नागेश्वर मंदिर / लक्ष्मीनारायण मंदिर

पारनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

पराशर ऋषी संत निळोबा महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पारनेरमध्ये महादेवाची १२ मंदिरे असून ती पारनेरची १२ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पारनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले नागेश्वर मंदिर हे शहरातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक मानले जाते. असे सांगितले जाते की़ या मंदिरात संत निळोबाराय यांनी अनेक वर्षे राहून नागेश्वराची पूजाअर्चा केली होती. येथेच त्यांना पांडुरंगाने दर्शन दिले होते. जमिनीखाली अखंड सापडलेले हे मंदिर पारनेरचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या शेजारी पुरातन श्रीराम मंदिर श्रीलक्ष्मीनारायण मंदिर आहे.

एका आख्यायिकेनुसार, सध्या जेथे नागेश्वर मंदिर आहे तेथे पूर्वी गायरान भाग होता. चरता चरता एकदा एका गायीचा पाय मातीत अडकला. खूप प्रयत्न करूनही तो निघेना म्हणून गुराख्याने ग्रामस्थांच्या मदतीने गायीला तेथून सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गाय जेथे अडकून पडली होती तेथील बाजूची जमीन खोदण्यास सुरुवात केली असता त्यांना तेथे मंदिराचा कळस असल्याचे जाणवले. आणखी खोदकाम केल्यानंतर संपूर्ण मंदिर समोर आले, हेच आजचे नागेश्वराचे मंदिर होय. या मंदिराशेजारी प्राचीन बारव असून त्याला लागून श्रीराम मंदिर आहे.

पारनेर शहरातील नागेश्वर गल्लीत असलेले नागेश्वराचे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसे खाली असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते. येथील मुखमंडपात चौथऱ्यावर नंदी विराजमान आहे. तेथून पुढे सभामंडपात गेल्यावर मधोमध फूट व्यासाची वर्तुळाकार शिळा आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून त्यावर पितळी आवरण आहे.

असे सांगितले जाते की पराशर ऋषींच्या काळापासून या मंदिरात श्रावणात दररोज लघुरुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे. आजही ती अविरतपणे सुरू आहे. प्रत्येक सोमवारी, श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे भरणारी जत्रा ही पारनेरमधील मोठी जत्रा असते. या दिवशी मंदिरात पहाटे वाजल्यापासून पूजा, अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी दुपारी १२ वाजता महाआरती होते. दररोज सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.

नागेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या एका जुन्या वाड्यात पेशवेकालीन श्रीराम मंदिर आहे. हे मंदिर खासगी मालकीचे असल्याने तेथे फारसे उत्सव साजरे होत नाहीत; परंतु या मंदिराचे दगडी बांधकाम गाभाऱ्यातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. श्रीराम मंदिराचा कळस आणि नागेश्वर मंदिराचा कळस यांची उंची त्यावरील कलाकुसर जवळपास सारखीच आहे. या मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यात श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या शाळीग्राम शिळेतील मूर्ती आहेत. या मूर्तींच्या खालच्या बाजूला शुभ्र संगमरवरी विष्णू मूर्ती आहे.

नागेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला दशावतारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख विष्णू मंदिरांमध्ये पारनेर येथील या दशावतारी लक्ष्मीनारायण मंदिराचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात १२ व्या शतकातील प्राचीन मूर्ती आहेत. अखंड दगडातून कोरलेल्या या मूर्ती ते फुटांच्या असून त्यावर अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेली दिसते. येथील लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीमध्ये मत्स्य, कुर्म, वराह, परशुराम, वामन, नरसिंह, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी हे १० अवतार कोरलेले आहेत. अशी विष्णूमूर्ती दुर्मिळ समजली जाते. या मूर्तीच्या एका बाजूला लक्ष्मी दुसऱ्या बाजूला पद्मावती देवी यांच्या मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की या सर्व मूर्ती मंदिरासमोरील एका विहिरीत सापडल्या होत्या. सुमारे ३०० वर्षांपूर्वी एका भाविकाला झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार त्याने या विहिरीत शोध घेतला असता या मूर्ती आढळल्या. मार्गशीर्ष प्रतिपदेला येथे मूर्ती स्थापना दिवस साजरा केला जातो. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी सायंकाळी .३० वाजता या मंदिरात आरती होते.

उपयुक्त माहिती:

  • पारनेर बस स्थानकापासून पायी १० मिनिटे, तर अहिल्यानगरपासून ४० किमी अंतरावर
  • अहिल्यानगर, पुणे, कल्याण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने नागेश्वर मंदिरापर्यंत थेट जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय

नागेश्वर मंदिर / श्रीलक्ष्मीनारायण मंदिर

पारनेर, तह. पारनेर, जि. अहिल्यानगर

निलोबा महाराज और पराशर ऋषि के वास से पावन हुए पारनेर में महादेव के १२ मंदिर स्थित हैं। इन्हें “पारनेर के १२ ज्योतिर्लिंग” के नाम से जाना जाता है। इन्हीं में पारनेर शहर के मध्य में स्थित नागेश्वर मंदिर को शहर के प्रमुख देवस्थानों में से एक माना जाता है। ऐसा कहा जाता है कि संत निलोबाराय ने इस मंदिर में कई वर्षों तक रहकर नागेश्वर की पूजा-अर्चना की थी। यहीं उन्हें विठ्ठल के दर्शन भी हुए थे। भूमि के नीचे अखंड रूप में प्राप्त यह मंदिर पारनेर का ग्रामदैवत है। इस मंदिर के पास प्राचीन श्रीराम मंदिर और श्रीलक्ष्मीनारायण मंदिर भी हैं।

एक जनश्रुति के अनुसार, जहाँ वर्तमान में नागेश्वर मंदिर है, वहाँ पहले गोचर भूमि थी। एक बार गाय चराते समय, उसका पैर मिट्टी में फँस गया। अनेक प्रयासों के पश्चात भी वह बाहर नहीं निकला। इसलिए ग्वाले ने ग्रामीणों की सहायता से गाय को निकालने का प्रयास किया, पर सफलता नहीं मिली। तब लोगों ने गाय जहाँ फँसी थी, वहाँ की मिट्टी खोदना प्रारंभ किया। तब उन्हें मंदिर का कलश दिखाई दिया। आगे खुदाई करने पर पूरा मंदिर प्रकट हुआ – यही आज का नागेश्वर मंदिर है। इस मंदिर के पास प्राचीन बावड़ी है और उससे सटा श्रीराम मंदिर है।

पारनेर शहर की नागेश्वर गली में स्थित यह नागेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली में बना है। इसमें मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह हैं। यह मंदिर ज़मीन से कुछ नीचे स्थित है। इसलिए अंदर जाने के लिए सीढ़ियाँ उतरनी पड़ती हैं। मुखमंडप में चबूतरे पर नंदी विराजमान हैं। वहाँ से आगे सभामंडप में मध्य में ६ पद व्यास की वृत्ताकार शिला है। गर्भगृह में स्वयंभू शिवलिंग स्थित है, जिस पर पीतल का मुखौटा चढ़ा है।

कहा जाता है कि पराशर ऋषि के काल से यहाँ श्रावण मास में प्रतिदिन लघुरुद्राभिषेक की परंपरा है। यह परंपरा आज भी निरंतर जारी है। प्रत्येक सोमवार, श्रावणी सोमवार और महाशिवरात्रि पर यहाँ दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है। महाशिवरात्रि के दिन लगने वाला मेला पारनेर का प्रमुख उत्सव होता है। इस दिन प्रात: ४ बजे से पूजा और अभिषेक जैसे धार्मिक कार्यक्रम होते हैं। महाशिवरात्रि और श्रावणी सोमवार को दोपहर १२ बजे महाआरती होती है। प्रतिदिन सुबह ६ से रात १० बजे तक श्रद्धालु दर्शन कर सकते हैं।

नागेश्वर मंदिर के पास एक पुरानी हवेली में पेशवाकालीन श्रीराम मंदिर स्थित है। चूँकि यह निजी संपत्ति है, इसलिए वहाँ विशेष उत्सव नहीं मनाए जाते। लेकिन मंदिर की पत्थर की वास्तुकला और गर्भगृह की मूर्तियाँ विशेष रूप से दर्शनीय हैं। श्रीराम मंदिर का कलश और नागेश्वर मंदिर का कलश, दोनों की ऊँचाई और उन पर की गई कला एक जैसी प्रतीत होती है। गर्भगृह विशाल है। इसमें शालिग्राम पाषाण से बनी श्रीराम, लक्ष्मण और सीता की मूर्तियाँ हैं। मूर्तियों के नीचे श्वेत संगमरमर की विष्णु मूर्ति भी विराजमान है।

नागेश्वर मंदिर के दाईं ओर दशावतारी श्रीलक्ष्मीनारायण मंदिर स्थित है। महाराष्ट्र के प्रमुख विष्णु मंदिरों में पारनेर स्थित यह मंदिर विशेष उल्लेखनीय माना जाता है। पूर्वाभिमुख इस मंदिर में १२वीं शताब्दी की प्राचीन मूर्तियाँ हैं। एक ही पाषाण से बनी ४ से ५ पद ऊँची ये मूर्तियाँ अत्यंत मनोहर नक्काशी से अलंकृत हैं। श्रीलक्ष्मीनारायण की इस मूर्ति में मत्स्य, कूर्म, वराह, परशुराम, वामन, नरसिंह, राम, कृष्ण, बुद्ध और कल्कि – ये दस अवतार उकेरे गए हैं। ऐसी विष्णु मूर्ति को दुर्लभ माना जाता है। मूर्ति के एक ओर लक्ष्मी देवी और दूसरी ओर पद्मावती देवी की मूर्तियाँ हैं। कहा जाता है कि सभी मूर्तियाँ मंदिर के सम्मुख स्थित एक कुएँ से प्राप्त हुई थीं। लगभग ३०० वर्ष पूर्व एक भक्त को स्वप्न में दृष्टांत मिलने पर जब उस कुएँ की खुदाई की गई, तो ये मूर्तियाँ मिलीं। मार्गशीर्ष प्रतिपदा को यहाँ मूर्ति स्थापना दिवस मनाया जाता है। इस दिन पूरे दिन धार्मिक कार्यक्रमों का आयोजन होता है। प्रत्येक दिन सुबह और सायंकाल ६:३० बजे मंदिर में आरती होती है।

मुख्य विशेषताएँ

  • पारनेर बस स्थानक से पैदल १० मिनट, अहिल्यानगर से ४० किमी दूरी
  • अहिल्यानगर, पुणे, कल्याण से एसटी सेवा उपलब्ध
  • निजी वाहन नागेश्वर मंदिर तक पहुँच सकते हैं
  • आसपास निवास और जलपान के कई विकल्प उपलब्ध
Back To Home