पद्मावती देवी मंदिर

घोसपुरी, ता. / जि. अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील घोसपुरी या ठिकाणी माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे स्थान असून पद्मावती देवी मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. जागृत नवसाला पावणारी, अशी येथील देवीची ख्याती असल्याने हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या आतील भिंती खांबांना सगळीकडे काचेच्या विविधरंगी लहानलहान तुकड्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली असल्याने परिसरात तेकाच मंदिरम्हणूनही प्रसिद्ध आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की येथून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील जठार घराण्यातील एक रेणुका मातेचा भक्त दरवर्षी माहूरगडावर देवीच्या दर्शनाला जात असे. लग्नाला अनेक दिवस होऊनही त्याला अपत्य नव्हते, म्हणून त्याने माहूरच्या देवीला साकडे घातले. त्याच रात्री देवीने स्वप्नदृष्टांत देऊन पहाटे त्याला शेतात जाण्यास सांगितले. देवीने सांगितल्याप्रमाणे शेतात पोचताच त्याच्या कानावर लहान बालकाचे रडणे पडले. आवाजाच्या दिशेने तो गेला असता एका झाडाखाली नुकतीच जन्मलेली मुलगी दिसली. त्याने तिला उचलून घरी आणले. या दाम्पत्याने तिचे नाव पद्मावती ठेऊन पालनपोषण केले.

काही वर्षांनी पद्मावती उपवर झाली. अहिल्यानगर तालुक्यातील सध्याचे मौजे रूईछत्ती या गावातील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी तिचे लग्न लावण्यात आले. तिच्या सासरची भरपूर जमिन होती. त्यामुळे तीही शेतीत त्यांना मदत करत असे. एकदा पद्मावतीच्या सासऱ्यांनी शेतीच्या कामासाठी अनेकांना बोलावले होते सून पद्मावतीला त्यांच्यासाठी जेवण बनविण्यास सांगितले. पद्मावतीने भाकऱ्या एका लहानशा पातेल्यात थोडी भाजी बनविली. सासरे आले असता तिने त्यांच्याकडे जेवणाचे टोपले दिले. न्याहरीची वेळ झाली, दरंदले यांनी सर्वांना जेवणासाठी हाक मारली. जेवणाचे टोपले सोडून पाहतात तर त्यात केवळ भाकऱ्या होत्या. हे जेवण इतक्या माणसांना कसे पुरेल याची चिंता करीतच सर्वांनी थोडे थोडे खाऊ या असे ठरविले. जेवण वाढण्यास सुरुवात झाल्यावर जितक्या भाकऱ्या उचलल्या जात होत्या तेवढ्याच पुन्हा टोपलीत दिसत होत्या. भाजीच्या बाबतही तोच प्रकार. सर्वजण पोटभर जेवूनही जेवण शिल्लकच होते.

पद्मावतीच्या घरच्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना वाटले की पद्मावती चेटकीण असून तिला घरात ठेवणे चांगले नाही. दुसऱ्या दिवशी पद्मावतीला माहेरी पाठविण्याची लगबग सुरू होते. एक घोडा घेऊन पद्मावती तिचे सासरे यांचा प्रवास सुरू होतो. विसापूरजवळ घोसपुरी येथे येताच एका विहिरीजवळ पद्मावती तिचे सासरे थांबले. तेथील निसर्गसमृद्ध वातावरण पाहून पद्मावतीचे मन रमले. सासऱ्यापासून दूर अंतरावर जाऊन तिने अंगावरील सर्व दागिने एका झऱ्याकाठच्या दगडाजवळ ठेऊन ती तेथे गुप्त झाली.

बराच वेळ होऊनही पद्मावती परत आल्याने सासऱ्याने हाका मारण्यास सुरुवात केली. तेव्हा खूप लांबूनजीअसा आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेने सासरे तेथे गेले असता जेथून पद्मावती गुप्त झाली तेथूनच पुन्हाजीआवाज ऐकू आला. असे बऱ्याचदा झाल्याने सासरे थकून गेले. सून सापडत नाही, आता घरी माहेरी काय सांगणार, या विचाराने सासरे तेथेच निपचित होऊन पडले. मालक निपचित पडलेला पाहून घोड्यानेही आपला देह ठेवला. दुसऱ्या दिवशी पद्मावतीने सासूला स्वप्नदृष्टांत देऊन ज्या ठिकाणाहून गुप्त झाली त्या स्थानाची माहिती दिली. त्यानुसार कुटुंबीयांनी तेथे जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे पद्मावतीचे दागिने एक तांदळा सापडला. ग्रामस्थांनी दागिने त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून तांदळा सापडला तेथे सुंदर मंदिर बांधले. तेच हे पद्मावती मंदिर. या मंदिराबाहेर पद्मावतीचे सासरे घोडा यांच्या समाध्याही आहेत. तेव्हापासून पद्मावती देवी घोसपुरीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे

घोसपुरी गावातील पद्मावती मंदिराचा परिसर सुशोभित केलेला दिसतो. परिसरात सर्वत्र फरसबंदी करून शोभेची झाडे लावण्यात आली आहेत, त्यामुळे हा परिसर प्रसन्न भासतो. मंदिराभोवती तटबंदी असून त्यात मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी दोन उंच दीपमाळ आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्याच्या भिंतीवर, खांबांवर छतावरही सर्वत्र विविधरंगी काच तुकड्यांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट आहे. सभागृहातून पुढे गेल्यावर तीन गाभारे दिसतात. त्यातील मध्य असलेल्या मुख्य गाभाऱ्यात पद्मावती देवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. उजवीकडील गाभाऱ्यात तुकाई देवी, तर डावीकडील गाभाऱ्यात गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात विठ्ठलरुक्मिणी, श्रीदत्त यांची मंदिरे आहेत. याशिवाय येथे एक प्राचीन विहीर आहे

मंदिराच्या तटबंदीला आतील बाजूंना अनेक ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांमध्ये पद्मावती देवीची जन्मापासून ते देवीचा तांदळा मिळेपर्यंतची माहिती चित्ररूपात देण्यात आली आहे. नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव असतो. या वेळी परिसरातील हजारो भाविक मंदिरात वास्तव्य करून देवीची पूजाअर्चा करतात. दरवर्षी नवव्या माळेला येथे होमहवन होते. त्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. तसेच दसऱ्याच्या दिवशी देवीची भव्य पालखी मिरवणूक निघते. यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात

उपयुक्त माहिती:

  • अहिल्यानगरपासून २६ किमी अंतरावर
  • अहिल्यानगर, पारनेरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात भक्तनिवासाची सुविधा

पद्मावती देवी मंदिर

घोसपुरी, तह. जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर में घोसपुरी माहुरगढ़ निवासिनी रेणुका माता का स्थान है और पद्मावती देवी मंदिर के नाम से प्रसिद्ध है। चूँकि यह स्थान जागृत एवं मनोकामना पूर्ण करने वाला होने के कारण यह हज़ारों श्रद्धालुओं के लिए श्रद्धा केंद्र है। मंदिर की भीतरी दीवारें और खंभे हर जगह रंगीन काँच के छोटे-छोटे टुकड़ों की अनूठी कलाकृति से सजे हुए हैं, इसलिए यह क्षेत्र में ‘काँच के मंदिर’ के रूप में भी प्रसिद्ध है।

मंदिर की जनश्रुति है कि श्रीगोंडा तहसील के विसापुर गाँव के जठार परिवार से रेणुका माता का एक भक्त हर साल माहुरगढ़ में देवी के दर्शन करने आता था। विवाह के कई दिनों बाद भी उसे संतान नहीं हुई, तो उसने माहुर देवी की पूजा की। उस रात देवी ने उसे दृष्टांत देकर सुबह खेत में जाने को कहा। देवी की आज्ञा के अनुसार जैसे ही वह खेत में पहुँचा, उसे एक छोटे बच्चे के रोने की आवाज़ सुनाई दी। जैसे ही वह आवाज़ की ओर गया, उसने एक पेड़ के नीचे एक नवजात लड़की को देखा। उसने उसे उठाया और घर ले आया। दंपति ने उसका नाम पद्मावती रखा और उसका पालन-पोषण किया।

कुछ सालों के बाद पद्मावती का विवाह अहिल्यानगर के मौजे रुईछत्ती गाँव के दरंदले परिवार में हुआ। उसके ससुर के पास बहुत ज़मीन थी। इसलिए पद्मावती खेती में भी उनकी सहायता करती थी। एक बार पद्मावती के ससुर ने खेती के काम के लिए कई लोगों को बुलाया था और अपनी बहू पद्मावती को उनके लिए भोजन बनाने के लिए कहा था। पद्मावती ने एक छोटे से बर्तन में 5 रोटियाँ और कुछ सब्ज़ियाँ पकाईं। जब उसके ससुर आए तो उसने उन्हें खाने की टोकरियाँ दीं। भोजन का समय हो गया था, दरंदले ने सभी को बुलाया। जब उन्होंने भोजन की टोकरियाँ देखीं, तो उनमें केवल 5 रोटियाँ थीं। इस बात की चिंता में कि यह भोजन इतने लोगों के लिए पर्याप्त कैसे होगा, उन्होंने थोड़ा-थोड़ा भोजन करने का निश्चय किया। पर जैसे-जैसे भोजन परोसा जा रहा था, वैसे-वैसे वह बढ़ने लगा। जितनी रोटियाँ परोसी गईं, फिर से उतनी ही रोटियाँ दिखाई देने लगीं। सब्जी के बारे में भी यही हुआ। सभी के भरपेट खाने के बाद भी भोजन बच गया।

पद्मावती के परिवार को जब यह बात पता चली, तो उन्होंने सोचा कि पद्मावती डायन है और उसे घर में रखना ठीक नहीं है। अगले दिन उन्होंने पद्मावती को उसके मायके भेजने का निर्णय लिया। पद्मावती और उसके ससुराल वालों ने घोड़े पर सवार होकर अपनी यात्रा प्रारंभ की। जैसे ही वे विसापुर के पास घोसपुरी पहुँचे, पद्मावती और उसके ससुराल वाले एक कुएँ के पास रुके। वहाँ का प्राकृतिक वातावरण देखकर पद्मावती प्रसन्न हुई। ससुराल वालों से बहुत दूर जाकर उसने अपने सारे आभूषण एक झरने के पास एक पाषाण के पास रख दिए और वह अदृश्य हो गई।

जब पद्मावती बहुत देर तक वापस नहीं लौटी, तो उसके ससुराल वालों ने आवाज़ लगाई। तभी बहुत दूर से ‘जी’ की आवाज़ आने लगी। जब उसके ससुराल वाले आवाज़ की ओर गए, तो उसी स्थान से फिर ‘जी’ की ध्वनि सुनाई दी। ऐसा कई बार हुआ और ससुर परेशान होकर थक गए। बहू नहीं मिली, अब परिवार और रिश्तेदारों को क्या बताऊँ, इस विचार से वो वहीं गिर पड़े। स्वामी को हताश पड़ा देख घोड़े ने भी अपने प्राण छोड़ दिए। अगले दिन पद्मावती ने अपनी सास को दृष्टांत दिया और उन्हें उस स्थान के बारे में बताया, जहाँ से वह अदृश्य हुई थी। तदनुसार जब परिवार ने वहाँ जाकर देखा, तो उन्हें वहाँ पद्मावती के गहने और देवी की मूर्ति मिली। ग्रामीणों ने गहने उनके परिवार को सौंप दिए और जहाँ मूर्ति मिली थी, वहाँ एक मनोहर मंदिर बनवाया। वही पद्मावती मंदिर है।

इस मंदिर के बाहर पद्मावती के ससुर और घोड़े की समाधि भी है। क्षेत्र में जगह-जगह पक्की सड़क बनाई गई है और सजावटी पेड़ लगाए गए हैं, इसलिए यह क्षेत्र रमणीक लगता है। मंदिर के चारों ओर दीवार है और मंदिर का मुख्य द्वार उसी में है। मुख्य द्वार के सम्मुख दो ऊँचे दीपस्तंभ हैं। प्रवेश द्वार से प्रवेश करने के बाद मंदिर प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर का स्वरूप एक सभामंडप और एक गर्भगृह जैसा है। मंदिर का सभामंडप विशाल है और इसकी दीवारों, खंभों और छत पर हर जगह रंग-बिरंगे काँच के टुकड़ों की अनूठी सजावट है। सभामंडप से गुजरने के बाद तीन गर्भगृह दिखाई देते हैं। इनके बीच में मुख्य गर्भगृह में पद्मावती देवी की मूर्ति स्थापित है। बाईं ओर के देवकोष्टक में गणेश की मूर्ति है, जबकि दाईं ओर के देवकोष्टक में तुकाई देवी की मूर्ति है। मंदिर प्रांगण में विठ्ठल-रुक्मिणी, श्रीदत्त के मंदिर हैं। इसके अलावा यहाँ एक प्राचीन कुआँ भी है। मंदिर की दीवार के भीतरी किनारों पर कई देवकोष्टक हैं। इन देवकोष्टकों में पद्मावती देवी के जन्म से लेकर देवी की मूर्ति प्राप्त करने तक की जानकारी चित्रों के रूप में दी गई है। नवरात्रि यहाँ का मुख्य त्यौहार है। इस दौरान क्षेत्र के हज़ारों श्रद्धालु मंदिर में रुककर देवी की पूजा करते हैं। हर साल नवमी तिथि को यहाँ होम-हवन होता है। उस दिन यहाँ बड़ा मेला आयोजित किया जाता है। साथ ही दशहरे के दिन देवी की भव्य पालकी यात्रा निकाली जाती है। इस समय हज़ारों श्रद्धालु उपस्थित रहते हैं।

प्रमुख विशेषताएँ

  • अहिल्यानगर से 26 कि.मी.
  • अहिल्यानगर, पारनेर से राज्य परिवहन सुविधा
  • निजी वाहन सीधे मंदिर पार्किंग स्थल तक जा सकते है
  • परिसर में श्रद्धालुओं के लिए सुविधाएँ
Back To Home