मल्लिकार्जुन मंदिर

घोटण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर

शेवगाव तालुक्यातील घोटण येथे मल्लिकार्जुन हे महादेवाला समर्पित मंदिर आहे. यादवकालीन स्थापत्य कलेचा सुंदर नमुना म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील गाभारा हा सभामंडपापासून सुमारे १५ फूट खोल असून तेथे असलेल्या शिवलिंगाजवळ पाण्याचा जिवंत झरा आहे. असे सांगितले जाते की मल्लिक ऋषींच्या आज्ञेने अर्जुनाने येथे तपश्चर्या केली होती, म्हणून या स्थानालामल्लिकार्जुननाव पडले.

या मंदिराची आख्यायिका अशी की धृतराष्ट्र पुत्र कौरव आणि मगध देशाचा राजा जरासंध यांनी अर्जुन पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिचे वडील विराट राजा यांच्याकडील गोधन पळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत सुटल्या. तेथे असणाऱ्या मल्लिक ऋषींनी या गायींना आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणालागो ठाणअसे नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊनघोटणझाले. कौरव पांडवांचे युद्ध होण्यापूर्वी या ठिकाणी अर्जुनाने या गायींच्या संरक्षणासाठी कौरवांबरोबर एक युद्ध केले होते. त्यात कौरवांचा पराभव करून विराट राजाला गोधन परत मिळवून दिले होते. तेव्हापासून येथे मल्लिकार्जुन मंदिर आहे

सध्या असलेले मंदिर हे १००० ते १२०० वर्षांपूर्वीचे असून चारही बाजूंनी त्याला तटबंदी आहे. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या सभामंडपात २४ खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्लयुद्ध, तसेच काही मैथुन शिल्पे आहेत. सभागृहात एक गद्धेगळ (एक प्रकारची शापवाणी किंवा शिवी. पूर्वीच्या काळी अनेकांना लिहिता वाचता येत नसे म्हणून अशा प्रकारची शिल्परचना केली जात असे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा बोध होई) आणि त्यावर देवनागरी लिपीतील मजकूर आहे. हा सभामंडप खुला असून अशा रचनेलारंगमंडपअसे संबोधले जाते.

या मंदिराचे वेगळेपण म्हणजे येथील गर्भगृह. साधारणतः शिवमंदिराचा गाभारा हा ते फूट खाली असतो; परंतु येथील गाभारा हा १५ फूट खाली असून तो टप्प्यांत विभागलेला आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना कुबेरमूर्ती कोरलेल्या आहेत. येथील द्वारशाखाही अनेक कोरीव शिल्पांनी सजलेली दिसते. त्यामध्ये विविध फुले, वेली यांचा समावेश आहे. या दरवाजाच्या ललाटबिंबावर (गर्भगृहाच्या दाराच्या वरील बाजूस मधोमध मूर्ती असते ती जागा) धनुष्यधारी महादेवांची मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला विद्याधर (महादेवांचे सोबती, उपदेव) हातात पुष्पमाळा घेऊन महादेवांना वंदन करताना दिसतात. साधारणतः प्राचीन महादेवांच्या मंदिरांमध्ये ललाटबिंबावर गणपती अथवा शंकराची प्रतिमा पाहायला मिळते, पण अशा प्रकारचे ललाटबिंब अन्यत्र कुठे दिसत नाही. या ललाटबिंबाच्यावर अनेक ऋषींच्या ध्यानस्थ मूर्ती कोरलेल्या दिसतात.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारातून शिवपिंडीपर्यंत जाण्यासाठी टप्पे आहेत. पायऱ्या उतरल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होतो. येथे खांब असून त्यावर विविध शिल्पे आहेत. तेथे खाली असलेल्या शिवपिंडीच्या समोरील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. येथून १० पायऱ्या खाली उतरल्यावर प्राचीन शिवपिंडी दिसते. या पायऱ्यांवरही अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिवपिंडीजवळ जिवंत झरा असून तेथे कायम पाणी असते. अशा प्रकारच्या शिवलिंगालापाताळलिंगम्हणून ओळखले जाते.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मल्लिकार्जुनाचा मोठा उत्सव असतो. यावेळी तेथे जत्रा असते. पहाटे वाजल्यापासून रात्री १० पर्यंत भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. भजन, कीर्तन यांसोबतच नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा फड या दिवशी येथे रंगतो. रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. महाशिवरात्रीलाही येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. दररोज सकाळी संध्याकाळी वाजता आरती होते. भाविकांना सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पर्यंत मल्लिकार्जुन महादेवाचे दर्शन घेता येते

उपयुक्त माहिती:

  • अहमदनगरपासून ७६ तर, शेवगावपासून . किमी अंतरावर
  • शेवगावपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home