कोरठण खंडोबा मंदिर 

पिंपळगाव रोठा, ता. पारनेर,जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले पिंपळगाव रोठा या गावातील प्राचीन खंडोबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे खंडोबाची कोणतीही घडीव मूर्ती नाही. दररोज देवाचे नवीन रूप येथे पाहायला मिळते. ‘बिन टाक्याचा देवम्हणून याला पूर्वी देवाचेकोरं ठाणंअसे म्हणत. त्यानुसार या स्थानाचे पुढे कोरठण हे नाव प्रचलित झाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी एक असलेले श्री क्षेत्र कोरठण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पारनेर तालुक्यात वसलेले पिंपळगाव रोठा हे समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंचीवर आहे. कोरठण खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखानुसार या मंदिराचे बांधकाम १४९१ च्या सुमारास झाले. येथे स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्ती असून त्यांच्यापुढे स्वयंभू १२ लिंगे आहेत. येथील मूर्तींना दररोज स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे लावले जातात वस्त्रेअलंकार परिधान केले जातात. त्यामुळे येथील मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पाहायला मिळतात. पगडी, शाल, फुलांची सजावट यामुळे खंडोबाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.

पौष पौर्णिमेला श्री क्षेत्र कोरठण येथे भरणारी खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखांहून अधिक भाविक येथे येतात, अशी नोंद आहे. यामध्ये पहिल्या दिवशी खंडोबाचे मंगलस्नान पूजाविधी केली जाते. दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी परंपरेनुसार पिंपळगाव रोठा, कान्हूर पठार, पारनेर, टाकळी ढोकेश्वर, नारायणगाव, मंचर, जुन्नर, पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो बैलजोड्या मंदिर परिसरात दाखल होतात. बैल मालकांकडून यावेळी बैलांची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत बैलगाडा स्पर्धेसाठी संधी मिळणे हा खंडोबाचा आशीर्वाद समजला जातो. त्यामुळे मोठे बक्षीस नसतानाही या शर्यतीत ४०० ते ४५० बैलगाड्या सहभागी होतात.

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे १०० ते १५० फूट उंचीच्या (साधारणतः १५ मजली इमारतीइतक्या) मानाच्या काठ्या. तिसऱ्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखोंच्या संख्येने आलेले भाविक या मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला टेकवून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. येथील बेल्हा आणि ब्राह्मणगाव येथून शाही मिरवणुकीने आलेल्या उंच काठ्यांना विशेष मानाचे स्थान असून त्यांची तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांसारख्या सरकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय पूजा केली जाते. मानाच्या काठय़ांबरोबरच परिसरातील अळकुटी, बेल्हे, साकुरी, तांदळी वडगाव, माळवाडी, राजापूर, सावरगाव घुले, कासारे कळस या गावांतील पालख्या हजारो भाविकांसह भंडाऱ्याची उधळण करीत येथे येतात.

मध्ययुगात बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुवर्णकळस बसविण्याचा सोहळा डिसेंबर १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. तेव्हापासून हा दिवस येथेसंतमेळा दिवसम्हणून साजरा करण्यात येतो. वार्षिक यात्रा उत्सवासोबतच सोमवती अमावास्या आणि प्रत्येक पौर्णिमेला येथे उत्सव असतो. सोमवती अमावास्येला या परिसरात दीपमाळांवर दिवे लावण्यात येतात.

प्रांगणात खंडोबा म्हाळसा घोड्यावरील मूर्तीचे मंदिर स्वामी गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे. याशिवाय विविध सोहळ्यांसाठी देवस्थानातर्फे येथे भव्य सभागृह उभारण्यात आला आहे. धर्मशाळा, जागरगोंधळ विधीसाठी जागा, महाप्रसादासाठी सभागृह, भक्त निवास दर्शन बारी अशा सुविधा देवस्थानतर्फे करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून कोरठण खंडोबा देवस्थानाचावर्ग तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सकाळी ते सायंकाळी .३० पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते. सकाळी , दुपारी १२ आणि सायंकाळी .३० वाजता आरती होते, तर दर रविवारी आणि पौर्णिमेला सकाळी वाजता आरती होते.

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून २६ किमी, तर अहिल्यानगरपासून ५९ किमी अंतरावर
  • पारनेर, कान्हूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
Back To Home