മുംബൈയിലെ ദിവാളേ അത്തരമൊരു ഗ്രാമമാണ്, അവിടെ ദൈവം തന്നെ അതിഥിയായി വരുന്നു. ഈ ദൈവം ബഹിരിദേവൻ അഥവാ ഭൈരിദേവനാണ്. ഈ അതിഥി വെറും രണ്ടര ദിവസത്തേക്ക് മാത്രമാണ് ഗ്രാമത്തിൽ വരുന്നത്. ബാക്കി വർഷം മുഴുവൻ അദ്ദേഹം ഘാരപുരി ദ്വീപിന് സമീപം കടലിന്റെ അടിത്തട്ടിലാണ് വസിക്കുന്നത്. ദീപാവലിയിൽ അശ്വിൻ ശുക്ല അമാവാസി മുതൽ മൂന്ന് ദിവസത്തേക്ക് ഇവിടെ ബഹിരിദേവന്റെ വലിയ യാത്ര (ഉത്സവം) നടക്കുന്നു. ക്ഷേത്രമൊന്നുമില്ലെങ്കിലും ഏതാനും മണിക്കൂറുകൾക്കായി ഗ്രാമത്തിൽ എത്തുന്ന ഈ ദൈവത്തെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടുന്നത്.
‘ഇരുപത്തിയൊന്നാം നൂറ്റാണ്ടിലെ നഗരം’ എന്നറിയപ്പെടുന്ന നവി മുംബൈ എന്ന ആസൂത്രിത നഗരത്തിൽ മുൻപ് പല ഗ്രാമങ്ങളും പാടികളും ഉണ്ടായിരുന്നു. ബേലാപ്പൂർ അതിലെ പ്രധാനപ്പെട്ട ഒരു ഗ്രാമമാണ്. പൻവേൽ ഉൾക്കടലിന്റെ മുഖത്തുള്ള ഈ ഗ്രാമത്തെ മുൻപ് ഷാബാസ് അല്ലെങ്കിൽ ഷാബാജ് എന്ന് വിളിച്ചിരുന്നു. ഇവിടുത്തെ കോട്ടയിൽ നിന്ന് പൻവേലിലേക്കും പൂനെയിലേക്കും പോകുന്ന വഴികൾ നിയന്ത്രിക്കാൻ സാധിച്ചിരുന്നു. ഈ ഗ്രാമത്തോട് ചേർന്ന്
ദിവാളേ എന്ന ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. കടൽത്തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ഗ്രാമം ഇപ്പോൾ ബേലാപ്പൂരിന്റെ തന്നെ ഭാഗമായി മാറിയിരിക്കുന്നു. ബഹിരിദേവനാണ് ഇവിടുത്തെ ഗ്രാമദേവത. ഈ ഗ്രാമത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ ഇവിടെ ബഹിരിദേവന് ക്ഷേത്രമില്ല, എങ്കിലും നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഇവിടുത്തെ ഓരോ വീട്ടിലും ബഹിരിദേവനെ നിത്യവും പൂജിക്കുന്നു.
ബഹിരോബ, ഭൈരോബ എന്നിവർ ഗ്രാമദേവതകളാണ്. അവരെ ശിവന്റെ രൂപമായി കണക്കാക്കിയ ശേഷം അവരുടെ പേര് ഭൈരവൻ എന്ന് സംസ്കൃതവൽക്കരിക്കപ്പെട്ടതാകാൻ സാധ്യതയുണ്ടെന്ന് ‘മറാഠി വിശ്വകോശ’കാരന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. പഞ്ചമുഖ ശിവന്റെ തെക്ക് ഭാഗത്തുള്ള മുഖത്തെ ഭൈരവൻ എന്ന് വിളിക്കുന്നു. അതുപോലെ ഭൈരവൻ ശിവന്റെ പ്രധാന ഗണമാണെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ആഗരി, കോളി സമുദായങ്ങളിലെ പലരുടെയും കുലദൈവമാണ് ഖണ്ഡോബയും ബഹിരോബയും. മഹാരാഷ്ട്രയിലെ പല ഗ്രാമങ്ങളിലും ബഹിരോബയുടെ ക്ഷേത്രങ്ങൾ കാണാം. എന്നാൽ ദിവാളേ ഗ്രാമത്തിലെ ബഹിരോബയുടെ വാസസ്ഥലം കടലിന്റെ അടിത്തട്ടിലാണ്.
ദീപാവലിയോട് അടുക്കുമ്പോൾ ദിവാളേയിലെ ഗ്രാമീണരുടെ ഉത്സാഹം പലമടങ്ങ് വർദ്ധിക്കുന്നു. കാരണം ഈ സമയത്താണ് അവരുടെ പ്രിയപ്പെട്ട ഭൈരിദേവൻ കടലിന്റെ അടിത്തട്ട് വിട്ട് ഗ്രാമീണർക്ക് ദർശനം നൽകാൻ വരുന്നത്. അതിനായി ഓരോ വീട്ടിലും പെയിന്റിംഗ് ആരംഭിക്കുന്നു. ദീപാലങ്കാരങ്ങൾ ചെയ്യുന്നു. പരിസരം അലങ്കരിക്കപ്പെടുന്നു. വീടുകൾക്ക് മുന്നിൽ രംഗോലികൾ കാണാം. ഈ ആഘോഷത്തിന് നൂറുകണക്കിന് വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇന്നത്തെ തലമുറയും അതേ ഉത്സാഹത്തോടെയാണ് ആ ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നത്. ദീപാവലിയിൽ നരക ചതുർദശിക്ക് തലേദിവസം ഈ ദൈവത്തെ കടലിൽ നിന്ന് കൊണ്ടുവരാൻ കൗൾ (ദൈവിക അനുമതി) ചോദിക്കുന്നു. കൗൾ ലഭിച്ചാൽ പിറ്റേദിവസം പഞ്ചക്രോശിയിലെ ൩൦൦ മുതൽ ൪൦൦ വരെ യുവാക്കൾ വള്ളങ്ങളും ബോട്ടുകളുമായി കടലിന്റെ അടിത്തട്ടിൽ വസിക്കുന്ന തങ്ങളുടെ ദൈവത്തെ കൊണ്ടുവരാൻ പുറപ്പെടുന്നു. ഈ ആഘോഷം കാണാൻ ഉറാൻ, ഘാരപുരി, ട്രോംബെ പരിസരങ്ങളിൽ നിന്ന് നിരവധി ഭക്തർ വള്ളങ്ങളിലും ബോട്ടുകളിലും ഇവിടെയെത്തുന്നു.
ഘാരപുരി ദ്വീപിന് സമീപമുള്ള ആഴക്കടലിൽ ഈ യുവാക്കൾ ബഹിരിദേവനെ തിരയാൻ ആരംഭിക്കുന്നു. അതിനുമുമ്പ് ദൈവത്തിനുള്ള ബഹുമാനമായി ജീവനുള്ള പാമ്പ്ലെറ്റ് മീനിനെയും ചെമ്മീനെയും അവിടെ നിക്ഷേപിക്കുന്നു. പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ കഴിഞ്ഞ വർഷം ഏത് സ്ഥലത്താണോ ഈ ദൈവത്തെ നിക്ഷേപിച്ചത്, ആ സ്ഥലം ആ വിശാലമായ കടലിലും ഈ യുവാക്കൾ കൃത്യമായി കണ്ടെത്തുന്നു. മുങ്ങിത്തപ്പി വിഗ്രഹം കണ്ടെത്തുന്ന ജോലി ഗ്രാമത്തിലെ ടാണ്ടേൽ കുടുംബത്തിലെ പുരുഷന്മാരുടേതാണ്. അവർക്ക് മാത്രമാണ് ഈ വിഗ്രഹം ലഭിക്കുന്നത് എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ വിഗ്രഹം കറുത്ത കല്ലിലുള്ള ഒരു ശിലയാണ്. വിഗ്രഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കുതിരപ്പുറത്തിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ പ്രതിമയുണ്ട്. കൂടെ മാധോ-ഈർ സഹോദരന്മാരുടെ പ്രതിമകളുമുണ്ട്. വർഷങ്ങളോളം വെള്ളത്തിൽ കിടന്നതിനാൽ ഈ ശിലാശില്പത്തിലെ കൊത്തുപണികൾ അവ്യക്തമായിട്ടുണ്ട്.
വിഗ്രഹം ലഭിച്ചുകഴിഞ്ഞാൽ ദൈവത്തിന് സ്നാനം നൽകുന്നു, പിന്നീട് സിന്ദൂരം പൂശി, ബഹുമാനപ്പെട്ട പല്ലക്കിൽ ഇരുത്തി, വാദ്യമേളങ്ങളോടെ, ഗുലാൽ വിതറി ഘോഷയാത്രയായി കൊണ്ടുവരുന്നു. ഈ ഘോഷയാത്ര ഗ്രാമത്തിലെ ടാണ്ടേലിന്റെ വീടിനടുത്തേക്ക് വരുന്നു. അവരുടെ ദേവഗൃഹത്തിൽ ദൈവത്തെ ഭക്തിപൂർവ്വം പൂജിക്കുന്നു. പ്രത്യേകം തയ്യാറാക്കിയ സ്ഥലത്ത് ബഹിരോബയുടെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിക്കുന്നു. പിറ്റേദിവസം അതായത് ലക്ഷ്മിപൂജ ദിവസം പുലർച്ചെ ബഹിരിദേവന് അഭിഷേകം ചെയ്യുന്നു. ശിരസ്സിൽ വെള്ളി കിരീടം അണിയിക്കുന്നു. പൂക്കൾ കൊണ്ട് അലങ്കരിക്കുന്നു. അതിനുശേഷം ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനുമായി നവി മുംബൈ ഉൾപ്പെടെ മുംബൈ, ഠാണെ, റായ്ഗഡ് ജില്ലകളിൽ നിന്ന് ഭക്തരുടെ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടുന്നത്.
ഈ സമയത്ത് മൂന്ന് ദിവസം ഗ്രാമം ഒരു ജാത്ര (ഉത്സവം) പോലെയാകുന്നു. അന്ന് രാത്രി ഗ്രാമത്തിൽ ദൈവത്തിന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളത്ത് നടക്കുന്നു. ഭക്തർ ഈ സമയത്ത് ദീപാവലി പലഹാരങ്ങൾ, നാളികേരം, മാലകൾ, പൂക്കൾ എന്നിവ അർപ്പിക്കുന്നു. പരമ്പരാഗത കോളി ഗാനങ്ങൾ, ഗോന്ധൾ, ഭജൻ-കീർത്തനങ്ങൾ എന്നിവയോടെ ഈ ഉത്സവം ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു.
മൂന്നാം ദിവസം അതായത് ബലിപ്രതിപദ ദിനത്തിൽ ദൈവം വീണ്ടും കടലിലെ തന്റെ സ്ഥാനത്തേക്ക് പോകാൻ പല്ലക്കിൽ കയറുന്നു. ദൈവത്തിന്റെ ഘോഷയാത്ര വാദ്യമേളങ്ങളോടെ നടത്തുന്നു. ഈ സമയത്ത് ദൈവത്തിന് യാത്രയയപ്പ് നൽകാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ തീരത്ത് ഒത്തുകൂടുന്നു. ഭാരപ്പെട്ട മനസ്സോടെയും കണ്ണീരോടെയും ആ ചടങ്ങ് നടക്കുന്നു. പിന്നീട് വള്ളങ്ങളിൽ ൩൦൦ മുതൽ ൪൦൦ വരെ യുവാക്കൾ ദൈവത്തെ തന്റെ സ്ഥാനത്ത് നിക്ഷേപിക്കാൻ പുറപ്പെടുന്നു. ദൈവം കടലിന്റെ അടിത്തട്ടിലിരുന്ന് പന്ത്രണ്ട് മാസവും തപസ്സ് ചെയ്യുന്നു എന്നാണ് ജനവിശ്വാസം. ഇവിടുത്തെ ഭൂരിഭാഗം ഗ്രാമീണരുടെയും തൊഴിൽ മീൻപിടുത്തമായതിനാൽ കടലിൽ പോകേണ്ടി വരുന്നു. അവിടെ ബഹിരിദേവൻ തന്നെയാണ് തങ്ങളെ സംരക്ഷിക്കുന്നത് എന്ന് അവർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പൻവേലിൽ നിന്ന് ൧൨ കി.മീ, കൊങ്കൺ ഭവനിൽ നിന്ന് ൧ കി.മീ അകലെ
- പൻവേൽ, ബേലാപ്പൂർ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എൻ.എം.എം.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ഗ്രാമത്തിൽ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ಜಲವಾಸಿ ಬಹಿರಿದೇವ
ದಿವಾಳೆ ಗ್ರಾಮ, ಬೇಲಾಪುರ, ನವಿ ಮುಂಬೈ

ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ‘ಅತಿಥಿ ದೇವೋ ಭವ’ ಅಂದರೆ ಅತಿಥಿಯನ್ನೇ ದೇವರೆಂದು ಭಾವಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ, ಆದರೆ ನವಿ ಮುಂಬೈನ ದಿವಾಳೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ದೇವರೇ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಬರುತ್ತಾನೆ. ಈ ದೇವರೆಂದರೆ ಬಹಿರಿದೇವ ಅಥವಾ ಭೈರಿದೇವ. ಈ ಅತಿಥಿಯು ಕೇವಲ ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾನೆ. ಉಳಿದ ವರ್ಷವಿಡೀ ಈತನು ಘಾರಾಪುರಿ ದ್ವೀಪದ ಸಮೀಪವಿರುವ ಸಮುದ್ರದ ತಳದಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾನೆ. ದೀಪಾವಳಿಯಲ್ಲಿ ಅಶ್ವಯುಜ ಶುದ್ಧ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಿಂದ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಬಹಿರಿದೇವರ ಭವ್ಯ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ದೇವಾಲಯವಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರುವ ಈ ದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸಾಲುಗಟ್ಟಿ ನಿಲ್ಲುತ್ತಾರೆ.
‘ಇಪ್ಪತ್ತೊಂದನೇ ಶತಮಾನದ ನಗರ’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ನವಿ ಮುಂಬೈನ ಈ ಯೋಜಿತ ನಗರದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳು ಮತ್ತು ಪಾಡಿಗಳು ನೆಲೆಸಿದ್ದವು. ಬೇಲಾಪುರವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಗ್ರಾಮ. ಪನ್ವೇಲ್ ಖಾಡಿಯ ಮುಖಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಹಿಂದೆ ಶಾಬಾಜ್ ಅಥವಾ ಶಾಹಬಾಜ್ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಇಲ್ಲಿನ ಕೋಟೆಯಿಂದ ಪನ್ವೇಲ್ ಮತ್ತು ಪುಣೆಗೆ ಹೋಗುವ ಮಾರ್ಗದ ಮೇಲೆ ನಿಯಂತ್ರಣ ಸಾಧಿಸಬಹುದಾಗಿತ್ತು. ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ
ದಿವಾಳೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಖಾಡಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಗ್ರಾಮವು ಈಗ ಬೇಲಾಪುರದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿದೆ. ಬಹಿರಿದೇವ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮದೇವತೆ. ಈ ಗ್ರಾಮದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಿರಿದೇವರ ದೇವಾಲಯವಿಲ್ಲ, ಆದರೂ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಿರಿದೇವರನ್ನು ನಿತ್ಯವೂ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಬಹಿರೋಬಾ, ಭೈರೋಬಾ ಇವರು ಗ್ರಾಮದೇವತೆಗಳು. ಇವರನ್ನು ಶಿವನೊಂದಿಗೆ ತಾದಾತ್ಮ್ಯಗೊಳಿಸಿದ ನಂತರ, ಇವರ ಹೆಸರನ್ನು ಭೈರವ ಎಂದು ಸಂಸ್ಕೃತೀಕರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ‘ಮರಾಠಿ ವಿಶ್ವಕೋಶ’ಕಾರರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಂಚಮುಖಿ ಶಿವನ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನ ಮುಖವನ್ನು ಭೈರವ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಭೈರವನು ಶಿವನ ಪ್ರಮುಖ ಗಣನೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಆಗರಿ ಮತ್ತು ಕೋಳಿ ಸಮಾಜದ ಅನೇಕರ ಕುಲದೈವತ ಖಂಡೋಬಾ ಮತ್ತು ಬಹಿರೋಬಾ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಬಹಿರೋಬಾನ ದೇವಾಲಯಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಆದರೆ ದಿವಾಳೆ ಗ್ರಾಮದ ಬಹಿರೋಬಾನ ವಾಸಸ್ಥಾನ ಸಮುದ್ರದ ತಳಭಾಗದಲ್ಲಿದೆ.
ದೀಪಾವಳಿಯ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ದಿವಾಳೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಉತ್ಸಾಹವು ಹಲವು ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಪ್ರೀತಿಯ ಭೈರಿದೇವನು ಸಮುದ್ರದ ತಳವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಲು ಬರುತ್ತಾನೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಣ್ಣ ಬಳಿಯುವ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಿಸರವು ಸಿಂಗಾರಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಮನೆಗಳ ಮುಂದೆ ರಂಗೋಲಿಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂದಿನ ಪೀಳಿಗೆಯೂ ಅಷ್ಟೇ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತದೆ. ದೀಪಾವಳಿಯಲ್ಲಿ ನರಕ ಚತುರ್ದಶಿಯ ಹಿಂದಿನ ದಿನ ಈ ದೇವರನ್ನು ಸಮುದ್ರದಿಂದ ತರಲು ಕೌಲನ್ನು (ಅನುಮತಿ) ಪಡೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಕೌಲು ಸಿಕ್ಕಿದ ನಂತರ ಮರುದಿನ ಪಂಚಕ್ರೋಶಿಯ ೩೦೦ ರಿಂದ ೪೦೦ ಯುವಕರು ದೋಣಿಗಳು ಮತ್ತು ಬೋಟ್ಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಮುದ್ರದ ತಳದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ತಮ್ಮ ದೇವರನ್ನು ಕರೆತರಲು ಹೊರಡುತ್ತಾರೆ. ಈ ಸೋಹಳವನ್ನು ನೋಡಲು ಉರಣ್, ಘಾರಾಪುರಿ, ಟ್ರಾಂಬೆ ಪ್ರದೇಶದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೋಣಿಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಘಾರಾಪುರಿ ದ್ವೀಪದ ಸಮೀಪವಿರುವ ಆಳ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಈ ಯುವಕರು ಬಹಿರಿದೇವರನ್ನು ಹುಡುಕಲು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ದೇವರಿಗೆ ಗೌರವ ಸೂಚಕವಾಗಿ ಜೀವಂತ ಪಾಮ್ಫ್ರೆಟ್ (ಪಾಪಲೆಟ್) ಮೀನು ಮತ್ತು ಸೀಗಡಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬಿಡಲಾಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ ಕಳೆದ ವರ್ಷ ದೇವರನ್ನು ಎಲ್ಲಿ ಬಿಡಲಾಗಿತ್ತೋ, ಆ ಸ್ಥಳವನ್ನು ಆ ವಿಶಾಲ ಸಮುದ್ರದಲ್ಲೂ ಈ ಯುವಕರು ನಿಖರವಾಗಿ ಪತ್ತೆಹಚ್ಚುತ್ತಾರೆ. ಮುಳುಗಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಹುಡುಕುವ ಕೆಲಸ ಗ್ರಾಮದ ತಾಂಡೇಲ್ ಕುಟುಂಬದ ಪುರುಷರದ್ದು. ಅವರೇ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ತಟ್ಟೆಯಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಶ್ವದ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿರುವ ದೇವರ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಮಾಧೋ-ಈರ್ ಸಹೋದರರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ನೀರಿನಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಈ ಶಿಲೆಯ ಮೇಲಿನ ಕೆತ್ತನೆ ಅಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ.
ಮೂರ್ತಿ ಸಿಕ್ಕಿದ ನಂತರ ದೇವರಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ನಂತರ ಸಿಂಧೂರ ಲೇಪನ ಮಾಡಿ, ಗೌರವದ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ, ವಾದ್ಯಗಳೊಂದಿಗೆ, ಗುಲಾಲ್ ಎರಚುತ್ತಾ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕರೆತರಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೆರವಣಿಗೆಯು ಗ್ರಾಮದ ತಾಂಡೇಲ್ ಅವರ ಮನೆಯ ಬಳಿ ಬರುತ್ತದೆ. ಅವರ ದೇವಗೃಹದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬಹಿರೋಬಾನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮರುದಿನ ಅಂದರೆ ಲಕ್ಷ್ಮೀಪೂಜೆಯ ದಿನದಂದು ಮುಂಜಾನೆ ಬಹಿರಿದೇವರಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವನ್ನು ಧರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹೂವು-ಪತ್ರಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಅಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ನವಿ ಮುಂಬೈ ಸೇರಿದಂತೆ ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ ಮತ್ತು ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಭಕ್ತರ ದಂಡೇ ಹರಿದು ಬರುತ್ತದೆ.
ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಗ್ರಾಮವು ಜಾತ್ರೆಯ ರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಅಂದು ರಾತ್ರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದೇವರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಭಕ್ತರು ದೀಪಾವಳಿಯ ತಿಂಡಿ, ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಹಾರ ಮತ್ತು ಹೂವುಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕೋಳಿ ಗೀತೆಗಳು, ಗೊಂಡಳ, ಭಜನೆ-ಕೀರ್ತನೆಗಳೊಂದಿಗೆ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಮೂರನೇ ದಿನ ಅಂದರೆ ಬಲಿಪಾಡ್ಯಮಿಯಂದು ದೇವನು ಮತ್ತೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿನ ತನ್ನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ದೇವರ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ವಾದ್ಯಗಳೊಂದಿಗೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಬೀಳ್ಕೊಡಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದಡದಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ. ಭಾರವಾದ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮತ್ತು ಕಣ್ಣೀರಿನಿಂದ ಆ ಸೋಹಳವು ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಂತರ ಮತ್ತೆ ದೋಣಿಗಳಲ್ಲಿ ೩೦೦ ರಿಂದ ೪೦೦ ಯುವಕರು ದೇವರನ್ನು ತಮ್ಮ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬಿಡಲು ಹೊರಡುತ್ತಾರೆ. ದೇವನು ಸಮುದ್ರದ ತಳದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಜನರ ನಂಬಿಕೆ. ಇಲ್ಲಿನ ಬಹುಪಾಲು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಕಸುಬು ಮೀನುಗಾರಿಕೆಯಾಗಿರುವುದರಿಂದ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಲೇಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಬಹಿರಿದೇವನೇ ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಅವರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪನ್ವೇಲ್ನಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ, ಕೊಂಕಣ ಭವನದಿಂದ ೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪನ್ವೇಲ್, ಬೇಲಾಪುರದಿಂದ ಎನ್ಎಮ್ಎಂಟಿ (NMMT) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ
জলে অধিষ্ঠিত বহিরীদেব
দিবালে গ্রাম, বেলাপুর, নবি মুম্বই

হিন্দু ধর্মে ‘অতিথি দেবো ভব’ অর্থাৎ অতিথিকেই দেবতা মানার রীতি প্রচলিত আছে, কিন্তু নবি মুম্বইয়ের দিবালে এমন একটি গ্রাম যেখানে স্বয়ং দেবতাই অতিথি হিসেবে আগমন করেন। এই দেবতা হলেন বহিরীদেব বা ভৈরীদেব। এই অতিথি কেবল আড়াই দিনের জন্য গ্রামে আসেন। বাকি সারা বছর তিনি ঘারাপুরী দ্বীপের কাছে সমুদ্রের তলদেশে অবস্থান করেন। দীপাবলিতে অশ্বিন শুদ্ধ অমাবস্যার পর থেকে তিন দিনের জন্য এখানে বহিরীদেবের বিশাল যাত্রা অনুষ্ঠিত হয়। কোনো মন্দির না থাকা সত্ত্বেও মাত্র কয়েক ঘণ্টার জন্য গ্রামে আসা এই দেবতার দর্শন ও মানত পূরণের জন্য হাজার হাজার ভক্তের ঢল নামে।
‘একবিংশ শতাব্দীর শহর’ হিসেবে পরিচিত নবি মুম্বইয়ের এই পরিকল্পিত শহরে অতীতে অনেক গ্রাম ও বসতি ছিল। বেলাপুর তার মধ্যে অন্যতম একটি গুরুত্বপূর্ণ গ্রাম। পানভেল খাঁড়ির মুখে অবস্থিত এই গ্রামটিকে আগে শাহবাজ বা শাহবাজ বলা হতো। এখানকার দুর্গ থেকে পানভেল ও পুনের দিকে যাওয়ার পথের ওপর নিয়ন্ত্রণ রাখা যেত। এই গ্রামের গা ঘেঁষেই
দিবালে গ্রামটি অবস্থিত। খাঁড়ির তীরে অবস্থিত এই গ্রামটি এখন বেলাপুরেরই একটি অংশ হয়ে গেছে। বহিরীদেব এখানকার গ্রামদেবতা। এই গ্রামের বৈশিষ্ট্য হলো, এখানে বহিরীদেবের কোনো মন্দির নেই, তবুও শত শত বছর ধরে এখানকার প্রতিটি ঘরে বহিরীদেবের নিত্যপূজা করা হয়।
বহিরোবা, ভৈরোবা হলেন গ্রামদেবতা। শিবের সাথে তাঁদের অভিন্নতা মানার পর, তাঁদের নামের সংস্কৃত রূপান্তর ‘ভৈরব’ হয়েছে বলে ‘মারাঠি বিশ্বকোষ’-এর রচয়িতারা মত প্রকাশ করেছেন। পঞ্চমুখী শিবের দক্ষিণ দিকের মুখকে ভৈরব বলা হয়। একইভাবে ভৈরবকে শিবের প্রধান গণ হিসেবেও মানা হয়। আগরি ও কোলি সমাজের অনেকেরই খণ্ডোবা, বহিরোবা কুলদেবতা। মহারাষ্ট্রের অনেক গ্রামে বহিরোবার মন্দির দেখা যায়। তবে দিবালে গ্রামের বহিরোবার বাস সমুদ্রের তলদেশে।
দীপাবলির প্রাক্কালে দিবালে গ্রামের গ্রামবাসীদের উৎসাহ বহুগুণ বেড়ে যায়। কারণ এই সময়ে তাদের প্রিয় ভৈরীদেব সমুদ্রের তলদেশ ছেড়ে গ্রামবাসীদের দর্শন দিতে আসেন। সেজন্য প্রতিটি ঘরে রং করা হয়। আলোকসজ্জা করা হয়। চারপাশ সেজে ওঠে। বাড়ির সামনে আলপনা দেখা যায়। এই উৎসবের শত শত বছরের ঐতিহ্য রয়েছে বলে জানা যায়। আজকের প্রজন্মও সমান উৎসাহে এই উৎসব পালন করে। দীপাবলিতে নরক চতুর্দশীর আগের দিন এই দেবতাকে সমুদ্র থেকে আনার জন্য ‘কৌল’ (অনুমতি) নেওয়া হয়। অনুমতি পাওয়ার পর পরের দিন পঞ্চক্রোশীর ৩০০ থেকে ৪০০ তরুণ নৌকা ও বোট নিয়ে সমুদ্রের তলদেশে বসবাসকারী তাদের দেবতাকে আনতে বেরিয়ে পড়ে। এই উৎসব দেখার জন্য উরণ, ঘারাপুরী, ট্রম্বে এলাকার অনেক ভক্ত নৌকা ও বোট নিয়ে এখানে আসেন।
ঘারাপুরী দ্বীপের কাছে গভীর সমুদ্রে এই তরুণরা বহিরীদেবের অনুসন্ধান শুরু করেন। তার আগে দেবতার সম্মানার্থে জীবন্ত পমফ্রেট মাছ ও গলদা চিংড়ি সেখানে ছাড়া হয়। বৈশিষ্ট্য হলো, গত বছর যে জায়গায় এই দেবতাকে রাখা হয়েছিল, সেই বিশাল সমুদ্রের মধ্যেও এই তরুণরা সেই জায়গাটি নিখুঁতভাবে খুঁজে বের করে। ডুব দিয়ে মূর্তি খোঁজার কাজ গ্রামের টান্ডেল পরিবারের পুরুষদের। কথিত আছে, কেবল তাদের হাতেই এই মূর্তি ধরা দেয়। এই মূর্তিটি হলো কালো পাথরের একটি ‘টাক’ (প্রতীক)। মূর্তির মাঝখানে অশ্বারূঢ় দেবতার প্রতিচ্ছবি রয়েছে। সাথে মাধো-ঈর ভাইদের প্রতিচ্ছবি আছে। বহু বছর জলে থাকার কারণে এই পাথর-টাকের শিল্পকর্ম অস্পষ্ট হয়ে গেছে।
মূর্তি পাওয়ার পর দেবতাকে স্নান করানো হয়, তারপর সিঁদুর লেপন করে সম্মানের সাথে পালকিতে বসিয়ে, বাদ্যযন্ত্রের তালে তালে, গুলাল ছিটিয়ে শোভাযাত্রা করে আনা হয়। এই শোভাযাত্রা গ্রামের টান্ডেলদের বাড়ির কাছে আসে। তাদের দেবালয়ে দেবতার ভক্তিভরে পূজা হয়। নির্দিষ্ট স্থানে বহিরোবার মূর্তির প্রতিষ্ঠা করা হয়। পরের দিন অর্থাৎ লক্ষ্মীপূজার দিন ভোরে বহিরীদেবকে অভিষেক করানো হয়। মস্তকে রুপোর মুকুট পরানো হয়। ফুল ও পাতা দিয়ে সাজানো হয়। এরপর সেখানে দর্শন ও মানত পূরণের জন্য নবি মুম্বইসহ মুম্বই, ঠানে ও রায়গড় জেলা থেকে ভক্তদের ভিড় উপচে পড়ে।
এই সময়ে তিন দিন গ্রামটি মেলায় পরিণত হয়। সেই রাতে গ্রামে দেবতার পালকি ঘোরে। ভক্তদের পক্ষ থেকে এই সময়ে দীপাবলির খাবার, নারকেল, মালা ও ফুল অর্পণ করা হয়। ঐতিহ্যবাহী কোলি গান, গোনধল, ভজন-কীর্তনের মাধ্যমে এই উৎসব পালন করা হয়।
তৃতীয় দিন অর্থাৎ বলিপ্রতিপদায় দেবতা পুনরায় সমুদ্রের নিজের স্থানে ফিরে যাওয়ার জন্য পালকিতে বসেন। দেবতার বাদ্যযন্ত্রের তালে শোভাযাত্রা বের করা হয়। এই সময়ে দেবতাকে বিদায় জানাতে হাজার হাজার ভক্ত তীরে জড়ো হন। ভারী হৃদয়ে ও অশ্রুসজল চোখে সেই উৎসব সম্পন্ন হয়। তারপর আবার নৌকা করে ৩০০ থেকে ৪০০ তরুণ দেবতাকে তার জায়গায় রেখে আসার জন্য বেরিয়ে পড়ে। লোকবিশ্বাস অনুযায়ী, দেবতা সমুদ্রের তলদেশে বসে বারো মাস তপস্যা করেন। এখানকার অধিকাংশ গ্রামবাসীর পেশা মাছ ধরা হওয়ায় তাদের সমুদ্রে যেতেই হয়। সেখানে বহিরীদেবই তাদের রক্ষা করেন, এমনটাই তাদের বিশ্বাস।
প্রয়োজনীয় তথ্য
- পানভেল থেকে ১২ কিমি, আর কোঙ্কণ ভবন থেকে ১ কিমি দূরত্বে
- পানভেল, বেলাপুর থেকে এনএমএমটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি গ্রামে আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা
ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਬਿਰਾਜਮਾਨ ਬਹਿਰੀਦੇਵ
ਦਿਵਾਲ਼ੇ ਪਿੰਡ, ਬੇਲਾਪੁਰ, ਨਵੀਂ ਮੁੰਬਈ

ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ‘ਅਤਿਥੀ ਦੇਵੋ ਭਵ’ ਭਾਵ ਮਹਿਮਾਨ ਨੂੰ ਹੀ ਦੇਵਤਾ ਮੰਨਣ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ, ਪਰ ਨਵੀਂ ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਦਿਵਾਲ਼ੇ ਇੱਕ ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਹੈ ਜਿੱਥੇ ਦੇਵਤਾ ਖੁਦ ਮਹਿਮਾਨ ਬਣ ਕੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਹ ਦੇਵਤਾ ਹਨ ਬਹਿਰੀਦੇਵ ਜਾਂ ਭੈਰੀਦੇਵ। ਇਹ ਮਹਿਮਾਨ ਸਿਰਫ਼ ਅਢਾਈ ਦਿਨਾਂ ਲਈ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਬਾਕੀ ਸਾਰਾ ਸਾਲ ਉਹ ਘਾਰਾਪੁਰੀ ਟਾਪੂ ਨੇੜੇ ਸਮੁੰਦਰ ਦੀ ਤਹਿ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਦੀਵਾਲੀ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁੱਧ ਅਮਾਵਸਿਆ ਤੋਂ ਤਿੰਨ ਦਿਨਾਂ ਲਈ ਇੱਥੇ ਬਹਿਰੀਦੇਵ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਯਾਤਰਾ ਭਰਦੀ ਹੈ। ਕੋਈ ਮੰਦਰ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਕੁਝ ਘੰਟਿਆਂ ਲਈ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆਏ ਇਸ ਦੇਵਤੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗ ਜਾਂਦੀ ਹੈ।
‘ਇੱਕੀਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਸ਼ਹਿਰ’ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਨਵੀਂ ਮੁੰਬਈ ਵਰਗੇ ਯੋਜਨਾਬੱਧ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਕਈ ਪਿੰਡ ਅਤੇ ਬਸਤੀਆਂ ਸਨ। ਬੇਲਾਪੁਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਪਿੰਡ ਹੈ। ਪਨਵੇਲ ਖਾੜੀ ਦੇ ਮੂੰਹ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਪਿੰਡ ਨੂੰ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਾਬਾਜ਼ ਜਾਂ ਸ਼ਾਹਬਾਜ਼ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਪਨਵੇਲ ਅਤੇ ਪੁਣੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਨਿਯੰਤਰਣ ਰੱਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਸੀ। ਇਸ ਪਿੰਡ ਨਾਲ ਲੱਗਦਾ ਹੀ
ਦਿਵਾਲ਼ੇ ਪਿੰਡ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਖਾੜੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਇਹ ਪਿੰਡ ਹੁਣ ਬੇਲਾਪੁਰ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਹਿੱਸਾ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਬਹਿਰੀਦੇਵ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤਾ ਹਨ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਹਿਰੀਦੇਵ ਦਾ ਕੋਈ ਮੰਦਰ ਨਹੀਂ ਹੈ, ਫਿਰ ਵੀ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਰ ਘਰ ਵਿੱਚ ਬਹਿਰੀਦੇਵ ਦੀ ਨਿੱਤ ਨੇਮ ਨਾਲ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਬਹਿਰੋਬਾ, ਭੈਰੋਬਾ ਗ੍ਰਾਮ ਦੇਵਤੇ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਦਾ ਰੂਪ ਮੰਨੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਮ ਦਾ ਭੈਰਵ ਵਜੋਂ ਸੰਸਕ੍ਰਿਤਕਰਨ ਹੋਣ ਦੀ ਸੰਭਾਵਨਾ ‘ਮਰਾਠੀ ਵਿਸ਼ਵਕੋਸ਼’ਕਾਰਾਂ ਨੇ ਪ੍ਰਗਟਾਈ ਹੈ। ਪੰਚਮੁਖੀ ਸ਼ਿਵ ਦੇ ਦੱਖਣੀ ਮੁੱਖ ਨੂੰ ਭੈਰਵ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਭੈਰਵ ਨੂੰ ਸ਼ਿਵ ਦਾ ਪ੍ਰਮੁੱਖ ਗਣ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਗਰੀ ਅਤੇ ਕੋਲੀ ਸਮਾਜ ਦੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਲੋਕਾਂ ਦਾ ਖੰਡੋਬਾ, ਬਹਿਰੋਬਾ ਕੁਲਦੇਵਤਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ਬਹਿਰੋਬਾ ਦੇ ਮੰਦਰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਦਿਵਾਲ਼ੇ ਪਿੰਡ ਦੇ ਬਹਿਰੋਬਾ ਦਾ ਨਿਵਾਸ ਹਾਲਾਂਕਿ ਸਮੁੰਦਰ ਦੀ ਤਹਿ ਵਿੱਚ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਦੀਵਾਲੀ ਦੇ ਨੇੜੇ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਦਿਵਾਲ਼ੇ ਦੇ ਵਸਨੀਕਾਂ ਦਾ ਉਤਸ਼ਾਹ ਕਈ ਗੁਣਾ ਵੱਧ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਿਆਰੇ ਭੈਰੀਦੇਵ ਸਮੁੰਦਰ ਦੀ ਤਹਿ ਛੱਡ ਕੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਣ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਹਰ ਘਰ ਵਿੱਚ ਰੰਗ-ਰੋਗਨ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰੌਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਲਾਕਾ ਸਜਣ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਘਰਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੰਗੋਲੀਆਂ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਲੱਗਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਦੀ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅੱਜ ਦੀ ਪੀੜ੍ਹੀ ਵੀ ਓਨੇ ਹੀ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਇਹ ਉਤਸਵ ਮਨਾਉਂਦੀ ਹੈ। ਦੀਵਾਲੀ ਵਿੱਚ ਨਰਕ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਤੋਂ ਇੱਕ ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਇਸ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚੋਂ ਲਿਆਉਣ ਲਈ ਕੌਲ (ਆਗਿਆ) ਲਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੌਲ ਮਿਲਦਿਆਂ ਹੀ ਅਗਲੇ ਦਿਨ ਪੰਜ ਕੋਹ ਦੇ ਦਾਇਰੇ ਵਿੱਚੋਂ ੩੦੦ ਤੋਂ ੪੦੦ ਨੌਜਵਾਨ ਕਿਸ਼ਤੀਆਂ ਅਤੇ ਬੋਟਾਂ ਲੈ ਕੇ ਸਮੁੰਦਰ ਦੀ ਤਹਿ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਆਪਣੇ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਲਿਆਉਣ ਲਈ ਨਿਕਲਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਨੂੰ ਦੇਖਣ ਲਈ ਉਰਨ, ਘਾਰਾਪੁਰੀ, ਟ੍ਰੌਂਬੇ ਖੇਤਰ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਕਿਸ਼ਤੀਆਂ ਅਤੇ ਬੋਟਾਂ ਰਾਹੀਂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਘਾਰਾਪੁਰੀ ਟਾਪੂ ਨੇੜੇ ਡੂੰਘੇ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਇਹ ਨੌਜਵਾਨ ਬਹਿਰੀਦੇਵ ਦੀ ਭਾਲ ਸ਼ੁਰੂ ਕਰਦੇ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇਵਤੇ ਦੇ ਸਨਮਾਨ ਵਜੋਂ ਜਿਉਂਦੀ ਪਾਪਲੇਟ ਮੱਛੀ ਅਤੇ ਝੀਂਗਾ ਉੱਥੇ ਛੱਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪਿਛਲੇ ਸਾਲ ਜਿਸ ਥਾਂ ‘ਤੇ ਇਹ ਦੇਵਤਾ ਛੱਡਿਆ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਉਹ ਜਗ੍ਹਾ ਉਸ ਅਥਾਹ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਵੀ ਇਹ ਨੌਜਵਾਨ ਸਹੀ ਲੱਭ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਡੁਬਕੀ ਮਾਰ ਕੇ ਮੂਰਤੀ ਲੱਭਣ ਦਾ ਕੰਮ ਪਿੰਡ ਦੇ ਤਾਂਡੇਲ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਮਰਦਾਂ ਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਇੱਕ ਟਾਕ (ਪੱਥਰ ਦਾ ਟੁਕੜਾ) ਹੈ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਘੋੜਸਵਾਰ ਦੇਵਤੇ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਮਾਧੋ-ਈਰ ਭਰਾਵਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਕਈ ਸਾਲ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਕਾਰਨ ਇਸ ਪੱਥਰ ਦੇ ਟਾਕ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਕਲਾਕ੍ਰਿਤੀ ਅਸਪਸ਼ਟ ਹੋ ਗਈ ਹੈ।
ਮੂਰਤੀ ਮਿਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਫਿਰ ਸਿੰਦੂਰ ਲਗਾ ਕੇ ਸਨਮਾਨਯੋਗ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਬਿਠਾ ਕੇ, ਵਾਜੇ-ਗਾਜੇ ਨਾਲ, ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ ਜਲੂਸ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਜਲੂਸ ਪਿੰਡ ਦੇ ਤਾਂਡੇਲ ਦੇ ਘਰ ਕੋਲ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦੇਵਘਰ ਵਿੱਚ ਦੇਵਤੇ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਖਾਸ ਤੌਰ ‘ਤੇ ਬਣਾਈ ਗਈ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਬਹਿਰੋਬਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅਗਲੇ ਦਿਨ ਭਾਵ ਲਕਸ਼ਮੀ ਪੂਜਨ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਬਹਿਰੀਦੇਵ ਨੂੰ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਪਹਿਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫੁੱਲਾਂ ਨਾਲ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਨਵੀਂ ਮੁੰਬਈ ਸਮੇਤ ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ ਅਤੇ ਰਾਏਗੜ੍ਹ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਤੋਂ ਭਗਤਾਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਇਸ ਸਮੇਂ ਤਿੰਨ ਦਿਨ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮੇਲੇ ਵਰਗਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਰਾਤ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪਾਲਕੀ ਘੁੰਮਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਇਸ ਸਮੇਂ ਦੀਵਾਲੀ ਦਾ ਫਰਾਲ਼, ਨਾਰੀਅਲ, ਹਾਰ ਅਤੇ ਫੁੱਲ ਭੇਟ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਰਵਾਇਤੀ ਕੋਲੀ ਗੀਤਾਂ, ਗੋਂਧਲ, ਭਜਨ-ਕੀਰਤਨ ਨਾਲ ਇਹ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਤੀਜੇ ਦਿਨ ਭਾਵ ਬਲੀ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਨੂੰ ਦੇਵਤਾ ਵਾਪਸ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਆਪਣੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਜਾਣ ਲਈ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਬੈਠਦੇ ਹਨ। ਦੇਵਤੇ ਦਾ ਵਾਜੇ-ਗਾਜੇ ਨਾਲ ਜਲੂਸ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਵਿਦਾਇਗੀ ਦੇਣ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਇਕੱਠੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਭਾਰੀ ਮਨ ਅਤੇ ਨਮ ਅੱਖਾਂ ਨਾਲ ਉਹ ਸਮਾਰੋਹ ਸੰਪੰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਫਿਰ ਦੁਬਾਰਾ ਕਿਸ਼ਤੀਆਂ ਵਿੱਚ ੩੦੦ ਤੋਂ ੪੦੦ ਨੌਜਵਾਨ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਛੱਡਣ ਲਈ ਨਿਕਲਦੇ ਹਨ। ਲੋਕਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਦੇਵਤਾ ਸਮੁੰਦਰ ਦੀ ਤਹਿ ਵਿੱਚ ਬੈਠ ਕੇ ਬਾਰਾਂ ਮਹੀਨੇ ਤਪੱਸਿਆ ਕਰਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਬਹੁਗਿਣਤੀ ਵਸਨੀਕਾਂ ਦਾ ਕਿੱਤਾ ਮੱਛੀ ਫੜਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਣਾ ਹੀ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਉੱਥੇ ਬਹਿਰੀਦੇਵ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕਰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਨਵੇਲ ਤੋਂ ੧੨ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਕੋਕਣ ਭਵਨ ਤੋਂ ੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਨਵੇਲ, ਬੇਲਾਪੁਰ ਤੋਂ ਐਨਐਮਐਮਟੀ (NMMT) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
