
अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले पिंपळगाव रोठा या गावातील प्राचीन खंडोबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे खंडोबाची कोणतीही घडीव मूर्ती नाही. दररोज देवाचे नवीन रूप येथे पाहायला मिळते. ‘बिन टाक्याचा देव’ म्हणून याला पूर्वी देवाचे ‘कोरं ठाणं’ असे म्हणत. त्यानुसार या स्थानाचे पुढे कोरठण हे नाव प्रचलित झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी एक असलेले श्री क्षेत्र कोरठण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पारनेर तालुक्यात वसलेले पिंपळगाव रोठा हे समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंचीवर आहे. कोरठण खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखानुसार या मंदिराचे बांधकाम १४९१ च्या सुमारास झाले. येथे स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्ती असून त्यांच्यापुढे स्वयंभू १२ लिंगे आहेत. येथील मूर्तींना दररोज स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे लावले जातात व वस्त्रे–अलंकार परिधान केले जातात.
त्यामुळे येथील मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पाहायला मिळतात. पगडी, शाल, फुलांची सजावट यामुळे खंडोबाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण भासते.
पौष पौर्णिमेला श्री क्षेत्र कोरठण येथे भरणारी खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. ३ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी राज्यभरातून ५ लाखांहून अधिक भाविक येथे येतात, अशी नोंद आहे. यामध्ये पहिल्या दिवशी खंडोबाचे मंगलस्नान व पूजाविधी केली जाते. दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती व देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी परंपरेनुसार पिंपळगाव रोठा, कान्हूर पठार, पारनेर, टाकळी ढोकेश्वर, नारायणगाव, मंचर, जुन्नर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो बैलजोड्या मंदिर परिसरात दाखल होतात. बैल मालकांकडून यावेळी बैलांची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत बैलगाडा स्पर्धेसाठी संधी मिळणे हा खंडोबाचा आशीर्वाद समजला जातो.
त्यामुळे मोठे बक्षीस नसतानाही या शर्यतीत ४०० ते ४५० बैलगाड्या सहभागी होतात.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे १०० ते १५० फूट उंचीच्या (साधारणतः १५ मजली इमारतीइतक्या) मानाच्या काठ्या. तिसऱ्या व यात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखोंच्या संख्येने आलेले भाविक या मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला टेकवून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. येथील बेल्हा आणि ब्राह्मणगाव येथून शाही मिरवणुकीने आलेल्या उंच काठ्यांना विशेष मानाचे स्थान असून त्यांची तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांसारख्या सरकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय पूजा केली जाते. मानाच्या काठय़ांबरोबरच परिसरातील अळकुटी, बेल्हे, साकुरी, तांदळी वडगाव, माळवाडी, राजापूर, सावरगाव घुले, कासारे व कळस या गावांतील पालख्या हजारो भाविकांसह भंडाऱ्याची उधळण करीत येथे येतात.
मध्ययुगात बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व सुवर्णकळस बसविण्याचा सोहळा ५ डिसेंबर १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. तेव्हापासून हा दिवस येथे ‘संतमेळा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. वार्षिक यात्रा उत्सवासोबतच सोमवती अमावास्या आणि प्रत्येक पौर्णिमेला येथे उत्सव असतो. सोमवती अमावास्येला या परिसरात व दीपमाळांवर दिवे लावण्यात येतात.
प्रांगणात खंडोबा म्हाळसा घोड्यावरील मूर्तीचे मंदिर व स्वामी गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे. याशिवाय विविध सोहळ्यांसाठी देवस्थानातर्फे येथे भव्य सभागृह उभारण्यात आला आहे. धर्मशाळा, जागर–गोंधळ विधीसाठी जागा, महाप्रसादासाठी सभागृह, भक्त निवास व दर्शन बारी अशा सुविधा देवस्थानतर्फे करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून कोरठण खंडोबा देवस्थानाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ७.३० पर्यंत भाविकांना मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते. सकाळी ७, दुपारी १२ आणि सायंकाळी ७.३० वाजता आरती होते, तर दर रविवारी आणि पौर्णिमेला सकाळी ८ वाजता आरती होते.

अहिल्यानगर और पुणे जिलों की सीमा पर स्थित पिंपलगाँव रोठा गाँव में प्राचीन खंडोबा मंदिर श्रद्धालुओं के लिए पूजा स्थल है। इस स्थान की विशेषता यह है कि यहाँ खंडोबा की कोई नक्काशीदार मूर्ति नहीं है। यहाँ हर दिन भगवान का एक नया रूप देखने को मिलता है।
अहिल्यानगर जिले के सबसे ऊँचे मंदिरों में से एक श्री क्षेत्र कोरठन एक प्रसिद्ध तीर्थ स्थल है। पारनेर तहसील में स्थित पिंपलगाँव रोठा समुद्र तल से 951 मीटर की ऊँचाई पर है। कोरठन खंडोबा मंदिर के प्रवेश द्वार पर लगे शिलालेख के अनुसार इस मंदिर का निर्माण वर्ष 1491 के आसपास हुआ था। यहाँ खंडोबा, म्हालसा और बानाई की स्वयंभू मूर्तियाँ हैं और उनके सामने 12 स्वयंभू लिंग हैं। यहाँ की मूर्तियों को प्रतिदिन स्नान के बाद चंदन का लेप लगाया जाता है और उन पर चांदी की आँखें रखी जाती हैं। उन्हें वस्त्र-आभूषण पहनाए जाते हैं। इसलिए यहाँ की मूर्तियाँ हर दिन नए रूप में देखी जा सकती हैं। पगड़ी, शॉल और फूलों की सजावट खंडोबा की मूर्ति को अनूठा बनाती है।
पौष की पूर्णिमा के दिन श्री क्षेत्र कोरठन में आयोजित खंडोबा मेला प्रसिद्ध है। ऐसा दर्ज है कि इस 3 दिवसीय तीर्थ उत्सव के लिए संपूर्ण राज्य से 5 लाख से अधिक श्रद्धालु यहाँ आते हैं। पहले दिन खंडोबा का पवित्र स्नान और पूजा की जाती है। दूसरे दिन बैलगाड़ी दौड़ और देवदर्शन का कार्यक्रम होता है। इसके लिए परंपरा के अनुसार पिंपलगाँव रोठा, कान्हूर पठार, पारनेर, टाकली ढोकेश्वर, नारायणगाँव, मंचर, जुन्नर, पुणे और अहिल्यानगर जिलों से सैकड़ों बैल जोड़े मंदिर परिसर में प्रवेश करते हैं। बैल मालिक इस अवसर पर बैलों की शोभायात्रा निकालते हैं। इस मेले में बैलगाड़ी प्रतियोगिता का अवसर मिलना खंडोबा का आशीर्वाद माना जाता है। इसलिए कोई बड़ा पुरस्कार न होने पर भी 400 से 450 बैलगाड़ियाँ इस दौड़ में भाग लेती हैं।
इस मेले में 100 से 150 पद ऊँची लाठ का विशेष सम्मान रहता है। मेले के तीसरे और अंतिम दिन लाखों श्रद्धालु इन सम्मान की लाठ को मंदिर के कलश पर रखते हैं और भंडारा (हल्दी) एवं नारियल चढ़ाते हैं। यहाँ बेल्हा और ब्राह्मणगाँव से राजसी जुलूस के साथ आने वाली ऊँची लाठ का विशेष सम्मान है।
प्रशासन और पुलिस जैसे सरकारी अधिकारी इसकी पूजा करते हैं। अलकुटी, बेल्हे, साकुरी, तांदली वडगाँव, मालवाड़ी, राजापुर, सावरगाँव घुले, कासारे और कलस के आसपास के गाँवों से भी सम्मान लाठ एवं पालकी के साथ हज़ारों श्रद्धालु भंडारा उछालते हुए यहाँ आते हैं।
मध्य युग में निर्मित इस मंदिर का 5 दिसंबर 1997 को स्वामी गगनगिरी महाराज द्वारा चंपाषष्ठी के शुभ दिन पर जीर्णोद्धार किया गया और स्वर्णकलश स्थापित किया गया। तब से इस दिन को यहाँ ‘संत मेला दिन’ के रूप में मनाया जाता है। वार्षिक मेला उत्सव के साथ-साथ यहाँ सोमवती अमावस्या और हर पूर्णिमा को उत्सव होता है। सोमवती अमावस्या पर परिसर में और दीपस्तंभ पर दीप जलाए जाते हैं। प्रांगण में खंडोबा म्हालसा घोड़े की मूर्ति का मंदिर और स्वामी गगनगिरी महाराज का मंदिर है। इसके अलावा मंदिर की ओर से यहाँ विभिन्न अनुष्ठानों के लिए एक भव्य सभामंडप बनाया गया है। मंदिर की ओर से धर्मशाला, जागरण-गोंधल अनुष्ठान के लिए स्थान, महाप्रसाद के लिए सभामंडप, श्रद्धालुओं के रहने की जगह और दर्शन पंक्ति जैसी सुविधाएँ प्रदान की गई हैं।
राज्य सरकार ने कोरठन खंडोबा मंदिर को ‘बी’ श्रेणी के तीर्थ स्थलों की सूची में शामिल किया है। भक्त सुबह 6 बजे से शाम 7:30 बजे तक मंदिर में आकर खंडोबा के दर्शन कर सकते हैं। सुबह 7 बजे, दोपहर 12 बजे और शाम 7:30 बजे आरती की जाती है, जबकि हर रविवार और पूर्णिमा को सुबह 8 बजे आरती की जाती है।